२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील .
त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय .
या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय .
कसाब अजुन जिवंत आहे का ?
मंजे त्याला गुपचूप फाशी दिली ,दफन हि केला . मग त्याचा एखादा फोटो किवां चित्रफित
फाशी देतानाची का नाही दाखवली जात .
त्या सदाम हुसेन च्या फाशीची चित्रफित पहिली होती आपण . लादेन हि मेला हे निट कळाल .
मग कसाब च्या फाशीचा एखादा पुरावा का नाही . फक्त बातम्यातच कळत त्याला फाशी झाली म्हणून .
यावर काही लोक आपली सभ्यता आणि कायदा याची दुहाई देतील .
पण आपण रोजच खून , बलात्कार ,दहशत वादी हल्ले , याच्या बातम्या पाहतोच कि , त्याप्रमाणे
कसाब ची फाशी हि पाहिली असती .
मला सारखा वाटत त्या कसबाला सरकारने गुपचूप जिवंत ठेवला आसेल .
आज हि तो बिर्याणी चापत मजेत राहत असेल .
तुमचापेकी कुणाकडे काही पुरावा आहे का त्याच्या फाशीचा ?
प्रतिक्रिया
26 Nov 2013 - 11:20 am | तुमचा अभिषेक
त्याला गपचूप जिवंत ठेऊन काय साधणार या अंगाने विचार करून बघा.
26 Nov 2013 - 12:04 pm | सुहासदवन
साधले सरकारने?
गोपनीयतेच्या नावाखाली निष्क्रियता आणि दौर्बल्य झाकायचा प्रकार होता तो.
त्याच्या कडून काय काय माहिती गोळा केली गेली, एक वाक्य तरी उघड केले आहे काय शासनाने?
आपल्या देशात बरेचदा इतके अनुभवी (समजून घ्या) अतिरेकी पकडले जातात, कसून चौकशी त्यांची करायला हवी.
अब तक छप्पन सिनेमात नाना पाटेकर जेव्हा विदेशातल्या कुप्रसिद्ध गुंडाकडे स्वतःहून जायला आणि त्याच्या कंपूत सामील व्हायला निघतो तेव्हा तो गुंड देखील म्हणतो "अगर यह अपने साथ मिल गया, तो क्या क्या कर सकते है, साला कितना इन्फोर्मेशन होगा उसके पास…. "
साला एक गुंड हा विचार करू शकतो पण लवकरच महासत्ता होणार म्हणून गेले कित्येक वर्षे बोम्बलणारा आणि मंगळापर्यंत आवाका असणाऱ्या देशाचा एक पोलिस अधिकारी आणि यंत्रणा हा विचार करू शकत नाही.
लाज वाटण्याची पण लाज वाटली पाहिजे.
26 Nov 2013 - 11:22 am | सचिन कुलकर्णी
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घटनेचे (फाशीचे) video रेकॉर्डिंग केलेले आहे,अशी ग्वाही दिली होती.
26 Nov 2013 - 11:33 am | मुक्त विहारि
आपल्या महान देशात काय वाट्टेल ते घडू शकते...
26 Nov 2013 - 11:39 am | अनिरुद्ध प
+१११ सहमत
26 Nov 2013 - 11:47 am | नितिन थत्ते
गृहमंत्री पाटील यांचा कसाबच्या फाशीविषयी लेख मटा दिवाळी अंकात आला आहे.
26 Nov 2013 - 11:54 am | जेपी
लेखी पुरावा नकोय .
काहि चित्रफीत किंवा मेलेली व्यक्ती कसाबच होती याचा पुरावा मिळाला तरच
विश्वास बसेल .
26 Nov 2013 - 11:58 am | अग्निकोल्हा
वाट इस धिस ?
26 Nov 2013 - 12:08 pm | गवि
तसाच गुपचूप जिवंत ठेवला असेल तरी काय करणार आता तो.. मोकळा सोडला नसला म्हणजे झालं. त्याचा अवतार संपला.. अधिकृतरित्या तरी तो मृतच आहे, त्यामुळे कोणी साथीदारांनी विमान अपहरण करुन त्याला सोडवण्याचा प्रयत्न होणार नाही, इतपत बास आहे.
