व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील.
१. कंटाळा
२. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे)
३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना
पण या तिन्ही कारणांचं समाधान करणारी व्यायामाची एक पद्धती आहे. जिला सर्किट ट्रेनिंग म्हणतात. इथे सर्किट म्हणजे व्यायामप्रकारांची एकामागोमाग केलेली जोडणी. ४ ते ५ मोजके व्यायामप्रकार घेऊन ते एकामागोमाग ठराविक वेळ, किंवा ठराविक वेळा केले जातात आणि असं ठराविक वेळ/ठराविक वेळा केलं जातं.
तुम्हाला काही विशिष्ट शारीरिक समस्या नसेल तर सर्किट ट्रेनिंग कुणालाही (वयाचं तसं बंधन नाही; १५ ते ६५ या साधारण मर्यादा) करता येतं (आपापल्या परीने) आणि व्यायामाचा आनंद घेता येतो. यात शक्यतोवर आपल्या शरीराचं वजन वापरूनच व्यायाम केला जातो, त्यात अतिरिक्त वजन/डंबेल्स इत्यादींची गरज लागत नाही. व्यायामाचा रोख स्नायूंची ताकद वाढवण्याकडे असतो; आकार वाढणं हे ‘बाय प्रॉडक्ट’ असतं.
साधारणपणे सर्किट ट्रेनिंग २०-३० मिनिटात संपतं. यात विश्रांती कमी असते, त्यामुळे ती २०-३० मिनिटं तुमचा पल्स रेट ऑप्टिमम हाय ठेवणं हे उद्दिष्ट असतं. यात कार्डिओ आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा मिलाफ साधला जातो त्यामुळे ही पद्धत बरीच लोकप्रिय आहे. बारीक व्हायचं असो त्याचबरोबर शरीर टोन करायचं असो; किंवा जस्ट टू मेंटेन असो; सर्किट ट्रेनिंग ला संधी द्यायला हरकत नाही.
(खाण्याचा विषय आणल्याशिवाय चैन पडत नाही) खाण्याची रेसिपी करावी; म्हणजे, कुणाला साखर चालत नाही, मग गूळ घालावा, तिखट कमी, मसाला जास्त वगैरे वगैरे, तसं हे सर्किट ट्रेनिंग कस्टमाईझ करता येतं. पण त्यासाठी मुळात व्यायामप्रकारांची माहिती असणं गरजेचं.
मी माझ्या माहितीच्या आणि थोडक्या अनुभवाच्या आधारे एक सर्किट ट्रेनिंग डिझाईन केलंय, जे, साधारणपणे सगळ्यांना करता येईल; ते इथे शेअर करतोय; २० मिनिटात हा व्यायाम करून होतो. पण ती २० मिनिटं तुम्ही शिस्तीत दिल्याप्रमाणे व्यायाम करणं जरूरीचं आहे, त्याशिवाय इफेक्ट वाटणार नाही. बघा करून महिनाभर; सांगा कसं वाटतं ते.
प्रतिक्रिया
22 Nov 2013 - 8:37 am | मुक्त विहारि
प्रयत्न करीन....
22 Nov 2013 - 10:38 am | पाषाणभेद
उत्तम माहिती
प्रयत्न करीन....
22 Nov 2013 - 10:49 am | माझीही शॅम्पेन
वाह चान चान .... सुरुवात करा :)
22 Nov 2013 - 10:50 am | प्रमोद देर्देकर
अपुर्व माझ्या कंपनीत अत्याधुनिक व्यायाम शाळा आहे तिथे मी रोज सकाळी १ तास व्यायाम करतो मला काही प्रश्न आहेत जर मी तुला व्य.नी. केला तर काही मार्गदर्शन कर्शील काय.
22 Nov 2013 - 11:55 am | वेल्लाभट
जरूर करीन की. कधीही व्य.नि. करा.
22 Nov 2013 - 1:06 pm | चित्रगुप्त
फार खाजगी स्वरूपाचे नसतील, तर इथेच चर्चा करा, इतरांनाही लाभ होईल.
22 Nov 2013 - 10:54 am | पिवळा डांबिस
व्हेरी गुड धागा!!
26 Nov 2013 - 5:08 pm | विजुभाऊ
ह्या असल्या रीमार्कमुळॅच मराठीची ब्याकहाट चालू आहे.
यू नो मराठी लेस अॅन्ड इंग्रजी मोअर अशी लँग्वेज यूज केल्यामुळे हल्ली मराठे वर्ड्स रीमेम्बर करायला डिफीकल्ट जाते.
यावर काहीतरी वर्काऔट मस्ट हवे यू नो.
तरच प्युअर मराठी यूज मधे राहील. नाहीतर आहेच अल्डरटेड मिक्स्ड कल्चर.
26 Nov 2013 - 5:13 pm | विजुभाऊ
ह्या असल्या रीमार्कमुळॅच मराठीची ब्याकहाट चालू आहे.
यू नो मराठी लेस अॅन्ड इंग्रजी मोअर अशी लँग्वेज यूज केल्यामुळे हल्ली मराठे वर्ड्स रीमेम्बर करायला डिफीकल्ट जाते.
यावर काहीतरी वर्काऔट मस्ट हवे यू नो.
तरच प्युअर मराठी यूज मधे राहील. नाहीतर आहेच अल्डरटेड मिक्स्ड कल्चर.
22 Nov 2013 - 11:09 am | विटेकर
म्हणजे जवळ जवळ रोज असेच ! फक्त मनाच्या आरोग्यासाठी त्याला आसनांची आणि प्रार्थनेची जोड दिली आहे.
वेळ -४५ मिनिटे , ४ सुर्य नमस्कार मस्ट. एकूण ४५ मिनिटे घरच्या घरी. टूरवर अस्लो की हॉटेल मधल्या खोलीत सहज शक्य होते. आणि दिवसभर उत्साही वाटते. कधीकधी संध्याकाळीदेखील सुचनाबर्हुकुम शवासन करतो , थकवा पार पळून जातो.
कोणाला हवे असल्यास व्य. नि . करावा. चांगला विषय काढल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार.
पण माझ्या व्यायामाने वजन कमी होत नाही. मला खाण्या-पिण्याबद्दल जरा मार्गदर्शन हवे आहे. त्या हर्बल पावडरीचा उपयोग होतो म्हण्तात पण अशी सवय शरिराला घातक अथरु शकेल का ?
22 Nov 2013 - 12:01 pm | वेल्लाभट
विटेकर,
हर्बल पावडर म्हणजे नक्की कुठली? मेदारी इत्यादी अशी नावं असलेली उत्पादनं का?
तसं असल्यास फारसा फरक पडत नाही. फोकस ऑन द बिग-टिकिट आयटम्स. असं समजा एक गाडी ढकलायचीय, ती ढकलण्यात एका लहानग्याचा जोर किती फरक पाडेल?... तितकच या पावडरीचं वजन कमी होण्यातलं योगदान असेल.
