तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये.
डाव खेळून बघता येईल.
Play Online Chess[Event "Anand-Carlsen World Championship"][Site "Chennai, India"][Date "2013.11.12"][Round "3"][White "Magnus Carlsen"][Black "Viswanathan Anand"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2870"][BlackELO "2775"]%Created by Caissa's Web PGN Editor1. Nf3 d5 2. g3 g6 3. c4 dxc4 4. Qa4+ Nc6 5. Bg2 Bg7 6. Nc3 e5 7. Qxc4 Nge78. O-O O-O 9. d3 h6 10. Bd2 Nd4 11. Nxd4 exd4 12. Ne4 c6 13. Bb4 Be6 14. Qc1Bd5 15. a4 b6 16. Bxe7 Qxe7 17. a5 Rab8 18. Re1 Rfc8 19. axb6 axb6 20. Qf4Rd8 21. h4 Kh7 22. Nd2 Be5 23. Qg4 h5 24. Qh3 Be6 25. Qh1 c5 26. Ne4 Kg7 27.Ng5 b5 28. e3 dxe3 29. Rxe3 Bd4 30. Re2 c4 31. Nxe6+ fxe6 32. Be4 cxd3 33.Rd2 Qb4 34. Rad1 Bxb2 35. Qf3 Bf6 36. Rxd3 Rxd3 37. Rxd3 Rd8 38. Rxd8 Bxd839. Bd3 Qd4 40. Bxb5 Qf6 41. Qb7+ Be7 42. Kg2 g5 43. hxg5 Qxg5 44. Bc4 h4 45.Qc7 hxg3 46. Qxg3 e5 47. Kf3 Qxg3+ 48. fxg3 Bc5 49. Ke4 Bd4 50. Kf5 Bf2 51.Kxe5 Bxg3+ 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384318664").value=document.getElementById("cwvpg_1384318664").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384318664").submit();
आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:)
http://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVD...
प्रतिक्रिया
12 Nov 2013 - 3:22 pm | रमताराम
दरवेळी नवी ओपनिंग करण्याच्या आपल्या परंपरेला छेद देऊन कार्लसनने पहिल्या सामन्यातील रेटी'चाचा वापर केलाय. त्याने ऑफर केलेले सी प्यादे चटकन स्वीकारून आनंदने त्याला थोडा गोंधळात टाकलाय. वजीराला पुढे आणून आनंदचे प्यादे टप्प्यात राखून कार्लसनने पॉप्युलर पद्धतीकडे डाव वळवलाय.
12 Nov 2013 - 3:24 pm | चतुरंग
आंतर्जालावर तुमचं स्वागत आहे! :)
रं.गा. पंडित
12 Nov 2013 - 3:23 pm | चतुरंग
दोघांचं एकेक प्यादं गेलंय. मोहोरी विकसित होताहेत
12 Nov 2013 - 3:25 pm | प्रचेतस
मस्त.
मजा यायला लागलीय समालोचन वाचायला.
12 Nov 2013 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय आणि पाहतोय. :)
-दिलीप बिरुटे
12 Nov 2013 - 3:26 pm | चतुरंग
कार्लसनकडे बघून त्याच्या प्रतिक्रियांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतोय! एरवी फार क्वचित तो मला असा दिसलाय.
दोघांचे किल्लेकोट झाले. राजाच्याच बाजूला झालेत.
12 Nov 2013 - 3:28 pm | प्रसाद गोडबोले
स्लो ...लेन्दी गेम्स अगैन !!
12 Nov 2013 - 3:29 pm | चतुरंग
सी१ वरुन जी ५ वरती घेऊन वजिरापुढचा घोडा पिन करायचा विचार आहे असे वाटते.
आनंद कार्लसनच्या वजिरावर हल्ला करेल का काही दुसरे खेळेल?
12 Nov 2013 - 3:38 pm | सुहासदवन
बिशप ला पुढे नेउन
मग बिशप टू बिशप एक्सचेंज आणि नंतर चेक
12 Nov 2013 - 3:31 pm | चतुरंग
जी५ वरती येऊ बघणार्या उंटाला किंवा घोड्याला रोखले
12 Nov 2013 - 3:35 pm | केदार-मिसळपाव
उंटाला रोखले.
पहिलीच वेळ आहे धावते बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा बघण्याची..
12 Nov 2013 - 3:34 pm | चतुरंग
बी ई ६ असेल बहुदा पांढर्या वजिराला हाकलून लावायला. आता कार्लसन काय खेळतोय?
उंटाची प्रगती करायला त्याला दोन वाटा आहेत. बी डी २ किंवा बी प्यादे सरकवून कर्णातून उंट काढ्णे (ती शक्यता मला कमी वाटते कारण प्याद्याची एक मूव वाया जाते.)
12 Nov 2013 - 3:39 pm | चतुरंग
जाणवलेला म्हणजे कोणीच पाणी, ज्यूस, चहा/कॉफी इ. चे ग्लास त्यांच्या टेबलावर आणलेले दिसत नाहीये.
फक्त ब्रेकरुमला जाऊनच ते घ्यायचे आहे की काय? असा काही नियम झाल्याचे ऐकले नाहीये.
12 Nov 2013 - 3:44 pm | केदार-मिसळपाव
बी-डी२ खेळला की कार्ल्सन..
12 Nov 2013 - 3:45 pm | रमताराम
फक्त ब्रेकरुमला जाऊनच ते घ्यायचे आहे की काय? >> नाही. परवा आनंदचा फेवरिट ग्रीन टी आला होता त्याच्या साठी.
12 Nov 2013 - 3:48 pm | चतुरंग
मग हरकत नाही. माझ्या नजरेतून सुटला.
12 Nov 2013 - 3:41 pm | प्रचेतस
जीवघेणा वेळ लावतोय कार्लसन.
बाकी मागच्या स्पॉन्सरशिप बोर्डावर जयललिताचा फोटू बघून डोळे पाणावलेत.
12 Nov 2013 - 3:43 pm | प्रसाद गोडबोले
+१
=))
12 Nov 2013 - 3:44 pm | चतुरंग
जयललिथा नाही! तंबी!! :)
12 Nov 2013 - 3:45 pm | प्रचेतस
=))
अगदी अगदी.
12 Nov 2013 - 4:46 pm | बॅटमॅन
तंबी देणे हा वाक्प्रचार अशातूनच आला असेल काय ;)
12 Nov 2013 - 3:42 pm | चतुरंग
कार्लसनचा उंट पुढे सरकला. आता बहुदा बी ई६ खेळणार आनंद, मग वजीर ए ४ असा वजीर मागे जाईल का?
12 Nov 2013 - 3:44 pm | प्रसाद गोडबोले
बी ई ६
मलाही हेच वाटत आहे
12 Nov 2013 - 3:43 pm | आनन्दा
आत आनंद त्याला सांगत असेल "मजा आली की नाही" :) आमच्या पँट्री सारखे..
12 Nov 2013 - 3:45 pm | चतुरंग
काँएंटरीत सहभागी झालेले बघून अतिशय आनंद झालाय. सगळ्यांचे स्वागत आहे!
12 Nov 2013 - 3:47 pm | सुहासदवन
आम्हा सगळ्यांना ह्या खेळाकडे वळविण्याच
12 Nov 2013 - 3:47 pm | चतुरंग
कपाळाला गंध लावले आहे का? तुम्हाला कोणाला दिसतंय का मलाच दिसतंय?
12 Nov 2013 - 3:52 pm | रमताराम
बरेचदा असते, दिसेल न दिसेल असे. छेन्नैचा अन्नाए तो.
12 Nov 2013 - 4:00 pm | चतुरंग
आणि श्रद्धाळू आहे. तो मन शांत करण्यासाठी त्याची प्रार्थना सुद्धा म्हणतो!
