सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः .... कालाय तस्मै नमः ।
आज, वरील सुभाषित, वर्तमानाचे भान ठेवत काही शब्द बदलून, मराठीत, "ते रम्य शहर, ते पंतप्रधान, ते मंत्री आणि लोकप्रतिनिधी, पार्श्वभूमीवर ती विद्वानांची सभा, त्या चन्द्रमुखी युवती, तो तरूणांचा घोळका, ते भाटचारण तसेच माध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या कथा, हे सर्व पहात असताना परत परत कालाय तस्मै नमः," असे म्हणावेसे वाटत आहे.
२८ सप्टेंबर २०१४ - न्यूयॉर्क आणि एकूणच अमेरीकेतील अनिवासी भारतीयांसाठी एक आठवणीत राहील असा दिवस ठरला आहे. बास्केट बॉल, आईस-हॉकी, महम्मद अली सारखे बॉक्सर्स, ब्रुस स्प्रिंगस्टीन सारख्यांच्या कॉन्सर्ट्स यांनी भरून जाणारे हे स्टेडीयम काल (२८ सप्टेंबरला) भारतीयांनी भरून गेले होते. ह्या स्टेडीयमच्या इतिहासात नक्कीच पण किंबहूना एकंदरीतच अमेरीकेत एखाद्या बाहेरील राष्ट्रप्रमुखाचे त्याच्या देशातील मूळ रहीवाशांनी केलेल्या एव्हढ्या मोठ्या स्वागताचा हा पहीलाच प्रसंग असावा. एकूण ४०८ विविध भारतीय संस्थांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे तिकीट मोफत होते. पण त्यासाठी आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आणि कुठल्या संस्थेकडून करत आहात हे सांगणे गरजेचे होते. रजिस्ट्रेशन नंतर प्रत्येक नावाची खात्री केली गेली आणि नंतर प्रिंटेड तिकीट दिले गेले.
सगळ्यांना न्यूयॉर्कला येणे शक्य नव्हते, विशेष करून विद्यार्थ्यांना त्यामुळे १९ राज्यांमधल्या ४५ विद्यापिठांमधल्या भारतीय विद्यार्थी संघटनांनी थेटप्रक्षेपणा एकत्रित पहाण्याची विशेष व्यवस्था केली होती. तुमच्यातल्या अनेकांनी देखील हा कार्यक्रम इंटरनेटद्वारा पाहीलेला असू शकतो.
पहाटे चार वाजता बॉस्टनहून निघालो आणि पार्कींग वगैरे मिळून सव्वा आठच्या दरम्यान मॅडीसन स्क्वेअर गार्डनच्या बाहेरच्या आवारात पोचलो तर मैलभर किंवा त्याहूनही मोठी रांग! सुरवातीस मोठी रांग पाहून सुरक्षेतून वगैरे वेळेत पोचू का अशी शंका होती पण व्यवस्था चांगली होती हे अनुभव आल्यावर समजले!
१८,००० जागांचे हे स्टेडीयम भरले होते. त्यात अक्षरशः अबालवृद्ध, विविध भाषिक भारतीय, विविध धर्मिय, पंथीय दिसले. भारतात असताना भाजपाचे पारंपारीक समर्थक असलेले जसे यात होते तसे अगदी भाजपाचे पारंपारीक समर्थक नसलेले देखील होते. पण यातील प्रत्येकाला मोदींमुळे काही चांगले बदल घडतील अशी आशा किंबहूना खात्रीच आहे असे जाणवत होते.
आत प्रवेश केल्यावर प्रत्येक तिकीटास एक अशा पध्दतीने एक टिशर्ट देण्यात आला. लहानसे अमेरीकन आणि भारतीय झेंडे पण वाटणे चालले होते. त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! मोदी ११:३० ला येणार होते. त्या आधी आत बसलेल्या मोठ्या जनसमुदायास खिळवून ठेवण्यासाठी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम झाले.
नंतर कविता कृष्णमुर्ती यांनी काही गाणी म्हणली. ह्यातील एका गाण्याच्या वेळेस एक अमेरीकन चित्रकाराने रंगाचे फराटे मारत ज्या पद्धतीने मोदींचे चित्र काढले ते प्रत्यक्ष बघताना खूपच आवडले. जनतेने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. मिस अमेरीका २०१४४ निना दावुलूरी आणि अमेरीकेतील पब्लीक ब्रॉडकास्टींग स्टेशनचा वृत्त निवेदक हरी श्रीनिवासन हे कार्यक्रमाचे संयोजन करत होते. वातावरणात प्रचंड उत्साह दिसत होता.
मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर स्टेजवर अमेरीकन राजकीय नेत्यांना बोलावण्यात आले. त्यात जवळपास ३० सिनेटर्स, काँग्रेसमेन आणि साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर (भारतीय वंशाच्या) निकी हिली असे सर्व स्टेजवर आले. त्यांच्या उपस्थित मग मोदींचे स्वागत झाले!
नंतर अमेरीकन आणि भारतीय राष्ट्रगीताने अधिकृत कार्यक्रमाची सुरवात झाली.
मोदींच्या भाषणात एकाच वेळेस भारतीय, अनिवासी भारतीय आणि अमेरीकन राज्यकर्ते, धोरणकर्ते तसेच उद्योजक यांच्याशी संवाद करण्याचे कौशल्य जाणवले. भाषण केवळ गोडगोड नव्हते तर देश घडवण्यासाठी प्रत्येकाकडून सहकार्य मिळवण्याचे आवाहन त्यात होते. भाषण पूर्णपणे हिंदीत झाले. पण क्षणार्धात भाषांतर करून ते स्क्रीन वर सबटायटल म्हणून दाखवले जात होते. तसेच, स्वतः मोदी जनतेला भावेल अशा शब्दात बोलत असताना देखील त्यांच्या कौतूकाने ओतप्रोत भरलेल्या प्रसंगात देखील पाय जमिनीवरच ठेवून होते असे त्यांच्या हालचालींवरून समजू शकत होते.
कार्यक्रमानंतर अनेकांशी संवाद झाला तसेच फेसबूक अपडेट्स पाहीले. यातील अनेक जण हे कधीच भाजपाचे नव्हते, मोदींचे असण्याचा प्रश्नच नाही... पण तरी देखील यातील प्रत्येकास/प्रत्येकीस देशाला नेतॄत्व मिळाले असे वाटत होते. मोदींच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि जे काही बातम्यातून वाचले जात आहे त्यातून सतत काहीतरी वेगळा विचार आणि त्याबरोबर सक्रीयता दिसत आहे. जर हा आलेख सकारात्मक वाढत राहीला तर जनता केवळ मोदींवरच खुश होईल असे नाही तर जो काही राज्यकर्ते, सरकार या बद्दलचा भ्रमनिरास झालेला आहे, भारतीय व्यवस्थेबद्दल नैराश्य आले आहे, त्यातून बाहेर पडू शकेल असे वाटते. ते तसेच व्हावे अशी मनोमन प्रार्थना!
माझ्या दृष्टीने स्टेजवर झालेले मोदींचे स्वागत, हे कार्यक्रमाचे एकाअर्थी शिखर होते.
ज्या माणसाला मुळच्या त्याच्याच देशातील असलेल्या व्यक्तींनी राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला आणि अमेरीकेतील कधिही न वापरल्या गेलेल्या एका कायद्याचा वापर करत अमेरीकन सरकारला असलेला व्हिसा रद्द करायला लावला आणि जे अमेरीकन सरकारने देखील ऐकले, त्या माणसास आज त्याच्याच देशातील जनतेनी निर्विवाद बहुमताने निवडून दिल्यावर अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! ह्यात मोदींची प्रतिमा जशी स्पष्ट दिसत होती तशीच "मोदी भक्त" नाही तर मोदींनी घेतलेल्या आव्हानाचे आणि कार्याचे समर्थक असलेल्या अनिवासी भारतीयांचे अमेरीकेतील राजकीय सामर्थ्य देखील दिसू शकले.
हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
प्रतिक्रिया
1 Oct 2014 - 2:23 pm | विनोद१८
एव्हढा समजुतदारपणा अजून तरी ना विरोधी पक्ष दाखवित आहेत ना त्या मिडीयाकडे दिसत आहे. दिसते ती केवळ आणि केवळ त्यांची मोदींबद्दलची असुया, मोदींचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे त्यांना आकलन झाले आहे का ?? याबद्दल मला शंका आहे.
माझ्या मते 'एकटा मोदी' या सर्वांना ( तथाकथित बलहीन व भाकड विरोधक ) पुरून उरेल हे नक्की.
1 Oct 2014 - 5:10 pm | नगरीनिरंजन
मोदी हे निओ-लिबरलांचे अवतारपुरुष आहेत आणि ज्यांच्यावर काही काळाने रडण्याची वेळ येऊ शकते असे भारतवासीही त्यांच्या भजनात (फालतू धार्मिक अथवा राष्ट्रीय अस्मितेची अफू खाऊन) दंग आहेत.
अमेरिकेत राहूनही अमेरिकेचं जहाज का डळमळतंय हे न कळणार्या आणि निरंतर डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणार्या भारतीयांबद्दल तर काय बोलायचं?
तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे.
1 Oct 2014 - 5:22 pm | मदनबाण
अमेरिकेत राहूनही अमेरिकेचं जहाज का डळमळतंय हे न कळणार्या आणि निरंतर डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणार्या भारतीयांबद्दल तर काय बोलायचं?
मी काय म्हणतो... याच्यावर सरळ एक वेगळा धागाच काढा ना ! तेव्हढीच आमच्या माहितीत नव्याने भर पडेल.
अमेरिकेची सध्याची ही अवस्था आहे :- National debt is now $17.6T and the debt per citizen is over $55k.
शिवाय चीन सुद्धा आता ओरडतोय म्हणे ! :- Debt risk, market turmoil threaten financial crisis
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games
1 Oct 2014 - 6:16 pm | आजानुकर्ण
मस्त प्रतिसाद. मोदींच्या आता पूर्णपणे कह्यात असलेल्या भारतीय प्रसारमाध्यमांनी या भेटीचा उदोउदो करणे आणि अमेरिकेतील माध्यमांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात बातम्या येणे याच्या मध्ये कुठेतरी या भेटीचे योग्य श्रेय असावे.
बाकी मोदींचे मार्केटिंग निर्विवादपणे चांगले आहे यात काहीच शंका नाही.
2 Oct 2014 - 1:17 am | विनोद१८
मोदी हे निओ-लिबरलांचे अवतारपुरुष आहेत आणि ज्यांच्यावर काही काळाने रडण्याची वेळ येऊ शकते असे भारतवासीही त्यांच्या भजनात (फालतू धार्मिक अथवा राष्ट्रीय अस्मितेची अफू खाऊन) दंग आहेत.
हे कसे जरा अधिक स्पष्ट करा ??
अमेरिकेत राहूनही अमेरिकेचं जहाज का डळमळतंय हे न कळणार्या आणि निरंतर डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणार्या भारतीयांबद्दल तर काय बोलायचं?
सध्या अमेरिकन अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर कोणत्या पातळीवर आहे ?? अगदी रसातळाला गेली आहे काय ?? "निरंतर डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणे" हि अमेरिकेत स्थायिक होण्यासाठीची पात्रता आहे का ??
2 Oct 2014 - 5:06 am | नगरीनिरंजन
छे छे, उलट अमेरिकन अर्थव्यवस्था २००८ पासून "रिकव्हरीच्या पाथवर" आहे आणि नवीन फ्रॅकिंग बूममुळे तर "एनर्जी इंडिपेंडंट" होणार आहे.
आता तोच चमत्कार भारतातही मोदी घडवून आणणार आहेत.
हाहाहा, कुठेही स्थायिक होण्यासाठी माणसाला पात्रता वगैरे असावी लागत नाही, लागू नये. पण अमेरिकेतल्या काही (डोळे दिपलेल्या वगैरे) भारतीयांना मात्र तसे वाटते. फक्त त्याच लोकांबद्दल ते वाक्य आहे. अमेरिकेतले सगळे भारतीय तसेच आहेत असे नाही.
2 Oct 2014 - 7:43 am | अर्धवटराव
जगाच्या इतिहासात प्रत्येक शक्तीशाली देशाचे आर्थीक वासे पोकळच होते, अजुनही असतात. त्यात चुकीचं काहिच नाहि. डॉलर अजुनही मजबूत आहे व कितीही चुका केल्या तरी अमेरीकेचं आजही कुणि काहि वाकडं करु शकत नाहि. त्यांचं ते निस्तरायला समर्थ आहेत कि.
मोदिंना चमत्काराचे आव्हान देण्यापुर्वी देशाचं थोडं सिंहावलोकन करावं. गाळात रुतलेली अर्थव्यवस्था, घरबंध नसलेली लोकशाही, फसलेला समाजवाद, भरकटलेली(तशी कधि नव्हती म्हणा) लालशाहि, दलदलीत मनोरे बांधणार्या सो कॉल्ड एन.जी.ओं चा उच्छाद, गणराज्याला गणंगराज्य बदवायला तत्पत अशी राज्य सरकारे, लोकशाहिला खुशाल घराणेशाहीची दासी बनवणारे राज्यकर्ते... एक ना दोन, हजार फुकटच्या कटकटी तंगड्या मोडताय देशाच्या. जरा कुठे स्थिर सरकार येऊन ते काहि वेगळे प्रयोग करायला निघाले कि लगेच फु(क)टपट्ट्या घेऊन टिमक्या वाजवायला जनता तयार. रोचक आहे हा सगळा प्रकार.
