जुलूस

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
23 Aug 2012 - 5:37 pm

सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्‍यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्‍यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते.
मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय. वर्गात मागच्या बेंचवर बसून खिडकीतून बाहेर बघणार्‍या मुलांना, ठराविक पद्धतीने निबंध न लिहिणार्‍या मुलांना, ठराविक साच्यातली उत्तरे न लिहिणार्‍या मुलांना वाया गेलेली मुले समजणार्‍या शिक्षणफॅक्टरीतून कशीबशी सर्टिफिकेटं मिळवलेल्या लोकांना स्वतःच्या शंकांच्या योग्यतेबद्दलही शंकाच असतात.
एकीकडे "आराम हराम है" किंवा "Work for all (and more of it)." सारख्या वाक्यांचा येता जाता पवित्र मंत्रासारखी जप करणार्‍या, 'कार्यमग्न' लोकांना पुजणार्‍या आणि काम न करणार्‍यांना ऐतखाऊ म्हणून हिणवणार्‍या व्यवस्थेचे पाईक कामाचे तास कमी करायला का झटतील हे काही केल्या कळत नाही किंबहुना कोणीही स्वतःचा वेळ मोकळा अनुत्पादक का ठेवेल हे "माणसाच्या उपभोगाकांक्षा अमर्याद असतात आणि स्रोत अतिशय मर्यादित" असे ठासून सांगणार्‍या या व्यवस्थेला कसे कळेल हेच समजत नाही (म्हणूनच कामात बदल म्हणजेच आराम वगैरे वगैरे). समृद्धी, शिक्षण वगैरे आल्यावर लोकसंख्या स्थिर होईल असे म्ह्णताना प्रगतीच्या गेल्या साठ वर्षांमध्येच लोकसंख्या दुपटीहून अधिक का वाढली हे कळत नाही आणि आदिमानवाची लोकसंख्या मात्र कोणत्याही समृद्धीविना पन्नास लाखाच्या आसपास कशी स्थिर राहिली हे कळत नाही.
पण सुदैवाने अशा शंकांना आपल्या विचारांनी आधार देणारी माणसे जगात आहेत.
माणसाला आपण स्वत:साठी निर्माण केली आहे असे वाटणार्‍या पण प्रत्यक्षात माणसांपासून बनलेल्या असूनही स्वतंत्रपणे उत्क्रांत झालेल्या आणि कोणत्याही एका माणसाच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या धर्म, सरकारादि यंत्रणांसारखीच "मार्केट" ही एक यंत्रणा उत्क्रांत झालेली आहे आणि माणूस म्हणजे तिच्या प्रभावाखाली तिच्यासाठीच फुकटात काम (Shadow Work) करणारा Homo Economicus झालेला आहे. मोठमोठ्या कंपन्यांची जगातल्या अगदी थोड्या लोकांच्या फायद्यासाठी काम करणारी ही बाजारू यंत्रणा प्रगतीचे ढोल इतक्या मोठ्या आवाजात वाजवत आहे की काय खरं आणि काय खोटं हे न बघताच माणसं त्या तालावर नाचू लागतात. माणसाच्या कोणत्याही गरजेचे संस्थानीकरण हे या यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. इवान इलिच या विचारवंताने माणसाच्या गरजांच्या संस्थानिकरणातून झालेला विपर्यास आपल्या Needs या लेखात मांडला आहे. उदाहरणार्थ शिक्षण या शब्दाचा अर्थ शिकणे असा न राहता पदवी मिळवणे, मार्क्स मिळवणे असा झाला आहे. शिकण्याच्या क्रियेपेक्षा बाजारातून मिळणार्‍या सेवेवर माणसाचे अवलंबित्व निर्माण झाले आहे. शाळेबाहेरच्या खर्‍याखुर्‍या शिकण्याला शिक्षण म्हणायची मान्यताच नाही. माणसाच्या शिकण्याच्या गरजेचे संस्थानिकरण करून बाजाराने बहुसंख्य लोकांची ती गरज भागणे दुरापास्त केले आहे. रुसो म्हणतो,"The noblest work in education is to make a reasoning man, and we expect to train a young child by making him reason! This is beginning at the end; this is making an instrument of a result. If children understood how to reason they would not need to be educated.". पण इथे खरेच शिकायचे कोणाला आहे? आम्हाला तर शिक्षण घेतल्याचा कागद हवा आहे म्हणजे बाजारात आमची किंमत वाढेल आणि मग बाजार उदार मनाने आम्हाला घर, गाडी, टीव्ही वगैरे देऊन आमच्या "गरजा" पूर्ण करेल. ज्यांनी असे शिक्षण घेतले आहे अशा आम्हा लोकांना हे सगळं मिळतं, सुबत्ता मिळते, जगात काय चाललंय याची माहिती मिळते पण आपण खातो ते नक्की कुठून येतं त्याचं ज्ञान मिळत नाही. आपण खातो त्यात नक्की किती पेस्टिसाईड्स आहेत ते कळत नाही. उत्पादकाने लावलेल्या "Organic" लेबलवर विश्वास ठेवण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. समजा नाहीच ते घ्यायचं म्हटलं तर दुसरं काय खायचं त्याचं ज्ञान नाही. आम्ही फक्त बाजाराच्या जगङ्व्याळ यंत्रात एखाद्या स्क्रूप्रमाणे एखादे अतिविशिष्ट काम करत बसतो ज्याचा संबंध आम्हाला आमच्या रोजच्या जगण्याशी लावता येत नाही. आमच्या अतिप्रचंड लोकशाही यंत्रणेतले आम्ही एक नगण्य भाग आहोत ज्यांना आशेशिवाय काहीही करता येत नाही. हळूहळू ही काही न करण्याची आम्हाला सवय लागलेली आहे आणि आमची हवा, आमचं पाणी आणि आमच्या अन्नाचं बाजारीकरण होतानाही आम्ही पाहात राहतो. आम्ही मानसिकरित्या षंढ केले गेलो आहोत. इतके की बाजाराने पवित्र ठरवलेल्या वस्तुंना आम्ही नाही म्हणू शकत नाही, त्यांच्यापुढे आम्ही आनंदाने मान झुकवतो. "Holy Cow" म्हणणार्‍या आमच्या पूर्वजांना आम्ही वेड्यात काढून "Holy Car!" म्हणतो. "गाय हमारी माता है|" म्हणणार्‍यांच्या वंशातले आम्ही आता कारसेवा करतो. कारसाठी आम्ही जमिनीवर डांबर ओतून आखीव-रेखीव रस्ते बनवतो. कोणत्याही दिशेने चालू लागण्याचे आमचे स्वातंत्र्य घालवून ठराविक मार्गाने जायचे नियम पैसे देऊन विकत घेतो आणि त्या पैशांसाठी जास्तीचे कामही करतो. सर्वसाधारण अमेरिकन माणूस कार असूनही त्याच्या आदिम पूर्वजाइतका चालतोच फक्त लॉबी, पार्किंग आणि कॉरिडॉर्समध्ये. इलिच म्हणतो "The model American puts in 1600 hours to get 7500 miles: less than five miles per hour. In countries deprived of a transportation industry, people manage to do the same, walking wherever they want to go, and they allocate only 3 to 8 percent of their society's time budget to traffic instead of 28 percent".
"हेल्थ" या आणखी एका संस्थानिकृत अतिप्रिय गरजेचाही आम्ही या अतिपूज्य कारसाठी त्याग करतो. कॅन्सरच्या नावाने गळे काढणारे आम्ही कारच्या नळीतून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन सायनाईडसारखे घातक कर्कजनक वायू मुकाट आमच्या फुप्फुसात भरून घेतो.
रस्त्यावर भारतात एक लाखाच्यावर बळी घेणार्‍या या कारसाठी सरकारने लाल गालिचा अंथरला आहे. किरकोळविक्री क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात काचकूच करणार्‍या सरकारने कारनिर्मिती क्षेत्रात आपले दरवाजे सताड उघडे ठेवले आहेत आणि वीस वर्षांत जगातले ऑटोमोबाईल हब व्हायचे स्वप्न बाळगले आहे. त्यासाठी मोठमोठे रस्ते बांधणे, त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी हडपणे जोमात चालू आहे.
त्याचवेळी या कारसाठी इंधन कमी पडणार हे पाहून नवनव्या इंधनाच्या शोधात मार्केट आहे आणि मार्केटच्या सुपीक डोक्यातून "जैवइंधनाचे" एक नरभक्षक पिल्लू बाहेर पडले आहे. २०५० पर्यंत जगाच्या ऊर्जेच्या २५% ऊर्जा जैवइंधनातून मिळेल असा अंदाज आहे. अर्थातच त्यासाठी आधीच कमी असलेली जमीन द्यावी लागणार. लाखो वर्षे जुनी जंगले तोडून तिथे पामची किंवा जट्रोफाची लागवड करावी लागणार (मलेशिया आणि इंडोनेशियाने यात भारतापेक्षा जास्त प्रगती केली आहे).माणसांना खायला नसेल मिळत पण इंधनासाठी ऊस आणि मका उपलब्ध करून द्यावा लागणार. मग अन्नधान्याच्या किंमती वाढताहेत तर वाढू द्या.
UN च्या फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (FAO) भूक कमी करण्याची काही ध्येये ठरवली होती. अगदी आकडेवारीनिशी. पण २००६ नंतर अन्न-धान्याच्या किंमती इतक्या वाढल्या की जगातल्या दीर्घकालीन उपाशी लोकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढायला लागली आणि २००९ मध्ये एक अब्जापेक्षा जास्त होईल असा अंदाज निघाला. मग FAO ने एक युक्ती केली. ध्येय ठरवण्यासाठी आकडेवारी वापरायचेच सोडून दिले. म्हणजे उपाशी लोकांची संख्या अमुक इतकी कमी करू असे न म्हणता फक्त "आम्ही उपाशी लोकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करू" असेच ध्येय ठरवले गेले.
जगातल्या वरच्या १० टक्क्यातल्या लोकांना पोषणमूल्यांनी भरपूर असा बहुढंगी आहार मिळतो, पण हे भाग्य सगळ्यांच्या नशिबी नाही. FAO च्या त्याच अहवालातला हा परिच्छेद पाहा:
"Biodiversity, another essential resource for agriculture and food production, is threatened by urbanization, deforestation, pollution and the conversion of wetlands. As a result of agricultural modernization, changes in diets and population density, humankind increasingly depends on a reduced amount of agricultural biological diversity for its food supplies. The gene pool in plant and animal genetic resources and in the natural ecosystems which breeders need as options for future selection is diminishing rapidly. A dozen species of animals provide 90 percent of the animal protein consumed globally and just four crop species provide half of plant-based calories in the human diet."