रंगमुरुगन
12 Nov 2013 - 3:49 pm | केदार-मिसळपाव
आता मार लेका घोडा.. मुख्य घोडा गेला तर पुढे आक्रमण कसा करशिल?
12 Nov 2013 - 3:50 pm | केदार-मिसळपाव
घोडा मारला तर वजीरावजीर्..प्यादे शाबुत... ह्म्म्म
12 Nov 2013 - 3:49 pm | रमताराम
आनंदचे ई-५ प्यादे मस्त बसले आहे. त्याला सपोर्ट न देण्याचा निर्णय घेऊन आनंदने कार्लसनला ते घेण्यात एक मूव दवडण्याचे आव्हान दिले आहे. नाही घेतले तर कार्लसनचे काही मोहर्यांच्या हालचालीवर मर्यादा पडतात. टु बी ऑर नॉट टु बी.
12 Nov 2013 - 3:51 pm | चतुरंग
घोडा उडी मारुन डी४ वर टाकलान की. आनंद आक्रमक खेळतोय. आता घोड्यांची मारामारी होईल का? पंढर्या वजिराला अजूनत्री त्याने दुर्लक्षित केले आहे. आनंदचा काहीतरी टॅक्टिकल डाव दिसतोय मला!
12 Nov 2013 - 3:55 pm | रमताराम
ई पट्टीतले प्यादे घोड्यांच्या मारामारीनंतर एक फळी पुढेही सरकते आणि वजीराच्या पाठिंब्याखाली येते. म्हणजे मागची प्यादी न हलवता हे प्यादे वाचलेच पण आणखी एक फळी पुढे जात कार्लसनची डोकेदुखी आणखी वाढवते. ते लवकरात लवकर उचलणे त्याला अत्यावश्यक होऊन बसते. दुर्लक्ष केलेले प्यादे अचानक महत्त्वाचे होऊन बसते.
12 Nov 2013 - 4:05 pm | चतुरंग
शिवाय त्या प्याद्याने डी प्याद्याचा मार्ग रोखला शिवाय आता पांढरा घोडा ई४ वर आल्याने ई प्यादे सुद्धा काहीकाळ मागासलेले ठेवावे लागणार कार्लसनला.
12 Nov 2013 - 4:05 pm | रमताराम
हे प्यादे खूपच कामात येणार. जी-७ मधला उंटाच्या कर्णात असल्याने भक्कम तर बसलेच पण त्याच बरोबर उंटाचा कर्ण मोकळा करण्याचे स्वातंत्र्य आता आनंदकडेच असणार आहे. पुढील पटावर हे प्यादे पुढे टाकून प्याद्याने एका मोहर्यावर नि उंटाने दुसर्या मोहर्यावर मोर्चा लावण्याची परिस्थिती निर्माण करणे त्याला शक्य होईल.
12 Nov 2013 - 3:51 pm | प्रसाद गोडबोले
हायला ही तानिया माझ्यापेक्षाही लहान आहे ...
http://en.wikipedia.org/wiki/Tania_Sachdev
चला परत एकदा कॉम्पीटेटीव्ह् चेस मधे उतरायला इन्सेन्टीव्ह मिळाला ;)
12 Nov 2013 - 3:55 pm | चतुरंग
घ्या भाग घ्या! ;)
रंगा सचदेव
12 Nov 2013 - 3:51 pm | अविनाश पांढरकर
पहिलीच वेळ आहे धावते बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा बघण्याची..
12 Nov 2013 - 3:52 pm | प्रचेतस
घोड्याची चाल करून कार्लसनला गोंधळात पाडलेले दिसतेय आनंदने.
12 Nov 2013 - 3:54 pm | प्रसाद गोडबोले
नाईट नाईट कॅन्सलेशन मग वजीरावजीरी झाली तर परत डाव ड्रॉ कडे सरकेल ...