2 Oct 2014 - 5:46 pm | नगरीनिरंजन
काहीच नाही. बिघडण्याची वाट पाहू नये एवढंच. पण हिस्टेरिया झालेल्या लोकांना क्वचितच भौतिक वास्तवाचं भान असतं, त्यामुळे चालू द्या.
2 Oct 2014 - 6:20 pm | अर्धवटराव
वास्तवाचं भान ठेवणं खरच गरजेचं आहे.
1 Oct 2014 - 10:07 pm | बंडा मामा
मोदीजीन्चे भाषण कसे झाले हे सगळ्यांनीच पाहिले. समर्थकाना आवडले, विरोधकांनही फारसे खुपले नाही ह्यातच सगळे आले.
मला मात्र तिथे आलेले डाळ-ढोकळा छाप लोक आणि करमणु़कीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली दाखवलेला भडक चीप प्रकार प्रचंड खटकला. भारतीय वन्शाचे अनेक सुप्रसिद्ध लोक असताना (जसे की सत्या नडेला, संजय गुप्ता, इन्द्रा नुयी, अतुल गावंडे, फरिद झकेरिया इ.इ.) इथे मिस अमेरिका बोलावुन हे हुल्लडबाजी करणारे, कॅमेरा दिसला की हावरटा सारखे हात हलवणारे हे लोक गोळा करुन एकंदरितच ह्या सो कॉल्ड 'एनाराय' कम्युनिटी विषयी मला हेच का ते हुशार लोक भारत सोडून गेलेले असा प्रश्न वेळोवेळी पडला.
1 Oct 2014 - 11:08 pm | आजानुकर्ण
कार्टून आवडले
2 Oct 2014 - 10:58 am | पुण्याचे वटवाघूळ
आणि ड्यू.आय.डी प्रमोट करायचा प्रयत्नही आवडला.
2 Oct 2014 - 3:52 pm | आजानुकर्ण
धन्यवाद. विनाकारण काडी घालण्याचा प्रयत्न आवडला
2 Oct 2014 - 5:20 pm | निनाद मुक्काम प...
मोदी ह्यांनी भारतातून नर्सेस व शिक्षक जगभराला पुरवण्याची शमत विकसित करण्याबद्दल भाषणात सांगितले , भारतात येउन येथील लोकांच्या पोटावर पाय कशाला द्यावा ,
भारतात रोजगार देण्यासाठी अनिवासी भारतीयांनी यावे रोजगार मिळेल म्हणून येऊ नये असे मला वाटते , प्रत्येक अनिवासी भारतीय हा आपल्या देशाचा सर्वार्थाने राजदूत म्हणून तेथील समाजात वावरला तर जगभरात सर्व पातळीवर भारतीय दबावगट निर्माण होईल.
गोरे आपल्या देशात पूर्वी बिना विसा आले होते ,
व्यापारी म्हणून आले नि राज्यकर्ते झाले ,
हाच कित्ता बॉबी जिंदाल ने गिरवला पाहिजे
मला कट्टर मोदी विरोधकांची कीव येते त्यांना ह्या मोदीमय प्रसारमाध्यमांच्या कोलाहलात आभासी जगतात मोदींच्या बद्दल एखादी टुकार बातमी शोधून शोधून टाकावी लागत आहे.
2 Oct 2014 - 5:25 pm | आजानुकर्ण
हे खरंय! निनादशेठ सपशेल सहमती!
2 Oct 2014 - 11:04 pm | विनोद१८
खरोखरच कीव करावी अशीच अवस्था आहे त्यांची, त्यांना मोदी व त्याचे एकुण राजकारण समजत नाही वा समजूनही न समजल्यासारखे दाखवताहेत कारण त्यांचा नकारात्मक द्रुष्टीकोन, ते सगळे अजुनही गेली १२ वर्षे काही कट्ट्रर मोदीविरोधकांनी ( काही राजकारणी, प्रसारमाध्यमे, एन.जी.ओ. ) उभ्या केलेल्या नकारात्मक द्रुष्टीकोनातून पाहात आहेत. जसजसे मोदींच्या राजवटीचे सुयोग्य परिणाम दिसू लागतील तसेतसे त्यांचे मतपरिवर्तन होइल असे मला वाटते, उद्या कदाचित हेच आजचे मोदीविरोधक त्यांचे समर्थकही होतील. कुणी सांगावे ??
