Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 15:20
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्‍या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये. डाव खेळून बघता येईल.
Play Online Chess
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.12"]
[Round "3"]
[White "Magnus Carlsen"]
[Black "Viswanathan Anand"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2870"]
[BlackELO "2775"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. Nf3 d5 2. g3 g6 3. c4 dxc4 4. Qa4+ Nc6 5. Bg2 Bg7 6. Nc3 e5 7. Qxc4 Nge7
8. O-O O-O 9. d3 h6 10. Bd2 Nd4 11. Nxd4 exd4 12. Ne4 c6 13. Bb4 Be6 14. Qc1
Bd5 15. a4 b6 16. Bxe7 Qxe7 17. a5 Rab8 18. Re1 Rfc8 19. axb6 axb6 20. Qf4
Rd8 21. h4 Kh7 22. Nd2 Be5 23. Qg4 h5 24. Qh3 Be6 25. Qh1 c5 26. Ne4 Kg7 27.
Ng5 b5 28. e3 dxe3 29. Rxe3 Bd4 30. Re2 c4 31. Nxe6+ fxe6 32. Be4 cxd3 33.
Rd2 Qb4 34. Rad1 Bxb2 35. Qf3 Bf6 36. Rxd3 Rxd3 37. Rxd3 Rd8 38. Rxd8 Bxd8
39. Bd3 Qd4 40. Bxb5 Qf6 41. Qb7+ Be7 42. Kg2 g5 43. hxg5 Qxg5 44. Bc4 h4 45.
Qc7 hxg3 46. Qxg3 e5 47. Kf3 Qxg3+ 48. fxg3 Bc5 49. Ke4 Bd4 50. Kf5 Bf2 51.
Kxe5 Bxg3+ 1/2-1/2
आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:) http://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVDWyKU2arBvR&index=1
  • Log in or register to post comments
  • 35740 views

Book traversal links for आनंद - कार्लसन डाव - ३

  • ‹ आनंद - कार्लसन - डाव २
  • Up
  • आनंद - कार्लसन डाव ५ ›

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 11/12/2013 - 16:05

Permalink

सी७

सी७ वीकनेस आहे ... आर सी १ नंतर कार्ल्याला ओपन फाईल्चे अ‍ॅडव्हान्टेज मिळेल ...
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Tue, 11/12/2013 - 16:08

In reply to सी७ by प्रसाद गोडबोले

Permalink

आनंद

बहुतेक बी-सी तले प्यादे हलवावे कि कार्ल्सन चा वजीर हलवावा त्याचा विचार करत असेल कारण आता कार्ल्सन चा हत्ती हालचाल करणार..
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:07

Permalink

मागल्या दोन्ही डावात काँप्लिकेशन्स टाळलेल्या

दोघांनी आज डाव निकाली काढायचा चंग बांधलाय की नाही ते अजून तीन चार खेळ्यात समजेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहासदवन on Tue, 11/12/2013 - 16:07

Permalink

कार्ल्सनच्या पटावर एक बाजू पूर्णपणे कमजोर आहे

आनंद तिचाच फायदा घेण्याचा विचार करत आहे पुढचा हल्ला बिशपचा
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:12

Permalink

सी ६

खेळला आनंद. वजीर सी १ मधे आणून एच ६ प्याद्यावर हल्ला करेल का? आनंदला त्याचा पांढरा उंट आणि वजीर चटकन पुढे आणून हत्तींचा समन्वय करावा लागेल. मॅग्नुसला काँप्लिकेटेड पोझीशन्स आवडतात कारण तो पोझीशनल खेळतो. आनंद टॅक्टिकल खेळतो पण तोही काँप्लिकेटेड पोझीशन्स खेळण्यात वाकबगार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:15

In reply to सी ६ by चतुरंग

Permalink

जर

मॅग्नस काही अनपेक्षित खेळला नाही (बहुधा वजीर पहिल्या फळीत परत जाईल) तर आता आनंदचा उंट ई-६ मधे येऊन बसेल. जेणेकरून मागचा घोडा पुढे दामटणे शक्य होईल. दोन्ही मूव जमल्या तर मध्यपटावर आनंदचे वर्चस्व निर्माण होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:17

In reply to जर by रमताराम

Permalink

दाबला

आनंदचा घोडा दाबला कार्लसनने. तरीही ई-६च होईल बहुधा वजीर नि हत्तींना मोकळे करणे गरजेचे आहे आता.
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Tue, 11/12/2013 - 16:20

In reply to दाबला by रमताराम

Permalink

इ६

वाटतेय खरे..
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Tue, 11/12/2013 - 16:13

Permalink

इ-सी ३?

कि अजुन काही वेगळी चाल?
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Tue, 11/12/2013 - 16:15

In reply to इ-सी ३? by केदार-मिसळपाव

Permalink

नाय..

बहुधा हत्ती हालवेल..
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Tue, 11/12/2013 - 16:17

Permalink

बाकी चेसबाबतची चॅट रुममध्ये

बाकी चेसबाबतची चॅट रुममध्ये (इतरत्र) चालू असलेली चर्चा कंटाळवाणी आहे. मला वाटायचं असल्या चर्चांचा मक्ता फक्त तथाकथित क्रिकेटप्रेमींकडे आहे :-)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:20

In reply to बाकी चेसबाबतची चॅट रुममध्ये by आतिवास

Permalink

हा हा!

नाही नाही, असे मक्तेदार सगळीकडे असतात. कणेकरांच्या म्हणण्याप्रमाणे लोकशाही असल्याने सगळ्यांना क्रिकेटमधलं सगळं कळतं असं चेसमधे सुद्धा आहे! "अरे जरा चान्स मिळायचा अवकाश की मी आनंद झालोच असतो रे!" टाईप पब्लिक खूप असते! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/12/2013 - 16:18

Permalink

कार्लसन परत ब्रेक घेऊन पळाला.

कार्लसन परत ब्रेक घेऊन पळाला.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:18

Permalink

उंट आला पुढे

बी ४. घोडा हत्तीला पिन केलाय्.आता हत्ती ई ८ घेतला तर पांढरा घोडा डी ६ येऊन त्याच्यावर हल्ला करेल त्यामुळे आता बहुदा उंट ई६ वर घेऊन पांढर्‍या वजिराला हाकलून लावेल आनंद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 11/12/2013 - 16:20

In reply to उंट आला पुढे by चतुरंग

Permalink

उंट

उंट ई६ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:22

Permalink

अमेजिंग

आताची ट्विट कोणी ऐकली का? एल-साल्वादोर मधे लोक लाईव 'ऐकताहेत'. feeling awesome
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:23

In reply to अमेजिंग by रमताराम

Permalink

अरे हे काय रिकामा प्रतिसाद

आताची ट्विट ऐकली का. लोक एल-साल्वादोर मधे लोक लाईव प्रोग्रॅम 'ऐकताहेत'. हॅट्स ऑफ गाईज.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:29

In reply to अरे हे काय रिकामा प्रतिसाद by रमताराम

Permalink

हो हो!

यावेळी आंतरजालाने या गेमला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. भारतीय बुद्धीबळ महासंघाचे मला कौतुक करायचे आहे!! त्यांनी ही इवेंट चांगली मॅनेज केली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:23

Permalink

येस!

आता वजीर बहुदा सी २ ला जाणार. ओह, वजीर सी १ ला गेला.
  • Log in or register to post comments

Submitted by राजो on Tue, 11/12/2013 - 16:24

Permalink

सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?

सामना लाईव्ह कुठे पाहता येईल? लिंक द्या ना..
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश पांढरकर on Tue, 11/12/2013 - 16:25

In reply to सामना लाईव्ह कुठे पाहता येईल? by राजो

Permalink

http://chennai2013.fide.com/fide-world-chess-championship-2013-l

http://chennai2013.fide.com/fide-world-chess-championship-2013-live/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/12/2013 - 16:26

In reply to सामना लाईव्ह कुठे पाहता येईल? by राजो

Permalink

इथे बघाhttp://www.gizmocrave

इथे बघा http://www.gizmocrave.com/24043-fide-world-chess-championship-2013-live-viswanathan-anand-vs-magnus-carlsen-level-at-1-1/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 11/12/2013 - 16:26

In reply to सामना लाईव्ह कुठे पाहता येईल? by राजो

Permalink

लिंका

http://www.geekosystem.com/2013-chess-championship-live/ http://chessbomb.com/site/
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:25

Permalink

अपेक्षित खेळ्या

न करणे हा कार्लसनचा स्थायिभाव आहे, कारण त्याने प्रतिस्पर्ध्याच्या मनात गोंधळ वाढतो. परंतु आनंद तसा गोंधळून जाणारा नाही. वो कार्लसनका बारसा जेव्या है! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:30

In reply to अपेक्षित खेळ्या by चतुरंग

Permalink

करेक्टे

रच्याकने बारशाला वाईन कुठली होती काही कल्पना आहे का हो?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:38

In reply to करेक्टे by रमताराम

Permalink

नाय ब्वा!

पण कार्लसन वाईनपेक्षा वोडकावर पोसलेला असावा! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:27

Permalink

आता बहुदा आनंद ए ४ खेळेल का

जरा चमत्कारिक खेळी आहे पण उंटाला हाकलून लावणे गरजेचे वाटते आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Tue, 11/12/2013 - 16:35

Permalink

सुट्टी

सामने सुरु झाले की इतर कामे बंद का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 11/12/2013 - 16:54

In reply to सुट्टी by विनायक प्रभू

Permalink

ओ गुर्जी

कुठं आहात तुमची मला कालच आठवण आली होती. कोणी तरी तुमच्या समुपदेशन लेखनाचं कौतुक करत होतं. :) दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:36

Permalink

उत्तम!

आनंदने उंट डावाच्या मध्यात आणला डी५! आता कार्लसन काय खेळतोय? वजीर एफ ४ ला आला तर राजाच्या बाजूला प्रेशर वाढेल. आनंद पुढची खेळी एफ ५ करुन पांढर्‍या घोड्यावर हल्ला करेल. जेणेकरुन घोडा तिथून हल्ला की पांढर्‍या उंटांची मारामारी घडवून आणायची असा आनंदचा डाव असावा!
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Tue, 11/12/2013 - 16:41

In reply to उत्तम! by चतुरंग

Permalink

एकुण

घोडा कि ऊंट हा प्रश्ण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:43

Permalink

ए-४ !

कार्लसन आल्रेडी माघारीच्या तयारीत? साहेब बरोबरीच्या शोधाला लागले की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:45

Permalink

झालं

कार्लसनने त्याच्या शिरस्त्याप्रमाणे प्यादी पुढे रेटायला सुरुवात केली! कारण तो जागा व्यापायला बघणार. आता आनंदने प्यादे ए ५ वर घेतले तर उंट ए३ असा मागे जाऊ शकेल, घोड्याची पिन तशीच ठेवायला.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:49

In reply to झालं by चतुरंग

Permalink

बरोबर

पण ए प्यादे आधी पुढे गेल्याने बी प्यादे अडकले (शिवाय आनंदचा जी पट्टीतला उंट कर्णात बसल्याने ते तसेही जरा नाजूक आहे जोवर हत्ती हलत नाही तोवर). आनंदचा उंट त्याला पुढे येऊ देणार नाही. म्हणजे फक्त ए प्यादेच विकसित होऊ शकते आहेत या क्षणी. फारसे कामात येईलसे वाटत नाही. याउलट मध्यभागी बस्तान बसवलेला आनंद आता.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 11/12/2013 - 16:51

Permalink

ड्रॉ चा प्रस्ताव कधी देता

ड्रॉ चा प्रस्ताव कधी देता येतो याला काही नियम आहेत का? का कधीही दोघांनी हो म्हटलं तर ड्रॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:53

In reply to ड्रॉ चा प्रस्ताव कधी देता by अनुप ढेरे

Permalink

एकाने ड्रॉ विचारले आणि दुसर्‍याने हो म्हटले तर कधीही!

