मंत्रचळाच्या मागोव्यावर

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
28 Jul 2014 - 7:40 pm

हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?

आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो. पण मिपांकरांतले अर्क मिपाकर खफवर नांदत असल्याने त्यांनी अर्थातच आमची भविष्यवाणी फाट्यावर मारली.

मला दीडशेची अपेक्षा होती. पण बघता बघता चारशाचा पल्ला गाठला गेल्यावर मी दंग राहिलो. (हो, मी मटाही वाचतो.)

हा प्रवास असा झाला

a

सपाट प्रतलावर चालू झालेला हा धागा दोन-तीन किल्ल्या बसताच सुसाटला. पठारानंतर जिथे चढण सुरू होते, तिथे या किल्ल्या बसल्या.

पण नुस्त्या प्रतिसादसंख्येवर काय आहे? वेगही महत्त्वाचा. छत्तीस धावा काढण्यासाठी साठ ओव्हर्स खेळणार्‍या गावसकरांची याद इथे येणे अपरिहार्य आहे. पण याही बाबतीत मंत्राने काश्मीरवर इंचा इंचाने मात केली आहे.

a

एकूण सत्तेचाळीस मिपाकरांनी या धाग्याला पावन केलं. पण जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद सत्तेचाळीसपैकी तीस टक्के मिपाकरांनी दिले. विल्फ्रेडो परेटोच्या (अत्रुप्त?) आत्म्याला शांती द्यायचं काम मिपाकरांनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन.

a

तर कोण आहेत हे टाप ट्वेंटी?

a

पण एकटा माणूस कोणाला आणि किती प्रतिसाद देणार? दूजेविण अनुवादु करायला माऊली पाहिजे. आपुलाचि वाद आपणांसि हे ब्रीद मिपाचं नव्हे. लॉरेल-हार्डी, टॉम अँड जेरी, चिप आणि डेल, गेलाबाजार काळू-बाळू तर हवेतच. नाहीतर वग रंगणार कसा?

a

चर्चा कुदवणं हा सांघिक खेळ असला, तरी वेळेवर काडी टाकायला महत्त्व आहे. गेलेली वेळ आणि सरलेला वारा परतून येत नाही असं एक सुवचन आहे. (किंवा असलंच काहीतरी. नक्की आठवत नाही.) तर वर सन्मानपूर्वक उल्लेख झालेल्या या आयड्यांनी चर्चेच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर योगदान दिलं? आपले गुण नेमके कधी उधळले?

a

************************************

खफवर मौताई आणि प्रगो यांच्याशी गफ्फा मारताना हे सुचलं. (दोघांचीही नावं वरच्या गुणवत्ता यादीत आहेत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.) सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड घेतलेत तरी हरकत नाही. फाट्यावर मारले जाईल.)

सांख्यकीशास्त्र आणि तदानुषंगिक विषयांत आमचे शिक्षण कमी असल्याने हे कंट्री अ‍ॅनालिसीस गोड मानून घ्यावे. कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे.

जय हिंद. जय महाराष्ट्र.

हे ठिकाणसमाजजीवनमानमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

कंट्री अ‍ॅनालिसीस गोड मानून घ्यावे. कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे.

आदूबाळजी, कोण कै म्हणो, आम्ही आपला अ‍ॅनालिसीस लै आवडून घेतला आहे. बरं झाल आम्ही योगायोगाने धागा उघडून बघीतला. आपला एक उद्देश कदाचित विरंगुळा असला तरी, आम्ही आपल्या अ‍ॅनालिसीसच्या भावी स्कोपकडे अत्यंत आशेने बघतो. संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून दिल्यास आम्ही आपले अत्यंत अभारी असू. सधारणतः १०० च्यावर प्रतिसाद गेलेल्या सर्वच मराठी संकेतस्थळांवरील धाग्यांचा अभ्यास या निमीत्ताने सुरु होऊ शकल्यास हवा आहेच (अर्थात आपल्या सवडी नुसार). मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे हा लेख शीळा झाल्याची पैतैंची नेहेमी तक्रार असते. आपल्या अ‍ॅनालिसीसचा ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्राप्त होणारा उपयूक्त भाग संदर्भा सहीत उचलण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू.

आतिवास's picture

2 Aug 2014 - 9:04 am | आतिवास

मराठी संकेतस्थळे हा लेख शीळा झाल्याची
शीळा??

माहितगार's picture

2 Aug 2014 - 12:12 pm | माहितगार

शिंळा =शींळा= शिळा= शीळा (तथाकथीत शुद्धलेखन विषयक काँमेंट असल्यास फां.मा.)

यशोधरा's picture

2 Aug 2014 - 8:10 pm | यशोधरा

मैलाचा दगड म्हणायचं असेल त्यांना ;)

माहितगार's picture

2 Aug 2014 - 9:23 pm | माहितगार

'मैला'ला र्‍हस्व दीर्घ नै तरी दोन-तीन अर्थ होतात का नै.:) कै समजायच ते क्वांट्येक्स्टवर समजत पण काय..... जाऊ द्या पा...नां फा. मा. इज द बेस्ट प्वालिसी.