प्रदूषणाने वातावरणावर परिणाम होतो म्हणून मार्केटने एक युक्ती काढली आहे. वातावरणाचं खाजगीकरण! म्हणजे वातावरणाचे हक्क आजवर ज्यांनी प्रदूषण केले आहे त्याच लोकांना वाटून द्यायचे. मग त्यातले काही लोक थोडंसं प्रदूषण कमी करतील आणि वाचलेला आपला "कोटा" इतरांना विकतील म्हणजे ते प्रदूषण करायला मोकळे. "कार्बन ट्रेडींग" या आपल्या पुस्तकात लॅरी लोहमानने पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांच्या मालकीचं आणि हक्काचं वातावरण या मार्केट इकॉनॉमिने प्रदूषणकर्त्यांना कसं परस्पर आंदण दिलं आहे याचा खुलासा केला आहे.

२०५० पर्यंत ९ अब्ज होणारी लोकसंख्या, तिला पोसण्यासाठी ७०% जास्तीच्या अन्नाची गरज असताना इतर कामांसाठी वापरली जाणारी जमीन, अन्न-धान्यांच्या बियाणांची कमी कमी होत जाणारी उत्पादनक्षमता, जेनेटिक्सच्या माध्यमातून कंपन्यांचा त्यावर नियंत्रण आणण्याचा कावा, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य, मरू घातलेले समुद्र, वाढती विषमता असं सगळं असूनही जणू काहीच प्रश्न नाही असा आव आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही मार्केट इकॉनॉमी करते.
त्या बाजाराच्या चमचमाटापुढे हतबल होऊन माणूस पुढ्यात आलेल्या गोष्टींचा उपभोग घेत राहतो, नवे नवे तंत्रज्ञान, नवे फोन, नवे संगणक, नवे टीव्ही येतच राहतात आणि अखेर मार्केटच माणसाचा उपभोग घेऊ लागते.
असा आपल्या प्रत्येक गरजेचा गुलाम झालेला माणूस त्या गरजा पूर्ण होत नसतानाही त्याच्या आभासासाठी रात्रंदिवस खपत राहतो. आयुष्यातला एक तृतीयांश भाग काम करण्यात आणि एक तृतीयांश भाग झोपेत काढल्यावर उरलेल्या वेळात माणूस आपण सुखी आहोत असे स्वतःला ओरडून ओरडून सांगत राहतो पण मार्केटच्या प्रगतीच्या जुलूसात त्याचा आवाज त्याला स्वत:लाही ऐकू येत नाही.

१. Fekri Hassan, Demographic Archaeology (New York: Academic Press, 1981). Cited in "My Name Is Chellis And I Am In Recovery From Western Civilization"

२. Vandana Shiva, "Soil Not Oil" (Southpress)

संस्कृतीसमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

23 Aug 2012 - 6:33 pm | आनन्दा

वाचतोय..

इष्टुर फाकडा's picture

23 Aug 2012 - 6:57 pm | इष्टुर फाकडा

आनंदा, वाचायचा थांब आता संपला लेख :)

ननिसाहेब, कोशात आहोत, बरे आहोत...कशाला उगाच विचार करायला लावून डोक्याला भुंगा लावताय...

मदनबाण's picture

23 Aug 2012 - 9:50 pm | मदनबाण

*

सर्वसाधारण अमेरिकन माणूस कार असूनही त्याच्या आदिम पूर्वजाइतका चालतोच फक्त लॉबी, पार्किंग आणि कॉरिडॉर्समध्ये. इलिच म्हणतो "The model American puts in 1600 hours to get 7500 miles: less than five miles per hour. In countries deprived of a transportation industry, people manage to do the same, walking wherever they want to go, and they allocate only 3 to 8 percent of their society's time budget to traffic instead of 28 percent".

पटले. अजुन काही वर्षात पुणेदेखिल याच परीस्थीतीत पोहचेल.

