संधीगत वात व पक्षाघात- सामान्य लक्षणे व संयुक्त उपचार पद्धती.

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
9 May 2014 - 12:13 pm

संधीवात व पॅरालिसिस करीता संयुक्त उपचार पद्धती.

आजच्या धक्काधक्कीच्या दैनंदिन जिवनात मानवाला भेडसावणारी नेहमीची समस्या म्हणजे,उठता बसता जाणवनारी सांध्यांची कुरकुर,कोणाचे गुडघे दुखत असतात,कोणाची कंबर, तर कोणाची मान दुखत असते,आपल्याकडेच नव्हे तर जगात सगळीच कडे या दररोजच्या वेदनांकडे एक तर दुर्लक्ष केले जाते अथवा तात्पुरती वेदनाशामक औषधे घेतली जातात,आणी हाच प्रकार आयुष्याच्या शेवटच्या वळणावर अत्यंत त्रासदायक ठरतो.व कुंथत कुंथत आयुष्य जगण्याची वेळ आणतो.जर सुरुवातीसच म्हणजे ज्यावेळेस सांध्यांच्या तक्रारी सुरु झालेल्या असतात त्याच वेळी जर योग्य उपचार केले तर हा आजार फक्त आटोक्यातच नाही तर पुर्ण बरा करता येवु शकतो.यासाठी मात्र पुढील त्रिसुत्रीची आवश्यकता आहे.

योग्य आहार + योग्य उपचार + योग्य व्यायाम = निरामय जीवन.

पुढील लेखात आपण आता सांध्यांचे आजार, मनक्याचे आजार व पक्षाघात(बोलीभाषेत पॅरालिसिस) यांची सामान्य लक्षणे व त्या अनुशंगाने उपचार यांची माहिती घेवुयात.
*मणक्याचे विकार(Spondylosis) - (स्पॉन्डिलायसिस) मणक्यामध्ये गॅप, मणक्याची झीज,मणका सरकणे,हातापायाची आग होणे,हात व पायाला मुंग्या येणे,जड होणे.
*गुडघेदुखी व संधीवात(Arthritis) - गुढघ्यात पाणी होणे,आवाज येणे,हाडांची झीज होणे.कुर्चांची झीज होणे. सतत सांधे दुखणे,सांधे सुजणे.
*आमवात(Rh.Arthritis) - एकाच वेळी अनेक सांधे राहुन राहुन दुखणे,सुजणे. एक झाला दुसरा सांध्याला त्रास होणे.
*वातरक्त (Gout) – पायाच्या बोटाच्या सांध्यांपासुन वेदना,आरक्तता व सुज सुरु होते.आणी हळु हळु घोटा, गुडघा यांच्या पर्यंत जावुन पोहजते. रक्ताचा अनुबंध असल्याने दाह(आग)असते.
*कंपवात (Parkinson’s Disease) -सामान्यतः उतारवयात हात,पायाची थरथर होणे.सामान्य हालचालीवरील नियंत्रण नष्ट होणे अथवा कमी होणे.स्नायुंची ताकत कमी होते,चालणे लकवा मारल्यागत असणे,इ.
*गृध्रसीवात(Sciatica) – कमरेच्या खुब्यापासुन वेदना होणे,मांड्या गुढगा व घोटा यात वेदना,हातात - पायात मुंग्या व चमक भरणे.
*सिरागत वात(Varicose Veins) – सर्वांगास ठणका लागणे,हाता-पायाच्या शिरा मोठ्या होणे.
याचबरोबर सांधे वाकडे होणे तसेच सांधे मुरगळणे इत्यादी लक्षणे दिसणे.
**वातव्याधींची कारणे ः- खरच,दोन पोलादाचे बार एकमेकांवर घासले तरी काही काळाने ते उगाळुन गुळगुळीत होतात परंतु मणक्याच्या अथवा सांध्यांच्या बाबतीत अस घडत नाही कारण शरीरातील पोषक घटकांकडुन ही झीज भरुन येत असते.
मग हाडांची झीज का होते ?
१)अस्थी पोषक तत्वाचा अभाव व २)पोषण करणा-या मार्गात येणारा अडथळा या दोनच गोष्टींनी हाडाची झीज व मणक्यातील चकत्यांची झीज होते. या गोष्टी सुधारल्या तर इतर हाडांप्रमाणे मणक्याच्या हाडांची झीज भरुन काढाता येते.

