या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859
एक स्वप्न प्रवास.(६) http://misalpav.com/node/1894
एक स्वप्न प्रवास.(७) http://misalpav.com/node/1966
एक स्वप्न प्रवास (८) http://www.misalpav.com/node/2085
प्रिय ऎन्.........तुझ्या स्वप्नात येण्याचे मी बरेच मार्ग विचारुन पाहिले. बस रेल्वे रीक्षा विमान पाणबुडी ढग हवा
बस ने यायचे शक्य होते. पण मधल्या म्यानमार मधुन रस्ता नीट नव्हता. रेल्वे ने यायचे ठरवले तर म्यानमार आणि कंबोडीया दरम्यानची दलदल अडचणीची ठरत होती रीक्षा वाला इतक्या दूरच्या अंतरासाठी दीडपत रीटर्न मागत होता. मी त्याला सांगुनही पाहिले की तुला रीटर्न वर्दी मिळवुन देतो म्हणुन पण तो ऐकायलाच तयार नव्हता.विमान पाणबूडी ढग हवा हे मार्ग अगोदरच चोखाळुन झाले होते. तुझ्या स्वप्नात चालत जावे असाही एक विचार मनात आला पण त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नव्हते.
मग म्हंटले की जाउ देत ना झोप लागल्यावर आपोआपच ठरेल मी कसा जाईन ते. पण एका माझ्यातला प्रोजेक्ट मॆनेजर मला स्वस्थ बसु देईना. काहीतरी प्लॆनिंग केल्याशिवाय प्रोजेक्ट सुरु करणे हा शिद्ध वेडेपणा ठरतो अर्थात प्रोजेक्ट मधे सुरुवात सोडल्यास इतर काहीही प्लॆनिंग प्रमाणे होत नाही. हा अनुभवही पाठीशी होता. पण नाउमेद होईल तो प्रोजेक्ट मॆनेजर कसला. मी ठरवले की आपण पुस्तके वाचु त्यातुन काहीतरी आयडीया येईल.नवीन प्रोजेक्ट्च्या सुरुवातीच्या प्रेझेंटेशनच्या फ़ाईल जुन्या प्रोजेक्ट्वरुनच तयार करायच्या असतात हा पहिला धडा घोकुन पाठ केला होता.
"अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक आता झोप येण्यासाठी आता फ़ारसा उपयुक्त नव्हते. घटत्या उपयुक्ततेच्या सिद्धान्तानुसार नेहमी वापर केला गेल्यामुळे रोगावरचे रामबाण औषध सुद्धा त्याची उपचारक्षमता घालवुन बसते. त्याप्रमाणे "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक वाचुन आताशा झोप पहिल्याप्रमाणे हमखास येत नव्हती. "अर्धविझल्या उदबत्त्या. रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" चा पुढचा भाग "पूर्ण विझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि रीकामी प्लेट" हे पुस्तक मी वाचायला घेतले. त्याच त्या उपमा ,तेच ते दाखले तीच ती "फ़िकट केशरी प्रकाश पाझरल्या सारखा झिरपत बाहेर येत होता" किंवा " त्याच्या म्लान मुखावर आता बर्फ़ीवर चंदेरी वर्ख पसरावा तसा मातकट शेवाळी फ़ेस पसरला होता " सारखी शब्दबंबाळ उदाहरणे यामुळे पुढच्या पानावर काय लिहिले असेल याचा अंदाज अगोदरच यायचा आणि ते बरोबर आहे का हे बघायला पुढचे पान उलगडावे लागायचे. असे करताकरता ते पुस्तक हातोहात वाचुन संपायचे.
मी थोडे वेगळे वाचायचे ठरवले आणि धारपांचे एक पुस्तक घेतले. हे पुस्तक वाचले की दुपारची सुद्धा झोप उडायची त्याल्या कथांनी
पण मग हातात घेउन पुस्तक पुन्हा ठेउन दिले.
"गांडुळे:: डामरट आणि चिल्लर" हे पुस्तक अचानक हाती लागले. प्रस्तावना वाचत असतानाच डोळे जडावले.कधी मिटुन बंद झाले ते त्यांचे त्यानाही कळाले नाही.
मी माझ्या खोलीतच पलंगावर बसलो होतो. काय करावे या विचारत असतानाच मला अचानक माझ्या आजोबांचे कपाट आठवले. मी दार उघडुन थेट गावातल्या जुन्या घरी गेलो आजोबांची खोली तशीच होती नीटनेटकी सगळ्या वस्तु जिथल्यातेथे होत्या. मला आठवले लहानपणी मी काही मागितले की आजोबा जपमाळेच्या पिशवीतुन किल्ली काढुन त्यांचे कपाट उघडत आणि त्यातुन चिक्की ,आलेपाक, श्रीखंडाच्या गोळ्या असला खजीना काढुन देत. त्यात एक जादुची पिशवी होती असे आजोबानीच सांगतले होते.
पिशवी बघायला मागितल्यावर ती दाखवायची नसते त्यात रहाणारे लोक नाराज होतात म्हणुन आजीने दरवेळेस मोडता घातला होता. एवढ्या छोट्या पिशवीत कोण रहात असावेत असा मी प्रश्न विचारला की आजी म्हणायची की बाटलीत राक्षस कसा रहातो तसे ते लोकपण पिशवीत रहातात.