अन्या दातार's picture

23 Aug 2012 - 7:11 pm | अन्या दातार

नगरीनिरंजन, खूप प्रभावी लेखन. सो कॉल्ड मार्केट फोर्सच्या आहारी आपण कसे जात आहोत हे सांगणारा लेख. लेखनशैली नेहमीप्रमाणेच अप्रतिम. :)
मध्यंतरी प्रोजेक्ट मेघदूतच्या निमित्ताने मध्य प्रदेशचा बराच भाग पालथा घातला, महाराष्ट्रातही पेंच प्रकल्पातील काही गावांमधून हिंडलो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी झालेल्या चर्चेतून बरेच नवे तपशील समजत होते. गरजांचे व साधनसंपत्तीचे बाजारीकरण आणि त्याचा आदिवासी जीवनावर झालेला प्रभाव या निमित्ताने मांडू इच्छितो.
१. शिक्षणः आजच्या घडीला नागरी रुढ शिक्षणावरच सर्व आदिवासींचा भर आहे. अर्थातच सरकारच्या माध्यान्ह भोजन, सर्वशिक्षा मोहिमेचाही हा प्रभाव लक्षणीय म्हणावा असाच आहे. यात गैर किंवा वावगे असे काहीच नाही; पण... आजच्या आदिवासींच्या पिढीला पारंपारीक ज्ञान अज्जिबात नाही. त्यांना त्यांच्या परंपराच माहिती नाहीत. जंगलवाचन किंवा जंगलचे ठोकताळे, त्याची साधी माहितीही त्यांना नाही. याला कारण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण. पारंपारीक ज्ञान आजच्या घडीला उपयोगाचे नाही या समजूतीचा पडलेला प्रभाव.
२. रोजगारः सरकारच्या धोरणांमुळे आदिवासींना लाकूड्तोड करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वनविभागाशिवाय इतर कुणासही लाकूडतोडीचा अधिकार नाही. त्यामुळे या लोकांचा पारंपारीक व्यवसायही संकटात आला. पर्यायी मार्ग म्हणून हे लोक शेतीकडे वळले आहेत. पण तिथेही उत्पादकतेच्या नावाने शिमगाच आहे. अनेक ठिकाणी आदिवासींना विस्थापित करुन जेथे जमिनी देण्यात आल्या त्या सुपीक नाहीत. नापिकीचे प्रमुख कारण म्हणजे इंग्रजांनी वनांचे केलेले सागवानीकरण! आज जेथे जेथे आपण जंगल म्हणून जातो, तिथे वृक्षविविधता क्वचितच आढळते. सर्व जंगलांमध्ये सागवानाचीच झाडे लावण्यात आली आहेत (इंग्रज सरकारच्या कृपेने). त्या ठिकाणी नंतर सागवानाशिवाय काहीच उगवत नाही. सागवानच का? कारण त्याला मागणी असते. जर बांबूला मागणी (दरही) जास्त असती तर सगळीकडे बांबूची बेटे दिसली असती. सागवानाच्या झाडावर कोणताही पक्षी घरटे बनवत नाही; जनावर खात नाही. आज जे देश जैवविविधता जैवविविधता म्हणून बोंबा मारताहेत त्यांनी यातून योग्य तो बोध घ्यावा.
इतर ठिकाणहून (मध वगैरे) जे उत्पन्न मिळते त्याला गौण वनउपज म्हणून टॅक्स लावला जातो. अनेकदा त्याचा बागूलबुवा दाखवून आदिवासींना (सरकारी यंत्रणेकडून) लुटलेही जाते. हे चक्र भेदण्यासाठी म्हणून आदिवासी युवक रोजगारासाठी शहरात दाखल होतो ते एखाद्या डिग्री/डिप्लोमाच्या सर्टीफिकेटच्या जोरावर.
शहरीकरणः जंगलात आदिवासींच्या मूलभूत गरजा ज्या प्रकारे भागतात तश्या शहरांमध्ये भागत नाहीत. शहरात प्रत्येक गोष्टीसाठी पैसाच लागतो. रहायचे तर घर हवे. हातात असते फक्त डिग्री/डिप्लोमाच्या सर्टीफिकेटची भेंडोळी आणि तुटपुंजी रक्कम. मग उभ्या राहतात झोपडपट्ट्या! शहरातील इतर आमिषेही कमी नसतात. संपर्कसाधनांत आज मोबाईलही एक गरज बनली आहे. त्यासाठी पैसा हवा. मग एकतर सावकारी कर्जाच्या विळख्यात स्वतःला गुरफटवून घेतो किंवा गुन्हेगारीत तरी.
प्रत्येक गोष्टीचे आपण होमोजिनायजेशन करत चाललो आहोत. आदिवासी असो वा कुणीही; त्याने रुढ व्यवस्थेत सामील व्हावे असाच आपला दुराग्रह असतो.

(प्रतिसाद अतिशय विस्कळीत आहे याची कल्पना आहे. पण गेले महिनाभर काहीही केल्या नीट मांडता येत नव्हते. आज ननिंच्या लेखाच्या निमित्ताने वाचा फुटली आहे.)

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 6:44 am | नगरीनिरंजन

अन्या आणि पैसाताई,
लेखात जागा आणि वेळेअभावी मी बरेच मुद्दे सोडले आणि मांडलेलेही खूप त्रोटकपणे लिहीले आहेत, पण तुम्हाला समजलंय मला काय म्हणायचं आहे ते.
धन्यवाद.

रेवती's picture

23 Aug 2012 - 7:15 pm | रेवती

हम्म्म्म....
डोळे उघडणारे लेखन वगैरे म्हणणार नाही कारण आकडेवारी पाठ नसली तरी इतर वाचनातून, इंटरनेटच्या माध्यमामुळे हे बर्‍याच जणांना माहित असतं. फारतर समजून , उमजून विसरण्याचा प्रयत्न करता येईल.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 6:47 am | नगरीनिरंजन

अगदी बरोबर. सगळ्यांनाच आतून हे माहित असतं पण काही करण्यासारखं नाही म्हणून विसरावं लागतं.
हे सगळं खोटं असेल अशीच आपण आशा करायची आणि पुढे समजा दुर्दैवाने आपल्या वंशजांना प्रॉब्लेम झालाच तर तेव्हा नजर चुकवायलाही आपण नसू एवढं पाहायचं.

तिमा's picture

23 Aug 2012 - 7:51 pm | तिमा

शिक्षणाचा मुद्दा पटण्यासारखा आहे.
सध्याचे शिक्षण म्हणजे, कमीतकमी वेळात जास्तीतजास्त अन्न खाण्याच्या स्पर्धा असतात ना , तसे झाले आहे. कुठलाही विषय शिकताना त्याची फंडामेंटल्स समजलीच नाहीत तर ती फक्त पोपटपंची होते. इथे तर कुणाला वेळच नसतो. सगळ्या मुलांची आकलनशक्ती ही सारख्या वेगाने कशी काम करेल ? मग होते काय की, दोनचार हुशार मुलांनी पटापट उत्तरे दिली की सगळ्या वर्गाला समजलंय असं गृहीत धरुन शिक्षक पुढे जातात.

इतर मुद्यांबद्दल मात्र सहमत नाही. चंगळवादी संस्कृती ही कितीही विरोध केला तरी फोफावतच जाते.
एखादा फुगा फुगतच राहिला तर त्याला विरोध करु नये. आणखी फुगु द्यावा. त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त हवा भरली गेल्यावर तो फुटतोच. मार्केटला आपला घास घेऊ द्यायचा की नाही हे जर त्या भक्ष्याला कळतच नसेल, तर ते अनुभवानेच शहाणे होतील.

आपल्या देशात मुख्य प्रश्न हा लोकसंख्येचा आहे. स्पर्धा ही जीवघेणी झाली आहे ती अति लोकसंख्येमुळेच. परदेशांत तुलनेने शांत जीवन व सुबत्ता ही कमी लोकसंख्येमुळेच आहे. गाडीत जागा मिळण्याची शाश्वती असेल तर कोणीही जिवावर उदार होऊन जागा पकडायला घुसणार नाही.
एकंदर लेखात निराशावादी सूर वाटतो.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 7:28 am | नगरीनिरंजन

आपल्या देशात मुख्य प्रश्न हा लोकसंख्येचा आहे

पाश्चात्य प्रगतीच्या कल्पनांनी वर्षानुवर्षे केलेया लूटमारीचा तो परिणाम आहे.

एकंदर लेखात निराशावादी सूर वाटतो.

आपण सगळे वरच्या १०-२०% वाले आहोत. आपल्याला निराशावादीच वाटणार.
थोडा दृष्टीकोन बदला. आपल्याला राहत्या घरातून हाकलले म्हणून शहरात झोपडपट्टीत येऊन राहतो आहोत अशी कल्पना करून वाचा किंवा नुकत्याच आफ्रिकेत खाण कामगारांवरच्या गोळीबारात मेलेल्या छत्तीस लोकांमध्ये आपल्या माहितीतला, जवळचा कोणीतरी होता अशी कल्पना करून वाचा म्हणजे लेख खूपच गुळमुळीत वाटेल.

इनिगोय's picture

24 Aug 2012 - 11:54 am | इनिगोय

:(.
खरं आहे. स्वतःची चाकोरीच एवढी थकवणारी आहे, की अशा तर्‍हेने आपली जागा सोडून दुसर्‍याचा विचार करणंही सुचवल्याशिवाय होत नाही. संवेदनशीलतेचा विसर पडलाय की ती आता मरूनच गेलीये?

पैसा's picture

23 Aug 2012 - 7:57 pm | पैसा

बाजारीकरणाचा रेटा एवढा जबरदस्त आहे की मोठ्या लोकांच्या लग्न, पोरांबाळांच्या फोटोसारख्या खाजगी गोष्टींचे हक्क सुद्धा विकले जाताहेत. आणि लोक ते चवीने पाहताहेत. शिक्षण कोणाला पाहिजे? सगळ्याना पाहिजे पदवीचा कागद. तो नसला तर तुमची किंमत शून्य. जगाबद्दल शिकण्याऐवजी आज सगळ्या शाळा कॉलेजांमधे डोक्यात ठराविक माहिती फक्त कोंबली जाते.

आदिवासी आणि जंगलं येत्या काही वर्षात नाहीशी होतील. कुणाला त्याचं काय आहे? कारण या आदिवासींकडे उपद्रवमूल्य काही नाही ना! नक्षली आणि ख्रिश्चन मिशनरी त्याना मदत करतात पण त्यात त्यांचा स्वतःचा अजेंडा असतो. अन्या जंगलांबद्दल लिहितोय, गोव्यात गेली काही वर्षे पट्टेरी वाघ लोकवस्तीत येताहेत आणि मारले जाताहेत, पण सरकार गोव्यात ढाण्या वाघ आहेत हेच कबूल करायला तयार नाही कारण मग ती जंगलं राखीव करावी लागतील आणि खाणसम्राटांना ते परवडायचं नाही.

गुगल मॅप वर गोवा आणि कर्नाटकचे नकाशे बघा. हिरव्यागार पश्चिम घाटाच्या मधे मधे खाणींचे विद्रुप तांबडे कोडासारखे चट्टे दिसतील. पण जोपर्यंत खाणी चालू आहेत तोपर्यंत जंगलं कोणाला हवी आहेत?

या गाड्यांनी इतकं नुकसान केलंय तरी आम्हाला आणखी मोठी गाडी पाहिजे. त्यासाठी मग गॅस सिलेंडर पण बेकायदा वापरायची तयारी. रस्त्यावर पहिला हक्क पायी चालणार्‍यांचा. पण हा नियम कागदावरच रहातो. एखद्या गाडीवाल्याला तुम्ही रस्त्यात चालताय म्हणून गाडीचा वेग कमी करावा लागला तर तो तिथेच तुमची आयमाय उद्धरणार. नाहीतर सरळ अंगावर गाडी घालणार.

लोकांना जेवायला धान्य नाही. जगातले १/३ गरीब लोक भारतात रहातात, अमेरिकेच्या तुलनेत पाहिलं तर भारतातले ६८% लोक दिवसाला २ डॉलर्सपेक्षा कमी कमवतात म्हणून दारिद्र्यरेषेखाली आहेत. तेंडुलकर कमिटीच्या रिपोर्टप्रमाणे भारतातले ३७% दारिद्र्यरेषेखाली जगतात. दारिद्र्यामुळे त्याना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होत नाहीत आणि अज्ञान, अनारोग्य, गुन्हेगारी यांचं दुष्टचक्र चालूच रहातं. तरी धान्य बिअरसाठी वापरू नका म्हणून बोंबा मारणारे गाढव कारण दारू पिंणे हा काही लोकांचा हक्क तुम्ही काढून घेताय!

उद्धवा, अजब तुझे सरकार!
लहरी राजा प्रजा आंधळी,
अधांतरी दरबार!

एकाच वेळी प्रचंड सहमत आणि प्रचंड असहमत.
(खालचे मन यांच्या प्रतिसादातील वाक्य उचलून इथे वर डकवले आहे.)

पैसाताई,

वसुधैव मार्केटकम! हा नव्या युगाचा मंत्र आहे. (हाच मंत्र घेऊन इष्ट इंड्या कंपणी इकडे आली होती. पण ते असो.) निरंजनांनी मूळ लेखात 'मार्केट'ला जरा जास्तच झोडपले आहे. कारण वर कंसात लिहिले तसे आहे. मार्केट आजच नाही, नेहेमीच स्ट्राँग असते. सिव्हिलायझेशन = मार्केट. (कुणाला इन्टरेष्ट असल्यास सिव्हिलायझेशन = मार्केट. या हायपोथेसिसची सिद्धता करू.)

जंगलतोडीबद्दल म्हणाल, तर मिपावरच आदिती३.१४ अन माझी बडबड एका मांसाहार/शाकाहार धाग्यावर झालेली होती. ज्या ऑक्सिजन तयार करण्याबद्दल अन प्रमुख अन्नघटक असल्याबद्दल आपण जंगलांना श्रेय देतो, त्यापेक्षा समुद्रातील वनस्पती जीवन जास्त महत्वाचे आहे. यातही एकपेशीय वनस्पती : प्लँक्टन्स जास्त महत्वाचे आहेत. नंतर येतात अल्गी.
जिथे खाणकाम करून सोडून दिलेली जमीन आहे, तिथे निसर्ग ती पुन्हा काबीज करेलच. आसपास पहा. आभाळाखालचा कोणताही २ इंचाचा तुकडा, तिथे जर वर्दळ नसेल तर झाड उगवतेच. तुमच्या माझ्या लाईफस्पॅनच्या तुलनेत कदाचीत तो वेळ मोठा भासेल पण पृथ्वीच्या किंवा मानवजातीच्या एकूण आयुष्यकालाच्या तुलनेत नगण्यच.
पण खाणकामातून मिळणारा कोळसा असो, कि तांबे. तुमच्या माझ्या जगण्यातून तांबे अन कोळसा काढून टाकला तर सगळी प्रिंटेड सर्किट्स, वायर्ड सर्किट्स, अन त्यातून वाहणारी किमान ५०% वीज काढून टाकण्यासारखे आहे.
गाड्यांचं बोलायचं तर पायी चालणार्‍याला सायकल हवीशी असते. सायकलवाल्याला स्कूटर, अन स्कूटरवाला किमान नॅनोची स्वप्ने तर पहातोच पहातो. इतरत्र (पाश्चात्य देशांत) गाड्या उदंड जाहल्या तरी आपण मात्र पायीच चालावे असे का? कार्बन ट्रेडींगच्या नानाची टांग!
ग्यास गाड्यांत बेकायदा वापरला जातो कारण सरकार सबसिडी देते. सबसिडी बंद केली, भाव वाढतील. बोंब कोण ठोकील? सगळाच ग्यास आहे त्या किमतीला दिला, तर गाडीत डिझेल स्वस्त पडते. ग्यासची सबसिडी बंद केली तर रस्त्यावरच्या ८०% मारूती व्हॅन्स बंद पडतील हे माझे भाकित आहे. पण मग त्या 'गरीब' लोकांच्या जेवणाचे काय??
जेवायच्या धान्याचे परत तेच.
रेशन कार्डावर धान्य मिळते. राजीव गांधी कार्डावर औषधोपचार. वीज जितकी मिळते ती फुकटच मिळते. (बिनदिक्कित चोरी) काम करायला माणसे मिळत नाहीत अन त्याच वेळी बेकारी भरपूर आहे! बेकार राहून उपाशी राहिले असते तर बेकार बसत नाही कुणी. पोट भरायला हातपाय हलवतोच माणूस. खरे उपाशी आहेत. पण ते फार कमी. दोन्ही हातांनी खाणार्‍याचीच चलती दिसते मला तरी.

