(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-)
प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239
नकळत चरे आले
पातेले फळीवरुन पडले
तू ताक घुसळायची रवि झालिस
हे मलाच कसे नाही कळले???
गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे..
थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम..
ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम...
यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही...
पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
प्रतिक्रिया
29 Nov 2012 - 1:51 am | अभ्या..
श्रेष्ठपुरूष हाच बुवांना शोभेल आयडी
नाहीतर
स्मायलीवालेबाबा
पुष्परंगावलीकार
हे आहेतच की ;)
ते आत्माराव कोण म्हणत होतं हो? ;)
29 Nov 2012 - 1:58 am | बॅटमॅन
स्मायलीकार, विडंबनसम्राट, आणि क्षीराब्धिमंथक वासुकी ऊर्फ अत्रुप्त कोंडके ;)
29 Nov 2012 - 2:04 am | मोदक
९१.
ब्याम्या ब्याम्या... अरे अत्रुप्तता घालवायची म्हणून आपण नावे सुचवतो आहोत ना? तू तर सरपटी बॉलवर हिट विकेट झालास की रे! (गंपाचे वाक्य - साभार.) :-D
"ष्ट्ये फोकस"
29 Nov 2012 - 8:46 am | श्री गावसेना प्रमुख
त्रुप्त महापुरुष
कस काय आहे हा नवा आय डी
29 Nov 2012 - 8:11 am | अनिल तापकीर
अत्रुप्तजी अजुन अत्रुप्त आहे येऊद्या नवीन
29 Nov 2012 - 8:33 am | किसन शिंदे
बाब्बौ!!
बुवांच विडंबन शतकाकडे चाललं म्हणजे. :)
(शतकी धाग्यासाठी हार्दिक शुभेच्छा) ;)
29 Nov 2012 - 8:50 am | नाखु
पर्याय :
१.हा धागा हीच जिलबी असुन धाग्यात जिलेबीची अज्जाबात गरज नाही..
२.हा धागा आणि जिलबी समांतर असून दोन्हिंचे ध्येय एकच आहे शतक.
३.ह्या धाग्यात बुवांचा काही अत्रुप्त हेतु असु शकतो.
पाठवा ५२५२५ वर आणि जिंका बक्षीसे....
29 Nov 2012 - 8:56 am | श्री गावसेना प्रमुख
महाराज जिलेबी पाठवायची का,त्वांड ग्वॉड करुन घ्या.
29 Nov 2012 - 9:06 am | स्पा
.
29 Nov 2012 - 9:07 am | प्रचेतस
आता मात्र लै झालं !!!!!!! बास्स्स्स........
धागा वाचनमात्र करतोय.
4 Dec 2015 - 11:01 am | अभ्या..
फशिवतो काय वल्ल्या.
हे रत्न वाचनमात्र नाहीये. करायचं पण नाही. जो कुणी करेल तो माझा दुश्मन.
4 Dec 2015 - 11:10 am | प्रचेतस
मायला =))
हे बूच कधी उघडले बे??
बाकी कविता निव्वळ महाssssssन. =))
4 Dec 2015 - 11:51 am | अत्रुप्त आत्मा
वाचनमात्र केलेला होताच.. तो कुणी कसा व का उघडून घेतला? काही कळेल का?।
4 Dec 2015 - 12:50 pm | प्रचेतस
ते माहीत नै. आणि भांडे उघडायला मी कै अता संपादक नै.
4 Dec 2015 - 1:39 pm | अत्रुप्त आत्मा
उत्तर-दायित्व ! ह्या ह्या ह्या ह्या! असो
4 Dec 2015 - 1:43 pm | प्रचेतस
जौ द्या.
कोणी का उघडेना.
आपण आपलं भांड्यातल्या ताकाचा अस्वाद घेत बसावे.
4 Dec 2015 - 2:52 pm | अत्रुप्त आत्मा
सकाळी पाणी आल्याच प्रथम आपल्यालाच कळावं, बादली घेऊन फैला नंबर लावता यावा या उद्देशानि सांजकाली हळूच जाऊन नळ उघडून गुपचुप परत येणाय्रा .., व सकाळी "कुणी बाई उघडला नळ ? बर झालं पण.. सगळ्यांना पाणि तरी भरता येईल लवकर! " अस म्हणत आपली बादली प्रथम लाउन पाणि भरणाय्रा ..(हुश्श्! ;) ) प्राचीन वाडा'मयींन गृहिणीची आठवण झाली.
4 Dec 2015 - 3:09 pm | प्रचेतस
ख्याक...!!!! मेलो मेलो.
कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं?
4 Dec 2015 - 2:59 pm | अन्या दातार
बुचे का उघडिता???
अांSSS
4 Dec 2015 - 3:04 pm | नाखु
तर लावतां कां ????
अत्यंत निरागस प्रश्न
4 Dec 2015 - 3:07 pm | टवाळ कार्टा
झाकण हवे तेव्हा बंद उघड करता आले पैजे :)
4 Dec 2015 - 3:07 pm | बॅटमॅन
हे म्हणजे ***चेच होते तर खाता का या प्रश्नासारखे झाले. =))
4 Dec 2015 - 11:14 am | सतिश गावडे
आहा... बुवांचे भांडे सापडले =))
4 Dec 2015 - 12:42 pm | नाखु
अगा जे हरविलेच नाही ते सापडेल कैसे !!
सगा हे (भांडे) मिपाव्यापी ,त्यासी कसले पैसे !!!
(यमक जुळले असल्यास निव्वळ योगागोग सम्जावा अन्यथा मुक्त छंद म्हणून चालवून घ्यावे (कडवे), भांडे नाही)
4 Dec 2015 - 12:49 pm | बॅटमॅन
फक्त १०५ प्रतिसाद?????? बाकीचे कुठे गेले? दू दू दुत्त दुत्त भूतपूर्व संपा दक :/
4 Dec 2015 - 12:51 pm | प्रचेतस
खी खी खी.
बाकी ते जमलम, तरंगम ही यमकं अजूनही काळजाला भिडताहेत राव. =))
4 Dec 2015 - 12:53 pm | सस्नेह
जुन्या जुन्या बाटल्यांची बुचे उघडली जात आहेत.
ताकाचे जे काय झाले असेल ते आपापल्या जबाबदारीवर पिणे ! =))
4 Dec 2015 - 1:31 pm | pacificready
अनेक वेळा या अजरामर काव्यस्थळास भेट देऊन सुद्धा निव्वळ दाराला लागलेल्या कुलपामुळे पुष्पं अर्पण करण्याची सन्धि आम्हास मिळत नव्हती. आज ही संधी साधुन घेण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो.
हही हही हही!
4 Dec 2015 - 3:28 pm | प्रमोद देर्देकर
बरें त्या मारुती कांबळेच काय झालं?
6 Mar 2017 - 6:36 pm | अत्रुप्त आत्मा
आमच्या काव्याचे ऐति-हासिक साक्षीदार!
गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे..
थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम..
ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम...
2 May 2017 - 10:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ओह असा सगळा प्रकार झाला तर.
3 May 2017 - 1:53 pm | सूड
मिपाच्या शिरपेचातला हा मानाचा तुरा पुन्हा उचकटून वर काढत आहे. =))
3 May 2017 - 5:39 pm | अभ्या..
तरुणपणात बुवा फारच विनोदी होते बुवा. ;)
काहीही लिहायचे अगदी.
=)) =)) =))
4 May 2017 - 6:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तरुणपणात? बाबौ. मग आता पेन्शनीत गेले का काय
?
4 May 2017 - 7:12 am | प्रचेतस
बुवांचं भांडं कितीही लपवायला गेलं तरीही लपतच नाहिये =))
4 May 2017 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा
27 Jul 2017 - 2:09 am | सचु कुळकर्णी
खफ वरती रंगाशेठ ने लिंक शेअर केल्याने तांब्याधिपती ह्यांचे हे काव्यरत्न वाचनात आले.
27 Jul 2017 - 10:19 am | अत्रुप्त आत्मा