एक स्वप्न प्रवास (१०)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
4 Sep 2008 - 9:57 am

या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859
एक स्वप्न प्रवास.(६) http://misalpav.com/node/1894
एक स्वप्न प्रवास.(७) http://misalpav.com/node/1966
एक स्वप्न प्रवास (८) http://www.misalpav.com/node/2085
एक स्वप्न प्रवास (९) http://www.misalpav.com/node/3210

मी मॆन्युअल वाचुन पिशवीचा एक बंद ओढला एक पाय पिशवीत टाकला होतच आता दुसरा पायही पिशवीत टाकला. भोवतालचे सगळे कशलाशा तपकिरी रंगात अंधारुन जात आहे असे काहिसे वाटु लागले. आणि

मी त्या पिशवीत अक्षरश: ओढला जातोय असे वाटु लागल. कसल्याशा ओढीने मी पिशवीत आत जात होतो. मी अख्खा आत गेलो. पिशवीचे बंद मी धरुन ठेवले होते. मी सम्पूर्णपणे आत आलो
पिशवीत एक प्रकरचा तपकिरी खाकी अंधार होता. हवा कुंद होती पण गुदमरुन टाकणारे असे काही नव्हते. भीति वगैरे वाटण्याच्या अवस्थेच्या पलिकडे गेलो होतो. तोंडतुन शब्द फ़ुटत नव्हता. पिशवीचा बंद मी खाली जाण्याच्या वेगामुळे हिसडा बसुन हातातुन कधी सुटुन गेला तेच समजले नाही. मी खालीखाली जात होतो. पिशवीच्या बाजूचे कापडही आता हाताला लागत नव्हते.
मी वेगाने कोठेतरी निघालो होतो. नक्की कोणत्या दिशेत जातोय तेच कळत नव्हते. काय करावे तेच सुचत नव्हते. जोरात ओरडावेसे वाटत होते. पण तोंडातुन एक शब्दही फ़ुटत नव्हता. कितीवेळ झाला तरी माझी खाली जाण्याची गती कमी होत नव्हती. ती वाढत नव्हती नव्हती इतकेच काय ते समाधान. पण इतक्या वेगात खाली जात राहिलो तर कुठेतरी आपटुन माझा चक्काचुर होणार हे स्पष्टच होते. तोंड शिवल्यासारखे झाले होते. मी दातावर दात घट्ट दाबुन ठेवले होते. त्याने काय होणार होते कोण जाणे.भोवतालचे काहीच दिसत नव्हते. फ़क्त तपकिरी अंधार दिसत होता. आणि मी वेगाने त्य कसल्याशा विवरातुन खालीखाली कोठेतरी निघालो होतो.
मला भगव्द्गीता आठवली त्यातल्या अर्जुनाचे "सिदन्ती मम गात्राणी" आठवले. इथे माझे आख्खे शरीर थडथडत होते. गात्रे वगैरे शिल्लक होते की कसे तेच उमजत नव्हते.मग "वांसासी जीर्णानी यथा विहाय" आठवले .....खालीखाली जात .आपण कुठेतरी आपटणार आणि आपला चक्काचुर होणार मग कोणीतरी आपल्या घरातल्याना हे "वांसासी जीर्णानी...." वगैरे ऐकवणार. असाही एक विचार मनात चमकुन गेला. पण मी या एका पिशवीत आलोय तेथेच कुठेतरी आपटुन चक्काचुर झालोय हे घरातल्याना कळणार तरी कसे. घरी शोधाशोध करतील. इकडेतिकडे मित्राना फ़ोन करतील आपण नाहिसे झालो हे जाणवल्यावर पेपरात फ़ोटो देतील. " जेथे असशील तेथुन परत ये तुझ्याशिवाय आईला अन्नपाणी जात नाहीये" असा मजकूर देतील. पण हे वाचणार तरी कोण. मग कधितरी कोणीतरी आपल्यासारखाच दिसणारा कोणितरी घरी येईल आईला वाटेल की मीच घरी आलो. आई त्याला तिखटामिठाचा खारा शिरा करुन देईल..तो त्याला आवडेल आणि मग आई त्याला मी म्हणुनच समजेल. मग तो माझे कपडे ,पांघरुण बाईक ,ब्यांकेतले अकाउंट, मित्र वगैरे सगळेच वापरेल. हं फ़क्त इमेल वापरु शकणार नाही. कारण त्याच्या पासवर्ड फ़क्त मलाच माहीत आहे. ऎन ला पाठवलेली मेल्स त्याला कधीच मिळु शकणार नाहीत. फ़क्त मोबाईल मध्ये तिचा फ़ोन नंबर आहे.
मोबाईलच्या आठवणीने माझा हात अवचित खिशाला गेला. मोबाईल खिशातच होता. हे एक बरे झाले. निदान बाहेरच्या जगात संपर्क करायला एकतरी साधन होते.या पिशवीत मोबाईलची रेन्ज मिळत असेल तरच त्याचा उपयोग होईल. हळु हळु माझा खाली जाण्याचा वेग कमी होऊ लागला. भोवतालचा तो तपकिरी अंधार सुद्धा कमी कमी होऊ लागला.
मला आता थोडे दिसु लागले होते. मी एका विवरात होतो. विवराच्या खाकी भिंती बहुधा दगडी असाव्यात. पण त्या नीट बांधलेल्या होत्या. सुबक पणा जागोजाग दिसत होता.
मला उगाचच ज्यूल्स व्हर्नच्या "जर्नी ट्वर्ड्स द सेंटर ऒफ़ द अर्थ" ची आठवण झाली. त्यातली मुले अशीच एका विवरात अडकली होती. आणि त्याना सप्त पाताळ दिसले होते. मलाही दिसणार होते बहुतेक. त्यातल्या त्या लोखंड खाणा-या माशांसकट. पण निदान ते गृप मधे होते मी एकटाच होतो.
आपल्याला ऎन ला भेटायला तीच्या स्वप्नात जायचे आहे वगैरे सगळॆ मी विसरलो.
तीच्या साठी आपण भलतेच काहीतरी करुन बसलोय हे लक्षात आले होते. पण ते आता निस्तारणे भाग होते. शिवाय ऎनला जर सांगितले की मी तुझ्यासाठी एका पिशवीत उडी टाकली तर ती वेड्यातच काढेल. ती म्हणेल की लोक दरीत उडी टाकतात / खड्यात उडी टाकतात , समुद्रात उडी मारतात , फ़ारच झाले तर विमानातुन उडी मारतात.......तू यक:ष्चित पिशवीत उडी मारलीस? कै च्या कै च.
माझी गती हळु हळु कमी झाली. मी कुठेही न आदळता जमिनीवर अलगद टेकलो. त्या पृष्ठभागाला जमीन म्हणायचे कारण मी त्यावर पाय टेकवले होते इतकेच. आतड्याच्या आतुन असावा तसा श्लेशमल स्पर्ष होता त्या जमिनीचा. मी घसरुन रापकन आदळलो नाही इतकेच. पाऊले डामरात चिकटुन बसावी तशी रुतुन बसली होती. उचलायलाच येत नव्हती. सरकवता मात्र येत होती.
एका चिंचोळ्या पण विस्तीर्ण दालनात मी उभा होतो. सभोवतालच्या भिंतीना हात लावला तर त्यांचा ही स्पर्ष जमिनीसारखाच वाटत होता.श्लेश्मल....गुळगुळीत...बुळबुळीत. हाताला डीटर्जन्ट लावावा तसे वाटले.
भिंतींचा रंग तपकिरी लालसर करडा होता. कोठेकोठे फ़ाटे फ़ुटलेल्या काळपट निळ्या रेशा दिसत होत्या. सभोवताली एकप्रकारचा श्लेश्मल चिकटपणा व्यापुन राहिला होता. मधुनच जमिनीवरुन कसलासा चिकट द्राव पाझरुन येत होता.
मला अचानक शंका आली मी एखाद्या प्राण्याच्या पोटात तर नाहिय्ये ना? ....मी वर पाहिले.त्या चिंचोळ्या दालनाची भिंत लांबवर वळत गेली होती. मधुनच ती आकुंचन पावत असावी असे मला वाटले.मला दरदरुन घाम फ़ुटला. माझ्या सर्वांगावर कसलातरी श्लेश्मल द्राव पसरतो आहे असे मला वाटले. मी बोट लावुन पहिले. हातावर गालावर पायावर कसलासा चिकट बुळबुळीत श्लेश्मल द्रव होता.अगदी कोटिंग केल्यासारखा.
मला एकाचवेळेस हुडहुडी भरुन थंडी वाजु लागली , पोटात एकदम मुरडा आला , जाम उकडत असावे तसा घाम आला, छातीचे ठोके एकदम सर्वाना ऐकु जातील एवढ्या मोठ्याना पडत होते.
मला जाणीव झाली...मी कुठल्यातरी प्राण्याच्या आतड्यात होतो....बापरे.....आता बाहेर कसे पडायचे?
(क्रमश:)

