एक स्वप्न प्रवास.
प्रिय ऍन
आज सन्ध्याकाळी आपण च्याट वर् बोललो त्याप्रमाणे मला सुद्धा तुला भेटायची उत्सुकता होतीच
स्वप्नात का होईना आपण् दोघे भेटणार हीच एक भन्नाट कल्पना. त्यासाठी मी रात्रीचे जेवण् अंमळ लवकरच् केले.उत्तम शान्त् ज़ोप लागावी यासाठे अंथरुण वगैरे तयारी करुन ठेवली. माझ्या रूम च्या दारावर् " डू नॊट डिस्टर्ब" अशी कागदावर लिहुन पाटीही लावुन ठेवली.तुला भेटायचे म्हणुन एक छान सा टी शर्ट् चढवला आणि तडक बेडवर अंथरुणात गेलो.
डोळे घट्ट मिटुन घेतले. तरी पण् मनात विचारांचे काहुर माजले होते.एकामागोमाग गोळीसारख्या वेगानी येणाया विचारांच्या वाहतुकीने मन खरोखर गजबले होते. हा गजबजाट मी कसाबसा शान्त् केला.
झोप् अजुनही माझ्यापासुन बरीच लांब होती. मी झोपे ला "लौकर् ये आतुरतेने.वाट पहातोय" असा एस् एम् एस् केला. झोपे ने मला लगेच् रीप्लाय केलाकी ती नेहमीच्याच् वेळेत येईल. दाबा करुन तीला माझी विनन्ती मान्य करायला लावली. तीने मला ती येईपर्यन्त् टी व्ही वर सर्वात् रटाळ कार्यक्रम लावुन ठेव म्हणुन सांगितले.मी महागुरु ची मते ऐकत् बसलो.ती चांगली वाटु लागली म्हणुन अवन्तीका मालीका लावली.
झोप् जरा जवळ् आली होती.यावेळेस् तीनेच् मला फ़ोन केला आणि म्हणाली की एकाचा अर्जन्ट् कॊल आला म्हणुन तीला यायला जरा उशीर होईल. झोपेने मला सर्वात् कंटाळवाणे पुस्तक् वाचायला सांगितले.मी "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" ही कथा वाचायला घेतली. वाचता वाचता मी झोपी गेलो......
या इतके ताजेतवाने मला यापूर्वी कधीच वाटले नव्हते. तुझ्याकडे येण्यासाठी मी घरातुन बाहेर पडलो. समोरुन येणाया टॆक्सी ला हात केला. आणि विमान तळाकडे निघालो.एअरपोर्ट् कडे वळणार एवढ्यात मला माझा क्लायन्ट् दिसला.तो माझ्याकडेच् निघाला होता..प्रोजेक्ट् मधल्या फ़ायनन्स च्या कोन्फ़िगरेशन् संदर्भात त्याला काही शन्का होत्या.त्या त्वरीत सोडवल्या जाणे महत्वाचे होते .ग्राहक देवो भव असे म्हणत मी त्याचे म्हणणे ऐकुन घ्यायलाच हवे होते. खरे तर त्यासाठी आमचा फ़ायनन्स मोड्युल चा कन्सल्टन्ट् आवश्यक होता.. आम्ही दोघे ही फ़ायनन्स मोड्युल च्या कन्सल्टन्ट् कडे गेलो.त्याला यासाठी कम्पनी ऒडीटर शी बोलायचे होते. त्याने त्वरीत ऒडीटर ला बोलावले. ऒडीटर अगदी बटन दाबल्या प्रमाणे विचार करायाचा अवकाश; ;त्वरीत अवतीर्ण झाला. यावेळी तो नाईट गाउन मधे होता, मी त्याला ओळखलेच नाही. ऑडीटर ही व्यक्ती नाईटगाउन मधे असु शकते . ऑडेटरला हसता येते. हाच एक आश्चर्याचा धक्का होता.
नेहमी प्रमाणे जोरदार चर्चा झाली. प्रत्येकजण् तोच मुद्दा ठासुन वेगवेगळ्या शब्दात सांगत होता.
जेंव्हा प्रत्येकाचे मुद्दे लिहुन झाले तेंव्हा मी ब्यागेत लपवलेली जादुची छडी काढली आणि कागदावरुन फ़िरवली त्यामुळे प्रत्येकाचे मुद्दे आता एकसारखेच दिसु लागले. अशारितीने सर्वांचे एकमत झाले. आणि मीटींग खूपच यशस्वी झाली.