माहितगार's picture

2 Aug 2014 - 9:37 pm | माहितगार

मंत्रचळेपणाचा अनुभव ?

बॅटमॅन's picture

4 Aug 2014 - 1:21 pm | बॅटमॅन

तथाकथित शुद्धलेखन? ;)

माहितगार's picture

4 Aug 2014 - 4:11 pm | माहितगार

हं, होय तसंच, तरीपण या धाग्यावर हि विषयांतरीत चर्चा वाढवायची नाहीए, वेगळ्या धाग्याच्या रुपाने काळाच्या ओघात लिहिनच तेव्हा चर्चा करुयात. तेव्हा आमचा या धाग्यापुरता या विषयास तुर्तास पुर्णविराम.

सस्नेह's picture

2 Aug 2014 - 1:00 pm | सस्नेह

यवढा बारीक अभ्यास करून धाग्याचा 'कूट' केलेला पाहून श्रीश्री आदुबाळ यांना 'मिपा-धागे-कूट्शिरोमणी' हा किताब देणेची शिफारस करणेत येत आहे.. *biggrin*

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2014 - 2:22 pm | श्रीगुरुजी

आदूबाळ,

या धाग्याचेही विश्लेषण करण्याची सुवर्णसंधी येताना दिसतेय. निदान त्या नवीन धाग्यात तरी 'सर्वज्ञांना' मानाच्या गणपतीत स्थान मिळू देत. नाहीतर त्यांना आयुष्यात वैफल्य येऊन त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर निघायचं.

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 4:44 pm | कवितानागेश

निरिक्षक स्थिर आहे! वैफल्य स्थिर आहे! .... इतरांनी पळा!! :P

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2014 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

या जगात बदल हीच एक गोष्ट स्थिर आहे. (Change is the only constant thing in this world.)

कवितानागेश's picture

3 Aug 2014 - 3:36 pm | कवितानागेश

हे फक्त तुम्हाला आणि मला कळून काय उपयोग? ;)

मग अजून कुणाला कळायला हवे असं तुमचं म्हणणं आहे?

कवितानागेश's picture

3 Aug 2014 - 8:41 pm | कवितानागेश

तुझ्यासारख्या नास्तिकांना आणि माझ्यासारख्या आस्तिकांना. ;)

ते तसं लवकरच होवो अशी तुम्ही मानत असलेल्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना ;)

कवितानागेश's picture

3 Aug 2014 - 8:56 pm | कवितानागेश

ये सुविधा आपके लाईनपे उपलब्ध नही है| :)

धन्या's picture

3 Aug 2014 - 9:05 pm | धन्या

खरंच की. ठीक आहे. तुम्ही प्रार्थना करा. आम्ही कुठल्या पुस्तकात ज्ञान (काहींच्या मते माहिती) मिळते का पाहतो.

सगळेच एकमेकांना ड्वाळे मारुन र्‍हायले. काय शिरेसनेसपना हाय का नाय?

यशोधरा's picture

3 Aug 2014 - 4:06 pm | यशोधरा

आदुबाळ, इस धागे ने भी शंभर कोटी कमाया. क्या आप इसका भी विश्लेषण करेंगे? म्हंजे करोच्च! *mail1*

आदूबाळ's picture

3 Aug 2014 - 4:10 pm | आदूबाळ

हे म्हणजे लोकसभेतला वाद न्यूजच्यानलवर नेण्यासारखं आहे. ;)

आदूबाळ's picture

3 Aug 2014 - 4:13 pm | आदूबाळ

मिपा दिवाळी अंकाचा विशेष म्हणून दोन्ही पक्षांनी आपल्या विरोधीपक्षाच्या बाजूने लिहायला पाहिजे.

यशोधरा's picture

3 Aug 2014 - 4:25 pm | यशोधरा

वानैवगैरे नै हो :) विश्लेषणात्मक धाग्याचं विश्लेषण झालंअसा, असा एक गमतीशीर विचार डोक्यात आला म्हणून लिहिलं. एकदम वादात कुठे पडताय? सोडून द्या. :)

वाद वगैरे * असे वाचावे कृपया.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Aug 2014 - 1:13 pm | बिपिन कार्यकर्ते

म हा न ! ! !

सविता००१'s picture

4 Aug 2014 - 3:38 pm | सविता००१

कहर आहे..
भन्नाट आवडलं.

मनीषा's picture

6 Aug 2014 - 9:48 am | मनीषा

आभ्यासू मागोवा

मंत्र सामर्थ्याची प्रचिती आली :)

बघुन आनन्द वाट्ला

कवितानागेश's picture

11 Aug 2014 - 6:55 pm | कवितानागेश

वेलकम टू द क्लब! :)

चिगो's picture

16 Aug 2014 - 12:10 pm | चिगो

कहर म्हणजेच कहरच आहे हा धागा.. आदूबाळ, लैच भारी रे बाबा..