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

रामदास's picture

4 Sep 2008 - 10:03 am | रामदास

डोळ्यासमोर चित्र उभं राहीलं आणि घाम फुटला.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

यशोधरा's picture

4 Sep 2008 - 10:05 am | यशोधरा

बापरे!! भलतंच ड्यांजर दिसतय स्वप्न!!

स्वाती राजेश's picture

4 Sep 2008 - 11:52 am | स्वाती राजेश

विजुभाऊ तुम्हाला अशीही स्वप्ने पडतात? मला वाटले फक्त पर्‍यांची स्वप्ने पडतात..:)
असो, मस्त लिहीले आहे...
लहानपणी रामसे बंधुचा पिक्चर पाहताना जशी स्थिती झाली होती तशी तुमची झालेली दिसते इथे स्वप्नात....
मस्त वर्णन पण यावेळी हात आखडता का घेतला लेख लिहीताना?

जैनाचं कार्ट's picture

4 Sep 2008 - 12:04 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हेच म्हणतो !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

डोमकावळा's picture

4 Sep 2008 - 11:58 am | डोमकावळा

पिशवीतून डायरेक्ट प्राण्याच्या पोटात..... :SS बापरे इकडे माझ्या पोटात गोळा आला.
च्यायला डेंजरच स्वप्न पडतात की तुम्हाला...खतरनाक...
पुढे सांगा की काय?

चंबा मुतनाळ's picture

4 Sep 2008 - 1:43 pm | चंबा मुतनाळ

श्लेम म्हणजे शेंबूड का हो विजुभावू??

विजुभाऊ's picture

5 Sep 2008 - 12:59 pm | विजुभाऊ

श्लेश्मल म्हणजे चिकट बुळबुळीत असा कोणताही पदार्थ . श्लेश्मल हे मराठीत विशेषण आहे. नाम नाही.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मदनबाण's picture

5 Sep 2008 - 8:24 am | मदनबाण

पोटात खड्डा पडला ना !!..

(स्वप्नाळु)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda