लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे. ती हाक तशी नुसती लिहून ऐकवता येणार नाही,ती ऐकवूनच लिहायला पाहिजे,अशी आहे.हा आमचा मद्राशी शास्त्री...तिथून आपला (बालाजी-सारखा)भारदस्त देह घेऊन जाता..जाता त्याला नेहमी ती हाक मारतो.सुरेsssssssssशं..,यंडगुंडो गुलिकुंद्डो??? मग तो सुरे..शं'ही त्याला तसल्याच वेड्यावाकड्या जिल्ब्यां-मधे काहितरी उत्तर देतो.मग आमचा हा तामिळ डॉन ( *biggrin* ) मद्राशी-शास्त्री आपला तो बालाजी-देह घेऊन,सुरेश'च्या गाडी मागे पाण्याच्या पिंपाजवळ उभा र्हातो,आणि सुरेशं त्याला "शा...स्त्री,यंडौड्गोड्गुडो...यिड्ली!" असं म्हणून त्याच्या हतात,गरमा-गरम यिड्ली-सांबारची डिश ठेवतो. मग आमच्या या मद्राशी-शास्त्री'चे मनसोक्त 'होई'पर्यंत त्या दोघांच्या गप्पा त्या रम्य तामिळीत चालतात.(आणि त्या तिथे ऐकायला अजूनच रम्य-मज्जा येते.) मग जरावेळानी मद्राशी-शास्त्री'ची 'नजर' माझ्याकडे पडते.आणि बशीतल्या यिड्लीला-सांबारात चमच्याने मौत-देत तो मला विचारतो...
मद्राशी-शास्त्री:-आंsssssss,शाsssस्त्री..यिदर कैसे आज?'स्लॅक' है क्या??? (दुष्ष्ष्ट! :-/ )
मी:-नै जी!..आज सुबे का काम खतम हो गया,अब दिनभर रिकामा है।
मद्राशी-शास्त्री:-आ..आ..आ..आ...(हा त्याच्या हसण्याचा आवाज बरं का! तामिळ्यांच्या भाषेतच काय?पण हसण्याच्या उच्चारी आवाजात सुद्धा काही स्वराक्षरव्यंजनं,अस्तित्वातच नाहीयेत!म्हणूच त्यांचा ह्हा..ह्हा..ह्हा..ह्हा..! -हा हसण्याचा आवाजसुद्धा, आ..आ..आ..आ..! असा..घश्यात काडी अडकल्यासारखाच येतो.) आणि मग मी 'मोकळा-सापडल्याच्या' आनंदात मला तो दुपारच्या कामाची ऑफर देतो...बिज्जी नै ए..तो चलो दोपर को अमारे सात..वानव्डी मे नव्ग्र का जप और हवन ए! बओत पैसा मिलेगा...आते क्या? (ही मद्राश्यांची 'शेवटाला-गाजर' दाखवण्याची सवय,आपण जसा 'पहिल्यांदा'च-मुळा' दाखवतो..तश्शीच आहे!)
मी:-तुम्हारे बहोत पैसे मे,आज कितना रुपैय्या मिलने वाला है!!!? (है..य्या! =)) जय भवानी! जय शिवाजी! =)) )
मद्राशी-शास्त्री:-(परत)..आ..आ..आ..आ..,तुम बओत अ(ह)रामी है साला..चलो,देंगा तुमको..जित्ना चाईये उत्ना! दोपर को,रैट्ट २ बजे मेरे गर को आव!
मी:- हां जी..आता है जी! ( *biggrin* )
मद्राशी-शास्त्री:- चलो..अब तंबाकू निकालो! (हलकट मेला!!! *biggrin* )
असला काहिसा संवाद होतो,आणि माझी गाडी परत सुरेशच्या गाडीकडे वळते.मग मी नेहेमीप्रमाणे पहिलं, १ डब्बल यिड्ली (हवं तेव्हढं) सांबार घेऊन संपवतो.आणि नंतर तिथला माझा अत्यंत अवडता बट्टाट्टावडा घेऊन तेव्हढ्याच सांबारात परत उडवतो. आणखि जागा र्हायली असेल तर मुखशुद्धीसाठी डाळवडा/चटणी! मग पुढच्या एका पेश्शल ठिकाणी "चाsss!",किंवा मूड आला तर पूर्वीच्या भवानी केटरर्स्स कडची काssssपी! (२ वर्षापूर्वी ती चांगली मद्रासी मेस तिथनं गेली राव! :( ) आणि अत्ताच्या त्याच्या समोर असलेल्या दुसर्या एका तसल्याच मेसवरची काssssपी! नंतर कँम्पातलं बर्फावरचं थंडग्गार पान(आपल्या समोर बर्फावर ठेऊन लावलेलं!) मग जरावेळ ते हिमालयी पान नीट चघळून..."झालं!" ( ;) ) ...की तसाच पुढे शिवाजीमार्केटातला इराणी चहा,आणि त्याच्यावर एक कडक डबलबार लावला..की कँम्पातनं घरापर्यंत कसं...फुलपाखरासारखं तरंगत..तरंगत..यायला मिळतं.हा सगळा कार्यक्रम ज्या आमच्या मन-पसंत यिड्ली,आणि प्रामुख्यानी सांबारा'मुळे होतो,त्या सुरेsssssssssशं च्या या येकनंबरी यिड्ली-सांबारच्यागाडीची आणि तिथल्या पदार्थांची,आधी...ही एक नुसती फोटोरूपी झलक पाहू.
