एक स्वप्न प्रवास.(७)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
4 Jun 2008 - 9:59 am

या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859
एक स्वप्न प्रवास.(६) http://misalpav.com/node/1894

मला त्याढगात पीठ दळणा-या म्हातारीला बघायची म्हातारी नसेल तर निदान तिचे एवढ्या जोरात आवाज करणारे जाते तरी कसेअसेल ते बघायची अनिवार इच्छा झाली.
(क्रमश:)
मी सरळ चालत गेलो. चालत पेक्षा तरंगत गेलो. कशावर चालत होतो तेच् कळत नव्हते. पायाला गार मऊसुत स्पर्ष लागत होता. कापसाच्या ढिगा-यातुन चालत होतो म्हणाना.
दालन नक्की किती मोठे होते तेच् समजत नव्हते. आजुबाजुला भिंती / खिडक्य असे काहीच नव्हते. जवळ् जवळ १०० /१५० पाऊले गेलो असेन. कसलासा आवाज आल म्हणुन मी मागे वळुन पाहीले.पहातो तर काय मी जेथुन आलो होतो त्या सम्पूर्ण दालनाने आता एक वेगळाच आकार घेतला होता.हे भलतेच अवघड होते. म्हणजे समजा मी एका षट्कोनी दालनातुन बाहेर पडलो तर परतताना ते दालन चौकोनी / अष्टकोनी / गोल घुमटासारखे दिसणार होते. शेजारुन जाणा-या एका यक्षणीला मी विचारले सुद्धा की मी आता माझी सीट परत शोधु कशी म्हणुन?
ती तिचे ते सुवर्णवर्खी दात दाखवुन हसली. ( या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे. सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.)मग माझ्या ध्याना ती पिवळ्या गॊगलची करामत आली.या पिवळ्या गॊगलमधुन् आमच्या ऒफ़ीस मधली ती यम्म् यस्स कडकलक्ष्मी कशी दिसेल याचाच मी विचार करु लागलो.माझा धवल नावाचा या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता . या असल्या लोकांची एक गम्मत असते. चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात.
हा तर काय म्हणत होतो मी....मी असा सरळ चालत गेलो दालन संपायचे नाव घेत नव्हते.बाहेर चे काही दिसत नव्हते.मी कोणत्या दिशेला जात होतो ते कळत नव्हते.एका बाजुने कसलासा घर्र आवाज येत होता. मी त्या दिशेने गेलो. हळु हळु आवाज मोठामोठा होत गेला. मी बहुतेक इन्जीनच्या दिशेने चाललो होतो.एका खोलीतुन आवाज येत होता. त्या खोली बाहेर एक म्हातारी खुर्चीत बसली होती. तिच्या हातात एक मोठा कागद होता. त्या म्हातारीने मला पाहिले आणि ती हसली. "ये तुला मला भेटायचे होते ना? मीच ती ढगातली म्हातारी."
"त्या दळणा-या जातेवाल्या आजी तुम्ही?"
हो मीच.
मग तुमचे जाते कुठाय ?
ते होय? ते अरे हल्ली मी वापरत नाही. चायनीज जाते आल्यापासुन हे जुने जाते आता तसे पडुनच असते.
पण आजी तुम्ही जात्यावर काय दळत असता?
मी होय? अरे केंव्हा केंव्हा ढगात गारेचे मोठे खडे असतात. ते जर डायरेक्ट खाली सोडले तर लोकंच्या डोक्यात पडतील. म्हणुन मी ते दळुन बारीक करेते.
हल्ली तर आम्ही चायनीज मिक्सरघेतलाय त्यामुळे जाते नुसते शो ला पडुन आहे. त्याचे काय करायचे हा प्रश्नच आहे.
शिवाय त्या मिक्सरमुळे गारा एका साईझ मधे बारीक होतात.शिवाय आवाजही कमी होतो.
केंव्हा केंव्हा तर लोकाना ढगाचा आवाज नाही आला तर पाऊस पडला असे वातत नाही म्हणुन आम्ही ढगाच्या गडगडण्याचा साऊंड ट्रॆक लावतो. जाते फ़िरवताना ठिणग्या उडायच्या लोक त्याला वीज समजायचे. त्यासाठी आता आम्ही चायनीज लाईटच्या माळा लावतो.पूर्वी धनभारीत ढग आणि ऋण भारीत ढग समोरसमोर आले तर त्यातल्या वीजेमुळे कडाडकन आवाज व्हायचा आता तसे दोन् ढग शेजारी शेजारी जोडुन् त्यातुन मिळणार्‍या वीजेवर हे ढगाचे इन्जीन चालवतो.
तू बाकी बघ तोवर मी या एवढ्या गारा दळुन संपवते.हल्ली लोकाना मोठ्या गारा चालत नाहीत रे....वयामुळे आताशा एवढे बारीक दळण होत नाही.
मी म्हातारीचे वय काय असेल याचा अंदाज लावत बसलो.
ढगाच्या जाण्याचा आणि येण्याचा मार्ग या वेळी बदलला होता.
एरव्ही ढग मुंबई , हैदराबाद , भुवनेश्वर , जगन्नाथ पूरी , निकोबार , मिनिकॊय , मार्गे समुद्रावरुन म्यानमार ला वळसा घालुन सरळ क्वालालंपुर ला जायचा पण पावसाळी मान्सून वा-यामुळे तो समुद्रावरुन न जाता तो मुम्बई हैदराबाद , जगन्नाथ पूरी , कोणार्क , कलकत्ता, शिलोंग , यांगुन , मंडाले , मार्गे होत निखॊन सावान जाकार्ता वरुन तरंगत क्राबुरी..रानॊन्ग फ़ट्टलुंग.. असे करत मन्जुंग पेट्लॊन्ग् जाया, क्वाला मुडा मार्गे क्वालालंपुर ला जाणार होता. ब्रम्हदेश, थायलंड , मलेशिया या तिन्ही देशाना जोडणारा मार्ग होता हा.वेळ ही बराच लागणार होता. नेहमी पेक्षा दुप्पट पण मार्ग मस्त होता. रस्त्यात बरेच् थांबे होते म्हणुन कंटाळा येणार नव्हता. विशेष म्हणजे मला देशोदेशीचे स्थानिक पदार्थ खाता येणार होते.
आमचा ढग आता बहुतेक जगन्नाथ पूरी वरुन जात होता.खाली काही दिसते का ते पहायचा प्रयत्न केला पण धुक्यामुळे जिथे आमचे पाय अम्हाला दिसत नव्हते तिथे इतर दिसणे शक्यच नव्हते.पण् अचानाक वा-याचा एक जोरदार प्रवाह आला आणि आमचा ढग हवेत हेलकावे खाऊ लागला.
"कृपया यात्री गण हिकडे लक्ष द्या. काय म्हन्तुया म्या हिकडे लक्ष द्या." ढिलायन्स ची ही ढग सेवा भारतातल्या सर्व भाषांमध्ये त्यांची सेवा पूरवत होती. मी कोल्हापुरी मराठी हा ऒप्शन् घेतल्यामुळे मला प्रत्येक अनाउन्समेंट अस्सल कोल्हापुरी म-हाटीत ऐकु येत होती. " ए ए म्हादबा आरं मर्दा ऐक की काय् म्हंतु म्या त्ये....का रं ए सुक्कळीच्या कान म्हानायचं का निस्ती भोस्कं आरं म्या इत्के वरडुन सांगात्तुया तरीबी तुझं त्ये मोबाइल काय सुटंना गड्या. ए मर्दा ए अरं येक येळ बाइल परवडली पर त्यो मोबाईल .....आरं बंद कर की त्ये......तर यात्रीगण हिकडे लक्ष द्या. सम्द्यानी लक्ष्य द्या. आपला ढग हा एअर टर्ब्युलन्स् मधुन जातोय तरी पर्त्येकानं जागेवर जाउन बसा आन पोटाला पट्टा बांधा. हालचालीनं कुनाचं टकुरं फ़ुटलं तर आमी जिम्मेवार न्हाय. पयलच सांगुन ठिवतो.जागेवर जाउन बसा आन पोटाला पट्टा बांधा."
मी माझ्या जागेवर परत आलो आणि पट्टा बांधला.. ढग आता नुसता हलत नव्हता तर चक्क हेंदाकळत होता.बाहेर वारे जोरदार होते.काहीकाही वेळा तर आपन जहाजात बसलोय आणि जहाज पाण्यावर जोरात वरखाली होते आहे असे वाटत होते.आमच्या बॆगा रॆक वर बांधलेल्या होत्या म्हणुन बरे नाहीतर त्यां रॅक वरुन आमच्या डोक्यात पडल्या असत्या. एकदा नीट लावलेली, झाकण त्यावर बसुन दाबुन लावली बॆग पुन्हा नीट लावणे हे किती अवघड असते ते सर्वानाच माहीत आहे.एकवेळ बाहेरे आलेली पेष्ट पुन्हा टूथ्पेष्टच्या ट्युब मधे पुन्हा आत ढकलणे सोपे पण कव्हर वर बसून कव्हर दाबुन बसवलेली बॆग............ शिवाय अफ़झुल खानाची आतडी पोटाबाहेर लोंबावीत तसे ब्यागेतले सामान बाहेर आले असते ते वेगळेच.
आमच्यातल्या काही जणाना बस लागते तसा ढग लागत होता. बरेच जणाना हा त्रास चालु झाला ढग स्थर स्थावर होइतोवर हे चालुच रहाणार होते.
बाहेरुन वारा जसा जोरात वहात होता तसेतसे ढगातल्या हवेत फ़रक पडत होता. ढगातली हवा थोडी जड थोडी उत्साही झाली होती. बाहेरुन ताज्या पाण्याचे ढग आमच्या मधे मिसळले.
हे पाणी आम्हाला मेघालय डेपो मधे टाकुन द्यायचे होते.शिवाय शिलॊंग मेघालय हा ढगांचा हक्काचा प्रदेश. कालीदासाच्या यक्षाने सुद्धा ढगाला रामटेक हून मेघालय मधेच् जा म्हणुन सांगितले होते.. मोसमी हवामानाचे वारे आम्हाला प्रवासात मदत करणारहोते. नैऋत्य मौसमी वारे आम्हाला आम्हाला तिकडे ढकलणार होते.हवेत जसजसे वरवर जावे तसे तसे वारे आपली दिशा बदलत असतात.लहानपणी भुगोलात शिकलेले वारे इथे उपयोगी पडतात.पण् काहीवेळा वारे उलट सुलट दिशेत वहात असतात. बलून मधुन जाणारे लोक याचा खास उपयोग करुन घेतात.
आमचा ढ्ग पायलटच्या भुगोलच्या द्न्यानावर विसंबून पुढे किंवा मागे जात होता. मला उगाचच शंका आली या पायलटला भुगोलाच्या पेपरात प्रत्येकवेळा चांगले मार्कच असतील ना?
माझे पाय उगाचच लटलत कापायला लागले.
पृथ्वी गोल आहे किंवा नाही या वरुन एकदा आमच्या ग्यान्ग मधे जोरदार वाद झाला होता जर ती गोल असेल तर त्या गोला वरची माणसे खाली का पडत नाहीत अशी कोणीतरी प्रश्न विचारला. त्यावर एकाने उत्तर दिले की प्रुथ्वी खूप गच्च भरलेली आहे. त्यावर खूप माणसे रहातात. प्राणी रहातात त्यांच्या श्वासोच्छवासाने पृथ्वी फ़ुगते कलीयुगाच्या अंताच्या वेळी ही प्रुथ्वी त्यावरील माणसांच्या वजनाने आणि त्यानी केलेल्या श्वासोच्छवासाने फ़ुगुन फ़ुटणार आहे...... पृथ्वीच्या गोलावरच्या वरच्या अर्ध गोलावर रहाणारी माणसे त्यांच्या वजनामुळे खाली पडत नाहीत आणि खालच्या अर्ध गोलावरची माणसे ही वरच्या अर्धगोलातल्या माणसांची वजने पेलुन धरत असतात म्हणुन ती पडत नाहीत...... हे मी सगळे एकदा भुगोलाच्या पेपरात लिहिले होते. माझे आणि भूगोलांच्या मास्तरांचे दुमत झाले असावे पण म्हणुन काय त्यासाठी झोडपुन काढायचे ?.आपले कोणाशी दुमत असले की त्याला झोडपुन काढायचे हे मला भूगोलाच्या मास्तरानी शिकवले. शाळेत शिकलेला हा माझा पहीला जीवनोपयोगी पाठ असावा. ....पण त्या प्रसंगामुळे माझे भूगोलाशी जे काय फ़ाटले ते कायमचे. बरे झाले न्यूटनने तो गुरुत्वाकर्षणाचा शोध शाळेत सांगितला नाही. त्याने तो तसा सांगितला असता तर त्याला गणीताच्या मास्तरानी झाडावरुन एक सफ़रचंद खाली पडले तर किती झाडावर एकुण किती सफ़रचंदे होती.असा प्रश्न विचारला असता. पीटीच्या मास्तरानी तु ग्राउंड वर झोपा काढायला जातोस का म्हणुन धोपटला असता आणि मराठीच्या बाइने " सफ़रचंद खाली पडले " कर्ता कर्म क्रियापद ओळखा. किंवा त्याचा अकर्मक कर्तरी प्रयोगात रुपांतर करा म्हणुन सांगितले असते. शिवाय त्याला मिळालेले सफ़रचंद जप्त केले असते ते वेगळेच.
मला शंका आली की पायलट चा भूगोल माझ्या भूगोलासारखा असेल तर ? मी हे सोबतच्या पेस्तनकाकाला बोललो असतो पण तो घोरत झोपला होता.
का कोणजाणे पण बाहेरचे वारे जरा कमी झाले होते. ढग आता हलत नव्हता.बाहेरची काही गम्मत कुठुन बघायला मिळते का हे मी पहात होतो.
तेवढ्यात ........
(क्रमश:)

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

4 Jun 2008 - 10:34 am | मनस्वी

अरे केंव्हा केंव्हा ढगात गारेचे मोठे खडे असतात. ते जर डायरेक्ट खाली सोडले तर लोकंच्या डोक्यात पडतील. म्हणुन मी ते दळुन बारीक करेते.

अस्स होय! काय अचाट कल्पनाय!

पूर्वी धनभारीत ढग आणि ऋण भारीत ढग समोरसमोर आले तर त्यातल्या वीजेमुळे कडाडकन आवाज व्हायचा आता तसे दोन् ढग शेजारी शेजारी जोडुन् त्यातुन मिळणार्‍या वीजेवर हे ढगाचे इन्जीन चालवतो.

अरे बापरे!

प्रत्येक अनाउन्समेंट अस्सल कोल्हापुरी म-हाटीत ऐकु येत होती.

:)

खाली काही दिसते का ते पहायचा प्रयत्न केला पण धुक्यामुळे जिथे आमचे पाय अम्हाला दिसत नव्हते तिथे इतर दिसणे शक्यच नव्हते.

मेघालय शिआँगवरून जाताना खालचा निसर्ग दिसला अस्ता तर अजून मज्जा आली असती ना विजुभाऊ!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

राजे's picture

4 Jun 2008 - 12:17 pm | राजे (not verified)

हेच म्हणतो आहे ;)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदयात्री's picture

4 Jun 2008 - 10:43 am | आनंदयात्री

>>चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात.
>>ए मर्दा ए अरं येक येळ बाइल परवडली पर त्यो मोबाईल .....आरं बंद कर की त्ये

=))

>>शिवाय अफ़झुल खानाची आतडी पोटाबाहेर लोंबावीत तसे ब्यागेतले सामान बाहेर आले असते ते वेगळेच.

तुमच्या लेखनावर जीएंचा प्रभाव जाणवतो =))

(गोरादाणा)
-आंद्या

इनोबा म्हणे's picture

4 Jun 2008 - 12:13 pm | इनोबा म्हणे

( या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे. सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.)
8}

तुमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायलाच हवी.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन's picture

4 Jun 2008 - 1:10 pm | मन

पुढील भाग वाचायचेत.
येउ द्या ना पटापट....
बाकी मान्सूनचा प्रवास,ढिलायन्स ची कोल्हापुरी भाषा मस्तच!

आपलाच,
मनोबा

प्रभाकर पेठकर's picture

4 Jun 2008 - 1:12 pm | प्रभाकर पेठकर

या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता
हे बाकी खास.

लेख इतर स्वप्नप्रवासी लेखांप्रमाणेच 'कल्पनातीत' आहे. अभिनंदन.

अन्जलि's picture

4 Jun 2008 - 1:28 pm | अन्जलि

काय सुन्दर उपमा दिलित हो मोथ्या गारा पडल्या तर लोकाना लागतिल म्हनुन मि दलुन देते. एकदम खास. अगदि लहानपण आथवले. तुमचा प्रवास मस्त चालला आहे.

स्वाती राजेश's picture

4 Jun 2008 - 1:55 pm | स्वाती राजेश

या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे.
नशीब एकेकाचे....:)
कोल्हापूरी भाषा एकदम सही वापरली आहे इथे....:)
एकदा नीट लावलेली, झाकण त्यावर बसुन दाबुन लावली बॆग पुन्हा नीट लावणे हे किती अवघड असते ते....खरे आहे..
पृथ्वीवरची माणसे खाली का पडत नाहीत याचे उत्तर आता मला सापडले....:)
बाकी लेखन मस्तच आहे...आवडले...:)

विसोबा खेचर's picture

4 Jun 2008 - 5:03 pm | विसोबा खेचर

मालिका छानच सुरू आहे...

का कोणजाणे पण बाहेरचे वारे जरा कमी झाले होते. ढग आता हलत नव्हता.बाहेरची काही गम्मत कुठुन बघायला मिळते का हे मी पहात होतो.
तेवढ्यात ........
(क्रमश:)

वाचतो आहे!

तात्या.

वरदा's picture

4 Jun 2008 - 5:51 pm | वरदा

"त्या दळणा-या जातेवाल्या आजी तुम्ही?"
हो मीच.
मग तुमचे जाते कुठाय ?
ते होय? ते अरे हल्ली मी वापरत नाही. चायनीज जाते आल्यापासुन हे जुने जाते आता तसे पडुनच असते.

काय भन्नार्ट कल्पना....माझ्या डोळ्यासमोर एक पांढर्‍या केसांची नऊवारी नेसलेली आजी आली आणि ती गिरणीचं बटण ऑन करतेय असं दिसलं....मानलं बॉ तुम्हाला.....
प्रुथ्वीवरची माणसं अशी बॅलंस होतात होय्...सा. ज्ञा. मधे सॉलीडच भर पडली...
लगे रहो...मस्तच लिहिताय....

शितल's picture

4 Jun 2008 - 5:53 pm | शितल

(सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.)

ही उपमा ही मजेशीर,
आणि कोल्हापुरी भाषा ही मस्त पेरली आहे.
छान कल्पना, चीनी वस्तुचा वापर किती वाढला आहे हे जीवनाश्यक झाला आहे हे दाखवुन दिलेत.
यु.एस.मध्ये तर मेड इन चायना वस्तुच जास्त पहायला मिळतात.

बकुळफुले's picture

7 Jun 2008 - 8:37 am | बकुळफुले

माझे आणि भूगोलांच्या मास्तरांचे दुमत झाले असावे पण म्हणुन काय त्यासाठी झोडपुन काढायचे ?.आपले कोणाशी दुमत असले की त्याला झोडपुन काढायचे हे मला भूगोलाच्या मास्तरानी शिकवले. शाळेत शिकलेला हा माझा पहीला जीवनोपयोगी पाठ असावा. .... =)) =)) =))

मदनबाण's picture

7 Jun 2008 - 9:48 am | मदनबाण

माझा धवल नावाचा या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता . या असल्या लोकांची एक गम्मत असते. चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात.
हे लय भारी !!!!!

मदनबाण.....