हम्मम्म.......... का...य?,शीर्षकावरून अंदाज आला असेलच ना..??? काय म्हणताय??? गाणं........? ''छो हो...! ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो....'' मग आहे तरी काय???'' ---
हांsssssssss
अत्ता खर्री मज्जा येणार सांगायला....! अवो,आज संक्रांत आहे ना...!, मंग ह्यो गोड...काटा म्हणजे,आपला साखर/तीळ हलव्याचा काटा हो......! हां,अता संक्रांतीला तस बरेच काटे न वरा आणी काय को???,,,आपलं सॉरी...ते..हे.. बाय को...(तरी गॅप पडली...)तर..तसे बरेच काटे, नवरा आणी बायको ...यांच्यात यायचे.
पूर्वी काळ्या साड्या(अत्यंत उठावदार काळ्या शेड्स निवडून) आणल्या/घेतल्या जायच्या... हल्ली काय काय होत असावं बरं.......??? आंम्ही काय सांगणार.आमचं ते क्षेत्र (म्हणजे विवाहित असण्याचं ;-) ) निर्माणच नाही झालेलं अजून ;-) .तरी सामान्यतः काहि ना काहि खरेदीच्या निमित्तानी हे काटे उभयता येत असणारच.नवविवाहितां चे प्राचीन हळदी/कुंकू समारंभ आता इतर रुपानी साजरे होत असणार.काळ भराभर बदलला,तरी मूल्य माणसाबरोबरच बदलतात...असो.
मला ना ह्या काटेरी हलव्याबद्दल लहान पणा पासून कुतुहल होतं....एकतर खाण्याचीच गोष्ट करायची झाली तर,ह्या काटेरी हलव्यात खाण्यापेक्षा तो शक्यतो दुसर्यांना देऊन,त्याबदल्यात तिळगुळाचे लाडू/वड्या या मिळविण्याकडे कल असायचा. आणी आंम्ही अजुन येक बेरकीपणा करायचो.संक्रांतिच्या दिवशी संध्याकळी १/२ रुपायची ही हलव्याची पुडी,आमच्या ग्यांगमधे प्रत्येकी १ घेतली जायची.आणी २ रुपायचं साधारण किलोभर खडेमीठ सगळ्यांमधे वाटून दिलं जायचं...गल्लीत अंधार पडला की समोरच्याकडून तिळगुळ/हलवा असं जे काहि मिळेल ते उकळायचं आणी देणारा किंवा री मर्जीतली नसली की अंधारात परत हलव्याच्या जागी खडेमीठ टेकवायचं...आणी सटकायचं.त्यामुळे ते खडेमीठ खरोखर ''जिरवणे'' ह्या एकाच कामासाठी तेंव्हा वापरलं जायचं. त्यामुळे माझ्यातरी या हलव्याबद्दलच्या अठवणी अगदी मोहक वगैरे नसल्या,तरी अगदीच काटेरीपण नाहियेत. तरी वर मी म्हटलेलं काट्यांबद्दलच कुतुहल होतच.आणी या वर्षी ते कुतुहल सुटायचा योग आला.
पर्वा मंडई मधे विड्याच्या पानांचा गाळयातून पानं घेतली आणी मधल्या गोलाकडे जाणार्या पायर्यांजवळचा १ तास करंट देणारा आमचा ''कट्टर च्या...'' मारला आणी बाहेर पडलो..तर सहजच लक्ष एका जुन्या गुडदाणीच्या गाडिकडे गेलं.कच्च्या अखंड शेंगदाण्याची साखरेतली चिक्की इथे अनेकदा घेतलेली. आज तिच्याबरोबर कडेलाच हि हलव्याची पाकिटं रचलेली पाहिली.आणी पावलं तिकडे सरकली.आमची पेटंट पावशेर साखर/दाण्याची चिक्की घेतली आणी त्या वयस्कर गुडदाणीवाल्यांना (श्री.ढेंबे) विचारलच मी, ''काय हो ? हा काटेरी हलवा,साधा आणी रंगीत करताना...रंग नंतर मारतात की पाक करताना त्यात टाकतात?'' गुडदाणीवाल्या अजोबांनी माझ्याकडे पाहिलं,आणी,''चौकस गिर्हाइक आलं...'' अश्या नजेरेनी माझ्याकडे बघुन त्यांच्या कसबा पेठेतल्या गुडदाणी/काटेरी हलवा/राजगिरालाडू+वड्या इत्यादी प्रकार करण्याच्या कारखान्याचं व्हिजिटिंग कार्ड माझ्या हतात ठेवलं. मग काय इचारता...मी लगेच पुढच्या एका दिवशी न्यूज रिपोर्टरच्या वेशात नसलो,तरी त्या आवेशात तडक तिकडे निघालोच...मग तो कसब्यातला कारखाना,आणी त्या अजोबांचा व्यवसाय पुढे हिमतिनी चालवणारा त्यांचा मुलगा (श्री.महेश ढेंबे) यांना गाठलं,नमस्कार चमत्कार जाहले...आणी त्यांच्या कडून एकंदर या व्यवसायाची जमेल तितकी माहिती,या हलवा बनविण्याच्या पूर्वीच्या आणी चालू प्रोसेस सकट त्यांच्याकडून मिळवली.त्याही माणसानी मला अगत्यानी माहितिही दिली आणी आत कारखान्यातले फोटोही...! (रिपोर्टरचं बेअरिंगच आपण तसं पकडलवतं भें.....डी!!! ;-) )
चला तर अता आपण पाहू ह्या काटेरी हलव्याची छोट्टिशी प्रोसेस... पूर्वी हे काम कोळश्याची छोटि शेगडी घेऊन केलं जायचं...आधी लालबुंद कोळश्याच्या चुल/शेगडीवर एक पितळ्याची परात ठेवायची.नंतर ती चांगली तापली की त्यावर बिनसाली/पांढरे तीळ टाकायचे मग ते तडतडायला/उडायला लागले की नंतर त्यात साखरेचा हळूहळू दाट करत अणलेला पाक एका बाजूनी हळूहळू सोडायचा आणी त्याच वेळी पसरट हतानी वरच्यावर तो पाक तीळांभोवती लगडत असताना हलवायचा. हां...!!! फार पटकन होणारी गोष्ट वाटते की नै..? पण तसं नाय हां.यातलं तंत्र फार डेंजर हाय...
१)आधी त्या पाकात तयार होताना काटा चांगला पडावा आणी हलवा शुभ्ररंगाचा व्हावा म्हणून लिंबू सत्व आणी हायड्रो पावडर या २ गोष्टी मिसळणे हे पहिलं तंत्र.
२)आणी नंतर तीळ जळू न देता एका वेळी परातिभोवती चार/चार बायका हात भाजत भाजत आळीपाळीनी हा हलवा चांगला कडक काटेरी होई पर्यंत करत असत...हे दुसरं तंत्र....
ही दोन यातली महत्वाची तंत्र जमली तर तयार होतो तो हलवा,नायतर मात्र उरतो,तो काटाच....! अता ही जुनी पद्धत बाद झाली आहे.कारण तापत्या तांब्याच्या गोलाकार भट्टीत हा खेळ एकत्रच होतो... कसा ते बघू आपण. (ही भट्टी बनवण्याची कल्पना-महेश ढेंबे यांच्या वडलांचीच...)
सर्वात अधी मोठ्ठ्या गॅस चुल्हाण्यावर पाक करायला घेतात
साखर विरघळेपर्यंत पाक करण्याची क्रीया मात्र संथ असते,दमाचं काम हाय त्ये...!
मग पाक पहिली तार धरत आला की त्यात लिंबू सत्व आणी हायड्रोपावडर टाकतात...
मग बघा पाक कसा ट्रान्स्फरंट पा.........क होतो ते.
अता आपण त्या महाकाय काँक्रीट मिक्सर सारख्या-कढईचं दर्शन घेऊ...
केव्हढी आहे ना...!? मी पण बसेन आत ;-)
ह्या फिरत्या कढईच्या खाली मोठ्ठा गॅस बर्नर लागलेला आहे...
नंतर तापलेल्या कढईत तीळ टाकून हा असा पाक त्यात ''लावला'' जातो.
आणी मग जरा वेळानी तीळावर कोटींग होत होत तयार होतो. तो हा अस्सा पांढरा शुभ्र...काटेरी हलवा
अता या हलव्या पासून तयार होणारे हार/दागिने पहा....
शिवाय इथे होणारे तिळ गुळाचे लाडू
आणी हा..........रंगीत हलवा.
गोडाऊन मधे लागलाय ...मार्केटला जायला...
असा हा गोडवा वाढवणारा तिळगूळ आणी काटेरी हलवा. दिवसेंदिवस महागाईचा काटेरी मुकुट घालून आपल्याकडे येत असला,तरी तोंडात टाकल्यावर जो पर्यंत गोड लागतो आहे,तो पर्यंत त्या(महागाई)चा ''काटा'' सहन करायला हरकत नाही....नाही का??? :-)
=================================================================================
ही मी घेतलेली श्री. महेश ढेंबे यांची मुलाखत...
पार्ट-१
पार्ट-२
=================================================================================
प्रतिक्रिया
14 Jan 2013 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा, बुवा. काटेरी हलव्याची छायाचित्र चाळली मस्तच दिसताहेत. लेखन वाचून अजून मनमोकळी दाद देईनच.
बाकी, मुलाखत घेणे, छायाचित्र डकवणे, प्रासंगिक असलेलं लेखन काळजीपूर्वक करणे, याला हाडाची कारागिरी लागते, मेहनत घ्यावी लागते, ते दिसतेच आहे. धन्स.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला. :)
-दिलीप बिरुटे
14 Jan 2013 - 10:13 am | अमोल केळकर
क्या बात है ! सुरेख माहिती
अमोल केळकर
14 Jan 2013 - 10:15 am | मूकवाचक
+१
14 Jan 2013 - 10:18 am | पियुशा
आजोबा तिळगुळ घ्या गोड्गोड बोला :)
14 Jan 2013 - 10:35 am | अत्रुप्त आत्मा
@आजोबा>>> फा..रच, गोग्गोड बोल्ता बाबा आजकाल...! तुंम्ही आज्जीबाई ;-)
15 Jan 2013 - 8:44 pm | मृगनयनी
अ.आ.- थॅन्क्स फॉर गिविन्ग द होल प्रोसेस ऑफ "काटेरी हलवा"!!!... सुन्दर!!
तिळगुळ घ्या... गोड बोला!!! :)
14 Jan 2013 - 10:35 am | पिंगू
भटजीबुवा, तिळगुळ घ्या आणि गोग्गोड बोला..
काटेरी हलवा झकासच..
- पिंगू
14 Jan 2013 - 10:36 am | प्रचेतस
मस्त हो बुवा.
मुलाखत तर अगदी कसलेल्या मुलाखतकाराने घेतलीय तशी झालीय.
>>>ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो.
ते संमंध वैग्रे लिहून तुम्ही भूतप्रेतसमंधादी लोकांशी असलेला तुमचा संबंध मोठ्या खुबीने दाखवून दिलाय
14 Jan 2013 - 11:26 am | पैसा
त्रस्त समंधा शांत हो. बुवांना आणि तुलाही पुढच्या संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांसकट सण अनुभवायला मिळो हीच शुभेच्छा!
बाकी लेख तर झक्कास झालाय. मुलाखत सवडीने ऐकेन, पण वर्णन आणि फोटो मस्त आलेत!
14 Jan 2013 - 10:49 am | लीलाधर
आमचा शब्दरुपी तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बाकी मुला खत उत्तमच जमलीये ओ
14 Jan 2013 - 10:52 am | छोटा डॉन
अत्यंत समयोचित लेख.
वर वल्ली म्हणतो तसे अगदी कसलेल्या मुलाखतकारासारखा आणि सारखेच्या पाकात मुरल्यासारखा झकास वृत्तांत झाला आहे. अभिनंदन.
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ...
तिळगुळ घ्या गोडगोड बोला
- छोटा डॉन
14 Jan 2013 - 12:37 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
21 Jan 2013 - 2:46 pm | धमाल मुलगा
अगदी! ब्येस!!
14 Jan 2013 - 2:32 pm | सस्नेह
मस्त लेख. हलवा बनवण्याची पद्धत आज समजली.
14 Jan 2013 - 11:01 am | अभ्या..
एकदम छान मुलाखत गुर्जी. धन्यवाद.
संक्रांतीच्या खूप सार्या शुभेच्छा.
14 Jan 2013 - 7:33 pm | सोत्रि
ह्याला म्हणतात कलावंत! पेंटब्रशचा स्प्रे वापरून असा काटेरी हलवा करता येऊ शकतो हे ध्यानात यायला हाडाचा कलाकारच असावे सोकाजी :)
- (नुसताच हाडाचा, कलावंत नसलेला) सोकाजी
14 Jan 2013 - 11:13 am | इनिगोय
चविष्ट लेख :)
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता पुढच्या सणालाही तुमच्या अशा मस्त लेखाची वाट बघायला आवडेल.
14 Jan 2013 - 11:55 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आत्मुस... काय तो हलवा, काय ते काटे, रुतले हो रुतले... :)
14 Jan 2013 - 12:17 pm | त्रिवेणी
तुमचे सर्वच लेख छान व महितीपूर्ण असतात.
सर्व गोड मिपाकरना तीळ गूळ घ्या गोड गोड बोला.
14 Jan 2013 - 12:18 pm | आदूबाळ
लईच भारी!
गुडदाणी हा प्रकार आता नाहीसा होत चालला आहे आणि त्याजागी चिक्की नावाचा त्याचा सावत्र भाऊ रुळला आहे. गुडदाणी आता फक्त (तुम्ही लिहिल्याप्रमाणे) मंडईत आणि गोपाळ हायस्कूलजवळ मिळते. तुमच्याकडून या बदलाबद्दल वाचायला नक्कीच आवडेल!
14 Jan 2013 - 12:20 pm | मालोजीराव
बुवा संक्रांतीचा गोड गोड लेख !
14 Jan 2013 - 12:31 pm | धनुअमिता
मस्त झालाय लेख. काटेरी हलवा कसा बनवतात हे प्रथमच पाहिले.हि नाविन्यापुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
समस्त मिसळ्पाव परिवाराला संक्रतीच्या शुभेच्छा.
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.
14 Jan 2013 - 12:37 pm | तिमा
वाचताना मिठाचा खडा लागला तो नाही आवडला. आपला शत्रु जरी असला तरी त्याला तिळ्गुळ आणि हलवा देताना खराच द्यावा.
14 Jan 2013 - 1:30 pm | अत्रुप्त आत्मा
अहो माणुसघाणे,ती लहानपणी केलेली गंम्मत आहे हो! इतकि सिरियसली गोग्गोड मानु नका तीला. :-)
14 Jan 2013 - 1:26 pm | सलिल २४
वा.अ.आ.मस्त माहिती दिलीत. संक्रांतीच्या भरभरून शुभेछ्या .तुम्हाला आणि समस्त मिपाकरानाही आंतरजालावर असल्याने आपणच स्वतः तिळगुळ खाउन घ्या आणि गोड बोला.[ पण आपल्या घरी आई जो हलवा करते त्याला जसे काटे येतात तसा हलवा मला तरी विकत मिळाला नाही बाजारात कधी.आता आई नाही आणि तो हलवाही नाही.तुमच्या मुळे ते सर्व आठवल.धन्यवाद.]
14 Jan 2013 - 1:37 pm | भटक्य आणि उनाड
मस्त !!!
तिळगुळ घ्या गोड्गोड बोला !!!!
14 Jan 2013 - 1:39 pm | धन्या
भन्नाट लेख...
आणि मुलाखत तर आकाशवाणीवरच्या मुंबई ब केंद्रावर चालू असलेलीच मुलाखत वाटली. लगे रहो आत्माभाय !!!
14 Jan 2013 - 2:08 pm | नाखु
उत्तम माहीती.....
काटेरी हल्व्यासार्ख्या (बहुरंगी) बुवांचा "पंखा"
नाद खुळा
14 Jan 2013 - 2:17 pm | विलासिनि
माहितीपूर्ण लेख आवडला. सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
14 Jan 2013 - 2:44 pm | स्पंदना
मानल बुवा मानल. मागच्यावेळी गुळात शिरला होता यावेळी हलव्यात. असो अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा!
फारच छान झालाय लेख. मी करायचे हलवा घरात. एव्हढ सोप नाही आहे काम ते. मला एक नाही समजल, आम्ही घरात करतो तेंव्हा हवा थंड असली की छान काटा येतो म्हणुन भल्या पहाटे जांभया देत करायला घेतो, मग कारखान्यात थंड हवा होती की नाही? मी बडीशेपेवरपण चढवायचे काटा.
14 Jan 2013 - 3:03 pm | सोत्रि
भटजी, लेख तर जमलाच आहे!
पण जी मुलाखत काही तुम्ही घेतली आहे ती अतिशय भन्नाट आहे. अगदी प्रोफेशनल.