१) यात 'रंगीत छत्री' पासून पुढे वाढलेलं जे भक्तगणांचं कोंडाळं दिस्तय ना..ती सुरेsssssssssशं च्या गाडीची जागा!
२) ही सुरे...शं'ची गाडी! फक्त यात दिसतोय तो सुरेश नाही,त्याचा हेल्पर आहे.सुरेशंचा या फोटोत फक्त-हात आहे! ;)
३)यातही पाटिआड दिसतोय..तो सुरेशंचा भाऊ आहे.आता खुद्द सुरेश हा दुसरा हायफाय श्टॉल चालवत असल्यानी या मूळपीठावर कदिमदीच दिसतो.पण कधी गेलात तर सहज ओळखाल! बघताक्षणीच कळतं,हा अण्णा आहे. कुरळे(मॅगीनुडल्स)केस,कानात सोन्याच्या रिंगा,कपाळाला त्यांच्या श्टाइलचं गंध (आणि घामही! ;) )
४) आणि ही'च ती भट्टी! *biggrin* सांबार रटारटा तापवणारी!
एक कॅन-'खाली'...एक कॅन-'वर'..।
पिण्यापूर्वी जमिनीत..पिल्यानंतर-वर॥ *dance4*
५)ह्ये आमचं लाडकं सुरेssssssशकडचं यिड्ली सांबार! *yahoo*
६)आनी ह्यो त्याच सांबारातला बट्टाट्टावडा...वरनं निस्तेज वाटला,तरी आतल्या आलं/लसूणाच्या (आता..क्वचितच मिळणार्या) मसाल्या मुळे-दणका उडवणारा!
७) हे आमचं बर्फा-वरचं *biggrin* पान!!!
८) ह्यो शिवाजीमार्केटातला श्टाइल-सह-इराणी चहा!
९) णंतरच्या डबलबार तंबाखूचा फोटू..काहि अ परिहार्य कारनास्तव क्याण्सल करनेत आला आहे!
=)) ... =)) ... =))
अपोलो टॉकिजकडून (रास्तापेठ) के.ई.एम.हॉस्पिटलकडे जाणर्या रस्त्यावर उजव्या बाजुच्या..पहिल्याच गल्लीत-आत,हा आमचा सुरेsssssssssशं-यिड्लिवाला असतो. तो २/३ गल्ल्यांचा सगळा भागच त्यांचा आहे. आणि त्या गल्लीच्या एका टोकापासून ते अय्यप्पा देवीच्या पुढे..चौकापर्यंत अनेक इडली-सांबार-वडा सांबार विकणारे स्थिरावलेले आहेत.त्यांच्यापैकी ७५ ट्क्के गाड्या शुद्धमराठी-माणसांच्या आहेत.पण जशी त्यांची कॉफी(उच्चारी-काsssपी!) आपल्याला जमत नाही,तसेच त्यांचे काहीच आपल्याला जमत नाही,हे या सगळ्या गाड्या सिद्ध करतात.एव्हढच कशाला? उरलेल्या २५ टक्क तामिळ्यांपैकी सुद्धा ह्यो आमचा सुरेsssssssssशं सोडला तर एकाकडेही सांबाराची ती अस्सल चव आता (अस्तित्वातच) उरलेली नाही,हे ही खरं आहे. इतकच काय? इडलीलाही त्यांन्नी,महागाईच्या नावाखाली गेल्या १५ वर्षात भरपूर 'सोडा'...मारलेला आहे.अश्यात हा आमचा सुरेsssssssssशं म्हणजे क्या केहेने!!!? त्याच्या कडचं सगळ्यात काही अस्सल असेल,तर त्यानी आजतागायत जशीच्यातशी ठेवलेली त्यांच्या पदार्थांची चव आणि भाव! महागाई..महागाई..कित्तीही जरी असली,तरी मूलभूत गोष्टींमधे फरक करायचा नाही,म्हणजे दुष्काळातही आपलं गिर्हाइक ठाम रहातं. हे खर्या अर्थशास्त्राचं गणित त्याच्या रक्तापेक्षा मला वाटतं,त्याच्या स्वभावधर्मामधे असावं.(तिथल्या त्याच्या'च जातभाइंनी हे सिद्धही केलेलं आहे!)माझी आणि त्याची तोंडओळख सुद्धा नाही.किंवा मी त्याचं रोजच गिर्हाइक सुद्धा नाही. मी कधिही म्हणजे..अगदी त्या भागातून गेलो,तरी सुद्धा "---तिकडे गेलो की ---तिथे जायला(च) पाहिजे" असलं श्रद्धाळू गणितही ठेवलेलं नाही.