पण या स्थितीत ड्रॉ व्हायची शक्यता नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:52

Permalink

आनंदचा

प्लॅन अजूनही क्लिअर होत नाहीये! बी६ खेळला आनंद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/12/2013 - 16:55

In reply to आनंदचा by चतुरंग

Permalink

कोणाची बाजू किंचीत वरचढ आहे,

कोणाची बाजू किंचीत वरचढ आहे, काही अंदाज?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:55

Permalink

येस

कार्लसन बाबा ड्रॉ साठी खेळायला लागले. उंटाने घोडा घेतला आणि ए-५ खेळून हत्ती एक्सेंच करण्याचा प्रयत्न चालू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 16:57

In reply to येस by रमताराम

Permalink

आनंद

बी-५ खेळून प्याद्यांची मारामारी टाळू शकत नाही. कारण मग कार्लसन घोडा पुढे काढून उंट एक्स्चेंज करेल नि आनंदचे सी प्यादे उघडे पडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 17:02

In reply to आनंद by रमताराम

Permalink

हं तेही आहेच

एफ ५ खेळून घोडा हाकलला तर कसे?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:57

In reply to येस by रमताराम

Permalink

आनंदला खेळ पुढे चालू ठेवायला

बी ५ खेळून प्याद्यांची मारामारी टाळता येईल पण मग ए६ असे प्यादे सरकले तर अवघड आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:55

Permalink

प्याद्यांचा रोलरकोस्टर सुरु झाला का?

आता ए५ वरचे प्यादे मारले तर पांढरा हत्ती ए५ वर येणार आणि काळ्याचे ए आणि पांढर्‍यचे बी प्यादे आयसोलेटेड
  • Log in or register to post comments

Submitted by सुहासदवन on Tue, 11/12/2013 - 16:55

Permalink

ड्रों होणार बहुतेक

ड्रों
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 11/12/2013 - 16:56

Permalink

अता

आता एफ ५
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 16:58

In reply to अता by प्रसाद गोडबोले

Permalink

बरोबर

तसेच वाटते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 17:00

Permalink

एक क्रेझी मूव

आनंद वजीर बी-४ खेळून हत्तींची मारामारी टाळू शकतो. त्याचवेळी कार्लसनच्या घोड्याच्या डी-६ जागेवर लक्ष ठेवून राहू शकतो. पण बरोबरी करण्याची इच्छा दिसत असलेला कार्लसन वजीरावजीरी करेल.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 11/12/2013 - 17:06

In reply to एक क्रेझी मूव by रमताराम

Permalink

आहा

आता तर वजीर बी-४ ला यायलाच हवा. मग आनंदच बी पट्टीतले प्यादे कार्लसनच्या ए प्याद्याशी एक्स्चेंज करून हत्ती आणि वजीर कनेक्ट करू शकेल. सॉलिड फॉर्मेशन मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 11/12/2013 - 17:05

Permalink

हत्ती बी ८

आता बी ६ चे प्यादे मारले तर ए प्याद्याने पुन्हा मारुन सी ५ वरचे प्रेशर आनंद काय्म ठेअव्तो. त्यानंतर एफ ५ खेळला तर घोड्याला मागेच जायला लागते. कार्लसन ई १ खेळलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहासदवन on Tue, 11/12/2013 - 17:07

Permalink

कासलिंग

आणि हत्ती बाहेर
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com