तेंव्हा मुळात व्यायाम करा, भरपूर पण चांगलं खा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, सातत्य ठेवा, मोटिव्हेटेड रहा. हीच त्रिसूत्री आहे.
23 Nov 2013 - 9:54 am | vrushali n
तुम्हाला हर्बल लाईफ पावडर म्हणायचे आहे का?माझ्या बाबांना आणी बर्याच ओळखीच्या लोकांना त्याचा फायदा झाला आहे
22 Nov 2013 - 11:12 am | त्रिवेणी
धन्यवाद माहिती शेअर केल्याबद्दल.
22 Nov 2013 - 11:19 am | पैसा
अशा प्रकारचे व्यायाम केल्याने फ्रेश वाटत असेल हे नक्की. चरबी कमी होऊन स्नायु मजबूत होण्याबद्दल तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे? कुतुहल म्हणून विचारत आहे.
@विटेकर हर्बल पावडरी वगैरेत काही अर्थ नाही असे वाटते. साखर, बेकरीत बनलेल्या वस्तू आणि लोणची वगैरे भरपूर तेल असलेले पदार्थ बंद केलेत तर बराच फायदा होईल असे वाटते.
22 Nov 2013 - 1:02 pm | वेल्लाभट
कळला नाही प्रश्न? `या' व्यायामाचं म्हणताय की एकंदरित व्यायामाचं? सविस्तर विचारता का जरा?
22 Nov 2013 - 1:31 pm | पैसा
सगळ्या प्रकारचे व्यायाम नव्हे, ही सर्किट पद्धत म्हणते मी.
22 Nov 2013 - 6:34 pm | वेल्लाभट
सर्किट ट्रेनिंग पद्धतीचं रहस्य असं आहे की यात कमीत कमी रेस्ट असते. म्हणजे सांगायचं झालंच तर तुम्ही अगदी प्रचंड दमलातच, तर १० सेकंद स्लो चाला खोलीतल्या खोलीत आणि पुढे सुरु. अशा प्रकारच्या व्यायामात तुमचा हार्ट रेट सतत `अप' रहातो ज्याने शरीरात आणि पर्यायाने स्नायूंपर्यंत जास्त ऑक्सिजन पोहोचतो. तसंच, यात कार्डिओ बरोबरच स्नायूंचं बळकटीकरण या दोन्ही गोष्टी एकत्र होतात, स्नायूंना पुरेपूर ताण दिला जातो, ज्यातून त्यांची झीज होते, आणि मग पुढे त्यातूनच स्नायूंची वाढ होते.
स्नायूंची वाढच मेदाच्या कमी होण्यास प्रेरक असते. तसंच कार्डिओव्हास्क्युलर फिटनेस सुधारण्याचंही बायप्रॉडक्ट मेद कमी होणे हे असतंच. तेंव्हा सर्किट ट्रेनिंग प्रकारात ब-याच अंशी या दोन्ही गोष्टी साध्य होतात. बरं, यातले व्यायामप्रकार केवळ आपल्या शरीराचं वजन वापरून करण्याचे असल्याने जागा, किंवा साधनांची विशेष गरज नाही. लागणारा वेळही कमी. या सर्व कारणांमुळे गृहिणी, किंवा फार व्यस्त दिनचर्या असणारी मंडळी, यांना हा विशेष जमणारा प्रकार आहे.
अर्थात, हाच आदर्श व्यायाम असं नव्हे. पण स्ट्रेन्ग्थ गेन, व फॅट लॉस हे दोन्ही साध्य करायचं असेल तर हा प्रकार नक्कीच परिणामकारक ठरतो.
22 Nov 2013 - 7:13 pm | पैसा
आणि बरेच प्रकार आलटून पालटून केल्याने दमणूक कमी होईल, कंटाळाही येणार नाही.
22 Nov 2013 - 7:21 pm | वेल्लाभट
मी तर म्हणतो, ऒन अ लायटर साइड, बट खरंच; एखाद्याला हे सगळं काही असं रूटीन, रेजिम वगैरे नको असेल, तर सरळ दणदणीत गाणी लावावी उडत्या चालीची, इंग्रजी असल्यास उत्तम, आणि दार बंद करून (लाज वाटत असल्यास *blum3* ) नाचावं मनमुराद दमेस्तोवर.... \m/ गंमत नाही; इट डज द सेम जॊब, बट मेक्स इट अ बिट मोअर एन्जॊएबल.
22 Nov 2013 - 7:24 pm | पैसा
झुंबा नावाचा असाच कायतरी प्रकार आहे असं ऐकलंय.
23 Nov 2013 - 5:08 am | Pearl
झुम्बा करायला मस्त वाटत. माझा आवडता व्यायाम प्रकार. आणि हा विडिओ पण छान आहे झुम्बाचा.
http://m.youtube.com/watch?v=Vf0q6qtThF4
23 Nov 2013 - 2:33 pm | चित्रगुप्त
हे एकदम बेस्टच.
संगीतामुळे एक वेगळीच मजा येते. यानिमित्ताने वेगवेगळे संगीतप्रकार शोधले जातात. अरबी बेलीडान्स संगीत, मोझार्टादिंचे संगीत, चिनी,जपानी,थायलंडचे संगीत, कव्वाली, जुनी आवडती हिंदी गाणी, असे काहीबाही यासाठी शोधणे, हाही एक आनंद.
असा नाच मी बरेचदा करतो ( पण आता नियमितपणे करायला हवा) मुक्तपणे नाचताना सहेतुकपणे शरिराच्या जास्तीतजास्त विविध प्रकारच्या हालचाली केल्यास उत्तम. उदाहरणार्थ गिरक्या घेणे, जमिनीवर लोळणे, उड्या मारणे, पोट आतबाहेर करणे, तोंडाचा आ वासणे, डोळे मोठे करणे, जीभ बाहेर काढून गर्जना करणे, हीव भरल्यासारखे करणे, असे जे जे सुचेल तसे वाट्टेल ते करणे. घरात लहान मूल असेल, तर त्यालाही बरोबर घ्यावे.
सुरुवातीला थोडा वेळ हालचाली हळू हळू कराव्यात, मग गति वाढवावी. शेवटली काही मिनिटे लालित्यपूर्ण नृत्यासारखे सावकाश करावे. या सर्वांसाठी वेगवेगळे संगीत निवडावे.
सुरू करण्या आधी थोडेसे पाणी प्यावे. चक्कर आल्यासारखे वाटल्यास लगेच थांबावे. एकदम अति करू नये, हळूहळू वेळ वाढवत न्यावी.
22 Nov 2013 - 12:08 pm | विहंग
शेअर केलेले डॉ. दिसत नहि.....
22 Nov 2013 - 1:03 pm | वेल्लाभट
नाही नाही; डॉक्टर नाही मी.