मला सुरेशच्या कडच्या सांबाराची अचानक तहान लागते,हेच माझं तिथे जाण्याचं खरं कारण आहे. माझ्यालेखी त्याच्याकडे मिळणार्या सांबारच्या चवीची तूलना ही एखाद्या नि'रव शांतता देणार्या देवालयासारखी आहे. तिथे जसं तो भगवंत आणि आपण हे श्रद्धेचं निस्सिम अधिष्ठान काम करून जातं,तसं या सुरेsssssssssशंच्या गाडीवरचं सांबार आणि मी ..त्याच्या बरोबरीच्या इडली आणि वड्यांबरोबर डायरेक स्वर्गात जातो.अश्यावेळी इहलोक..हे स्वर्गात जाण्याचं (काहि क्षण का होई ना!? ;) ) साधन आहे,या (खर्या-आध्यात्मिक :D ) सत्यावर माझा विश्वास बसतो.
ते गरम..गरम सांबार पिताना काय काय होतं म्हणून सांगू??? आहाहाहाहाहा...!!! एकदा का ती बशी तोंडाला लागली आणि हळूहळू (परंतू नॉनश्टॉप ) ते सांबार प्यायला लागलो..की डोक्यावरची केसंपण त्याच गतीनी हळूहळू उगवणार्या गवतासारखी वर...वर..येऊ लागतात! आणि..मस्ताकातून थंड पाण्याचा प्रवाह अंतर्मनापर्यंत जात असल्याचा भास होतो. ब्रम्हचर्य..नावाच्या निरर्थक वाळवंटातून नाइलाजास्तव मार्ग-क्रमणा करणार्या युवकास,अचानक एखादी....(जाऊ द्या..लोक हो,अनुभव-शून्य जातकास,त्या प्रांतातील-सत्याची,सम्यक भाषाSप्रचीती येइलच..असे नाही!..नाही का?) ................................................असो!!!
त्या सांबारात तो काय वापरतो? आणि काय नाही? हे विचारायच्या भानगडीत मी आजपर्यंत पडलेलोही नाही,आणि पडणारंही नाही.फक्त ती गाडी ४० वर्ष जुनी आहे,अशी माहिती मला तिथेच एकदा कानावर आली होती.
एक मात्र खरं त्याच्या गाडीवर त्या एरियातलं सगळं पब्लिक अगदी रतीब लावल्यासारखं येतं. सगळं म्हणायचं,कारण तो एरिया ख्रिश्चन/मोमिनांपासून..ते (हल्लीचे) भय्ये/मराठी लोकांपर्यंतचा,असा सर्वांचा आहे. नाश्टा काय करावा? किंवा अमकाच रोज करावा का? या बाबतीत,आपणा मराठीजनांचं वैशिष्ठ्य म्हणावं असं फारसं काहि नाही,पण उरलेल्या समाजांचं ते-तसं (आजही) आहे. एरवी ते तसे दुसर्यांच्या कोणत्याच ठिकाणांवर वारंवार हजेरी लावत नाहीत,पण सुरेशकडची चव त्यांना खेचून अणत असावी,असं आपलं 'मला मात्र' खात्रीनी वाटतं. नाहितर त्या एरियात 'त्यांची हॉटेलं' मुबलक असताना,त्यांच्यातलेच अ नेक-इन्सान सुरेश'ची चव चाखायला आलेच कशाला असते? अहो.. हा चविचा खेळ आहे हो,त्याला वरतून मुद्दाम तयार केलेली..ती.."वेगळेपणाची-भेळ"..फार काळ दूर ठेऊ शकत नाही! शेवटी आध्यात्मिक सत्य ही सार्वत्रिक चव नसली,तरी "चव" हे सार्वत्रिक आध्यात्मिक सत्य आहेच आहे! ते नाकारून बदलता येणार नाही...स्विकारल्यामुळे हलकं करता येइल..इतकच काय ते!!! ;)
असो!
