एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे.
एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता.
त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला.
तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे. तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे?
तर तो म्हणतो, “मला माहित नाही. गाढवाला विचारा.”
बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.
समर्थ रामदास स्वामींनी १७व्या शतकात, त्यांचे पट्टशिष्य आणि लेखनिक कल्याणस्वामींकरवी लिहवून घेतलेला दासबोध हा ग्रंथ आहे. एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या,बालकांच्या,प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जातीपंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. दशक दुसरा,समास पहिला यात मुर्खाची लक्षणे त्यांनी दिलेली आहेत, जी आजही पदोपदी समोर येतात व आपला महत्त्वाचा वेळ वाया घालवतात.
॥ श्रीरामसमर्थ ॥
॥ श्रीमत् दासबोध ॥
दशक दुसरा,समास पहिला : मूर्खलक्षण
॥ श्रीराम ॥
ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना ।
कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १॥
तुज नमूं वेदमाते । । श्रीशारदे ब्रह्मसुते ।
अंतरी वसे कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २॥
वंदून सद्गुरुचरण । करून रघुनाथस्मरण ।
त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥ ३॥
येक मूर्ख येक पढतमूर्ख । उभय लक्षणीं कौतुक ।
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ ४॥
पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण ।
साअवध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५॥
आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार ।
परि कांहीं येक तत्पर । होऊन ऐका ॥ ६॥
जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान ।
जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७॥
जन्मला जयांचे उदरीं । तयासि जो विरोध करी ।
सखी मनिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८॥
सांडून सर्वही गोत । स्त्रीआधेन जीवित ।
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९॥
परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्वशुरगृही वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १०॥
समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता ।
सामर्थ्येंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११॥
आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२॥
अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी ।
जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३॥
आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री ।
परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४॥
बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन ।
परस्थळीं बहु भोजन| करी, तो येक मूर्ख ॥ १५॥
मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न ।
सप्त वेसनीं जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६॥
धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकास ।
निसुगाईचा संतोष मानी, तो येक मूर्ख ॥ १७॥
घरीं विवेक उमजे । आणि सभेमध्यें लाजे ।
शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८॥
आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट ।
सिकवेणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९॥
नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसी जाणीव दावी ।
जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २०॥
येकायेकीं येकसरा । जाला विषईं निलाजिरा ।
मर्यादा सांडून सैरा वर्ते, तो येक मूर्ख ॥ २१॥
औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा ।
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ ।
संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी ।
उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३॥
आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन ।
रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४॥
सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित ।
सर्वकाळ दुश्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५॥
विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण ।
स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६॥
देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ।
ज्याचे मुखीं भंडउभंड । तो येक मूर्ख ॥ २७॥
घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा ।
ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८॥
नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत ।
मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९॥
स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार ।
करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३०॥
तपीळ खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं ।
धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१॥
विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान ।
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२॥
लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड ।
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३॥
उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे ।
सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४॥
दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण ।
सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५॥
वैधृति आणी वितिपात । नाना कुमुहूर्तें जात ।
अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६॥
क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी ।
जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७॥
जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी ।
नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८॥
आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी ।
लक्ष्मीचा भरवसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९॥
पुत्र कळत्र आणी दारा । इतुकाचि मानुनियां थारा ।
विसरोन गेला ईश्वरा । तो येक मूर्ख ॥ ४०॥
जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावाअवें ।
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१॥
पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्वरी देणें ।
ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२॥
दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले ।
दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३॥
देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही ।
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४॥
परपीडेचें मानी सुख । पससंतोषाचें मानी दुःख ।
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५॥
आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६॥
तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले ।
कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७॥
पत्य राखों नेणें कदा । विनोद करी सर्वदा ।
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८॥
होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड ।
बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९॥
वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे ।
जो गोत्रजांस विश्वासे । तो येक मूर्ख ॥ ५०॥
तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे ।
आपलें आन्हीत करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१॥
हीन जनासीं बरोबरी । बोल बोले सरोत्तरीं ।
वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२॥
समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी ।
घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३॥
सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा ।
सार्थकेंविण वेंची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४॥
संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें ।
मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५॥
अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी ।
जो विस्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६॥
समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे ।
क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७॥
बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक ।
ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८॥
अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी ।
संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९॥
घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी ।
बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी । तो येक मूर्ख ॥ ६०॥
आपुलें अर्थ दुसर्यापासीं । आणी दुसर्याचें अभिळासी ।
पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१॥
अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे ।
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२॥
दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें ।
डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३॥
उदकामधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी ।
सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४॥
स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें ।
मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५॥
परस्त्रीसीं कळह करी । मुकी वस्तु निघातें मारी ।
मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६॥
कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे ।
खरें अस्ता खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७॥
लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी ।
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८॥
आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी ।
पुढीलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९॥
अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७०॥
आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी ।
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१॥
ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे ।
चीत्त देउनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२॥
लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती ।
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्षमा केलें पाहिजे ॥ ७३॥
उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं ।
पुढिले समासी आघवीं । निरोपिलीं ॥ ७४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥ १॥
जय जय रघुविर समर्थ|
प्रतिक्रिया
1 Jul 2014 - 11:39 am | पैसा
रामदास स्वामी द्रष्टे होते. असे नमुने सगळ्या काळात असतात, असतील हे जाणून वर्णन केलं आहे. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे. परंतु आम्ही फक्त वाचतो!
