आनंद - कार्लसन - डाव २

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
10 Nov 2013 - 3:29 pm

माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली!
असो डावाकडे वळतो.

बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे. कार्लसनने भलतीच तयारी केली आहे, त्याच्या घड्याळात १४ खेळ्यांसाठी केवळ ६ मिनिटे झाली आहेत!

Play Online Chess[Event "Anand-Carlsen World Championship"][Site "Chennai, India"][Date "2013.11.10"][Round "2"][White "Viswanathan Anand"][Black "Magnus Carlsen"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2775"][BlackELO "2870"]%Created by Caissa's Web PGN Editor1. e4 c6 2. d4 d5 3. Nc3 dxe4 4. Nxe4 Bf5 5. Ng3 Bg6 6. h4 h6 7. Nf3 e6 8.Ne5 Bh7 9. Bd3 Bxd3 10. Qxd3 Nd7 11. f4 Bb4+ 12. c3 Be7 13. Bd2 Ngf6 14.O-O-O O-O 15. Ne4 Nxe4 16. Qxe4 Nxe5 17. fxe5 Qd5 18. Qxd5 cxd5 19. h5 b5 20.Rh3 a5 21. Rf1 Rac8 22. Rg3 Kh7 23. Rgf3 Kg8 24. Rg3 Kh7 25. Rgf3 Kg8 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384201906").value=document.getElementById("cwvpg_1384201906").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384201906").submit();

समाजक्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

रमताराम's picture

10 Nov 2013 - 3:34 pm | रमताराम

आनंदच्या वजीराच्या मार्‍याच्या दिशेनेच कॅसल करून मॅग्नसने सॉल्लिड च्यालेंज दिलंय. घे लेका, कर हल्ला.

रमताराम's picture

10 Nov 2013 - 3:35 pm | रमताराम

अपोजिट साईड कॅसल्स. धुवांधार गेमची नांदी.

पंधरावी खेळी. पहिली अनपेक्षित खेळी आनंदची. राजा बी पट्टीत नेऊन सुरक्षित करणे किंवा वजीर एफ पट्टी आणून राजाच्या बाजूच्या हल्ल्याची तयारी करण्याऐवजी पुन्हा एकवाद घोड्यावर अधिक भर दिलाय

कार्लसनने सी ६ ने प्रत्त्युत्तर दिले, डी४-डी५
दोघांनी किल्लेकोट विरुद्ध बाजूला केलाय म्हणजे धमाल आहे!

मधेच स्क्रीन गायबतोय!!

रमताराम's picture

10 Nov 2013 - 3:43 pm | रमताराम

पहिल्या भागात आणखी एक दुवा दिला होता काल, (ग्रीक की गीकसिस्ट्म्सचा) तिथे चेक करा. पण बहुधा इथलाच फीड जातोय सगळीकडे, तेव्हा फरक पडेल असं वाटत नाही. चेस्डॉमवर पट ऑन ठेवा. तिथे विडिओ नाही.

डोळ्यासमोरु गायबत नाहीये

स्वलेकर's picture

10 Nov 2013 - 3:41 pm | स्वलेकर

रमताराम! मी पण आत्ताच आलो... कोण सरस आहे, सद्द्या? काहि कळत नाहि आहे. बोर्ड कडे बघुन.

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 3:41 pm | चतुरंग

डाव सोपा करुन लांबलचक डावाचं दळण लावायलो बघतोय कार्लसन!

प्रश्नच आहे! कारण दोघेही झपाट्याने खेळताहेत. कार्लसनला वजिरावजिरी करायची आहे असे दिसते.

आतिवास's picture

10 Nov 2013 - 3:46 pm | आतिवास

बोर्ड पाहताना (http://chessbomb.com वर पाहतेय) दोघांची हानी सारखीच दिसते आहे (दोन घोडे, एकेक उंट, प्यादी जवळ्जवळ सारखीच) मला तरी. त्यामुळे इथली चर्चा वाचत बोर्ड पाहतेय आता.

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 3:47 pm | चतुरंग

वजीर जी ४ खेळेल असे वाटते. ए २ च्या प्याद्यावर हल्ला आहे कार्लसनचा, ते कसे वाचवणार?

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 3:48 pm | चतुरंग

बरं म्हणजे डाव झकासपैकी लांबणार असे दिसते

अन्या दातार's picture

10 Nov 2013 - 3:49 pm | अन्या दातार

आनंदने वजीर घेतला कार्ल्सन चा. स्वतःचा वजीर धोक्यात घालून. बहुदा ए २ वाचवण्यासाठीच

रमताराम's picture

10 Nov 2013 - 3:49 pm | रमताराम

बरेच पीसेस आताच ट्रेड झाले आहेत. सब एन्ड गेम का मजा होगा आज.

ऊप्स. वजीरही ट्रेड झाले. आनंद बहुधा पुढपर्यंत पोचलेल्या प्याद्यांना पुश करून एन्डगेम अ‍ॅडवांटेज घेऊ इच्छितोय बहुधा.

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 3:50 pm | चतुरंग

खेळ्यात ड्रॉ?!
लै बोर होईल राव तसं झालं तर! कार्लसन फायटर आहे खेळत राहतो पण या सामन्यात माहीत नाही काय करेल?

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 3:53 pm | चतुरंग

आनंडने जागा व्यापायला सुरुवात केली. त्याची वजिराच्या बाजूची प्यादे भिंत सगळी काळ्या घरात खडी आहे त्यामुळे त्याचा काळा उंट त्याबाजूने बाहेर पडू शकत नाही.तसेच काळ्याच्या काळ्या उंटाला तिकडून यायला देखील प्रतिबंध करेल

रमताराम's picture

10 Nov 2013 - 4:00 pm | रमताराम

जर कार्लसनच्या उंटाला उडवू शकला आनंद तर कनेक्टेड प्याद्यांचा चांगला फायदा उठवता येईल. पण कार्लसन उंटाला मागेच ठेवून प्यादी विकसित करू लागलाय.

प्यादी रेटून जागा व्यापायची आणि मोहोरी मागून आणायची. त्यामुळे होते काय की तो मोहोरी दोन्ही बाजूला कमिट करण्याची शक्यता शेवटपर्यंत ठेवतो!

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 3:58 pm | चतुरंग

वजिराच्या बाजूने रोलरकोस्टर सुरु केला!
पुढची खेळी ए५, नंतर बी ४
आनंद ए ३ करुन त्याला ब्रेक लावतोय का बी ४ खेळून?
बी४ ची शक्यता फार कमी आहे कारण पोझिशन एकदमच ओपन होईल

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:00 pm | चतुरंग

ए ५
आनंद त्याच्या प्याद्यांना येऊ देतोय. राज बी १ मधे घेणार काय?

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:02 pm | चतुरंग

गेलाय! मला बोरिस गेल्फंड बरोबरच्या आठव्या डावाची आठवण होतेय
हत्ती एफ १, हत्ती सी १

रमताराम's picture

10 Nov 2013 - 4:03 pm | रमताराम

तुमची लाडकी तानिया येतेय. :)

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:06 pm | चतुरंग

परस्परंच आमची लाडकी होय? बळंच!

रमताराम's picture

10 Nov 2013 - 4:08 pm | रमताराम

पण तुमचाच आनंद दूष्ट आहे. तिला फारवेळ कामेंट्री चा चानस दिला नाही त्याने.

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:10 pm | चतुरंग

येऊ नकोस लवकर, बाय! म्हणला होतात ना त्यामुळे ती लगेच गेली बघा आज!!

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:06 pm | चतुरंग

ड्रॉ झाला राव! श्या कुछ जम्या नहीं राव

रमताराम's picture

10 Nov 2013 - 4:07 pm | रमताराम

एवढ्या जोरदार चढाईनंतर ड्रॉ.

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:07 pm | चतुरंग

डोळे लावून बसलो होतो. झोपेचं खोबरं उगीच केलं असं वाटतंय....

काल १७ खेळ्या, आज पंचवीस, या गतीने चौथ्या डावात चाळीस खेळ्या पार होणार

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:17 pm | चतुरंग

फारच सावधपणे खेळला. तो कबूल करतोय की आजच्या डावात कार्लसनची तयारी जास्त दिसत होती. काल त्याचे जे झाले तेच आज आनंदचे झाले.

तसे दोघांचे ताकद आजमावण्यात दोन डाव खर्ची झालेत. परंतु मला असे वाटते की ज्या पातळीला हे दोघे खेळत आहेत त्या पातळीला हे थोडे अपेक्षितच आहे असे वाटते. कारण एकदम रिस्क दोघेही घेणार नाहीत.

रमताराम's picture

10 Nov 2013 - 4:25 pm | रमताराम

हा प्रकार लैच हास्यास्पद आहे. लोक कैच्याकै प्रश्न विचारताय्त. तिथे काही खेळाडूंना का प्रवेश देत नाहीत, जरा काही नेमके प्रश्न विचारले तर काही उजेड पडेल त्यांच्या खेळावर, मानसिकतेवर. हे ठोंबे पत्रकार येडे आहेत.

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:29 pm | चतुरंग

लोकं काहीही प्रश्न विचारताहेत. "तुमची पुढच्या डावातली स्ट्रॅटेजी काय आहे?" हा प्रश्न काल एका कांद्याने विचारला. आनंद हसून म्हणाला "सीरीअसली? आर यू आस्किंग मी स्ट्रॅटेजी इन प्रेस कॉन्फरन्स?" कास्पारोव असता तर शिव्या घातल्या असत्यान!!

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:26 pm | चतुरंग

तिसरा सामना मंगळवारी दुपारी सुरु होणार. बिचार्‍या सेकंड्सना पुरेशी झोप दोन दिवसात मिळाली नाहीये. काल दीड तासातच दोघे गेले आज दोन तासात. त्यांचीही झोप जरा पूर्ण होईल आज! ;)

रमताराम's picture

10 Nov 2013 - 4:28 pm | रमताराम

करेक्टे. मधला एक दिवस सुटी असते ती खरं म्हणजे त्यांच्यासाठी.

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 4:32 pm | चतुरंग

आम्ही पण आता कल्टी मारतो आमचा रविवार सुरु आहे, त्यामुळे जरा झोप पूर्ण करतो.

प्रसाद गोडबोले's picture

10 Nov 2013 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले

कारोकान !!

सो अनएक्स्पेक्टेड ! !

वेगवेगळ्या बाजुचे कॅसलीन पाहुन मलाही वाटले होते की हा डाव निकाली निघेल !

पण असो ...

आता उद्याच्या डावाची उत्सुकता !!

चतुरंग's picture

10 Nov 2013 - 10:51 pm | चतुरंग

कार्लसन कोणते ओपनिंग करेल याचा भरवसा नसतो आणि ही अनिश्चितताच त्याचं एक महत्त्वाचं अस्त्र आहे.

प्रचेतस's picture

10 Nov 2013 - 9:09 pm | प्रचेतस

जबरदस्त समालोचन.

मुक्त विहारि's picture

10 Nov 2013 - 9:44 pm | मुक्त विहारि

सहमत

+१ चतुरंग, रमताराम आणि गिरिजा - पुढच्या डावांचेही समालोचन चालू ठेवणे.

मन१'s picture

11 Nov 2013 - 7:52 am | मन१

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2013 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रर्र, मिस केलं राव मी हे सर्व. :(
मंगळवारी किती वाजता होईन म्याच सुरु. (भाप्रवे)

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

11 Nov 2013 - 9:02 pm | चतुरंग

दुपारी ३ वाजता (भाप्रवे) सुरु होत आहेत. दर दोन डावांनंतर १ दिवस विश्रांतीचा आहे.

अग्निकोल्हा's picture

11 Nov 2013 - 2:29 pm | अग्निकोल्हा

विजेता ही स्पर्धा केवळ एका सामन्याने जिंकणार असे वाटते. विशी जोपर्यंत पराभूत होत नाही आक्रमक खेळ स्वत: करणार नाही.

मिपाकरांच्या समालोचनाने अजुन मजा येतेय
..

चतुरंग's picture

12 Nov 2013 - 2:05 am | चतुरंग

वरती लेखात टाकला आहे. तिथेच खेळून बघता येईल.

तू नळीवरती या डावाचे अतिशय प्रभावी विश्लेषण आलेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=494p9B0UzkY&feature=player_embedded

सुहासदवन's picture

12 Nov 2013 - 9:54 am | सुहासदवन

नोटेशन बद्दल दिलीत तर बरे होईल

प्रसाद गोडबोले's picture

12 Nov 2013 - 10:52 am | प्रसाद गोडबोले

http://en.wikipedia.org/wiki/Algebraic_notation_%28chess%29

ही नोटेशन शिकायला खूपच सोप्पी आहे . गणितात कार्टेशियन कॉर्डीनेट सिस्टीम असते तसेच ! फक्त क्ष अक्षावर ए बी सी ...एच अशी नावे आहेत अन य अक्षावर १ २...८ अशी !!

राजा K
प्रधान Q
उंट B
घोडा N
हत्ती R
प्यादे ( चिन्ह/नाव नाही)

थोडक्यात Nf3 = घोडा एफ ३ ह्या घरात
Nbd2 = बी कॉलम्न मधील घोडा डी २ ह्या घरात
cXd4 = सी कॉलम्न मधील प्याद्याने डी ४ चे प्यादे मारले

सोप्पे आहे !!

( जुनी नोटेशन पध्दत लईच कॉम्प्लिकेटेड होती , मी १९९८ पासुन खेळतोय तरीही अजुनही मला समजत नाही व्यवस्थित )

चतुरंग's picture

12 Nov 2013 - 11:13 am | चतुरंग

मी लिहीत असतानाच तुम्हीही लिहीत होतात वाटते! धन्यवाद!! :)

चतुरंग's picture

12 Nov 2013 - 11:01 am | चतुरंग

वरचा पट बघा. खालच्या डाव्या कोपर्‍यात १ आणि a असे लिहिले आहे तिथून स्तंभात ८ पर्यंत आकडे आहेत आणि ओळीत h पर्यंत अक्षरे आहेत. K=King=राजा, Q=Queen=राणी (वजीर), R=Rook (हत्ती), B=Bishop (उंट), N=kNight (घोडा), p=Pawn (प्यादे) अशा अक्षरांनी प्रत्येक मोहोरे संबोधले जाते.
c4 = c स्तंभातले प्यादे चौथ्या घरात, Nb4 = घोडा बी ४ मधे असे.
वरचा डाव एकेक खेळी करुन बघा आणि अक्षरे+अंक ताडून बघा लक्षात येईल.

मध्यंतरी फिडेची संपूर्ण नियमावली मराठीत भाषांतरित केली होती, इथे मिपावरच तो छोटा प्रकल्प पार पाडला.
त्याचा दुवा देतो सापडवून.

चतुरंग's picture

12 Nov 2013 - 11:16 am | चतुरंग

http://www.misalpav.com/node/13213

बुध्दीबळ नियमांचे भाषांतर केले आहे.

धाग्यातच शेवटी शेवटी माझ्या प्रतिक्रियेत गुगलडॉक्सवरती चढवलेल्या पुस्तिकेचा दुवा आहे.
https://docs.google.com/file/d/0BzP_LmTBZG0MNzBlY2E0NGItMGVkNi00YzJiLWE4...

प्रसाद गोडबोले's picture

12 Nov 2013 - 11:50 am | प्रसाद गोडबोले

हे भारी काम केले आहाए चतुरंगराव !

फेसबुक वर हा दुवा शेयर करीत आहे . बुधिबळ शिकु इच्छिणार्‍यांना फारच उपयुक्त आहे !! प्रिंट काढुन डिस्ट्रिब्युट करायला काही कंडीशन्स असल्यास कळवा .

चतुरंग's picture

12 Nov 2013 - 12:02 pm | चतुरंग

सर्वांना उपलब्ध असलेले ज्ञान आहे, कंडिशन कसली, जरुर छापून वाटा! :)
तुमच्या उत्साही प्रतिसादाबद्दल धन्यवाद.