======================
मंडळी...पुन्हा (लवकरच) भेटू अश्याच एका अव्वल-खादाडीच्या ठिकाणावर! तो पर्यंत.... राम राम!
कळावे...
आपलाच इहलोकीचा अत्रुप्त..आणि..काहि क्षणांचा स्वर्ग-वासी...आत्मा!
======================
प्रतिक्रिया
12 May 2014 - 5:55 pm | दिपक.कुवेत
आता लेख सवडिने आवतो. पण तो कुहुप चान असेल ह्यात शंका नाहि
12 May 2014 - 6:00 pm | आत्मशून्य
पुणेरी धागा.
12 May 2014 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा
T.P.-कल
आत्म शून्य प्रतिसाद!
सही========>चहात खारी!
13 May 2014 - 3:04 pm | आत्मशून्य
माताय, पुण्याचे साधे कौतुक करायचे म्हटले तर लगेच "T.P.-कल" प्रतिसाद येतो राव.
०===०===०===०===०
स्विकृती एक दीपस्तंभ! विकृती एक जीवन संघर्ष!
13 May 2014 - 8:36 pm | अत्रुप्त आत्मा
बाकि कै म्हणा विडंबन सही सही शोभलं हो तुंम्हाला!!!
12 May 2014 - 6:01 pm | आदूबाळ
जबरदस्त! हे ठिकाण माहीत नव्हतं. नक्की जाणार.
12 May 2014 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चटपटीत लेख आणि फोटो !
कॉलेजच्या कँटीन्मधल्या शेट्टीच्या सांबाराची चव जीभेवर आली ! आता के इ एम जवळून चक्कर झाली की सुरेsssssssssशं...(अण्णा!)ला राजाश्रय देणं अटळ झाले आहे :)
12 May 2014 - 6:03 pm | प्रचेतस
आम्ही ते भाग्यवंत. लाभले आम्हास सुरेश अण्णाकडचं यिड्डली वडा सांबार खाण्याचे सुख.
12 May 2014 - 6:04 pm | दिपक.कुवेत
पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल. लेख हा त्या यिडली-सांबार, ईराण्याकडचा चहा, बर्फाळलेलं पाना सारखाच फर्मास/फक्कड जमलाय.
12 May 2014 - 6:05 pm | प्रचेतस
वाडिया कालेजमागची अण्णाची टपरी याहून भारी होती राव. रस्तारुंदीकरणात ती गेली राव.
13 May 2014 - 12:40 pm | बागेश्री
वल्ली,
वाडिया कोलेज मागचा अण्णा आता cannought place मधल्या गाळ्या मधे shift झालाय. चव पण अजुन तशिच आहे.
13 May 2014 - 1:32 pm | प्रचेतस
धन्यवाद बागेश्री.
आता तिकडे चक्कर मारून यायला हवेच.
13 May 2014 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्या अण्णाच्या गाळ्याचं नाव सांगू शकाल का?
13 May 2014 - 6:23 pm | प्रचेतस
तेव्हा साईनाथ का साईकृपा असं काहीसं होतं.
13 May 2014 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्स अ लॉट !
13 May 2014 - 6:53 pm | प्यारे१
तुमचं 'माहेरपण' जोरात सुरु दिसतंय इ. ए. सर!
13 May 2014 - 8:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
12 May 2014 - 6:08 pm | शिद
ईडली-सांबार, डोसा, उत्तपा व इतर तस्तम साऊथ ईंडीयन खाद्य पदार्थ रस्त्यांवरच्या उभ्या गाड्यांवरच एकदम चटपटीत व चविष्ट लागतात असे मला वाटतं. त्यांच्याकडे मिळणारी पांढरी चटणी पन मस्तच असते.
घरी कितीही वेळा प्रयत्न केले तरी तशी चव काही साध्य करता येत नाही. :)
13 May 2014 - 12:28 pm | प्रमोद देर्देकर
अगदी +++१
कारण ते सगळे पदार्थ आपल्या समोरच तयार होत असल्याने स्वच्छता कशी आहे ते दिसते.
नाहीतर नामांकित "अ" श्रेणी हॉटेलात हे असले प्रकार सर्रास होतात.