आमचा विरोध असतो तो झोपेचे सोंग घेतलेल्यांना.
5 Oct 2014 - 2:48 pm | उदयन
व्हिसा मोदींना नाही तर भारताच्या पंतप्रधान पदाला मिळालेला.
या कडे सोईस्कर दुर्लक्ष केले गेले :)
5 Oct 2014 - 8:23 pm | प्रभाकर पेठकर
व्हिसा 'मोदींना' नाकारला गेला होता की गुजराथच्या मुख्यमंत्र्यांना ह्याकडेही सोयिस्कर दुर्लक्ष करू नये असे वाटते.
5 Oct 2014 - 8:36 pm | पुण्याचे वटवाघूळ
छे हो भलत्याच अपेक्षा बघा तुमच्या. व्हिसा नाकारला होता तो मोदींना आणि आता दिला तो भारताच्या पंतप्रधानांना :)
6 Oct 2014 - 9:15 am | नाखु
कोर्या धनादेशासारखा "कोरा व्हिसा" देऊन ठेवला होता आणि तोच मोदींनी वापरला (आय्तोबा कुठले?)
आणि तो वाया जाऊ नये म्ह्णून मोदी पंतप्रधान झाले (निव्वळ संधी साधूपणा हो)
कृ ह्.घ्या.
6 Oct 2014 - 5:21 pm | ऋषिकेश
व्हिजा खरोखरच मोदिंना नाकारला गेला होता.
आता तो "हेड ऑफ द स्टेट" या A1 विजाप्रकारातील विजा मिळालेला आहे.
अजूनही मोदी या व्यक्तीला २००२नंतर अमेरिकेने विजा दिलेला नाही हे मात्र खरे आहे. (पुढे ते पंतप्रधानपदी राहिले नाहित तरी देतील की नाही हे काळच ठरवेल)
6 Oct 2014 - 5:30 pm | उदयन
हेच भक्तांना समजत नाही ;)
जिथे सोनिया गांधींना समन्स बजावलेले तेव्हा ही लोक आनंद व्यक्त करत होते. आता त्याच न्यायालयाने मोदींना समन्स बजावले तेव्हा आनंद वारला त्यांचा :)
6 Oct 2014 - 7:37 pm | विकास
कोर्टाने कायद्यानुसार खटला दाखल करून घेतला असला तरी दुसर्या कायद्यानुसार कोर्टाकडून मोदींना समन्स बजावता आले नाही.
6 Oct 2014 - 9:24 pm | lakhu risbud
अरे तुम्ही इकडे पण का ?
आता या धाग्याचा पण जागता पहारा होणार का ?
सोनिया देवीची आरती सुरु होणार
7 Oct 2014 - 8:54 am | प्रभाकर पेठकर
पद बदललं म्हणजे माणूस सुद्धा 'बदलतो' असा अमेरिकेचा गैरसमज दिसतो आहे.
असो. त्यांनाही कांहीतरी पळवाट हवीच नं, आपल्याच पॉलीसीवर, घुमजाव करायला.
हेही मोदी विरोधकांना समजत नाही.
6 Oct 2014 - 9:41 pm | उदयन
सोनिया देवी म्हणालात शेवटी ;) आता कल्याण होईल तुमचे
6 Oct 2014 - 10:49 pm | अनिरुद्ध प
उत्तम व्रुत्तांत
7 Oct 2014 - 9:52 am | मदनबाण
ताक :-
India is benefiting from a “Modi dividend”, the report said, with economic activity buoyed by expectations from the newly elected government of Prime Minister Narendra Modi. Over the next year or so economic growth should be supported by the recovering U.S. economy that would provide a market for Indian merchandise and service exports. Private investment is expected to pick up thanks to the government’s business orientation, and declining oil prices should boost private sector competitiveness. But economic reforms will be needed for India to achieve its full long-term growth potential, the report argued.
इति :- World Bank
संदर्भ :- Led by India, South Asia Economic Growth to Accelerate, World Bank
‘Narendra Modi dividend’ may push up growth, economy set to grow by 6.4% in 2015-16: World Bank
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काँग्रेसी कुलदैवताची कुलंगडी
7 Oct 2014 - 7:38 pm | विकास
वर्ल्ड बँकेचा दुवा आणि त्यातील भाष्य भलतेच रोचक आहे! धन्यवाद!