राम्राम मंडळी.
खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.
मी सुरूवात करतो..
********************************************************
गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन...
ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील.
त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात.
तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो.
किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही.
हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं.
महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो...
********************************************************
प्रतिक्रिया
29 May 2013 - 10:47 am | पांथस्थ
दुर्गा भागवत ह्यांनी त्यांच्या 'पैस' ह्या पुस्तकामधे दुःखावर खालील विचार व्यक्त केले आहेत. वाचुन धन्य झालो. दुःखाकडे बघायचा काय पर्स्पेक्टीव्ह आहे. कितीही वेळा वाचले तरी मन भरत नाही. 'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. जरूर वाचा.
ता.क.: हे लेखन माझ्या ब्लॉग वर पुर्वप्रकाशीत आहे.
29 May 2013 - 10:56 am | यशोधरा
'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. >> + करोडो वेळ
29 May 2013 - 10:53 am | यशोधरा
खामोशी की एक नदी बहती थी...
उंचे पर्वतोंके साये
उस नदी में खेलते
और पेडोंकी छाती से
जब फूल खिलते
तो सारी सुगंधी वो
हवाऑ को अरप देतें..
जब हवाएं नदी मे नहाने के लिए आती
सूरज को अर्घ्य देतीं
तो एक घडी नदी के किनारें
वो पत्थरोंपर बैठ जातीं..
उस समय नदी की छाती से
सूरज की रौशनी कुछ कहती थीं
खामोशी की एक नदी बहती थीं...
धरती आसमान की लीला
उस नदी में खेलती
बादल भी नदींमें तैरते
सितारें भी नदीमें उतरते
पंछी भी पानी परसने आतें
और चांद का योगी ..
कमंडल भरने के लिये आता था
दो घूंट पानी लेकर
वो अपनी चिलम धोता था
और फिर एक घूंट पानी
मुझपर छिडक देता था..
और मुझे लगता ..
वो मेरी आग को भी
चिलम की तरह पीता था..
वो मेरी एक कोयला आग थी
मेरे माथेंमें रहती थीं
और आँखोके सामने
खामोशी की नदी बहती थीं...
साईं! वो कौनसे पर्वत की घाटी
और कौनसे काल की गाथा
मैं नहीं जानती
पर इतना जानती..
की इस किनारे की छातीमें
उस दुसरे किनारे का इश्क धडकता
तो हिज्र की गाथा
मेरे होठोंपर सिसकतीं
उस नदी की तरह लगती थी
और मैं - कुछ उसी तरह
सुनती और कहतीं थीं
जिस तरह खामोशी की नदी बहती थीं...
ओ मेरे शाह मुराद सांई!
वो कौनसा काल था
और कौनसी तिथी
तू स्वयं नदीपर आया था
और तूने हंसकर नदीपर
अक्षरोंका सेतू बनाया था
और मुझे सेतूपर ले जाकर
दुसरा किनारा दिखाया था..
उस दिन नदी गुनगुनाईं थीं..
और मेरे कानोंमें उसने
राज़की एक बात कहीं थीं...
और सांई!
यह हिज्र और वस्ल की गाथा
तभी से चली आती हैं
ना खुलकर होंठोंसे निकलती
ना रगोंमें खामोश होती हैं...
वो खामोशी की नदी
मेरी यादमें बहती हैं
और इस किनारे की छातींमें
जब दुसरे किनारे का इश्क धडकता
और बिरहा रगोंमें चलता
मैं उठकर नदीपर जाती हूं
अक्षरोंका सेतू बनाती हूं
पर सेतूपर खडी होती हूं
तो न कोई आर दिखता है
न कोई पार दिखता हैं
सिर्फ एक चिंगारी हैं
जो एक लीला खेलती
और अंधेरेकी छातीमें
वो कभी बुझती, कभी जलती ..
जाने खुदा वो क्या कहतीं हैं
और खामोशी की वो नदी
मेरी याद में बहती हैं...
29 May 2013 - 2:01 pm | लॉरी टांगटूंगकर
धागा प्रचंड श्रीमंत होत चाललाय
आता माझेपण थोडसे,
मी जुन्या स्मृती चाळवू लागलो. त्या जुन्या आठवणींच्या विश्वात मी आश्रय घेतला. माझ्या मनाला त्या मध्ये स्वैर सोडून दिले. परंतु मला ज्या स्मृतींचा दर्शन होत होते, ती एक भूत काळाची तात्पुरती आणि वरवरची झलक होती काय ? भूतकाळात आकाशात विहार करताना कुठूनही कसेही स्मृतींचे अखंड तुकडे पुन्हा पुन्हा उगवत होते आणि मावळत होते. त्या अथांग अवकाशाच्या विस्ताराची कल्पना करता येत नव्हती तिथे जीवनाच्या प्रवाहाची सतत भर पडत होती. पण शेवटी तो जीवन प्रवाह आतून शुष्क बनून जातो म्हणजेच माणसाचा मृत्यू होतो. मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे. भूतकाळाच्या अवकाशातील एक कृष्णविवर आहे. एक शून्य आहे. मर्यादेची कसलीही सीमारेषा नसलेल्या त्या पोकळीमध्ये जिवंत अस्तित्वाचा पूर्ण आभाव असतो. त्यातल्या कृष्ण विवरात आपण एकदा शिरलो, कि तिथून परतीचे मार्ग कायमचे बंद होतात का ? जर आपण स्मृतींच्या अवकाशात भूतकाळात मनाने जाऊन प्रवास करतो तसा वर्तमान काळात पुढे जाऊन नाही का करता येणार ?
लहान पाणी मी आईशेजार उघड्यावर झोपायचो. अवकाशात पसरलेले तारे तारकाविश्व पाहायचो. त्यावेळी माझ्या मनात माणसाचा जन्म, मृत्यू आणि हे अथांग अंतराळातले विश्व याबद्दल विचार उमटायचे. हे विचार मी नेमक्या कोणत्या शब्दात करायचो हे आता आठवत नाही. पण माझ्या सारखी लहान बालके हे विचार करतात हे नक्की. भाषेच्या आधी विचार निर्माण झालेले असतात. विचार हा भाषेला शब्दांचे रूप देतो. भाषा हि नेहमी विचारांची गुलाम असते. स्वच्छ चांदण्यारात्री वर पाहत पहुडलो असताना हळूहळू वरचे ते तारकाविश्व खाली येई. शेवटी ते इतके खाली येई, की हात लांब केला तर त्या चांदण्याला सहज स्पर्श करता यावा. त्यावेळी मला आढळे, की या कोट्यावधी चांदण्या, तारे किती जवळ जवळ ठासून भरलेले आहेत. असे यापूर्वी आपल्याला कधी दिसले नव्हते कि जाणवले नव्हते. त्यावेळी माझ्या मनात येई, ‘या आकाशाच्या घुमटामध्ये मी म्हणजे केवळ एक ठिपका तर नाही ना ?’ डोळे उघडे ठेवून आकाशाकडे पाहताना मी आश्चर्याने भारावून जायचो. शेजारी माझी आई झोपलेली असायची तिचा मंद श्वास मला ऐकू यायचा. वरचे आकाश अत्यंत सावकाश फिरत राहायचे. क्षितिजावर नवीन तारे उदयास येत. पण सप्तर्षी मात्रे नेहमी दिसत राहत. ते कधी अदृश्य व्हायचे नाहीत. त्यांचा आकार मला लांब दांड्याच्या फावड्यासारखा वाटायचा. हे फावडे रात्रभर आकाश नांगरत असे. कशासाठी ? पेरणी करण्यासाठी ? पण तो ध्रुव तारा मात्र अविचल असे. आपली जागा सोडायचा नाही असे का ? बाकीच्या चांदण्याप्रमाणे तो का हलत नाही ? असे त्यावेल माझ्या मनात असे प्रश्न निर्माण होत असत. हे प्रश्न कालच्या स्मृतीमध्ये राहिले आहेत, का माझ्या आजच्या विचारणा त्यावेळच्या प्रश्नांची एक नक्षीदार झालर लाभलेली आहे ? कदाचित दोन्हीही असेल. आजची भाषा हि नक्कीच कालची स्मृती असते.
अन या कवितेबद्दल मी काय लिहिणार
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी
रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतु
वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहिला मी
-अनिल कांबळे
29 May 2013 - 2:16 pm | अक्षया
ही कविता फार छान आहे. या कवितेचे गाणे ऐकले आहे.
29 May 2013 - 4:27 pm | सुहास..
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. >>>
अर्थातच ...काही मिपावरच्या लेखकांचे आवडलेले ऊतारे आणि ओळी चालतील का ? ..तुर्तास मला आवडलेले हे तीन मिपाकरांचे ...
१) नान्या ने केलेले निरूपण...
संत जनाबाई.
महाराष्ट्राच्या भूमीत समाजसुधारणा, भक्तीमार्गदर्शन या हेतुन प्रेरीत होऊन जे अनेक संत होऊन गेले त्यातले एक अग्रणी नाव. नामयाची दासी, दासी जनी, जनी नामयाची यासारख्या अनेक नावांनी स्वतःला संबोधुन विठ्ठल भक्तीत अखंड रममाण झालेली एक स्त्री संत. कधी आवडीने विठ्ठलाचे नाम घेत तल्लीन होऊन भजणारी तर कधी त्याच्यावर संतापणारी जनी. एक ना अनेक अशी तिची रुपे आपल्याला तिच्या अभंगातुन पहायला मिळतात.
