मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो..
बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे..
अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..!
अतिशय सुरेख गरमगरम पुर्या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?!
पुर्या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. पुर्यांसोबत खायला आलुमटर, आलूमेथी, छोले असे मोजकेच परंतु चवदार पदार्थ...
राईसप्लेटचीही व्यवस्था आहे. साधी राईसप्लेट मागवलीत तर साधारण ५० रुपायांमध्ये पोटभर जेवण होतं..गरमागरम ५ पुर्या, एक कोणतीतरी आपल्या आवडीची पातळ भाजी, चांगल्या तांदळाचा भात, सोबत कढी आणि वरण..अगदी ताजं आणि गरमागरम आणि मुख्य म्हणजे सोडा न मारलेलं जेवण असतं..!
दहीही अगदी मधूर असतं..
डीलक्स थाळी ७० रुपायांपर्यंत मिळते.
तुम्ही नुसती गरमगरम पुरीप्लेट मागवलीत तर सोबत तोंडी लावायला बटाट्याचा रस्सा फुकट..! - : )
हा काँप्लिमेटरी मिळणारा बटाट्याचा रस्साही चवीला अगदी सुरेख असतो.. साधी जिर्याची फोडणी..चवीपुरती मीठमिरची.. अगदी साधा असा हा रस्सा गरमागरम पुरीसोबत तुम्हाला खाता येईल..
तेलाची क्वालिटी अतिशय उत्तम.. कधी कुठल्या पुरीला तेलाचा खराब वास आलाय किंवा कधी मैद्याची पुरी दिली गेल्ये असं मला तरी आजतागायत आठवत नाही..
त्याशिवाय मसालापुरी, भटुरे हे देखील पदार्थ अतिशय उत्तम मिळतात..
पंचमचा जगनसेठ.. (मी त्याला जगनसेठ म्हणतो.. त्याचं खरं नांव मला माहीत नाही.. ) जग्नसेठचे कुणी आजोबा की पणजोबा त्याकाळी मुंबैत आले आणि एका लाकडी फळीवजा टेबलावर रस्त्यावरच उभं राहून त्यांनी पुर्या तळण्याचा व्यवसाय सुरू केला..तो यज्ञ आजही अव्याहत सुरू आहे..फक्त अलीकडे दोनेक वर्षांपूर्वी काही दिवस पंचमपुरीचं दुकान नुतनिकरणाकरता बंद होतं..
आजतागायत अनेकदा पंचमपुरीच्या पायर्या अगदी भक्तिभावाने झिजवल्या. आताशा जगनसेठ फारसा दुकानात येत नाही..आता त्याचा मुलगा सांभाळतो..(चवथी की पाचवी पिढी!) पण पूर्वी जगनसेठ असताना कधी पंचमपुरीच्या दुकानात गेलो की माझं अगदी,
'आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. "
असं अगदी तोंड भरून स्वागत करायचा. मग लगेच स्वत: माझ्या टेबलापाशी येऊन ऑर्डर घेईल..माझं जेवण झालं की मी मागवलेला नसतानाही एखादा छानसा गुलाबजाम माझ्या पानात ठेवेल.. वर 'ये हमारी तरफसे.. ' - असंही मिश्किलपणे सांगेल..
सांगायचा मुद्दा हा की हल्लीच्या काळात या शेट्टी हॉटेलवाल्यांनी मांडलेल्या प्रचंड महागड्या हॉटेलच्या तुलनेत आजही आमचा पंचमपुरीवाला त्या मानाने खूप उजवा आहे.. शेट्टी हॉटेलातल्या महागड्या सोडा मारलेल्या पदार्थांपेक्षा पंचमपुरीचीवाल्याची पुरीभाजी अथवा राईसप्लेट केव्हाही उजवी, अधिक समाधान देणारी आणि मुख्य म्हणजे पोटभरीची..!
असो...
तात्या.
आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..
प्रतिक्रिया
3 May 2013 - 3:15 pm | स्पा
सुरेख .. 3 वाजलेत .. ५ वाजेपर्यंत येउंद्या पुढील लेख
तुमचे लेख म्हणजे साला पर्वणी असते महाराजा :)
3 May 2013 - 3:24 pm | प्यारे१
तुला़ काय अडच ण रे स्पावड्या? तात्यानी एकदम सतरा लेख टा कले तर तुला काय खतरा आहे़? पर्वणीचा लाभ घे की मेल्या. तुला काय पैशे पडायलेत ?
3 May 2013 - 3:38 pm | सूड
'नव्या माणसान रोज दोन लेख टाकले तर ताका जिल्बी म्हण्टंत नि जुन्या माणसान टाकले तं पर्वणी' हा म्हायत नाय ताका. रे मेल्या स्पावड्या, धा पावट 'पर्वणी पर्वणी' बरंय. हांगा फिरान येव नको, कळ्ळें?
3 May 2013 - 3:42 pm | कुंदन
मौ भात न मेतकुट खाणार्या स्पा ला पुरीची चव काय कळणारे?
3 May 2013 - 3:48 pm | बॅटमॅन
&*%## स्पावड्या, साल्या गरीब बिचार्या मांजर्या मारून खातोस होय रे &%$##!!!! मुंबैच्या समस्त कोंबड्या डुकरे काय रोगग्रस्त झाली काय रे आँ?
बॅटू बर्वे.
3 May 2013 - 4:35 pm | स्पंदना
अच्छा अस आहे होय? म्हणुनच त्या भयकथा प्रसवतात स्पा कडुन.
खरच रात्र वैर्याची आहे. जागते रहो!!!
3 May 2013 - 4:57 pm | मोदक
:-))
3 May 2013 - 5:03 pm | बॅटमॅन
बैलाचा डॉळाच फोडलात की हो =)) =)) =))
3 May 2013 - 6:33 pm | अत्रुप्त आत्मा
@बैलाचा डॉळाच फोडलात की हो>>> पांडुज बाजार
3 May 2013 - 5:20 pm | सूड
अहो एखादा आयडी जालीय आत्महत्या करायचा तुमच्या या अशा लिखाणानं !! ;)
3 May 2013 - 5:28 pm | स्पा
ख्याक
=)) =))
डायरेक सुपरमार्केट
4 May 2013 - 4:04 am | धमाल मुलगा
=)) =)) =))
कॉफी अडकली साल्या नरड्यात! काय लिहितो का काय करतो? ते स्पांडू पारंपारिक वैदूच्या गेटपमध्ये डोळ्यापुढं आलं ना बे! =))
4 May 2013 - 2:42 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
धमुशेठच्या नरड्यात कॉफी अडकण्यास अखेरीस आपणही कारणीभूत ठरलो हे पाहून डोळे पाणावले ;) लै दिसांची इच्छा होती ;)
4 May 2013 - 2:47 pm | सहज
मिपाशास्त्रात धमूशास्त्री आठवले यांच्या पद्धतीप्रमाणे कळफलकावर सांडून तो खराब होणे हेच खरे कर्मकांड आहे. आजकाल कळाफलक ह्या विधीत वापरला जात नाही. शॉर्टकट मधे प्रथा पाळल्या जात आहेत. चालायचेच..
4 May 2013 - 2:52 pm | बॅटमॅन
खराय. काळ मोठा कठीण आहे.
4 May 2013 - 9:22 am | अद्द्या
या ब्याट्या ला कोणी तरी आधी मारा रे
नको तिथे नको ते सुचतं याला
सकाळी सकाळी तात्यांचा लेख वाचावं म्हटलं .
तोंडाला पाणी सुटतंय . भूक लागतीये हे वाचून .
पण तरीही मक्ख चेहरा ठेवलाय हापिसात .
आणि हे उलटं लटकलेलं मधेच पचकतय .
आता दिवस भर बॉस चा उगाचच रागावलेला आणि माझ्या कडे "काय पात्र आहे हे" अशी नजर झेला :-/
4 May 2013 - 2:43 pm | बॅटमॅन
=)) =))
एक सुधारणा सुचिवतो बगा फकस्त. बॅटमॅन उल्टं लटकत न्हाई. :)
3 May 2013 - 5:33 pm | श्रावण मोडक
पैशे? ऑं? पैशे पडतात का असं वाचण्यासाठी कुठं? आधीच सांगून ठेव. तिकडं जाणं टाळतो... ;-)
4 May 2013 - 2:51 pm | कुंदन
तुम्ही पण आता डॉलर मध्ये वेवहार कर्ता का?
3 May 2013 - 5:27 pm | ढालगज भवानी
=)) =)) कसली विनोदी प्रतिक्रिया लिहीतोस रे स्पा!!!
3 May 2013 - 3:59 pm | चौकटराजा
पुण्याच्या नान्या, जागा हो २४ तास मुंबैच्या तात्याचे आहेत ! चितळे, बेडेकर, श्री, सगळ्या श्रद्धास्थानांची लैन लाव गड्या !
3 May 2013 - 4:04 pm | कुंदन
अन ते जोशि बटाटे वाले?
3 May 2013 - 4:37 pm | स्पंदना
खेडशिवापूरची भेळीचे दुकान्ं? त्यातला पण कुणी असेल की "याऽऽ" म्हणणारा.
3 May 2013 - 4:59 pm | चित्रगुप्त
वाचून जल्मात पहिल्यांदा आपण मुंबैकर नसल्याबद्दल खंत वाटली.
3 May 2013 - 5:06 pm | कुंदन
चित्रगुप्त साब के लिये एक प्लेट पुरी लाव.
3 May 2013 - 5:52 pm | आजानुकर्ण
चार पाच पिढ्या मुंबईत घालवूनसुद्धा स्थलांतरितांच्या पाचव्या पिढीने भाईकाका, आण्णा आणि बाबूजींसारख्या मराठी मानबिंदूंच्या निस्सीम भक्ताचे स्वागत
आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. "
अशा भय्यास्टाईलने करावे आणि त्या मराठी माणसाने मिटक्या मारत पाणीपुरी हाणावी याची मिपाकर म्हणून शरम वाटली.
3 May 2013 - 5:56 pm | आजानुकर्ण
ऐवजी पुरीभाजी वाचावे
धन्यवाद
3 May 2013 - 6:21 pm | मदनबाण
हे तातुडी, एक लेख "जिलबी"वर पण लिहा ना... प्लीज प्लीज प्लीज...
4 May 2013 - 9:29 am | सामान्य वाचक
लाडे लाडे नाही लिहिले तरी लेख येईल,
काळजी नका करू
4 May 2013 - 10:26 am | धमाल मुलगा
=)) =)) =))
बा**ला! त्या मदन्याचा साला तुमीतर पार शारुक करुन टाकला द्येवा! :D
4 May 2013 - 11:14 am | सामान्य वाचक
शारूक केला तोपर्यंत ठीक आहे नशीब कि कारण जोहर नाही केला
4 May 2013 - 12:09 pm | मदनबाण
माझा प्रतिसाद हा उपरोध आहे हे कळले नाही असे दिसते...
असो...
4 May 2013 - 12:12 pm | सामान्य वाचक
आम्ही पण काही एवढे '' हे'' नाही
तुमचा प्रतिसाद गमतीशीर वाटला , म्हणून तर त्याला उत्तर दिले.
3 May 2013 - 7:03 pm | संदीप चित्रे
अत्यंत साध्या पण उत्तम रेस्टॉरंटची ओळख करून दिल्याबद्दल धन्स रे!
जेवणात सोडा मारलेला नसतो हे तर फारच महत्वाचं :)
4 May 2013 - 2:09 pm | विनोद बोरोले
आम्च्य नग्पुरत नहि मिलत अशि चन्ग्लि पुरि भजु.
4 May 2013 - 2:31 pm | संजय क्षीरसागर
हा कि-बोर्डचा प्रॉब्लम आहे का जिभेचा?
4 May 2013 - 3:37 pm | lakhu risbud
ठ्ठो(=)!
4 May 2013 - 4:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्यांच्या पहिल्या नावाकडे पहा... उत्तर त्याच्यात दडलं आहे ;)
3 May 2013 - 7:18 pm | उपास
तात्या, 'बोरीबंदर' ह्या एकाच शब्दात जिंकलस गड्या.. साला हल्ली सी.एस.टी नाहीतर व्हीटी शिवाय कोणी हाक नाही मारत त्याला.. ६५, ६६, ६९ किंवा कुठल्याही बशीत 'बोरीबंदर' हा शब्द हद्दपार झालाय..
पुरीवाल्याकडे जाऊन बघायला हवे एकदा.. पण तिकडे गेलो की विठ्ठल भेळ, बादशाहा आणि मागे भगत ताराचंद सारख्या भुरळ घालणार्या इतक्या गोष्टी आहेत की बस्स! आणि हो ते जाताजाता कामताला नावं ठेव्ण्याचं काम नाय हां.. सुविधा आहे ना समोर फोर्ट चं ते तोंडात मारेल कुणाच्याही.. हाटेल चालवावं तर कामतांनीच.. साला पुण्यात हे तुळ्ळू कामत मात्र फार दिसत नाहित ह्याचं वाईट वाटतं!
3 May 2013 - 7:50 pm | सहज
आजचा गृहपाठ - जगनसेठचे व्यक्तीचित्र लिहा.
थीम-
साधारण दुकान सुरु व्हायची वेळ, जगनसेठ व प्रोटॅगॉनिस्ट यांची भेट, जगनसेठ भीमाण्णाचे फॅन, मग काय सुरवातीला हा कोण आला पासुन आपण साला ह्या प्रोटॅगॉनिस्ट चे कट्टर फॅन व पुढे पुढे निस्सीम भक्त असा जगनसेठचा प्रवास.
दरवेळी गेलो की आवडीने प्रोटॅगॉनिस्ट फर्माईश करुन गाउन घेणार. प्रोटॅगॉनिस्ट चे कौतुकच कौतुक, थरथरत्या हाताने शेवटच्या दिवशी पण प्रोटॅगॉनिस्टला पुर्या भरवून, ठंडा पाजून जगातून एक्झीट घेणार जगनसेठ
सहाय्यक शब्द, - साला, कोणकुठला, फॅन, भक्त, भीमण्णा (हा शब्द सूचक जागी एकदाच किंवा दोन वेळा पुरे पण एका भीमाण्णाच्या वाक्यात चार मी, माझे, मला, आपणही हवे), कौतुक, समाधान, मान, सन्मान, माज
3 May 2013 - 7:58 pm | सूड
उतार्याखालचे व्याकरण:
१) भाजीत माशी मरुन पडली आहे, व्याकरणाच्या मदतीने चालवून दाखवा.
२) 'बोरीबंदर' या शब्दाचा सामासिक विग्रह करा.
३) 'पुर्या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. ' यातील उपमा, उपमेय आणि उपमान शोधून व्याख्येसहित स्पष्ट करा.
5 May 2013 - 1:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हे आवडले...लई भारी !!!
3 May 2013 - 8:49 pm | विसोबा खेचर
आदरणीय सहजराव, मूळ लेखासंदर्भात कुठलीही बरीवाईट प्रतिक्रिया न देणारा आपला अवांतर प्रतिसाद वाचून अतिशय वाईट वाटले. इतकेच सांगू इच्छितो की भारतरत्न अण्णांचा पूर्णत: अस्थानी असा उल्लेख व जगनशेठच्या जाण्याचा उल्लेख खूप दुखावून गेला. असो, मूळ लेखाप्रमाणेच हा प्रतिसादही अत्यंत थर्डरेट समजून दुर्लक्ष करावे अशी सादर विनंती करतो.. - तात्या
3 May 2013 - 9:15 pm | सहज
ललित लेखनातली स्थळ, पात्र यांना काही एक स्वातंत्र्य असते. माझ्या प्रतिसादात तुम्हाला भारतरत्न अण्णा दिसले, पण ललित लेखनात ते एक स्वतंत्र घटक आहेत, दोन लोकांना जोडणारा दुवा आहेत. त्यात अनादर, अस्थान नाही. जगनशेठ हे एका ललितलेखाचा एक भाग असु शकतात. प्रत्यक्ष व्यक्तीशी संबध असेलच असे नाही. तुम्ही प्लीज भावना बाजूला काढून पाहीलेत तर माझा प्रतिसाद केवळ एक व्यक्तीचित्रण पाककृती आहे हे दिसेल. तुम्हाला ती पाककृती नावडायचा पर्याय आहेच. तुम्ही जरुर दुर्लक्ष करा, प्रतिसादाला थर्डरेट समजा पण आमच्या पाककृतीतल्या प्रोटॅगॉनिस्टला नावे ठेवू नका तो गरीब बिचारा आहे. आज त्याचा टाईम खराब असेल पण तो हिरो आहे. त्याचे भले कौतुक करु नका पण नावे ठेवू नका अशी विनंती करतो. तुम्ही सिद्धहस्त लेखक आहात आम्हा फुटकळ काळेपांढरे करणार्यांच्या प्रतिसादाला बघीतलेत हेच आमच्याकरता खूप आहे.
बाकी खेद आहे.
4 May 2013 - 5:15 am | विकास
____/\____
There's a bizarre insistence on how a story should be. 'The protagonist must be sympathetic!' they say. Whatever that means. I never engage in that discussion. I never use that word, 'sympathetic.' I just know 'interesting.' - Alexander Payne
3 May 2013 - 8:31 pm | श्रीरंग_जोशी
पुरीभाजी व जेवणाच्या थाळीचे एवढे चपखल वर्णन वाचून लगेच पंचम पुरीवाल्याकडे जावेसे वाटत आहे.
माझ्या लहानपणीपासून अफाट लोकसंख्येमुळे मुंबईवर खूप ताण आहे असे वर्तमानपत्रांत रोज रोज वाचल्यामुळे कशापायी त्यात भर घालावी या विचाराने मुंबईत कधी निवांतपणे फिरलोच नाही. एकदाच काय काही तासांसाठी दक्षिण मुंबईत चक्कर टाकली.
3 May 2013 - 9:19 pm | लंबूटांग
अवांतर प्रतिक्रिया वाचून काय म्हणावे कळत नाही.
तात्या सध्या एकामागून एक बरेच लेख टाकत आहेत, बऱ्याच नवीन सदस्यांची ह्याच कारणासाठी खिल्ली उडवली जाते वगैरे सगळे मान्य. त्याबद्दल लिहीले तर एकवेळ समजू शकतो.
पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले. मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का? अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.
असो ह्या निमित्ताने बरेच जुने आय डी लिहिते झाले हेच काय ते चांगले म्हणायचे.
3 May 2013 - 9:50 pm | उपाशी बोका
या कारणामुळे आणि कंपूबाजीमुळेच मी इथे (इच्छा असूनही) फारसे लिहित नाही. केवळ वाचनमात्र असतो.
3 May 2013 - 9:56 pm | श्रीरंग_जोशी
तुमचा बिल्ला क्रं ७ आहे. मिपाच्या जन्मापासूनचे तुम्ही सदस्य आहात.
कॄपया इथे लिहिण्याचा एकदा प्रयत्न तर करा. मला तरी असे वाटते की जुन्या सदस्यांनी फार बागुलबूवा केल्याने बरेच नवे सदस्य मोकळेपणाने अभिव्यक्त होत नाहीत.
(अवांतराबद्दल क्षमस्व)
4 May 2013 - 4:07 am | धमाल मुलगा
तू तर काय आणि खुळाच हैस खरं. लेका बिल्ला नंबर दिसतोय तुला अन तरी कुठं प्रौढ साक्षरतेच्या मास्तरागत विनवण्या करतंयस?
4 May 2013 - 4:13 am | श्रीरंग_जोशी
जसे जमते, तसे लिहितो.
नवा असतांना धमुमास्तरांची शिकवणी भेटली असती तर असे लिहायची सवय लागली नसती ;-).
4 May 2013 - 4:24 am | धमाल मुलगा
'धमुमास्तर'???? आयला! ते काय माणसात गणायच्या लायकीचं है होय रे?
शिकवणी लावायची तर मास्तर एकच...... प्रभुमास्तर! :)
4 May 2013 - 4:29 am | श्रीरंग_जोशी
शाळेत उशिरा प्रवेश मिळाल्यामुळे सर्व शिकवण्या आधीच फुल झाल्या होत्या....
3 May 2013 - 10:02 pm | विसोबा खेचर
चलता है रे लंबुटांग. सुखात होतो, शोफरड्रिव्हन कारने फिरत होतो तेव्हा काहीच कळलं नाही. आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली. ठीक आहे. सध्या सर्वांचंच बरेबर आहे, माझं एकट्याचंच चूक आहे हे मान्य. उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की. तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!
3 May 2013 - 10:11 pm | प्यारे१
>>>>उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की.
इन्शा अल्लाह
खुदा कसम झूठ नही बोल रहा, उस दिन का हम इन्तेझार कर रहे है. परवरदिगार आपको सलामत रक्खे.
3 May 2013 - 10:32 pm | ढालगज भवानी
:( तात्या मी प्रत्येक विनोदी प्रतिक्रियेला हसते बरं का. कोणाला दुखविण्याचा अथवा चढविण्याच्या हेतूने येथे येत नाही. असो.
4 May 2013 - 4:46 am | विकास
ह्यातून कुणाला तरी कळवळा येऊ शकतो नाही का?
( आता पुढे काय कुणा निनाव्याला रोगाने पछाडले म्हणून मदत वगैरे का ? )
4 May 2013 - 12:07 pm | मदनबाण
( आता पुढे काय कुणा निनाव्याला रोगाने पछाडले म्हणून मदत वगैरे का ? )
रुजवात करून देईन असे तात्यांनी इथे जाहिर केले होते,किती जणाच्या वाती आत्ता पर्यंत वळल्या गेल्यात हे ज्यांचे त्यांनाच ठावुक...
बाकी ज्या सदस्यांना इथल्या जुन्या जाणत्या सदस्यांचे या धाग्यावरचे प्रतिसाद पाहुन नवल वाटत आहे,त्यांनी हे सर्व सदस्य असे प्रतिसाद का देत आहेत याचा विचार करावा...कारण गेल्या ५ वर्षात माझ्या तरी पाहण्यात असा प्रकार या जुन्या जाणत्या मंडळींनी कोणाच्या लेखनात केल्याचे दिसुन आलेले नाही.
बाकी तात्यांच लेखन महानच आहे आणि ते सिद्धहस्त लेखक सुद्धा आहेत... इतके सिद्धहस्त लेखक आहेत की त्यांच्या एका लिखाणात त्यांनी महर्षी व्यासांना अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी म्हंटल्याचे मला आठवते !
या वरुन उगाच तेव्हा मला कहा राजा भोज और कहा गंगुतेली ही म्हण आठवली होती... असो.
4 May 2013 - 9:36 am | बंडा मामा
तात्या हे वाचुन वाइट वाटले हे नक्की. पण तुम्ही नियमीत मिपावर असता म्हणजे तुमच्याकडे चांगला संगणक आणि इंटर्नेट जोडणी आहे हे स्पष्ट आहे,किराणा माल न परवडणारा मनुष्य इंटरनेटची जोडणी कशी काय घेईल? आता टाइम बदलला आहे असा निष्कर्श काढण्यास काही हरकत नसावी.
4 May 2013 - 10:15 am | स्पा
समाचार आंतरजालीय कि रिअल लाईफ त्ये पण स्पष्ट करा कि .
बाकी आंतरजालीय टिके वरून त्यात्या लगेच सामाचाराच्या गोष्टी करतात
कूच जम्या नय.
फॉर एक्झाम्पल.....चायला इथे म्या - सूड भांड भांड भांडतो.. पण प्रत्येक्षात आमच्यात काही वाद नसतात
भले परा -विमे ची खडाजंगी चालत असेल, पण ते जेंव्हा भेटतात तेंव्हा एकमेकांचा खरपूस समाचार वेग्रे घेत नाहीत
बाकीचे बरेच वाद अंतर्जालावर चालतात ते कोणी वयक्तिक घेत नाही,
तुम्ही डायरेक समाचाराच्या भाषा करून लागले ना भाऊ .
शिवाय तुमच्या वरील वक्तव्यावरून तुम्हाला झालेल्या प्रकारचे काडी मात्र वाईट वाटलेले नसून, केवळ काळ खराब आहे म्हणून मी गप्प आहे असेच सूचित होते आहे .
शिवाय अजून कोणी येथे तुमच्यावर वयक्तिक टीका केलेली दिसत नाहीये. तुमच्या डेक्कन क्वीन च्या स्पीड ने येणाऱ्या "जुनाट फेस्बुकीय" लेखांवर झालेली ती टीका आहे .
तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!
4 May 2013 - 10:17 am | स्पा
द व णी य वाक्य :)
4 May 2013 - 10:32 am | विश्वनाथ मेहेंदळे
काही तरी गैरसमज होतो आहे तात्या. तुमचे किराणामालाचेही वांधे झाले असतील तर ते इथल्या ९९.९९% जनतेला माहित असण्याचा काही मार्ग नाही. जे होते आहे त्याची कारणे वेगळीच(आणि सर्वज्ञात) आहेत. त्यामुळे तो विषय जाऊच द्या.
4 May 2013 - 11:08 am | प्रभाकर पेठकर
खरोखर जर किराणामालाचेही वांधे झाले असतील तर अशा परिस्थितीत वेगवेगळे धागे काढण्याचा मूड राहतो? की माणूस दैनंदिन विवंचनेत गुंतून पडतो?
4 May 2013 - 11:35 am | नरेश_
अगदीच राहवलं नाही म्हणून हा अवांतर प्रतिसाद.शेवटी चुकत कोण नाही? लक्षात ठेवा.दुनिया गोल असते- वाईट दिवसांनंतर बरे दिवस हटकून येतातच! जीवन म्हणजे शब्दश: सापशिडीचा खेळ. असते एकेकाचे नशीब!आज मी शंभराच्या घरात तर उद्या सापाच्या तोंडी. चालायचेच, कालाय तस्मै नमः
4 May 2013 - 9:59 am | विश्वनाथ मेहेंदळे
या धाग्यापुरते बोलायचे झाले तर मला फार वैयक्तिक काही दिसले नाही.
झाला प्रकार गंभीर होता. त्यामानाने बरी वागणूक देत आहेत लोकं.
चालायचंच... मागे एकदा असेच एका नवीन सभासदावर टीका होत असताना इतरांनी पण हात धुवून घेतले होते की. अगदी रसग्रहण वगैरे करून. नाही का? :-)
4 May 2013 - 6:33 pm | लंबूटांग
माझा प्रतिसाद एकंदरच ह्या लेखकाच्या सर्व धाग्यांवर जे काही चालले आहे त्याला उद्देशून होता. हा धागा सर्वात वर होता म्ह्णून इथे टंकले इतकेच. कोणत्याच धाग्यावर प्रतिसाद वैयक्तिक नाहीत? ह्या धाग्यावर काही प्रतिसाद आहेत जे इथे उधृत केले तर हा प्रतिसाद उडेल.
मी कधीच अमान्य केले नाही. मला ऐकीव माहितीवरून जे काही कळले ते गंभीरच्याही पलीकडले होते आणि मी त्याचे कधीच समर्थन करत नाहीये. पण ते सगळे इथे लिहीण्याची काय गरज आहे?
गल्ली चुकताय राव,
मी काही तात्याला वैयक्तिकरीत्या भेटलेलो नाहीये, फोनवरून बोललो ही नाहीये. मिपाच्या स्थापनेच्या आसपास काय ती एक खरड केली असेल तेवढीच. त्यामुळे मी काही मित्रत्वाच्या नात्यातून वगैरे लिहीतोय असे काही नाहीये. येथे येणारे प्रतिसाद आयडी आणि लेखाला उद्देशून असावेत अशी जी एक सर्वसाधारण अपेक्षा असते त्याला अनुसरून लिहीतोय. वैयक्तिक टीका खटकली इतकेच.
बाकी चर्चा करायची असल्यास खरडवहीत करूयात. येथे आधीच बरेच अवांतर झालेय नाही का?
5 May 2013 - 12:04 am | छोटा डॉन
लंबुशी सहमत.
जो प्रकार चालला आहे तो योग्य नाही, अगदी मनापासुन ह्याचा तिटकारा वाटत आहे.
भूतकाळात जे झाले ते सर्वांना माहित आहे, पण ते प्रत्येकच ठिकाणी उगाळण्यात जास्त मतलब नाही असे मला वाटते.
त्यात काही काही जणांची वागणुक पाहुन तर अचंब्याने तोंडात बोटे गेली, आश्चर्यजनक आहे सगळे.
ह्यावर खरे तर चकार शब्द लिहायला नव्हता पण वाहत्या गंगेत अनेकजण उगाच हात धुवुन घेत आहेत असे वाटल्याने इथे लिहले.
बाकी चालु द्यात ...
- छोटा डॉन
4 May 2013 - 8:06 pm | जेनी...
लंबूटांग्याशी सहमत .
3 May 2013 - 10:46 pm | चावटमेला
लेख आवडला..
4 May 2013 - 12:37 am | पिवळा डांबिस
तात्या, लेख आवडला. जुन्या आठवणी ताज्या केल्यास.
पण आता त्या पुरी-आलूरश्श्याच्या चवीच्या आठवणीने जीभ खवळली आहे त्याचं काय करू?
:)
अवांतरः लंबूटांगच्या प्रतिसादाशी सहमत.
4 May 2013 - 4:21 am | धमाल मुलगा
झणझणीत पुरी-भाजीची भूक फ्ल्याट ब्रेड अन पोट्याटो स्ट्यू वर भागणार तरी आहे का? :(
अवांतरः अवांतराशी सहमत. जो तो विषय ज्या त्या जागी! तिथे गल्लत करण्यात काही हशील नाही.
4 May 2013 - 4:43 am | विकास
तोच तर प्रॉब्लेम आहे ना! नुसत्या आठवणीच नाही, तर सवयी पण कुणाच्या जाग्या झाल्या तर?
4 May 2013 - 9:26 am | निनाद मुक्काम प...
लंबूटांगच्या प्रतिसादाशी सहमत.
अवांतर ह्याच परिसरातील पंचतारांकित हॉटेलात प्रशिक्षण घेतल्याने ह्या उपाहारगृहात जायचा योग बरेचवेळा आला आहे. सात्त्विक जेवण हीच त्याची खरी ओळख ,
असेच दाक्षिणात्य सात्त्विक जेवण येथे मिळते.
अनेक जुने आयडी येथे जुने हिशेब चुकते करण्यासाठी आवर्जून आले,
एरवी मिसळपाव चे त्यांना वावडे का असते हें समजू शकत नाही..
मिसळपाव वरील नित्य नियमित राबता असणार्या सभासदांचा जिलबी पाडू प्रवृत्तीवर राग मी समजू शकतो व त्यांच्याशी अंशतः मी सहमत आहे.
4 May 2013 - 11:05 am | विसोबा खेचर
चित्रगुप्त, संदिप चित्रे, उपास, श्रीरंग जोशी, लंबुटांग, चावट मेला, डांबिस, धमाल मुलगा, निदान मुक्काम,
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे...
4 May 2013 - 11:44 am | रामदास
ह्या लेखातील वर्णनाचा काही भाग जमला नाही.
१ पंचम चे दुकान साधेसुधे पण न सजवलेले आहे.
२ स्वच्छता नाही. ताटं वाट्या तेलामुळे आणि व्यवस्थित न धुतल्यामुळे ओशटच असतात.
३ हॉटेल मुमनपाच्या ग्रेड प्रमाणे ग्रेड /३ चे आहे त्यामुळे वेटर स्वछ युनीफॉर्ममध्ये नसतात.
४ पंचम पुरी प्रसिध्द आहे ते त्याच्या झोलवाल्या झांसी ररश्शासाठी आणि वाडग्यात ठेवलेल्या वाफवलेल्या मिर्च्यांसाठी. रश्शाच्या सोबत लाल भोपळ्याची भाजी असते.
५ पंचमच्या लेखात मसाला पुरीचा उल्लेख नाही त्यामुळे लेख अर्धाच राहीला असे वाटते.
६ माझी वैयक्तिक ओळख नाही पण माझ्या माहीतीप्रमाणे पंचमवाला आता सिरीअल फायनान्सींगच्या व्यवसायात आहे. पण ही माहीती अवांतर आहे.
4 May 2013 - 11:45 am | रामदास
पंचमसोबत बाज्च्या गल्लीतल्या भारतीय मिष्टानला कढी-खिचडी खाण्यासाठी जरूर भेट द्यावी.
4 May 2013 - 11:49 am | विसोबा खेचर
रामदास साहेब,
मसालापुरीचा उल्लेख आहे..आपल्या नजरेतून सुटला असे वाटते..
असो.. प्ररिसादाबद्दल धन्यवाद..
4 May 2013 - 11:58 am | श्रिया
लेख आवडला.
4 May 2013 - 12:24 pm | वेताळ
खरतर आपण प्रत्येक वेळी सर्वच हॉटेलात मिष्ट्टान्न खाण्यास जात नाही. जवळ जवळ ९०% लोक आपआपले पोट भरण्यासाठी जातात.पण अजुनही त्यात सरळसाधी अशी कित्येक हॉटेल टिकुन आहेत कि त्याची चव व जिव्हाळा त्यात्या हॉटेलात आपल्याला पुन्हा पुन्हा ओढुन घेवुन जातो.मुंबईत किंवा मोठ्या शहरात अशी खुप हॉटेल ,ठेले आहेत कि त्यात खुप रुचकर पदार्थ मिळतात. ५ रुपयात मिळणार बॉम्बेवडापाव हा तर माझ्यासाठी खुपच आवडणारा पदार्थ आहे.
कोल्हापुर ला मिळणारी राजाबापुची भेळ,किंवा फडतरेंची मिसळपाव हे नादखुळाच.तसेच काही हॉटेलात मटकी उसळ ,चपाती,लोणचे,वरण.भात व पापड असा साधा मेन्यु देखिल खुप सुंदर बनवतात.
तात्यांनी खुपच सुंदर लेख बर्याच दिवसानी लोहल्याबद्दल त्याचे आभार मानतो
तसेच सुंदर लेखाला बर्याच ठिकाणी काही प्रतिसादानी गालबोट लावले आहे,ते जर टाळता आले असते तर खुप बरे झाले असते. कारण वडापाव किंवा पुरीभाजी खाताना चुकुन खडा आला तर चव बिघडते तसे झाले आहे.
असो तात्या तुम्ही असेच लिहित रहा.
4 May 2013 - 12:45 pm | विसोबा खेचर
धन्यवाद वेताळराव..
4 May 2013 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार
पण तात्याबांचे लेख आले, की अनेक मृत आयडी* पुन्हा जिवंत होतात आणि मिपावरती वावरायला लागतात ह्याचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे.
*म्हणजे जे कधी लॉग-ईन केलेले देखील दिसत नाहीत.
4 May 2013 - 12:55 pm | सूड
मन की बात बोल दी !! ;)
4 May 2013 - 1:15 pm | विसोबा खेचर
छान निरिक्षण रे परासायबा.. खरं आहे तुझं. येतात ती मंडळी माझ्यावरील मायेपोटी आणि कीबोर्ड सरसावत कौतुकाचे (?!) दोन गोड (?!) शब्द लिहितात झालं..! सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत आहे...! :-)
4 May 2013 - 6:12 pm | तुमचा अभिषेक
या पुरीवाल्याबद्दल फारसे माहीत नाही पण आगामी लेख खरेच मनीज इडलीवाल्याचा असेल तर वाट बघतोय.. आम्ही बाजूच्याच राजाशिवाजीचे.. परीक्षा संपल्यावरच्या कित्येक पार्ट्या तिथेच झाल्यात.. तेथील आकर्षण म्हणजे एकच... हवे तितके सांबार चटणी .. पोटभर आणि मोफत... ये उ द्या लेख...
4 May 2013 - 6:49 pm | विसोबा खेचर
इकडचे अवांतर प्रतिसाद कृपया आता तरी थांबवा अशी सर्वांनाच नम्र विनंती..
4 May 2013 - 8:15 pm | कंजूस
आता
टिव्हिवरील कोणत्याही भाषेतील कुकिंगवरचे कार्यक्रम पाहा १कांदा तळणे २गरम
मसाला आणि टोमेटो घालून रगडणे ३गुळ सोडून किचिनमधल्या सर्व पदार्थ घालणे
४पुढे त्यात पनीर ,चिझ (तीन प्रकार),ओलिव ओईल ,अजिनोमोटो ,चायनिज सॉस वगैरे
महागडे पदार्थ घालणे याशिवाय काही कमी पदार्थात खायचे जिन्नस होत नाहित हा
समजायचा जमाना आहे विसोबा . माहेश्वरचे खुराक लाडू अथवा अबू स्टेशनची
मटक्यातली रबडिची मलापण आठवण येते .
5 May 2013 - 1:01 pm | जव्हेरगंज
खुप छान
6 May 2013 - 6:07 pm | निश
खर तर मी तुमचे आधीचेही लेख वाचले आहेत. मला ते मनापासुन आवडले. खर तर लेख किती येतात त्यापेक्षा लेखांची वाचनीयता किती आहे, वाचणार्याला आनंद देण्याची ताकद किती आहे ह्याला महत्त्व द्यायला हवे. तुमचे सगळेच लेख वाचनीय असतात. त्यामुळे ते येत रहावेत व आम्हाला वाचन आनंद मिळ्त रहावा ही नम्र विनंती.