Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/03/2013 - 15:10
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
शिफारस
माहिती
मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो.. बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे.. अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..! अतिशय सुरेख गरमगरम पुर्‍या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?! पुर्‍या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. पुर्‍यांसोबत खायला आलुमटर, आलूमेथी, छोले असे मोजकेच परंतु चवदार पदार्थ... राईसप्लेटचीही व्यवस्था आहे. साधी राईसप्लेट मागवलीत तर साधारण ५० रुपायांमध्ये पोटभर जेवण होतं..गरमागरम ५ पुर्‍या, एक कोणतीतरी आपल्या आवडीची पातळ भाजी, चांगल्या तांदळाचा भात, सोबत कढी आणि वरण..अगदी ताजं आणि गरमागरम आणि मुख्य म्हणजे सोडा न मारलेलं जेवण असतं..! दहीही अगदी मधूर असतं.. डीलक्स थाळी ७० रुपायांपर्यंत मिळते. तुम्ही नुसती गरमगरम पुरीप्लेट मागवलीत तर सोबत तोंडी लावायला बटाट्याचा रस्सा फुकट..! - : ) हा काँप्लिमेटरी मिळणारा बटाट्याचा रस्साही चवीला अगदी सुरेख असतो.. साधी जिर्‍याची फोडणी..चवीपुरती मीठमिरची.. अगदी साधा असा हा रस्सा गरमागरम पुरीसोबत तुम्हाला खाता येईल.. तेलाची क्वालिटी अतिशय उत्तम.. कधी कुठल्या पुरीला तेलाचा खराब वास आलाय किंवा कधी मैद्याची पुरी दिली गेल्ये असं मला तरी आजतागायत आठवत नाही.. त्याशिवाय मसालापुरी, भटुरे हे देखील पदार्थ अतिशय उत्तम मिळतात.. पंचमचा जगनसेठ.. (मी त्याला जगनसेठ म्हणतो.. त्याचं खरं नांव मला माहीत नाही.. ) जग्नसेठचे कुणी आजोबा की पणजोबा त्याकाळी मुंबैत आले आणि एका लाकडी फळीवजा टेबलावर रस्त्यावरच उभं राहून त्यांनी पुर्‍या तळण्याचा व्यवसाय सुरू केला..तो यज्ञ आजही अव्याहत सुरू आहे..फक्त अलीकडे दोनेक वर्षांपूर्वी काही दिवस पंचमपुरीचं दुकान नुतनिकरणाकरता बंद होतं.. pp आजतागायत अनेकदा पंचमपुरीच्या पायर्‍या अगदी भक्तिभावाने झिजवल्या. आताशा जगनसेठ फारसा दुकानात येत नाही..आता त्याचा मुलगा सांभाळतो..(चवथी की पाचवी पिढी!) पण पूर्वी जगनसेठ असताना कधी पंचमपुरीच्या दुकानात गेलो की माझं अगदी, 'आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. " असं अगदी तोंड भरून स्वागत करायचा. मग लगेच स्वत: माझ्या टेबलापाशी येऊन ऑर्डर घेईल..माझं जेवण झालं की मी मागवलेला नसतानाही एखादा छानसा गुलाबजाम माझ्या पानात ठेवेल.. वर 'ये हमारी तरफसे.. ' - असंही मिश्किलपणे सांगेल.. सांगायचा मुद्दा हा की हल्लीच्या काळात या शेट्टी हॉटेलवाल्यांनी मांडलेल्या प्रचंड महागड्या हॉटेलच्या तुलनेत आजही आमचा पंचमपुरीवाला त्या मानाने खूप उजवा आहे.. शेट्टी हॉटेलातल्या महागड्या सोडा मारलेल्या पदार्थांपेक्षा पंचमपुरीचीवाल्याची पुरीभाजी अथवा राईसप्लेट केव्हाही उजवी, अधिक समाधान देणारी आणि मुख्य म्हणजे पोटभरीची..! असो... तात्या. आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..
  • Log in or register to post comments
  • 44761 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 05/04/2013 - 04:13

In reply to ह्याट्ट मर्दा! by धमाल मुलगा

Permalink

:-)

जसे जमते, तसे लिहितो. नवा असतांना धमुमास्तरांची शिकवणी भेटली असती तर असे लिहायची सवय लागली नसती ;-).
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Sat, 05/04/2013 - 04:24

In reply to :-) by श्रीरंग_जोशी

Permalink

हात्तुझी!!!!

