वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी ) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन ;)
चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥
का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे???
अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे
कशी मेलि ती अवचित वेळी,येथे येउन उलथली...॥१॥
ठाऊक आहे तुझा हा तोरा,भारी शिस्तिची तू
तुझ्या कार्ट्याने टुथपेस्ट लाऊन,जिन्यात केली थू थू
तिथेच घसरून पडले मी ना,यात मी काय चूक केली? ॥२॥
दहा ला गं पाणी गेले,अता कोठूनी आणू???
एकच हंडा घरी राहिला,कुणाच्या डोक्यात हाणू
येकच बाद्ली र्हाय्ली होती,ती बचकन तू सांडली...! ॥३॥
असु दे आता घेऊन जा ग, माझ्या घरनं पाणी
डोके दुखले ऐकून तुझी ही ,सक्काळी सक्काळी पिपाणी
एका बादलिनी माझी इश्टेट,कुठे गं खाक्कन जळ्ली?...॥४॥
ठेव तुझी ती बाद्ली तुलाच,घे डोसक्यावर ओतून
मि ही पाणी ड्र्मातले काढीन,भरलाय तो काल पासून
जा जा तुझे उपकार नको,इश्टेट तुझिही कळ्ली..! ॥५॥
==========================================================
या नंतर सदरहू दोन्ही महिला...एकमेकिस... ''ह्हूं...!!!'' असा केवळ स्त्रीजन्य आवाज काढून हुसकाऊन लावल्याच्या आनंदात घरी गेल्या...पुढे संध्याकाळी काय जाहले... ते पुढिल भागात पाहू ;-)
प्रतिक्रिया
14 Mar 2013 - 1:49 pm | प्रचेतस
महान आहात.
काय हे हिंसक विचार.
15 Mar 2013 - 4:06 am | किसन शिंदे
वा वा!!
बुवा नॉस्टॅल्जिक केलंत तुम्ही. तुमच्या या वाड्यातील भांडणांवरून मला आमच्या चाळीतली नळावरची भांडणं आठवली.
15 Mar 2013 - 4:26 am | लौंगी मिरची
हा हा हा
आवडले भांडण . =))
15 Mar 2013 - 8:28 am | अन्या दातार
फारच सभ्य भाषा. :-)
15 Mar 2013 - 2:31 pm | अत्रुप्त आत्मा
कुणाची??????????????
16 Mar 2013 - 11:05 pm | अन्या दातार
एकंदरीतच या भांडणातली.
15 Mar 2013 - 8:37 am | लीलाधर
पुढे संध्याकाळी काय काय जाहले हे प्ण लौकरच सांगा ओ :)) खर्र्च आप्ण महाण आहाट.
15 Mar 2013 - 9:24 am | चौकटराजा
फारच सौम्य शब्दात भांडण. मी यापेक्षाही भन्नाट भांडण पाण्यावरून ते ही स्त्री व पुरूषात झालेले पाहिले आहे. ( तळेगाव येथे १९६६ चे सुमारास )पण पाण्यावरूनचे खरे भांडण ऐकावयाचे असेलच तर फर्गसन मागची झोपडपटी, भैय्यावाडी शिवाजीनगर किंवा काशेवाडी भवानी पेठ येथे जाउन ऐकावे. ऐसी अक्षरे कलहे जी जहराते पैजा जिंकी चा अनुभव येईल.
15 Mar 2013 - 12:02 pm | सांजसंध्या
धम्माल आहे सगळीच. शेवटची ओळ तर कहर आहे
( प्रतिक्रिया देताना दृपाल, मेंटेनन्स अशा शत्रूंचा वारंवार सामना करावा लागला )
15 Mar 2013 - 12:05 pm | सस्नेह
भांडणपुष्पे काव्यसूत्रात ओवण्याचे कौशल्य झकास हो बुवा !
