जपानमधील गणेशोत्सवाची काही छायचित्रे पाठ्वीत आहे.
तोक्योमधील ग्योतोकुला भारतीयांनी एकत्र येउन गणेशोत्सव साजरा केला, ही विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे
श्रींची मुर्ती
हा कार्यक्रम हवाच !!!
श्रींची विसर्जन मिरवणुक
म्योदेन बे वर भाविकांची गर्दी
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
प्रतिक्रिया
16 Sep 2008 - 8:42 am | प्रकाश घाटपांडे
मास्तर जरा वाढाव लिवा कि. चित्र लै भारी काल्ढी बुवा. तुमी कुडय त्याच्या मदि?
प्रकाश घाटपांडे
16 Sep 2008 - 8:44 am | भाग्यश्री
हे फोटो जपानमधले अजिबात वाटत नाहीएत!! कसली धमाल करताय सगळे!!
सही !!
16 Sep 2008 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी!
तुम्ही सगळ्यांनी एकदम भोकरवाडीच बनवली जपानमधे!
अदिती (स.मु. पुणे)
16 Sep 2008 - 8:44 pm | गणा मास्तर
स. मु .पुणे तुला ये म्हनल व्ह्त भोकरवाडीला
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
16 Sep 2008 - 8:54 am | सहज
चित्र क्रमांक ३ बघताना कानामधे ढोल ताशाचा ठेका आपोआप घुमू लागला.
:-)
16 Sep 2008 - 11:03 am | जैनाचं कार्ट (not verified)
हेच म्हणतो !
मस्त फोटो !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
16 Sep 2008 - 10:59 am | बबलु
बरेच लोक आहेत की... बाप्पा प्रसन्न !!
....बबलु-अमेरिकन
16 Sep 2008 - 11:05 am | ऋचा
मस्त हो मास्तर!!
कीती धमाल करताय :)
अजुन लिहा की थोड काय काय केल त्या दिवशी ते :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
16 Sep 2008 - 12:13 pm | स्वाती दिनेश
तोक्योमध्ये जोरदार गणेशोत्सव झालेला दिसतो आहे.मस्त वाटले चित्रं पाहून..
स्वाती
16 Sep 2008 - 12:34 pm | डोमकावळा
मस्त फोटो आलेत...
पण तुम्ही कुठं दिसत नाहीत.... बाकी लोकांपैकी पण एक-दोनच ओळ्खीचे दिसत आहेत.
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
16 Sep 2008 - 12:55 pm | गणा मास्तर
घाटपांडे काका, मित्र डोमकावळ्या आम्ही कॅमेर्याच्या मागे होतो आणि आपण काय धड दिसत नाय त्यामुळे फोटो टाकला नाय..
घाटपांडे काका वाढाव लिहाव तर लय फाफटपसारा व्ह्तो पघा माह्याकडुन्,म्हणुन लिवलं नाय म्या
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
16 Sep 2008 - 1:34 pm | प्रभाकर पेठकर
सर्वच छायाचित्रे सुंदर आली आहेत. जपानी गणेशोत्सव जोरदार साजरा झालेला दिसतो आहे.
पहिल्या छायाचित्रातील प्रवेशद्वारापाशी बेशिस्तपणे काढून ठेवलेल्या पादत्राणांनी मात्र हृदयात बारीकशी कळ उमटली.
16 Sep 2008 - 4:52 pm | विसोबा खेचर
मस्त फोटू...
प्रसन्न वाटले! :)
बोला गंपती बाप्पा मोरया....
लालबागच्या राजाचा विजय असो....
तात्या.
16 Sep 2008 - 9:00 pm | चतुरंग
फुल्टूच झालाय की गणेशोत्सव!
तिसरं चित्र बघितलं आणि मनात ढोल-झांजपथकानं ताल धरला - धतड.. ततड.. धतड..ततड! ढिंग ढिंग ढिढिंग ढिंग - ढिंग ढिंग ढिढिंग ढिंग!! ;)
चतुरंग