पॅरालिसिस अथवा पक्षाघात
*शरीराच्या ठराविक एका किंवा दोन्ही बाजुंची हालचाल संवेदना जाते,तो भाग जड वाटतो,वाकडा-लुळा होणे.
*स्नायुंमध्ये बळ राहात नाही,शेवटी अवयव सुकुन जातो.*बोलणे बंद किंवा अडखळत बोलणे,तोंड वाकडे होते.,याच अवस्थेत रुग्णाला संपुर्ण आयुष्य घालावावे लागते.
कारणेः- मेंदूचे विकारः-मेंदूची गाठ,रक्तस्राव होणे,मेंदूवर दाब येणे.इत्यादी.
अपथ्यकर आहार विहार,बी.पी वाढल्याने/कमी झाल्याने इतर आजाराचा उपद्रव या स्वरुपात.

** संयुक्त उपचार पद्धती **

(ठराविक दिवसांचा संयुक्त उपचार पद्धतीने रुग्णात लक्षणीय सुधारणा होते.)
*आयुर्वेदीय औषधी उपचार- वाढलेल्या वाताला नियंत्रीत करणारी वनस्पतीजन्य व सिध्द रसौषधी व सिध्द तैल द्रव्ये.

*आयुर्वेदीय आहार उपचार- दैनंदिन आहार,विहार जो वाढलेले दोष कमी करेल व शरीराचे योग्य पोषण करेल.

*विशेष पंचकर्म उपचार-
१)सर्वांग स्नेहन- विशिष्ठ प्रकारच्या औषधी तेलाने मसाज उपचार पद्धती,ज्यामुळे वाढलेला वात कमी होतो.स्नायू रिलॅक्स होण्याकरिती व स्नायूंना बल मिळावण्याकरीता.
२)सर्वांग स्वेदन- वातघ्न द्रव्यांची औषधी वाफ ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते,व वेदना कमी होतात,तसेच मालिश केलेली तेला त्वचेवरिल रोमरंध्रे खुली झाल्यामुळे स्नायुपर्यंत पोहचतात.
३)बस्ती उपचार(enema)-आयुर्वेदातील अर्धी उपचार पद्धती.या उपचाराने मणक्याच्या गॅप,संधीवात,मेंदूची विकृती सुधारते,संवेदना आणणे,हाडांची झीज भरुन काढणे.व वाताच्या इतर सर्व आजारात उपयोगी.
४)कटीबस्ती/मन्याबस्ती/जानुबस्ती- वेदना असणा-या भागावर पाळे करुन कोमट तेल भरणे व जिरवणे.यामुळे तेल खोलवर पोहचुन,आखडलेले स्नायूबंध खुले होतात व वेदना कमी होतात.
५)लेप- औषधी वनस्पती द्रव्यांचा लेप मांसाच बळ वाढवितो,संवेदना येतात,सुकलेला शरीरभाग सुधारतो.
६)रक्तमोक्षण-ठणकणा-या भागावर जळु लावुन दुषित रक्त काढणे त्यामुळे त्या भागाचे रक्ताभिसरण सुधारते.
७)नस्य – मेंदूच्या पेशींचे बळ सुधारते.

*Chinese Therapy
1)Acupuncture- स्नायू व सांधे यांच्या वेदना त्वरीत दूर करणारे उपचार.
2)Cupping: Vaccum कप मसाज व्दारे स्नायू मोकळे करणे.
3)Scrapping: Chinase stone मसाजव्दारे सांध्यातील वेदना घालवणे.
4)Moxa: सांध्यास व खोलवरील स्नायूस शेक देणे.

*physiotherapy- स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी व व्याधी परत होवु नये म्हणुन केली जाणारी उपचार व व्यायाम पद्धती.

*** वरील संपुर्ण उपचार पद्धतीमध्ये,रुग्णास सरासरी १० ते ३० दिवस पंचकर्म करावे लागेल,पोटातुन औषधी साधारणतः २ ते ३ महिने घ्यावी लागतील.व्यक्ती,व्याधी व प्रकृती परत्वे उपचाराचा कालावधी बदलु शकतो.
*** योग्य आहार,योग्य व्यायाम व योग्य उपचार यांच्या सहाय्याने आपण नक्कीच व्याधीमुक्त होवु शकतो.

डॉ.प्रशांत दौंडकर पाटील.
http://www.ayurvedandpanchakarma.com/

समाजजीवनमानविचारअनुभवमतसल्ला

प्रतिक्रिया

जेपी's picture

9 May 2014 - 1:21 pm | जेपी

चांगली माहिती.

सविस्तर प्रतिसाद देईनच नंतर.

एक प्रश्न - पक्षाघात होणे अनुवंशिक असते का ?

पैसा's picture

9 May 2014 - 2:49 pm | पैसा

आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून खूपच उपयोगी माहिती आहे. माझ्या आईला वयानुसार गुडघ्याच्या सांध्यातील वंगण कमी झाल्यामुळे (याला निश्चित वैद्यकशास्त्रीय संज्ञा मला माहित नाही.)खूप वेदना होत होत्या. इथल्या एका आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणार्‍या वैद्याने काही सोपे व्यायाम करायला सांगितले आणि वरून लावायला एक लेपगोळी दिली होती. त्याच्या वापरानंतर तिच्या वेदना आणि सूज खूपच कमी झाली होती.

सौंदाळा's picture

9 May 2014 - 3:21 pm | सौंदाळा

उपयुक्त माहिती.

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2014 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

अत्यंत उपयुक्त लेख! :)

खूपच उपयुक्त लेख आहे. चांगली माहीती मिळाली.

रेवती's picture

9 May 2014 - 6:20 pm | रेवती

वाचतिये हो डॉक्टर!

मुक्त विहारि's picture

10 May 2014 - 9:22 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

भावना कल्लोळ's picture

12 May 2014 - 11:54 am | भावना कल्लोळ

+१

स्पंदना's picture

14 May 2014 - 7:57 am | स्पंदना

माझी एक शंका आहे डॉक्टर.
हे जे तेल जीरवणं असतं,त्यात तेल त्वचेच्या खाली त्या दुखर्‍या भागापर्यंत खरंच पोहोचत का? कारण शोषुन घेण्याचे काम फक्त त्वचे मार्फतच होत. त्यापुढे जाउन ते तेल सांध्यांपर्यंत पोहोचत का?

तुम्हे दिलेली माहीती खरच उपयुक्त आहे. पंचकर्माबद्दल मला फार औस्त्युक्य आहे.

मालिशने खरतर आखडलेले स्नायुबंध खुले होतात,वातव्याधी मुख्यत्वे रुक्षत्व अत्याधिक प्रमाणात असते त्यामुळे त्याठिकाणी स्थानिक स्नेहनाची आवश्यकता असते व्यवहारात देखिल प्रत्यक्ष प्रमाण म्हणुन एक सोप्पा उपाय करुन पहा.घरात कोनाचाही एखादा सांधा दुखत असेल तर बाजारात सहज उपलब्ध होणारे क्युअर ऑन सारख्या तेलाने मालिश करुन शेकावे,एक दोन दिवसात लगेच आराम मिळतो.दुर्देवाने आयुर्वेदाचे प्रमाणीकरण झालेले नाही परंतु अनुभवजन्य ग्यान च्या आधारे ही पद्धती निच्छितच अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे.(अवांतर-बाजारात मिळणार्‍या आधुनिक शास्त्रातील वेदनाशामक मलमांच्या मध्ये तरी वेगळी कोनती कन्सेप्ट असते.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 May 2014 - 2:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जळवेला बरोबर दूषित रक्तच सापडतं असं तर वाटत नाही. ट्रेक करणाऱ्या अनेकांना, नको तिथे जळवा लागल्याचे अनुभव अन्यथा आले नसते.

जळू लावताना रुग्ण आणि/किंवा वैद्यांना घाण वाटत नाही का? त्यापेक्षा स्वच्छ सुई खुपसून रक्त उपसून घेणं सोयीचं, कमी कटकटीचं, हायजेनिक आणि किमान किळसवाणं वाटत नाही का, याबद्दल मला 'औस्त्युक्य' आहे. (अवतरणातला शब्द संबंधितांनी ह. घेणे.)

निरक्षिर विवेक हा सिद्धांत मान्य केला आहे.प्रत्यक्षात ज्या वेळेस वेदनेच्या ठिकाणी रक्तदोषाचा अनुबंध असेल त्याच वेळेस जलौकाचरण केले जाते,एकांगिक अथवा क्षयजन्य किंवा अवरोधजन्य संम्प्राप्तीमध्ये नाही.हा सर्वस्वी त्या त्या अनुभवी वैद्याचा निर्णय असतो.दुसरे जळुच्या लाळेमध्ये हिरुडीन नावाचे तत्व सापडते की जे रक्त साकाळु देत नाही त्यामुळे जळु लावलेल्या ठिकाणी रक्ताभिसरण सुधारते व वेदनाशमन होण्यास मदत होते. जलौकाचरण हे फक्त स्थानिक दुष्टी असेल तरच केले जाते इतर वेळी सिरागत रक्तमोक्षणच केले जाते.
बाकी तुमच अनहायजनिक अथवा किळसवाण प्रकार- कुठल्याही डॉक्टर अथवा वैद्याचे कामच लोकांची घाण साफ करण आहे,कुनीतरी हे काम केलेच पाहिजे,त्याची किळस वाटणारा प्राणी वैद्यकिय पेशाच्या लायकीचा नसतो.

माझ्या उजव्या पायाला सायटिका झालेली .नारायणतेल लावून गुण नाही आला .अर्जुनारिष्ट आणि बलारिष्ट( दोनशे एमेल प्रत्येकी)रोज थोडे सात दिवस घेऊन गुण आला .दुसऱ्या कोणत्याही अॅलोपथी गोळ्या घेतल्या नाहीत .ब्रफेनपण नाही .