1 Jul 2014 - 11:53 am | प्रसाद गोडबोले
हा श्लोक वाचला ... पाय परत जमीनीवर टेकले !
मनापासुन आभारी आहे हे शेयर केल्या बद्दल :)
1 Jul 2014 - 11:53 am | स्पंदना
नो कमेंटस!!
1 Jul 2014 - 1:40 pm | प्यारे१
पढतमूर्खाची लक्षणे पण येऊ द्या!
4 Jul 2014 - 1:53 am | आयुर्हित
ही पहा पढतमुर्खाची लक्षणे
1 Jul 2014 - 2:56 pm | अधिराज
श्री रामदास स्वामींनी सांगितलेली लक्षणे यथोचितच आहेत.
ह्या लक्षणांचा तुम्ही कदाचित अभ्यास केलाहि असेल. पण ह्या आधी बर्याच प्रतिसादांतून व्यक्त झालेले तुमचे विचार अंधश्रध्देला खतपाणी देणारे आहेत.
1 Jul 2014 - 8:44 pm | आयुर्हित
जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान ।
जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७॥
जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे कार्यकारण भाव समजून येत नाही तोपर्यंतच माझी श्रध्दा आपल्यासाठी अंधश्रध्दा असु शकते. आणि म्ह्णुनच हा सारा खटाटोप करत आहे, तो आपण पुर्ण ओपन माईंड ठेवुन समजून घेतला पाहीजे.
3 Jul 2014 - 12:23 pm | अधिराज
अच्छा अच्छा! म्हणजे तुम्हाला अपेक्षित असे प्रतिसाद न देणारे ते तुमच्या लेखी मुर्ख असे आहे तर!
असा समज असेल तर हे हि एक लक्षणच आहे मुर्खाचे.
१
1 Jul 2014 - 7:05 pm | कवितानागेश
यातील काही शब्द जरा कठीण आहेत. अशा शब्दांचे अर्थदेखिल सोबत द्या.
1 Jul 2014 - 8:03 pm | सिद्धेश महाजन
हो खर आहे काहि शब्द समजायला कठिण आहेत. क्रुपया आजच्या बोली भाशेत कोणी रुपान्तरित करेल का?
1 Jul 2014 - 10:07 pm | भृशुंडी
स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें ।
मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५॥
?
1 Jul 2014 - 10:15 pm | पैसा
सलगी देणे = जवळ करणे (नको इतके, अर्थात डोक्यावर बसवणे असा अर्थ अभिप्रेत असावा.)
पिशाच्या = वेड्याच्या (पिसा =वेडा)
सुणे = कुत्रे
2 Jul 2014 - 12:04 pm | प्रसाद गोडबोले
पैसा ह्या शब्दाची व्युत्पत्ती ह्या पिसा वरुन तर झाली नसेल ना ? *biggrin*
2 Jul 2014 - 12:07 pm | पैसा
गूगलकाकांना विचारा.
2 Jul 2014 - 12:08 pm | एस
तो पिसाचा मनोरा वेडाच आहे ना असा झुकायला! ;-)
2 Jul 2014 - 12:44 pm | बाबा पाटील
आवडले.