मन१'s picture

23 Aug 2012 - 8:20 pm | मन१

एकाच वेळी प्रचंड सहमत आणि प्रचंड असहमत.
वादावादी करायला, चर्चा करायला मटिरियल ठासून भरलेला लेख.
अजूनही चांगले वैचारिक लेखही येतात, हे पाहून बरं वाटलं.
शेवटच्या ओळीवरुन(मार्केटच आपला उपभोग घेते ह्यावरून) भर्तृतहरीची एक ओळ आठवली.
भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
बाकीचे फुरसतीत.

अर्धवटराव's picture

23 Aug 2012 - 9:43 pm | अर्धवटराव

" जी मुक्त करते ति विद्या" असं काहिशी विद्येची व्याख्या आठवली. पण मुक्तपणाची धुंदी ओळखणे आणि पचवणे कठीण. मग उरतो हा असला गुंता.

फार मार्मीक लिहीलत हो ननी.

अर्धवटराव

आज सकाळीच, कॉलेज शिक्षणातून नेमकं काय मिळतं याविषयीच्या इतरत्र चर्चेत, एका अफलातून संघटनेची आणि त्यांच्या अनोख्या शिष्यवृत्ती-प्रकल्पाची माहिती मिळाली, ती इथल्या चर्चेशी अगदी सुसंगत आहे म्हणून देतो आहे.

अमेरिकेतील पीटर थील (Peter Thiel) या उद्योजकाने ही आगळीवेगळी शिष्यवृत्ती गेल्या वर्षी सुरू केली. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून २० वर्षांखालील २० तरूण निवडले जातात, आणि या तरुणांनी पुढील २ वर्षे कॉलेजमध्ये न जाता, शिष्यवृत्तीचे १००,००० डॉलर्स वापरून फक्त त्यांना आवडतं त्या विषयातील संशोधनावर लक्ष केंद्रित करायचं, त्यासाठी स्वावलंबनाखेरीज त्यांना मार्गदर्शन मिळतं ते यशस्वी आणि दृष्टे अशा शास्त्रज्ञांचं, उद्योजकांचं, आणि विचारवंतांचं. एखादी path-breaking कल्पना घेऊन, तिचं product मध्ये रुपांतर करून दाखवायचं, असा काहीसा हा प्रकल्प आहे. कॉलेजच्या वर्गांमधून शिकवलं जाणारं ठोकळेबाज शिक्षण न घेता खर्‍या जगात येणार्‍या अडचणींमधून कमीत कमी ठेचकाळत पण लवकरात लवकर स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि यशस्वी उद्योजक निर्माण करण्यासाठी ही योजना आहे.

या प्रकल्पातील मार्गदर्शकांविषयी माहिती इथे आहे:

ही शिष्यवृत्ती योजना आता दुसर्‍या वर्षात प्रवेश करते आहे. जगभरातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. Applications for the 2013 class are due by 11:59 PM, December 31, 2012. Applicants must have been born after December 31, 1992 to qualify.

आधिक माहिती इथे मिळेल.

" Rather than just studying, you’re doing." असं विद्यार्थ्यांना सांगणार्‍या Twenty Under Twenty योजनेत खालील प्रकारच्या संशोधनांना प्राधान्य मिळतं:

याच संस्थळावर Do Too Many Young People Go to College? हा वॉल स्ट्रीट जर्नलमधील लेख मिळाला. तो वाचतो आहे.

नगरीनिरंजन: विचार करायला लावणार्‍या लिखाणाची तुमची हातोटी कायम आहे, धन्यवाद!

सहज's picture

24 Aug 2012 - 6:46 am | सहज

>नगरीनिरंजन: विचार करायलाच लावणार्‍या लिखाणाची तुमची हातोटी कायम आहे, धन्यवाद!

ननि, हा डोस किंचीत जास्त स्ट्राँग आहे आम्हा ए.डी.डी. वाल्यांसाठी पण चांगला खुराक दिला. धन्यवाद. लोकशाहीत कसे दोन आघाडीवाल्या पक्षांनी तेच ते राजकारण केल्यावर काहीतरी तिसरा सक्षम पर्याय हवा किंवा या दोन आघाडीच्या पक्षांनी सुधारावे असे वाटते तश्याप्रमाणे तुम्ही वर उल्लेख केलेल्या यांत्रीक्/विनाशाकडे घेउन जाणार्‍या जीवनशैलीला नाकारायचे तर अजुन एक वेगळा पर्याय हवा असे अधुन मधून वाटते खरे.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 7:31 am | नगरीनिरंजन

धन्यवाद सहजराव.
डोस थोडा स्ट्राँग झाला आहे हे खरं आहे पण ते प्लेन, पोलिटिकली करेक्ट वगैरे लिहीणे जमत नसल्याचा परिणाम आहे तो.

अजून पर्याय हवेत यावर अनेकदा सहमत.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 6:50 am | नगरीनिरंजन

धन्यवाद बहुगुणीजी, तुम्ही दिलेली माहिती फार रोचक आहे त्यात जेनेटिक्स, AI आणि नॅनोटेक वगैरे आहे हे जास्तच रोचक आहे.

खरं तर अन्या दातारचा आख्खा प्रतिसादच थेट पाहिल्यानं आलेला असल्यानं जे जसं आहे, त्यावर बराच प्रकश टाकतोय. पैसातैंनी जंगलचं नवीनच गौडबंगाल संगितलय. लेखही एकूणात चांगलाच आहे. आणि त्या प्रतिसादांपुढे खरं तर लिहिण्याची गरजच पडू नये. पण्....रहावत नाही.
.
इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात,
छे हो. "इतरांची" भरभराट होताना चुकचुकणारी माणसे "अपयशाची" बळी असतात.
.
समृद्धी, शिक्षण वगैरे आल्यावर लोकसंख्या स्थिर होईल असे म्ह्णताना प्रगतीच्या गेल्या साठ वर्षांमध्येच लोकसंख्या दुपटीहून अधिक का वाढली हे कळत नाही
ती कर्व्ह वगैरे भानगड ठाउक नाही आपणास?
http://mr.upakram.org/node/1693 हे तुम्हाला माहित नसणं शक्यच नाही.
सिंगापूर, युरोप, अमेरिकेच्या उदाहरणावरून सगळे म्हणतात की लोकसंख्या स्थिरावणार.
(अमेरिकन जनसंख्या वाढते आहे, पण त्यात जननदर वृद्ध्ही काहीही नाही, अगदिच स्थिर. पण स्थलांतरित व स्थलांतरितांचय पिढ्यांमुळे ती वाढते आहे. अमेरनाही.मागील दोनेकशे वर्सहपासून स्थायिक लोकांमुळे नाही.)
.

आणि आदिमानवाची लोकसंख्या मात्र कोणत्याही समृद्धीविना पन्नास लाखाच्या आसपास कशी स्थिर राहिली हे कळत नाही१.
प्रचंड जननदर आणि प्रचंड मृत्युंचे प्रमाण. कधीकधी मृत्युचे प्रमाण अधिक होइ.(मध्ययुगात प्लेगच्या महासाथीने आख्ख्या युरोपातील एक तृतीयांश लोकसंख्या संपवली म्हणतात. हा आजवरचा ज्ञात जागतिक विक्रम आहे.) युद्धे, अपुरे अन्न, नैसर्गिक संकटात रेस्क्यू न झाल्याने मरणारे अगणित, आजारी, जखमींवरच्या उपचारांची अनुपलब्धता, ह्यामुळे कुणीही मरायला काहीही लागायचे नाही.(ह्या गोष्टींत एकाएकी घट होणे हे लोकसंख्या स्फोटाचे हे महत्वाचे कारण.)
आपल्या आजोबांच्या पिढीने परंपरागत अनुभवाने १०-१२ अपत्ये असावीत म्हणजे त्यातली निदान २-४ जगतील असा विचार केला. आधुनिक तंत्रज्ञानाने जन्मास आलेले जवळपास सगळेच जगले! लोकसंख्येचा स्फोट असा दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात जगभर झाला.(अगदि युरोप्-अमेरिकेत सुद्धा.पण तुलनेने कमी.)
.
.
मोठमोठ्या कंपन्यांची जगातल्या अगदी थोड्या लोकांच्या फायद्यासाठी काम करणारी ही बाजारू यंत्रणा प्रगतीचे ढोल इतक्या मोठ्या आवाजात वाजवत आहे की काय खरं आणि काय खोटं हे न बघताच माणसं त्या तालावर नाचू लागतात.
पहिला मुद्दा मिळाला ज्यावर सहमत. ह्याच्या वरती आअतापर्यंत जे काही लिहिलय ते काहीच समजलं नाही.
.

पण आपण खातो ते नक्की कुठून येतं त्याचं ज्ञान मिळत नाही.
हे पूर्वीही मिळायचं ह्याबद्दल साशंक आहे. उलट आज येणार्‍या जिन्नसांचे बारीक बारेक कंगोरेही पाहिले जातात.
फक्त काही कुतूहल असणार्‍यांनाच त्याचं ज्ञान होतं.(अन्न कसं उगवतं, बीजाच रोप कसं होतं वगैरे वगैरे.)
.

आपण खातो त्यात नक्की किती पेस्टिसाईड्स आहेत ते कळत नाही
.
म्हणजे? पूर्वी कळायचे?
.
आमच्या अन्नाचं बाजारीकरण होतानाही आम्ही पाहात राहतो.
पुन्हा सहमत. हल्ली अन्न "मॅन्युफॅक्चर" होतं कारखान्यात.
.
कोणत्याही दिशेने चालू लागण्याचे आमचे स्वातंत्र्य घालवून ठराविक मार्गाने जायचे नियम पैसे देऊन विकत घेतो
हे हायक्लास. प्रचंड आवडले.
.
कॅन्सरच्या नावाने गळे काढणारे आम्ही कारच्या नळीतून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन सायनाईडसारखे घातक कर्कजनक वायू मुकाट आमच्या फुप्फुसात भरून घेतो.
हे कैच्या कैच . मी कार घेतली नाही तरी इतरांनी घेतलेल्या करमुळे माझी बत्ता लागणारच आहे. मी कार घेतली म्हणजे काही तत्काळ माझे आयुष्य पाच्-धा वर्शानी कमी होणार नाही. घेतली नाही, म्हणून पाच्-दहा वर्षे हट्टीकट्टी , सुखाची मिळतील असेही नाही. मग का घेउ नये कार; हा सवाल रास्त आहे.
.
म्हणजे उपाशी लोकांची संख्या अमुक इतकी कमी करू असे न म्हणता फक्त "आम्ही उपाशी लोकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करू" असेच ध्येय ठरवले गेले.
धन्य ते युनो का कोण ते.
.

जेनेटिक्सच्या माध्यमातून कंपन्यांचा त्यावर नियंत्रण आणण्याचा कावा,
तुम्ही बराच विचार करुन एकेके वाक्य लिहिलेलं असतं. आम्ही त्या विचाराच्या प्रोसेसमध्ये नस्तो. अशा वाक्यांसाटेहे खरं तर अजून डिटेल्स दिले असते तर बरं झालं असत्ं.(थोडक्यात जेनेटिक्सच्या माध्यमातून काय ह्तोए आहे, हे सर्व वाचकांना ठाउक आहे असे सध्या आपण ग्रुहितच धरलेले दिसते.)
.
मरू घातलेले समुद्र
बाकी सर्व भयाण चित्र ठीक. पण माणसाला अजूनही समुद्राचा विचका, विनाश करता आलेला नाही. किनारपट्टीच्या आसपसची नास्धूस म्हणाल ती वेगळी. ती खूपच मर्यादित. पण जमिनीवरील हैदोस जो काही प्रगतीच्या नावानं घातला गेलाय्/जातोय, त्याच्या एक सहस्रांशही समुद्राला त्रास नाही.(आख्ख्या जमिनीवरील जीवसृष्टीची वाट लागते का काय दोनेकशे वर्षात अशी भीती कित्येकदा व्यकत होते. पण दूरवर, खोल समुद्रात माणूस काहीही झाट करु शकलेला नाही, ते चांगलेच आहे. "किनारपट्टीचा भाग" इतकाच समुद्र नसतो.)
.
, वाढती विषमता असं सगळं असूनही जणू काहीच प्रश्न नाही असा आव आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही मार्केट इकॉनॉमी करते.

विषमता वाढते आहे का नाही ठाउक नाही.(नाहीतर लागलिच काही "विदाशास्त्री" विदा माराय्चे फेकून अंगावर.) पण दिशाभूल मार्केट इकॉनॉमी काय अन् लोकशाही काय, खूपच अप्रतिम पद्धतीने करतात. म्हणजे होते काय, की तुम्हाला "पर्याय उप्लब्ध आहेत. हवे ते निवडणयचे स्वातंत्र्य आहे" असे सांगितले जाते. आणि त्या समजुतीतच जे हवय ते न घेता तुम्ही जे त्याला विकायचं आहे, तेवढच घेउन मोकळे होता, पुन्हा निवडीचा आणि स्वातंत्र्याचा अत्त्यानंद होतो ते वेगलाच.
.

अर्धवटराव's picture

24 Aug 2012 - 3:02 am | अर्धवटराव

समुद्रात आजघडीला प्लॅस्टीकचे आयलंड्स तयार होताहेत. एकुण समुद्राच्या साईझच्या मानाने ते नगण्य असेल पण मानवी आयुष्यावर परिणाम करायला पुरेसे आहेत.

अर्धवटराव

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 7:39 am | नगरीनिरंजन

गमतीदार प्रतिसाद आहे. कालचा दिवस कंटाळवाणा होता वाटतं :-)

छे हो. "इतरांची" भरभराट होताना चुकचुकणारी माणसे "अपयशाची" बळी असतात.

स्वतःची भरभराट होताना उपाशी लोकांकडे पाहून चुकचुकणारे कशाचे बळी असतात? नैराश्याचे की दुटप्पीपणाचे? की त्यालाच माणुसकी म्हणायचे पूर्वी?

ती कर्व्ह वगैरे भानगड ठाउक नाही आपणास?