पुढे कधीतरी त्या पिशवीतल्या लोकांची नावे नारायण धारपांची पुस्तके वाचताना कळाली. त्यातल्या बाईचे नाव कर्हाटट नीम्र असे होते आणि त्यात एक खारीसारखा प्राणी होता त्याचे नाव चंक्री होते एका गिधाडासारख्या दिसणाया पक्ष्याचे नाव गुर्डुघा होते.
मला तेंव्हा या नावांचीच गम्मत वाटायची.पण पिशवीला हात लावायची हिम्मत व्हायची नाही.
आता चांगला चान्स अला होता. आजोबांच्या कपाटाला कुलुप नव्हते. मी सरळ कपाट उघडले. समोरच ती छोटीशी पिशवी पडली होती. आजोबांचे सगळे जादुचे जग त्या छोट्या पिशवीत सामावले होते.थरथरत्या हाताने मी पिशवी उचलली. पिशवीचे बंद सोडवले. पिशवी उघडुन बघितली पण कपाटातल्या अंधारात काहीच दिसत नव्हते.पिशवी तर लहाखुरी वाटत होती. जास्तीत जास्त दहा पंधरा इंच लाम्बीची रुंदीलाही तेवढीच.स्पर्षावरुन तर कापड कसल्यातरी चिवट चामडी प्रकारचे वाटत होते.रंग सांगता येणार नाही इतका विटला होता. रस्त्यावर बेवारस पडली असती तर एखाद्या भिकायानेसुद्धा त्या पिशवीकडे ढुंकुन पाहिले नसते.
आजोबांनी ही पिशवी इतकी कडेकोट बंदोबस्तात जपून ठेवली या मागे काहितरी जबरदस्त कारण असले पाहिजे. शोधुनच काढायला हवे.
मग मला आठवले की मला तुझ्या स्वप्नात यायचे आहे प्रायोरीटी बदलली की प्रोजेक्ट चे काय होते हा अनुभव मला होताच. तसा तो प्रत्येक प्रोजेक्ट मॆनेजरला एकदातरी आलेला असतोच
निदान यावेळेस तरी मला तो अनुभव घ्यायचा नव्हता.
मी काहितरी आयडीया मिळते का म्हणुन पिशवीत हात घातला.मला पिशवीचा तळच लागेना. कोपरापर्यन्त हात आत जाउन सुद्धा पिशवीचा तळ मिळत नव्हता. मी सम्पूर्ण हात पिशवीत घातला. अगदी खांद्यापर्यन्त.एकदा माझे पाकीट मारले गेले होते तेंव्हा मला तळ न लागला जाण्याचा आरपार अनुभव आला होता.मी पिशवीचे दुसरी टोक पाहिले ते व्यवस्थीत बंद होते.
पिशवीत माझ्या हाताचा स्पर्षही होत नव्हता. एखाद्या अंधाया खोल विवरात प्रकाषाचा कवडसा विरत जाऊन नाहीसा व्हावा तसा माझा हात पिशवीत अदृष्य झाला होता.
ती पिशवी आतुन अनंत होती. पिशवीचा अंत लागणारच नव्हता.
मला एकदम एक कल्पना सुचली. आपण पिशवीत उतरलो तर? कदाचित दुसरीकडे कुठेतरी तुझ्या घराजवल निघु शकेल. मी सहज पिशवीत पाय घालुन बघितला. "कशात काय अन फ़ाटक्यात पाय" अशी एक म्हण आठवली.पायालाही पिशवीच्या खोलीचा अंदज येत नव्हता.
खरच आपण या पिशवीत उतरलो आणि असे वेगळे काहितरी अनुभवत कोठेतरी पोहोचलो तर "कशात काय अन पिशवीत पाय" अशी नवी म्हण मराठीला बहाल करु शकु.
पिशवीत मी दुसराही पाय टाकणार इतक्यात मला त्या पिशवीच्या शेजारी एक मनाच्या श्लोकाचे असते तेवढे छोटे पुस्तक दिसले. ते त्या पिशवीचे ऒपरेटिंग मॆन्युअल होते.
पिशवीचा वापर कसा करावा त्यातुन कोठेही कसे जावे याची क्रमवार माहिती त्यात होती. आजोबानी ती पिशवी एका चिनी भंगारवाल्याकडुन विकत घेतली होती.
त्यानेच आजोबाना हे मूळ चिनी भाषेतली मॆन्युअल पिशवीच्या मदतीने मराठीत करुन दिले होते.
त्यापिशवीच्या सहायाने मला कुठेही फ़िरता येणार होते किमान काही वेळपर्यन्ततरी.
मी मॆन्युअल वाचुन पिशवीचा एक बंद ओढला एक पाय पिशवीत टाकला होतच आता दुसरा पायही पिशवीत टाकला. भोवतालचे सगळे कसल्याशा तपकिरी उजेडात सगळे अंधारुन जात आहे असे काहिसे वाटु लागले. आणि
(क्रमश:)
प्रतिक्रिया
25 Aug 2008 - 2:52 pm | अमोल केळकर
अजोबांची पिशवी ही जबरदस्त कल्पना
मस्त कल्पना विस्तार. विषेशतः चिनी भंगारवाला, ऑप्रेटिंग मॅन्युअल इ तपशिल आवडला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
26 Aug 2008 - 10:30 am | II राजे II (not verified)
हेच म्हणतो !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
26 Aug 2008 - 10:27 am | आनंदयात्री
हा भाग पण मस्त जमलाय विजुभाउ !
28 Aug 2008 - 11:40 am | विजुभाऊ
? प्र का टा आ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत