ह्ये वागनं बरं नव्हं

निराकार गाढव's picture
निराकार गाढव in जे न देखे रवी...
18 Sep 2014 - 1:33 am

रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत |

आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||

 

गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली

पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला

आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||

 

गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय,

गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि

आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||

 

समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला

अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया

आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वागनं बरं नव्हं ||

 

लादेन ध्यान किंमतीचं, शिकिवून रायल्ये हिंमतीचं |

लब्बाड माउ बोचकारते, मूषक मिश्श्या फेंदारते ...

आरं पांडॊस्पा, वुलट्याच मारतोस गस्पा, ह्ये वागनं बरं नव्हं ||

 

मंडळात भारी गुर्र्जींची वट, तुमची खोडी ये अंगलट

घाबरून रावा गुर्र्जेन्ला, समजवू कित्ती तुम्माला

आरं कडबत्या, रवांथ करतोस जस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||

 

किती करावी कोल्हेकुई, खोटाच गुर्जी फुडं होई

फुसकाच एक्का सत्याचा, गुर्र्जींचा पत्ता हुकमाचा

आवो पैसाक्का, कामून उडवता धाग्गा, हे वागनं बरं नव्हं ||

 

मार्गदर्शनहझलकरुणधोरणधर्मगझलशिक्षण

प्रतिक्रिया

एस's picture

18 Sep 2014 - 6:47 am | एस

हा धागाही उडायच्या आत वाचून ठेवल्याची पोच. :-)

गाढवा रे...!

टवाळ कार्टा's picture

18 Sep 2014 - 9:08 am | टवाळ कार्टा

हा हा हा
भलतेच खंग्री जमलयं ;)

अनुप ढेरे's picture

18 Sep 2014 - 10:02 am | अनुप ढेरे

हा हा हा.. कहर.
एक गाढवाचा फटू तेवढा राहिला बघा.

सविता००१'s picture

18 Sep 2014 - 10:39 am | सविता००१

:)

पोटे's picture

18 Sep 2014 - 10:56 am | पोटे

तिसर्‍या ओळी सुंदरच आहेत.

खेबुडकरही चाट पडतील

>> गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय,

ह्या ह्या ह्या. कुणाचा विलाज करायचा असेल तर बोला. अर्थात काही हाताबाहेर गेलेल्या केशी सोडून. :)

आदूबाळ's picture

18 Sep 2014 - 11:56 am | आदूबाळ

जमलंय जमलंय!

आता प्रतिहल्ला म्हणून "घागर नळाला लाव" चं सुडंबन पडेल काय?

पैसा's picture

18 Sep 2014 - 12:03 pm | पैसा

मी कुठे काय क्येलं? उगाच आपलं! तुम्हा गरीब बापड्या सदस्यांचा टंकशोष वाचून माझे कोमल हृदय द्रवले आणि आता माझे हृदयपरिवर्तन झाले आहे. यापुढे तुमच्या प्रतिक्रिया आणि लेख फुलासारखे जपेन म्हण्टे. (म्हणजे झाडं कापायची कात्रीच घेऊन बसते आता.) विश्वास ठेवा नायतर ठेवू नका! (मेरे बाप का क्या जाता!)

बरं काका, (प्रसंग पडला बाका, तर गधे को केहना काका) तुमचे गुर्जी कोण ते सांगूनच टाका एकदा! त्यांच्याकडून किरपा प्राप्त करीन म्हणटे. आतापर्यंत मी १० गुर्जी करायचा प्रयत्न केला, त्यातल्या ३ जणांनी जीव दिला. ३ जण संन्यास घेऊन फरार झाले आणि उरलेले ४ जण लग्न करून घरजावई झाले. अकरावा गुरू तरी लाभतोय का बघू!

बरं तुम्ही जगदीश खेबुडकरांसारख्या बूर्झ्वा, प्रतिगाम्याच्या गाण्याचं विडंबन का केलंत म्हणे? तुम्हाला पुरोगामी व्हायचे नाही?

किसन शिंदे's picture

18 Sep 2014 - 7:36 pm | किसन शिंदे

त्येच म्हनतो की मी, या गाढवाला कुटनं मिळाली आतली खबर.?

लैच्च पोचलेलं हाय जणू हे गाढाव.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2014 - 7:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

हां ना ! गातय बी सुरात... काना मात्रा सर्वे सर्वे जागेव्र !

सस्नेह's picture

18 Sep 2014 - 12:18 pm | सस्नेह

तात्पर्य : अखेर गाढव हे गाढव असतं...

काउबॉय's picture

18 Sep 2014 - 12:53 pm | काउबॉय

=))

=)) आग्गागा !

_/\_

कहर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2014 - 12:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

घोर घोर कलियुग ! निराकार गाडाव श्यान्या मान्साना आक्कल शिकवतया ! +D

>>पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला

आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा,

हे मला उद्देशून असेल तर हा वल्ली किंवा बुवांचा डुआयडी वाटतो आहे असं नमूद कर्तो. ;)

बॅटमॅन's picture

18 Sep 2014 - 2:43 pm | बॅटमॅन

अगागागागागा =)) =)) =)) =)) =))

एकाचवेळी इतक्या दुगाण्या झाडूण सगळ्यांची तोंडे बाद केल्याबद्दल या ठिकानी या माध्यमातूण मी णिराकार गाढवभाऊंचे हबिणंदण कर्तो!!!!

जेम्स बॉन्ड ००७'s picture

18 Sep 2014 - 5:02 pm | जेम्स बॉन्ड ००७

अशेच म्हण्टो..

प्यारे१'s picture

18 Sep 2014 - 3:26 pm | प्यारे१

>>> काव्यरस:
मार्गदर्शन
मी आणि माझे
हझल
करुण

ह्या उपरोक्त रसांमधलं काव्य अ फा ट आवडलंय....!

गुर्जींकडून किती मार्कं पल्डे म्हणे?

सुहास..'s picture

18 Sep 2014 - 3:39 pm | सुहास..

=)) =)) =))

लईच निराकार ब्वा तुम्ही !

नानासाहेब नेफळे's picture

18 Sep 2014 - 3:53 pm | नानासाहेब नेफळे

म्हारास्ट्राचा फुढचा शिएम निराकार गाढवच झाला पायजेल, त्योच आमाला फुढं नेईल. कारण त्याच्या मागं कोण हुभं राहणार ,लाथ वर्मी बसल्यावं काय घ्या? त्यामुळं समदी गपगुमाण फुढं चालत्याल.
निराकारीय गाढवी पार्टी ,-पार्टी विथ दुगाण्या.

पंखी अजया गाढवाचे पाय धरी॥__________/\_________

बॅटमॅन's picture

18 Sep 2014 - 4:03 pm | बॅटमॅन

सेम हिअर.

वटवाघूळ गाढवाचे पाय धरी _/\_

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Sep 2014 - 9:38 am | पुण्याचे वटवाघूळ

वटवाघूळ गाढवाचे पाय धरी

ए ब्यॅट्यॅ. खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का :)

काळा पहाड's picture

19 Sep 2014 - 10:11 am | काळा पहाड

ते नावाला. अहो तुम्ही "पुण्याचे" वटवाघूळ. पुण्यातले काही विनोदी प्रकार बघता (उदा: पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव, पुणेरी सिटी बसेस, पुणेरी ट्रॅफिक सेन्स इ.) तुमचा आणि खर्‍या वटवाघूळाचा संबंध वाघ आणि मांजर इतका घनिष्ठ असू शकेल. ह.घ्या.

खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का

अन मग आमी काय कागदी पंख लावल्यालं वटवाघूळ हाय का ;)

संदर्भः मगदूम च्या.

"आमी आमच्या आबाआज्यापासनं मगदूम च्याच पितो."
"आन आमी काय ऊन पानी पितो काय?"

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2014 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा

लब्बाड माउ बोचकारते, मूषक मिश्श्या फेंदारते ...http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif

आरं पांडॊस्पा, वुलट्याच मारतोस गस्पा,http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif

गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही.
मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

अजय जोशी's picture

18 Sep 2014 - 8:02 pm | अजय जोशी

नुसती धमाल...

दिनेश सायगल's picture

19 Sep 2014 - 11:56 am | दिनेश सायगल

तुमचे गुर्जी कोण ते आम्हाला काय माहित नाही, पण दुसरे एक गुर्जी काठी घेऊन कोणा गाढवाच्या पाठी धावताहेत.

पिलीयन रायडर's picture

19 Sep 2014 - 12:01 pm | पिलीयन रायडर

कोण असेल हा खरा आयडी?

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2014 - 12:37 pm | प्रसाद गोडबोले

असेल एखादं गाढव =))

नुसतं गाढव नाही हो; निराकार गाढव. *lol*

हे इथेच खाली हसुन लोळतंय ते तर नाही ना!!

श्या प्रतिसाद खाली आला,पिराच्या प्रतिसादाखाली हवा!!आता वरती हसुन लोळतंय ते म्हणायला हवं!!

चौकटराजा's picture

19 Sep 2014 - 1:05 pm | चौकटराजा

मिपा या गावातील मी ढ असल्याने मला काय बी कल्ला नाय ? कोन हाये हा गाडाव ? काव्य बरं लिल्हय म्हानायाचं !

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2014 - 1:09 pm | श्रीगुरुजी

कोणाला उद्देशून हे उपरोधिक लिखाण केलं जातंय ते कळेल का? तिकडे स्वयंघोषित सर्वज्ञांनी देखील गाढवावर काही तरी खरडलं आहे. त्यांचं ते लिखाण नम्रपणे केलेली आत्मस्तुतीच असावी असा गोड संशय येतोय. इथेही गाढव हाच मुख्य नायक आहे. काही आयडींना अचानक स्वजातीविषयी का उमाळा वाटू लागला असावा हे एक गूढच आहे. कृपया कोणत्या आयडीला उद्देशून हे लेखन केले जात आहे ते कळेल का?

कंजूस's picture

19 Sep 2014 - 8:37 pm | कंजूस

कळतं त्यांना झोंबतं,
नाही त्यांना विरंगुळा.