Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निराकार गाढव on गुरुवार, 09/18/2014 - 01:33
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत | आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   लादेन ध्यान किंमतीचं, शिकिवून रायल्ये हिंमतीचं | लब्बाड माउ बोचकारते, मूषक मिश्श्या फेंदारते ... आरं पांडॊस्पा, वुलट्याच मारतोस गस्पा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   मंडळात भारी गुर्र्जींची वट, तुमची खोडी ये अंगलट घाबरून रावा गुर्र्जेन्ला, समजवू कित्ती तुम्माला आरं कडबत्या, रवांथ करतोस जस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   किती करावी कोल्हेकुई, खोटाच गुर्जी फुडं होई फुसकाच एक्का सत्याचा, गुर्र्जींचा पत्ता हुकमाचा आवो पैसाक्का, कामून उडवता धाग्गा, हे वागनं बरं नव्हं ||  

Submitted by एस on गुरुवार, 09/18/2014 - 06:47

Permalink

काव्यरस... अगागागा...

हा धागाही उडायच्या आत वाचून ठेवल्याची पोच. :-) गाढवा रे...!

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/18/2014 - 09:08

Permalink

हा हा हा भलतेच खंग्री जमलयं

हा हा हा भलतेच खंग्री जमलयं ;)

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 09/18/2014 - 10:02

Permalink

हा हा हा.. कहर.

हा हा हा.. कहर. एक गाढवाचा फटू तेवढा राहिला बघा.

Submitted by सविता००१ on गुरुवार, 09/18/2014 - 10:39

Permalink

आई ग्ग

:)

Submitted by पोटे on गुरुवार, 09/18/2014 - 10:56

Permalink

.

तिसर्‍या ओळी सुंदरच आहेत. खेबुडकरही चाट पडतील
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 09/18/2014 - 11:36

Permalink

>> गावच्या धणा लय शानाच हाय,

>> गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, ह्या ह्या ह्या. कुणाचा विलाज करायचा असेल तर बोला. अर्थात काही हाताबाहेर गेलेल्या केशी सोडून. :)

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 09/18/2014 - 11:56

Permalink

जमलंय जमलंय!

जमलंय जमलंय! आता प्रतिहल्ला म्हणून "घागर नळाला लाव" चं सुडंबन पडेल काय?

Submitted by पैसा on गुरुवार, 09/18/2014 - 12:03

Permalink

अगागागा!

मी कुठे काय क्येलं? उगाच आपलं! तुम्हा गरीब बापड्या सदस्यांचा टंकशोष वाचून माझे कोमल हृदय द्रवले आणि आता माझे हृदयपरिवर्तन झाले आहे. यापुढे तुमच्या प्रतिक्रिया आणि लेख फुलासारखे जपेन म्हण्टे. (म्हणजे झाडं कापायची कात्रीच घेऊन बसते आता.) विश्वास ठेवा नायतर ठेवू नका! (मेरे बाप का क्या जाता!) बरं काका, (प्रसंग पडला बाका, तर गधे को केहना काका) तुमचे गुर्जी कोण ते सांगूनच टाका एकदा! त्यांच्याकडून किरपा प्राप्त करीन म्हणटे. आतापर्यंत मी १० गुर्जी करायचा प्रयत्न केला, त्यातल्या ३ जणांनी जीव दिला. ३ जण संन्यास घेऊन फरार झाले आणि उरलेले ४ जण लग्न करून घरजावई झाले. अकरावा गुरू तरी लाभतोय का बघू! बरं तुम्ही जगदीश खेबुडकरांसारख्या बूर्झ्वा, प्रतिगाम्याच्या गाण्याचं विडंबन का केलंत म्हणे? तुम्हाला पुरोगामी व्हायचे नाही?

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 09/18/2014 - 19:36

In reply to अगागागा! by पैसा

Permalink

त्येच म्हनतो की मी, या

त्येच म्हनतो की मी, या गाढवाला कुटनं मिळाली आतली खबर.? लैच्च पोचलेलं हाय जणू हे गाढाव.

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 09/18/2014 - 19:42

In reply to त्येच म्हनतो की मी, या by किसन शिंदे

Permalink

हां ना ! गातय बी सुरात...

हां ना ! गातय बी सुरात... काना मात्रा सर्वे सर्वे जागेव्र !

Submitted by सस्नेह on गुरुवार, 09/18/2014 - 12:18

Permalink

हम्म..

तात्पर्य : अखेर गाढव हे गाढव असतं...
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on गुरुवार, 09/18/2014 - 12:53

Permalink

अगाग्गा !

=))
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on गुरुवार, 09/18/2014 - 14:34

In reply to अगाग्गा ! by काउबॉय

Permalink

इतक्या शेपट्यावर एकदम पाय दिला

=)) आग्गागा ! _/\_ कहर.

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 09/18/2014 - 12:55

Permalink

घोर घोर कलियुग ! निराकार

=)) घोर घोर कलियुग ! निराकार गाडाव श्यान्या मान्साना आक्कल शिकवतया ! +D

Submitted by सूड on गुरुवार, 09/18/2014 - 14:40

Permalink

>>पिळ घालूनी दावतो मिश्श्या,

>>पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, हे मला उद्देशून असेल तर हा वल्ली किंवा बुवांचा डुआयडी वाटतो आहे असं नमूद कर्तो. ;)

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 09/18/2014 - 14:43

Permalink

अगागागागागा =)) =))

अगागागागागा =)) =)) =)) =)) =)) एकाचवेळी इतक्या दुगाण्या झाडूण सगळ्यांची तोंडे बाद केल्याबद्दल या ठिकानी या माध्यमातूण मी णिराकार गाढवभाऊंचे हबिणंदण कर्तो!!!!

Submitted by जेम्स बॉन्ड ००७ on गुरुवार, 09/18/2014 - 17:02

In reply to अगागागागागा =)) =)) by बॅटमॅन

Permalink

+१

अशेच म्हण्टो..

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/18/2014 - 15:26

Permalink

>>> काव्यरस:

>>> काव्यरस: मार्गदर्शन मी आणि माझे हझल करुण ह्या उपरोक्त रसांमधलं काव्य अ फा ट आवडलंय....!

Submitted by इनिगोय on गुरुवार, 09/18/2014 - 15:36

Permalink

गुर्जींकडून किती मार्कं पल्डे

गुर्जींकडून किती मार्कं पल्डे म्हणे?
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 09/18/2014 - 15:39

Permalink

=))

=)) =)) =)) लईच निराकार ब्वा तुम्ही !

Submitted by नानासाहेब नेफळे on गुरुवार, 09/18/2014 - 15:53

Permalink

म्हारास्ट्राचा फुढचा शिएम

म्हारास्ट्राचा फुढचा शिएम निराकार गाढवच झाला पायजेल, त्योच आमाला फुढं नेईल. कारण त्याच्या मागं कोण हुभं राहणार ,लाथ वर्मी बसल्यावं काय घ्या? त्यामुळं समदी गपगुमाण फुढं चालत्याल. निराकारीय गाढवी पार्टी ,-पार्टी विथ दुगाण्या.

Submitted by अजया on गुरुवार, 09/18/2014 - 15:58

Permalink

पंखी अजया गाढवाचे पाय धरी॥___

पंखी अजया गाढवाचे पाय धरी॥__________/\_________

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 09/18/2014 - 16:03

In reply to पंखी अजया गाढवाचे पाय धरी॥___ by अजया

Permalink

सेम हिअर.

सेम हिअर. वटवाघूळ गाढवाचे पाय धरी _/\_

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Fri, 09/19/2014 - 09:38

In reply to सेम हिअर. by बॅटमॅन

Permalink

मीच खरोखरचे वटवाघूळ

वटवाघूळ गाढवाचे पाय धरी
ए ब्यॅट्यॅ. खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का :)

Submitted by काळा पहाड on Fri, 09/19/2014 - 10:11

In reply to मीच खरोखरचे वटवाघूळ by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

ते नावाला. अहो तुम्ही

ते नावाला. अहो तुम्ही "पुण्याचे" वटवाघूळ. पुण्यातले काही विनोदी प्रकार बघता (उदा: पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव, पुणेरी सिटी बसेस, पुणेरी ट्रॅफिक सेन्स इ.) तुमचा आणि खर्‍या वटवाघूळाचा संबंध वाघ आणि मांजर इतका घनिष्ठ असू शकेल. ह.घ्या.

Submitted by बॅटमॅन on Fri, 09/19/2014 - 12:50

In reply to मीच खरोखरचे वटवाघूळ by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का

खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का
अन मग आमी काय कागदी पंख लावल्यालं वटवाघूळ हाय का ;) संदर्भः मगदूम च्या. "आमी आमच्या आबाआज्यापासनं मगदूम च्याच पितो." "आन आमी काय ऊन पानी पितो काय?"

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 09/18/2014 - 16:37

Permalink

लब्बाड माउ बोचकारते, मूषक

लब्बाड माउ बोचकारते, मूषक मिश्श्या फेंदारते ...Image removed. आरं पांडॊस्पा, वुलट्याच मारतोस गस्पा,Image removed.

Submitted by जेपी on गुरुवार, 09/18/2014 - 17:05

Permalink

गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने

गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.

Submitted by अजय जोशी on गुरुवार, 09/18/2014 - 20:02

Permalink

धमाल

नुसती धमाल...

Submitted by दिनेश सायगल on Fri, 09/19/2014 - 11:56

Permalink

का वो निराकार बुवा

तुमचे गुर्जी कोण ते आम्हाला काय माहित नाही, पण दुसरे एक गुर्जी काठी घेऊन कोणा गाढवाच्या पाठी धावताहेत.

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 09/19/2014 - 12:01

Permalink

कोण असेल हा खरा आयडी?

कोण असेल हा खरा आयडी?

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 09/19/2014 - 12:37

In reply to कोण असेल हा खरा आयडी? by पिलीयन रायडर

Permalink

असेल एखादं गाढव

असेल एखादं गाढव =))
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 09/19/2014 - 12:42

In reply to असेल एखादं गाढव by प्रसाद गोडबोले

Permalink

नुसतं गाढव नाही हो; निराकार

नुसतं गाढव नाही हो; निराकार गाढव. *lol*

Submitted by अजया on Fri, 09/19/2014 - 13:41

In reply to कोण असेल हा खरा आयडी? by पिलीयन रायडर

Permalink

हे इथेच खाली हसुन लोळतंय ते

हे इथेच खाली हसुन लोळतंय ते तर नाही ना!!

Submitted by अजया on Fri, 09/19/2014 - 13:45

In reply to हे इथेच खाली हसुन लोळतंय ते by अजया

Permalink

श्या प्रतिसाद खाली आला

श्या प्रतिसाद खाली आला,पिराच्या प्रतिसादाखाली हवा!!आता वरती हसुन लोळतंय ते म्हणायला हवं!!

Submitted by चौकटराजा on Fri, 09/19/2014 - 13:05

Permalink

मिपा या गावातील.....

मिपा या गावातील मी ढ असल्याने मला काय बी कल्ला नाय ? कोन हाये हा गाडाव ? काव्य बरं लिल्हय म्हानायाचं !

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 09/19/2014 - 13:09

Permalink

कोणाला उद्देशून हे उपरोधिक

कोणाला उद्देशून हे उपरोधिक लिखाण केलं जातंय ते कळेल का? तिकडे स्वयंघोषित सर्वज्ञांनी देखील गाढवावर काही तरी खरडलं आहे. त्यांचं ते लिखाण नम्रपणे केलेली आत्मस्तुतीच असावी असा गोड संशय येतोय. इथेही गाढव हाच मुख्य नायक आहे. काही आयडींना अचानक स्वजातीविषयी का उमाळा वाटू लागला असावा हे एक गूढच आहे. कृपया कोणत्या आयडीला उद्देशून हे लेखन केले जात आहे ते कळेल का?

Submitted by कंजूस on Fri, 09/19/2014 - 20:37

Permalink

कळतं त्यांना झोंबतं,

कळतं त्यांना झोंबतं, नाही त्यांना विरंगुळा.
  • 9163 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com