12 May 2014 - 6:09 pm | स्पा
एक णंबर रे वुव्या, सही लिवलय
12 May 2014 - 6:11 pm | जेपी
पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय. तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय. याधी फक्त स्वारगेट चौकातल कॅफे आन वासवानी जवळचा वडपाव( ज्याच्यात लिंबुमिरची लोणच देतात
12 May 2014 - 6:11 pm | बॅटमॅन
सांबाराची तहान लागली च्यायला. सालं दक्षिणायन बंद का पडलं *cray2* *cray2*
12 May 2014 - 6:24 pm | प्रचेतस
दक्षिणायन बोगस होतं बे.
12 May 2014 - 6:28 pm | बॅटमॅन
क्वांटिटी अंमळ कमी होती एवढं सोडून चवीतली उणीव सांग, मानलं तुला.
12 May 2014 - 6:30 pm | प्रचेतस
चव पण आवडली नव्हती बे. त्यापेक्षा साऊथ इंडिज कैक पटीनं चांगलं आहे.
12 May 2014 - 6:32 pm | बॅटमॅन
सादर(किंवा विदौट आदर) असहमत आहे *biggrin*
सौदिंडीज ची चव लै भारी आहेच पण दक्षिणायनमध्ये जे रसम मिळायचं त्याची सर कुणाला नाही. अन्य आयटमही तितकेच जबराट होते.
12 May 2014 - 6:56 pm | सूड
अरे वा!! बंद झालं का दक्षिणायन? फ्याट्यावर मारायच्या सुद्धा लायकीचं नव्हतं ते. तीन माणसांसाठी पुरेल सांगून जेमतेम एक माणूस जेवेल इतपत भात पुढ्यात आणून ठेवला होतंन्. आता त्याची लुंगीवाली ग्यांग गेली असती हाटेलात तर तेवढासा भात त्यांच्या दातालाही लागला नसता. क्वालिटीही यथातथा होती बर्का!
12 May 2014 - 7:22 pm | बॅटमॅन
हॅ हॅ हॅ.
बाकी चालू द्या.
13 May 2014 - 10:00 am | प्रचेतस
सूडक्याशी मात्र सहमत हो.
तुला चांगला अनुभव आला असेल पण आमच्या वेळी तरी क्वालिटी आणि क्वांटीटीची वाटच लागलेली होती. शेवटी मराठवाड्याचे धपाटे आणि सांगली भेळ ह्या गाड्यांवर जावे लागले.
12 May 2014 - 6:32 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू वल्ली..
आणि बॅट्या..चवित क्वलिटी होती..पण रेट....अबबबब... ! *shok*
13 May 2014 - 1:55 pm | मृत्युन्जय
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील ही पापे? अर्रे उद्या म्हणशील बेडेकरची मिसळ आणि चितळेची बाकरवडी बोगस असते. दक्षिणायन एकदम अस्सल. किंमती जरा जास्त होत्या हे मान्य. पण चटण्या आणि सांबारसाठी पुर्ण मार्क. रस्सम तर केवळ अप्रतिम.
13 May 2014 - 2:01 pm | प्रचेतस
बेडेकर मिसळ ही खरेच बोगस असते राव. गोड मिसळीला काय मजा, बाकी चितळेंची बाकरवडी अजूनही नंबर वन. तरीही मशिनवर बनवणे सुरु झाल्यापासून पूर्वीसारखी चव राहिली नाही हे खरे.
13 May 2014 - 2:08 pm | मनिष
+१
हे दक्षिणायन राहूनच गेले.
13 May 2014 - 4:12 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. किमान एक तरी मिपाकर माझ्याशी सहमत अस्ल्याचे पाहून आनंद वाटला.
या पापक्षालनार्थ वल्लींनी भटकंती अथवा आयकॉनॉग्रफीचे २ धागे किंवा गेलाबाजार ३ विडंबने पाडली पाहिजेत. हेच खरे प्रायश्चित्त होईल. गॉथमकर ब्रह्मवृंदाचा फायनल आदेश आहे हा.
-बॅटंभट्ट गॉथमकर.
13 May 2014 - 4:30 pm | प्रचेतस
=))
बाकी एक सुमार विडंबन नुकतंच कुठं इथं पाडलं होतं पण ते लैच सुमार असल्याने कुणाचं लक्षं गेलं नै भौतेक.
वेरूळ लास्ट पार्ट, अंजनेरी लायनीत आहेत भटकंतीला. :)
13 May 2014 - 4:44 pm | बॅटमॅन
ते वाञलं अन हे वायलं ;)
तुमच्या प्रायश्चित्ताच्या ब्याकलॉगावर बारीक लक्ष आहे बरे का आमचे!
(धर्ममार्तंड) बट्टमण्णाचार्य.
13 May 2014 - 4:51 pm | प्रचेतस
हाहाहा. =))
12 May 2014 - 11:12 pm | नंदन
>>> सालं दक्षिणायन बंद का पडलं Cray 2 *cray2*
संक्रांत आली असेल ;)
13 May 2014 - 9:15 am | llपुण्याचे पेशवेll
आले कोटीभास्कर आले. संक्रांत आणलेनीत दक्षिणायनावर मग आता उत्तरायणात एखादा लेख पाडून वसंतबहार फुलवा नंदूशेठ. तो मागे तुर्कस्तानातल्या सफरीनंतर फारसे काही वाचले नाही तुझे.
13 May 2014 - 12:24 pm | बॅटमॅन
नवकोटनंदन _/\_
12 May 2014 - 6:36 pm | पिंगू
आज नेमकी आमची खादाडीची जागा तुमाला गावली बगा.. कधी येताय आमच्या सोबत सांबार हाणायला..
12 May 2014 - 6:53 pm | खटपट्या
उद्या ठाण्यातून निघून पुणे मार्गे कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार आहे. रस्त्यात हे ठिकाण लागेल का?
नसल्यास चांगले जेवणाचे ठिकाण सांगा.
12 May 2014 - 7:09 pm | अत्रुप्त आत्मा
@ रस्त्यात हे ठिकाण लागेल का?>>> नाही जी...ते बरच आत..सिटीत आहे.
12 May 2014 - 7:15 pm | खटपट्या
मग पुण्यात दुपारी हादडायला चांगले ठिकाण सुचवा
13 May 2014 - 1:58 pm | मृत्युन्जय
शहरात शिरायचे नसल्यास जेवणासाठी पुणे - बेंगलोर हायवेवर डेक्कन पॅव्हिलियन चांगले आहे. पण आवर्जुन थांबुन खावेच असे नाही.
13 May 2014 - 8:11 pm | धन्या
खुप महाग आहे ते.
13 May 2014 - 4:16 am | जयंत कुलकर्णी
सातारा रोडनेच जावे लागेल. तेथे हॉटेल पंचमीच्या चौकात डावीकडे वळाले की उजवीकडे नागब्र्ह्म आहे. तेथे हे सर्व पदार्थ व आप्पे उत्कृष्ट मिळतात.
12 May 2014 - 6:58 pm | पैसा
असल्या गाड्यांवरची चव काय वेगळीच असते! ती मोठ्या हॉटेलांतून क्वचितच भेटते!
12 May 2014 - 7:08 pm | प्यारे१
मस्त स्लर्रर्रर्रर्रप लेख!
12 May 2014 - 7:35 pm | अनन्न्या
आवडती डीश!
12 May 2014 - 7:36 pm | केदार-मिसळपाव
विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे.
लै बेक्कार फोटु आहेत.
जाउद्या...
आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...
12 May 2014 - 9:37 pm | स्पा
वहीणीच्या हातच्या जेवणाचा व्रुतांत कधी रे येणार?
-- स्पिलाधर
12 May 2014 - 10:04 pm | सूड
साय, दूध एखादी गाय हे सगळं त्याआधी अत्यावश्यक आहेसं दिसतंय. =))))
12 May 2014 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा
@वहीणीच्या हातच्या जेवणाचा व्रुतांत कधी रे येणार?>>> :-/ हल कट पांडू..हाणू का तुझ्या डोक्यात दांडू? :-/
आत्मू दां डुब्बा-फटकाखाऊ पां-डुब्बा! =))
..........
13 May 2014 - 12:25 pm | बॅटमॅन
हे यमक अंमळ वेगळे आहे असे आठवते, हो किनै लोक्स ;)
12 May 2014 - 10:31 pm | Prajakta२१
तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे तिथे खूप मस्त भेळ मिळते :-)
(आत्ता अजून मिळते का ते माहिती नाही)
13 May 2014 - 4:42 pm | तुषार काळभोर
मिळते की..!!
ओली भेळ, भडंग भेळ, फरसाण भेळ, एस्पीडीपी...
स्लर्प--स्लर्प--स्लर्प!!
13 May 2014 - 4:48 pm | तुषार काळभोर
'कल्याण'पेक्षा 'इंटर्व्हल' दहापट चांगली, असं माझं वैयक्तिक मत आहे.
13 May 2014 - 4:51 pm | प्रचेतस
कल्पना, इन्टर्वल ह्या हुच्च भेळींना मागे सारून संभाजी बागेतील 'व्यास भेळ' अखिल जगात सर्वोत्तम असे माझे मत आहे.
13 May 2014 - 6:28 pm | सौंदाळा
व्वा वल्लीबुवा जुनी आठवण ताजी झाली.
