काळा घोडा फेस्टिवल कट्टा .... ८/२/२०१४

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
2 Feb 2014 - 2:21 pm

प्रिय मिपाकरांनो,

कसे आहात?

रविवारचे जेवण कसे झाले?

वामकुक्षी झाली असेलच किंवा वामकुक्षीच्या तयारीत असालच.

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की , आपला हेमांगी के ह्यांच्या बरोबरचा डोंबिवली कट्टा छान पार पडला.प्रथे प्रमाणे पुढील कट्ट्याची योजना पण लगेच तयार झाली.

तर मंडळी, आपला पुढील कट्याची योजना / रुपरेखा देत आहे.

वार : शनिवार
दिनांक : ०८ फेब्रुवारी २०१४
वेळ : भेटण्याची वेळ सकाळी ९ वाजता.बरोब्बर ९:१५ मिनिटांनी भ्रमणास सुरुवात होईल.
भेटण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी टर्मिनस

पहायच्या गोष्टी , काळा घोडा फेस्टिवल आणि मग फोर्ट मधल्या सुंदर आणि भव्य इमारती.

आणि हे सगळे दाखवायला आपले मार्गदर्शक आहेत. श्री. रामदास काका.

तर आता वेळ दवडू नका.आपापला कार्यक्रम आखून ठेवा आणि चला रामदास काकांबरोबर फोर्ट दर्शनाला.

कळावे,
लोभ आहेच तो अशा निमित्ताने वाढावा, ही विनंती.
आपलाच एक मिपाकर,
मुवि.

(ता.क. हा कट्टा दिवस भर चालेल, त्यामुळे आपण कुठूनही हा कट्टा जॉइन करू शकता आणि केंव्हाही ह्या भमणातून रजा घेवू शकता.खर्च आपला आपणच करायचा आहे.)

संस्कृतीकलासमाजजीवनमानतंत्रमौजमजाबातमी

प्रतिक्रिया

नंदन's picture

2 Feb 2014 - 2:27 pm | नंदन

कट्टा जोरदार होणार यात शंकाच नाही. रामदासकाकांबरोबर फोर्टमध्ये भटकणं म्हणजे जवळजवळ थेट कृष्णाच्या तोंडून गीता ऐकण्यासारखंच! शक्य झाल्यास, ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आलं त्यांच्या माहितीचं; तर फारच उत्तम.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2014 - 2:35 pm | मुक्त विहारि

.....करता आलं त्यांच्या माहितीचं; तर फारच उत्तम.

असा प्रयत्न नक्कीच करण्यात येईल.

भाते's picture

2 Feb 2014 - 3:52 pm | भाते

मुक्त विहारि, या वेगाने तुम्ही एका मागोमाग एक मुंबई कट्टे आयोजित करत राहिलात तर, मला अशी भिती वाटते आहे कि, लवकरच मुंबईबाहेरचे मिपाकर त्यांच्या नेहमीच्या मिपा स्टाइलमध्ये तुमच्यावर स्नेह प्रकट करतील. तेव्हा कृपया योग्य ती काळजी घ्या.

प्रचेतस's picture

2 Feb 2014 - 4:01 pm | प्रचेतस

हाहाहा.
अजिबात नाही.
उलट डायहार्ड कट्टेकरी मुवि बघून अंमळ हेवाच वाटतोय.

बाकी आम्ही काही पुणेकर लवकरच घारापुरी लेणी भ्रमंतीचा प्लान आखत आहोत. मुवि तेथे कट्टा जमवणारच यात काहीच शंका नाही.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2014 - 4:19 pm | मुक्त विहारि

कधी आहे कट्टा?

कारण, दिपक कुवैत पण पुढच्या महिन्यांत येत आहेत.

त्याच सुमारास काढला तर एकाच तिकीटांत आणि जवळ पास तितक्यांच दिवसांत २ही कट्टे होतील.

जमल्यास सकाळी घारापुरी आणि संध्याकाळी दिपक कुवैत ह्यांच्या बरोबर पक्षी आणि तीर्था सकट संध्याकाळ साजरी करू. दुसर्‍या दिवशी पुणेकर आपापल्या ठिकाणी जायला मोकळे.

प्रचेतस's picture

2 Feb 2014 - 4:27 pm | प्रचेतस

फेब्रुवारी मध्ये जमल्यास शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च मध्ये असा बेत आहे.
सकाळी सिंहगड ने थेट सीएसटी ला उतरून गेटवे ऑफ़ इंडिया वरून घारापुरी. मग संध्याकाळी फोर्ट ला चक्कर मारून रात्री ८ च्या महालक्ष्मी ने पुणे.
मुक्कामाचा बेत नाही. आणि बहुधा शनिवारीच येऊ.

दिपक.कुवेत's picture

2 Feb 2014 - 7:02 pm | दिपक.कुवेत

घारापुरी असेल तर उत्तम. माझ्या घराजवळ आहे. आय मीन मी जीथे राहतो (उरण) तीथुन खुप जवळ आहे फक्त तिकडुन मचवे सुटतात का ते चेक करायला हवं. अर्थात जर तारीख पक्कि झाली तर आल्यावर तेहि चेक करीन. अगदि काहिच सोय नसेल तर गेटवे ऑफ़ इंडिया वरुन तुमच्यासोबत जॉईन होईन पण येणार हे नक्कि. मी २२ फेब्रुवारीला येतोय. घारापुरी बघुन झाल्यावर "पक्षी आणि तीर्थप्राशनासाठि" आपण एका पायावर तैयार.........तर होउन जौदे मग!........चलो घारापुरी.

भाते's picture

2 Feb 2014 - 8:10 pm | भाते

तुमच्यासाठी आणखी एका कट्टा नियोजनाचे काम.
सर्वसमंतीने, होऊन जाऊद्या एक 'घारापुरी मुंबई कट्टा' दिपक.कुवेत यांच्यासाठी. शक्य असल्यास १,२ मार्चला.
लगेच काढा धागा या कट्टयाचा.
पुणेकरांनो, जमल्यास कट्टयाला येण्याचा प्रयत्न करावा. च्यायला, या पुणेकरांना विनंती करायची म्हणजे…
बघुया तरी भन्नाट पाकृ टाकणारा हा प्राणी दिसतो तरी कसा? (सापांसारख्या भयानक प्राण्यांशी खेळणारा एक माणुस आधीच याची देही याची डोळा पाहिला आहे.)

प्रभाकर पेठकर's picture

4 Feb 2014 - 9:28 pm | प्रभाकर पेठकर

फेब्रूवारी २३.२४.२५,२६ ला मी मुंबईत असण्याचा प्रयत्न करतो आहे. नंतर पुन्हा २८ मार्च ते ०९ एप्रिल मुंबईत असेन. तारीख नक्की झाली की इथेच घोषणा करा. पाहूया काय आणि कसे जमते ते.

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2014 - 4:37 pm | टवाळ कार्टा

पक्षी आणि तीर्था सकट संध्याकाळ साजरी करू

=))

जेपी's picture

2 Feb 2014 - 4:30 pm | जेपी

मुवि नीं स्वत:चा आयडी मुक्तविहारी च्या जागी
कट्टाविहारी (कवि)
असा करुन घ्यावा .

काळाघोडा कट्ट्यास शुभेच्छा .

प्यारे१'s picture

2 Feb 2014 - 4:36 pm | प्यारे१

च्यायला, गप्राव जरा!
जरा काय ती अमुकची नसली तरी तमुक ची बाळगा!
किती छळ किती छळ????

कट्टे आयोजित करायचे, कट्टे यशस्वी करायचे, त्या कट्ट्याचा वृत्तांत टाकायच्या आधी दुसर्‍या कट्ट्याचं आयोजन करायचं....
नंतर आधीच्या कट्ट्याचे फोटो टाकायचे, नाकं(मुरडून) दाखवायची, आणि हात भर वृत्तांत लिहून जळवायचं.... हा हा ही ही करत किती माज (ते मजा लिहायचं होतं, असो)केला ते जगाला दाखवायचं.

मी एकटाच करतो आता कट्टा.... :(
मुविंच्या बैलाला हो.....!
(हलकं घ्या म्हणवत नाही ;) )

-आत्यंतिक जळजळग्रस्त

आदूबाळ's picture

2 Feb 2014 - 6:35 pm | आदूबाळ

सहमत सहमत!!

अजया's picture

2 Feb 2014 - 6:20 pm | अजया

.

प्यारे१'s picture

2 Feb 2014 - 7:03 pm | प्यारे१

ऐला, पायनॅपल फ्लेवर ? ;)

दिपक.कुवेत's picture

2 Feb 2014 - 7:05 pm | दिपक.कुवेत

तु तिथेच आहेस कि.......यायचा प्लॅन करु शकतेस!

ते ईनो माझ्यासाठी नाही,जळजळ वाल्या पब्लीकसाठी आहे! घारापुरीला उरणहुन मचवे जातात.आम्हालाही उरणच जवळ पडते. पण तिथले मचवे लई डेंजर दिसतात्,गेट वे पेक्षा!दोन्,तीन वर्षात बदलले असले तर नाही माहिती.बाकी कट्ट्याला शुभेच्छा!!

भ ट क्या खे ड वा ला's picture

2 Feb 2014 - 9:36 pm | भ ट क्या खे ड वा ला

रामदास काकांबरोबर नक्क्की यायला आवडले असते, आज सकाळच्या कट्ट्यात ओळख झाली, म्हणजे "पर्तेक्ष" भेट झाली.
०७ ला रात्री कोस्टल ट्रेक साठी जात आहे ३ दिवस त्यामुळे येऊ शकत नाही.
दुधाची तहान ताकावर भागवू
या कट्ट्याचा वृत्तांत रामदास काका नि लिहिला तर मजा येईल. ताका ऐवजी मठठा मिळेल.

सर्वसाक्षी's picture

2 Feb 2014 - 9:52 pm | सर्वसाक्षी

फोर्टात भटकंती आणि रामदासशेठ बरोबर! मग यायलाच पाहिजे.

रामदासशेठ, ८ तारखेला सकाळी ७.३० ला न्यायला घरी येतो.

राजेश घासकडवी's picture

4 Feb 2014 - 1:14 pm | राजेश घासकडवी

८ तारखेला मी मुंबईमध्येच असेन. पण दुर्दैवाने सकाळचे कार्यक्रम घट्ट लागलेले आहेत. उशीरा दुपारी किंवा संध्याकाळी कट्टा चालू असेल तर नक्की यायला आवडेल.

आणि फोर्ट विभागातच असल्याने तुम्ही कधी पण हा कट्टा जॉइन करु शकता.

चरता आणि फिरता कट्टा असल्याने, मिपाकरांना शोधायला फारसा त्रास होणार नाही.

किसन शिंदे's picture

4 Feb 2014 - 8:49 pm | किसन शिंदे

वाह!! सलग दुसर्‍या वर्षीही काळाघोडा फेस्टिवलला कट्टा भरवताय तर.

कट्ट्यास प्रचंड शुभेच्छा!!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 Feb 2014 - 3:44 pm | घाशीराम कोतवाल १.२

शनिवार ऐवजी रविवारी कट्टा असता तर नक्कि येउ शकलो अस्तो बाकी रामदास काकाना फोर्ट मधिल ईमारतीचा भरपुर अभ्यास आहे

पण येता रविवार हा फेस्टिवलचा शेवटचा दिवस असल्याने, गर्दीची शक्यता जास्त होती, म्हणून शनिवार ठरवला.

माझीही शॅम्पेन's picture

7 Feb 2014 - 2:07 pm | माझीही शॅम्पेन

शनिवार ऐवजी रविवारी कट्टा असता तर नक्कि येउ शकलो अस्तो बाकी रामदास काकाना फोर्ट मधिल ईमारतीचा भरपुर अभ्यास आहे

रविवार केला तर नक्की येऊ शकतो

शनिवार पेक्षा रविवार मोठ्या प्रमाणात रस्ते रिकामे असतात

ते इतर वेळी...

फोर्ट फेस्टीवलच्या वेळेस रविवारी जास्त गर्दी असते.

माझीही शॅम्पेन's picture

7 Feb 2014 - 3:21 pm | माझीही शॅम्पेन

ओके बर तर मग कट्ट्याला शुभेच्छा !!!
आमच्या नशिबात सध्या तरी रामदास योग नाही !!!

सुधीर's picture

7 Feb 2014 - 6:19 pm | सुधीर

"आमच्या नशिबात सध्या तरी रामदास योग नाही !!!"
:(

सुहास झेले's picture

6 Feb 2014 - 5:49 pm | सुहास झेले

नाईट आहे...पण नक्की प्रयत्न करेन... :)

चिप्लुन्कर's picture

6 Feb 2014 - 5:57 pm | चिप्लुन्कर

कोणाला कसा संपर्क करायचा ?

मुक्त विहारि's picture

6 Feb 2014 - 9:44 pm | मुक्त विहारि

जरूर या.

जमल्यास तुमचा मो.नं. मला व्य.नि. करा.

मुक्त विहारि's picture

7 Feb 2014 - 1:45 pm | मुक्त विहारि

श्री. रामदास गाडी घेवून येणार आहेत.अजून २ जणांची त्यांच्या गाडीत सोय होवु शकते.

ज्यांना यायचे असेल त्यांनी श्री.रामदास ह्यांना व्य.नि. करावा.

चिप्लुन्कर's picture

7 Feb 2014 - 6:03 pm | चिप्लुन्कर

मी ठाण्यातून येणार आहे पण दुपारी येत असल्यामुळे येताना माझी सोय झाली तर फार बरे होइल