26 Nov 2013 - 12:14 pm | चिरोटा
व्हिडियो दाखवला तरी फाशीवर जाणारा तो खरा कसाब कशावरून असाही सवाल करणारे असू शकतात.कसाबला जिवंत ठेवण्यामागे बिर्याणी मसाला बनवणारे- एव्हरेस्ट्,एम्.डी.एच्. मसालेवाले होते असेही बोलले जायचे.
26 Nov 2013 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
कसाबला जिवंत ठेवण्यामागे बिर्याणी मसाला बनवणारे- एव्हरेस्ट्,एम्.डी.एच्. मसालेवाले होते असेही बोलले जायचे.
:)
26 Nov 2013 - 12:17 pm | कपिलमुनी
<रामू मोड > कसाब एक इन्सान नही .. कसाब एक सोच है .. इन्सान को मारनेसे पहले उसकी सोच को मारना जरूरी है <ऑफ>
कसाब प्रवृत्ती जोवर जिवंत आणि सक्रिय आहे .. तोवर १-२ फियादीनना फाशी देउन त्या विचारंना मिटवणं अवघड आहे ..
बाकी त्याला / गुरुला फाशी दिल्याने दुसरे कंदाहार टळले
26 Nov 2013 - 1:43 pm | देवांग
कपिलमुनी रामगोपाल वर्माचे चित्रपट कमी पाहत जा
26 Nov 2013 - 12:57 pm | पैसा
तुकाराम ओंबाळे, हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामते, संदीप उन्नीकृष्णन आणि इतर शहीदांची आठवण काढायचं सोडून त्या दरिद्री कसाबची आठवण कशाला काढताय?
26 Nov 2013 - 12:59 pm | बॅटमॅन
=)) अतिशय इणोदी धागा.
तसे तर मग लादेनचा मृतावस्थेतील फोटो तरी कुठे होता???
26 Nov 2013 - 1:04 pm | कपिलमुनी
परीचित आणि नातेवाईकांना कळवले असेल ओबामामामांनी !
26 Nov 2013 - 1:03 pm | जेपी
पैसाताई वरील शहिदांना मी कधीच विसरलो नाही . कामटे साहेब तर माझे नायक आहेत . सोलापुरात एका कर्नाटकी नेत्याला ईथे एकच दादा आहे तो म्हणजे मी . असा दम भरणारा अधिकारी गमावल्याची खंत आहे .
26 Nov 2013 - 1:16 pm | पैसा
पण मग त्यांच्यावर पण लेख लिहा ना!
26 Nov 2013 - 1:21 pm | तुमचा अभिषेक
कसाबची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी होती का?
तसे असल्यास त्याच्या एजंटनी तो मृत झाल्याचे कागदपत्रे गोळा केली असतील.
26 Nov 2013 - 1:25 pm | जेपी
वाटतोय पण अद्याप मी इतका प्रगल्भ आहे अस वाटत नाही .
(च्या**ला , एकातरी कसाबला गोळी घालुन म्हणायचय ' with love from कामटे साहेब)
29 Nov 2013 - 1:29 am | अभ्या..
सोलापुरातील कामटे साहेबांच्या असल्या फ्यानांचे त्यांच्या नावाने चालणारे प्रकार जास्त डोक्यात जातात.
नंबरप्लेट न लावता नुसता कामटे साहेबांचा फोटो काय, त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला रस्ते अडवणे काय, विना परमीट रिक्षावर त्यांचे शहीद म्हणून फोटो काय. अति केलेय लोकांनी, इव्हन पोलिसांनी सुध्दा :( कामटे साहेब स्वतः असते तर पहिल्यांदा अस्ल्या फॅनांच्या ** वर फटके मारले असते.
राहता राहीले तो कर्नाटकी नेता मस्त मजेत आहे. मॉलवर मॉल उठवतो आहे. दारु तीच आहे. बाटली अन लेबल बदललेय. :(
26 Nov 2013 - 1:30 pm | बाबा पाटील
प्रशासनाची थोडीफार माहिती असल्यास असे रिकामे विषय सुचनार नाहित.त्या दांड्केवाल्या आणी कॅमेर्यावाल्या पोरी असतात बघा," आप अभी खड्डे में पडे हो आपको कैसे लग रहा है !".यावर सामान्य प्राणी, "अग भोसडीचे, ढुंगणावर पडल्यावर काय मजा येते का ?"असाच प्रकार या कसाबच्या बाबतीत काही लोकांनी चालु केला आहे.अरे बाबांनो ,सरकार काय झक मारायला तिथे बसलय का ? राजकारणी जाउ दे खड्यात पण तिथे देश चालवणारे जे टॉपमोस्ट रँकर अधिकारी बसले आहेत ते काय गोट्या खेळायचा पगार घेतात का ?
थोडक्यात माहिती देतो,कसाबचे शेवटचे फिजिकल फिटनेस ज्या वैद्यकिय अधिकार्याने दिले त्याला रात्री दोन वाजता, पोलिसाधिकार्यांनी घरातुन उचलुन नेले होते.कसलीही कल्पना न देता.त्याच्या बायकोचा रात्री २.३० ला घाबरुन फोन भाउजी यांना पोलिस अचानक कसल्यातरी मिशनवर घेउन गेलेत प्लिज चौकशी करुन सांगा.मला माहिती मिळेपर्यंत कसाब लटला होता. तेथे असणरृया सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे फोन सुद्धा काढुन घेतले गेले होते.
26 Nov 2013 - 5:39 pm | जेपी
माझी तक्रार प्रशासन अथवा राजकारणी यांच्याबद्दल नाही .
तो कसाब नक्की मेला का याबद्दला आहे .
कळु द्या की आमला तो मेलाय म्हणुन .
काय होईल त्याच्या फाशीची चित्रफीत आली तर?
26 Nov 2013 - 9:43 pm | llपुण्याचे पेशवेll
हो आणि तथाकथित मोठा पगार घेणारे प्रशासन म्हणजे जणू रामराज्यातले भरतच की हो. की घेतल्या पगाराला जागून अगदी कर्तव्यतत्परतेने देशसेवा करतात.
असो.
26 Nov 2013 - 1:41 pm | जेपी
असेल हो .?
एक सल होती ती बोलुन दाखवली .
26 Nov 2013 - 1:50 pm | सुनील
अशा सली बोलायचया नसतात. "कुजबुजा"यच्या असतात! ;)
26 Nov 2013 - 2:19 pm | विनोद१८
सल बोलून दाखवली म्हणूनच 'बाबा पाटलान्च्या' प्रतिक्रियेमुळे समाधान होते. बाकी या देशात काहीही होउ शकते हे मात्र खरे.
विनोद१८
26 Nov 2013 - 4:14 pm | वडापाव
ह्या डायलॉगचा वीट आलाय. तसे तर जगात कोणत्याही देशात काहीही होऊ शकते. एखादी साधारणतः ऐकायला न मिळणारी, म्हणजेच आऊट ऑफ द बॉक्स बातमी किंवा अफवा आली काय, लगेच आपल्या देशाला 'इधर साला कुछ भी हो सकता है' असं म्हणून अतरंगी ठरवून मोकळे होतात.
26 Nov 2013 - 4:47 pm | अग्निकोल्हा
पप्पूला लोंच करायचा प्लान आहे अशी ट्विट फिरत होती. म्हणे अण्णा उपोषण करणार अन पप्पु लोकपाल मान्य करणार अन विनाघाड़ी पंतप्रधान बनणार चायला चित्रपट कथा लिहणे अन कारस्थाने उघड करणे यात फरक असतो राव
26 Nov 2013 - 4:58 pm | खबो जाप
http://www.youtube.com/watch?v=naX7lV3neX0
26 Nov 2013 - 5:16 pm | बाप्पू
याबाबत माझा एक अंदाज:
सरकार ला अस वाटत असाव कि अश्या घटनेची चित्रफित जर प्रसारित केली तर ती न्यूज चैनेल वाले सलग दोन महिने दाखवून जातीय तेढ निर्माण करतील.
याबाबत माझे मत--> हि जर बाब खरी असेल तर यापेक्षा मोठे आपल्या देशाचे दुर्दैव नहि…!!! जर आश्या चित्रफिती पाहून जर कोणाला राग येत असेल तर त्यांना या देशात राहण्यचा अधिकार नहि. अश्या लोकांचे पासपोर्ट आम्ही स्वखार्चाने बनवून देउ….!
26 Nov 2013 - 6:07 pm | बाप्पू
ज्या देशामध्ये अमर ज्योती ला लाथा मारणारे (ते हि पोलीसां समोर) लोक मोकाट फिरत असतील त्या देशामध्ये हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे…
26 Nov 2013 - 5:25 pm | अमोल मेंढे
१००% सहमत
26 Nov 2013 - 6:29 pm | नितिन थत्ते
जिंदा, सुखा, बिल्ला, रंगा, रामन राघव, सतवंतसिंग धनंजय चॅटर्जी, गेला बाजार नथुराम गोडसे कशावरून जिवंत नाहीत अजून?
26 Nov 2013 - 6:42 pm | जेपी
थत्ते साहेब कैच्या
कै बोलु नका .
यापैकी कुणीही कसाब सारखा काम नव्हत केल .
26 Nov 2013 - 6:49 pm | कपिलमुनी
>>काय होईल त्याच्या फाशीची चित्रफीत आली तर?
तर अतिरेकी ही चित्रफीत सतत दाखवून अजून कसाब तयार करतील .. त्याला प्रसिद्धी देतील आणि लोकांची माथी भडकवतील !
26 Nov 2013 - 6:54 pm | बाबा पाटील
>>काय होईल त्याच्या फाशीची चित्रफीत आली तर?
तर अतिरेकी ही चित्रफीत सतत दाखवून अजून कसाब तयार करतील .. त्याला प्रसिद्धी देतील आणि लोकांची माथी भडकवतील ! तु नळीवर मुस्लीम अतिरेक्यांकडुन सगळ्यात जास्त प्रसिद्ध केलेली चित्रफित असेल ती.
26 Nov 2013 - 7:26 pm | बॅटमॅन
यग्झाक्टलि!!!!!! याच कारणामुळे आम्रिकेनेही लादेनला पकडल्यावर त्याचा मृतदेह दाखवत वैग्रे बसले नाहीत. दाखवलं तर त्या दीडदमडीच्याचे फाजील लाड केल्यासारखं होतं.
26 Nov 2013 - 7:31 pm | अनिरुद्ध प
वाचनानुसार अमेरिकेनी लादेनला जिवन्त पकडले नव्हते.
26 Nov 2013 - 7:34 pm | बॅटमॅन
आयमाय स्वारी. बारीक चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. "आम्रिकेने लादेनला ठार मारल्यावर" असे वाचावे.
26 Nov 2013 - 10:03 pm | चेतनकुलकर्णी_85
कसाब अल्ला ला प्यारा झालाय हे शंभर टक्के खरे आहे पण हे हि तितकेच खरे आहे कि तो फाशी मुळे नाही तर डेंग्यू सारख्या तत्सम आजाराने झाला . आणि श्रेय लाटण्यासाठी फाशी दिल्याचे नाटक केले . असल्या गुलछबु मंत्र्या मध्ये कसली आलीय धमक .
थोडक्यात माहिती देतो,कसाबचे शेवटचे फिजिकल फिटनेस ज्या वैद्यकिय अधिकार्याने दिले त्याला रात्री दोन वाजता, पोलिसाधिकार्यांनी घरातुन उचलुन नेले होते.कसलीही कल्पना न देता.त्याच्या बायकोचा रात्री २.३० ला घाबरुन फोन भाउजी यांना पोलिस अचानक कसल्यातरी मिशनवर घेउन गेलेत प्लिज चौकशी करुन सांगा.मला माहिती मिळेपर्यंत कसाब लटला होता. तेथे असणरृया सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे फोन सुद्धा काढुन घेतले गेले होते.
हे विधान दुसर्या अर्थाने पण बघता येईल . बाकी जेंव्हा तो डॉक्टर आपले आत्मचरित्र लिहील तेव्हा तो जरूर तुम्ही सांगताय ह्याच्या उलटे सांगून खळबळ उडवून देईल . ह्या प्रशासकीय अधिकार्यांना सवयच असते नोकरीत असताना सरकारची हुजरेगिरी करायची आणि निवृत्त झाले कि टीवी वर येउन मोठ्या बाता मारायच्या किंवा आत्मचरित्रे लिहून खळबळ जनक (भलेही ते खरे का असेना )लिहायचे !
27 Nov 2013 - 11:07 am | नितिन थत्ते
महाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंकात कसाबला शेवटचे काही दिवस तपासणार्या डॉक्टरचेही कथन आलेले आहे.
त्यात त्याला डेंग्यू झाला होता असा उल्लेख नाही. [डेंग्यू झाला होता ही अफवा असावी किंवा सगळं जगच एखाद्या षड्यंत्रानुसार चालत असावं].
27 Nov 2013 - 10:28 pm | चेतनकुलकर्णी_85
एकदम बरोबर !
27 Nov 2013 - 11:48 am | थॉर माणूस
खरं आहे.
मी तर म्हणतो ते काय सी-लिंक वगैरे पूल का काय आहे तो आणि बरेच इतर प्रोजेक्ट पण आपण बनवले नसणार, गुपचूप येऊन एलिअन बांधून गेले असणार, असले मोठे प्रोजेक्ट अप्रूव करायची आपल्या गुलछबु मंत्र्यांमधे कसली आलीय धमक.
ते मंगळयान वगैरे सुद्धा अमेरीकेने वगैरे बनवलं असणार आणि आपल्या नावावर सोडलं असणार, असले वैज्ञानिक प्रयोग अंमलात आणायची आपल्या लोकांत कसली आलीय धमक.
कसाबला पण पकडलं नसणार, तो स्वतःच येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला असणार. ती रॉ वगैरे पण आहे असं म्हणतात पण खरंतर अशी यंत्रणाच नसणार, स्वतःची गुप्तहीर यंत्रणा? आपल्या सरकार मधे कुठे आलीय इतकी धमक.
अगदी बरोबर आहे तुमचं. :)
27 Nov 2013 - 10:27 pm | चेतनकुलकर्णी_85
ह्या सी लिंक प्रोजेक्ट चा इतिहास जरा तपासा म्हणजे कळेल तुम्हाला नेत्यांची अंगातील धमक व कुवत ! पूल बांधायला लागली दहा एक वर्षे आणि नाव द्यायाला १ मिनिट .
धमक कि प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकात लागते फंड मंजूर करणाऱ्या नेत्यात असतेच असे नाही
बाकी तुमच्या प्रतिसादावर अनेक काही लिहू शकतो पण इथील लोके धागा भरकटला म्हणून बोंबा मारतील म्हणून थांबतो :D
28 Nov 2013 - 11:31 am | थॉर माणूस
थांबल्याबद्दल धन्यवाद. ;)
26 Nov 2013 - 10:30 pm | दिग्विजय खवरे
त्याचा बाप सापडला असता तर पूर्ण देश विकला असता
27 Nov 2013 - 12:50 pm | नानबा
काय त्या दळभद्र्या कसाबड्याचं दैव? जिवंत होता तेव्हा सरकारी पाहुणचार झोडला, मेल्यावर (जर मेला असला तर) विचारवंत मिपाकरांकडून घेतलेली दखल..
मज्जाय ब्वाँ...
28 Nov 2013 - 12:28 pm | प्रभाकर पेठकर
का कोण जाणे, 'कसाब अजुन जिवंत आहे का ?' हे शीर्षक मला जरा विचित्र वाटते आहे.
'कसाब अजुन जिवंत आहे का?', असल्यास माझे त्याच्याकडे थोडे काम आहे, असे कांहीसे ध्वनीत होते आहे.
'कसाबला फांशी दिली, ह्या बातमीत सत्यता किती?' असे शीर्षक असायला हवे होते, असे वाटते.
28 Nov 2013 - 8:36 pm | नितिन थत्ते
इकडे कसाब मेल्याचा पुरावा मागितला जातोय आणि तिकडे जेवढी सांगितली तेवढी माहिती सांगितल्याने 'गोपनीयतेचा भंग' झाला म्हणून शिवसेना गृहमंत्र्यांवर कारवाई करावी असं म्हणते आहे.
कसं काय जमायचं?
http://www.indianexpress.com/news/shiv-sena-wants-action-against-patil-f...
30 Nov 2013 - 9:17 am | उद्दाम
:)