12 Nov 2013 - 3:59 pm | प्रसाद गोडबोले
आनंदने वजीरावजीरी केली नाही !!
आनंद इस लुकिंग फॉर विन ...आय गेस्स
12 Nov 2013 - 3:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्लसन सारखं डोकं धरुन बसतो. वरीजनल आनंदच्या खेळीचं ओझं असेल का त्याला ?
-दिलीप बिरुटे
12 Nov 2013 - 3:56 pm | चतुरंग
डोक्यात अनेक डाव सुरु असतात त्यांच्या. एकाच वेळी साधारण पाचपन्नास डावांचे अॅनालिसिस एकेका खेळीसाठी सुरु असते.
12 Nov 2013 - 3:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
-दिलीप बिरुटे
12 Nov 2013 - 3:53 pm | केदार-मिसळपाव
कार्ल्सन च्या वजीरावर हल्ला करणार कि काय आनंद?
12 Nov 2013 - 3:54 pm | चतुरंग
दोघांनी १० खेळ्यांना साधारण २३ मिनिटे प्रत्येकी घेतली आहेत.
12 Nov 2013 - 3:58 pm | चतुरंग
कार्लसनने. प्याद्याने घोडा घेतला. छान आता घोडा हलवणे भाग आहे बहुदा ई४ वरती. आणि मग आनंद बहुदा उंट बाहेर आणेल ई ६ वरती.
12 Nov 2013 - 3:59 pm | केदार-मिसळपाव
पन प्यादे पुढे?
12 Nov 2013 - 4:03 pm | चतुरंग
मला सामना बघताना एवढी प्रचंड उत्सुकता कधी वाटली नव्हती. आनंद्-टोपलोव किंवा आनंद्-गेल्फंड्च्या वेळी सुद्धा!
यावेळी मात्र मी जाम उत्सुक आहे.
12 Nov 2013 - 4:05 pm | प्रसाद गोडबोले
सी७ वीकनेस आहे ... आर सी १ नंतर कार्ल्याला ओपन फाईल्चे अॅडव्हान्टेज मिळेल ...
12 Nov 2013 - 4:08 pm | केदार-मिसळपाव
बहुतेक बी-सी तले प्यादे हलवावे कि कार्ल्सन चा वजीर हलवावा त्याचा विचार करत असेल कारण आता कार्ल्सन चा हत्ती हालचाल करणार..
12 Nov 2013 - 4:07 pm | चतुरंग
दोघांनी आज डाव निकाली काढायचा चंग बांधलाय की नाही ते अजून तीन चार खेळ्यात समजेल असे वाटते.
12 Nov 2013 - 4:07 pm | सुहासदवन
आनंद तिचाच फायदा घेण्याचा विचार करत आहे
पुढचा हल्ला बिशपचा
12 Nov 2013 - 4:12 pm | चतुरंग
खेळला आनंद. वजीर सी १ मधे आणून एच ६ प्याद्यावर हल्ला करेल का? आनंदला त्याचा पांढरा उंट आणि वजीर चटकन पुढे आणून हत्तींचा समन्वय करावा लागेल. मॅग्नुसला काँप्लिकेटेड पोझीशन्स आवडतात कारण तो पोझीशनल खेळतो. आनंद टॅक्टिकल खेळतो पण तोही काँप्लिकेटेड पोझीशन्स खेळण्यात वाकबगार आहे.
12 Nov 2013 - 4:15 pm | रमताराम
मॅग्नस काही अनपेक्षित खेळला नाही (बहुधा वजीर पहिल्या फळीत परत जाईल) तर आता आनंदचा उंट ई-६ मधे येऊन बसेल. जेणेकरून मागचा घोडा पुढे दामटणे शक्य होईल. दोन्ही मूव जमल्या तर मध्यपटावर आनंदचे वर्चस्व निर्माण होईल.
12 Nov 2013 - 4:17 pm | रमताराम
आनंदचा घोडा दाबला कार्लसनने. तरीही ई-६च होईल बहुधा वजीर नि हत्तींना मोकळे करणे गरजेचे आहे आता.
12 Nov 2013 - 4:20 pm | केदार-मिसळपाव
वाटतेय खरे..
12 Nov 2013 - 4:13 pm | केदार-मिसळपाव
कि अजुन काही वेगळी चाल?
12 Nov 2013 - 4:15 pm | केदार-मिसळपाव
बहुधा हत्ती हालवेल..
12 Nov 2013 - 4:17 pm | आतिवास
बाकी चेसबाबतची चॅट रुममध्ये (इतरत्र) चालू असलेली चर्चा कंटाळवाणी आहे. मला वाटायचं असल्या चर्चांचा मक्ता फक्त तथाकथित क्रिकेटप्रेमींकडे आहे :-)
12 Nov 2013 - 4:20 pm | चतुरंग
नाही नाही, असे मक्तेदार सगळीकडे असतात. कणेकरांच्या म्हणण्याप्रमाणे लोकशाही असल्याने सगळ्यांना क्रिकेटमधलं सगळं कळतं असं चेसमधे सुद्धा आहे! "अरे जरा चान्स मिळायचा अवकाश की मी आनंद झालोच असतो रे!" टाईप पब्लिक खूप असते! :)
12 Nov 2013 - 4:18 pm | प्रचेतस
कार्लसन परत ब्रेक घेऊन पळाला.
12 Nov 2013 - 4:18 pm | चतुरंग
बी ४. घोडा हत्तीला पिन केलाय्.आता हत्ती ई ८ घेतला तर पांढरा घोडा डी ६ येऊन त्याच्यावर हल्ला करेल त्यामुळे आता बहुदा उंट ई६ वर घेऊन पांढर्या वजिराला हाकलून लावेल आनंद.
12 Nov 2013 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उंट ई६
-दिलीप बिरुटे
12 Nov 2013 - 4:22 pm | रमताराम
आताची ट्विट कोणी ऐकली का? एल-साल्वादोर मधे लोक लाईव 'ऐकताहेत'. feeling awesome
12 Nov 2013 - 4:23 pm | रमताराम
आताची ट्विट ऐकली का. लोक एल-साल्वादोर मधे लोक लाईव प्रोग्रॅम 'ऐकताहेत'. हॅट्स ऑफ गाईज.
12 Nov 2013 - 4:29 pm | चतुरंग
यावेळी आंतरजालाने या गेमला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. भारतीय बुद्धीबळ महासंघाचे मला कौतुक करायचे आहे!!
त्यांनी ही इवेंट चांगली मॅनेज केली आहे.
12 Nov 2013 - 4:23 pm | चतुरंग
आता वजीर बहुदा सी २ ला जाणार. ओह, वजीर सी १ ला गेला.
12 Nov 2013 - 4:24 pm | राजो
सामना लाईव्ह कुठे पाहता येईल? लिंक द्या ना..
12 Nov 2013 - 4:25 pm | अविनाश पांढरकर
http://chennai2013.fide.com/fide-world-chess-championship-2013-live/
12 Nov 2013 - 4:26 pm | प्रचेतस
इथे बघा
http://www.gizmocrave.com/24043-fide-world-chess-championship-2013-live-...
12 Nov 2013 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
http://www.geekosystem.com/2013-chess-championship-live/
http://chessbomb.com/site/
12 Nov 2013 - 4:25 pm | चतुरंग
न करणे हा कार्लसनचा स्थायिभाव आहे, कारण त्याने प्रतिस्पर्ध्याच्या मनात गोंधळ वाढतो. परंतु आनंद तसा गोंधळून जाणारा नाही. वो कार्लसनका बारसा जेव्या है! ;)
12 Nov 2013 - 4:30 pm | रमताराम
रच्याकने बारशाला वाईन कुठली होती काही कल्पना आहे का हो?
