अमेरीकेतला आमचा गणपती (मोदकांसहित)

बबलु's picture
बबलु in कलादालन
16 Sep 2008 - 7:20 am

काही फोटू अमेरीकेतल्या घरातले....

मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला. :)

राहती जागासमाजजीवनमानराहणीछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

16 Sep 2008 - 8:30 am | भाग्यश्री

वा..गणपती कस्ला मस्त आहे!! कान अगदी सुपासारखे म्हण्तात तसे आहेत.. मूर्ती खूपच आवडली!! कुठून घेतलीत?
मोदकही एकदम मस्त दिसत आहेत..

सहज's picture

16 Sep 2008 - 9:00 am | सहज

काही म्हणा, एकंदर गणपतीउत्सव लहानपणापासुन आपल्या मनात प्रचंड घर करुन आहे की काय कल्पना नाही पण ती गणपतीची मुर्ती बघताना काही शब्दातीत आनंद मिळतो नाही?

भाग्यश्री's picture

16 Sep 2008 - 9:04 am | भाग्यश्री

अगदी!! मला गणपतीची मूर्ती एरवीच पाहताना मस्त वाटतं.. गणेशोत्सवात तर अगदी झळाळी आल्यासारखी मस्त दिसते गणपतीची मूर्ती!
आत्ताच अलिकडे मला एका मैत्रिणीच्या घरी जावं लागलं.. तिच्या भल्यामोठ्या घराची थीम होती गणपती!! तिच्या घरात तब्बल २००+ गणपतीच्या मूर्ती आहेत!! असं काहीतरी करेन मी ही माझ्या घरात.. :)

यशोधरा's picture

16 Sep 2008 - 9:56 am | यशोधरा

गणपतीबाप्पा एकदम सात्विक आणि सुंदर आहेत. प्रसन्न वाटलं बघून.
मोदक तर मस्तच दिसताहेत! :)

स्वाती दिनेश's picture

16 Sep 2008 - 12:19 pm | स्वाती दिनेश

मूर्ति फार सुरेख,सजावटही छान,प्रसन्न वाटले पाहून.. आणि मोदक तर .. पटकन एक उचलावासा वाटतो आहे..
स्वाती

बेसनलाडू's picture

16 Sep 2008 - 12:47 pm | बेसनलाडू

आणि मोदक तर .. पटकन एक उचलावासा वाटतो आहे..
अगदी हेच म्हणतो!
(मोरयाभक्त)बेसनलाडू
आमच्या गणपतीचीही अगदी अशीच (किंबहुना हीच!) मूर्ती होती असे वाटते. भारत बाजार मधून घेतली काय बबलूशेठ? ;) ही पहा -
IMG_0653
आणि हे आमचे मोदक -
IMG_0658
बाप्पांची आनखी एक प्रसन्न मुद्रा -
IMG_0656
दिव्यांचे ताट -
IMG_0646

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 4:51 pm | विसोबा खेचर

बबलू आणि बेसनलाडू,

सर्वच फोटू सुरेख....!

लालबागच्या राजाचा विजय असो....

तात्या.

बबलु's picture

17 Sep 2008 - 2:16 am | बबलु

मस्त वाटलं पाहून...
जास्वंदाचं फूल सहीच. आम्हाला काही मिळालं नाही.

भारत बाजार मधून घेतली काय बबलूशेठ?
होय होय (लॉरेन्स-रीड वरचं भारत बाजार, सन्निवेल). तीच मूर्ती आहे :)

बाकी तुमचेही मोदक झकास.
दिव्यांचं ताट तर जबरीच.

....बबलु-अमेरिकन

बेसनलाडू's picture

17 Sep 2008 - 4:21 am | बेसनलाडू

जास्वंदाचं फूल सहीच. आम्हाला काही मिळालं नाही.
साउथ मेन स्ट्रीटवरील जैन मंदिराच्या समोर जी छोटी दुकाने,कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांच्या आवारात फुटपाथलगत तीन-चार जास्वंदाची झाडे आहेत. त्यांच्यातल्या एकावरून ७-८ काढून आणली :)

होय होय (लॉरेन्स-रीड वरचं भारत बाजार, सन्निवेल). तीच मूर्ती आहे
बरोबर. आम्हीही तेथूनच घेतली. आतापर्यंत ज्या ज्या भारतीय वाणसामानाच्या दुकानात गेलो, त्यांत हे माझे सगळ्यात आवडते दुकान. मुख्य म्हणजे इतरांच्या तुलनेत जास्त स्वच्छ आहे :) असो.

(माहीतगार)बेसनलाडू

नाटक्या's picture

17 Sep 2008 - 2:23 am | नाटक्या

बबलू/बेसनलाडू,

सहीच आहे.

- नाटक्या...

ता.क.: कट्ट्यावर येताना मोदक जरुर आणा ;)

पुणेरी पुणेकर's picture

17 Sep 2008 - 7:05 am | पुणेरी पुणेकर

मुर्ती एकदम सुरेख!!! जास्वंदाचे फूल आम्हाला पण नाही मिळाले जपानमध्ये