त्यामुळे आता तुम्ही पौरोहित्य हा जोडधंदा आणि मुलाखतकार हा मुख धंदा असा प्रयोग करून बघायला हरकत नाही.
- (हलव्याप्रमाणेच काटेरी पण गोड असलेला) सोकाजी
14 Jan 2013 - 4:16 pm | मी-सौरभ
गाडगिळांचा सुधीर किती वर्ष एकटाच लढणार????
गुर्जी तुमच्या नविन अवतारासाठीही शुभेच्छा!!
14 Jan 2013 - 3:04 pm | Mrunalini
वा... खुपच छान!!! एकदम नवीन माहिती... माझी आज्जी करायची हा हलवा घरी... खुप अवघड असते हे करायला... एकदा try केला पाहिजे करायचा.
14 Jan 2013 - 3:22 pm | दिव्यश्री
छाण माहिती मिळली आपल्या लेखातुण........:)
14 Jan 2013 - 4:00 pm | इष्टुर फाकडा
छान माहिती दिलीत आत्मू शेठ. लेख आवडेश.
बाकी सोत्रिंच्या सूचनेचा विचार करून पाहायला हरकत नाही ;)
14 Jan 2013 - 4:38 pm | मनराव
एक नंबर गुरुजी.........
14 Jan 2013 - 4:45 pm | चौकटराजा
बुवा, या लेखाबाद्द्ल एक आशावसन ( आश्वासन ) देतो की पुढच्या संक्रातीला तुमच्या घरचे हलव्याच्या दागिन्याचा पहिला हप्ता व त्यानंतर दोन वर्षानंतरच्या स़क्रांतीचा हलव्याच्या दागिन्याचा दुसरा हप्ता आपण करून देणार ! ह्यो आपला शबूद हाय ! ( बाकी हे घडण्यासाठी काय 'मेहनत' घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवा बुवा !)
!
16 Jan 2016 - 1:54 am | रेवती
चौराकाका, अजूनही वेळ गेलेली नाही. रथसप्तमीपर्यंत कधीही दागिने करून बुवांकडे द्या.
14 Jan 2013 - 6:20 pm | अनन्न्या
माझी आई खूप वर्ष विकायला करायची हलवा. थंडीचे दिवस असल्याने शेगडीवर हलवा करताना हात भाजत नसे. पाकातील मळी जाऊन तो स्वच्छ होण्यासाठी आई ताक वापरायची. मग पांढय्रा फडक्याने पा़क गाळून ठेवायचा. जवळ्पास महिनाभर आधी ही तयारी चालायची. काकडीच्या, भोपळ्याच्या बिया सोलून त्या तिळाबरोबर घालायच्या.
मला रंगीत हलवा करायला फार आवडॅ. त्याचा ह्ळूह्ळू गडद होणारा रंग छान वाटायचा. हं... आठवणी ताज्या झाल्या.
14 Jan 2013 - 7:12 pm | चित्रगुप्त
वाहवा.. अंगावर गोड काटा आला, गोड काटेरी हलवा बघून आणि वाचून. शुभेच्छा.
14 Jan 2013 - 7:26 pm | किसन शिंदे
बुवा, मुलाखत तर काही पाहिली नाही पण लेख मात्र खुपच छान झालाय, तिळगुळाच्या गोडव्यासारखा.!
14 Jan 2013 - 7:43 pm | बॅटमॅन
+१. हेच म्हणतो. मस्त लेख अत्रुप्त!!!!!
14 Jan 2013 - 8:14 pm | रेवती
सुरेख लेखन. अगदी आवडले. फोटूंमुळे पाककृती समजली.
14 Jan 2013 - 9:31 pm | सूड
हलवा कसा बनवतात त्याबद्दल उत्सुकता वाटत असे. धन्यवाद, अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल !!
14 Jan 2013 - 9:47 pm | मुक्त विहारि
मस्त लेख...
अप्रतिम..
15 Jan 2013 - 9:16 pm | शुचि
माहीतीपूर्ण लेख खूप आवडला.
15 Jan 2013 - 9:42 pm | ५० फक्त
लई भारी ओ बुवा, गेली २८ वर्षे हे शोधत होतो हलवा कसा करतात ते, धन्यवाद. हा कारखाना वर्षभर चालु असतो का, एकदा पोराला घेउन जाईन तिथं.
बाकी मला वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत बुंदीचे लाडु आणि जिलेबी(खायची) कशी करतात ते माहित नव्हतं.
16 Jan 2013 - 3:14 pm | उमेश टेकाडे
थोडे शेंगदाने टाकले तर मजा येईल्,आजोबा
16 Jan 2013 - 11:44 pm | श्रिया
तीळगुळ बनविण्याच्या प्रक्रियेची रोचक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! मुलाखत पण छान जमली आहे.
तुम्ही लेखात उल्लेख केलेल्या गुडदाणीवाल्यां कडे मिळणारी गुड़ीशेव एकदा खाल्ली होती. ही गुड़ीशेव कशी बनवतात ह्याबद्दल ही उत्सुकता आहे.
17 Jan 2013 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा
@ही गुड़ीशेव कशी बनवतात ह्याबद्दल ही उत्सुकता आहे.>>> गुडदाणी,गुडीशेव,रेवडी असे अनेक प्रकार गुडदाणीवाले विकतात.त्याची माहिती घेऊन त्यावर लवकरच लिहिणार आहे...
17 Jan 2013 - 12:32 am | पिवळा डांबिस
छान लिहिलंय. काही गोष्टी आपण गॄहीतच धरतो, त्या कशा बनवल्या जातात ते माहिती नसतं. अशा गोष्टींच्या बनवण्याची प्रक्रिया पुष्कळदा मनोरंजक असते.
बाकी वरील लेख वाचून शाळेतल्या या कवितेची आठवण झाली...
ताईच्या हातात
छोटिशी परात
हलवा करायला
तीळ नाही घरात
ताई बसली रुसून
तीळ म्हणतो हसून
घाल मला पाकात
कर हलवा झोकात
आता इतकंच आठ्वतंय....
:)
21 Jan 2013 - 1:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
सध्याच्या चॉकलेटच्या झटपट जमान्यात हे असले बनवायला कठीण असणारे खास मराठी / भारतीय पदार्थ मागे पडू लागलेत.
काटेरी हलवा अजून बाजारात टिकवून ठेवणार्या ठेंबे परिवाराला आणि त्यांच्या या उपक्रमाच्या माहितीची भेट मकरसंक्रातीच्या मुहुर्तावर देणार्या अतृप्त आत्मासाहेबांना शतशः धन्यवाद !
21 Jan 2013 - 2:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
बुवा माहिती आणि फोटुंबद्दल धन्यवाद. हलवा कसा बनतो हे कळल्यावर त्याची गोडी अजुनच वाढली.
पैजारबुवा,
15 Jan 2016 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा
तिळगुळ घ्या....
15 Jan 2016 - 9:55 pm | बहुगुणी
डिट्टेल वृत्तांत आवडला, पण ती मुलाखत काही ऐकता आली नाही, कृपया दुवे परत पूर्ववत करता आले तर पहा.
बाकी, या लेखानंतर आता
"पूर्वी काळ्या साड्या(अत्यंत उठावदार काळ्या शेड्स निवडून) आणल्या/घेतल्या जायच्या... हल्ली काय काय होत असावं बरं.......??? आंम्ही काय सांगणार.आमचं ते क्षेत्र (म्हणजे विवाहित असण्याचं ;-) ) निर्माणच नाही झालेलं अजून ;-)"
ही परिस्थिती बदललेली आहे. तेंव्हा त्यावेळी चौरासाहेबांनी दिलेलं हे वचन पाळलं का हो?ते 'हायड्रो' म्हणजे काय ते कळलं नाही, ब्लीचिंगसाठी वापरतात तो हायड्रोजन पेरॉक्साईड का? (नसावं, कारण अन्नपदार्थांसाठी सहसा H2O2 न वापरता सोडियम हायपोक्लोराईड वापरतात.)
15 Jan 2016 - 10:04 pm | प्रचेतस
हल्ली चिंतामणी कलर जोरात चालतो म्हणे.
15 Jan 2016 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा
हरितमृतागोबा-खुर्चीमारात्मबंध
16 Jan 2016 - 4:00 am | श्रीरंग_जोशी
प्रत्यक्ष मुलाखत अन कारख्यानाला भेट देऊन अत्यंत माहितीपूर्ण लेखन केले आहे.
या विषयावर (कुठल्याही) आंतरजालावर प्रथमच वाचायला मिळाले.
याच प्रकारचे अधिक लेखन वाचायला मिळाल्यास आनंद होईल.