Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जेपी on Tue, 11/26/2013 - 11:18
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिक्रिया
मत
२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील . त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय . या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय . कसाब अजुन जिवंत आहे का ? मंजे त्याला गुपचूप फाशी दिली ,दफन हि केला . मग त्याचा एखादा फोटो किवां चित्रफित फाशी देतानाची का नाही दाखवली जात . त्या सदाम हुसेन च्या फाशीची चित्रफित पहिली होती आपण . लादेन हि मेला हे निट कळाल . मग कसाब च्या फाशीचा एखादा पुरावा का नाही . फक्त बातम्यातच कळत त्याला फाशी झाली म्हणून . यावर काही लोक आपली सभ्यता आणि कायदा याची दुहाई देतील . पण आपण रोजच खून , बलात्कार ,दहशत वादी हल्ले , याच्या बातम्या पाहतोच कि , त्याप्रमाणे कसाब ची फाशी हि पाहिली असती . मला सारखा वाटत त्या कसबाला सरकारने गुपचूप जिवंत ठेवला आसेल . आज हि तो बिर्याणी चापत मजेत राहत असेल . तुमचापेकी कुणाकडे काही पुरावा आहे का त्याच्या फाशीचा ?
  • Log in or register to post comments
  • 13069 views

प्रतिक्रिया

Submitted by तुमचा अभिषेक on Tue, 11/26/2013 - 11:20

Permalink

त्याला गपचूप जिवंत ठेऊन काय

त्याला गपचूप जिवंत ठेऊन काय साधणार या अंगाने विचार करून बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहासदवन on Tue, 11/26/2013 - 12:04

In reply to त्याला गपचूप जिवंत ठेऊन काय by तुमचा अभिषेक

Permalink

त्याला खुलेआम जिवंत ठेऊन तरी काय

साधले सरकारने? गोपनीयतेच्या नावाखाली निष्क्रियता आणि दौर्बल्य झाकायचा प्रकार होता तो. त्याच्या कडून काय काय माहिती गोळा केली गेली, एक वाक्य तरी उघड केले आहे काय शासनाने? आपल्या देशात बरेचदा इतके अनुभवी (समजून घ्या) अतिरेकी पकडले जातात, कसून चौकशी त्यांची करायला हवी. अब तक छप्पन सिनेमात नाना पाटेकर जेव्हा विदेशातल्या कुप्रसिद्ध गुंडाकडे स्वतःहून जायला आणि त्याच्या कंपूत सामील व्हायला निघतो तेव्हा तो गुंड देखील म्हणतो "अगर यह अपने साथ मिल गया, तो क्या क्या कर सकते है, साला कितना इन्फोर्मेशन होगा उसके पास…. " साला एक गुंड हा विचार करू शकतो पण लवकरच महासत्ता होणार म्हणून गेले कित्येक वर्षे बोम्बलणारा आणि मंगळापर्यंत आवाका असणाऱ्या देशाचा एक पोलिस अधिकारी आणि यंत्रणा हा विचार करू शकत नाही. लाज वाटण्याची पण लाज वाटली पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन कुलकर्णी on Tue, 11/26/2013 - 11:22

Permalink

पुरावा

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घटनेचे (फाशीचे) video रेकॉर्डिंग केलेले आहे,अशी ग्वाही दिली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 11/26/2013 - 11:33

Permalink

काय कल्पना नाय ब्बॉ.....

आपल्या महान देशात काय वाट्टेल ते घडू शकते...
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Tue, 11/26/2013 - 11:39

In reply to काय कल्पना नाय ब्बॉ..... by मुक्त विहारि

Permalink

+१११

+१११ सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 11/26/2013 - 11:47

Permalink

गृहमंत्री पाटील यांचा

गृहमंत्री पाटील यांचा कसाबच्या फाशीविषयी लेख मटा दिवाळी अंकात आला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 11/26/2013 - 11:54

Permalink

लेखी पुरावा नकोय .

लेखी पुरावा नकोय . काहि चित्रफीत किंवा मेलेली व्यक्ती कसाबच होती याचा पुरावा मिळाला तरच विश्वास बसेल .
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Tue, 11/26/2013 - 11:58

Permalink

ओँ ...

