एक स्वप्न प्रवास.(२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 May 2008 - 11:35 pm

या पूर्वीचा दुवा http://misalpav.com/node/1699
प्रिय ऍन
मागचा अनुभव जमेस धरुन यावेळी समुद्र मार्गेच् प्रवास करावा असे ठरवले.
जरा लवकरच् संध्याकाळी झोपलो. "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक सोबत होतेच्. औषधाच्या दुकानातुन प्रिस्क्रिशनवर खप होणारे हे एकमेव बिगर वैद्यकिय पुस्तक. बहुतेक डॉक्टर हे पुस्तक रोग्याना भूल देण्यासाठी चांगले भूलक( ट्रन्क्विलायझर)म्हणुन वापरतात. मला ते माझ्या सहकार्यांकडुन वाढदिवस नसतानाही वाढदिवसाची सप्रेम भेट् असे स्केचपेनने लिहुन दिले गेले होते. "त्यामुळे निदान थोडावेळ का होइना हा खवीस प्रोजेक्ट मॅनेजर सारखा छळणार नाही." हे वाक्य मात्र पेन्सिलीने लिहुन खोडले होते..
असो. काय म्हणत होतो मी .हां संध्याकाळी जरा लवकरच् झोपलो . "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" पुस्तकाच्या पहिल्या पानावरच्या तिस-या ओळीतच् मी गारद झालो आणि गाढ झोपलो.
हवाई प्रवासाचा मागचा अनुभव गाठीशी होता. शिवाय हल्ली विमानाने प्रवास ही एक अनिश्चीत् गोष्ट झाली आहे.विमानतळावर जाताना रस्त्यात ट्रॆफ़िक ज्याम असते आणि विमान तळावर ही ट्रॆफ़िक ज्याम असते.
मी ऐकले की हल्ली या ट्रॆफ़िक ज्याम मुळे लोक मुम्बई विमानतळावर हवेतच् ऑफ़िसच्या मिटींग्स् घेतात.मागे एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती. वेगवेगळ्या देशांत काम करणारे अधिकारी एका विमानातच चक्क त्यांची विमाने ; पंखावरुन चालुन जाउन ओलांडुन एकत्र आले होते. खरे खोटे कोण जाणे.पण सबसे तेज बातमी होती त्या दिवशी मुम्बई विमानतळावर ट्रॆफ़िक होताच एवढा ज्याम.जिकडे तिकडे विमानेच् विमाने होती. जमिनीवर हवेत विमानेच् विमाने होती. इन्डीगो , गो एअर वेज आणि स्पाईस जेट या तीन विमान कम्पन्यानी हवेत विमाने हवेत पंख एकमेकाना जोडुन पंखावरुन प्रवाशाना चालत हवेतच इतर विमानात जाता येईल अशी सेवा देउ केली.अशा रीतीने जर्मनी जपान आणि अमेरिका येथील अधिकारी भारतातल्या अधिकार्‍याना भेटले.मिटींग्स् घेतल्या. चर्चा केल्या आणि विमानांच्या पंखावरुन पुन्हा एकदा चालत जाउन स्वत:चे विमान गाठले.
भारतातेली बहुराष्त्ट्रिय कंपनी टाटा बेन्झ् च्या सहकार्याने अतीमहत्वाच्या अधिकार्‍यांसाठी एक पंखाची जोडी आणि हवाई छत्री विकसीत करण्यच्या विचारात आहे असेही ऐकावात आहे.
असो तर काय म्हणत होतो मी. हां थंड हवेत कुडकुडत पंखावरुन चालण्याची कोणतीही जोखीम मी घेणार नव्हतो.मी समुद्र मार्गे जायचे ठरवले.
खवळलेल्या समुद्रातुन आगबोटीने प्रवास करणे हे ही काही कमी जोखमीचे नसते. म्हणुन मी सरळ पाणबुडीचे तिकीट बूक केले.
पाणबुडी गेट वे ऒफ़ इंडीया पासुन निघणार होणार होती.पाणबुडी थोड्या खोल पाण्यात उभी केली होती. आम्हाला पाणबूडी पर्यन्त् पोहुन जावे लागेल असे सांगण्यात आले.
काही उत्साही विरानी तेथे जाण्यासाठी अक्कल चालवुन एक नवी शक्कल शोधुन काढली. त्यानी त्यांच्या ब्यागा पाण्यावर टाकल्या आणि ब्यागांवर बसुन तरंगतच ते तेथे पोहोचले खरे .पण पाणबूडी समुद्रतळावर उभी होती. पाण्यावरुन ती दिसत नव्हती.
जहाज कम्पनीने त्या लोकाना पाण्यात बुडण्यासाठी मदत केली.मी पाणबूडी उभी होती तेथे गेलो.पाणबूडीत बसलो. सगळ्या सीट भरल्या होत्या. मला खीडकी जवळची जागा मिळाली. सगळे लोक व्यस्थीत बसले हे पाहिल्यावर पायलट ने पाणबूडी सुरु केली. एक छोटासा धक्का बसला आणि पाणबोडीने वेग घेतला.
ती आता मुम्बै कोचीन दक्शिण श्रीलंका कलकत्ता म्यानमार, जावा( खुर्द आणि बुद्रुक) सुमात्रा मार्गे मलशिया ला जाणार होती.
पाणबुडी आता ताशी ४० समुद्री मैल अशा स्थिर वेगाने जात होती.भोवतलचे पाणी स्थिर होते. आणि आसपास समुद्रात झाडी दाट होती..अनेक प्रकारच्या पाणवनस्पती आणि मासे दिसत होते.देवमासे, ऒक्टोपस वगैरे येताना जाताना दिसत होते.पायलट नकशा बरहुकुम चालला होता. रस्त्यात दिशा/ अंतर दर्शक् खुणा होत्या त्यामुळे आम्हाला अंतर कळत होते. अचानक एक जोरदार धक्का बसला. माझ्या हातातली कॊफ़ी ;कप हेंदकळल्यामुळे शर्टावर सांडली. समुद्रात एक मोठा खड्डा होता. खड्डा कसला दरीच म्हणाना.. पाणबुडी त्यावर तरंगायला हवी होती पण बसलेल्या जोरदार धक्क्याने पाणबूडीचे एक इन्जीन बिघडले.सर्वानाच काळजी वाटु लागली.
पायलट ने दुसरे इन्जीन चालु करायाचा बराच प्रयत्न केला.पण ते शांतच राहीले. आता पाणबुडी केवळ एकाच इन्जीनावर धावत होती.
आम्ही कोठेतरी म्यानम्यारच्या आसपास असु. पाणबूडी आता खोल पाण्यात होती.आम्हाला स्पॆनिश पद्धतीचे जेवण देण्यात आले. चिज पिझ्झा,आणि डेझर्ट्स्.
खिडकी बाहेर ची दुनिया आता बदलली होती. पिर्‍हाना, छोटे शार्क समुद्री, कासवे अवती भोवती दिसत होते.तुमच्या डोक्यावरुन मासे पोहोताना पाहणे हा अनुभव काही वेगळाच असतो.
पाणबूडी आनखी काही वेळ अशीच जात राहीली.काहीतरी कारण झाले आणि दुसरे इन्जीनही बंद पडले.पाणबूडी थोडावेळ तशीच पुढे जात राहीली आणि थोड्या वेलानन्तर तीची गती पूर्ण थांबली.
पायलट् ने इन्जीन दुरुस्तीसाठी खोलले. एव्हाना पाणबूडी पुढे जायची थांबली आणि ती आता पुढे जाण्याऐवजी खाली खाली जाउ लागली.समुद्रतळावर जाउन ती स्थिरावाली.
सगळ्यांनाच खूप काळजी वाटु लागली थोडे खाट खूट् करुन झाल्यावर पायलट ने कोणी चांगला मेक्यानीक आहे का इथे अशी विचारणा केली.
आमच्यात आय सर्जन , हार्ट सर्जन , ओरॆकल सर्टीफ़ाईड प्रोफ़ेशनल , एस् ए पी सर्टीफ़ाईड, जावा प्रोफ़ेशनल्स्, नेटवर्क ऎडमिनिस्टर असे बरेच सगळे होते पण कोणीही साधा मेकॆनीक नव्हता.गाडीत पेट्रोलकुठे भरायचे याउपर कोणाचा इन्जीनाशी दूरान्वये ही संबंध आला नव्हता. पत्येक जण उपाय सांगत होता. ऒइल पहा , \टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची. कोणीतरी खाली उतरुन पाणबूडीला धक्का मारुया आणि पायलट त्या धक्क्यावर पाणबूडी स्टार्ट् करेल अशीही एक सूचना पुढे आली.बस असती तर ही सूचन योग्य होती पण पाणबूडी साठी अयोग्य होती.
काहीनी दुसरे वाहन बोलावुन आपली पाणबूडी त्याने ओढुन न्यावी अशी सूचना केली. पण आसपास समुद्रात कोणतेच वाहन बोट दिसेना.....
मी माझी केबिन ब्याग उघडली. प्रवासत काहीतरी चाळा असावा म्हणुन घेतलेल्या बबल गम च्या पाकिटावर माझी नजर पडली. एक कल्पना सुचली.
प्रत्येकाने बबलगम चे फ़ुगे करावेत मी सूचना केली.भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले. लोकाना बबल गमचे फ़ुगे कसे करावे ते शिकवले..
प्रत्येकाने माझ्या सूचनेवर विश्वास ठेउन बबलगम चे फ़ुगे फ़ुगवायला सुरुवात केली. साधारण ३०० फ़ुगे झाले. लोक थकले . गाल दुखताहेत अशी तक्रार करु लागले.त्यावर एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी पाटी पाहिल्याचे सांगितले. लोकानी बबलगम चे फ़ुगे फ़ुगवणे चालुच ठेवले. ३५० वा फ़ुगा फ़ुगवला गेला आणि पाणबूडी जराशी हलली. ४००व्या फ़ुग्यानन्तर आता वरवर येऊ लागली. फ़ुगे फ़ुगवणे चालुच् ठेवले.पाणबूडी आता पूर्ण समुद्रसपाटीवर तरंगु लागली. एक भलेमोठे व्यापारी जहाज आमच्याच दिशेने येत होते.आम्ही त्याच्या मार्गात होतो.व्यापारी जहाजाने आम्हाला इशारा देण्यासाठी भोंगा वाजवला.जहाज जवळ येत चालले .भोंग्याचा आवज जवळ येउ लागला......पों...........पों....... पों.........

.पों...........पों....... पों...पों...........पों....... पों..पीप् पीप् क्रॆम्....ढिं..ठाण.ट्रीट् ट्रीट् बिल्डींसमोरचा रस्ता ट्रॆफ़िक तुम्बला होता. रिक्शा ट्रक टेम्पो बस बैल गाड्या जीप. बहुतेक सगल्या प्रकारच्या गाड्या त्यात होत्या.प्रयेक् वाहन पूर्ण ताकदीनिशी हॊर्न वाजवत होते.त्या गोंगाटाने मी खडबडुन जागा झालो.........
पुढच्या वेळेस् तुझ्या स्वप्नात येण्यासाठी मला आता काहीतरी वेगळाच मार्ग वापरायला हवा
बघु. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास आज कसा पूर्ण करता येतोय ते.

तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर......

(इथे क्रमश: संपले)........

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

7 May 2008 - 11:52 pm | अभिज्ञ

विजुभाउ,
जबरदस्त झालेय स्वप्न.
अहो ते "येथे गाल दाबून मिळतिल" असे दुकान कुठे आहे हो?त्याचा पत्ता खरोखर द्याच.
हसून हसून येडा झालो राव.

बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची.

हा हा हा. जबरा हाणला आहे.

बाकी,चहा,कैरी,आंबे,द्राक्ष, पापड तसेच धमुचे लग्न सारखे वेगवेगळे विषय आणि हा अचानक चालु केलेला
स्वप्नवत प्रवास. मानले राव तुमच्या लेखनाला आणि कल्पना शक्तीला.
हॅटस ऑफ टू यू विजुभाउ.

पुढील लिखाणास शुभेच्छा.

अबब.

इनोबा म्हणे's picture

8 May 2008 - 12:38 am | इनोबा म्हणे

असली विचित्र स्वप्ने बर्‍याच वेळा पडली असतील सगळ्यांना! पण जागतेपणी असली स्वप्ने आपण तरी पाहली नाय बॉ! कल्पनाविलास जबराच आहे तुमचा.

सुचना:हा लेख मी खरेच वाचत आहे की,हे स्वप्न आहे याबद्दल लेखकानी खुलासा करावा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

गणपा's picture

8 May 2008 - 1:10 am | गणपा

विजुभाऊ, धमाल लिहिलय.
जावा( खुर्द आणि बुद्रुक) :))
भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले.

:)) :))
" येथे गाल दाबुन मिळतील"
=)) =)) =)) =))
सदाशिव पेठेतला पत्ता देता का? हसुन हसुन गाल दुखले....

(इथे क्रमश: संपले)........
:( इथे नुसतं क्रमश: वाचायला आवडल असतं.

मदनबाण's picture

8 May 2008 - 3:52 pm | मदनबाण

असेच म्हणतो.....

(स्वप्नाळु)
मदनबाण.....

आनंदयात्री's picture

8 May 2008 - 10:15 am | आनंदयात्री

>>टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद
>>एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी

हा हा हा .. जबरा !!

मनस्वी's picture

8 May 2008 - 11:32 am | मनस्वी

एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती.

हो.. मी पाहिलेली ती बातमी व्हेक्टरसाहेब.

पाणबुडीचा अदभुत प्रवास आवडला.

शरुबाबा's picture

8 May 2008 - 11:24 am | शरुबाबा

भाउ , येकदम मस्त .

धमाल मुलगा's picture

8 May 2008 - 11:38 am | धमाल मुलगा

हे परमेश्वरा,
मी काय वाचतोय, हे मलाच कळत नाहीये, जे कळत ते झेपत नाहीये, जे झेपतय ते टिपत नाहीये, जे टिपतय ते वाचता येत नाहीये, जे वाचता येतय ते स्वप्नात घडतय, ते जे स्वप्न आहे ते विजुभाऊंचं आहे, मग ते मी कसं पाहतोय? की मीच स्वप्नात आहे? ....
माझ्या आकाशातल्या मेंढपाळा, तुझ्या ह्या अजाण मेंढराला माफ कर!

- पोप धमाल बेनेडिक्ट

चांगलं चाललय म्हाराजा विजुभाऊ, लै भारी फिरवताय आम्हाला तुमच्याबरोबर!

बाकी पाणबुडी आणि समुद्रतळाचा आपला बराच अभ्यास दिसतोय. लेखनातून जाणवतोय :)

बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची.

बा, बाळ फाटका, वाचतोयस ना, तुझ्या कंपनीच्या 'फ्लॅगशीप प्रॉडक्ट'ची कशी बिनदिक्कत ठोकताहेत? जरा सुधारणा कर रे!


भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले.

आयच्च्या गावात रे !!!!!
आयला, भडकमकर क्लासेस म्हणजे आप्पाचा ढोलच झाला...जो-तो येतो आणि थाप मारुन जातोय :))

" येथे गाल दाबुन मिळतील"

:)) :))
हळू दाबा म्हणावं...नाहीतर आपलेच वाजवून मिळतील :P

llपुण्याचे पेशवेll's picture

8 May 2008 - 9:54 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला, भडकमकर क्लासेस म्हणजे आप्पाचा ढोलच झाला...जो-तो येतो आणि थाप मारुन जातोय

धमालराव हे बाकी खरे बोललास भघ.. :)
पुण्याचे पेशवे

अन्जलि's picture

8 May 2008 - 2:43 pm | अन्जलि

हसुन हसुन खरच गाल दुखले धमाल स्वप्न आहे. हा.. हा... हा... मला बरोबर लिहिता आले

ब्रिटिश टिंग्या's picture

8 May 2008 - 3:41 pm | ब्रिटिश टिंग्या

त्यावर एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी पाटी पाहिल्याचे सांगितले.
हा हा हा! :D

(इथे क्रमश: संपले)........
म्हणजे? मालिका संपली की काय? अजुन एखादा भाग वाचावयास आवडला असता.

स्वाती राजेश's picture

8 May 2008 - 4:38 pm | स्वाती राजेश

आज दोनही भाग वाचले. खूपच मस्त लिहिले आहे. विषय पण खूपच छान निवडला आहे.
बाकि तुम्हाला काही विषयाला कमी नाही. डिक्शनरी उघडली कि जे पान येईल, जो शब्द येइल त्यावर तुम्ही लिहू शकाल.....:)
हवाई प्रवासाचा मागचा अनुभव गाठीशी होता. शिवाय हल्ली विमानाने प्रवास ही एक अनिश्चीत् गोष्ट झाली आहे.विमानतळावर जाताना रस्त्यात ट्रॆफ़िक ज्याम असते आणि विमान तळावर ही ट्रॆफ़िक ज्याम असते.
हा अनुभव आम्ही मागच्यावर्षी जूनमधे भारतात येताना अनुभवला. मुंबईला पाउस होता, भरपूर विमाने वरच फिरत होती. कारण जागाच नव्हती उतरायला म्हणून आमचे विमान अहमदाबादला नेले. तिथे ६ तास ठेवले नंतर मुंबईला आणले. त्यामुळे आमचे कनेक्टेड पुण्याचे फ्लाईट चुकले.:))

आपला स्वप्नप्रवास खूपच आवडला. मजा आली वाचून.....

अहो आम्ही स्वप्नात अजुन राग॑तच असतो, तुम्ही बरे आपले, विमानातुन, पाणबुड्यातुन जाता.
लै भारी विजुभाऊ, आप फिर से छा गये .
पण सदाशिव पेठेत कोठे हो गाल दाबुन मिळतात, आता त्याची आम्हाला खर॑च गरज आहे.

छोटा डॉन's picture

8 May 2008 - 7:46 pm | छोटा डॉन

च्यायला पहिल्या स्वप्न प्रवासाला अजून प्रतिसाद द्यायचा तेवढ्यात दुसरा लेख हजर ...
आमचं प्रतिसाद द्यायला डोकं काम करत नाही पण तुम्हाला लिहायला एवढं डोकं कसं चालतं म्हणतो मी ?
लिहायला वेळ कधी भेटतो ???

>>त्यामुळे निदान थोडावेळ का होइना हा खवीस प्रोजेक्ट मॅनेजर सारखा छळणार नाही.
अच्छा तर तुम्ही "प्रोजेक्ट मॅनेजर" आहात तर, हाताखालच्या पोरांना असे लेख लिहण्यासाठी ठेवलं आहे काय ?
का एखादी फटाकडी "पी ए" ठेवली आहे यासाठी ?

>>मागे एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती.
ही गोष्ट खरी आहे. मी पण जाणार होतो त्या मिटींगला पण आमच्या इमानाच्या टायरची हवा कुणी तरी सोडली आणि ते उडू शकले नाही. ह्या गोष्तीबद्दल चौकशीसाठी १० सदस्यीय समिती नेमली होती. अहवाल अजून आला नाही, आला की मिपा वर सादर करीन ....

>>भारतातेली बहुराष्त्ट्रिय कंपनी टाटा बेन्झ् च्या सहकार्याने अतीमहत्वाच्या अधिकार्‍यांसाठी एक पंखाची जोडी आणि हवाई छत्री विकसीत करण्यच्या विचारात आहे असेही ऐकावात आहे
घ्या आता, अहो आम्ही डिजाईन केली ...
सध्या परिक्षण चालू आहे टांझानियाच्या जंगलात !!!
लवकरच ग्लोबल लाँच करू .....

>>आमच्यात आय सर्जन , हार्ट सर्जन , ओरॆकल सर्टीफ़ाईड प्रोफ़ेशनल , एस् ए पी सर्टीफ़ाईड, जावा प्रोफ़ेशनल्स्, नेटवर्क ऎडमिनिस्टर असे बरेच सगळे होते पण कोणीही साधा मेकॆनीक नव्हता
आरारा ... आरारा , ही गोष्ट लै वंगाळ झाली.
मला एक पत्र तरी टाकायचं, लगेच पोहचलो असतो लागोलाग ....
मी काय मेकॅनीक नाही पण "इंजिने डिजाईन" करण्याचे काम करतो त्यामुळे जमले असते ...
पुढच्यावेळी असे झाले तर चिठ्ठी पाठवायचे विसरू नका ...

>>पुढच्या वेळेस् तुझ्या स्वप्नात येण्यासाठी मला आता काहीतरी वेगळाच मार्ग वापरायला हवा
मी सांगू का एक मार्ग , मस्तपैकी भुयार खांदा जमिनीखाली , मग काय नो ट्रॅफिकजाम आणि नथिंग !!!
बाकी त्याच्या "धन्यवाद यादीत" आमचे नाव टाकायला विसरू नका ....

लिहा अजून तद् माताय. आम्ही वाचतो आहोत ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा's picture

8 May 2008 - 8:37 pm | वरदा

भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले.

:))
ते गाल दाबून मिळतील तर एकदम दणादण...
मस्तच आहेत तुमची स्वप्न
अवांतरः मला का नाही अशी स्वप्न दिसत्...सारखं एकच स्वप्न दिसतं मी परीक्शा संपल्यावर परीक्षा हॉल मधे पोचले..असं कधीही झालं नाही खरं तर पण तेच दिसतं खरं.... :S

छोटा डॉन's picture

8 May 2008 - 9:16 pm | छोटा डॉन

>> सारखं एकच स्वप्न दिसतं मी परीक्शा संपल्यावर परीक्षा हॉल मधे पोचले..
>> असं कधीही झालं नाही खरं तर पण तेच दिसतं खरं....
असे असेल तर कदाचित ....
ते स्वप्न नसून तुम्हाला कदाचित तुमच्या "मागच्या जन्मातल्या घटना" आठवत असाव्यात !!! .... ह.घ्या.
होतं असं कधीकधी .... फिकर नॉट

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पिवळा डांबिस's picture

8 May 2008 - 9:45 pm | पिवळा डांबिस

प्रिय विजुभाऊ,
हा लेख काल सकाळी प्रथम वाचला. डोकं सुन्न झालं! तशा अवस्थेत प्रतिक्रिया लिहिणं शक्यच नव्हतं!!
म्हणून परत संध्याकाळी सावकाश वाचला. तर तिच्यायला, परत डोकं सुन्न!!
स्कॉच घेऊनही सुन्नपणा जाईना, तेंव्हा तसाच झोपलो. झोपेत काय-काय तर्‍हेतर्‍हेची स्वप्नं पडली ते विचारू नका!!:)
आता दुसर्‍या दिवशी फ्रेश होऊन लेख पुन्हा वाचला. सवय झाल्यामुळे असेल पण सुन्नपणा जरा कमी जाणवला. (ऍडिक्शन, ऍडिक्शन म्हणतात ते हेच का हो?:))

अहो विजुभाऊ, हे काय स्वप्न आहे की चेष्टा!!
आकाशात विमानांचे पंखाला पंख लावून त्यावरून माणसं काय चालवताय, बॅगांवर बसून तरंगत माणसं पाणबुडीपर्यंत काय पाठवताय!!

पत्येक जण उपाय सांगत होता. ऒइल पहा , \टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. कोणीतरी खाली उतरुन पाणबूडीला धक्का मारुया आणि पायलट त्या धक्क्यावर पाणबूडी स्टार्ट् करेल अशीही सूचना केली.
हे मात्र पटलं. चार पुस्तकी गाढव एकत्र आले की अशाच वांझोट्या सूचना मिळणार!!:)
थियरी परफेक्ट! प्रॅक्टिकल बोंब!!

बबलगमचे फुगे फुगवून पाणबुडी हलकी करायची आयडिया मात्र झकास! गाल खरंच दुखले असतील तुमचे!
येता काय इथे आमच्याकडे? अगदी अमेरिकन चियरलीडरकडून तुमचे दुखरे गाल दाबून द्यायची व्यवस्था करतो...:))

मित्राच्या दुखर्‍या गालांची काळजी असलेला,
पिवळा डांबिस

छोटा डॉन's picture

8 May 2008 - 9:53 pm | छोटा डॉन

गेल्या २ दिवसांपासून जरा "गाल" अंमळ दुखतायत्.
डांबिसकाका , बघा काही उपचाराची व्यवस्था होत असेल तर ...

देशी उपचारांनी काही साधत नाही, आता जरा तुमच्या विदेशी उपचाराने काय फरक पडतो ते बघुयात !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पिवळा डांबिस's picture

8 May 2008 - 9:57 pm | पिवळा डांबिस

तुझे गाल दाबून देण्यासाठी एखादा तगडा, राकट पहिलवानच शोधूया!!
छोटा असलास तरी काय झालं, डॉन ना तू!!!:)

छोटा डॉन's picture

8 May 2008 - 10:02 pm | छोटा डॉन

काय हा अन्याय ?
काय हा दुजभाव ?
काय हा भेदाभेद ?
काय हे पॉलीटीक्स ?

विजूभाउंचे गाल दुखताय म्हटले तर "अमेरिकन रेडस्कीन चिअरलीडर्स "
आणि आम्ही म्हणालो तर "तगडा, राकट पहिलवान" ....

घोर कलियुग,

तात्पर्य : वैद्यकीय पेशा आजकाल पहिल्या एवढा पारदर्शक राहिला नाही .... ह. घ्या.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग's picture

8 May 2008 - 9:59 pm | चतुरंग

नक्की गालंच दुखतायंत ना?:>
नाही "गाल" असं लिहिलं आहेस म्हणून जरा शंका आली. :W

चतुरंग

छोटा डॉन's picture

8 May 2008 - 10:05 pm | छोटा डॉन

मराठीत गाल चे एकवचन "गाल" आणि अनेकवचन सुध्धा "गाल" च ...
हे "गालं " नविन काय काढलतं ?
[ मला खरच माहित नाही याबद्दल तेव्हा कॄपया ह.घ्या आणि असल्यास चूक सुधारायला मदत करा ]

बाकी दुखण्याच्या निदानाबद्दल शंका नसावी ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

8 May 2008 - 10:23 pm | इनोबा म्हणे

लेका तूझे गाल कशानी दूखायला लागले रे? जरा जस्तीच *** घेतल्या का रे? ऐश आहे भौ तुझी.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विजुभाऊ's picture

9 May 2008 - 7:17 pm | विजुभाऊ

क्रमशः

सुधीर कांदळकर's picture

10 May 2008 - 5:28 am | सुधीर कांदळकर

फार मजा आली.
एक अत्यंत कठीण असा फँटसीचा फॉर्म. पण सुरेख जमलाय. लगे रहो.

सुधीर कांदळकर.

विजुभाऊ's picture

10 May 2008 - 6:24 pm | विजुभाऊ

.