15 Mar 2013 - 12:47 pm | प्राकृत
हसुन हसुन पुरेवाट :D
15 Mar 2013 - 12:57 pm | कवितानागेश
मजेदार. :)
15 Mar 2013 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)) :)) :))
15 Mar 2013 - 2:16 pm | क्रान्ति
हसून हसून मेले........................
सांजसंध्या म्हणते तसंच बरेच दिवसांनंतर दृपल आणि मेंटेनन्सच्या पाट्या न दिसता थेट मिपा दिसलं आणि उघडलं तर हे भन्नाट जलकाव्य वाचायला मिळालं त्यामुळे जीव पाण्याच्या [रिकाम्या] बादलीत पडला. :D :D :D
15 Mar 2013 - 2:21 pm | सुधीर
:) मजा आली वाचून!
15 Mar 2013 - 2:34 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
मह्हान, निव्वळ महान आहात बुवा. दंडवत स्वीकारावा _/\_
15 Mar 2013 - 2:40 pm | पैसा
दुसरा अंक कधी?
15 Mar 2013 - 3:07 pm | सूड
बायका इतक्या शांतपणे भांडत नाहीत हो आणि पाण्याबद्दलचं भांडण असेल तर नाहीच नाही.
अवांतरः भांडणारी 'शिंदीण' असल्यामुळे हा सभ्यपणा आला असावा का?
15 Mar 2013 - 3:31 pm | अत्रुप्त आत्मा
@भांडणारी 'शिंदीण' असल्यामुळे हा सभ्यपणा आला असावा का?>>> =)) काय मेली लोकं एकेक सूड घेतात नै? :-p
15 Mar 2013 - 3:50 pm | जेनी...
हिहिहि
गुर्जि भांडायला कधी यु मग ??? ;)
मत्त मत्त भांदण =))
15 Mar 2013 - 4:03 pm | अत्रुप्त आत्मा
ह्हीह्हीह्ही भांडखोर अजाण बालिके... तू येण्णाल माज्याशी भांदायला?
पैज आप्ली..तू आलिस तर
15 Mar 2013 - 4:27 pm | प्रचेतस
पवारीण बै दिवेकरीण बैंशी भांडायला येतील ओ.
15 Mar 2013 - 4:30 pm | पैसा
कुठेत दिवेकरीण बै?
15 Mar 2013 - 4:33 pm | प्रचेतस
येतील की लवकरच.
15 Mar 2013 - 6:41 pm | जेनी...
:-/
शी बै :-/ कित्ती प्रेमाने विचारलं होतं यु का भांडायला म्हुण :-/
दीवेकरीन येनार असेल तं आपली सपशेल मागार :-/
मेली खुप घाण शिव्या देते :(
16 Mar 2013 - 12:51 am | जेनी...
सॉरी हं .. ही दीवेकरीण म्हणजे गुर्जिन्ची बायकू हे खुप उशिरा लक्षात आलं ..
तरिपण जर दीवेकरिण पवारीण बैंशी भांडली तर ते भांडण असं होईल :
अगं सटवे कितीदा सांगितले , नादी लागु नकोस तु माझ्या
ह्यांना सांगितले तर यंदा गणपतीस जाणवे कोण घालील गं तुझ्या ???
भदाड्या अंगाच्या ठुमक्यानं तु मुद्दामच बादली माझी सांडली
अन जगाला वाट्टेल आता कि ही दीवेकरीणच पवारणीशी भांडली || धु ||
=))
स्वारी बर्का गुर्जि ;)
16 Mar 2013 - 1:05 am | अभ्या..
=)) =)) =)) =))
15 Mar 2013 - 4:43 pm | बॅटमॅन
असं नै विचारायचं आत्मूस. मिपाची परंपरा विसरला काय?
"पुजा मझ्यशि भंदन कर्नर कं" :P :P =))
15 Mar 2013 - 5:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
+P :)) +P
15 Mar 2013 - 5:28 pm | प्यारे१
बुवांचे आब्जर्वेशन लय भारी हे!
15 Mar 2013 - 6:55 pm | अनन्न्या
त्या स्मायल्या कशा टाकायच्या यावर एक धागा टाका, त्यांचे उगमस्थान, उत्क्रांती, प्रगती आणि काय ते करंट मस्त सारखे तपशीलवार येऊ दे.
15 Mar 2013 - 10:30 pm | सानिकास्वप्निल
=)) =))
15 Mar 2013 - 11:07 pm | मोदक
च्यायला. :-D
15 Mar 2013 - 11:56 pm | चिगो
सभ्य जल-भांडणकाव्य आवडले..
अवांतर- आमच्या एका गुर्जींचा किस्सा आठवला. ते त्यांच्या लहाणपणी म्हणे नळावरच्या भांडणाच्यावेळी कागद-पेन घेऊन बसले होते म्हणे, चकमकीतल्या अस्सल म्हणींना टिपून घ्यायला.. :-D . भांडण झाल्यावर त्यांच्या आजींना वही दाखवली, तर बदडला त्यांना..
16 Mar 2013 - 12:11 am | मोदक
ते त्यांच्या लहाणपणी म्हणे नळावरच्या भांडणाच्यावेळी कागद-पेन घेऊन बसले होते म्हणे, चकमकीतल्या अस्सल म्हणींना टिपून घ्यायला..
:-))
16 Mar 2013 - 1:18 am | बॅटमॅन
+१.
=)) =))
16 Mar 2013 - 1:00 am | आदूबाळ
व्यासंग व्यासंग म्हणतात हो हाच!
16 Mar 2013 - 12:03 am | अभ्या..
काय झाले होते रे किसना? जाउदे चल आपण हाटीलात जाऊ आपल्या. :)
16 Mar 2013 - 12:05 am | ५० फक्त
बुवा, वाड्याच्या जिन्यावर पण लिहा आणि सार्वजनिक फळ्यावर पण.
16 Mar 2013 - 12:12 am | अभ्या..
जिन्याखाली पण विसरु नका. ;)
16 Mar 2013 - 9:09 am | अत्रुप्त आत्मा
@जिन्याखाली पण विसरु नका.>>> तो विषय दीर्घकाव्याचा आहे,असल्या नव्हे ;-)
16 Mar 2013 - 1:16 pm | तुमचा अभिषेक
हा हा हा.... जबरी आहे... आठवनी जाग्या झाल्या.. :)
नशीब काव्यकविता म्हणून दुर्लक्षिले नाही गेले माझ्याकडून..
16 Mar 2013 - 11:42 pm | श्रिया
मजेदार आहे कविता.
18 Mar 2013 - 6:56 pm | मी-सौरभ
आवड्ल्या गेले आहे
18 Mar 2013 - 9:18 pm | मनीषा
भांडु या सौख्यभरे !
पुढचं भांडण कशावरून होणार आहे म्हणे? :)
18 Mar 2013 - 9:26 pm | पप्पु अंकल
सत्यनारायण सांगताना अचानक सुर्सुरी आली (कविता करण्याची) तर जरा जपुन हो मालक बाकी धमाल आली.
18 Mar 2013 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा
मास्टर ब्लास्टर - वृत्तराज - मिस्टर.बॅटमॅन ऊर्फ वाघुळशास्त्री यांनी आमच्या काव्यकिड्याला वृत्तात नीट-बसवून त्याचा पतंग न होता एकदम Fullपाखरू केले आहे. ;-) मला त्यांनी व्यनीतून पाठवलेला हा अप्रतिम रचना प्रकार आपल्या आस्वादासाठी सादर करत आहे.
==============================================================================
@वृत्तराज मास्टर ब्लास्टर.बॅटमॅन ऊर्फ वाघुळशास्त्री पुनर्रचित-
=============================जलाष्टक=================================
जातां चाळजिन्यातुनी लगबगी, जैं बादली सांडली |
तेव्हा येवुनि देशपाण्डिणिसवे, शिंदीण ती भांडली ||धृ.||
डोळे ते जणु पूर्णतःचि फुटले, आहे पुढे लक्ष का?