12 Nov 2013 - 4:38 pm | चतुरंग
पण कार्लसन वाईनपेक्षा वोडकावर पोसलेला असावा! ;)
12 Nov 2013 - 4:27 pm | चतुरंग
जरा चमत्कारिक खेळी आहे पण उंटाला हाकलून लावणे गरजेचे वाटते आहे
12 Nov 2013 - 4:35 pm | विनायक प्रभू
सामने सुरु झाले की इतर कामे बंद का?
12 Nov 2013 - 4:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुठं आहात तुमची मला कालच आठवण आली होती.
कोणी तरी तुमच्या समुपदेशन लेखनाचं कौतुक करत होतं. :)
दिलीप बिरुटे
12 Nov 2013 - 4:36 pm | चतुरंग
आनंदने उंट डावाच्या मध्यात आणला डी५! आता कार्लसन काय खेळतोय? वजीर एफ ४ ला आला तर राजाच्या बाजूला प्रेशर वाढेल. आनंद पुढची खेळी एफ ५ करुन पांढर्या घोड्यावर हल्ला करेल. जेणेकरुन घोडा तिथून हल्ला की पांढर्या उंटांची मारामारी घडवून आणायची असा आनंदचा डाव असावा!
12 Nov 2013 - 4:41 pm | केदार-मिसळपाव
घोडा कि ऊंट हा प्रश्ण आहे.
12 Nov 2013 - 4:43 pm | रमताराम
कार्लसन आल्रेडी माघारीच्या तयारीत? साहेब बरोबरीच्या शोधाला लागले की काय?
12 Nov 2013 - 4:45 pm | चतुरंग
कार्लसनने त्याच्या शिरस्त्याप्रमाणे प्यादी पुढे रेटायला सुरुवात केली! कारण तो जागा व्यापायला बघणार. आता आनंदने प्यादे ए ५ वर घेतले तर उंट ए३ असा मागे जाऊ शकेल, घोड्याची पिन तशीच ठेवायला.
12 Nov 2013 - 4:49 pm | रमताराम
पण ए प्यादे आधी पुढे गेल्याने बी प्यादे अडकले (शिवाय आनंदचा जी पट्टीतला उंट कर्णात बसल्याने ते तसेही जरा नाजूक आहे जोवर हत्ती हलत नाही तोवर). आनंदचा उंट त्याला पुढे येऊ देणार नाही. म्हणजे फक्त ए प्यादेच विकसित होऊ शकते आहेत या क्षणी. फारसे कामात येईलसे वाटत नाही. याउलट मध्यभागी बस्तान बसवलेला आनंद आता.
12 Nov 2013 - 4:51 pm | अनुप ढेरे
ड्रॉ चा प्रस्ताव कधी देता येतो याला काही नियम आहेत का? का कधीही दोघांनी हो म्हटलं तर ड्रॉ?
12 Nov 2013 - 4:53 pm | चतुरंग
पण या स्थितीत ड्रॉ व्हायची शक्यता नाहीये.
12 Nov 2013 - 4:52 pm | चतुरंग
प्लॅन अजूनही क्लिअर होत नाहीये! बी६ खेळला आनंद.
12 Nov 2013 - 4:55 pm | प्रचेतस
कोणाची बाजू किंचीत वरचढ आहे, काही अंदाज?
12 Nov 2013 - 4:55 pm | रमताराम
कार्लसन बाबा ड्रॉ साठी खेळायला लागले. उंटाने घोडा घेतला आणि ए-५ खेळून हत्ती एक्सेंच करण्याचा प्रयत्न चालू आहे.
12 Nov 2013 - 4:57 pm | रमताराम
बी-५ खेळून प्याद्यांची मारामारी टाळू शकत नाही. कारण मग कार्लसन घोडा पुढे काढून उंट एक्स्चेंज करेल नि आनंदचे सी प्यादे उघडे पडेल.