वाट इस धिस ?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 11/26/2013 - 12:08

Permalink

तसाच गुपचूप जिवंत ठेवला असेल

तसाच गुपचूप जिवंत ठेवला असेल तरी काय करणार आता तो.. मोकळा सोडला नसला म्हणजे झालं. त्याचा अवतार संपला.. अधिकृतरित्या तरी तो मृतच आहे, त्यामुळे कोणी साथीदारांनी विमान अपहरण करुन त्याला सोडवण्याचा प्रयत्न होणार नाही, इतपत बास आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Tue, 11/26/2013 - 12:14

Permalink

हम्म

व्हिडियो दाखवला तरी फाशीवर जाणारा तो खरा कसाब कशावरून असाही सवाल करणारे असू शकतात.कसाबला जिवंत ठेवण्यामागे बिर्याणी मसाला बनवणारे- एव्हरेस्ट्,एम्.डी.एच्. मसालेवाले होते असेही बोलले जायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 11/26/2013 - 12:50

In reply to हम्म by चिरोटा

Permalink

कसाबला जिवंत ठेवण्यामागे

कसाबला जिवंत ठेवण्यामागे बिर्याणी मसाला बनवणारे- एव्हरेस्ट्,एम्.डी.एच्. मसालेवाले होते असेही बोलले जायचे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 11/26/2013 - 12:17

Permalink

हो

<रामू मोड > कसाब एक इन्सान नही .. कसाब एक सोच है .. इन्सान को मारनेसे पहले उसकी सोच को मारना जरूरी है <ऑफ> कसाब प्रवृत्ती जोवर जिवंत आणि सक्रिय आहे .. तोवर १-२ फियादीनना फाशी देउन त्या विचारंना मिटवणं अवघड आहे .. बाकी त्याला / गुरुला फाशी दिल्याने दुसरे कंदाहार टळले
  • Log in or register to post comments

Submitted by देवांग on Tue, 11/26/2013 - 13:43

In reply to हो by कपिलमुनी

Permalink

कपिलमुनी रामगोपाल वर्माचे

कपिलमुनी रामगोपाल वर्माचे चित्रपट कमी पाहत जा
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/26/2013 - 12:57

Permalink

काय ओ!

तुकाराम ओंबाळे, हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामते, संदीप उन्नीकृष्णन आणि इतर शहीदांची आठवण काढायचं सोडून त्या दरिद्री कसाबची आठवण कशाला काढताय?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/26/2013 - 12:59

Permalink

अतिशय इणोदी धागा.

=)) अतिशय इणोदी धागा. तसे तर मग लादेनचा मृतावस्थेतील फोटो तरी कुठे होता???
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 11/26/2013 - 13:04

In reply to अतिशय इणोदी धागा. by बॅटमॅन

Permalink

परीचित

परीचित आणि नातेवाईकांना कळवले असेल ओबामामामांनी !
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 11/26/2013 - 13:03

Permalink

पैसाताई वरील शहिदांना मी कधीच

पैसाताई वरील शहिदांना मी कधीच विसरलो नाही . कामटे साहेब तर माझे नायक आहेत . सोलापुरात एका कर्नाटकी नेत्याला ईथे एकच दादा आहे तो म्हणजे मी . असा दम भरणारा अधिकारी गमावल्याची खंत आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/26/2013 - 13:16

In reply to पैसाताई वरील शहिदांना मी कधीच by जेपी

Permalink

तसे नाही हो!

पण मग त्यांच्यावर पण लेख लिहा ना!
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Tue, 11/26/2013 - 13:21

Permalink

कसाबची लाईफ इन्श्युरन्स

कसाबची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी होती का? तसे असल्यास त्याच्या एजंटनी तो मृत झाल्याचे कागदपत्रे गोळा केली असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 11/26/2013 - 13:25

Permalink

त्याच्यांवर लेख लिहावा

वाटतोय पण अद्याप मी इतका प्रगल्भ आहे अस वाटत नाही . (च्या**ला , एकातरी कसाबला गोळी घालुन म्हणायचय ' with love from कामटे साहेब)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 11/29/2013 - 01:29