2 Jul 2014 - 12:50 pm | आयुर्हित
धन्यवाद.
2 Jul 2014 - 4:43 pm | दिपक.कुवेत
हे एवढं सगळं तुम्हि टंकलय? फार पेशन्स बुवा!!!
2 Jul 2014 - 5:23 pm | प्रसाद गोडबोले
च्प्य पस्ते रे ... हे बघ ह्या इथे आहे संपुर्ण
http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5...
3 Jul 2014 - 4:36 pm | दिपक.कुवेत
कॉपी-पेस्ट आहे व्हय. मग ह्यात यांच योगदान काय?
3 Jul 2014 - 5:58 pm | अधिराज
अरेरेरे! निदान दुसर्यांना शानपना शिकवताना तरी स्वताचं डोकं वापरावं?
3 Jul 2014 - 8:32 pm | आयुर्हित
दिपक.कुवेतजी,अधिराजजी,
आपल्या डोळ्यांनी लेख परत एकदा नीट वाचावा, रंग बदल असेल तर तो ओळ्खावा ही विनंति.
2 Jul 2014 - 10:04 pm | सस्नेह
मूर्खलक्षणेच काय, आख्खा दासबोधच वाचनीय अन चिंतनीय आहे.
3 Jul 2014 - 12:36 pm | प्यारे१
अनुकरणीय बाबत आपलं काय मत आहे? ;)
3 Jul 2014 - 1:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
दासबोधामधे वर्णन केलेल्या आदर्श पुरुषाचे अनुकरण करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण ते कितपत जमेल अशी शंका प्रत्येकाच्याच मनात असते. अनुकरण नाही तरी किमान दासबोधाचे चिंतन झाले तरी बरेच काही साध्य होईल असे वाटते.
(तेवढेच करायचा अटोकाट प्रयत्न करत असलेला) पैजारबुवा
3 Jul 2014 - 1:35 pm | मनीषा
अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे ।
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२॥
दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें ।
डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३॥
काय बोलावे? समर्थ सर्वज्ञानी होते हेच खरं ...
अवांतर : "समर्थांनी मूर्खांची इतकी लक्षणे लिहून ठेवली आहेत, तरीही अजून काही लिहायची बाकी आहेत......." इति. पु. ल. देशपांडे
3 Jul 2014 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा
पढत मूर्ख मंजे काय?
.
.
.
.
.
.
जो वाचता वाचता ..मूर्ख झाला..तो का???
3 Jul 2014 - 11:47 pm | आयुर्हित
पढतमुर्खाची लक्षणे यायची आहेत अजुन पूढ्च्या भागात.
4 Jul 2014 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा
ब्वॉरं..मग पडू या...आपलं ते हे..पढू'या मग त्या भागात! ;)
4 Jul 2014 - 12:45 am | बॅटमॅन
स्वतःचे डोके न वापरता चार पुस्तकातील आंधळेपणे रट्टा मारलेल्या उतार्यांच्या बडबडीवर अन्य लोकांना सुनावणारे आणि खरेच कुणी तर्कसंगती इ. बद्दल बोलले की कमरेखाली उतरणारे लोक म्हंजे पढतमूर्ख. अध्यात्माच्या नावाखाली भाकडकथा पसरवणारेही त्यातच येतात.
(आता कुंय कुंय करत कुणीतरी गरळ ओकेल, पहाच बुवा तुम्ही =)) )
4 Jul 2014 - 6:29 am | अत्रुप्त आत्मा
@(आता कुंय कुंय करत >>> =)))))) *lol*
4 Jul 2014 - 9:45 am | बाळ सप्रे
आयुर्हितमहाराज,
असे ६०-७० श्लोक विकीवरुन इथे चिकटवण्यापेक्षा एक एक श्लोक घेउन त्याचा मतितार्थ समजावून सांगितल्यास जास्त योग्य ठरेल. वरील श्लोकातील बरेच शब्द जुन्या काळातील आहेत, तसेच वरवर पहाता काही श्लोकांचे अर्थही आजच्या काळानुरुप बोधकारक वाटत नाहित.
तुमच्या मिपावतारामध्ये हे ही एक कार्य होउन जाउ द्या..
नाहितर काय आम्हाला दासबोध म्हणजे डोक्यावर घेउन चालण्याचा ग्रंथ एवढेच माहित आहे. त्याने चाल सुधारते ..