22 Nov 2013 - 12:44 pm | स्मिता शितूत
हे व्ययाम केल्याने वजन कमी होइल का?
22 Nov 2013 - 1:07 pm | वेल्लाभट
सर्किट ट्रेनिंग ने फायदा नक्कीच होतो. व्यायामाची पद्धत, मात्रा योग्य हवी; सोबत सकस आहार, प्रोटीन, कॅल्शियम चं आहारातील भरपूर प्रमाण; या बाबी मात्र जरूरीच्या आहेत. कारण वजन कमी होणं, किंवा ते वाढणं... याला अनेक फॅक्टर्स कारणीभूत असतात.
22 Nov 2013 - 1:34 pm | चित्रगुप्त
हा वीस मिनिटाचा व्यायाम, आणि चाळीस मिनिटे सायकल चालवणे, यात जास्त फायदेशीर कोणते असावे?
फायदा म्हणजे पोट, वजन जमी करणे, एकंदरित स्टॅमिना वाढवणे, असे गृहित धरले आहे.
22 Nov 2013 - 2:12 pm | वेल्लाभट
असं बघा, की सर्किट ट्रेनिंग मधे टार्गेट होणारे स्नायू सायकलिंग पेक्षा जास्त आहेत. सायकलिंग हा उत्तम कार्डियो व्यायाम आहे. मी म्हणेन की २० मिनिटं स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग प्रकारचा व्यायाम करा + ४० मिनिटं सायकलिंग करा = सुपर अवर होईल. मच बेटर ऑप्शन.
22 Nov 2013 - 1:35 pm | सुबोध खरे
एक ७० किलोचा माणूस जर सहा किमी ताशी या वेगाने २० मिनिटे धावला तर त्याच्या १४० कैलरी (नेट) जळतात.एकशे चाळीस कैलरी म्हणजे पंधरा ग्रॅम चरबी( एक ग्रॅम चरबी म्हणजे ९ कैलरी). जर तो बटर फ्लाय तर्हेने २० मिनिटे पोहला तर ३३० कैलरी (नेट) जळतात. (हा सर्वात कठीण व्यायामाचा आणि थकविणारा प्रकार आहे आणि हे केवळ निष्णात पोहणार्याचे काम आहे ). सुदृढ व्यक्तींनी एकदा ट्रेड मिल वर पळून पहावे
एक समोसा खाल्ला तर ३०८ कैलरिज आपल्या शरीरावर चढतात तर ब्लैक फोरेस्ट पेस्ट्री मध्ये २८५ कैलरिज.
तेंव्हा जर आपण सामोसा(किंवा तत्सम पदार्थ) खाणार असाल तर आपल्याला किती मिनिटे धावायला लागेल त्याचा विचार करणे आवश्यक आहे. जर वेल्लाभट यांचा व्यायाम करून आपण जर काही अधिक खाणार असाल तर त्याचा उपयोग नाही. उगाच नंतर वेल्लाभट यांना दुषणे देऊ नका.
व्यायाम रोज जर वीस मिनिटे "नेमाने" केला आणि त्यानंतर भूक लागली म्हणून अधिक खाल्ले नाही तर रोज पंधरा ग्रॅम म्हणजे साडे चारशे ग्रॅम महिन्याला आणि वर्षाला साधारण साडे पाच किलोने वजन कमी होईल.
असो
वजन कमी करणे यावर कित्येक लोक पी एच डी करून श्रीमंत झाले. वजन कमी करणे हि एक अब्जावधी रुपये कमावणारा उद्योग जगभरात आहे.तो असा सहज शिळोप्याच्या गप्पांचा विषय नाही.
हा प्रतिसाद अतिशहाणपणाचा वाटण्याची शक्यता आहे याची मला जाणीव आहे पण हे कटू सत्य आहे
22 Nov 2013 - 2:57 pm | सूड
कॅलरी काऊंटसकट प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद !! आता खाताना विचार करणेत येईल.
22 Nov 2013 - 6:40 pm | वेल्लाभट
स्टेपिंगनेही खूप कॅलरी कमी होतात. १८९ (६० किलो - २० मिनिटं)
हे बाकी खरं आहे. इतका बागुलबुवा केला जातो या `फॅट' चा.... की विचारू नका.
23 Nov 2013 - 1:05 am | सूड
स्किपिंगबद्दल काय मत आहे? किती कॅलरीज बर्न होऊ शकतात जर ७० किलो वजनाची व्यक्ती दहा मिनीटे स्किपिंग करत असेल तर ??
23 Nov 2013 - 2:08 am | चतुरंग
http://www.self.com/calculatorsprograms/calculators/caloriesburned/jumpi...
26 Nov 2013 - 6:07 pm | सूड
धन्यवाद्स!!
23 Nov 2013 - 11:18 am | प्रभाकर पेठकर
डॉक्टरसाहेब,
तासाला ६ किमी धावून नाही चालूनही पूर्ण होतात. मी रोज ५ किमी चालतो मला ५० ते ५५ मिनिटे लागतात. माझे वजन ११७ किलो आहे. माझ्या ह्या वजनालाही वरील वेळेत चालणे शक्य होते. ७० किलो वजनाच्या माणसास धावल्यास ताशी वेग ६ किमी पेक्षा नक्कीच जास्त मिळेल.
हा प्रतिसाद तुमचे विधान खोडून काढण्यासाठी नसून चालण्यात आणि धावण्यात तितक्याच उष्मांकांचे (कॅलरीज) ज्वलन होते का ह्या माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी आहे, आणि म्हणूनच मी माझे वजन, रोजचा व्यायाम वगैरे तपशिल दिला आहे.
खाण्यावर पूर्वी नव्हतं पण सध्या तरी नियंत्रण आहे.
23 Nov 2013 - 11:42 am | सुबोध खरे
साहेब,
हा सहा किमी तशी वेग मुद्दामच गृहीत ठेवला होता याचे कारण बरेचसे वजनदार लोक यापेक्षा जास्त वेगाने सुरुवातीला तरी पळू/ चालू शकणार नाहीत. अन्यथा तरुण माणसे याच्या दुप्पट वेगाने पळू शकतात. चालण्यापेक्षा धावण्यात जास्त उष्मांक जळतात कारण धावताना आपल्याला उडी मारून आपले वजन उचलावे लागते आणि चालताना उडी मारली जात नाही. म्हणूनच धावले तर लवकर दमायला सुद्धा होते. शिवाय ते आपल्या गुडघ्यांसाठी हानिकारक असू शकते. त्यामुळेच हृदयरोग मधुमेह रक्तदाब इ आजारावर वेगात चालणे सांगितले जाते. आपण करत तेवढा व्यायाम (पाच किमी पन्नास मिनिटात) योग्य आहे. फक्त हा नियमित (कमीत कमी आठवड्यात चार वेळा) करणे आवश्यक आहे. आणि जसेजसे सवय होईल तसे आपण आपला वेग वाढवत न्या. म्हणजे आपला फिटनेस वाढेल आणि वजनही कमी होऊ शकेल.