कधी विठ्ठलाचे गुणगान करतांना जनी त्याला लेकुरवाळा म्हणते आणि सारे तिचे सखे सोबती हे जणू काही विठ्ठलाची लेकरे आहेत असे समजुन तल्लीनतेने म्हणते -
विठु माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर
गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी
बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा
अहाहा ! काय ही एकेक लेकरे ! प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा कौतुकाने यांना खेळवत असेल हे नि:संशयच. ती वयाने लहान असली तरी समज आणि जाणिवेने महान अशी चौघे दैवी लेकरे आणि त्यांचे सोबती विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर एखाद्या अल्लड नातवाने आपल्या आजोबाच्या अंगावर बागडावे अशाच प्रेमाने आणि आपुलकीने बागडत आहेत आणि जगाच्या दृष्टीने तो सर्वेसर्वा, परमेश्वर असला तरी या नातवांसाठी तो पोराहुन पोर झाला आहे. नातवांना खेळवणे हा खरोखर आजोबांच्या आयुष्यातील आनंदाचाच क्षण असतो.
पण ही मंडळी जरी विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळत असली तरी जनी त्यांना विठ्ठलापासुन वेगळे समजत नाही. जनीच्या दृष्टीने विठ्ठलच विविध मानवी रुपांमधे आला असुन त्याची लीला दाखवत आहे. जनीला हे उमगले आहे की संत हेच देव आणि दगडाचा देव हा केवळ प्रतिकात्मक आहे. पण हे सांगतांना जनी एकापेक्षा एक सुंदर दाखले देते. पाणी, ढग समान आहेत, माती धुळ समान आहेत इत्यादी दा़खले देत जनी म्हणते असेच संत आणि देव समान आहेत. इतक्या सरळसोपेपणाने जनीने सांगितले आहे की अडाण्याहुन अडाण्याला सुद्धा ते चटकन कळावे.
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काय या दोन्हीपणीं वेगळीक
माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन
साखरीं गोडी गोडी साखरेसी । थिजलें तुपासी काय दोन्ही
डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न
वदन ते ओंठ ओंठ तें वदन । क्षेमआलिंगन काय दोन
जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ । आशा आणि लोभ काय दोन
संत तेचि देव देव तेचि संत । म्हणे जनी मात गोष्टी भिन्न
असे साक्षात देवस्वरुप असलेले संत जेव्हा एकत्र येतात तेव्हा विठ्ठल सुद्धा सर्व काम सोडुन त्यांच्यात येउन रहातो. नाम संकिर्तन चालले असतांना विठ्ठल स्वतः त्यात रंगुन जातो तर मानवाची काय कथा ! आणी मग जनी सांगते अशा विठ्ठलाला सुद्धा रंगात रंगवुन टाकणार्या संतानाच शरण जावे. अर्था ज्या संताला शरण जायचे त्याची परिक्षा करुनच मग शरण जावे केवळ भगवी वस्त्रे ल्यायलेल्या मनुष्याला नव्हे.
२ ) चिगो ऊर्फ आमचे मित्रवर्य सुशीभक्तींत रमले होते तेव्हा .... स्साल्याने शेवटच्या वाक्याला फुल्ल सेन्टी केले होते.
स्साला एवढी वर्सॅटॅलिटी जर कुण्या विंग्रजी लिवणार्याकडे असती ना तर लोकं डोक्यावर घेऊन नागडी नाचली अस्ती त्याला.. पण आम्ही साले कर्मदरीद्री.. अरे, नुस्त्या खटल्यांच्या भरवशावर पानं खरडणारे तुम्हाला संमेलनाध्यक्ष म्हणुन चालतात आनी आमच्या सुशिंना "नुस्ते लोकप्रिय" म्हणून अनुल्लेखानी मारणार तुम्ही, भडव्यो !?
सुशिंना मी बर्याच आधी वाचलं. कॉलेजमध्ये असतांना पारयणं केली. नंतरच्या धबगड्यात हे वेड जरा मागे पडलं, पण कॉलेजात असतांना मी एका वहीत एकीकडे सुशिंची पुस्तकं (इश्यु केलेली) लिहित असे आणि बाकी सगळ्यांची दुसरीकडे, पण सुशिंचं परड्म नेहमीच जड होतं.
एकदा मी लायब्ररीतून सुशिंच्या तीन कादंबर्या संध्याकाळी इश्यु करून नेल्या आणि रात्रभरात वाचून पुन्हा आणखी घ्यायला सक्काळी लायब्ररीत गेलो. तिथली बाई बोलली, "तू ह्या सगळ्या पुर्ण वाचल्या !?"
मी बोललो," हो, पुर्ण वाचल्या."
ती बोलली ,"झोपला नाहीस का?"
मी बोललो ," झोपलो की थोडा."
तिला विश्वासच बसेना. म्हणे "नक्की"??
मी पुन्हा हो म्हणालो..
शेवटी ती बोलली, "कमाल आहे !!"
........... त्या वेडीला काय ठाऊक, कुणाची आणि किती कमाल आहे ते?.. जाने दो, दिवाना ही जाने दिवाने की हालत....!
३ ) अरूंधती ताई दंगली चा अनुभव कथन करतात तेव्हा ....
पुढचा अर्धा तास आम्ही कोणीही एकमेकांशी बोललो नाही. कधी नव्हे ते इतके जीव खाऊन पळाल्यामुळे पोटात प्रचंड दुखत होते..... छातीची धडधड अजून थांबली नव्हती.... पळताना उशीर झाला असता तर त्या संतप्त जमावाच्या हाती आपले काय झाले असते ही कल्पनाच करवत नव्हती..... त्या संकटाच्या तुलनेत त्यानंतर उभ्याने करायला लागलेला बसचा प्रवास कस्पटासमान होता. बसच्या खिडकीतून आत येणारी अस्पष्ट वाऱ्याची झुळूक घामट हवेतही शरीराला आणि मनाला आल्हाद देत होती. आपण सुरक्षित आहोत, हातीपायी धड आहोत आणि एका जीवघेण्या परिस्थितीतून सुटून आपल्या घरी परत चाललो आहोत ह्याचेच मनाला हायसे वाटत होते!
दंगल, दंगल म्हणजे काय असते ह्याचा माझ्या आयुष्यातील तो एक अविस्मरणीय अनुभव होता! संतप्त, चिडलेला, आक्रमक जमाव इतक्या जवळून बघायला मिळेल, दगडफेकीचा -लाठीमारीचा असा अनुभव मिळेल असे आयुष्यात वाटले नव्हते! आणि हे सगळे अनुभवूनही आम्ही सर्वजण हातीपायी धड, सुरक्षित होतो हेच एक नवल होते! त्या विस्मयाला उराशी बाळगत आणि दंगलीच्या त्या जीवघेण्या आठवणीला मनातून दूर झटकतच आम्ही पुण्याला घरी परतलो
गैर लागु असल्यास माफी, पण काही मिपाकर्स खरचं टची लिहुन जातात ...वेळ आणि परवानगी असल्यास अजुन टाकतो ..
29 May 2013 - 8:43 pm | मोदक
वेळ आणि परवानगी असल्यास अजुन टाकतो
चेष्टा करतो काय..?? बिन्धास्त टाक!!! :-)
30 May 2013 - 1:41 am | आदूबाळ
सुहास उतार्यांबरोबर दुवे पण द्या की...
29 May 2013 - 8:52 pm | मोदक
मिपाकर चित्रा मॅडमनी एके ठिकाणी लिहून ठेवले होते..
अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर लोकांनी चुकीने, न समजता आरोप केलेले असतात असे आपल्याला वाटत असते. असे आरोप कधी खरे असतात, तर कधी नसतात, तर कधी गैरसमज असतात. कधी अशा व्यक्तींना शूर, किंवा उत्तम किंवा खुजे किंवा दुष्ट किंवा लबाड म्हणून सिद्ध करण्यासाठी म्हणून काहींनी त्यांच्याविषयी लंब्याचौड्या बाता मारलेल्या असतात. अशा आपल्याशी जोडलेल्या लोकांवरचे आरोप दूर करण्याची कधीकधी इच्छा होऊ शकते. जेव्हा ही व्यक्ती या काळात, जितीजागती, रक्ताच्या नात्याने जोडलेली अशी आपल्यासमोर असते किंवा आरोप दूर होण्याशी काहीतरी स्वार्थ जोडलेला असतो, तेव्हा असे आरोप दूर करणे एखाद्याच्या दृष्टीने निकडीचे असू शकते. मात्र जेव्हा अशी व्यक्ती ही अनेक पिढ्यांमागची, लांबची नातेवाईक असण्याची शक्यता असते, तेव्हा अशा काळाने, आहाराविचाराने दूरस्थ अशा व्यक्तीवरचे असे आरोप दूर झाले काय किंवा नाही झाले काय, आपल्या "खुद्द" स्वत:च्या सध्याच्या स्थितीत काहीही ढिम्म फरक पडणार नाही असे बहुदा दिसून येते. उगाच वेळ वाया का घालवा? भारतातल्या ऐतिहासिक गोष्टींत इतकी भेसळ झाली आहे की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. या अशा कथांमधील भेसळीला दूर करून अशा कथेतील ऐतिहासिक सत्य काय असू शकते याचे थोडेफार अंदाज लावण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण तसा करण्याची गरज आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा.
अमोल (जातीवंत भटका) चे एके काळचे गूगल स्टेटस.
गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे !
आजच व्यनीमधून मिळालेले डोस.. ;-)
Effort is very important. But, knowing 'when', 'where', and 'how' to apply it, gets the results 'you want'
आणखी पेस्टवतो आहे..
29 May 2013 - 9:21 pm | मोदक
रामदास काकांचा एक अशक्य प्रतिसाद :-))
सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. याचा अर्थ बोका एकटा झोपत नाही.टाकीवर पुरेशी पकड (ग्रीप)न मिळाल्याने ओरखळे उठतात. काही दिवसानी ओरखळ्यांची नवलाई संपली की तो गपगुमान झोपून राहील. या बाबतीत दुय्यम स्वरुपाचे असे काही प्रश्न मनात येतात. तो झोपण्यापूर्वी वेगवेगळे आवाज काढतो का ? तसे असेल तर प्रकरण नविन आहे. आवाज नसेल तर भाटी जुनीच आहे असे समजा. सिटवर सकाळी केस मिळतात का ते बघा. कदाचीत भाटी येत नसेल पण बोका दाढी करत असेल .केस आढळले नाहीत तर तो बोका नसून भाटी आहे असे समजा .भाटी बोक्यापेक्षा वस्ताद असते आणि तिची नखे तिक्ष्ण असतात. नखांवरून भाटी आहे की बोका ते समजते. अंगपरीक्षा करावयाचा प्रयत्न करू नये.काहीवेळा गळ्यापर्यंत उडी मारून जुगुलर का काहीशा नावाची नस पकडते.जुगुलरचा आणि जुगण्याचा काही संबंध नाही.त्या नसा वेगळ्या . त्यांची नावे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला विचारावी. पराचा अभ्यास बरा आहे असे म्हणतात बॉ. पूर्वी धम्याला पण मांजरी पाळण्याचा षौक होता म्हणे. पण त्याला नोकरी लागली .त्याखेरीज मिपावर एक कृष्णमार्जार प्रेमी नावाचा मुलग्या आहे. त्याला विचारा. तूर्तास त्या मार्जारावर लक्ष ठेवा . ते आत झोपले की वरून मच्छरदाणी घाला. नंतर सिटवर (गाडीच्या ) पाणी ओता. हे पाणी ओतण्यापूर्वी कोसला नावाची एक कादंबरी वाचा. त्यात मांजर हाकलण्या/पकडण्यासाठी एक आख्खा धडा आहे. ह्या धड्यामुळे ते लेखक अजूनही बोक्यासारखी मिशी ठेवतात. हां तर मी सांगत होतो ते पाणी ओतण्यासाठी .पाणी ओतले की कुत्र्याचा पण मूड जातो.पूर्वी असं काही आमच्या घराच्या समोर असं काही आलं की आमचा गडी पाणी ओतायचा ते आठवलं. हां तर मच्छरदाणी. काळ्या रंगाची नको. फार पूर्वी गिरणगावात एकाच रुम मध्ये दोन कुटुंब राहयची तेव्हा काळ्या मच्छरदाणीचा वापर केला जायचा. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल. पाणे ओतल्यावर मार्जार बाहेर येईल .त्याची नखे मच्चारदाणीत अडकतील .मग मच्छरदाणीमें मांजर. त्यानंतर पुण्यात असाल तर लकडीपुलावर जा. लकडीपूल माहीती नसेल तर मिपावर एक लेख आला होता लकडीपूलाचा तो वाचा. तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुचाकी वाहनाला प्रवेश नाही. नो प्रॉब्लेम तुम्ही सरकारी नोकर आहात. तुम्हाला कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला तर तर ....मिपावर पुढचा धागा टाका.
:-)) :-)) :-))
30 May 2013 - 1:47 am | आदूबाळ
संपलो संपलो!! :)) :))
दुवा... दुवा...
असाच एक श्री श्री टारझनभौ यांचा प्रतिसादः
या एका प्रतिसादातच मी टारझनभौंचा "फॅण" झालो :))
31 May 2013 - 10:36 pm | सुधीर
काय भारी कल्पनाशक्ती आहे. हहपूवा :)
1 Jun 2013 - 8:58 am | चौकटराजा
हसून हसुन पोटाची पुरती वाट लागली !!!
1 Jun 2013 - 12:53 pm | मोदक
इस्पीकचा एक्का
29 May 2013 - 9:30 pm | चिगो
भटक्यारावांनी जो लिहीलाय तो
माझ्या माहितीप्रमाणे गोनिदांच्या "दुर्गभ्रमणगाथा" मधला उतारा आहे..
29 May 2013 - 8:53 pm | चिगो
धन्यवाद, मित्रा.. तुझ्यासारख्या जुण्या-जाणत्या मिपाकरानं माझं काहीतरी चोप्य-पस्ते करावं, ह्यातच सारंकाही आलं.. सुशिभक्ती अजूनही सुरु आहे.. फक्त आता बोलत नाही, वाचतोय.. मेघालयात ये, भटकंतीसोबतच ४-५ दिवसतरी बाहेर पडणार नाहीस एवढी "सुशिंभक्ती" मांडतो.. ;-) सध्याचा काऊंट ३४-३५ असेल..
आता मुळ धाग्याबद्दल.. धागा श्रीमंत होतं चाललाय. मलाही "कणा" ही कविता खुप आवडते.. सुरेश भटही आवडीचे. त्यांच्या काही ओळी माझ्या खवत पर्मानन्ट विराजल्या आहेत.. धाग्यावर हिंदी कविताही चालताहेत, हे बघून केलेली ही गुस्ताखी..
"मैनें उसके हाथोंसे सबकुछ छुटतें हुए देखा है
लोगोंको उसके वजूद को, नोंचतें खसोंटते हुए देखा हैं..
कहतें हैं, वो देवताओंसेभी बढकर होती हैं
मैंने तो उसको अपनोंकेही पैरोंमें घसीटते हुए देखा हैं
दिल में जमानेभर क प्यार लिए
उसें आलिशान बंगलोंके कोनों में, सिमटते हुए देखा हैं
देखा हैं उसे, अपने ही बेटों के बीच युं बटते हुए
मैनें इक मां को, बिखरते हुए, टूंटते हुए देखा है.."
29 May 2013 - 10:01 pm | बहुगुणी
अप्रतिम, चिगो! या हिंदी ओळी कुणाच्या आहेत?
31 May 2013 - 7:15 am | बहुगुणी
पाठपुरावा केला म्हणून कळलं की या ओळी चिगो यांच्याच आहेत! बहोत खूब!
31 May 2013 - 1:04 pm | बॅटमॅन
चिगो हे कवीही आहेत तर म्हणजे!!!! भारीच कविता एकदम :)
29 May 2013 - 7:43 pm | इनिगोय
ओतुरचं जग ('दीपावली' दिवाळी २००६)
- अनिल अवचट
ओतूरला दुष्काळ पडतो का?
त्या काळात मला कधीही नदी आटलेली आठवत नाही. बारा महिने वाहणारी नदी होती. आमच्या आडाचं पाणी आटल्याचं आठवत नाही. पण तरीही दुष्काळाची एक आठवतेय घटना, आमच्याच घरात पाहिलेली. सकाळी उठून आम्ही खाली आलो, तर आजी, वडील, आई बोलत उभे. काय झालं? चोरी झाली.
चोर मागच्या भिंतीवरून उडी मारून आले. आणि काय चोरलं? तर रात्रीचं उरलेलं जेवण जेवून गेले! ते इतके सभ्य की जाताना ते ताट-वाटी घासून गेले होते. भिंतीच्या कडेला उभी दोन पितळेची कल्हईची ताटं मला आजही आठवतात.
आजी म्हणत होती, उपाशी होती गं माणसं. मला माहीत असतं तर आणखी ठेवलं असतं अन्न.
असा जमाना, जिथे चोर होते सभ्य.
29 May 2013 - 8:34 pm | किसन शिंदे
अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्री जन्मास आला.
अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मुर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री. त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत. त्याचे खेळणे-खिंदळणेही पुरूषी आहे. त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्री हा ज्वालामूखीचा उद्रेक आहे. अति प्रचंड, अति राकट, अति दणकट अन काळाकभिन्न. रामोश्यासारखा!! पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो. आडदांड सामर्थ्य हेच त्याचें सौंदर्य. तरी पण कधी काळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजुक लेणी घातली. त्याच्या आटीव अन पिळदार देहाला कुणाची दृष्ट लागू नये, म्हणून मराठी मुलखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या. त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला. मनगटांत किल्ले-कोटांचे कडीतोडे घातले. सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरी तो दिसायचा तसाच दिसतो! रामोश्यासारखा! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा!!
सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही. डोळेच फिरतात! मुसळधार पावसांत तो न्हाहू लागला की, त्याच्या खांद्यांवरून धो धो धारा कालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणें, खिदळणें ते! बेहोष खिदळत असतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राजाशिवछत्रपती या बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकात अजिंक्य सह्याद्री या प्रकरणात सह्याद्री जे अप्रतिम वर्णन केलंय त्यातलाच हा थोडासा भाग! माझा अतिशय आवडता!! बाबासाहेबांनी सह्याद्रीला दिलेली तालमीच्या मातीतून अंग घुसळून आलेल्या रामोश्याची उपमा एकदम चपखल. पौष माघाची थंडी सरली कि फाल्गुनातल्या होळीनंतर सह्याद्री आपला राकटपणा धारण करायला सुरूवात करतो ते वैशाख वणवा संपेपर्यंत. जेष्ठात काळ्यासावळ्या मेघांनी भरून आलेलं आभाळ त्याच्या कडेकपार्यांत धो धो कोसळलं की सह्याद्री आपला राकटपणा विसरून हिरव्या पोपटी रंगाची झुल पाघंरायला सज्ज होतो. या सह्याद्रीवर कितीही आणि कोणीही लिहलं तरी ते कमीच! 'गोनीदां' नंतर बाबासाहेबांच हे शब्दसामर्थ्य मला प्रचंड आवडतं.
या राकट दणकट सह्यकड्यांची साक्षात हिमालयासोबत वसंत बापटांनी केलेली तुलना सह्याद्रीचं वेगळेपण दाखवून जाते.
29 May 2013 - 8:43 pm | इनिगोय
तुझ्या स्वाक्षरीतल्या ओळीदेखील सुरेख आहेत. पूर्ण कविता असेल तर दे की इथे..
29 May 2013 - 9:07 pm | किसन शिंदे
नदीच्या किनारी नदीला म्हणावे
तुझे पूर माझ्या नसातून यावे
अभंगात गोडी तुझ्या भाकरीची
तहानेत माझ्या तुला ओळखावे
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल
माझी मराठी माऊली तिची विठोबा साऊली
ज्ञाना, नामा, तुका, एका उभे कैवल्य राऊळी
माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास
माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास
माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ
सळसळती आतून माझ्या रक्तात पिंपळ
कवी – अशोक बागवे
संपुर्ण कविताच सुंदर असली तरी हे कडवं खुप खास!
29 May 2013 - 10:55 pm | कोमल
वा..
खासच हे कडवं पण..
29 May 2013 - 8:56 pm | तिरकीट
व्वा, मोदकराव.... हा आता धागा नाहीये.....
सुंदर गोफ विणल्यासारखा होतोय.......
पुनश्च धन्यवाद.....
29 May 2013 - 9:25 pm | मोदक
"शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे पाणी, दुसर्याचा पाय चुकून लागल्यावरदेखील आपण केलेला प्रथम नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आज्जीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी, दसर्याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणार्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूल हात लागून घाटदार मडके घडावे तसा ह्या अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा!
-- पु ल देशपांडे.
*************************************************************
"स्वतः भुकेला असताना इतर भुकेल्याकडे लक्ष न देता खाणे ही प्रकृती, स्वतःचे पोट भरलेले असताना देखील इतर भुकेल्याकडे लक्ष न देता अजून खाणे ही विकृती, आणि स्वतः खाण्याआधी इतरांच्या भुकेकडे बघणे ही संस्कृती"
*************************************************************
"जो आपल्या कृतीतून संस्कृती निर्माण करतो तो देव, प्रकृती करतो तो मानव आणि विकृती करतो तो दानव".
*************************************************************
नक्की कुठे थांबावे (प्रतिसादामध्ये / अवांतरामध्ये / वादामध्ये) अशा आयडींसाठी.. ;-)
एक तरुण संन्यासी जंगलात तप करीत असताना त्याने सोबत म्हणून एक मांजर पाळले. त्याला नियमित दूध मिळेना म्हणून त्याच्यासाठी एक गाय पाळली. तिच्या शेणाचा दुर्गंध त्याच्या कुटीपासून दूर रहावा म्हणून - आणि वन्य प्राण्यांपासून तिचे संरक्षण व्हावे म्हणून - थोड्या अंतरावर त्या गायीसाठी त्याला एक गोठा बांधावा लागला. गायीला चरायला नेणे, गोठ्याची सफाई वगैरे करण्यात त्याचा फार वेळ जाऊ लागला नि त्याच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला म्हणून हे सगळे काम करण्यासाठी त्याने एक बाई ठेवली. यथावकाश त्याने तिच्याशी लग्न केले.
29 May 2013 - 9:43 pm | मैत्र
प्रवासात आगगाडीतून येताना
शेताच्या लाल लाल बांधावर
दिसला एक हिरवाहिरवागार पोपट.
मग पोपट हिरवेगार उडाला.
पोपट माझ्या मनात शिरला.
पोपट माझ्या मनात फिरला
मन हिरवेगार करीत,
विचार हिरवेगार करीत,
स्वप्ने हिरवीगार करीत.
पोपट बसला खांद्यावर
आणि क्षणभर मी झालो एक हिरवेगार झाड...
मी म्हटले, "मिस्टर पोपट, कसे काय?"
तो म्हणाला, "मिस्टर कवी, कसे काय?"
भलताच मिस्कील होता पोपट.
हिरवाहिरवागार पोपट.
प्रवासभर पोपट बोलत होता खूप.
प्रवासभर मीही बोलत होतो खूप.
पोपट म्हणाला, "मिस्टर कवी, करता काय?"
मी म्हटले, "नोकरी करतो."
पोपट म्हणाला, "नोकरीमध्ये करता काय?"
मी म्हणालो, " नोकरीमध्ये खोटे हसतो.
खोटे बोलतो. बंद गळ्याच्या मठठांना
शहाणे म्हणतो. लाचारांना शूर म्हणतो.
हलकटांना सज्जन म्हणतो.
समर्थाच्या श्वानांना सलाम करतो.
झकास करतो मूल्यांची पोपटपंची.
पहिलीला पगार घेतो :
रहाणीची मान जरा उंच करतो. "
पोपटाने माझ्या डोळ्यांत पाहिले :
मला भलतीच भीती वाटली.
वाटले, हा भूल घालून नेईल मला
हिरव्या हिरव्या पंखांवरून
लाल लाल बांधावर.
माझे एक प्रमोशन ड्यू होते :
पोपटाची मला खूप भीती वाटली.
पोपटाने पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत पाहिले :
डोळे भरून माझ्या डोळ्यांत पाहिले
आणि तो उडून गेला.
हिरव्या हिरव्या पंखांवर
निळे निळे आभाळ झेलीत
लाल लाल बांधाकडे
पोपट एकटा उडून गेला.
--
मंगेश पाडगावकर
९-१०-१९६६
(साहित्य अकादमी विजेता काव्यसंग्रह -- सलाम)
बोरकरांच्या काव्याबद्दल लिहिताना जे कालातीतपणाची भावना येते त्याचाच प्रत्यय पाडगावकर अनेकदा देतात.
गुरू शिष्य शोभतात आपापल्या वेगळ्या शैलीतही..
परंपरागत आणि झूल पांघरलेली सफेद कॉलर कामे करताना अचानक हापिसातल्याच प्रदर्शनात हा काव्यसंग्रह आणि हे रत्न हाती लागले. ६६ सालची अतिशय जुन्या वातावरणातली मुंबई आणि आज जवळजवळ ५० वर्षांनंतर कुठल्याही इतर ठिकाणी तीच जाणीव टचकन करून देणार्या अतिशय साध्या शब्दातल्या ओळी...
29 May 2013 - 9:45 pm | फिरंगी
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.
वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही
गांजणार्या वासनांची बंधने सारी तुटावी.
संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे, लोचने आता मिटावी.
सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.
काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी ?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !
29 May 2013 - 10:26 pm | बहुगुणी
इथले अनेक शब्दप्रभू अफाट लिहून जातात...रामदास, सहजराव, बिका, भानस...यादी मोठी आहे...
'बामनाचं पोर' या नावाने पूर्वी लिहिणार्या सदस्याने (आता त्यांनी आय डी बदलला आहे की काय हे माहीत नाही, त्यांचं नवीन लिखाण वाचल्याचं आठवत नाही) एका प्रतिसादात खालील ओळी लिहिल्या होत्या:
.. आयुष्य म्हणजे आजवरच्या श्वासांची बेरीज नव्हे तर श्वास विसरायला लावणार्या, रोखून धरलेल्या क्षणांची बेरीज....
29 May 2013 - 10:36 pm | मैत्र
#बहुगुणी... थोडे हिंदी.. खास तुमच्यासाठी..
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते
जब कोइ तागा टुट गया या खत्म हुआ
फिर से बांध के
और सिरा कोई जोड़ के उसमे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
इक भी गांठ गिराह बुन्तर की
देख नहीं सकता है कोई
मैनें तो ईक बार बुना था एक ही रिश्ता
लेकिन उसकी सारी गिरहें
साफ नजर आती हैं.. मेरे यार जुलाहे
मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे...
30 May 2013 - 1:36 am | बहुगुणी
या गुलझारच्या काही त्रिवेण्या:
************
तमाम सफहे किताबोंके फ़डफ़डाने लगे
हवा धकेल के दरवाजा आ गयी घर में
कभी हवा की तरह तुम भी आया जाया करो!
************
सारा दिन बैठा मैं हाथ में लेकर खाली कास
रात जो गुज़री, चांद की कौडी डाल गयी उसमें
सूदखोर सूरज कल मुझसे ये भी ले जायेगा!
***********************
सामने आये मेरे, देखा मुझे, बात भी की
मुस्कराए भी, पुरानी किसी पहचान की खातिर
पुराना अखबार था, बस, देख लिया, रख भी दिया!
*************
ज़मीं भी उसकी, ज़मीं की नेमतें उसकी
ये सब उसी का है, घर भी, ये घर के बंदे भी
खुदा से कहिये, कभी वो भी अपने घर आये!
***************
कभी कभी बाज़ार में यूं भी हो जाता है
कीमत ठीक थी, जेब में इतनें दाम नही थे
ऐसे ही इक बार मैं तुम को हार आया था!
************
वह जिस सांस का रिश्ता बंधा हुआ था मेरा
दबा के दांत तले, सांस काट दी उसने
कटी पतंग का मांझा मुहल्ले भर मे लुटा!
************
चुडी के टुकड़े थे, पैर में चूभते ही खूं बह निकला
नंगे पांव खेल रहा था, लड़का अपने आंगन में
बाप ने कल दारू पी के मां की बाह मरोडी थी!
************
बुड बुड करते लफ्जों को चिमटी से पकड़ो
फेंको और मसल दो पैर की ऐडी से
अफवाहोंको खूं पीने की आदत है!
****************
30 May 2013 - 1:53 am | आदूबाळ
मनाला चरा पाडून गेली ही त्रिवेणी...
1 Jun 2013 - 4:34 pm | इनिगोय
ही एक अतिशय आवडती रचना आहे! आभार..
29 May 2013 - 10:57 pm | मोदक
सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम,
लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्याला सलाम,
न बघणार्याला सलाम,
विकत घेणार्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणार्याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.
वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्या त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और बहनों,
सबको सलाम.
ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्या राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्या जादुगारांना सलाम,
भाईयों और बहनों सबको सलाम.
नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मगलरला सलाम,
मट्केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीला बी सलाम,
ठोकरशाहीला बी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या, गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बाँब फेकणार्याना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्यांना सलाम,
काळाबाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्यांना सलाम,
तिरडीचे सामान विकणार्यांना सलाम,
तिरडी उचलणार्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों,सबको सलाम.
बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम,
धंद्यांच्या मालकाला सलाम,
युनीयनच्या लीडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्या प्रत्येक हाताला सलाम,
सलाम,भाईयों और बहनों,सबको सलाम.
या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्यांना सलाम,
या बातम्या वाचाणार्या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाईयों और बहनों,सबको सलाम.
सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणार्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन काढतील
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम प्यारे भाईयों और बहनों,सबको सलाम.
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाईयों और बहनों,सबको सलाम.
------------------मंगेश पाडगांवकर
29 May 2013 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
बा मोदका, फार्फार भारी आयडिया काढलीस !
हा धागा एक कायमची वाचनखूण झाली आहे !!!
30 May 2013 - 1:25 am | लॉरी टांगटूंगकर
रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक उल्लाह खान यांच्यातली ही जुगलबंदी आणि त्यातून तयार झालेल्या या अमर काव्याचा जन्म,
एका सभेमध्ये बिस्मिलच्या शायरीच उत्तर अश्फाकने आपले उस्ताद जिगर मोरादाबादीच्या गझलेच्या कडव्यातून दिलेलं,
बिस्मिल म्हणाले होते,
बहे बहरे-फना में जल्द या रब! लाश 'बिस्मिल' की।
कि भूखी मछलियाँ हैं जौहरे-शमशीर कातिल की।।"
( या बहरून उठलेल्या अंतकाळात माझे शव वाहून जाउदे;
की भुक्या मासोळ्या शत्रूच्या तलवारी प्रमाणे आहेत)
आमेन असं म्हणून अश्फाक म्हणतात
"कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है।
जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है।।"
अश्फाक आर्य समाज मंदिरात बिस्मिलकडे काही कामानिमित्त गेलं असताना एक गझल गुणगुणत होते.
"कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है।
जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है।।"
शेर ऐकून बिस्मिलने स्मितहास्य केलं असतं अश्फाक ने विचारले की मी काही चुकीचं बोललो काय, तर बिस्मिल म्हणतात की असा भाग नाही मिर्जा गालिबच्या जुन्या जमिनीवर एखादा शेर सांगितला म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. अजून काही रंगवलं असतं तर आम्ही पण इर्शाद म्हणलो असतो. अश्फाक काहीशा आव्हान देणाऱ्या स्वरात म्हणले की "तो राम भाई! अब आप ही इसमें गिरह लगाइये, मैं मान जाऊँगा आपकी सोच जिगर और मिर्ज़ा गालिब से भी परले दर्जे की है" त्यावेळेस बिस्मिल साहेब म्हणतात
"सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।
देखना है जोर कितना बाजु-कातिल में है?"
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बांजुए कातिल में है l
करता नहीं क्यूं दूसरा कुछ बातचीत,
देखता हूं मैं जिसे वो चुप तेरी महफिल में है
ए शहीद-ए-मुल्क-ओ-मिल्लत मैं तेरे ऊपर निसार,
अब तेरी हिम्मत का चरचा गैर की महफिल में है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l
वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमान,
हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है
खैंच कर लायी है सब को कत्ल होने की उम्मीद,
आशिकों का आज जमघट कूच-ए-कातिल में है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l
है लिये हथियार दुशमन ताक में बैठा उधर,
और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर.
खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है,
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l
हाथ जिन में हो जुनून कटते नही तलवार से,
सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से.
और भडकेगा जो शोला-सा हमारे दिल में है,
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l
हम तो घर से निकले ही थे बांधकर सर पे कफ़न,
जान हथेली पर लिये लो बढ चले हैं ये कदम.
जिन्दगी तो अपनी मेहमान मौत की महफिल में है,
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l
यूं खडा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उडा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहां मंज़िल में है l
वो जिस्म भी क्या जिस्म है जिसमें ना हो खून-ए-जुनून
तूफानों से क्या लडे जो कश्ती-ए-साहिल में है,
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बांजुए कातिल में है l
(बिसमिल अजीमाबादी)
30 May 2013 - 1:48 am | मोदक
__/\__
झोप उडवलीस बे मंद्या!!!!!
30 May 2013 - 2:16 am | किसन शिंदे
आमीरच्या रंग दे बसंती मध्ये अतुल कुलकर्णी आणि कुणाल कपूर यांनी अनुक्रमे रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक उल्लाह खान छान रंगवले होते.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बांजुए कातिल में है
अतुल कुलकर्णीने रामप्रसादच्या भुमिकेसाठी आपली निवड व्हावी म्हणून या ओळी गोर्या मड्ड्मला म्हणून दाखवलेल्या आठवल्या.
30 May 2013 - 3:52 am | फारएन्ड
मस्त! याचीच एक व्हर्जन - कदाचित विडंबन- 'गुलाल' चित्रपटात तो पीयुष मिश्रा गाताना दाखवला आहे. त्याचे शब्दही इंटरेस्टिंग होते.
30 May 2013 - 1:41 pm | प्यारे१
__/\__
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!
किमान ह्या शब्दांसाठी तरी देशातल्या प्रत्येकानं थोडं प्रामाणिक व्हावं.
30 May 2013 - 2:55 pm | कोमल
जबरदस्त रे..
रोमांच उठले..
__/\__
30 May 2013 - 5:04 am | यशोधरा
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले
वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल
मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल
विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल
सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल
जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल
जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
- सुरेश भट
1 Jun 2013 - 4:36 pm | इनिगोय
अरे वा! ही आली का इथे!
क्या बात!
30 May 2013 - 12:39 pm | सानिकास्वप्निल
कविता महाजन ह्यांच्या भिन्न कादंबरीतूनः
मी हमसत धूमसत जितूचे हात गच्च पकडून अस्मिताच्या मांडीवर कोसळले. रडत रडतच म्हणाले, मला एड्स झालाय!....
" भला मोठा लांबरुंद रस्ता. डांबरी. काळा-करडा. बाजूनं फूटपाथ काळ्या घडीव दगडांचे. प्राण्यांची प्रचंड मोठी झुंड... एक झुंड नव्हे, अनेक झुंडी धावत येताहेत. रस्ता पूर्ण भरून गेलाय. एनलार्ज केलेल्या आकृत्यांसारखी घसघशीत मोठ्या आकारांची जनावरं. भली मोठी वळणदार शिंग. म्हशींसारख्या रुंद पाठी, पण भरपूर उंच मजबूत दणकट काळेभोर प्राणी. रानडुकरांसारखी त्वचा... चांगलीच जाड, केसाळ. वेगानं ताठलेले दिसताहेत त्यांचे अंगभरचे केस. घोड्यांसरखा तुफान वेग आहे त्यांच्या धावण्याला. त्यांच्या आकारमानाला न शोभेसा. आणी त्यांच्या काळ्या गोंडेदार शेपट्या जाडजूड विणलेल्या दोरखंडासारख्या टणक लहरताहेत हवेत सणसणीत गोफणीसारख्या.
मी फूटपाथवर अंग चोरून उभी. मागे खूपच खूप उंच घरं आहेत. इंग्लिश धाटणीची वाटतात. एकसारखी. सगळं दगडी बांधकाम आहे. चिरेबंदी. कातीव. दारंखिडक्या दिसतच नाहीत. मी शोधतेय. कुठून आत शिरता येईल का बचाव करण्यासाठी. पण नुसती नजर फिरतेय सगळीकडे आणी मावळत जाताहेत सार्या शक्यता. काही हालचाल करण्याची हिंमत होतच नाही. कुठल्याही क्षणी हे झुंड फूटपाथवर येईल. किंवा झुंडीतला एखादा चुकार प्राणी मला शिंगावर उचलून घेईल. त्या जाड शेपटीनं मान आवळून टाकील. किंवा आपल्याच धुंदीत ते तुडवत जातील मला त्यांच्या टपोर कडक दगडी टाचांखाली. खाली वर आजूबाजूला सगळीकडे दगड. आणी मी मृदू मांसल स्पंजी नरम गरम लालबुंद रक्तानं थबथबलेली.
चेंदामेंदा."
30 May 2013 - 5:47 pm | बाळ सप्रे
१. Specialization is knowing more and more about less and less until one knows everything about nothing. :-) (Vice versa for generalization)
२. दूरदर्शनवर विज्ञानावर आधारीत एक माहीतीपूर्ण कार्यक्रम होता "Turning Point". त्यात शेवटी प्रश्नोत्तरे असत. हा प्रश्न आणि त्याला दिलेलं उत्तर एकदम लक्षात राहील असं होतं. उत्तर बहुतेक जयंत नारळीकर यांनी दिलं होतं. प्रश्न होता जसं Kidney, heart transplant करतात तसं भविष्यात Brain transplant करता येईल का?
उत्तर होतं - You can get new heart, kidney but not brain, because YOU are the brain. Brain transplant will mean somebody else getting your body.
30 May 2013 - 6:39 pm | आदूबाळ
टर्निंग पॉईंट प्रा. यशपाल चालवायचे ना?
31 May 2013 - 9:47 am | बाळ सप्रे
हो.. त्यात वेगवेगळे शास्त्रज्ञ, प्राध्यापक पाहुणे म्हणून येत आपआपल्या विषयावर बोलायला आणि प्रश्नोत्तरांसाठी..
30 May 2013 - 8:56 pm | कोमल
उनकी याद करें…
जो बरसों तक लड़े जेल में, उनकी याद करें।
जो फाँसी पर चढ़े खेल में, उनकी याद करें।
याद करें काला पानी को, अंग्रेज़ों की मनमानी को,
कोल्हू में जुट तेल पेरते, सावरकर से बलिदानी को।
याद करें बहरे शासन को, बम से थर्राते आसन को,
भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, के आत्मोत्सर्ग पावन को।
अन्यायी से लड़ें, दया की मत फरियाद करें।
उनकी याद करें।
याद करें हम पुर्तगाल को, ज़ुल्म सितम के तीस साल को,
फौजी बूटों तले क्रांति को, सुलगी चिनगारी विशाल को।
याद करें सालाज़ारों को, ज़ारों के अत्याचारों को,
साइबेरिया के निर्वासित, शिविरों के हाहाकारों को।
स्वतंत्रता के नए समर का शंख निनाद करें।
उनकी याद करें।
बलिदानों की बेला आई, लोकतन्त्र दे रहा दुहाई।
स्वाभिमान से वही जियेगा, जिससे कीमत गई चुकाई।
मुक्ति माँगती शक्ति संगठित, युक्ति सुसंगत, भक्ति अकम्पित,
कृति तेजस्वी, धृति हिमगिरि-सी, मुक्ति माँगती गति अप्रतिहत।
अंतिम विजय सुनिश्चित, पथ में क्यों अवसाद करें?
उनकी याद करें।
-श्री अटलबिहारी वाजपेयी
30 May 2013 - 9:25 pm | तिरकीट
आता वाटतं की नऊ नऊ महिने घेणार एक एक शब्द यायला
आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला
एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस
आता वाटतं – नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला
आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ,
कसे सचैल भिजायचो इतके दिवस – मजा वाटते आहे !
काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा
अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे …
आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला
थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही
आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास
प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही !
भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो – क्षमा !
बहरून आला होतात त्या उद्यानांनो – क्षमा !
झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात
पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे !
पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो
यावर आता विश्वास ठेवायचा फक्त …
हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे
थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं,
आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त !
- मौनाची भाषांतरे, संदिप खरे
31 May 2013 - 10:24 am | दिपक
दुवा - http://kahitarinavinahe.blogspot.in/2011/03/blog-post_24.html
31 May 2013 - 10:55 am | मोदक
निव्वळ अप्रतीम!!!!!!!!!
31 May 2013 - 11:11 am | मदनबाण
जबरदस्त !
31 May 2013 - 2:12 pm | किसन शिंदे
क ड क!!
_/\_
31 May 2013 - 2:45 pm | बॅटमॅन
कडक!!!!!!! लैच जब्री अणभव _/\_
31 May 2013 - 11:55 am | आदूबाळ
टूटे हुए चूड़ियों से जोड़ूं ये कलाई मैं |
पिछले गली में जाने क्या छोड़ आई मैं ||
बीती हुई गलियों से | फिर से गुज़रना ||
पैरों में ना साया कोई सर पे ना साये रे |
मेरे साथ जाये ना मेरी परछांई रे ||
बाहर उजाड़ा हैं | अन्दर वीराना ||
यारा सीली सीली बिरहा की रात का जलना |
ये भी कोई जीना हैं | ये भी कोई मरना ||
- गुलजा़र
31 May 2013 - 1:21 pm | इनिगोय
आणि लता!!
31 May 2013 - 2:35 pm | गवि
एकदा शांत वेळी हे गाणं लागलं, अंधार होता आणि एकदम डोळ्यात पाणी येईल इतकं ओढून घेतलं गाण्याने. एरवी कधी असं होत नाही सहसा, पण या गाण्याबाबतीत झालं बुवा..
31 May 2013 - 3:11 pm | किसन शिंदे
वाहवा..
आणि ह्रदयनाथ मंगेशकर!!
31 May 2013 - 5:29 pm | आदूबाळ
ही मूळ धून हिंदुकुशाच्या डोंगराळ भागातली आहे.
31 May 2013 - 1:04 pm | यशोधरा
कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे
आतआतूनी दाटून आली विस्मृत काही स्मरणे
दूर कुठेतरी जशा हालती मंदपणे तरुशाखा
तसेच काही आत जाणवे मंद मंद हुरहुरणे
काळोखावर उअमटत जाता प्रकाशटिंबे ओली
एक एक चांदणीसंगती खोल उसासा भरणे
वाहत येता झुळ्झुळ वार, वास जुईचा ज्वाला
त्या गंधासह गीत पुराणे ओठांवर थरथरणे
भोवताल तिमिरात बुडाले अशा सुन्न एकांती
अलग स्वतःला करणे आणिक फक्त एकटे उरणे
- शांता शेळके
31 May 2013 - 1:52 pm | सुधीर
चांगला धागा सुटला होता. फुरसत मध्ये सगळे प्रतिसाद वाचावे लागतील. वि. स. खांडेकर ययाति आणि अमृतवेल मधून भावून गेले. स्वतःसाठी म्हणून खांडेकरांचे कोटस मी माझे मलाच मेल करून ठेवले होते. या धाग्याच्या निमित्ताने तो मेल इथे चिटकवतो.
"भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरूडपंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं, म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी, त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नांमागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळे!" - (अमृतवेल - मेहता पब्लिशिंग हाऊस)
" ... या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. सा-या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -- प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वतःचाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात..."- (अमृतवेल - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुस-याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी" - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"मृत्यू हा अष्टौप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे; त्याला ह्या जगात कोणीही विरोध करू शकत नाही." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"मृत्यू हा जीवनाला जितका अप्रिय, तितकाच अपरिहार्य आहे. तो सृष्टिचक्राचा जन्माइतकाच नाट्यपूर्ण आणि रहस्यमय भाग आहे. वसंत ऋतूत वृक्षावर हळूच डोकावणारी तांबूस, कोमल पालवी जशी आदिशक्तीची लीला आहे तशी शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्णं ही सुद्धा तिचीच क्रीडा आहे. या दृष्टीनंच आपण मृत्यूकडे पाहिले पाहिजे. उदयास्त, ग्रीष्म-वर्षा, प्रकाश-छाया, दिवस-रात्र, स्त्री-पुरुष, सुख-दु:ख, शरीर व आत्मा, जन्म आणि मृत्यू या सर्व अभेद्य जोड्या आहेत. जीवनाच हे द्वंदात्मक व्यक्त स्वरूप आहे. या सर्व आडव्या-उभ्या धाग्यांनीच आदिशक्ती विश्वाच्या विलासाची आणि विकासाची वस्त्र विणीत असते." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"जीवन हे नेहमीच अपूर्ण असतं, तसं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नये. खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं. निरपेक्ष असतं; मग ते फुलावर असो, प्राण्यावरलं असो, सृष्टीसौंदर्यावरलं असो, आईबापांवरलं असो, प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यावरलं असो, कूल, ज्ञाती, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो; नि:स्वार्थी, निरपेक्ष, निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते, असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
"जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे! कर्तव्याला कठोर व्हावं लागतं. पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे." - (ययाति - मेहता पब्लिशिंग हाऊस)
31 May 2013 - 3:08 pm | मूकवाचक
शब्दक्रम
मोरूने आधी एक ओळ लिहिली...
मोरूने आधी एक ओळ लिहिली:
'गुंडांच्या तावडीमध्ये लोकशाही'.
मग मोरू गंभीरपाने म्हणाला:
"गुंडांच्या तावडीतून लोकशाही सोडवायला,
शब्दांचा क्रमच आता बदलून टाकतो!"
शब्दांचा क्रम, मोरू बदलू लागला...
तावडीमध्ये गुंडांच्या लोकशाही!
लोकशाही, गुंडांच्या तावडीमध्ये!
गुंडांच्या, लोकशाही तावडीमध्ये!
लोकशाही तावडीमध्ये गुंडांच्या!
शब्दांचा क्रम जरी बदलला, तरीसुद्धा,,,
गुंडांच्याच तावडीमध्ये लोकशाही?
थक्क होऊन मोरूने आरशात पाहिले...
थक्क होऊन, मोरूने आरशात पाहिले.
आपला मोरू झालेला त्याला दिसला.
- मंगेश पाडगावकर
31 May 2013 - 3:34 pm | अनुप ढेरे
फारुख शेख वर चित्रित झालेलं हे गाणं...
सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है
दिल है तो, धड़कने का बहाना कोई ढूंढें
पत्थर की तरह बेहिस-ओ-बेजान सा क्यों है
तनहाई की ये कौन सी, मंजिल है रफीकों
ता-हद-ये-नज़र एक बयाबान सा क्यों है
क्या कोई नयी बात नज़र आती है हममें
आईना हमें देख के हैरान सा क्यों है
चित्रपटः गमन
31 May 2013 - 4:26 pm | प्यारे१
आमचे मित्र, तत्ववेत्ते नि मार्गदर्शक मा. श्री. मोदकराव (हो आपले धागाकर्तेच) ह्यांनी वादकौमुदिनी ह्या दीर्घांकात आंतरजालासंदर्भात मांडलेले काही विचार ;)
______________________________________________________
आपल्याला साधारणपणे ६ व्या ७ व्या वर्षी कळायला लागते व हळूहळू अक्कल येवू लागते. स्वभावाची जडणघडण तर गर्भामध्येच सुरू होते. आपली पुढच्या आयुष्यातली सर्व मते व विचार हे त्या त्या वेळी आलेल्या अनुभव + आपला स्वभाव यांवर अवलंबून असतात.
एखाद्याचा स्वभाव हेकट असेल व त्याला एका व्यक्तीककडून (त्याच्या दृष्टीने!) वाईट अनुभव आला तर ती व्यक्ती टुकार आहे हे मत लगेचच तयार होते व त्या व्यक्तीबाबतचे ते मत पसरवण्यामध्ये / समविचारी लोक शोधण्यामध्ये मेंदू गुंततो - हे सर्वसाधारण उदाहरण आहे.
अंतर्जालावर आपली मते रेटताना कुठे थांबावे हे कळणे फेस टू फेस वादापेक्षा वेगळे अस्ते कारण इथे समोर कोणी नसतो. फक्त मी आणि माझी स्क्रीन त्यामुळे विचार मांडताना ते साहजीकच टोकदार होतात. (मॅनेजरला किंवा अगदी हाऊसकीपींगला आपण आपल्या जागेवर जरी मनातल्या मनात शिव्या घालत असलो किंवा हार्ष बोलायचे ठरवत असलो तरी प्रत्यक्षात वयाचा आदर आणि समोरच्या माणसाला माणसाप्रमाणे वागवण्याचे संस्कार आडवे येतात व "मेसेज" पोहोचविला जात असला तरी तो थोडा आपुलकीने व गोडव्याने पोहोचविला जातो)
आणखी एक मुद्दा अहंकाराचा. मला अहंकार नाही - टॅबू नाही वगैरे म्हणणार्या मंडळींना "मला अहंकार नाही" या गोष्टीचा जास्त अहंकार असतो. आपण सर्वजण मर्त्य मानव आहोत. आहार निद्रा भय मैथून या चारही गोष्टींच्या आहारी जातो ही वस्तुस्थिती आहे, ही व अशा प्रकारची वस्तुस्थिती नाकारायचे काहीच कारण नसते मात्र निव्वळ अहंकारापायी एखादा मुखवटा चढवला जातो. या अहंकाराच्या जोडीला आपली भलावण करणारे चार लोक असतील तर क्या बात है!!
अशा परिस्थीतीमध्ये आपण लोकांची मते बदलण्यासाठी वेळ देणे कितपत शहाणपणाचे आहे? बरं वेळ देत असलीस तरी तू किती वेळ देणार? तो पुरेसा आहे का..? आणि असला तरी त्यातून साध्य काय..? वेळ घेणारी व्यक्ती खरोखरीच तुझी मते वाचून, नीट समजून स्वीकारेल हे शक्य आहे का..? विशेषतः वरती जे विचार निर्मीती चे सांगीतले आहे त्यावरून..
आणखी एक गोष्ट असते.. "मला तुझा आत्ता मुद्दा पटला आहे, परंतु मी सुरूवातीला विरूद्ध मत दर्शवले होते मग मी आत्ता तुझे म्हणणे मान्य करणे हा माझा पराभव ठरेल" हा माईंडसेट.
मी माझ्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीशी / बायकोशी वाद घालताना हा माईंडसेट पकडून चालणार नाही कारण मला जन्म त्यांच्या / तिच्या सोबत घालवायचा आहे. पण अंतर्जालावर काय.. अमुकशी मी बोललो काय आणि नाही काय.. मला फरक पडणार आहे का..?? (किंवा मोदकला डिलीट करून तुला फरक पडणार आहे का..??)
याचे उत्तर बहुदा नाही असेच असते कारण आपण येथे नाती जोडायला येत नाही. त्यामुळे वाद घालताना शब्दाचे कीस पाडत वाद वाढत जातात आणि अकारण आपली शक्ती वाया जाते. माणसे तुटतात ती वेगळीच! बरं.. ही शक्ती विधायक कामात लागत असेल तर ठीक आहे.. पण तू माझी मते बदलून किंवा मी तुझी मते बदलून मिळणार काय..?
आजच्या वादामध्ये मी तुला गप्प केले आणि माझा प्रतिसाद शेवटचा ठरला याचे तथाकथीत समाधान!!
31 May 2013 - 4:49 pm | लॉरी टांगटूंगकर
क्या बात, क्या बात है !!!!!!!!
हे मोदकरूपी हिऱ्याचे सुवर्णमढीत विचार नजरेस येण्यासाठी प्यारे सारखी जवहीर्याचीच नजर पाहीजे...
31 May 2013 - 4:57 pm | बॅटमॅन
मान गये...प्यारे की पारखी नज़र और मोदक सुपर, दोनोंको ;)
ऑन अ सिरिअस नोट, मार्मिक लिहिलंय एकदम!!
31 May 2013 - 5:51 pm | पिलीयन रायडर
अध्ये मध्ये मोदकाने ही हे वाचत जावे अशी वेळ आलीये काय!!!
(मी रोज वाचते...)
- वादकौमुदिनी
31 May 2013 - 7:40 pm | मोदक
अजून नाही.. ;-)
31 May 2013 - 8:28 pm | निशिगंध
पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं
शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
- कुसुमाग्रज
1 Jun 2013 - 2:51 pm | मूकवाचक
धर्मानुशासन आजच्या मानवास पेलणेच शक्य नाही. त्याला पेलू शकतील एवढी धर्मबंधने शिथील केली, तर त्या अवस्थेत धर्मालाच रूप उरत नाही असे दिसेल. आजचा मानव म्हणूनच धर्माचे विडंबन करतो. धर्म नको म्हणणारा, धर्माचा द्वेष करणारा किंवा त्या उलट धर्माचे अवडंबर माजवणारा माणूस आज म्हणूनच पहावयास मिळतो. असे होण्यात विशेषेकरून त्याचा सत्यासमीप जाण्याचा स्वभावच उचंबळून आलेला असतो. आपण पौरूषहीन आहोत, हे ही त्याला मान्य नसते. अशा वेळी तो स्व-अस्मितेचा उदघोष करून, खोटेपणाने आपली न्यूनता झाकणारी विचारप्रणाली स्वीकारत असतो. 'धर्म नको' असे म्हणणे हे याच विचारप्रणालीचे रूप आहे.
आज सर्वत्र याच विचारप्रणालीचा हैदोस सुरू आहे. तथापि अशाही अवस्थेत, मानवाला सत्यासमीप नेणारी अशी काही सहजगम्य व्यवस्था संभवते का, हे शोधणे अत्यावश्यक झाले आहे. आजच्य शुष्कपौरूष मानवसमाजात निग्रह, संयम, दमन, पराक्रम इ. थोर धर्मांचा जरी क्षय दिसत असला, तरी आजच्या मानवामध्ये सत्यप्रीती (त्याला वाटते तशी!), प्रत्यक्ष निष्ठा, जीवनावरील प्रेम, ऐहिक भोगातील समता अर्थात् सुखदु:खातील आणि न्यायव्यवस्थेतील समता या गोष्टींची विशेष आवड आहे. ही दृष्यस्थिती दिव्य आचारांपेक्षा वास्तव विचारांकडे विशेष झुकलेली आहे, असे म्हणावे लागते.
हाच धागा धरून, शास्त्रीय जीवननिष्ठा म्हणजेच धर्म असा पर्याय स्थिर करून, जीवनवादाचा सिद्धांत आजच्या समाजास दिला पाहिजे. जीवनातील शास्त्रीय व्यवस्था जर आपल्या आचरणातून प्रकट करता आली तर 'शास्त्रनिष्ठेद्वारे धर्मानुशासन' या ऐवजी 'धर्मस्वरूप शास्त्रानुशासन' हे मानवसमूहाच्या उत्थानासाठी आज हिताचे आहे असे स्पष्ट दिसेल.
- 'संतधर्म जीवनदर्शन' - श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर
1 Jun 2013 - 3:24 pm | मूकवाचक
भारतीय तत्वचिंतन हे केवळ चिंतनासाठी चिंतन नसून त्याचा वापर प्रत्यक्ष जीवनात घडावा अशी अपेक्षा असते. या जीवनाच्या आचारालाच धर्म म्हणतात. तत्वज्ञानाची धर्माशी सांगड असणे हे भारतीय तत्वज्ञानाचे - दर्शंनांचे वैशिष्ट्य आहे. पाश्चात्य तत्वचिंतन हे धर्माशी संबंधित नाही, ते स्वतंत्र आहे. म्हणून त्या चिंतनातून जीवनप्रणाली निर्माण झालेली नाही. निष्प्राण, कोरड्या चिंतनापेक्षा, ज्यामुळे जीवन प्रगल्भ होईल असे व्यवहार्य, आचारप्रेरक चिंतन याचेच महत्व भारतीयांना वाटते. कारण सत्याधिष्ठित जीवनाचीच प्रतिष्ठा मानण्यात येते. तत्य हे जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. 'सत्ये सर्वं प्रतिष्ठितम्' हा भारतीय जीवनाचा मूलमंत्र आहे. म्हणून भारतीय तत्वचिंतनात विज्ञान, तत्वज्ञान आणि धर्म यांच्यामधे सुसंवाद प्रस्थापीत करण्याचे सामर्थ्य आहे.
भारतीय दर्शने विविध असली तरी त्यांच्याकडे पाहण्याचा समन्वयात्मक दृष्टीकोन भारतीय तत्वज्ञानामध्ये मुळातच आहे. जे काही सत्य तत्व आहे, त्याकडे निरनिराळ्या पायर्यांवरून किंवा दृष्टीकोनांतून पाहता येते, त्याचे दर्शन घेता येते. त्यामुळे दर्शनांमधे वैविध्य असले तरी, त्या त्या भूमिकांवरून घडते ते सत्यदर्शनच होय. म्हणून सर्व दर्शंनांमध्ये सत्याचा ग्राह्य भाग असतोच. त्यामुळे आपल्याकडे 'षड्दर्शन्-समुच्चय-संग्रह' यासारखे ग्रंथ निर्माण झाले. भारतीय सर्व दर्शने मिळून समन्वयात्मक एक चित्र दिसते ही भारतीय चिंतनाची विशेषता आहे. 'एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति', म्हणजे सत्य एकच आहे, पण त्याची दर्शने विविध घडल्याने त्याची वर्णने बहुप्रकारांनी केली जातात. हा मुळातला ॠग्वेदाचा विचार भारतीय प्रगल्भ जीवनदृष्टीचा दर्शक आहे. संपूर्ण जीवनाचा साकल्याने विचार करणारी 'पुरूषार्थ कल्पना' ही एक फार महत्वाची अशी भारतीय जीवनदृष्टी आहे. दार्शनिक विविधतेतही ही एकता आहे. हे चार पुरूषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे होत.
'धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजा:' (महाभारत) - ज्यामुळे सर्व प्रजेची, सृष्टीची धारणा होते त्या व्यवस्थेला धर्म असे म्हणतात. 'धर्मोSस्य विश्वस्य जगतः प्रतिष्ठा' - म्हणजे स्थावरजंगम अशा सर्व विश्वाची प्रतिष्ठा म्हणजे धर्म होय. धर्म हा कोणा प्रेषिताने, श्रेष्ठ पुरूषाने निर्माण केलेला नाही. ती नैसर्गिक व्यवस्था आहे. या अर्थाने धर्म अपौरूषेय आहे. सर्व मौलिक सत्य अपौरूषेयच असते. त्याचा द्रष्टा कोणी असामान्य असू शकतो. जसे वैदिक ऋषी होते. सर्व चराचर सृष्टीशी तादात्म्य पावणारा हा धर्म व त्यातून उदित झालेली 'वसुधैव कुटुंबकम्' ही विश्वकुटुंबवादी जीवनदृष्टी ही भारताची उत्तुंग महानता आहे.
- 'संतधर्म जीवनदर्शन' - श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर
1 Jun 2013 - 4:40 pm | इनिगोय
विचार करायला लावणारे.
1 Jun 2013 - 5:04 pm | अजया
चुकली दिशा तरीही - विंदा करंदीकर
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?
2 Jun 2013 - 1:45 am | मोदक
केवळ अप्रतिम; अविश्वसनीय प्रवास सुरू आहे या धाग्याचा!!!!!
या क्षणी प्रतिसादकांचे आभार मानण्याऐवजी सर्वांच्याच ऋणात राहणे आवडेल!
मला धन्यवाद देणारेही अनेक प्रतिसाद आहेत, गविंच्याच "संपादकीय" भाषेमध्ये बोलायचे तर...
2 Jun 2013 - 3:00 pm | हरिप्रिया_
माझ्या काही अटी होत्या...
ऑपरेशन सुरु असतांना
माझा कवी मित्र
ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित हवा...
मला अॅनेस्थेशियात टाकलं जाऊ नये...
माझ्या आवडत्या कवींच्या कविता
ऑपरेशन सुरु असतांना मित्राला म्हणू द्याव्यात...
माझ्या छातीवरचे केस काढले गेले...
मी उताणा...
वर मोठ्ठा लाईट....
बाजूला ऑक्सिजन सिलिंडर्स...
चकचकीत शस्त्रास्त्रं....
पांढरे अॅप्रन्स.....
पांढरे रबरी हॅण्डग्लोज घातलेले डॉक्टर्स.. नर्सेस...
उशाला कॉम्प्युटराईज्ड टी. व्ही.
त्यावर आडव्या-तिडव्या रेषेत धावणारा बिंदू....
हा माझा श्वासोच्छवास म्हणे...
टी. व्ही. वर बघूनच त्यांची फ्रिक्वेन्सी कळ्ते....
(साले... ऑपरेशन करणार आहेत
की टी. व्ही. बघत बसणार आहेत...)
'ऐलतटावर-पैलतटावर हिरवळी घेऊनी
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुनी'
मित्राने कविता सुरु केली...
डॉक्टरांनी छातीत सुरी खुपसली...
वरचं मांस कापून बाजूला केलं....
फासळ्या ड्रिल करुन मोकळ्या केल्या....
धडक....धडक....धडक....धडक....धडक....
त्यांना दिसला लाल रंगाचा मुठीएवढा गोळा...
माझ्या डोळ्यात कॄतज्ञता उतरली....
हो सालं...
नाहीतर... आजकाल कोण इथपर्यंत पोहोचतो....
'सीझर' डॉक्टर म्हणाले....
अगदी अलगद हृदयात खुपसून....
ते हृदय कापू लागले....
चुळ्ळ्कन रक्तांचं कारंजं उडालं.....
जमिनीवर लाल थारोळ....
'झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
जळात बसला पाय टाकुनी असला औदुंबर'
मित्र आता डोळे मिटुन कविता म्हणत होता.
मोडकळीस आलेल्या घराची झडप डॉक्टरांनी उघडली...
आणि अचानक काही प्रेतं बाहेर पडली....
पैकी...
फक्त दोघांची ओळख पटली
एक माझ्या जुन्या मित्राचं होतं...
आणि दुसरं होत माझ्या प्रेयसीचे.....
ही प्रेतं माझ्या नकळत मी का वाहत होतो?
इतक्यात....
एक, दोन, पाच, वीस, पंचवीस.. अरे?
जिवंत माणसांचे कळपच्या कळप
माझ्या हृदयातुन बाहेर पडुन सैरावैरा पळू लागले...
जणू इतकी वर्षं बळजबरीनं
मीच त्यांना कोंडून ठेवलं होतं....
हळूहळू....
माझ्या रक्तात माखलेल्यांनी...
सारं ऑपरेशन थिएटर भरुन गेलं...
रोगी दगावेल म्हणून
त्यांच्यातून वाट काढत
डॉक्टर बिघाड शोधत होते....
'ही अफाट गर्दी कोलाहल कल्लोळ
आश्चर्य! अरे बघ गेला याचा तोल...'
तशातही...
मित्र कविता म्हणतच होता....
'दे विश्ड दे कुड फ्लाय अवे
अँड नॉट सिंग बाय माय हाऊस ऑल डे...
अँड अफकोर्स देअर मस्ट बी समथिंग राँग
इन वाँटींग टू सायलेन्स माय साँग...'
शेवटी सारे निघून गेलेत....
कच्चे टाके घातलेलं हृदय घेऊन मी पडलोय...
संपूर्ण रिकामा झालोय...
हा रितेपणा मला वेडही लावील....
म्हणूनच.....
मी उद्या राजस्थानच्या रेताड प्रदेशात जाणार आहे....
कच्चे टाके उसवून...
हृदयात खचाखच रेती भरुन घेणार आहे...
उरलेल्या सर्व वर्षांपूरती
आता, माणसांची वाट पाहण्यात अर्थे नाही....
आता, या क्षणी मला काहीच जाणवत नाही आहे....
पण,
कुठुन तरी, कुणीतरी डेस्परेटली गातोय....
'वुड्ज आर लव्हली डार्क अॅण्ड डीप
अॅण्ड आय हॅव प्रॉमिसेस टू कीप
अॅण्ड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप
अॅण्ड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप...'
-सौमित्र
2 Jun 2013 - 3:01 pm | हरिप्रिया_
नदी सागरा मिळ्ता, पुन्हा येइना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर
काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले
सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर
तरी तीला आठवतो, जन्म दिलेला डोंगर
डोंगराच्या मायेपायी, रुप वाफ़ेचे घेउन
नदी तरंगत जाते, पंख वाऱ्याचे लावून
पुन्हा होउन लेकरु, नदी वाजवते वाळा
पान्हा फ़ुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा.
-गदिमा
2 Jun 2013 - 3:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
To Be or not to be That is the Question
जगावं की मरावं हा एकच सवाल
या दुनियेच्या उकिरडयावर
खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून ध्य़ावं देहाचं लक्तर
त्यात गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या कळ्याशार डोहामध्ये ?
आणि करावा सर्वोचा शेवट एकाच प्रहारानं माझा तूझा आणि त्याचाही.
मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणार्या निद्रेला नसावं जागृतीचा किनारा कधीही
पण त्या निद्रेला ही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर ,
तर - तर इथंच मेख आहे .
नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो हे जूने जागेपण
प्रेताच्या निर्जिवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभार्यात असलेल्या सत्वाची विटंबना
आणि अखेर करूणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकराच्याच दाराशी .
विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला,
आम्ही ज्यानां जन्मं दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्या बाजूला,
ज्यानं आम्हाला जन्मं दिला तो तु ही आम्हाला विसरतोस,
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करूणाकरा,
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदाळायचं !
- वि वा शिरवाडकर (नटसम्राट)
2 Jun 2013 - 3:37 pm | ज्ञानोबाचे पैजार
जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली आहेत देव जाणे. त्यांतली निम्म्याहून अधिक माणसे मनिऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच !
कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेटनी आपले भाष्य सुरू केले. "अहो, कसला गांधी ? जगभर गेला, पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो ! त्यास नेमकं ठाऊक --- इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे ! सुताबितात तथ्य नाही हो ! आमचा शंभूशेट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला ! ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही ! तिसरं शस्र म्हणजे उपासाचं ! इथे निम्मं कोकण उपाशी ! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हांस कसलं ? नाही, माणूस असेल मोठा... पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर ? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकांशीही नाही."
"म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं ?"
"ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा ! पण इंग्रज गेला कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं ? धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं ! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं. सत्ता इंग्रजाची नाही, न्हेरूची नाही आणि जनतेची नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची !"
"मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजाच्या ताब्यात कसा गेला ?"
"खुळे की काय तुम्ही ! विश्वेश्वर घट्ट आहे राजिवड्यावर ! अहो, एक खेळ करून दाखवला त्यानं."
"दीडशे वर्षांच्या गुलामीचा कसला खेळ ?"
"'अहो दीडशे वर्षं तुमची ! ब्रह्नदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षं ओलांडल्याशिवाय !"
कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. "अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."
अश्या वेळी अंतूशेटच्या जिभेवर लक्ष्मी नाचते.
2 Jun 2013 - 7:23 pm | आदूबाळ
आताशा बुडणार्या सूर्याला
"बरंय, उद्या भेटू" असं म्हणालो
की तो मला म्हणतो
"कशावरून? मधल्या रात्रीची तुला अजूनही इतकी खात्री आहे?"
सूर्य आताशा म्हातारा झालाय
--
पु ल दे
15 Jun 2013 - 11:57 am | आदूबाळ
स्पॅमासुरांच्या हल्ल्यातही ह्या धाग्याने तगाव धरलेला पाहून प्रचंड आनंद झाल्या गेल्या आहे...
15 Jun 2013 - 1:10 pm | यशोधरा
ही कविता ऐकता, वाचताना दर वेळी मन भरुन आल्याशिवाय रहात नाही!
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात ॥धृ.॥
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज.
15 Jun 2013 - 1:41 pm | आदूबाळ
सन १८१८ नंतर मराठी साम्राज्याची जी वाताहत झाली त्याची वर्णनं तत्कालीन शाहिरांनी केली आहेत. राजाश्रय संपल्यामुळे त्यांचा बिचार्यांचा तर बाजारच उठला. अशाच एका तंतकवीने केलेलं वर्णनः
सकळ रायांत म्हणविती श्रेष्ठ जे राय ।
दिवस सोन्याचा दर्शने जयाच्या जाय ॥
असले गेले टाकून हवेल्या पागा ।
खराटे झाले उदकाविण सुकल्या पागा ॥