निकटदृष्टीता. निकटदृष्टीता हा माणसाचा अहंकाराखालोखाल सर्वात मोठा दोष आहे. आदिमानव म्हणजे मला अश्मयुगातला माणूस अभिप्रेत होता. माझे आजोबाच काय खापरपणजोबाही आदिमानव नव्हते.
आणि खूप जननदर आणि खूप मृत्युदर असलेली लोकसंख्या स्थिर नसते.
प्लेग, मलेरिया वगैरे साथीचे रोग नागरीकरणापूर्वी नव्हते. ती आपल्या तेव्हाच्या प्रगतीची (म्हणजे भटके आयुष्य संपून शेती करायला लागलो या प्रगतीची) देणगी किंवा फळे आहेत.
ते कर्व्ह वगैरे सगळं ठीक आहे हो, पण भारत आणि चीन अमेरिकेइतके समृद्ध व्हायला आणि ती समृद्धी टिकवायला आपल्याला पाच पृथ्व्या लागतील त्याचं काय?
वंदना शिवा या पर्यावरणवादी भैतिकशास्त्रज्ञाच्या मते लोकसंख्या भरमसाठ वाढण्याचे कारण आहे विस्थापन (Dislocation),लुबाडणूक (Dispossession) आणि स्त्री-पुरुष विषमता (Inequality to women). या तिन्ही गोष्टी तथाकथित मानवी संस्कृतीची देणगी आहे.
आदिमानवाची लोकसंख्या पन्नास लाख होती आणि त्यात ०.०१% ते ०.००५% वाढ होत होती असे त्या पुस्तकात नमूद केलेले आहे. अर्थातच ते आपण नाकारू शकतो.

हे पूर्वीही मिळायचं ह्याबद्दल साशंक आहे

का कोण जाणे, पण निसर्गाच्या जवळ राहणार्‍या माणसाचा मेंदू आपल्यापेक्षा अप्रगतच असणार अशी एक समजूत आपल्या सुशिक्षित मग्रूर मेंदूत ठाम असते. गेल्या तीनशे वर्षांतच (किंवा दहाहजार म्हणा) मेंदू उत्क्रांत होऊन माणसं एकदम बुद्धिमान झाली आणि त्याआधी एकदम मठ्ठ होती असं काहीसं आपल्याला वाटत असतं. आपल्या मुलांना आसपासच्या (असली तर) झाडांपैकी दहा वेगवेगळ्या झाडांची माहिती नसेल पण निसर्गाच्या जवळ राहणार्‍या माणसाला आश्चर्य वाटेल इतक्या गोष्टी माहिती असतात. तो स्वतःच्या हाताने झाडावरून तोडून, मारून किंवा पकडून अन्न मिळवतो.

म्हणजे? पूर्वी कळायचे?

पूर्वी केमिकल पेस्टिसाईड्स नव्हती आणि कॅन्सरही नव्हता.

अशा वाक्यांसाटेहे खरं तर अजून डिटेल्स दिले असते तर बरं झालं असत्ं

विस्तारभयास्तव दिले नाहीत. त्यावर वेगळा लेख होऊ शकेल.

पण दूरवर, खोल समुद्रात माणूस काहीही झाट करु शकलेला नाही

स्टेट ऑफ ओशियन अहवाल.

अर्थात्, किती वर्षांपूर्वी म्हणजे 'पूर्वी' हे सापेक्ष आहे, पण जवळजवळ तीन हजार वर्षांपासून कर्करोगाच्या उपस्थितीची नोंद आहे. तेंव्हा पेस्टिसाईड्स नसले तरी इतर (जेनेटिक आणि पर्यावरणीय) कारणे होतीच.

अवान्तर :

MATRIX चित्रपटात एजंट स्मिथ हा यंत्रांचा प्रतिनिधी ‘नियो’ या महामानवाला हा डायलॉग बोलतो.

"जितका वेळ मी इथे घालवलाय त्यात एक गोष्ट मला उघड झालीय आणि ती तुला सांगायला मला नक्कीच आवडेल.तुमच्या प्रजातीचे वर्गीकरण करतांना मला ती जाणवली. तुम्ही माणसं म्हणजे फक्त सस्तन प्राणी नाही. या ग्रहावरचा प्रत्येक सस्तन प्राणी त्याच्या आंतरिक प्रेरणेने आजुबाजूच्या पर्यावरणाशी नैसर्गिक संतुलन विकसित करतो. तुम्ही माणसं तसं करत नाही, तुम्ही एका क्षेत्रात पसरता, तिथे वाढता आणि वाढतच जाता. जोपर्यंत तेथील प्रत्येक नैसर्गिक संसाधन संपत नाही तोपर्यंत फक्त वाढता. शेवट दिसू लागला कि अस्तित्व टिकवण्यासाठी तुमच्याकडे एकच मार्ग उरतो. दुसर्या ठिकाणी पसरणे. अश्या प्रकारे वाढणारा या ग्रहावर आणखी एक जीव आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी तो हाच पॅटर्ण वापरतो. माहित आहे तो जीव कुठलाय ? विषाणू. तुम्ही माणसं विषाणूंसारखी आहात. एक महामारी. या ग्रहाला झालेला एक कर्करोग.एक प्लेग. आम्ही त्यावर उपाय आहोत. "

पहिल्यांदा ऐकला तेव्हापासून मेंदूत तसाच्या तसा कोरलेला आहे.

आनंदी गोपाळ's picture

23 Aug 2012 - 11:03 pm | आनंदी गोपाळ

लुक हू इज टॉकिंग!
हारून भौ,
त्ये यंत्र हैत का नै, त्ये त्या क्यान्सर, प्ल्येग म्हामारी माण्सानी बनविल्यात. जरा ज्यास्त अक्कल आल्यागत डायरेक्टरानी शिकव्लं आन राय्टर नी लिव्लं तस्लं बोल्तंय त्ये.

"या ग्रहावरचा प्रत्येक सस्तन प्राणी त्याच्या आंतरिक प्रेरणेने आजुबाजूच्या पर्यावरणाशी नैसर्गिक संतुलन विकसित करतो." ह्ये चुकीचं हाय.

सस्तन, अंडज, जे काय असेल ते करणारा सजीव, नेहेमीच आजूबाजूचे पर्यावरण स्वतःसाठी बदलतो. मगर अंडी घालायला खड्डा खणते. existing खड्डा शोधत नाही. अन मिळाला, तर तो बुजवावा लागतो. it takes advantage of the milleu. and tries to change it to its advantage.

बेसिक मधे राडा केला की पुढची वाक्यं लै भारी वाटायला लागतात.
think a bit further. how do the machines run? on fuel. what fuel? (imagine i am machine and food is my fuel)
keep thinking...
what will the machines do when fuel runs out.
when number of machines grows beyond the amount of fuel available in that area?
plague?
virus?
are u really happy degrading urself like that? =))

मगर अंडी घालायला खड्डा खणते... घरटं बनवत नाहि कि नर्सींग होम मध्ये जात नाहि. निसर्गाने आखुन दिलेल्या मर्यादेत आणि आज्ञावलीप्रमाणे काम चालते. माणसाचा मुख्य प्रोब्लेम (आणि सोल्युशन देखील) त्याची अमर्याद कल्पनाशक्तीच आहे. मॅट्रीक्स्च्या मशीन्स भलेही माणसावर राज्य करणार नाहित... पण "सुखाने" जगण्याकरता लागणार्‍या मागण्यांचा परीघ अवास्तव वाढत चाललाय हे नक्की. आणि या परिघात माणसाला फार स्थान नसुन यंत्रांना आहे हे ही सत्य.