११वी, १२वी मॉरडनला (मॉडर्न नाही) असताना व्यास भेळवाल्या काकांकडे किती भेळा खाल्ल्या याचा हिशोब नाही.
शेवटचे जाऊन ३ वर्षे झाली. जायला पाहीजे राव आता.
12 May 2014 - 10:32 pm | तुमचा अभिषेक
मुंबईत देखील बरेच ठिकाणी रस्त्यावरच्या अण्णा लोकांकडे मिळणारे मेदूवडे जाम लुसलुशीत असतात. दुर्दैवाने सांबारमध्ये दम नसतो, कारण ते त्यांना परवडणारेही नसते म्हणा, पण तरी खायला मजा येते. कुठे गर्दी दिसली की घुसायचे बिनधास्त ..
बाकी, बर्फाच्या लादीवरचे पान, वाह क्या बात है, कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. स्टडीनाईटस मारताना तुडुंब चरून झाल्यावर माटुंग स्टेशनला आम्ही मुद्दाम ते पान खायला म्हणून जायचो.
12 May 2014 - 11:13 pm | नंदन
लेख, वर्णन आणि फोटू झकास!
13 May 2014 - 3:51 am | कंजूस
वणक्कम् (नमस्कार) .
सुरेऽऽश इटटलीवाल् रोम्ब ऽ नल्लारिकाय् (=सुरेश इडलीवाल भयानक चांगला आहे ).निंगऴ अवनक्कु विट्टील नवग्र पोयवेंडुम् .(=आपण त्याच्या घरी नवग्रह पुजेसाठी जायला पाहिजे ).ननरि स्वामि (धन्यवाद महाशय ) .
13 May 2014 - 4:53 pm | बॅटमॅन
इंगे नांगळ वेण्डुम्.
- ब्रूसवेनन् वाल्गुदनाथन्.
14 May 2014 - 6:51 am | कंजूस
ननरि स्वाऽमि .
13 May 2014 - 7:13 am | चौकटराजा
पोरगी ल्हानपणी के ई यम मधी चार दिस याडमिट व्हती तवा ह्योच अन्ना मला नाष्टयाला आदार आसायचा !
13 May 2014 - 8:18 am | यशोधरा
मस्त लेख. जायला हवं इथे एकदा!
13 May 2014 - 10:02 am | प्रचेतस
बाकी त्या सुरेशपेक्षा त्याच्या अलीकडे असलेल्या मोठ्या स्टॉलवरचे इड्डली वड्डा सांबार जास्त चवदार आहे असा व्यक्तिगत अनुभव आहे.
13 May 2014 - 10:22 am | मदनबाण
आमच्या इथे सुद्धा असा एक अण्णा आहे, पण त्याच्याकडे फक्त डोसा / मसाला डोसा मिळतो. पण चव जबरा असते !
बाकी एक अशीच डोश्याची गाडी आणि त्याचा मालक पाहिला होता ! त्याच्या बाजुच्या दुकानात काही कामा निमित्त्य उभा होतो तेव्हा त्याच्या गाडीकडे नजर गेली तेव्हा कोणीच तिथे नव्हत ! थोड्या वेळाने अण्णा "बादली टाकुन " आला, घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली ! *LOL* :D *LOL*
13 May 2014 - 10:31 am | स्पंदना
आत्मुस मस्त वर्णन. अगदी लाळ गळायला लागली वाचल्यावर.
13 May 2014 - 10:33 am | अनुप ढेरे
व्वा! मस्तं लेख...
13 May 2014 - 10:42 am | मृत्युन्जय
गुर्जी तुमच्या बरोबर एकदा यायलाच पाहिजे या सुरेशची गाडी शोधण्यासाठी. :)
13 May 2014 - 11:43 am | अत्रुप्त आत्मा
१)दिपक.कुवेत
@पुढल्या भारत भेटित २ दिवस पुण्यासाठि राखुन ठेवणार आहे. ह्या सगळ्या (खायच्या) जागांना तुमच्या सोबत भेट द्यायला नक्कि आवडेल.>>> *i-m_so_happy* निश्चितच जाऊ.फक्त येण्याची तारीख १५ दिवस आधी व्य.नी.करा. म्हणजे मस्त प्रोग्रॅम मॅनेज करता येइल.
========================
२)जेपी
पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय.
तेंवा ये ठिकाण, मधुची गाडी,बादशाही आणी मंगला समोरची मिसळ गाडी भेट देणार हाय.>>> *good* खादाडीवरचे सर्व लेखन सार्थकी लागले! धन्यवाद. :)
========================
३)नंदन
@संक्रांत आली असेल >>> =)) आंम्ही काय बोलावे? =)) नमन_/\_घ्या हो...कोटी-भास्करा! *clapping*
========================
४)पिंगू
@आज नेमकी आमची खादाडीची जागा तुमाला गावली बगा..
कधी येताय आमच्या सोबत सांबार हाणायला..>>> :-/ पिंग्या...तू रोजचा मेंबर ना मेल्या थितला(टाइम काय रे एंट्री'चा! ;) ) ,आणि आज सांगतोयस होय रे? :-/ असच आणखि कुट कुट जातो(खादाडी'ला *biggrin* ) सांग बरं आता! =))
========================
५)केदार-मिसळपाव
@अतिशय वाईट-नीच धागा... >> अत्यंत जिवंत प्रतिक्रीया!
@विशेषतः हाफिसात बसुन वाचतांना आत्माराम शास्त्री यांना ओम भस्मासी असे काहिसे म्हणावेसे वाटत आहे.>>>
@लै बेक्कार फोटु आहेत.
जाउद्या...
आत्मुस, तेव्हडा ढेकर मात्र आमच्या नावाने द्या सांबार वोरपल्यावर...>>> निश्चित देनार जी!!! *biggrin*
========================
६)Prajakta२१
@तिथेच पुढे एका डावीकडच्या गल्लीत इंटर्वल (interval) नावाचे एक भेळेचे दुकान आहे.
तिथे खूप मस्त भेळ मिळते>>> *good* नेक्श्ट टाइम'ला शोध घेणेत येइल! ठांकू! :)
========================
७)मदनबाण
@घाम पुसला आणि त्याच बादली+ घाम वाल्या हाताने पिठात हात बुडवुन डोसा पिठात गोल-गोल वाटी फिरवुन तव्यावर डोसा टाकला ! गिर्हाइक जमु लागली आणि डोश्यावर ताव मारु लागली !>>> विकणार्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर,चौपाटीवरच्या भेळेची चव असते ... इति...असा मी आसामी.. सा भार!
========================
९) मृत्युन्जय
@गुर्जी तुमच्या बरोबर एकदा यायलाच पाहिजे या सुरेशची गाडी शोधण्यासाठी.>>> *i-m_so_happy* दिवस ठरवा.बंदा हाजिर हो जाएगा!
========================
धाग्यावर..अत्तापर्यंत आलेल्यांचे धन्यवाद! येणार्यांचे स्वागत.
13 May 2014 - 11:52 am | प्रचेतस
त्रुप्ती झालेली दिसतेय ओ तुमची.....धागा टाकून आणि प्रतिक्रिया वाचून =))
13 May 2014 - 12:25 pm | अत्रुप्त आत्मा
@धागा टाकून आणि प्रतिक्रिया वाचून >>> दुष्ष्ष्ष्ष्ट..हलकट..छळू
अगोबा हत्ती!
13 May 2014 - 8:15 pm | धन्या
हे हत्तीचं पिल्लू जंगल बुकच्या यानिवर्सरी येडीशनमधील दिसतंय.
13 May 2014 - 9:18 pm | सूड
मित्रप्रेम बघा कसं उतू चाल्लंय !!! *mosking*
13 May 2014 - 12:16 pm | एक तारा
खादाडी चे लेख देताना google वर tag करून त्याच्या दुवा देता येईल का. नवख्याला जागा शोधणं अंमळ कठीण जातं. मंडळ आभारी राहील.
13 May 2014 - 12:31 pm | सुहास झेले
जबरी लिवलंय बुवा :)
13 May 2014 - 2:06 pm | arunjoshi123
मला असले फटू टाकून जळवणारे लोक मुळ्ळीच आवडत नाहीत.
13 May 2014 - 4:29 pm | सस्नेह
यिडली अन सांबाराचा फोटो बघूनच आत्मा शून्य झाल्यामुळे पुढे वाचावले नाही !
13 May 2014 - 6:03 pm | रेवती
छान वर्णन व चविष्ट फोटू. हे सगळं वाचायला, बघायला बरं वाट्टं पण खाता मात्र येत नाही. आम्ही आपले वयशालीत जातो.
13 May 2014 - 8:08 pm | अवतार
एक नूर इडली दस नूर सांबारम!
13 May 2014 - 8:34 pm | अत्रुप्त आत्मा
@एक नूर इडली दस नूर सांबारम!>>> लै भारी हो अवतारबाबा! *i-m_so_happy*
14 May 2014 - 9:15 am | पाषाणभेद
सुरूवातीचे संवाद भन्नाट आहेत.