मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
9 Nov 2013 - 1:35 pm

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

संस्कृतीकलाधर्मइतिहाससमीक्षा

प्रतिक्रिया

जेपी's picture

9 Nov 2013 - 1:56 pm | जेपी

निव्वळ भंगार मालिका , नाटकी अभिनय , वेषभुषा रंगभुषा सातवाहकालीन करायची का चोप्रा च्या महाभारत सिरीयल प्रमाणे यामध्ये सगळाच गोंधळ झालाय . च्याआयला आता शिव्या पण देण जमत नाय इथ .

प्रचेतस's picture

9 Nov 2013 - 2:11 pm | प्रचेतस

सहमत.
अत्यंत टुकार मालिका.
एकाच भागात तिरस्करणीय झालेली.

सुहास झेले's picture

11 Nov 2013 - 5:51 am | सुहास झेले

अगदी अगदी..... फालतू पैश्यांची उधळपट्टी आणि त्यात काही दर्दी (?) प्रेक्षकवर्ग :)

एकदम भंकस आणि टुकार मालिका… लहानपणीचे रामायण आणि महाभारत हेच सर्वोत्तम. शेवटी म्हणतात ना "जुने ते सोने".

तुषार काळभोर's picture

9 Nov 2013 - 2:25 pm | तुषार काळभोर

जेव्हा कोणाही पात्राचे बालपणीचे प्रसंग दाखवतात, तेव्हा ते अतिशय 'बालिश' असे का चित्रित केले जातात?

गणपती, हनुमान, पांडव-कौरव, कॄष्ण, आदी सर्वांचे बालपण असे चित्रित केले जाते, की ते व्रात्य्/खोडकर/निरागस कमी आणि बिनडोक जास्त वाटतात. आणि कमीत कमी बाल कलाकारांचा अभिनय अतिरंजित, ओव्हरअ‍ॅक्टिंग केल्यासारखा असतो.

मला अभिनय, संस्कृती, कला, यातलं कदाचित जास्त कळत नसेल, पण हे बालकलाकार/बाल-पात्रे नॉर्मल अभिनय करत नाहीत, हे नक्कीच जाणवते.

+१
'किसीकोभी सडकसे उठाके सुप्परश्टार बना सकता हूं'.. टाईप वाटतय.
इतर रिअ‍ॅलेटी शोजमधे किती मस्त टॅलेंटेड मुले असतात नै?.. यात बहुतेक प्रोड्युसरच्या पै-पाहुण्यांची पोरं भरलीयत..

आनंद's picture

9 Nov 2013 - 2:26 pm | आनंद

अत्यंत टुकार मालिका.
पांडु मेल्यावर त्याच्या नाकात चक्क कापसाचे बोळे दाखवले होते.

प्रसाद गोडबोले's picture

11 Nov 2013 - 1:32 pm | प्रसाद गोडबोले

म्हणजे त्याकाळी कापसाचे बोळे वापरायचे नाहीत काय ??

तेच ना राव. आबजेक्षण काढायचे म्हणून कैपण! उद्या म्हणाल महाभारत काळात चपला घातलेल्या कशा दाखवल्या =))

अनुप ढेरे's picture

15 Nov 2013 - 11:07 am | अनुप ढेरे

बरोबर आहे. बोळे कालातीत आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Nov 2013 - 2:29 pm | प्रकाश घाटपांडे

मला कर्कश्य वाटली. किती किंचाळतात पात्र!

अख्ख्या मालिकेत शकुनी बोलता बोलता एक डोळा सहजपणे मिटून घेतो तेवढंच जरा बघण्यासारखं वाटलं.
बाकी

च्याआयला आता शिव्या पण देण जमत नाय इथ .

अगदी याच माझ्याही भावना आहेत या मालिकेबद्दल.

पूनम शर्मा's picture

9 Nov 2013 - 2:51 pm | पूनम शर्मा

खूपच छान मालिका आहे. पहिल्या एपिसोड पासून पाहत आहे. अत्यंत भव्य-दिव्य आणि अभ्यासपूर्ण हाताळणी.
अभिनय, संगीत ... अवर्णनीय. . .

अलबेला सजन's picture

9 Nov 2013 - 4:30 pm | अलबेला सजन

अतिशय सुंदर मालिका आहे.
शकुनीचे पात्र करणारा तर खरोखर कसलेला अभिनेता आहे.
काही गोष्टी मात्र मला खटकल्या म्हणजे-
१. सर्व राजकुमारांच्या गळ्यात जानवे दाखवलेले आहे. ते का हे समजलेले नाही.
२. महाभारत काळात सर्व ज्ञान हे तोंडी पठण केले जाई, लिखीत नव्ह्ते त्यामुळे ते काळाच्या ओघात नष्ट झाले म्हणतात असे असताना ध्रूतराट्र द्रोणांना लिखित संदेश कसा पाठवतो

योगी९००'s picture

9 Nov 2013 - 11:47 pm | योगी९००

शकूनीची वेशभुषा जॅक स्पॅरो (Pirates of the Caribbean) सारखी वाटते ना? जॉनी डेप ने शकूनीची भुमिका चांगली निभावली असती....

शकुनीचे पात्र करणारा तर खरोखर कसलेला अभिनेता आहे.
खरे आहे.

गजानन५९'s picture

9 Nov 2013 - 5:45 pm | गजानन५९

१. सर्व राजकुमारांच्या गळ्यात जानवे दाखवलेले आहे. ते का हे समजलेले नाही. >>>>>>>
क्षत्रियांची मुंज व्हायची त्या काळी

२. महाभारत काळात सर्व ज्ञान हे तोंडी पठण केले जाई, लिखीत नव्ह्ते त्यामुळे ते काळाच्या ओघात नष्ट झाले म्हणतात असे असताना ध्रूतराट्र द्रोणांना लिखित संदेश कसा पाठवतो >>>>>>>>
नाय पटले

बाकी हि मालिका आणि महादेव हि मालिका घरात आवर्जून बघतात कारण त्या सास-बहु आणि रियालिटी शोज च्क़ फालतूपणा बघण्यापेक्षा निदान हे बरे.(बरे नाही चांगलेच )

मंदार कात्रे's picture

9 Nov 2013 - 6:53 pm | मंदार कात्रे

पहायला हवी एकदा ,

पण काही म्हणा , ९० च्या दशकात पाहिलेल्या या मालिकाच मनात घट्ट बसलेल्या आहेत,त्यामुल्ळे त्याच '' ओरिजिनल'' बाकी सगळ्या बकवास ,अशी भावना होते खरी!

कदाचित मी पुर्वी दुरदर्शन वर पाहिलेल्या मालिकेचा परिणाम असेल पण मला नविन मालिका अजिबात आवडली नाही.
आधीच्या मालिकेत कृष्ण (नितिश भारद्वाज) आणि भिष्म (मुकेश खन्ना) यांनी वठवलेल्या भुमिका पाहिल्यावर त्यांच्या जागी इतर कोणी कलाकार पाहणे अशक्य आहे. सौरभ राज जैन याच्या महादेव मालिकेतल्या विष्णुच्या भुमिकेमुळे तो ठिक वाटतो. अरव चौधरी नवीन भिष्म म्हणुन नक्कीच शोभत नाही. हरीश भिमाणी यांच्या 'समय' या आवाजात सांगितलेली कथा त्यावेळी ऐकायला छान वाटत असे. गुंफी पेंटल यांच्या शकुनीसमोर नवीन गेटअप मधला शकुनी विचित्र वाटतो. केकता कपुरच्या शकुनीपद्धल न बोललेलेच बरे. गिरीजा शंकरच्या धृतराष्ट्रापेक्षा नविन धृतराष्ट्र नक्कीच खटकतो. विरेद्र राझदान यांच्या विधुर पद्धलही तेच मत. मोठेपणीचे कौरव आणि पांडव अजुन आले नाही आहेत. आधीच्या महाभारतात गांधारीच्या डोळ्यांवर पांढरी पट्टी होती. केकता कपुरने ती काळी केली आणि आता इथे लाल.
राजकमल यांच्या संगीतातले, राही मासुम रझा यांनी लिहिलेले, राजकमल आणि महेंद्र कपुर यांनी गायलेले सुरुवातीचे गाणे केवळ अप्रतिम.
दुरदर्शनवर महाभारत पाहिलेल्यांना ही मालिका रुचलेली नाही. केकता कपुरची मालिका डब्यात गेल्यावरसुद्धा पुन्हा ही मालिका बनवण्याचे धाडस केले हेच निर्मात्याचे मोठे धाडस. केकता कपुरने तिच्या महाभारतामध्ये केलेल्या चुका नविन महाभारतामध्ये टाळता आल्या तर छानच. कदाचित आणखी २०-२५ वर्षांनी पुढच्या पिढीला ही नविन मालिका आवडेलही. तोपर्यंत कदाचित महाभारताच्या आणखी दोन चार आवृत्या निघालेल्या असतील.
हे माझे वैयक्तिक मत आहे.

अतीशय सुंदर मालिका. मालिकेतला प्रत्येक प्रसंग एखाद्या समीक्षकाच्या दृष्टीने पाहून कथानकामध्ये व पात्रांमध्ये अगदी बारकाईने शोधून खोट काढायचीच,कारण जुन्या महाभारतापेक्षा चांगली ही मालिका असूच शकत नाही असं ठरवून बघणार्यांना ही मालिका नाही आवडणार कदाचित... अर्थात यात त्यांचा काही दोष नाही. बी आर चोप्रांच्या महाभारताचा प्रभावच इतका प्रचंड होता. 1988 ते 1990 अशी 2 वर्ष त्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. मी कधी जुनी मालिका पाहिली नव्हती कारण तेव्हा माझा जन्मच झाला नव्हता. पण नवीन महाभारत मात्र मी एकही भाग मिस न करता आवर्जून पहाते. त्यातली पात्र,त्यांचा अभिनय, भव्य सेट आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रसंगानुरूप दिली जाणारी कृष्णाची शिकवण ...सगळ्या बाजूंनी मला ही मालिका अगदी परिपूर्ण वाटते. कुतूहलापोटी मी यूट्यूब वर जुन्या महाभारतातले काही भाग पाहिले,पण महाभारताची कथा वाचून तिच्यातल्या पात्रांची जी प्रतिमा माझ्या मनामध्ये तयार झाली होती त्या प्रतिमेच्या अधिक जवळची मला नव्या महाभारतातली पात्र वाटली. जुनंही छानच आहे पण मला नवीन आवडलं..आणि कदाचित भविष्यात आणखी नवीन मालिका महाभारतावर आली तरी मला सध्याचीच मालिका आवडत राहील...कारण कदाचित या मालिकेचा प्रचंड प्रभाव माझ्यासारख्या जुनं महाभारत न पाहिलेल्यांवर आहे...

मी इयत्ता आठवी मध्ये होतो तेव्हा जुने महाभारत मी पाहिले होते. ते मला आठवते. ते ही आवडले. पण ते प्रथम होते म्हणून कदाचीत असेल.
पण तरीही नवे त्यापेक्षा छान आहे असे मी म्हणेन. तुलना करायचीच झाली तर यावेळेस चा कृष्ण पूर्वीच्या कुष्णापेक्षा सरस आणि प्रभावी वाटतो.
नेहेमीच जुने तेच सोने असे नसते.
कदाचित लोक नवे महाभारत स्वीकारू शकत नाहीत कारण पाहिल्याशी तुलना होते आणि पाहिल्याशी तुलना होतच राहाणार कारण हा मनुष्य स्वभावाच आहे कि माणूस आयुष्यातली पहिली गोष्ट, व्यक्ती, भावना कशीही विसरत नाही.
खरे कि नाही ? पण त्याचा अर्थ असा नाही जी त्यानंतर आयुष्यात येणार्‍या इतर गोष्टी पहिल्या गोष्टीपेक्षा / व्यक्तीपेक्षा सरस नसतीलच !!
काय ? पटतंय का?
स्वयं विचार किजीये. !!!
:-)

महाभारत कथा हजारो वर्षे जनमानसात टिकून राहण्याची कारणे बघू जाता मुळातच अत्यंत अद्भुत, जटिल, वैविध्यपूर्ण आणि सशक्त कथानक, त्यातील नाट्यपूर्ण घटनाक्रम, व्यापक तत्वज्ञान, सत्व-रज-तमोगुणी पात्रे, नवरसांचा परिपोष करणारे प्रसंग वगैरे सर्व गोष्टी संत-पंत कवींच्या रचना आणि शेकडो वर्षांपासून गावोगाव कीर्तनादि पारंपारिक पद्धतीने केले गेलेले त्यांचे सादरीकरण यात असल्याचे दिसून येईल.

आधुनिक काळात मात्र असे कवी, कीर्तनकार इतिहासजमा झाल्याने ही परंपरा आता आधुनिक तंत्रज्ञानाचा सहारा घेऊनच पुढे चालवणे भाग आहे, त्यातूनच नवनवीन पिढ्यांना महाभारत निदान ठाऊक तरी होईल. यातून विशेष जिज्ञासा जागृत होणारे महाभारताचा अधिक सखोल अभ्यास करण्यास प्रवृत्त होतील, अशी आशा करूया.

तस्मात हे कार्य अर्थलाभासाठी का होईना, जे कुणी करत असतील, ते अभिनंदनास पात्र होत. हे काम तसे कठीण आणि जटिल आहे हेही खरेच.
या सर्व बाबी लक्षात घेता कशी का असेना, महाभारतावर एक तरी मालिका सुरु आहे, हेही नसे थोडके.
वैयक्तिक आवड-निवड ही प्रत्येकाची असतेच. मला स्वतःला आजवर आलेली कोणतीच मालिका काही खास वाटलेली नाही. बीबीसी निर्मित रोमन साम्राज्यावरील मालिकांसारखे काही करणे आपल्याला केंव्हा जमेल?

आनंदी गोपाळ's picture

10 Nov 2013 - 3:47 pm | आनंदी गोपाळ

तर बीबीसीलाच भरीस घालून अशी मालिका काढायला लावले जाऊ शकते..

बीबीसी निर्मित रोमन साम्राज्यावरील मालिकांसारखे काही करणे आपल्याला केंव्हा जमेल?

मला आवडलं नविन महाभारत आणि जुनं सुद्धा आवडलं होतं.
त्या सास-बहुचा फालतूपणा बघण्यापेक्षा निदान हे बरे. +१

जे.पी.मॉर्गन's picture

11 Nov 2013 - 12:11 pm | जे.पी.मॉर्गन

आत्ताशी तर कुठे सुरू होतिये मालिका...... इतक्यात शिव्या का घालताय? प्रथमदर्शनी चांगलं चाललंय. ते ओव्हरअ‍ॅक्टिंगचं म्हणाल तर कुठ्ल्याही ऐतिहासिक / मायथॉलॉजिकल मालिकेत ते असतंच. मालिकेचा सल्लागार देवदत्त पटनाईक कॉर्पोरेट क्षेत्रात आदरानं घेतलं जाणारं नाव आहे. त्यांचा दृष्टिकोन परंपरागत समजांपेक्षा काही बाबतीत वेगळा आहे. त्यानी आपल्याला सुद्धा महाभारताबद्दल आपल्या नेहेमीच्या सरधोपट विचारांपेक्षा एक नवा आयाम मिळू शकेल.

मला स्वतःला श्रीकृष्णाला सूत्रधार करण्याची कल्पना आवडली. मुख्यतः युद्धप्रसंगांमधला फिल्मीपणा प्रथमच महाभारत बघणार्‍यांना आवडू शकतो. आणि पात्रांचं म्हणाल तर चोप्रांच्या महाभारतात सुद्धा जेव्हा मोठेपणीचे कौरव पांडव इंट्रोड्यूस केले गेले तेव्हा ते हास्यास्पदच वाटले होते. पण त्यांना ते पात्र जगायला थोडा अवधी लागलाच.

ह्या महाभारतातले कौरव पांडव फुल सिक्स पॅक वाले आणि किमान दुर्योधन भीम २४ इंची बायसेप्स वाले असावेत हीच अपेक्षा. शिवाय द्रौपदी महाभारतात वर्णिल्याप्रमाणे असावी :). बघूया तर काय होतंय ते.

जे.पी.

द्रौपदी महाभारतात वर्णिल्याप्रमाणे असावी

महाभारतातील द्रौपदीच्या वर्णनाचे मूळ श्लोक मराठी अर्थासहित द्यावेत, ही विनंती.

जे.पी.मॉर्गन's picture

13 Nov 2013 - 11:45 am | जे.पी.मॉर्गन

मूळ संस्कृत महाभारत अर्थातच वाचलेलं नाही (आणि वाचलं तरी कळणार नाही). पण भाषांतरातल्या स्वयंवरपर्वातल्या १८६ व्या भागात वर्णिल्याप्रमाणे - " Of eyes like lotus-petals and of faultless features endued with youth and intelligence, she is extremely beautiful. And the slender-waisted Draupadi of every feature perfectly faultless, and whose body emitteth a fragrance like unto that of the blue lotus for two full miles around..."

एकंदरच द्रौपदी ही अतिशय कणखर आणि जहाल विचारांची स्त्री असणार. रूपा गांगुली द्रौपदी म्हणून फिट्ट होती. पण वैयक्तिक मला द्रौपदीच्या व्यक्तिमत्वाचं एखादं वेगळं इंटरप्रिटेशन बघायला आवडेल. महाभारत मुळातच इतकी क्लिष्ट कलाकृती आहे की तिथे वाचणार्‍याच्या कल्पनाशक्तीला प्रचंड वाव आहे. आणि जर कोणी ह्या महाकाव्याची मालिका बनवत असेल तर त्याला ते स्वातंत्र्य दर्शक म्हणून आपण द्यायला हवं. कोणी त्या व्यक्तिरेखा कंटेम्पररी दृष्टिकोनातून दाखवत असेल तर त्यात गैर काय? असला आमचा अर्जुन सिक्स पॅक वाला तर कुठे बिघडलं? उगाच prejudice मनात ठेऊन कशाला बघायची एखादी कलाकृती?

चित्रगुप्तजी - हे खास तुमच्यासाठी - तुम्हाला कदाचित आधीच माहिती पण असेल हा इसम. पण मला तरी त्याचं काम आवडलं. त्याचं चेपूचं पान देखील आहे. कदाचित माझा नाविन्याची हौस चा सदरा ह्या सदरात पडल्यामुळे मला हे महाभारत आवडत असेल.

जे.पी.

चित्रगुप्त's picture

13 Nov 2013 - 3:05 pm | चित्रगुप्त

@ जे पी मॉर्गनः वा. छानच आहेत चित्रं.
द्रौपदीला पणाला लावताना युधिष्ठिराने तिचे जे वर्णन केले होते (म्हणे) त्याचे मराठी पुस्तकातील वर्णन माझ्याकडे आहे, ते शोधून इथे देईन. मात्र त्याविषयी मूळ संस्कृत श्लोक काय आहे, हे ठाऊक नाही. युधिष्ठिराचे वर्णन एकंदरित प्रसंगाला आणखीनच काळीमा लावणारे आहे. ते वर्णन ऐकून कौरव चेकाळले, यात आश्चर्य नाही.

कुमारी चाऽपि पांचाली वेदीमध्यात् समोत्थितः।
सुभगाः दर्शनीयांगी वेदीमध्या मनोरमाः॥
श्यामा पद्मपलाशाक्षी नीलकुंचित मूर्धजः।
मानुषं विग्रहं कृत्वा साक्षात् अमर वर्णिनी॥
नीलोत्पल समो गंधो यस्यः क्रोषात् प्रवायती।
या विभर्ति परं रूपं यस्य नास्त्यूपमा भुवी॥

अग्निकोल्हा's picture

11 Nov 2013 - 1:46 pm | अग्निकोल्हा

आता स्पष्ट मत नोंदवतो, आपण टुकार परिक्षक आहात.

प्रसाद गोडबोले's picture

11 Nov 2013 - 1:59 pm | प्रसाद गोडबोले

किंव्वा हे पेड परिक्षण असेल :D

तुम्ही टुकार टिकाकार आहात ...
:-)

अग्निकोल्हा's picture

12 Nov 2013 - 9:47 am | अग्निकोल्हा

परंतु मी लेखांना टीआरपी भेटला नाही म्हणून दिशाभूल करणारे परीक्षण लिहायला सुरुवात केली नाही/करणार नाही...