In reply to त्याच्यांवर लेख लिहावा by जेपी

Permalink

सोलापुरातील कामटे साहेबांच्या

सोलापुरातील कामटे साहेबांच्या असल्या फ्यानांचे त्यांच्या नावाने चालणारे प्रकार जास्त डोक्यात जातात. नंबरप्लेट न लावता नुसता कामटे साहेबांचा फोटो काय, त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला रस्ते अडवणे काय, विना परमीट रिक्षावर त्यांचे शहीद म्हणून फोटो काय. अति केलेय लोकांनी, इव्हन पोलिसांनी सुध्दा :( कामटे साहेब स्वतः असते तर पहिल्यांदा अस्ल्या फॅनांच्या ** वर फटके मारले असते. राहता राहीले तो कर्नाटकी नेता मस्त मजेत आहे. मॉलवर मॉल उठवतो आहे. दारु तीच आहे. बाटली अन लेबल बदललेय. :(
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Tue, 11/26/2013 - 13:30

Permalink

असे मुर्खपणाचे धागे काढण्याचे कस सुचतो हो ?

प्रशासनाची थोडीफार माहिती असल्यास असे रिकामे विषय सुचनार नाहित.त्या दांड्केवाल्या आणी कॅमेर्‍यावाल्या पोरी असतात बघा," आप अभी खड्डे में पडे हो आपको कैसे लग रहा है !".यावर सामान्य प्राणी, "अग भोसडीचे, ढुंगणावर पडल्यावर काय मजा येते का ?"असाच प्रकार या कसाबच्या बाबतीत काही लोकांनी चालु केला आहे.अरे बाबांनो ,सरकार काय झक मारायला तिथे बसलय का ? राजकारणी जाउ दे खड्यात पण तिथे देश चालवणारे जे टॉपमोस्ट रँकर अधिकारी बसले आहेत ते काय गोट्या खेळायचा पगार घेतात का ? थोडक्यात माहिती देतो,कसाबचे शेवटचे फिजिकल फिटनेस ज्या वैद्यकिय अधिकार्‍याने दिले त्याला रात्री दोन वाजता, पोलिसाधिकार्‍यांनी घरातुन उचलुन नेले होते.कसलीही कल्पना न देता.त्याच्या बायकोचा रात्री २.३० ला घाबरुन फोन भाउजी यांना पोलिस अचानक कसल्यातरी मिशनवर घेउन गेलेत प्लिज चौकशी करुन सांगा.मला माहिती मिळेपर्यंत कसाब लटला होता. तेथे असणरृया सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे फोन सुद्धा काढुन घेतले गेले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 11/26/2013 - 17:39

In reply to असे मुर्खपणाचे धागे काढण्याचे कस सुचतो हो ? by बाबा पाटील

Permalink

पाटील साहेब

माझी तक्रार प्रशासन अथवा राजकारणी यांच्याबद्दल नाही . तो कसाब नक्की मेला का याबद्दला आहे . कळु द्या की आमला तो मेलाय म्हणुन . काय होईल त्याच्या फाशीची चित्रफीत आली तर?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 11/26/2013 - 21:43

In reply to पाटील साहेब by जेपी

Permalink

हो आणि तथाकथित मोठा पगार

हो आणि तथाकथित मोठा पगार घेणारे प्रशासन म्हणजे जणू रामराज्यातले भरतच की हो. की घेतल्या पगाराला जागून अगदी कर्तव्यतत्परतेने देशसेवा करतात. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 11/26/2013 - 13:41

Permalink

आमचा मुर्खपणा

असेल हो .? एक सल होती ती बोलुन दाखवली .
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 11/26/2013 - 13:50

In reply to आमचा मुर्खपणा by जेपी

Permalink

खिक्

अशा सली बोलायचया नसतात. "कुजबुजा"यच्या असतात! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Tue, 11/26/2013 - 14:19

Permalink

....खिक्....खिक्.....खिक्......!!!

सल बोलून दाखवली म्हणूनच 'बाबा पाटलान्च्या' प्रतिक्रियेमुळे समाधान होते. बाकी या देशात काहीही होउ शकते हे मात्र खरे. विनोद१८
  • Log in or register to post comments

Submitted by वडापाव on Tue, 11/26/2013 - 16:14

Permalink

बाकी या देशात काहीही होउ शकते

बाकी या देशात काहीही होउ शकते हे मात्र खरे.
ह्या डायलॉगचा वीट आलाय. तसे तर जगात कोणत्याही देशात काहीही होऊ शकते. एखादी साधारणतः ऐकायला न मिळणारी, म्हणजेच आऊट ऑफ द बॉक्स बातमी किंवा अफवा आली काय, लगेच आपल्या देशाला 'इधर साला कुछ भी हो सकता है' असं म्हणून अतरंगी ठरवून मोकळे होतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Tue, 11/26/2013 - 16:47

In reply to बाकी या देशात काहीही होउ शकते by वडापाव

Permalink

होना मध्यंतरी अन्ना हजारेंचे आंदोलन म्हणे

पप्पूला लोंच करायचा प्लान आहे अशी ट्विट फिरत होती. म्हणे अण्णा उपोषण करणार अन पप्पु लोकपाल मान्य करणार अन विनाघाड़ी पंतप्रधान बनणार चायला चित्रपट कथा लिहणे अन कारस्थाने उघड करणे यात फरक असतो राव
  • Log in or register to post comments

Submitted by खबो जाप on Tue, 11/26/2013 - 16:58

Permalink

कसब चे स्टेटमेंट

http://www.youtube.com/watch?v=naX7lV3neX0
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Tue, 11/26/2013 - 17:16

Permalink

याबाबत माझा एक अंदाज

याबाबत माझा एक अंदाज: सरकार ला अस वाटत असाव कि अश्या घटनेची चित्रफित जर प्रसारित केली तर ती न्यूज चैनेल वाले सलग दोन महिने दाखवून जातीय तेढ निर्माण करतील. याबाबत माझे मत--> हि जर बाब खरी असेल तर यापेक्षा मोठे आपल्या देशाचे दुर्दैव नहि…!!! जर आश्या चित्रफिती पाहून जर कोणाला राग येत असेल तर त्यांना या देशात राहण्यचा अधिकार नहि. अश्या लोकांचे पासपोर्ट आम्ही स्वखार्चाने बनवून देउ….!
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Tue, 11/26/2013 - 18:07

In reply to "अमर ज्योती"ला लाथा मारणारे by टवाळ कार्टा

Permalink

एक्दम बरोबर....

कसाब अजुन जिवंत आहे का ?
ज्या देशामध्ये अमर ज्योती ला लाथा मारणारे (ते हि पोलीसां समोर) लोक मोकाट फिरत असतील त्या देशामध्ये हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे…
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल मेंढे on Tue, 11/26/2013 - 17:25

Permalink

सहमत

अश्या लोकांचे पासपोर्ट आम्ही स्वखार्चाने बनवून देउ….!
१००% सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 11/26/2013 - 18:29

Permalink

जिंदा, सुखा, बिल्ला, रंगा,

जिंदा, सुखा, बिल्ला, रंगा, रामन राघव, सतवंतसिंग धनंजय चॅटर्जी, गेला बाजार नथुराम गोडसे कशावरून जिवंत नाहीत अजून?
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 11/26/2013 - 18:42

Permalink

थत्ते साहेब कैच्या

थत्ते साहेब कैच्या कै बोलु नका . यापैकी कुणीही कसाब सारखा काम नव्हत केल .
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 11/26/2013 - 18:49

In reply to थत्ते साहेब कैच्या by जेपी

Permalink

>>काय होईल त्याच्या फाशीची

>>काय होईल त्याच्या फाशीची चित्रफीत आली तर? तर अतिरेकी ही चित्रफीत सतत दाखवून अजून कसाब तयार करतील .. त्याला प्रसिद्धी देतील आणि लोकांची माथी भडकवतील !
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Tue, 11/26/2013 - 18:54

Permalink

मुनीवर १००% खरी गोष्ट

>>काय होईल त्याच्या फाशीची चित्रफीत आली तर? तर अतिरेकी ही चित्रफीत सतत दाखवून अजून कसाब तयार करतील .. त्याला प्रसिद्धी देतील आणि लोकांची माथी भडकवतील ! तु नळीवर मुस्लीम अतिरेक्यांकडुन सगळ्यात जास्त प्रसिद्ध केलेली चित्रफित असेल ती.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/26/2013 - 19:26

In reply to मुनीवर १००% खरी गोष्ट by बाबा पाटील

Permalink

यग्झाक्टलि!!!!!! याच

यग्झाक्टलि!!!!!! याच कारणामुळे आम्रिकेनेही लादेनला पकडल्यावर त्याचा मृतदेह दाखवत वैग्रे बसले नाहीत. दाखवलं तर त्या दीडदमडीच्याचे फाजील लाड केल्यासारखं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Tue, 11/26/2013 - 19:31

In reply to यग्झाक्टलि!!!!!! याच by बॅटमॅन

Permalink

माझ्या

वाचनानुसार अमेरिकेनी लादेनला जिवन्त पकडले नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/26/2013 - 19:34

In reply to माझ्या by अनिरुद्ध प

Permalink

आयमाय स्वारी. बारीक चूक

आयमाय स्वारी. बारीक चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. "आम्रिकेने लादेनला ठार मारल्यावर" असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on Tue, 11/26/2013 - 22:03

Permalink

कसाब अल्ला ला प्यारा झालाय हे

कसाब अल्ला ला प्यारा झालाय हे शंभर टक्के खरे आहे पण हे हि तितकेच खरे आहे कि तो फाशी मुळे नाही तर डेंग्यू सारख्या तत्सम आजाराने झाला . आणि श्रेय लाटण्यासाठी फाशी दिल्याचे नाटक केले . असल्या गुलछबु मंत्र्या मध्ये कसली आलीय धमक . थोडक्यात माहिती देतो,कसाबचे शेवटचे फिजिकल फिटनेस ज्या वैद्यकिय अधिकार्‍याने दिले त्याला रात्री दोन वाजता, पोलिसाधिकार्‍यांनी घरातुन उचलुन नेले होते.कसलीही कल्पना न देता.त्याच्या बायकोचा रात्री २.३० ला घाबरुन फोन भाउजी यांना पोलिस अचानक कसल्यातरी मिशनवर घेउन गेलेत प्लिज चौकशी करुन सांगा.मला माहिती मिळेपर्यंत कसाब लटला होता. तेथे असणरृया सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे फोन सुद्धा काढुन घेतले गेले होते. हे विधान दुसर्या अर्थाने पण बघता येईल . बाकी जेंव्हा तो डॉक्टर आपले आत्मचरित्र लिहील तेव्हा तो जरूर तुम्ही सांगताय ह्याच्या उलटे सांगून खळबळ उडवून देईल . ह्या प्रशासकीय अधिकार्यांना सवयच असते नोकरीत असताना सरकारची हुजरेगिरी करायची आणि निवृत्त झाले कि टीवी वर येउन मोठ्या बाता मारायच्या किंवा आत्मचरित्रे लिहून खळबळ जनक (भलेही ते खरे का असेना )लिहायचे !
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 11/27/2013 - 11:07

In reply to कसाब अल्ला ला प्यारा झालाय हे by चेतनकुलकर्णी_85

Permalink

डॉक्टर

महाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंकात कसाबला शेवटचे काही दिवस तपासणार्‍या डॉक्टरचेही कथन आलेले आहे. त्यात त्याला डेंग्यू झाला होता असा उल्लेख नाही. [डेंग्यू झाला होता ही अफवा असावी किंवा सगळं जगच एखाद्या षड्यंत्रानुसार चालत असावं].
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on Wed, 11/27/2013 - 22:28

In reply to डॉक्टर by नितिन थत्ते

Permalink

सगळं जगच एखाद्या

सगळं जगच एखाद्या षड्यंत्रानुसार चालत असावं
एकदम बरोबर !
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on Wed, 11/27/2013 - 11:48

In reply to कसाब अल्ला ला प्यारा झालाय हे by चेतनकुलकर्णी_85

Permalink

अगदी अगदी!!!

खरं आहे. मी तर म्हणतो ते काय सी-लिंक वगैरे पूल का काय आहे तो आणि बरेच इतर प्रोजेक्ट पण आपण बनवले नसणार, गुपचूप येऊन एलिअन बांधून गेले असणार, असले मोठे प्रोजेक्ट अप्रूव करायची आपल्या गुलछबु मंत्र्यांमधे कसली आलीय धमक. ते मंगळयान वगैरे सुद्धा अमेरीकेने वगैरे बनवलं असणार आणि आपल्या नावावर सोडलं असणार, असले वैज्ञानिक प्रयोग अंमलात आणायची आपल्या लोकांत कसली आलीय धमक. कसाबला पण पकडलं नसणार, तो स्वतःच येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला असणार. ती रॉ वगैरे पण आहे असं म्हणतात पण खरंतर अशी यंत्रणाच नसणार, स्वतःची गुप्तहीर यंत्रणा? आपल्या सरकार मधे कुठे आलीय इतकी धमक. अगदी बरोबर आहे तुमचं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on Wed, 11/27/2013 - 22:27

In reply to अगदी अगदी!!! by थॉर माणूस

Permalink

मी तर म्हणतो ते काय सी-लिंक

मी तर म्हणतो ते काय सी-लिंक वगैरे पूल का काय आहे तो आणि बरेच इतर प्रोजेक्ट पण आपण बनवले नसणार
ह्या सी लिंक प्रोजेक्ट चा इतिहास जरा तपासा म्हणजे कळेल तुम्हाला नेत्यांची अंगातील धमक व कुवत ! पूल बांधायला लागली दहा एक वर्षे आणि नाव द्यायाला १ मिनिट .
असले वैज्ञानिक प्रयोग अंमलात आणायची आपल्या लोकांत कसली आलीय धमक.
धमक कि प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकात लागते फंड मंजूर करणाऱ्या नेत्यात असतेच असे नाही बाकी तुमच्या प्रतिसादावर अनेक काही लिहू शकतो पण इथील लोके धागा भरकटला म्हणून बोंबा मारतील म्हणून थांबतो :D
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on गुरुवार, 11/28/2013 - 11:31

In reply to मी तर म्हणतो ते काय सी-लिंक by चेतनकुलकर्णी_85

Permalink

थांबल्याबद्दल धन्यवाद.

थांबल्याबद्दल धन्यवाद. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user दिग्विजय खवरे

Submitted by दिग्विजय खवरे on Tue, 11/26/2013 - 22:30

Permalink

कसाब वर येवढा खर्च केला

त्याचा बाप सापडला असता तर पूर्ण देश विकला असता
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on Wed, 11/27/2013 - 12:50

Permalink

रम्य चर्चा...

काय त्या दळभद्र्या कसाबड्याचं दैव? जिवंत होता तेव्हा सरकारी पाहुणचार झोडला, मेल्यावर (जर मेला असला तर) विचारवंत मिपाकरांकडून घेतलेली दखल.. मज्जाय ब्वाँ...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 11/28/2013 - 12:28

Permalink

चुकीचे शीर्षक.

का कोण जाणे, 'कसाब अजुन जिवंत आहे का ?' हे शीर्षक मला जरा विचित्र वाटते आहे. 'कसाब अजुन जिवंत आहे का?', असल्यास माझे त्याच्याकडे थोडे काम आहे, असे कांहीसे ध्वनीत होते आहे. 'कसाबला फांशी दिली, ह्या बातमीत सत्यता किती?' असे शीर्षक असायला हवे होते, असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 11/28/2013 - 20:36

Permalink

इकडे कसाब मेल्याचा पुरावा

इकडे कसाब मेल्याचा पुरावा मागितला जातोय आणि तिकडे जेवढी सांगितली तेवढी माहिती सांगितल्याने 'गोपनीयतेचा भंग' झाला म्हणून शिवसेना गृहमंत्र्यांवर कारवाई करावी असं म्हणते आहे. कसं काय जमायचं? http://www.indianexpress.com/news/shiv-sena-wants-action-against-patil-for-leaking-info-on-kasab/1200139/
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com