मी आसपास पाहीले. ज्या टेक्सीत मी बसलो होतो ती आता एअरपोर्ट् जवळच ट्रॆफ़िक जाम मधे अडकली होती. मागे पुढे आजुबाजुला कुठेच् हालायला जागा नव्हती.मी ड्रायव्हरला टॆक्सी थेट विमानतळावर घ्यायला सांगितली. टॆक्सी हवेत झेपावली आणि एकदम थेट् विमानतळावर धावपटीवर उतरली.यासाठी टॆक्सीवाल्याने एकही पैसा जास्त मागितला नाही. मी सुखावलो पण थोड्याच वेळात मला माझे क्रेडीट कार्ड् १० डॉलर ने हलके झाल्याचे जाणवले.
प्लॆटफ़ोर्मवर विमान सुटण्याच्या तयरीतच् होते. मी धावत जाउन विमान पकडले.आत जाउन पाहीले तर ते खचाखच भरले होते. उभे रहायला सुद्धा जागा नव्हती.काही जण तर विमानाच्या टपावर पण बसायला तयार होते.पायलट ने मला त्याची सीट देउ केली. मी नको म्हणालो पण आम्ही दोघे अर्धे अर्धे त्या सीट वर बसलो.
विमानाने टेक ऒफ़्फ़् केले. समोर चे दृष्य बदलले.छोटी छोटी घरे , डोंगर मागे पडु लागले. छान् निळे क्शितीज दिसु लागले . वर आकाश् खाली अथांग निळा समुद्र.विमान आता भू मध्य समुद्रावरुन उडत होते. अचानक विमानची गती थांबली कोनीतरी (रेल्वे ची ओढतात तशी) विमानची चेन ओढली होती. एका प्यासेन्जराचा लॆपटॊप् खीडकीतुन खाली समुद्रात पडला होता.
पायलट ने विमान समुद्रसपाटीजवळ खाली आणले.लॆपटॊप् लाटांवर तरंगत् होता. काही छोटे मासे त्यावर एक्सेल वापरुन ३७ चा पाढा पाठ करत बसले होते. लॆपटॊप् विमानात घेतला गेला.पायलट ने विमान पुन्हा उंचावर नेले. आता विमान सरळ पेनांग विमानतळावर उतरले.
मी विमानातुन बाहेर आलो. कस्टम अधिकर्याने मला पासपोर्ट मगितला. या सगळ्या गडबदीत मी पासपोर्ट् विसरलो होतो.
त्या अधिकार्याने मला एका बाजुला उभे राहण्यास सांगितले.माझ्या बरोबर् आणखी दोन जण होते. पण ते मलेशियन विमान प्राधिकरणाचे कर्माचारी होते. मी त्याना सांगुन पाहीले पण् काही उपयोग झाला नाही.उलट त्यानी मला परत जायला सांगितले.
मी माझे तुझ्या स्वप्नात आजच येणे किती गरजचे आहे हे त्याना पटवुन सांगितले.त्यातल्या एकाला माझी दया आली असावी. त्याने मला दहा उठाबशा काढायला सांगितले.आणि सोडुन दिले. बरे झाले त्याने ३९ चा पाढा विचारला नाही मी त्याला तसे विचारले सुद्धा त्यावर् अतो म्हणालाकी तो त्यालाच येत नव्हत.
एअरपोर्ट वर फ़ार न रेंगालता मी बाहेर येउन सरळ् टॆक्सी केली.
तुझ्या घराजवळ उतरलो. दारावर "वेलकम" ची सुन्दर पाटी लावली होती.मी दार ठोठावले .दार म्हणाले "बेल आहे ना? मग दार कशाला वाजवता. मी बेल चे बटण दाबले कर्रर्रर्रर्रर्र-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------कर्रर्रर्रर्रर्र घड्याळात गजर वाजत होता.
त्यानेच मला जाग आली. सकाळचे सहा वाजत होते.
बघु. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास आज कसा पूर्ण करता येतोय ते.
तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर......
(क्रमश:)
प्रतिक्रिया
6 May 2008 - 11:35 pm | वरदा
सही...एकदम हटके.....जरा वेळ लागला मला झेपायला :? :O ....पुढच्या भागाची वाट पहातेय...
अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" ही कथा वाचायला घेतली.
कुठं मिळतात हो ती असली भयंकर पुस्तकं?....
पायलट ने मला त्याची सीट देउ केली. मी नको म्हणालो पण आम्ही दोघे अर्धे अर्धे त्या सीट वर बसलो.
हे खरच कैच्याकैच........मध्य रेल्वे चा ड्रायव्हर देखील नाहि करायचा...
बरे झाले त्याने ३९ चा पाढा विचारला नाही मी त्याला तसे विचारले सुद्धा त्यावर् अतो म्हणालाकी तो त्यालाच येत नव्हत.
१९ च्या पाढ्यात सुद्धा वाट लागेल माझी ३९ चा पाढा? /:)
6 May 2008 - 11:42 pm | llपुण्याचे पेशवेll
माताय विजुभाऊ .... म्हागुरूची मते तुम्हाला पटायला लागली... ??? म्हणजे म्हागुरूचा दर्जा वाढला म्हनायचा.
बाकी आपल्या तर बुवा स्वप्नाना बोलवावे लागते.. झोप आपोआप येते... :) जशी आत्ता यायला लागली आहे.. :)
पुण्याचे पेशवे
7 May 2008 - 12:59 am | इनोबा म्हणे
स्वप्नांचा प्रवास फार मजेदार चाललाय बरं का!
आता मला रात्री कसली कसली स्वप्ने पडणार कोण जाणे?
अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम
कुठून आणली हो,ही पुस्तके?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
7 May 2008 - 1:21 am | ब्रिटिश टिंग्या
मालापण वाईच येळ लागला झेपायला.....एकदम जब्राट!
मी "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" ही कथा वाचायला घेतली.
ही असली पुस्तकं तुम्हाला कुठनं मिळतात हो? नमोगतावर तर नाही? :D
मी महागुरु ची मते ऐकत् बसलो.ती चांगली वाटु लागली म्हणुन अवन्तीका मालीका लावली.
ऑक? आवरा विजुभाऊ, तब्येत बरी आहे ना! :&
पायलट ने मला त्याची सीट देउ केली. मी नको म्हणालो पण आम्ही दोघे अर्धे अर्धे त्या सीट वर बसलो.
ही ही ही! हे एकदम विजुभाऊ एष्टाईल मध्ये......:)
कर्रर्रर्रर्रर्र घड्याळात गजर वाजत होता.
त्यानेच मला जाग आली. सकाळचे सहा वाजत होते.
???? फाटं फाटं सहा वाजता उठता तुम्ही?
असो, पु.ले.शु.आ.पु.भा.ल.ये.दे.
-टिंग्या :D
7 May 2008 - 1:42 am | मन
स्वप्नं असावीत तर अश्शी.
काय बी काट कसर नाय पायजे स्वप्नात ..काय?
नेहमी प्रमाणे जोरदार चर्चा झाली. प्रत्येकजण् तोच मुद्दा ठासुन वेगवेगळ्या शब्दात सांगत होता.
ह्ये तर लै भारि.अनुभवातुन उमटलेलं दिसतयं.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
7 May 2008 - 3:11 am | शितल
>>>विमान आता भू मध्य समुद्रावरुन उडत होते. अचानक विमानची गती थांबली कोनीतरी (रेल्वे ची ओढतात तशी) विमानची चेन ओढली होती. एका प्यासेन्जराचा लॆपटॊप् खीडकीतुन खाली समुद्रात पडला होता.
पायलट ने विमान समुद्रसपाटीजवळ खाली आणले.लॆपटॊप् लाटांवर तरंगत् होता. काही छोटे मासे त्यावर एक्सेल वापरुन ३७ चा पाढा पाठ करत बसले होते. लॆपटॊप् विमानात घेतला गेला.
मजेशीर स्वप्नातील प्रवास .
7 May 2008 - 6:27 am | पिवळा डांबिस
की मागला पुढला विचार न करता हातगाडीवरच्या पदार्थांचा फडशा पाडत जाऊ नका म्हणून!!
आता एका सॅप वाल्याला हातगाडीवरच्या शिळ्या चिकन शेजवानचे अपचन झाले की अशीच स्वप्ने पडणार, त्यात स्वप्नांचा तरी काय दोष आहे?:))
मी धावत जाउन विमान पकडले.आत जाउन पाहीले तर ते खचाखच भरले होते. उभे रहायला सुद्धा जागा नव्हती.काही जण तर विमानाच्या टपावर पण बसायला तयार होते.
हा, हा!! एकदम मजेशीर चित्र डोळ्यापुढे उभे राहिले!!:)
काही छोटे मासे त्यावर एक्सेल वापरुन ३७ चा पाढा पाठ करत बसले होते.
खी, खी, खी!!:))
हल्लीच्या माशांना पाढे नीट येतात का हो?
मस्त आहे, लिखते जाओ!!
-पिवळा डांबिस.
ता. क.: त्या "क्रमशः" बद्द्ल स्पेशल अभिनंदन!! ;)
7 May 2008 - 9:55 am | आनंदयात्री
>>काही छोटे मासे त्यावर एक्सेल वापरुन ३७ चा पाढा पाठ करत बसले होते
:)) .. लै भारी ...
7 May 2008 - 9:56 am | मनस्वी
>> मी महागुरु ची मते ऐकत् बसलो.ती चांगली वाटु लागली म्हणुन अवन्तीका मालीका लावली. <<
बांदेकर सुरु होईस्तोवर थोडे थांबायचे होते की! :D
>> अर्धविझल्या उदबत्त्या <<
हो.. हे पुस्तक खरच खूप छान आहे. :)
>> पायलट ने विमान समुद्रसपाटीजवळ खाली आणले.लॆपटॊप् लाटांवर तरंगत् होता. काही छोटे मासे त्यावर एक्सेल वापरुन ३७ चा पाढा पाठ करत बसले होते. लॆपटॊप् विमानात घेतला गेला. <<
हे हे :) सगळे दृष्य डोळ्यासमोर आले!
स्वप्नप्रवास छानच रंगला आहे.
7 May 2008 - 10:47 am | आंबोळी
आयला आता लोकाना स्वप्ने पण क्रमशः पडायला लागली..... मेलो....
7 May 2008 - 4:57 pm | आनंदयात्री
:))
7 May 2008 - 8:38 pm | विजुभाऊ
लोकाना स्वप्ने पण क्रमशः पडायला लागली..... मेलो....
खरे आहे हो. त्या डांबीस काकाने ही क्रमशः ची सवय लावली आहे इथल्या लोकाना .
हल्ली स्वप्ने संपताना सिनेमात जशी "दी एन्ड" पाटी येते तशी "क्रमशः " अशी पाटी समोर येते आणि जाग येते.
7 May 2008 - 11:47 am | स्वाती दिनेश
मजेशीर स्वप्नप्रवास! ३७,३९ चे पाढे बाकी उत्तमच,:)
फँटसी छान जमली आहे,
स्वाती
7 May 2008 - 11:55 am | धमाल मुलगा
विजुभाऊ.....................................................................................
तद् माताय! काय स्वप्न पडतात की चेष्टा?
महागुरुंची मतं काय पटतात, अवंतिका काय पाहता, धावत जाऊन विमान काय पकडता...
बाब्बोय....
पहिल्यांदा वाचलं तर काही टिपलंच नाही...म्हणलं नक्की काय...वाचतोय काय मी? का मीच स्वप्नात आहे :)
:)) कसं दिसतं हो त्याच्या म्होट्ट्या खिडकीतून? हलकट कुठचे...प्याशिंजरांना मात्र चिटूकल्या खिडक्या देतात..
आरारारा...म्हणजे आता मासे खाताना बघून खावे लागतील....पाढे पाठ केलेले मासे आम्हाला कसे पचावेत?
विजुभाऊ, हे बरं नव्हे हं !
खास तुम्ही आपले म्हणून प्रकाशनापुर्वी वाचायला दिलेल्या माझ्या हस्तलिखिताची अशी चारचौघांत खिल्ली उडवणं बरं आहे का?
(उडवा..उडवा...तेव्हढीच प्रकाशनपुर्व प्रशिध्दी !!!! एकदम 'श्री. धमाल मुलगा ह्यांच्या वादग्रस्त कादंबरीचे प्रकाशन समाजहिताकरिता सरकारी आदेशाने अनिर्णित कालावधीसाठी प्रलंबीत' वगैरे बातमी देऊन टाकू आपण )
अवांतरः हल्ली डोस जरा जास्तच वाढलेला दिसतोय ;)
7 May 2008 - 8:38 pm | चतुरंग
अहो तुम्ही धावत धावत पकडलेल्या विमानात पायलटच्या मागची सीट एका हवाईसुंदरीबरोबर शेअर करुन बसलेला मीच होतो! ;))
मस्त कल्पनाविलास! चालू दे.
चतुरंग
8 May 2008 - 9:40 am | प्रभाकर पेठकर
मागची सीट एका हवाईसुंदरीबरोबर शेअर करुन बसलेला मीच होतो!
हवाईसुंदरी बरोबर 'सीट' शेअर करुन्?...गोविंद्य...गोविंद्य... कॉय हें दिवस पाहावें लागताहेंत......!
7 May 2008 - 8:42 pm | अभिज्ञ
लै भारी लिवलय स्वप्न..
ह.ह.पो.दु.
=)) =)) =))
अवांतर- लोक झोपेत चालतात ,बोलतात वगैरे ऐकले होते.
च्यायला,झोपेत लेख लिहायचा म्हणजे कमाल आहे. :SS (ह.घ्या.)
(विजुभाउ, लेख आवडला हे वे.सां. न.ल.) =D>
(झोपेत लेख वाचणारा) अबब ;)
7 May 2008 - 11:37 pm | विजुभाऊ
या पुढचा स्वप्न प्रवास http://misalpav.com/node/1712
8 May 2008 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभौ,
लेखनाच्या बाबतीत आपला पींड गंभीर नाही हे लै भारी . लेखन आवडले.
!!! :)
झोप येण्यासाठीच्या उपायाबरोबर-
विचारांच्या वाहतुकीने मन खरोखर गजबले होते. हे वाक्य आवडलं !!!
विमान पकडले.आत जाउन पाहीले तर ते खचाखच भरले होते. उभे रहायला सुद्धा जागा नव्हती.काही जण तर विमानाच्या टपावर पण बसायला तयार होते.
महाराष्ट्रातली बस विमानासारखी दिसली बरं वाटलं :)
विमानची चेन ओढली होती.
व्हेरी गुड !!!
आपल्या स्वप्नाला आमच्या भरभरुन शुभेच्छा !!! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
8 May 2008 - 2:52 pm | मदनबाण
प्रिय ऍन
>> विजुभाऊ ही काय भानगड आहे ?..... :)
त्यासाठी मी रात्रीचे जेवण् अंमळ लवकरच् केले.उत्तम शान्त् ज़ोप लागावी यासाठे अंथरुण वगैरे तयारी करुन ठेवली.
>> म्हणजे सर्व तयारी झालीय तर !!!!!
झोपे ने मला लगेच् रीप्लाय केलाकी ती नेहमीच्याच् वेळेत येईल. दाबा करुन तीला माझी विनन्ती मान्य करायला लावली. तीने मला ती येईपर्यन्त् टी व्ही वर सर्वात् रटाळ कार्यक्रम लावुन ठेव म्हणुन सांगितले.मी महागुरु ची मते ऐकत् बसलो.ती चांगली वाटु लागली म्हणुन अवन्तीका मालीका लावली.
>> हा प्रयोग मी पण करुन पाहतो..... म्हणजे शांत झोप लागते का ते पाहु!!!!!
"अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" ही कथा वाचायला घेतली.
>>कुठल्या वाचनालयात अशी पुस्तके मिळतात ते आधी सांगा म्हणजे मी सुद्दा आजीवन सभास्त्व घेईन म्हणतो.....बर अशी पुस्तके वाचुन स्वप्न मात्र लय भारी पडतात असे आपल्या अनुभवातुन तरी दिसुन येते.....
काही छोटे मासे त्यावर एक्सेल वापरुन ३७ चा पाढा पाठ करत बसले होते.
>>छ्या..... मासे पण ३७ वर पोहचले अन आम्ही अजुन बे एक बे च करतोय......
मी ब्यागेत लपवलेली जादुची छडी काढली
>>काय खर दिसत नाही मिपा करांच.... आंबोळी कडे कॉट्राक्ट किलर कंदिल तर आपल्या कडे छडी.....
पायलट ने मला त्याची सीट देउ केली. मी नको म्हणालो पण आम्ही दोघे अर्धे अर्धे त्या सीट वर बसलो.
>>एक प्रश्न-- पायलटला नीट गिअर टाकता आला का रे ?????
(नको ती स्वप्ने पाहणारा) I)
मदनबाण.....
26 Mar 2015 - 1:28 pm | बॅटमॅन
रक्त गाभुळल्या वटवाघळांसाठी धागा पेश्शली वर आणलेला आहे.