तुम्ही छान लिहता पण मार्केटिंग तुमचा पिंड नाही , मला जलजीवा आवडले होते तुम्हाला लिहायला आवडते तर लिहते रहा पण दिशाभूल ठरनारी परीक्षणे लिहून स्वत:चे अद्न्यान दाखवू नेए
चित्रपट आवडला वा नाही हे कोणीही लिहू शकते परन्तु परीक्षण लिहायला प्रत्येक चित्रपट बघायचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक असतो तेव्हां ते रसिकांचे मन जिंकु शकते...

भिकापाटील's picture

11 Nov 2013 - 10:08 pm | भिकापाटील

टुकार ...... टिकाकार :D

जेपी's picture

11 Nov 2013 - 10:10 pm | जेपी

भिकार मालीका , टुकार परीशण .

तुमच्या क्रिश च्या *** परिशणावरुण , चित्रपट पाहिलेला -
तथास्तु

निमिष सोनार's picture

12 Nov 2013 - 11:38 am | निमिष सोनार

पण महाभारत एवढेही वाईट नाहीये.

सुरवातीला ह्या मालिकेत खूप अतिशयोक्ती दाखवल जायचा . त्यामुळे मी comedy मालिका बघतेय असंच वाटायचं . पण आता खूप सुधारणा झालीये आणि मला हि मालिका खूप आवडायला लागलीये

शकूनीची वेशभुषा जॅक स्पॅरो (Pirates of the Caribbean) सारखी वाटते ना? जॉनी डेप ने शकूनीची भुमिका चांगली निभावली असती....

अफगाण वेशभूषा असेल ती . गांधार अफगाणिस्तान मध्ये होतं ना

महाभारत काळात सर्व ज्ञान हे तोंडी पठण केले जाई, लिखीत नव्ह्ते त्यामुळे ते काळाच्या ओघात नष्ट झाले म्हणतात असे असताना ध्रूतराट्र द्रोणांना लिखित संदेश कसा पाठवतो

पटल नहि. ते लोक काही मागासलेले आदिवासी नवते . असे संदेश सर्रास पाठवले जायचे आणि त्याखाली राजाची सही म्हणून राज्याची मोहोर उठवली जायची .
जे.पी.मॉर्गन च्या मताशी सहमत आहे

सर्व कौरव-पांडव हे शूटिंगसाठी त्यांच्या डॉन बॉस्को किंवा दिल्ली पब्लिक स्कूलमधून सरळ सेट वर आल्यासारखे वाटतात. विशेषतः त्यांच्या कटिंगांमुळे.
त्यांच्या आया वगैरे बाया पलिकडे शांपूच्या जाहिरातीचे शूटिंग आटोपून तश्याच लगोलग इकडल्या सेट वर आलेल्या चिकन्या चमेल्या वाटतात.

जुन्या महाभारतात सुद्धा अनेक चुका होत्या. निष्कारण फक्त चुका शोधायचेच ठरवले तर चुका सापडणारच.
जुन्या महाभारतात एकदा (चुकून अनावधानाने असेल) दुर्योधन (पुनीत इसार) म्हणाला होता, "हमे यहा ड्यूटी है" त्याने इंग्रजी शब्द वापरला होता....

मन१'s picture

13 Nov 2013 - 10:09 pm | मन१

आख्खी महाभारत मालिका यू ट्यूबवर उपलब्ध आह बी आर चोप्रांचीे.
तुम्ही म्हणत आहात ती चूक कुठे आहे ते दाखवून देउ शकाल का?

इरसाल's picture

15 Nov 2013 - 3:04 pm | इरसाल

मह्याकडे ११ जीबी महाभारत अनं १४/१५ जीबीचं रामायण बी हाय बरं ! सांगी देलं तर बर पडीन शोध्याले !

मन१'s picture

14 Nov 2013 - 7:41 pm | मन१

माहिती देताय ना?

जे.पी.मॉर्गन's picture

13 Nov 2013 - 12:10 pm | जे.पी.मॉर्गन

जे लहानपणापासून ऐकत आलो ते महाभारत म्हणजे लॉजिकची आई-बहीण आहे राव! मी तर पोराला महाभारत बघायला बंदी घालायच्या विचारात आहे. पहिल्याच भागात - "त्या राजानी (शंतनु) नदीशी (गंगा) लग्न केलं?" हा प्रश्न आला आणि नांदीच झाली.

कर्ण सूर्याचा मुलगा म्हटल्यावर चिरंजीव "म्हणजे रोज सकाळी आकाशात असतो तो सूर्य? त्याचा मुलगा?" वगैरे विचारतो तेव्हा "ते सगळं खोटं असतं रे" म्हणण्या पलिकडे पर्याय नसतो. आता लोकं त्या गोष्टींमागचा कार्यकारणभाव विचारणारच. मग आताच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून महाभारताचं इंटरप्रिटेशन पण बदलायलाच हवं.

जे.पी.

चित्रगुप्त's picture

13 Nov 2013 - 3:10 pm | चित्रगुप्त

अगदी अलिकडले एक-दोनच 'एपिडोस' बघितलेत या मालिकेचे. शंभर कौरवांचा जन्म कसा झाला, आणि कुंती, माद्री ला तथाकथित 'देवां' पासून गर्भसंभव, हे कसे दाखवले होते, हे समजले नाही. यावर कुणी प्रकाश टाकेल का?

मी संपुर्ण मालिका पाहिली नाही, पण भीमाला वायुदेवाने डायरेक्ट कुंतीच्या हातातच दिले, असे एका भागात दाखवले होते.

चित्रगुप्त's picture

13 Nov 2013 - 9:45 pm | चित्रगुप्त

भीमाला वायुदेवाने डायरेक्ट कुंतीच्या हातातच दिले,

असं होय? याच विषयावर दादा कोंडके यांनी एक हिंदी सिनेमा बनवला होता ना? काय बरं त्याचं नाव?

...परदेशातल्या हॅरी पॉटर, स्पायडरमेंन, अ‍ॅलिस ईन वंडरलॅण्ड, गुलिव्हर ट्रूव्हल्स अशा काल्पनिक कथांना मात्र चांगले म्हणतो. पण आपल्याच भारतातील एक महाकाव्य (ज्यात थोडा काल्पनिकतेचा अंश आहे) त्याला मात्र उगाचच इकडून तिकडून, ओढून ताणून संशय जमा करून घेत नावे ठेवत आहोत. उलट मूळ कथा आणि त्यावर मालिका बनवणार्‍या निर्मात्यांच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. त्यातले तत्वज्ञान समजून घेतले पाहिजे. आग ओकणारा चायनीज ड्रेगन आपल्याला पटतो पण विषबाधा झालेला भीम पाण्यात पडल्यावर सापाने चावल्यावर असा कसा मुत्यू पासून वाचू शकतो असे आणि अनेक संशय आपण घेत राहातो आणि मूळ कलाकृती चा आनंद घेणे मात्र राहून जाते.
रावणाला दहा तोंडे कशी आणि का? असाच आपण विचार करतो...
कोळी चावल्याने पीटर पार्कर भिंतींना चिकटतो हे आपण आवडीने पाहातो पण क्रीश ला नावे ठेवतो...
जेम्स बोंड चे काल्पनिक गेजेट तसेच खूप मारामारी करून त्याच्या अंगाला साधे खरचटत नाही हे आपण स्वीकारतो.
पण भीष्माला इच्छामरण असे कसे मिळू शकतो यावर खल करत राहातो...

त्या हॅरी पॉटर, स्पायडरमेंन, अ‍ॅलिस ईन वंडरलॅण्ड, गुलिव्हर ट्रूव्हल्स यांची गोष्ट वेगळी. त्यांना लोक काल्पनिक कथाच मानतात.
याउलट महाभारत, रामायण यांना काही लोक काल्पनिक न मानता, ते इथे घडून गेले होते. त्यावेळी स्टेम सेल टेक्नोलोजी, सरोगेशन, अण्वस्त्रे, विमाने वगैरे होती असा अनेकांचा ठाम विश्वास आहे.

परिंदा's picture

15 Nov 2013 - 12:48 pm | परिंदा

बाकी हे नवीन महाभारत प्रेक्षणीय आहे. नुसत्या कथेनुसार प्रसंग दाखवण्यापेक्षा त्यांनी अनेक पात्रांमधील नाती, संबंध छान उलगडून दाखवले आहे. जसे कुंती जेव्हा युधिष्टीरास जन्म देते, तेव्हा माद्रीच्या मनात होणारी चलबिचल, आपल्याला कधी आईपण मिळणार अशी असुयेची छटा वगैरे छान रंगवले आहे.

इरसाल's picture

15 Nov 2013 - 3:06 pm | इरसाल

ते जरा बोंड च बॉन्ड्/बॉण्ड्/बाँड करा लैच इचित्र वाटतय.

बॅटमॅन's picture

15 Nov 2013 - 3:27 pm | बॅटमॅन

मा.श्री. निमिष सोनार सो|,

आक्षेप काल्पनिकतेवर नसून त्याच्या सादरीकरणाला आहे. मला सांगा, महाभारत-रामायणात काय कमी मसाला आहे? अख्खे हरी पुत्तर, स्टार वॉर्स, लॉर्ड ऑफ द रिंग्ज झक मारतील जर रामायण-महाभारतावर त्या तोडीचे पिच्चर काढले तर.

मोठ्या आशेने पहावे तर स्पेशल इफेक्ट्स त्या तोडीचे आहेत का? चोप्रासायबांनी आपल्या परीने चांगला प्रयत्न केला तसा पण त्याच्यापलीकडे जायची वेळ आलेली आहे. जरा विचार करा, लॉर्ड ऑफ द रिंग्स मधल्या धनुर्धर लेगोलाससारखा अर्जुन, ट्रॉय मधल्या अजॅक्स सारखा भीम अन सर्वांचा पोलिटिकल गेम करणारा कृष्ण, अन गँडाल्फसारखे भीष्मद्रोण दाखवले तर का नाही लोक फिदा होणार? प्लस जरा अजून रिअलिस्टिक पोलिटिकल कटकारस्थाने दाखवली तर खात्रीने सांगतो, उड्या पडतील लोकांच्या.

एखाद्याने एखाद्या सिनेमाला आणि मालिकेला चांगले म्हटले म्हणजे त्याला निर्मात्याने पैसे दिले असे गृहीत जर सगळेजण धरत असतील तर मग जे चित्रपटावर/मालिकेवर टीका करत आहेत आणि चित्रपट, मालिका वाईट आहे असे म्हणत आहेत त्यांना मग काय त्या निर्मात्याच्या विरोधकांनी पैसे दिले असे समजायचे का?

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Nov 2013 - 3:46 pm | llपुण्याचे पेशवेll

एकून मालिकेचा दर्जा बघता विरोधकांनी पैसे देऊन बदनामी करायची गरज आहे असे वाटले नाही.

मन१'s picture

15 Nov 2013 - 8:07 pm | मन१

हा प्रतिसाद तुम्ही दिलात म्हणजे धाग्यावर तुम्ही डोकावून गेलेले आहात.

जुन्या महाभारतात एकदा (चुकून अनावधानाने असेल) दुर्योधन (पुनीत इसार) म्हणाला होता, "हमे यहा ड्यूटी है" त्याने इंग्रजी शब्द वापरला होता....

ह्या संदर्भात मी वरती काही माहिती विचारली होती. त्याबद्दल तुमचा काहीही प्रतिसाद आलेला नाही.
माहिती देताय ना?

ग्रेटथिन्कर's picture

15 Nov 2013 - 11:06 am | ग्रेटथिन्कर

-|:O}

ग्रेटथिन्कर's picture

15 Nov 2013 - 11:07 am | ग्रेटथिन्कर

=|:O}

खरेच सुंदर एपिसोड होता आजचा.
गुरू शिष्य संबंधातले बारकावे तर होतेच तसेच द्रोणाचार्यांनी एकलव्याला अंगठा मागण्यामागाचे खरे कारण अर्जुनाला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये असे नव्हते तर एकलव्य मगध देशाचा असल्याने आणि मगध देश हस्तिनापुराचा शत्रू असल्याने ते त्याला अंगठा मागून त्याची धनुर्विद्या शिकण्याची शक्यता नष्ट करून मगध देशात त्याला परत पाठवतात. कारण ते हस्तिनापुरा चे मीठ खात असतात... वगैरे वगैरे...

मन१'s picture

15 Nov 2013 - 9:13 pm | मन१

ते ठीक आहे. पण
आख्खी महाभारत मालिका यू ट्यूबवर उपलब्ध आह बी आर चोप्रांचीे.
तुम्ही म्हणत आहात ती चूक कुठे आहे ते दाखवून देउ शकाल का?

प्यारे१'s picture

15 Nov 2013 - 9:39 pm | प्यारे१

ह ह पु वा.
का पाठपुरावा करत सुटला आहेस सगळ्यांचा बाबा?
एवढं पॉलिटीकली करेक्ट असायला नि राहायला तू का आता बिनलग्नाचा आहेस? ;)

सोड की पिच्छा सोनारबुवांचा =))

मन१'s picture

15 Nov 2013 - 10:02 pm | मन१

दोन तीन गोष्टी आहेत.
१. महाभारत सिरियल, जो जीता वही सिकंदर चित्रपट ह्यांचा मी जबरदस्त पंखा आहे.
त्यात पुन्हा समाजात काही टोकाचे भावनिक लोक असतात, emotional fool च्या पातळीवर त्यांचा भावनिक आवेग असतो. मी त्या जमातीतलाच म्हटलं तरी हरकत नाही.
त्यामुळे ह्या महाभारत वगैरेला कुणी खराब म्हटलं तर मी तो पर्सनल इन्सल्ट मानतो.
२. ह्याउप्पर "आपण अत्यंत न्यायी असावं" असा एक ट्रिगर माझ्या मनात सतत असतो. त्यामुळे "महाभारत सिरियल दळभद्री आहे" म्हटलं तर वाईट वाटलं तरी मी ऐकून घेतो.फक्त समोरच्याचं म्हणणं तसं का आहे; हे त्यानं
सांगावं इतकीच अपेक्षा असते. किम्वा साधार तसे म्हटले तरी चालेल.
३. वैधानिक मार्गानं लोकांना भंडावून सोडायला मनाच्या एका कोपर्‍यात कुठे तरी मजा पण येते. बालिश आनंद म्हणा हवं तर; ताईचे केस ओढण्यातला किंवा दादाला चिमटे काढण्यातला. शिवाय मार्ग वैधानिक असल्यानं समोरच्याची गोची होते.
४. इतकं असून कुणी स्वतःहून व्यवस्थित बोललं, थँक्स वगैरे म्हटलं; किम्वा goodwill gesture दाखवलं तर त्याला पिडणं मला अजिबात ठीक वाटत नाही. मी ते तत्काळ थांबवतो. (कारण तेच. "न्यायी असण्याचा डोक्यात सुरु असलेला ट्रिगर")
.
.
तस्मात्, खाली " धन्यवाद " असा एक शब्द दिसतो आहे. मी ह्या धाग्यावर माझ्यातर्फे थांबत आहे.

प्रचेतस's picture

15 Nov 2013 - 9:24 pm | प्रचेतस

हहपुवा.

एकलव्य निषाद देशाचा होता. कुठे सुदूर पूर्वेकडे असलेला मगध तर कुठे हस्तिनापुराच्या नैऋत्येला असलेला निषाद. कैच्याकै.
मालिका टुकार आहे हे सिद्धच होते अशा बादरायण संबंधांमुळे.

बाकी त्या मनोबाच्या प्रश्नाचे उत्तर एकदाचे देऊन टाका राव.

आनंदमयी's picture

17 Nov 2013 - 12:53 am | आनंदमयी

@वल्ली
एकलव्य निषाद देशाचा होता. कुठे सुदूर
पूर्वेकडे असलेला मगध तर कुठे
हस्तिनापुराच्या नैऋत्येला असलेला निषाद.

तुमच्या या प्रश्नाचं हे उत्तर.
आपणा सर्वांच्या आवडत्या जुन्या महाभारतातला हा भाग

http://www.youtube.com/watch?v=Xd2MdEGkFBQ&client=mv-samsung-bada&hl=en&...

आनंदमयी's picture

17 Nov 2013 - 1:42 am | आनंदमयी

महाभारत ही एक महाकथा आहे. विविध भावभावनांनी परिपूर्ण असलेल्या या महाकथेचे वर्णन 'जे येथे नाही , ते जगात अन्यत्र कुठेही नाही' असे केले जाते. इथे प्रत्येक पात्राचे, घटनेचे विभिन्न पैलू आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांचा सारभाग म्हणजे ही महाकथा... या कथेला केवळ एक माहितीपट न बनवता विविध व्यक्तिमत्वांचे विविध पैलू आपल्यासमोर आणून धर्माची बाजू योग्य पध्दतीने मांडण्याचे स्तुत्य कार्य सध्या स्टार प्लसवर प्रसारित होणारी महाभारत ही मालिका करत आहे. एकलव्यासारख्या गुरूभक्तीत समरस झालेल्या धनुर्धराकडे त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागण्यापुर्वी गुरू द्रोणांच्या मनात चाललेले द्वंद्व आणि गुरूंच्या प्रती आत्मसमर्पणाची परिसीमा गाठून एकलव्याने अंगठा कापून दिल्यानंतर अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त झालेल्या त्या महान गुरूच्या मनाची तळमळ तुमच्या आवडत्या जुन्या महाभारतात दाखवली नव्हती! त्यामुळे नवीन मालिकेला शिव्या देण्याकरता शिवशिवणारी तुमची जीभ आवरती घ्या आणि टिकाकार म्हणून नव्हे, तर केवळ एक प्रेक्षक म्हणून या कलाकृतीचा आनंद घ्या. :)

प्यारे१'s picture

17 Nov 2013 - 2:20 am | प्यारे१

>>>महाभारत ही एक महाकथा आहे.

मिसळपाववर 'मूळ' महाभारत जवळपास तोंडपाठ असलेले मला किमान दोन आयडी माहिती आहेत.
कुठल्या पर्वात कुठं काय होतं त्याचं पुलंच्या हरितात्यांसारखं 'धावतं समालोचन' ते करतात. त्यातला एक वल्ली नि दुसरा मृत्युंजय.
अर्थात म्हणून त्यांच्या विरोधात कुणी बोलू नये अथवा काही म्हणू नये असं नाही. मात्र मूळ महाभारतात नसलेल्या गोष्टी जेव्हा दाखवल्या जातात सांगितल्या जातात तेव्हा ते 'अमुक तमुक'चं महाभारत होतं. मूळ महाभारत नव्हे! नि तशा वेगळ्या सादरीकरणाला हे लोक विशेषतः वल्ली येऊन मतप्रदर्शन करतो. :)

जे महाभारताचं तेच रामायणाचं.

मन१'s picture

17 Nov 2013 - 8:19 am | मन१

+१

आनंदमयी's picture

17 Nov 2013 - 9:54 am | आनंदमयी

इथे नवीन महाभारत जुन्या महाभारताच्या तुलनेत सुमार आहे हे सिध्द करण्याचा जो प्रयत्न होत होता तो फक्त मी जुन्या मालिकेच्या एका भागाचा दाखला देवून मोडीत काढला... महाभारताबद्दल जर इथे कुणाला इत्यंभूत माहिती आहे तर त्यांचा मी आदरच करते. पण मी पुर्वी म्हणाले तसंच महाभारत मालिका केवळ एक माहितीपट म्हणून न दाखवता घटनांचे विविध भावनिक पैलू दाखवण्याचे काम ही नवीन मालिका करत आहे. मी फक्त नवीन मालिकेची बाजू मांडली आणि त्याच मालिकेतल्या एका प्रसंगाबद्दल एक प्रश्न उपस्थित झाला होता त्याचं जुन्या मालिकेतल्या एका भागाकरवी उत्तर दिलं इतकंच, कुणाच्याही माहितीबद्दल शंका घेतलेली नाही. अर्थात मी लहान तोंडी मोठा घास घेतला याबद्दल क्षमा मागते... __/\__

जुन्या महाभारत मालिकेबरोबर(चोप्रा) मी नविन मालिकेची तुलना कुठे केली आहे हे कृपया माझ्या निदर्शनास आणून द्यावे.

माझी प्रतिक्रीया या धाग्यावर ती तुलना करणार्यांसाठी होती, आपल्यासाठी नाही. मी तर केवळ आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. माझ्या इतर कुठल्याही प्रतिक्रीयेत आपण दोन मालिकांमध्ये तुलनाकरत आहात असं मी कुठेही म्हटलेलं नाही किंवा असेल तर माझ्या निदर्शनास आणून द्यावं...

प्रचेतस's picture

17 Nov 2013 - 10:55 am | प्रचेतस

बाकी मी कुठला प्रश्न उपस्थित केला होता हे सांगाल काय?

आनंदमयी's picture

17 Nov 2013 - 11:32 am | आनंदमयी

''एकलव्य निषाद देशाचा होता. कुठे
सुदूर पूर्वेकडे असलेला मगध तर कुठे
हस्तिनापुराच्या नैऋत्येला असलेला निषाद.
कैच्याकै.
मालिका टुकार आहे हे सिद्धच होते
अशा बादरायण संबंधांमुळ
..''

'एकलव्य आणि मगध देशाचा काय संबध? तो तर निषाद देशाचा होता!' अशा आशयाची एक प्रतिक्रीया आहे वर.
तर एकलव्य आणि मगध देशाचा संबंध असा , की एकलव्याचे पिता हे मगध नरेश जरासंधाच्या सेनेतील एक निष्णात सैनिक होते, हा आशय स्पष्ट करणारी एक व्हिडियो क्लिप मी प्रतिक्रिया म्हणून पाठवली होती :)

असो! मला अत्यंत भावलेली नव्या मालिकेतली ही कृष्णाची सीख आपणा सर्वांना ही नक्की आवडेल म्हणून सर्वांसोबत शेअर करू इच्छिते...

www.youtube.com/watch?p=AM7IOZnvD2F5fyXXeKoFdAQIdxOOQgSW&v=4GWhQYkwPJw&g...

प्रचेतस's picture

17 Nov 2013 - 2:53 pm | प्रचेतस

ह्यात मी प्रश्न विचारलेला कुठे दिसला तुम्हास? ते एक निव्वळ विधान आहे.

तर एकलव्य आणि मगध देशाचा संबंध असा , की एकलव्याचे पिता हे मगध नरेश जरासंधाच्या सेनेतील एक निष्णात सैनिक होते, हा आशय स्पष्ट करणारी एक व्हिडियो क्लिप मी प्रतिक्रिया म्हणून पाठवली होती

बाकी ह्याचा मूळ महाभारतातील (चोप्रांच्या किंवा नव्या मालिकेतील नव्हे) दाखला देऊ शकाल काय?
माझ्या अत्यल्प ज्ञानाप्रमाणे एकलव्य हा निषादराजा हिरण्यधनु याचा मुलगा. जर हिरण्यधनु हा व्याधराजा असेल तर तो सैनिक म्हणून मगधराज्यात कसा राहिल?

अवांतरः हाच एकलव्य पुढे पौंड्रक वासुदेवाबरोबर द्वारकेवर चालून आला होता. पौंड्रकाचा वध हा कृष्णाने तर एकलव्याचा पराभव हा बलरामाने केला. हा उल्लेख खिलपर्वात आला आहे (हरिवंश). याव्यतिरिक्त एकलव्याचा उल्लेख आदिपर्वाशिवाय कुठेच नाही. तस्मात एकलव्याची कथा संपूर्ण प्रक्षिप्त असावी असे मला वाटते.

आनंदमयी's picture

17 Nov 2013 - 5:09 pm | आनंदमयी

1.He was son of Vyatraj Hiranyadhanus, a talented soldier in the army of King of Magadha. Magadha was ruled by Jarasandha, who was at odds with the Kingdom of Hastinapura

1.Source:
en.m.wikipedia.org/wiki/Eklavya

एकलव्य हा निषाद राजाचा पुत्र. निषाद ही एक जमात होती. या जमातीचा उदय कसा झाला याचा संदर्भ

2.'काकःकृष्णाति~हस्वांगो~हस्वबाहुर्महाहनुः। ~हस्व पाद्निम्न नासाग्रो रक्तक्षस्ताम्रमूर्धजः॥
तम् तू तेऽवनतम् दीनम् किमकरोमिती वदिनम्।
निषिदेतिऽब्रुवंस्तात सा निषादस्तथा भवत्॥'
श्रीमद् भाग्वतम् 4.14.44-45

2.source: http://vedabase.net/sb/4/14/44/en

अशा प्रकारे राजा वेण याच्या मांडीतून निषाद या जमातीच्या जनकाचा जन्म झाला. शिकार करणा~या, राज्य नसून केवळ एक जमात असलेल्या निषादांचा राजा हिरण्यधनुष जर सैनिक म्हणून मगधराज जरासंधाची सेवा करायचा यात विस्मयित होण्यासारखे काही नाही.
3.बाकी मूळ महाभारत ग्रंथातील एकलव्याबद्दलचे वर्णन हे संक्षिप्त आहे व एकलव्याच्या पित्याबद्दल विस्तृत माहिती यात उपलब्ध नाही
3.source: www.sacred-texts.com/hin/m01/m01135.htm

प्रचेतस's picture

17 Nov 2013 - 6:08 pm | प्रचेतस

मूळ महाभारतातच अगदी कमी माहिती असताना विकीत दिलेली माहिती कितपत ग्राह्य धरायची?

विकिपीडीयात ससंदर्भ माहिती दिली जाते. तिच्यात बहुतांश तथ्य असतं म्हणून आज बहुतेकांसाठी ते माहिती मिळवण्याचे ठिकाण झाले आहे... अर्थात तुम्हाला हे नसेल खरं मानायचं तर नका मानू! तात्पर्य काय की महाभारत मालिकांमध्ये (जुन्या व नव्या दोन्ही) एकलव्याच्या वडिलांबद्दल जी माहिती दिली गेली, तिला कुठेतरी आधार आहे. अर्थात एवढ्यावरूनच तुम्ही ही किंवा आधीची मालिका सुमार ठरवत असाल तर ते योग्य नाही.

@ इथे उपस्थित सर्व टिकाकार:
प्रत्येक कलाकृतीबद्दल प्रत्येकाचं वैयक्तीक मत असतं, त्याचा मी आदरही करते. पण इथे उपस्थित सर्व टिकाकारांनी केवळ त्यांना ही मालिका आवडली नाही म्हणून जे काही शाब्दीक वार या धाग्यावर केलेत त्यांनी एकदा मालिकेविषयी असणार्या आपल्या नापसंतीचं कारण शोधून पहावं. बाकी ही मालिका आवडणारेही या धाग्यावर बरेच आहेत, केवळ धागाकर्ता एकटा नाही, हे लक्षात घ्यावं. उद्या तुमच्या आवडत्या, अगदी मनापासून आवडत्या गोष्टीला एखाद्याने विनाकारण नावं ठेवली तर तुम्हाला रुचेल का??? स्वयं विचार कीजिये.... :) :)

प्रचेतस's picture

17 Nov 2013 - 9:20 am | प्रचेतस

ओके. :)

चित्रगुप्त's picture

16 Nov 2013 - 4:14 pm | चित्रगुप्त

महाभारतकालीन भारताचा नकाशा संदर्भासाठी डकवत आहे:
(हस्तिनापूर ते मगध (राजगृह) अंतर सुमारे १३०० कि.मी. आहे).
.

यापुढे फक्त अभ्यास वाढवा अन परिक्षण खुमासदार व महत्वाचे म्हणजे वास्तववादी लिहा म्हणजे विषय संपला.

आपली मते लोकांना पटतात हे फक्त तेंव्हाच वास्तव असते जेव्हां लोक त्याविरोधी बोल्तातच पण त्याचा प्रतिवाद आपल्या एकट्यालाच करावा लागत नाही, अन्यथा आपण मन गच्च कर व बाकी सगले गोडयावर सोड सारखे लेखान्पुरते मर्यादित व्हाल.

निमिष सोनार's picture

15 Nov 2013 - 9:28 pm | निमिष सोनार

चला आता पुढे महाभारतात काय काय घडते ते पाहू आणि चर्चा करू.
धन्यवाद अग्निकोळा आणि मन१ !!
आता सोमवारी कौसव पांडव मोठे होणार !!

आणि त्या जुन्या चुकीबद्दल:
ते मी यु ट्यूब वर नव्हते बघितले, तर लहानपणी पुसट से मला आठवते तसे!!

सुहासदवन's picture

16 Nov 2013 - 8:47 am | सुहासदवन

कौरव पांडव असतील हो कदाचित

एकलव्य कुठल्या राज्याचा होता ते माहीत नाही पण द्रोनांनी धृतराष्ट्राला वचन दिल होत कुरु कुमारांच्या शिवाय इतर कोणाला विद्यदान करणार नाही म्हणून.
आत्ताच्या काळामध्ये टेस्ट tube baby वगेरे किवा आणखी बर्याच तंत्रज्ञानाने शरीराच्या बाहेर गर्भ धारणा होऊ शकते . मग त्या काळात सुधा काहीतरी असेल ज्याने direct हाता मधेच बाल प्रगट होत असेल. द्रोपदी आणि तिचा भाऊ धृष्ट्धुम्न यांचा जन्म सुधा असाच झालाय कि. यज्ञातून .. अग्निदेवांची हि २ मुलं. अग्निकन्या असल्यामुळे द्रोपदी मुळातच कणखर , जहाल, बुद्धिमान, रंगाने सावली पण सुंदर, सुगंधी होती.
आणि ह्या युधिष्ठिराला धर्मराज का म्हणतात कुणास ठावूक ... ह्याला तर अधर्मराज म्हणायला पाहिजे. इतर पांडवांच्या, द्रोपदीच्या अपमानाला हाच कारणीभूत होता. त्याच्यामुळेच महाभारत घडलं.

द्रोनांनी धृतराष्ट्राला वचन दिल होत कुरु कुमारांच्या शिवाय इतर कोणाला विद्यदान करणार नाही म्हणून.

म्हैसतै, तुम्ही नेहमीच संदर्भांशिवाय बोलत असता. आणि संदर्भ मागितले कि देत नाहीत.
ह्या वचनाच्या दाखल्याचा काही संदर्भ देऊ शकाल काय?

अग्निकोल्हा's picture

17 Nov 2013 - 9:40 am | अग्निकोल्हा

आम्हाला तसं वाटतय?

चित्रगुप्त's picture

16 Nov 2013 - 3:50 pm | चित्रगुप्त

एकलव्य डावखुरा होता, त्यामुळे त्याने उजव्या हाताचा अंगठा खुशाल कापून दिला, त्यामुळे त्याच्या धनुर्विद्येवर फारसा परिणाम झाला नाही.

शक्यता नाकारता येत नाही...

जेपी's picture

16 Nov 2013 - 5:45 pm | जेपी

=)) चित्रगुप्तजी यामुळे कुमार दिवाळी अंकात वाचलेली टाईम मशीनची गोष्ट आठवली .

काहि मुल वेळेत मागे जाऊन एकलव्यला सावध करतात आणी डाव्या हाताने प्रॅक्टीस करायला सांगतात .जुनी गोष्ट आहे दुवा दे नाय

पुष्कर जोशी's picture

18 Nov 2013 - 12:11 am | पुष्कर जोशी

माझे बाबा मेघालयात गेले होते (भारत मेरा घर कार्यक्रम)... तेथे आजही अंगठ्या शिवाय घनुष्य बाण चालवतात ...

चित्रगुप्त's picture

17 Nov 2013 - 4:22 pm | चित्रगुप्त

आत्ताच मी परिचयातील एका निष्णात वैद्यांना भेटायला गेलो होतो, त्यांचा पुराणे वगैरेंचाही अभ्यास आहे. त्यांना विचारले, की पांडुला कर्दम ॠषींनी शाप दिला होता वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन वैद्यकीय दृष्टीने पांडूला कोणती व्याधी झालेली असावी, ज्यामुळे त्याला स्त्रीसंग करताच मृत्यु यावा? त्यावर त्यांनी सांगितले, की पांडूने जो दिग्विजय वगैरे केला, त्यात त्याला अनेक स्त्रिया लाभल्या, शिवाय दासी वगैरे असतच. तस्मात कामातिरेकामुळे त्याचे ओज नष्ट झालेले होते, अश्या स्थितीत औषधी सेवनाने कृत्रिम रीत्या तात्पुरती शक्ती मिळवण्याचा आणखीनच वाईट परिणाम होतो. परिणामी त्याचे र्‍हदय कमकुवत झाले असावे, आणि उत्तेजनेमुळे वाढणार्‍या र्‍हदयगतिचा ताण सहन न झाल्यास मृत्यु ओढवू शकतो.
अश्या प्रकारचे संशोधन करून जर या मालिकेत त्याचा अंतर्भाव करतील, तर ते आजच्या प्रेक्षकांना जास्त खरे वाटेल, पटेल.

आनंदमयी's picture

17 Nov 2013 - 5:23 pm | आनंदमयी

ऐकण्यात आले आहे की पांडू हा पांडूरोगाने ग्रस्त होता. ह्रदयाच्या आश्रयी असणारं साधक पित्त वाढल्यामुळे हा रोग होतो...
पण याबाबतीत आपण वर्तवलेली शक्यता अधिक पटण्यासारखी वाटते