23 Nov 2013 - 2:05 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
धावण्याची सवय नाही (पूर्वीही नव्हती). चालण्याची सवय (व्यायामासाठी म्हणून) गेली अनेक वर्षे आहे. गुडघ्यांचा त्रास आहेच. (फाटलेली कार्टीलेजिस). शंभरएक मिटर्स च्या पुढे धावू शकत नाही. त्यामुळे स्ट्रेस टेस्ट (ज्यात ट्रेड मिलवर धावावे लागते म्हणतात) अजून केलेली नाही. बाकी नुसत्या चालण्याने दम वगैरे कांही लागत नाही. असो.
22 Nov 2013 - 2:59 pm | प्रफुल्ल
आजपासून सुरवात करण्यात आली आहे..
22 Nov 2013 - 3:15 pm | सुबोध खरे
व्यायामाला कि खाण्याला ?
22 Nov 2013 - 3:21 pm | प्रफुल्ल
सर्किट ट्रेनिंगला !! खायचा चालु आहेचकी पहिल्यापासून..म्हणुन १०० किलो चे थोडे १०-१५ ग्रम कमी होतील बघू.. कंटाळा न करता..
23 Nov 2013 - 6:51 am | सांजसंध्या
+१
22 Nov 2013 - 6:37 pm | बॅटमॅन
मला एक प्रश्न पडतो बर्याचदा. अर्थात व्यायाममाहात्म्य नाकारणे मूर्खपणाच आहे. पण वजन महत्त्वाचे की फिटनेस? समजा पाहिजे त्यापेक्षा तुमचे वजन जरा जास्तच आहे पण पळापळी ट्रेकाट्रेकी करताना जर टेकीस येत नसाल तर त्याचा तोटा काय?
22 Nov 2013 - 6:43 pm | वेल्लाभट
फिटनेस! नो डाउट अबाउट इट. मार्क महत्वाचे की बुद्धी... तसं आहे ते.
22 Nov 2013 - 7:32 pm | चित्रगुप्त
अगदी तरूण वयात वजन जरा जास्त असले तरी शक्ती पुष्कळ असल्याने थकायला होत नाही, मात्र वय जसजसे वाढेल, तसे जास्त वजनामुळे त्रास होऊ लागतो, तस्मात वजन नेहमी आटोक्यात असणे बरे.
उदाहरणार्थ मागे एका धाग्यात 'अगदी सोपी फिटनेस टेस्ट' दिली होती, ते तरुण वयात जमते, पण वाढलेया वयात वजन तेवढेच असून जमत नाही.
अर्थात जास्त वजन हे चरबीचे आहे, की हाडा-स्नायुंचे, हेही महत्वाचे. यासाठी एक टेस्ट मोठ्या इस्पितळातून करवून घेता येते, त्यात अमुक किलो हाडे, अमुक स्नायु, अमूक चरबीचे वजन असे येते. ती करवून घेणे उपयोगी ठरावे.
22 Nov 2013 - 6:54 pm | पिशी अबोली
हे सर्किट ट्रेनिंग डायरेक्ट २० मिनिटं सुरु करता येतं का? इतकं दमवणारं असेल तर अचानक सुरुवात करून त्रासही होऊ शकेल ना? तसेच मधे गॅप पडणार असेल, अगदी ४-५ दिवसांचाही, तर त्यानंतरही याच पद्धतीने चालू ठेवायचं का? मी साधे सूर्यनमस्कार काही गॅपनंतर परत आधीसारखेच सुरु केले तर त्रास झाला होता आणि डॉक्टरनी मला छान झापले होते.
22 Nov 2013 - 7:15 pm | वेल्लाभट
नाही नाही; असं काही नाही. शेवटी प्रत्येकाची कुवत नावाचीही एक गोष्ट असते. तुम्हालाच असं नाही, सगळ्यांनाच म्हणून सांगतो.
एकदम २० मिनिट जमेल असं मुळीच नाही. नवखा दमणारच. तेंव्हा अगदीच झोक जायला लागला तर थांबायचं सरळ. कुणी हंटर घेऊन बसलेलं नाही. अगदी पार आउट नाही झालो; पण दमलो, तर १०-२० सेकंदाची चीटिंग करावी... काही हरकत नाही. तसंच, एखादा प्रकार नाही जमला त्यातला, तर त्याबदल्यात तुम्हाला जमतो तो प्रकार करायचा... शेवटी व्यायाम महत्वाचा नाही का. यात हवी ती व्हेरिएशन्स करता येतात आणि केलीच पाहिजेत. तरच मजा आहे. वर दिलेलं रुटीन हा एक नमुना आहे.
तेंव्हा सावकाश, हळू हळू वाढवत न्या, हरकत नाही. बिन्धास्त. *smile* :-) :) +) =) :smile:
22 Nov 2013 - 7:29 pm | यशोधरा
मस्त धागा, आणि माहिती. धन्यवाद.
22 Nov 2013 - 9:25 pm | सांजसंध्या
काम की चीज है..
थँक्स !
22 Nov 2013 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर उपयोगी धागा !
फक्त एक महत्वची सुचना: अगोदर कुठल्याच व्यायामाची सवय नसलेल्या किंवा बर्याच खंडानंतर व्यायाम सुरू करत असलेल्या आणि विषेशतः ४०+ वय असलेल्या सर्व व्यक्तींनी व्यायाम सुरू करण्या अगोदर वैद्यकीय तपासणी करून घेतलेली बरी.
महत्वाची गोष्ट म्हणजे वजनासे काहीसे बँकेतल्या शिलकीसारखे असते:
भरणा केलेली रक्कम (खाल्लेल्या कॅलरीज) - खर्ची घातलेली रक्कम (खर्च केलेल्या कॅलरीज) = बाकी (वजन)
अर्थात प्रत्यक्षात हे गुणोत्तर इतके एकदम सरळ नसून काही प्रमाणात प्रत्येकाच्या शरीराच्या चयापचयाच्या गुणधर्माप्रमाणे (मेटॅबोलीझम कॅरॅक्टेरिस्टीक्स) बदलते... पण घोपट्मार्गाने बरोबर आहे.
वजन ताब्यात असणे अत्यंत महत्वाचे पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे तो जीवनदर्जा (quality of life). चांगला जीवनदर्जा म्हणजे १०० टक्के आरोग्य अथवा महाराष्ट्रश्री नाही तर नेहमीच्या व्यवहारातल्या आणि आपल्या आवडीच्या अशा गोष्टी मजेत करण्याइतके उत्तम आरोग्य असणे. योग्य वैद्यकीय काळजी व नियमीत व्यायाम यांच्या संयोगाने मधुमेह, हृदयविकार, इ असलेल्या व्यक्तींचाही जीवनदर्जा उत्तम असू शकतो.
या लेखात म्हटल्याप्रमाणेच व्यायामात खूप श्रमापेक्षा खूप नियमितपणाला जास्त महत्व आहे.
24 Nov 2013 - 9:15 am | मदनबाण
कालच माझे वजन चेक केले,आकडा पाहुन हैराण आहे. :(
24 Nov 2013 - 1:46 pm | तुमचा अभिषेक
छान माहिती, लिंक वाचनखूण :)
26 Nov 2013 - 6:10 am | वेल्लाभट
अभिषेक, मदनबाण, इस्पिकएक्का, सांजसंध्या, यशोधरा,
सगळ्यांचेच आभार. मस्त, स्वस्थ रहा! :)
26 Nov 2013 - 9:55 am | सुबोध खरे
वेल्ला भट साहेब,
वरील सर्किट ट्रेनिंग फारच उपयुक्त आहे (जर आजपासून चालू केले- उद्यापासून नाही). हे जर आणखी वीस मिनिटे बर्यापैकी वेगाने धावण्याबरोबर जोडले (आणि अर्थात आहारावर नियंत्रण ठेवले) तर महिन्याला एक ते दीड किलोपर्यंत वजन कमी होऊ शकेल. म्हणजे वर्षभरात बारा ते अठरा किलो. वजन हळूहळू का कमी करायचे यावर एक प्रतिसाद जर सवडीने टाकतो.
26 Nov 2013 - 11:50 am | वेल्लाभट
अगदी बरोबर.
शिवाय, शरिराच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेनुसार कमी होणार वजन हे कमी जास्त असू शकतं.
आहार, हा एक संपूर्ण वेगळा, विस्तृत विषय आहे.
यावरून आठवलं म्हणून सांगतो, मी स्वतः, केवळ स्टेपिंग करून साधारण महिन्याभरात (त्याहूनही कमीच) पाच किलो वजन कमी केलं होतं. डाएट मधे केवळ प्रोटीन पुरेपूर ठेवण्यावर भर, बाकी आहारात एका कणाचीही घट नाही.
असो. रिस्पॉन्सिवनेस चा विषय, म्हणून सांगितलं.
28 Nov 2013 - 4:32 pm | पियुशा
वेल्लाभट मी सध्या रोज व्यायाम करतेय , स्टेपिंग विषयी माहीती हवीय , माझ्या घरातल्या जिन्याला १० पायर्या आहेत त्या मी रोज सकाळी किमान १०-१२ वेळेस तरी चढ्ते उतरते अर्थात मला याबद्दल जास्ती माहीती नाही पण तुम्ही जे म्हनताय ते अन मी जे करतेय ते, ह्यालाच स्टॅपिंग म्हणातात का ?
28 Nov 2013 - 7:28 pm | वेल्लाभट
स्टेपिंग हेच; पण यात अनेक व्हेरिएशन्स असतात.
१. साधं जिने चढणं.
२. एक पायरी सोडून
३. थोडं वेगात चढणं (अर्थात न पडता, तोल सांभाळून)
४. लांब लांब पाय टाकत (म्हणजे एक पाय पायरीच्या डाव्या टोकाला तर पुढचा पाय वरच्या पायरीच्या उजव्या टोकाला)
५. २ अप १ डाउन / १ डाउन २ अप
६. दोन्ही पायांनी उडी मारून
७. पायरीगणिक बैठक मारत
८. पाय टाकताना छातीला गुडघा टेकवून पाय टाकत
९. पायरी गणिक आल्टरनेट पाय बट्स ला टेकवत
१०. चवड्यांवर
असे अनेक प्रकार करता येतात, केले जातात आणि ते परिणामकारक असतात. तुमची कल्पनाशक्ती वापरा बिन्धास्त.
अर्थात; हे आधीच सांगतो की याचा अतिरेक चांगला नाही. तेंव्हा एक दिवसा आड हे करा, किंवा ४ दिवस हे केलंत की ३ दिवस दुसरं काहीतरी करा, मसल्स ना झीज भरून काढायला वेळ हवा ना.
29 Nov 2013 - 10:12 am | पियुशा
अच्छा ... मग मी करते हे दररोज गेले ८ दिवस नियमीत ,
१० मिनिटे मी जलद गतीने जिना चढते उतरते त्याआधी १५ मि.स्ट्रेचींगचे काही व्यायामप्रकार करते ज्यात बटरफ्लाय, क्रंची असे व्यायाम आहेत तुम्ही दिलेल्या सर्किट ट्रेनिंग प्रकारातले व्यायाम अन मी करत अस्लेले व्यायाम यात बरेच साम्य आहे , मग मला अस विचारायच आहे की , जर मी हे नियमीत चालु ठॅवले अर्थात जिभेचे चोचले न पुरवता तर साधारण महिन्याला कितपत वजन कमी करणे आरोग्याच्या दॄष्टीने हितावह आहे
29 Nov 2013 - 11:19 am | वेल्लाभट
तुम्ही करता ते चालू ठेवा. चांगलं खा, वेळच्यावेळी खा. फिटनेस येत जाईलच. वजन किती कमी करावं महिन्याला याचा असा बेन्च्मार्क नाही ठाउक मला. अर्थात, अती नाही हे नक्की. पण होत जाईल कमी. शरीर किती कसा प्रतिसाद देतंय त्यावर बरंच काही ठरतं. मेटॅबॉलिजम वरही अवलंबून असतं. पण व्यायाम चालू राहूद्या. आणि एक मात्र आहे, की व्यायामात `क्म्फर्ट लेव्हल' येऊन देऊ नका. व्यायाम वाढवत न्या. वेळाने किंवा डिफिकल्टी लेव्हल ने. पण keep raising the bar. and also, change the routine every 2 weeeks. body gets used to a certain level of activity and then stops reacting to it.
27 Nov 2013 - 10:18 am | सुबोध खरे
बहुसंख्य वजन कमी करणारी केंद्रे आपल्याला दोन महिन्यात पंधरा किलो वजन कमी करा इ इ आमिषे दाखवीत असतात. त्या गळाला आपण का लागायचे नाही याचा एक गोषवारा.
१) आपले वजन पंधरा किलोने दोन महिन्यात वाढलेले नाही अगदी स्त्रियांच्या गरोदरपणात सुद्धा नाही. पूर्ण ९ महिन्यात १ २ किलोने वजन वाढणे अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त वजन म्हणजे आईच्या अंगावर चढलेली चरबी असते जी नंतर उतरता उतरत नाही.
२) वजन एका झटक्यात कमी केले तर फुगा भरपूर फुगवला आणि एकदम हवा कमी केली तर जसे त्यावर सुरकुत्या पडतात तशाच सुरकुत्या आपल्या शरीरावर पडतात. यात सुद्धा पोटावरची चरबी सर्वात शेवटी उतरते आणि चेहरा आणि मानेवरची चरबी अगोदर उतरते. कारण हि चरबी अत्यावश्यक नसते.याचा परिणाम म्हणून मध्य वयीन माणसे (विशेषतः स्त्रिया) एकदम सुरकुतलेली आणि वय वाढलेली दिसु लागतात. विशेषतः स्त्रियांसाठी हा एक फार मोठा धक्का असतो त्यामुळे त्या सहजा सहजी तसे करायला तयार नसतात.
पोटावरची चरबी हि आतल्या अवयवांचे थंडी पासून रक्षण करते त्यामुळे निसर्ग ती चरबी शक्यतो वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. म्हणून सुटलेले पोट परत आत घेणे हे फार कठीण आहे हा आपल्या सर्वांचा वैयक्तिक अनुभव आहे.
३) याच कारणासाठी चरबी शोषून घेणारी यंत्रे वापरणे (LIPOSUCTION) हे तितके सोपे नाही. कारण पोटावरची दीड ते दोन किलो चरबी आपण एका रात्रीत काढून घेतली तर पोटाची त्वचा नुकत्याच बाळंत झालेल्या बाईसारखी किंवा हवा गेलेल्या फुग्यासारखीहोते . यासाठी ते तुम्हाला एक रबराची अतिशय घट्ट चड्डी बेंबी पासून मध्य मांडीपर्यंत चोवीस तास दीड ते दोन महिन्यासाठी वापरायला लावतात. म्हणजे या काळात आपली त्वचा मूळ आकार परत धारण करू लागते.पण हि रबराची चड्डी वापरणे अतिशय कटकटीचे आणी त्रासदायक आहे असे मला बर्याच रुग्णांनी सांगितले.
४) व्यायाम आणी मिताहार याने जेंव्हा आपण वजन महिन्याला दीड ते दोन किलोने कमी करता तेंव्हा व्यायामाने आपली सैल झालेली त्वचा पूर्ण घट्ट होतेच पण त्वचेहे रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते आणी आपले वय पाच वर्षांनी कमी दिसू शकते. शिवाय व्यायामाचे आणी वजन कमी केल्याचे फायदे तर आहेतच.
म्हणून हा व्यायाम आपण आजचा चालू केला पाहिजे
केल्याने होत आहे रे
आधी केलेची पाहिजे
26 Nov 2013 - 9:57 am | llपुण्याचे पेशवेll
सर्कीट ट्रेनिंगचे माहीत नाही पण तालमीमधे शिकवला जाणारा सपाट्या नावाचा व्यायाम मध्यंतरी एका मित्राच्या आग्रहामुळे करू लागलो आणि स्टॅमिन्यामधे झालेली असाधारण वाढ मी माझी अनुभवली. पूर्वी मी तरणतलावात पोहताना एकदा श्वास घेऊन जेमतेम २ हात जात असे ५-६ मीटर. आता चांगला २५ मीटर जाऊ लागलो आहे. आमच्या ५० मीटर टँकची फेरी दोन वेळा श्वास घेऊन पूर्ण करू शकतो. म्हणजे फुफ्फुसांची क्षमता वाढली असावी.
सदर व्यायामाने चांगला भरपूर दम लागतो म्हणजे करताना नाही. करून थांबल्या नंतर इतका जोरात श्वास घ्यावासा वाटतो की एखादा पंप असला असता तर त्याने हवा भरून घेतली असती असे वाटते. पण २ मिनीटे दीर्घश्वसन केल्यावर नीट होते परत. सपाट्या फक्त दिवसाला ५० इतक्याच मारतो. पण पुरे पडतात असे वाटते. ४ किमी न थांबता पळू शकतो. ही माझ्यासारख्या नव्वदीच्या (वजनाने)माणसासाठि मोठीच मजल आहे.
याप्रकाराने मुख्य व्यायाम हा फुफ्फुसे, मांड्या, खांदे याना होतो असा अनुभव आहे.
वेल्लाभट,
एकदा हे सर्कीट ट्रेनिंगचाही सप्ताह करेन आणि रीझल्ट कळवेन. उपयुक्त माहीतीबद्दल धन्यवाद.
26 Nov 2013 - 10:07 am | यशोधरा
सपाट्या म्हणजे काय ते सांग की!
26 Nov 2013 - 10:40 am | वामन देशमुख
"सपाट्या नावाचा व्यायाम" म्हणजे काय?
26 Nov 2013 - 4:44 pm | llपुण्याचे पेशवेll
याला दंडबैठका म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे सुरुवातीला उभे रहायचे. मग हात टेकवून उकीडवे बसायचे, मग हात टेकलेले ठेऊन पाय उचलून मागे घ्यायचे. मग जोर मारायचा, परत दोन्ही पाय जवळ घ्यायचे, उभे राहायचे आणि एक मोजायचा. परत हीच प्रक्रिया करायची. असे ५० वेळा
26 Nov 2013 - 10:00 pm | llपुण्याचे पेशवेll
http://www.youtube.com/watch?v=fFJicdhPDRM
तूनळीवरच्या या चित्रफितीच्या सुरुवातीस पाहीले तर मल्ल सामूहिकरित्या हा व्यायाम करत आहेत. फरक इतकाच की महाराष्ट्रीय मल्ल संपूर्ण उभे राहतात आणि परत पुढचा जोर काढतात.
27 Nov 2013 - 3:47 pm | सुखी
पिट्टा पडत असेल नाय
26 Nov 2013 - 10:37 am | मिनेश
ट्रेडमिल वर एका constant speed ने धावणॅ आणी speed variation करून धावणे यापैकी कशात जास्त कॅलरीज खर्च होतात? मी सध्या २ मिनीट १३-१४ च्या वेगाने धावून २ मिनीट cooldown mode वर धावतो.....
26 Nov 2013 - 11:39 am | वेल्लाभट
वेगवेगळे अॅप्रोच आहेत.
१. वेग सातत्याने तोच ठेवणे. यात एन्ड्युरन्स वाढतो, कॅलरीजही बर्न होतात. पण शरीर फार पटकन अॅडॉप्ट करतं, एखाद्या सवयीला. त्यामुळे ६ स्पीड वर ३० मिनिटं धावायला पहिल्या दोन दिवशी कठीण जाईल, परंतु ३०व्या दिवशी त्याने काहीच वाटणार नाही. तेंव्हा या अॅप्रोच मधे एक तर स्पीड किंवा धावण्याचा वेळ वाढत जाणं गरजेचं आहे. अर्थात, साधारण एक ४० मिनिटाहून जास्त करू नये असं मला वाटतं. का? तर पुन्हा हेच की शरीराला जितका वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम देऊ तितकं ते जास्त प्रतिसाद देतं. तेंव्हा ४० मिनिटं १० ने धावलात (उदाहरणार्थ) की मग थोडं स्टेपिंग करा, दोरीउड्या मारा, अॅण्ड सो ऑन.
२. वेग कमी जास्त करत धावणे. - हा प्रकार HIIT म्हणजे हाय इन्टेन्सिटी इन्टरव्हल ट्रेनिंग मधे मोडतो. हा मोठा आणि सर्किट ट्रेनिंग सारखाच एक प्रचलित, लोकप्रिय होत असलेला प्रकार आहे. यात शरीराला शॉक केलं जातं ज्यामुळे रिझर्व चरबीतून शरीराला एनर्जी घेणं भाग पडतं, आणि मग अर्थातच, कॅलरी बर्न, व फॅट लॉस. हे केलं तरी हरकत नाही. दोन्ही चांगलंच.
26 Nov 2013 - 1:17 pm | मिनेश
अजुन एक.....
superset workouts वजन कमी करण्यासाठी कितपत उपयोगी पडू शकतात याचीही माहिती द्यावी...
26 Nov 2013 - 10:48 pm | वेल्लाभट
माफ करा, सुपरसेटिंग मी कधी ट्राय केलेलं नाही, किंवा त्याबद्दल पुरेशी माहितीही मला नाही.
वाचायला हवं.
पण याबद्दल मिपावरील जाणकार नक्कीच माहिती देऊ शकतील...
26 Nov 2013 - 2:24 pm | दिपक.कुवेत
खरचं मनापासुन वाटतं रोज थोडा तरी व्यायाम करावा पण वर म्हटल्याप्रमाणे "कंटाळाच" आडवा येतो. असो जाणकारांनी म्हटल्याप्रमाणे आधी चालायला सुरवात करुन मग सर्किट ट्रेनिंगची जोड देण्याचा प्रामाणीक प्रयत्न करीन. वेल्लाभटजी आपण जो सकस आणि पौष्टिक आहार म्हणतो तो जरा अजुन विस्तृत करुन सांगता येईल का? आय मीन अगदि सकाळि उठल्यापासुन ते रात्रि झोपेपर्यंत काय आणि किती खावं ते सांगता येईल का? वरचा प्लॅन्क नावाचा जो व्यायाम प्रकार आहे त्याने पोट कमी होईल का? अगदि सीक्स पॅक्स नाहि पण निदान थोडं तरी?
27 Nov 2013 - 6:37 am | वेल्लाभट
तसं नाही म्हणता येणार.
प्लॅन्क हा आयसोमेट्रिक एक्सरसाइज आहे, ज्यात आपण वर दिलेली स्थिती ३० सेकंद - १ मिनिटं होल्ड करून ठेवायची असते. यामुळे कोअर मसल्सना ताकद येते. हे कोअर मसल्स शरीराचा बॅलन्स राखणं, वजन उचलताना शरीराला भक्कमपणा देणं, इत्यादी अनेक कामं करतात. खूप महत्वाचे असे हे मसल्स आहेत. परंतु पोट कमी होण्यास एकमेव हा व्यायाम मदत करेल असं नाही. मुळात एकटं पोट कमी करण्याकडे विचारांची दिशा न ठेवता, सर्वांगी बारीक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की मग पोट आपोआप कमी होतं.
पोटावरील चरबी ही सर्वात जास्त स्टबर्न असते आणि फॅट कमी होण्याच्या प्रक्रियेत ती सर्वात शेवटी कमी होते.
सो, plank helps bigtime; but shouldnt be relied upon solely, to reduce belly fat.
27 Nov 2013 - 6:38 am | वेल्लाभट
प्लॅन्क नेमाने केलां, तर पुढे क्रन्चेस, डिप्स बेन्च प्रेस, डेड लिफ्ट या सगळ्या प्रकारात मदत होत जाते.
26 Nov 2013 - 8:32 pm | उपास
मी गेले तीन महिने नियमित (आठवड्यातून चार वेळा) एच आय सी टी (हाय इंटेंसिटी सर्किट ट्रेनिंग) करतोय. चांगलाच फायदा जाणवतोय -
मुख्य फायदे -
१. संपूर्ण शरिराला व्यायाम
२. थोड्यावेळात तुलनेने जास्त कॅलरीज जळतात
३. कुठलेही साधन न वापरता केवळ शरिराच्या वजनाचा वापर करुन स्नायू बळकट करता येतात, फॅट बर्न करता येते
४. कुठेही (अगदी घरी/ गॅलरित) करता येण्यासारखे प्रकार, तसेच कुणाच्याही मदतिशिवाय
सावधाबता -
१. व्यायाम प्रकार सुरु करण्यापूर्वी किमान पाच मिनिटांचा व्यवस्थित वॉर्मवर आवश्यक
२. व्यायाम पूर्ण झाल्यावर स्ट्रेचिंग फायद्याचे
३. जर व्यायालाचे रिझ्ल्ट दिसायला हवे असतिल तर खाण्यावर ताबा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा!
अॅप्स
मी एच आय सी टी साठी अॅप स्टॉअर वरचे "सेव्हन" हे फ्री अॅप वापरतोय, सात मिनिटांचे बारा व्यायाम प्रकारांच हे एक सर्किट आहे, त्यातिल व्यायाम प्रकार खालीलप्रमाणे -
1. Jumping Jacks
2. Wall sit
3. Push ups
4. Crunches
5. Step ups
6. Squats
7. Triceps dips
8. Plank
9. High knees running
10.Lunges
11.Push ups with rotation
12. Side plank
वेल्लाभट धाग्यासाठी धन्यवाद!
26 Nov 2013 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
३. जर व्यायालाचे रिझ्ल्ट दिसायला हवे असतिल तर खाण्यावर ताबा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा!
यासाठी खालील व्यायामप्रकार करा:
१. काहीही खाताना पहिल्यांदा योग्य इतकेच वाढून घ्या.
२. स्वत: अथवा इतर कोणी केलेल्या दुसर्या वाढपाच्या वेळी स्वतःची हनुवटी स्वतःच्या एका खांद्यापासून दुसर्या खांद्यापर्यंत कमीत कमी तीनदा तरी फिरवा... गरज पडल्यास आवश्यक तेवढ्या जास्त वेळेस.
हमखास फायदा होतो :)
27 Nov 2013 - 9:57 am | सुबोध खरे
केवळ खाण्यावर ताबा ठेवून मी गेली २३ वर्षे माझे वजन ताब्यात ठेवलेले आहे. आजचे वजन ६७ किलो उंची (५ फूट १० इंच). आतापर्यंत जास्तीत जास्त वजन ६८ किलो आणि कमीत कमी वजन ३ किलो जन्मतः
26 Nov 2013 - 10:16 pm | रेवती
छान धागा.
27 Nov 2013 - 1:26 pm | इष्टुर फाकडा
गेल्या चार दिवसांपासून सुरुवात केली आहे… जबर्या प्लान आहे धन्स वेल्ला !
गेले सहा महिने व्यायामात खंड पडलेला आहे आणि अजून तीन महिने जिम ला जाने शक्य नाही त्यामुळे माझ्यासाठी हे घरीच करणे आदर्शवत आहे.
असो, आज काही भर टाकली-
१. पुश अप्स च्या जागी घरच्या बर वर चीन अप्स.
२. नुसत्या प्लान्क्स ऐवजी मुव्हिंग प्लान्क्स.
३. लंजेस पाच किलोचे डम्बेल्स घेऊन.
दुप्पट घाम निघाला…. हेच अजून तीन महिने सुरु ठेवेन अशी इच्छा आहे. हे वजन कमी व्हावे हि तो वेल्लूंची इच्छा ;)
27 Nov 2013 - 1:55 pm | वेल्लाभट
वेल बिगन इज हाफ डन ! चालूदे जोमाने !
27 Nov 2013 - 1:56 pm | वेल्लाभट
तीनही अॅडिशन्स स्वागतार्ह केल्यात तुम्ही. ग्रेट.
27 Nov 2013 - 3:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
सगळ्यांना कामाला लावले या वेल्लाभटाने
चार दिवस रोज सकाळी अर्धातास लवकर उठतोय . हळुहळु वाढवत नेला व्यायाम.
आज सकाळी थोडासा वॉर्म अप, ८ सुर्यनमस्कार, २०० दोरी उड्या, १० + १० + १० बैठका व सोसायटीला चालत ३ राउंड ( १ राउंड साधारण ८०० मिटर) (चालण्या सोबत अपोआप होणारा डोळ्यांचा व्यायाम वेगळा ;-) ;) ^_~ .
अनावश्यक खाण्यावर आपोआप ताबा मिळाल्या सारखा वाटतो आहे. पण त्या बद्दल सध्या नो कॉमेंट्स.
आजपासुन संध्याकाळी पण थोडा चालणार आहे.
सुरुवात तर चांगली झाली आता सातत्य राखणे जमले पाहिजे.
27 Nov 2013 - 7:20 pm | वेल्लाभट
:) वा वा! कीप इट अप!
27 Nov 2013 - 5:21 pm | उपास
आता प्रत्येकाची प्रोग्रेस ट्रॅकिंग सामूहिक रीत्या करता आली तर उत्तम.. तुमचे अनुभव किंवा शंका इथे विचारल्यात तर चर्चेतून उत्तर द्यायचा प्रयत्न करु सगळेच.
मी आयफोन अॅप वापरतोय पण तत्सम अॅन्ड्रॉईड अॅप
व्यायामाच्या लेव्हल्स असतात किती वेळ व्यायाम करायचा हा प्रश्न प्रत्येक व्यक्तिच्या प्रकृतीनुसार बदलणार त्यामुळे Perceived Exertion Scale हा प्रकार समजावून घेणे उपयुक्त ठरते. तुमच्या शरिराला झेपेल पण त्याचवेळी स्नायूंना चॅलेंज केले जाईल इतपत व्यायाम हवा, म्हणजे नेमके किती तर ह्या स्केल वर तपासून पहा -
•Level 1: I'm watching TV and eating bon bons
•Level 2: I'm comfortable and could maintain this pace all day long
•Level 3: I'm still comfortable, but am breathing a bit harder
•Level 4: I'm sweating a little, but feel good and can carry on a conversation effortlessly
•Level 5: I'm just above comfortable, am sweating more and can still talk easily
•Level 6: I can still talk, but am slightly breathless
•Level 7: I can still talk, but I don't really want to. I'm sweating like a pig
•Level 8: I can grunt in response to your questions and can only keep this pace for a short time period
•Level 9: I am probably going to die
•Level 10: I am dead
लक्षात घ्या, कुठल्याही व्यायामात आपल्याला १० वर राहयचं नाही पण ९ पर्यंत जाऊन यायचय, ८-९ पर्यंत हमखास पोहोचायच. जेव्हा तुम्ही व्यायाम करु लागता तेव्हा कुठल्या स्केल वर आहात हे लक्षात घेत चला आणि जस जसा शरीराला सराव होईल व्यायामाचा तशी स्केल वाढवत चला, अर्थात घाई नकोच.
पुपे, सपाट्या जबरदस्त व्यायाम आहेच पण उडी मारताना शरिराचा बॅलन्स सांभाळणे आणि इजा होणार नाही हे बघणे महत्त्वाचे, छान उपक्रम!
27 Nov 2013 - 7:00 pm | विजुभाऊ
आठवड्यातून तीन वेळा सेक्स हा देखील एक योग्य कार्डीओव्हस्क्युलर व्यायाम आहे. असे वाचून आहे. तज्ञानी खुलासा करावा
27 Nov 2013 - 7:07 pm | टवाळ कार्टा
;)
27 Nov 2013 - 8:07 pm | प्रभाकर पेठकर
गप झोपा तिकडे भिंतीकडे तोंड करून. आलेत मोठे कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम करणारे.
28 Nov 2013 - 10:18 am | टवाळ कार्टा
आम्ही गेमाडपंथी नाही :P
28 Nov 2013 - 5:40 pm | विजुभाऊ
हाण्ण तेच्या........ छप्पर फाड प्रतिसाद.
अनुभवी लोकच अशी प्रतिक्रीया देउ शकतात. ;)
29 Nov 2013 - 1:51 pm | सुबोध खरे
सेक्स मध्ये एका वेळेस साधारण शंभर ( ते एकशे पंचवीस) कैलरी जळतात. एका आठवड्यात तीन वेळा सेक्स केल्यास फारतर साडे तीनशे कैलरी जळतील. सेक्स हे व्यायामासाठी करतात?. आपल्या आनंदासाठी जी गोष्ट करतो त्याला समर्थन लागते का?मुळात सेक्स चे बाकी इतर बरेच फायदे आहेत जसे तुमच्या सर्व शरीराचे रक्ताभिसरण सुधारते, प्रतिकार शक्तीला तजेला मिळतो, त्वचेला उजाळा मिळतो(होय, हे सत्य आहे) आणि आठवड्यात तीन वेळा सेक्स केल्यास आपली त्वचा नक्कीच जास्त तरुण राहते. इतके फायदे आहेत तर समर्थनाची गरज आहे का?
थोडेसे विषयांतर --सेक्स बद्दल असे म्हणतात. SEX AFTER MARRIAGE – ONCE A DAY IN FIRST THREE YEARS, ONCE IN TWO DAYS IN NEXT THREE YEARS, TRI WEEKLY FOR NEXT TEN YEARS, TRY WEEKLY FOR NEXT TEN YEARS AND TRY WEAKLY THEREAFTER.
29 Nov 2013 - 2:55 pm | टवाळ कार्टा
डॉक्टरांचा सल्ला ;)
(ह.घे.)
27 Nov 2013 - 7:47 pm | रेवती
आज व्यायाम चुकवीन म्हटलं तर या धाग्यानं पंचाईत केलीये.