4 Jul 2014 - 11:34 am | प्रसाद गोडबोले
आयुर्हित हे असामीच आहेत हो =))
4 Jul 2014 - 11:53 am | धन्या
हे काम आयुर्हित यांनीच केले पाहिजे असं काही नाही.
मिपावर समोरच्याला "दासबोध वाचा मग बोलू", "समर्थांनी दासबोधात अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटले आहे" असं सांगणारे जाणकारही आहेत. त्यांनीही अर्थ समजावून सांगितला तरी चालेल.
जल्ला समष्टी का काय ती आमानापन मिलू दया की. :D
4 Jul 2014 - 1:05 pm | अत्रुप्त आत्मा
@स म अष्टी >>>
4 Jul 2014 - 1:10 pm | प्रसाद गोडबोले
ऑन सीरीयस नोट : हे मला उद्देशुन आहे काय धनाजी राव ? तसे असल्यास २ श्लोक क्वोट करतो फक्त ...
"प्रचीतीविण बोलणे | ते अवघेचि कंटाळवाणे | जैसे तोंड पसरुनिया सुणे | भुंकुन गेले ||" (माझं नुसतंच वाचन आहे मित्रा , प्रचिती नाही दुसर्या शब्दात बोलायचे तर "अभ्यास" आहे "अधिकार" नाही म्हणुन मी बोलण्याला अर्थ नाही )
" अधिकारेविण सांगणे | अलभ्य होये तेणे गुणे | ह्या कारणे शहाणे | अधिकार पहाती ||" (इथे किती लोकांना श्रवणाचा तरी अधिकार आहे कोण जाणे , श्रवणाचा अधिकार नसतानाही जर र्त्यांना सांगितले तर लोक कन्फुज होतात असा अनुभव आहे , उदा. तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग | तोचि झाले आंगे स्वये तुका || हे जर अनधिकारी माणसाला सांगितले तर एक तर त्याला ते समजणार नाही शिवाय तो स्वतःला तुका समजायला लागला तर त्याला त्या अवस्थे पर्यंत पोहचणेही अवघड होवुन जाईल... म्हणुन
अधिकार पाहिला पाहिजेच!!
सध्या नुसताच अभ्यास आहे , अधिकार नाही , अधिकारासाठी पुढे मागे त्रिदंडी सन्यास घ्यायचा आणि अभ्यासलेले सारे प्रचीतीस आणायचा विचार आहे ... त्यानंतर प्रवचन करायचे की नाही ते ठरवु :)
-------------------------------------------------------
ऑन अ लाईटर नोट : इथे नुसती वादावादीच करायची असल्यास आपण दासबोधच काय ज्ञानेश्वरी ,गीता , उपनिशद , ओल्ड टेस्टामेन्ट ,न्यु टेस्टामेन्ट , संविधान , डिक्लेरेशन ऑफ इन्डेपेन्डस्न , बया , हैदोस, सविताभाभी , इलेयड , ऑडेसी...कशातलाही रेफरन्स शोधुन काढु *biggrin*
22 Aug 2018 - 11:20 pm | सतिश गावडे
यष्टी समष्टीवरुन लक्षात यायला पाहिजे होतं तुमच्या. ;)
4 Jul 2014 - 2:46 pm | सूड
ट्रॅफिक जॅमच्या धाग्यावर ताळतंत्र सोडून प्रतिसाद देणारे लोकांना मूर्खांची लक्षणे सांगतायेत हे बघून भरुन पावलो. आता डोळे मिटायला मोकळा!! उचलायला या रे! ;)
4 Jul 2014 - 2:50 pm | प्रसाद गोडबोले
>>> ये माररा सिक्सर ! =))))
4 Jul 2014 - 3:03 pm | बॅटमॅन
अगागागागाग्ङाङागागागागागागागाङागागागागागागागागा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
5 Jul 2014 - 12:25 am | आयुर्हित
क्लीब म्हणता अर्जुना
नाही जीभ कचरली
शहाण्याला शब्दाचीच
एक ठिणगी पुरली
अर्जुनालाच कळला
अर्थ शब्दांचा ज्वलंत
तारे तोडती विद्वान
शिवी देतो भगवंत!
22 Aug 2018 - 9:27 pm | तुडतुडी
क्लीब म्हणजे?
22 Aug 2018 - 10:14 pm | समर्पक
पौरुषहीन, षंढ