'धमुमास्तर'???? आयला! ते काय माणसात गणायच्या लायकीचं है होय रे? शिकवणी लावायची तर मास्तर एकच...... प्रभुमास्तर! :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 05/04/2013 - 04:29

In reply to हात्तुझी!!!! by धमाल मुलगा

Permalink

:-)

शाळेत उशिरा प्रवेश मिळाल्यामुळे सर्व शिकवण्या आधीच फुल झाल्या होत्या....
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/03/2013 - 22:02

In reply to लेख तात्या स्टाईल by लंबूटांग

Permalink

चलता हं..

चलता है रे लंबुटांग. सुखात होतो, शोफरड्रिव्हन कारने फिरत होतो तेव्हा काहीच कळलं नाही. आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली. ठीक आहे. सध्या सर्वांचंच बरेबर आहे, माझं एकट्याचंच चूक आहे हे मान्य. उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की. तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 05/03/2013 - 22:11

In reply to चलता हं.. by विसोबा खेचर

Permalink

>>>>उद्या पुन्हा टाईम बदलला

>>>>उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की. इन्शा अल्लाह खुदा कसम झूठ नही बोल रहा, उस दिन का हम इन्तेझार कर रहे है. परवरदिगार आपको सलामत रक्खे.
  • Log in or register to post comments

Submitted by ढालगज भवानी on Fri, 05/03/2013 - 22:32

In reply to चलता हं.. by विसोबा खेचर

Permalink

माझ्यापुरतं बोलते

:( तात्या मी प्रत्येक विनोदी प्रतिक्रियेला हसते बरं का. कोणाला दुखविण्याचा अथवा चढविण्याच्या हेतूने येथे येत नाही. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 05/04/2013 - 04:46

In reply to चलता हं.. by विसोबा खेचर

Permalink

हिंट?

आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली.
ह्यातून कुणाला तरी कळवळा येऊ शकतो नाही का? ( आता पुढे काय कुणा निनाव्याला रोगाने पछाडले म्हणून मदत वगैरे का ? )
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 05/04/2013 - 12:07

In reply to हिंट? by विकास

Permalink

( आता पुढे काय कुणा

( आता पुढे काय कुणा निनाव्याला रोगाने पछाडले म्हणून मदत वगैरे का ? ) रुजवात करून देईन असे तात्यांनी इथे जाहिर केले होते,किती जणाच्या वाती आत्ता पर्यंत वळल्या गेल्यात हे ज्यांचे त्यांनाच ठावुक... बाकी ज्या सदस्यांना इथल्या जुन्या जाणत्या सदस्यांचे या धाग्यावरचे प्रतिसाद पाहुन नवल वाटत आहे,त्यांनी हे सर्व सदस्य असे प्रतिसाद का देत आहेत याचा विचार करावा...कारण गेल्या ५ वर्षात माझ्या तरी पाहण्यात असा प्रकार या जुन्या जाणत्या मंडळींनी कोणाच्या लेखनात केल्याचे दिसुन आलेले नाही. बाकी तात्यांच लेखन महानच आहे आणि ते सिद्धहस्त लेखक सुद्धा आहेत... इतके सिद्धहस्त लेखक आहेत की त्यांच्या एका लिखाणात त्यांनी महर्षी व्यासांना अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी म्हंटल्याचे मला आठवते ! या वरुन उगाच तेव्हा मला कहा राजा भोज और कहा गंगुतेली ही म्हण आठवली होती... असो.
  • Log in or register to post comments

Submitted by बंडा मामा on Sat, 05/04/2013 - 09:36

In reply to चलता हं.. by विसोबा खेचर

Permalink

आता रोजच्या किराणामालाचेही

आता रोजच्या किराणामालाचेही वांधे झाल्यावर माणसं त्यांच्या प्रपिसादातल्या एखाददोन शब्दांनिशीच पटापट कळू लागली.
तात्या हे वाचुन वाइट वाटले हे नक्की. पण तुम्ही नियमीत मिपावर असता म्हणजे तुमच्याकडे चांगला संगणक आणि इंटर्नेट जोडणी आहे हे स्पष्ट आहे,किराणा माल न परवडणारा मनुष्य इंटरनेटची जोडणी कशी काय घेईल? आता टाइम बदलला आहे असा निष्कर्श काढण्यास काही हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 05/04/2013 - 10:15

In reply to चलता हं.. by विसोबा खेचर

Permalink

ह्म्म

उद्या पुन्हा टाईम बदलला की एकेकाचा 'तात्या स्टाईल' अगदी खरपूस समाचार घेईन हे नक्की.
समाचार आंतरजालीय कि रिअल लाईफ त्ये पण स्पष्ट करा कि . बाकी आंतरजालीय टिके वरून त्यात्या लगेच सामाचाराच्या गोष्टी करतात कूच जम्या नय. फॉर एक्झाम्पल.....चायला इथे म्या - सूड भांड भांड भांडतो.. पण प्रत्येक्षात आमच्यात काही वाद नसतात भले परा -विमे ची खडाजंगी चालत असेल, पण ते जेंव्हा भेटतात तेंव्हा एकमेकांचा खरपूस समाचार वेग्रे घेत नाहीत बाकीचे बरेच वाद अंतर्जालावर चालतात ते कोणी वयक्तिक घेत नाही, तुम्ही डायरेक समाचाराच्या भाषा करून लागले ना भाऊ . शिवाय तुमच्या वरील वक्तव्यावरून तुम्हाला झालेल्या प्रकारचे काडी मात्र वाईट वाटलेले नसून, केवळ काळ खराब आहे म्हणून मी गप्प आहे असेच सूचित होते आहे . शिवाय अजून कोणी येथे तुमच्यावर वयक्तिक टीका केलेली दिसत नाहीये. तुमच्या डेक्कन क्वीन च्या स्पीड ने येणाऱ्या "जुनाट फेस्बुकीय" लेखांवर झालेली ती टीका आहे . तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 05/04/2013 - 10:17

In reply to ह्म्म by स्पा

Permalink

तोपर्यंत दगडं खायला मी तयार

तोपर्यंत दगडं खायला मी तयार आहे. रक्तबंबाळ करतात पण खूप म्हणजे खूप काही शिकवून जातात ती दगडं...!
द व णी य वाक्य :)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 05/04/2013 - 10:32

In reply to चलता हं.. by विसोबा खेचर

Permalink

काही तरी गैरसमज होतो आहे

काही तरी गैरसमज होतो आहे तात्या. तुमचे किराणामालाचेही वांधे झाले असतील तर ते इथल्या ९९.९९% जनतेला माहित असण्याचा काही मार्ग नाही. जे होते आहे त्याची कारणे वेगळीच(आणि सर्वज्ञात) आहेत. त्यामुळे तो विषय जाऊच द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 05/04/2013 - 11:08

In reply to काही तरी गैरसमज होतो आहे by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

विश्वास बसत नाही.

खरोखर जर किराणामालाचेही वांधे झाले असतील तर अशा परिस्थितीत वेगवेगळे धागे काढण्याचा मूड राहतो? की माणूस दैनंदिन विवंचनेत गुंतून पडतो?
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Sat, 05/04/2013 - 11:35

In reply to चलता हं.. by विसोबा खेचर

Permalink

वाईट वाटले..

अगदीच राहवलं नाही म्हणून हा अवांतर प्रतिसाद.शेवटी चुकत कोण नाही? लक्षात ठेवा.दुनिया गोल असते- वाईट दिवसांनंतर बरे दिवस हटकून येतातच! जीवन म्हणजे शब्दश: सापशिडीचा खेळ. असते एकेकाचे नशीब!आज मी शंभराच्या घरात तर उद्या सापाच्या तोंडी. चालायचेच, कालाय तस्मै नमः
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 05/04/2013 - 09:59

In reply to लेख तात्या स्टाईल by लंबूटांग

Permalink

पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि

पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि संपादक/ सल्लागार यांच्या काही खोचक वैयक्तिक टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रीया वाचून अचंबा आणि खेद दोन्ही वाटले.
या धाग्यापुरते बोलायचे झाले तर मला फार वैयक्तिक काही दिसले नाही.
मला भूतकाळात काय झाले याची बऱ्यापैकी कल्पना आहे पण ते सगळे ह्या आणि इतर धाग्यांवर का?
झाला प्रकार गंभीर होता. त्यामानाने बरी वागणूक देत आहेत लोकं.
अनेक नवीन सदस्य जे वयाने/ अनुभवाने तात्यांपेक्षा लहान असतील त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत.
चालायचंच... मागे एकदा असेच एका नवीन सभासदावर टीका होत असताना इतरांनी पण हात धुवून घेतले होते की. अगदी रसग्रहण वगैरे करून. नाही का? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Sat, 05/04/2013 - 18:33

In reply to पण येथील ज्येष्ठ सदस्य आणि by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

माझा प्रतिसाद

या धाग्यापुरते बोलायचे झाले तर मला फार वैयक्तिक काही दिसले नाही.
माझा प्रतिसाद एकंदरच ह्या लेखकाच्या सर्व धाग्यांवर जे काही चालले आहे त्याला उद्देशून होता. हा धागा सर्वात वर होता म्ह्णून इथे टंकले इतकेच. कोणत्याच धाग्यावर प्रतिसाद वैयक्तिक नाहीत? ह्या धाग्यावर काही प्रतिसाद आहेत जे इथे उधृत केले तर हा प्रतिसाद उडेल.
झाला प्रकार गंभीर होता. त्यामानाने बरी वागणूक देत आहेत लोकं.
मी कधीच अमान्य केले नाही. मला ऐकीव माहितीवरून जे काही कळले ते गंभीरच्याही पलीकडले होते आणि मी त्याचे कधीच समर्थन करत नाहीये. पण ते सगळे इथे लिहीण्याची काय गरज आहे?
चालायचंच... मागे एकदा असेच एका नवीन सभासदावर टीका होत असताना इतरांनी पण हात धुवून घेतले होते की. अगदी रसग्रहण वगैरे करून. नाही का? smiley
गल्ली चुकताय राव,
  1. तात्या नवीन नाहीत.
  2. त्यांच्या लेखांच्या संख्येवर, गुणवत्तेवर टीका करणे ठीक आहे. मी बाकीच्या प्रतिसादांबद्दल बोलतोय.
  3. रसग्रहण, पाकृ, विडंबन सर्व ठीक आहे. करा की तात्याच्या लेखांचे! त्याच्या स्टाईलचे. येथे खुद्द तात्यांनीच लिहीले आहे http://www.misalpav.com/node/24673.
  4. तुमची वैयक्तिक आयुष्यात जी फसवणूक अथवा जे काही झाले त्याचे उट्टे इथे कशाला?.
मी काही तात्याला वैयक्तिकरीत्या भेटलेलो नाहीये, फोनवरून बोललो ही नाहीये. मिपाच्या स्थापनेच्या आसपास काय ती एक खरड केली असेल तेवढीच. त्यामुळे मी काही मित्रत्वाच्या नात्यातून वगैरे लिहीतोय असे काही नाहीये. येथे येणारे प्रतिसाद आयडी आणि लेखाला उद्देशून असावेत अशी जी एक सर्वसाधारण अपेक्षा असते त्याला अनुसरून लिहीतोय. वैयक्तिक टीका खटकली इतकेच. बाकी चर्चा करायची असल्यास खरडवहीत करूयात. येथे आधीच बरेच अवांतर झालेय नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Sun, 05/05/2013 - 00:04

In reply to माझा प्रतिसाद by लंबूटांग

Permalink

+१

लंबुशी सहमत. जो प्रकार चालला आहे तो योग्य नाही, अगदी मनापासुन ह्याचा तिटकारा वाटत आहे. भूतकाळात जे झाले ते सर्वांना माहित आहे, पण ते प्रत्येकच ठिकाणी उगाळण्यात जास्त मतलब नाही असे मला वाटते. त्यात काही काही जणांची वागणुक पाहुन तर अचंब्याने तोंडात बोटे गेली, आश्चर्यजनक आहे सगळे. ह्यावर खरे तर चकार शब्द लिहायला नव्हता पण वाहत्या गंगेत अनेकजण उगाच हात धुवुन घेत आहेत असे वाटल्याने इथे लिहले. बाकी चालु द्यात ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 05/04/2013 - 20:06

In reply to लेख तात्या स्टाईल by लंबूटांग

Permalink

लंबूटांग्याशी सहमत .

लंबूटांग्याशी सहमत .
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Fri, 05/03/2013 - 22:46

Permalink

लेख आवडला..

लेख आवडला..
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 05/04/2013 - 00:37

Permalink

+१

तात्या, लेख आवडला. जुन्या आठवणी ताज्या केल्यास. पण आता त्या पुरी-आलूरश्श्याच्या चवीच्या आठवणीने जीभ खवळली आहे त्याचं काय करू? :) अवांतरः लंबूटांगच्या प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Sat, 05/04/2013 - 04:21

In reply to +१ by पिवळा डांबिस

Permalink

+१

झणझणीत पुरी-भाजीची भूक फ्ल्याट ब्रेड अन पोट्याटो स्ट्यू वर भागणार तरी आहे का? :( अवांतरः अवांतराशी सहमत. जो तो विषय ज्या त्या जागी! तिथे गल्लत करण्यात काही हशील नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 05/04/2013 - 04:43

In reply to +१ by पिवळा डांबिस

Permalink

प्रॉब्लेम

जुन्या आठवणी ताज्या केल्यास.
तोच तर प्रॉब्लेम आहे ना! नुसत्या आठवणीच नाही, तर सवयी पण कुणाच्या जाग्या झाल्या तर?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sat, 05/04/2013 - 09:26

Permalink

लंबूटांगच्या प्रतिसादाशी सहमत

लंबूटांगच्या प्रतिसादाशी सहमत. अवांतर ह्याच परिसरातील पंचतारांकित हॉटेलात प्रशिक्षण घेतल्याने ह्या उपाहारगृहात जायचा योग बरेचवेळा आला आहे. सात्त्विक जेवण हीच त्याची खरी ओळख , असेच दाक्षिणात्य सात्त्विक जेवण येथे मिळते. अनेक जुने आयडी येथे जुने हिशेब चुकते करण्यासाठी आवर्जून आले, एरवी मिसळपाव चे त्यांना वावडे का असते हें समजू शकत नाही.. मिसळपाव वरील नित्य नियमित राबता असणार्या सभासदांचा जिलबी पाडू प्रवृत्तीवर राग मी समजू शकतो व त्यांच्याशी अंशतः मी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 05/04/2013 - 11:05

Permalink

चित्रगुप्त, संदिप चित्रे,

चित्रगुप्त, संदिप चित्रे, उपास, श्रीरंग जोशी, लंबुटांग, चावट मेला, डांबिस, धमाल मुलगा, निदान मुक्काम, आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sat, 05/04/2013 - 11:44

Permalink

पंचम पुरी

ह्या लेखातील वर्णनाचा काही भाग जमला नाही. १ पंचम चे दुकान साधेसुधे पण न सजवलेले आहे. २ स्वच्छता नाही. ताटं वाट्या तेलामुळे आणि व्यवस्थित न धुतल्यामुळे ओशटच असतात. ३ हॉटेल मुमनपाच्या ग्रेड प्रमाणे ग्रेड /३ चे आहे त्यामुळे वेटर स्वछ युनीफॉर्ममध्ये नसतात. ४ पंचम पुरी प्रसिध्द आहे ते त्याच्या झोलवाल्या झांसी ररश्शासाठी आणि वाडग्यात ठेवलेल्या वाफवलेल्या मिर्च्यांसाठी. रश्शाच्या सोबत लाल भोपळ्याची भाजी असते. ५ पंचमच्या लेखात मसाला पुरीचा उल्लेख नाही त्यामुळे लेख अर्धाच राहीला असे वाटते. ६ माझी वैयक्तिक ओळख नाही पण माझ्या माहीतीप्रमाणे पंचमवाला आता सिरीअल फायनान्सींगच्या व्यवसायात आहे. पण ही माहीती अवांतर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sat, 05/04/2013 - 11:45

Permalink

एक राहीलंच

पंचमसोबत बाज्च्या गल्लीतल्या भारतीय मिष्टानला कढी-खिचडी खाण्यासाठी जरूर भेट द्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 05/04/2013 - 11:49

Permalink

रामदास साहेब,

रामदास साहेब, मसालापुरीचा उल्लेख आहे..आपल्या नजरेतून सुटला असे वाटते.. असो.. प्ररिसादाबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिया on Sat, 05/04/2013 - 11:58

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 05/04/2013 - 12:24

Permalink

लेख आवडला

खरतर आपण प्रत्येक वेळी सर्वच हॉटेलात मिष्ट्टान्न खाण्यास जात नाही. जवळ जवळ ९०% लोक आपआपले पोट भरण्यासाठी जातात.पण अजुनही त्यात सरळसाधी अशी कित्येक हॉटेल टिकुन आहेत कि त्याची चव व जिव्हाळा त्यात्या हॉटेलात आपल्याला पुन्हा पुन्हा ओढुन घेवुन जातो.मुंबईत किंवा मोठ्या शहरात अशी खुप हॉटेल ,ठेले आहेत कि त्यात खुप रुचकर पदार्थ मिळतात. ५ रुपयात मिळणार बॉम्बेवडापाव हा तर माझ्यासाठी खुपच आवडणारा पदार्थ आहे. कोल्हापुर ला मिळणारी राजाबापुची भेळ,किंवा फडतरेंची मिसळपाव हे नादखुळाच.तसेच काही हॉटेलात मटकी उसळ ,चपाती,लोणचे,वरण.भात व पापड असा साधा मेन्यु देखिल खुप सुंदर बनवतात. तात्यांनी खुपच सुंदर लेख बर्‍याच दिवसानी लोहल्याबद्दल त्याचे आभार मानतो तसेच सुंदर लेखाला बर्‍याच ठिकाणी काही प्रतिसादानी गालबोट लावले आहे,ते जर टाळता आले असते तर खुप बरे झाले असते. कारण वडापाव किंवा पुरीभाजी खाताना चुकुन खडा आला तर चव बिघडते तसे झाले आहे. असो तात्या तुम्ही असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 05/04/2013 - 12:45

In reply to लेख आवडला by वेताळ

Permalink

धन्यवाद वेताळराव..

धन्यवाद वेताळराव..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 05/04/2013 - 12:51

Permalink

ते काही असो..

पण तात्याबांचे लेख आले, की अनेक मृत आयडी* पुन्हा जिवंत होतात आणि मिपावरती वावरायला लागतात ह्याचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे. *म्हणजे जे कधी लॉग-ईन केलेले देखील दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sat, 05/04/2013 - 12:55

In reply to ते काही असो.. by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१

मन की बात बोल दी !! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 05/04/2013 - 13:15

In reply to ते काही असो.. by परिकथेतील राजकुमार

Permalink

छान निरिक्षण रे परासायबा..

छान निरिक्षण रे परासायबा.. खरं आहे तुझं. येतात ती मंडळी माझ्यावरील मायेपोटी आणि कीबोर्ड सरसावत कौतुकाचे (?!) दोन गोड (?!) शब्द लिहितात झालं..! सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत आहे...! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Sat, 05/04/2013 - 18:12

Permalink

या पुरीवाल्याबद्दल फारसे

या पुरीवाल्याबद्दल फारसे माहीत नाही पण आगामी लेख खरेच मनीज इडलीवाल्याचा असेल तर वाट बघतोय.. आम्ही बाजूच्याच राजाशिवाजीचे.. परीक्षा संपल्यावरच्या कित्येक पार्ट्या तिथेच झाल्यात.. तेथील आकर्षण म्हणजे एकच... हवे तितके सांबार चटणी .. पोटभर आणि मोफत... ये उ द्या लेख...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 05/04/2013 - 18:49

Permalink

इकडचे अवांतर प्रतिसाद कृपया

इकडचे अवांतर प्रतिसाद कृपया आता तरी थांबवा अशी सर्वांनाच नम्र विनंती..
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 05/04/2013 - 20:15

Permalink

आता

आता टिव्हिवरील कोणत्याही भाषेतील कुकिंगवरचे कार्यक्रम पाहा १कांदा तळणे २गरम मसाला आणि टोमेटो घालून रगडणे ३गुळ सोडून किचिनमधल्या सर्व पदार्थ घालणे ४पुढे त्यात पनीर ,चिझ (तीन प्रकार),ओलिव ओईल ,अजिनोमोटो ,चायनिज सॉस वगैरे महागडे पदार्थ घालणे याशिवाय काही कमी पदार्थात खायचे जिन्नस होत नाहित हा समजायचा जमाना आहे विसोबा . माहेश्वरचे खुराक लाडू अथवा अबू स्टेशनची मटक्यातली रबडिची मलापण आठवण येते .
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sun, 05/05/2013 - 13:01

Permalink

आवडले

खुप छान
  • Log in or register to post comments

Submitted by निश on Mon, 05/06/2013 - 18:07

Permalink

विसोबा खेचर साहेब, लेख मस्त आहे.

खर तर मी तुमचे आधीचेही लेख वाचले आहेत. मला ते मनापासुन आवडले. खर तर लेख किती येतात त्यापेक्षा लेखांची वाचनीयता किती आहे, वाचणार्‍याला आनंद देण्याची ताकद किती आहे ह्याला महत्त्व द्यायला हवे. तुमचे सगळेच लेख वाचनीय असतात. त्यामुळे ते येत रहावेत व आम्हाला वाचन आनंद मिळ्त रहावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com