आत्ता आणलि बादली भरुनिया, गोटे शिरी घालु का?
मेली ही इकडे कशी कडमडे, आत्ताचि ऐशा पळीं...||१||
तोरा तो तव सर्व ठाउक मला, भारीच शिस्तीचि तू
कार्ट्याने तव टूथपेस्ट गिळुनी , केली जिन्याते थु-थू
मी तेथे पडले पहा घसरुनी, ही चूक का जाहली? ||२||
गेले ते जल वाजती जधि दहा, आणू कुठूनी अता?
हंडा एकचि जो घरी मम; शिरी हाणू कुणाच्या अता?
होती एकच बादली तवगुणे तीही अशी सांडली ||३||
आसो देचि अता; घरोन मम तू घेवोन पाण्यासि जा
प्रातःकाळि पिपाणि ऐकुनि तुझी डोस्क्यास होई सजा
एका बादलिने जणों मम पुरी इष्टेट का नष्टली? ||४||
ठेवी गे तव बादली तुजसवे, घे मस्तकी ओतुनी
काढी थांब जळा ड्रमामधुनिया, जो पूर्ण काल् पासुनी
नक्को जा, उपकार ते तव, तुझी इष्टेट ती दीसली ||५||
ऐसे भांडण भांडिता उभयतां "हूऽ" कार तो काढुनी
गेल्या त्या परि एकमेक जणु हो निष्कासनें मोदुनी ;-) ==== बोला सुमुर्त ब्याट-म्यान ;-)
18 Mar 2013 - 11:33 pm | जेनी...
=)) =))
भौराया भारी =))
19 Mar 2013 - 2:15 am | अभ्या..
भौराया ह्याला काय शार्दूलविक्रीडीत का काय म्हणायचे रे?
ते मासाजासतताग जुळतेत की बरोब्बर. :)
19 Mar 2013 - 2:29 am | बॅटमॅन
एग्झॅक्टली!!! तेच आहे ते. :)
19 Mar 2013 - 6:25 am | स्पंदना
बॅटॅ एक वृत्ताचा क्लास घे मिपावर सविस्तर.
फार गरज आहे. इतक काही विसरल आणि आम्हाला शिकवणारी बाई काय फार ईंटरेस्ट्न शिकवत नव्हती त्यामुळे डोक्यात काय प्रकाश पडला नव्हता तेंव्हा. आता तरी पडतो का पाहु.
ही रिक्वेस्ट समजावी, कोल्लापुरी असल्याने रिक्वेस्ट सुद्धा अशी दनदणीत करायची सवं आहे
19 Mar 2013 - 3:43 pm | सूड
बुवांच्या कवितेचं रुपडंच बदललंस राव !! मस्तच.
19 Mar 2013 - 7:33 am | ५० फक्त
बॅटमॅन, तुम्ही बुवांच्या कवितेला ब्युटी पार्लरमध्ये नेउन आणलंत, धन्यवाद.
19 Mar 2013 - 9:42 am | अत्रुप्त आत्मा
@ब्युटी पार्लरमध्ये नेउन आणलंत>>> =))
19 Mar 2013 - 10:43 am | सुमीत भातखंडे
मस्त...:))
19 Mar 2013 - 11:04 am | डॉ सुहास म्हात्रे
अत्रुप्त आत्मा गुर्जींचा "कोल्हापूरी ठेचा-कांदा-भाकरी" आणि कविराज वाघुळशास्त्रींचा "वरण-भात-मटारची उसळ-शिक्रण" हे दोन्ही बेत एकदम फक्कड आहेत.
काय काय भन्नाट प्रतिभावान मंडळी आहेत मिपावर... दिल यकदमच गार्डन गार्डन हो गया :)) :)) :))
19 Mar 2013 - 4:07 pm | प्यारे१
+१००००००
मस्तच! बॅटॅ, लय भारी रे!