अर्धवटराव

आनंदी गोपाळ's picture

24 Aug 2012 - 2:03 pm | आनंदी गोपाळ

मगर अंडी घालायला खड्डा खणते... घरटं बनवत नाहि कि नर्सींग होम मध्ये जात नाहि.

खड्डा खणणे हे मगरीच्या मेंदूच्या उत्क्रांती 'लेव्हलचे' नर्सिंग होम बांधण्यासारखेच नव्हे काय?

अर्धवटराव's picture

24 Aug 2012 - 9:41 pm | अर्धवटराव

आणि मगर त्या उत्क्रांती लेव्हलशी प्रामाणीक राहाते... हा मुख्य फरक.

अर्धवटराव

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 6:58 am | नगरीनिरंजन

(imagine i am machine and food is my fuel)

are u really happy degrading urself like that? =))

असो.

प्रत्येक सजीवाचा आपल्या भवतालावर परिणाम होतो. त्याला त्याचा फेनोटाईप म्हणतात. सगळ्या सजीवांचा फेनोटाईप खूप वारंवार बदलत नाही. निसर्गात पर्यावरण आणि सजीवांची वागणूक एकमेकांशी जोडलेली असते.
मगर अंडी घालायला खड्डा खणते हे खरं असलं तरी तसं तिच्या भवतालाशी असलेल्या संबंधातून निर्माण झालेलं आहे. मगर कधी असं करत नाही की चला यावर्षीचा खड्डा झाला खणून तर पुढच्या दोन-चार वर्षांचेही खड्डे खणून ठेवावे किंवा माझा झालाय खणून तर इतरांना खड्डे खणून देऊन त्यातून पैसे कमवावे.
माणसाचा फेनोटाईपही लाखो वर्षे ठरलेला होता, पण गेल्या दहाहजार वर्षात नागरीकरणानंतर तो बदलत गेला.

आनंदी गोपाळ's picture

24 Aug 2012 - 2:13 pm | आनंदी गोपाळ

प्रत्येक सजीवाचा आपल्या भवतालावर परिणाम होतो. त्याला त्याचा फेनोटाईप म्हणतात.

आपले आकलन चुकले आहे.

A phenotype (from Greek phainein, 'to show' + typos, 'type') is the composite of an organism's observable characteristics or traits: such as its morphology, development, biochemical or physiological properties, phenology, behavior, and products of behavior (such as a bird's nest). Phenotypes result from the expression of an organism's genes as well as the influence of environmental factors and the interactions between the two.

हे विकीवरून तुम्हीच दिलेल्या लिंकेतील प्रथम परिच्छेद पेस्टले आहे.
किमान आपण जो शब्द वापरला, त्याचा अर्थ नीट पाहिला असतात तर मला अधिक बरे वाटले असते.
जिनोटाईप म्हणजे जे जीन्स मधे लिहिले ते. अन फिनोटाईप म्हणजे जे शरीरात दिसते ते. फिनोटाईप मोस्टली जीन्सच्या कमांड्सचे 'एक्स्प्रेशन' असले तरी त्यावर "वातावरणा"चाही(आजूबाजूची परिस्थिती. फक्त हवापाणी नव्हे.) परिणाम असतो.
उदा, लांब चोचीच्या एका हमिंगबर्ड मधे अमुक प्रकारची चोच तयार होण्यामागे विशिष्ट फुलाचाच मध उपलब्ध असणे हे एक कारण जेनेटिक कोड सोबत असते. या मुळे चोचीचा आकार बदलत जातो, त्यासोबत नवी प्रजाती विकसित होते. या दृष्य बदलांसहित जे शरीर्/प्रजाती बनली तो फिनोटाईप.

दहा हजार वर्षांत कोणता फिनोटाईप बदलेला दिसून आला? तितकी वर्षे हा नागरिकरणाचा कालावधी आहे काय? दहा हजार वर्षांपूर्वीच्या नागरी संस्कृती कोणत्या? अधिक जाणुन घ्यायला आवडेल.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 2:32 pm | नगरीनिरंजन

products of behavior हा शब्द चुकून वाचायचा राहिला वाटतं तुमचा (पक्ष्यांची घरटी, बिव्हर्सचे पूल हे सगळे फेनोटाईप आहेत). :-)
दहा हजार वर्षांपूर्वी कोणत्याही नागरी संस्कृती नव्हत्या हेच मला सांगायचे आहे. दहाहजार वर्षांपूर्वी कमीत कमी एक लाख वर्षे माणूस कोणत्याही नागरी संस्कृतीविना राहिला आणि मग सामूहिक शेतीचा आणि पाठोपाठ नागरी संस्कृतीचा उदय झाला.
हे वाचून बघा.

(imagine i am machine and food is my fuel)

are u really happy degrading urself like that? =))

Quotes ची अशी मोडतोड करून तुमच्या लेखातूनही अभ्यासू ऐवजी विनोदी रचना तयार करता येतील.
तुमच्या अभ्यासू लेखानंतर अशी अपेक्षा नव्हती.

अवांतर :

अन्न हे खरेच आपले इंधन आहे, अन शरीररूपी मशीन कसे काम करते, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आधुनिक वैद्यक आजही करतेच आहे. बरेच स्पेअर्स बदलता येऊ लागले आहेत. डोळ्यात लेन्स, कृत्रीम गुडघे, हृदयाच्या झडपा, करोनरी आर्टरीज चे स्टेंट्स.. भवताली अनेक अंशतः सायबोर्ग बनलेली माणसे आजही दिसू लागली आहेत.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 3:00 pm | नगरीनिरंजन

ही मोडतोड नाही.
माणसाला स्वतःमध्ये आणि मशिन मध्ये अ‍ॅनॉलॉजी करायला काहीच वाटत नाही पण स्वतःमध्ये आणि जनावरात अ‍ॅनॉलॉजी करायला लाज वाटते कारण माणूस जनावरांना कमी दर्जाचे समजतो पण यंत्रांना स्वत:पेक्षा सुपिरिअर ठरवतो हेच तुम्ही सिद्ध केलंत.
अवांतराबद्दलः तसं पाहिलं तर सगळेच सजीव म्हणजे जैविक यंत्रंच आहेत असं म्हणता येईल. प्रश्न तो नाही आहे.
प्रश्न हा आहे की माणसाचं माणूसपण संपवून नक्की काय जपायचं आहे? माणसासारखं सगळं काम करणारा एखादा यंत्रमानव असेल तर त्याला तुम्ही माणूस म्हणणार का? उद्या माझ्या शरीराच्या जागी सगळं बायॉनिक असेल तर फक्त मेंदूतले विचार माझे आहेत म्हणून मीच तो? Hans Moravec ने भाकित केलंय तसा तुमच्या ऐवजी तुमचा एखादा Upload असेल तर तो म्हणजे तुम्हीच का?

मन१'s picture

24 Aug 2012 - 3:55 pm | मन१

"मी विचार करतो म्हणून मी आहे" असं कुठल्या तरी तत्वाज्ञानं म्हणूनच ठेवलय.
ह्याचाच व्यत्यास "जो विचार करतोय, तोच मी आहे" असा का असू नये?

नगरीनिरंजन's picture

5 Sep 2012 - 8:26 am | नगरीनिरंजन

हा लेख कदाचित रोचक वाटेल.
मी म्हणजे कोण, उपयुक्त ज्ञान म्हणजे काय हे अजून नक्की कळले नसताना असले उद्योग करणे मलातरी चुकीचे वाटते.

आनंदी गोपाळ's picture

24 Aug 2012 - 8:33 pm | आनंदी गोपाळ

Behaviour is a verrrrrrrrrry small part of what is called phenotype. असो.

फिनोटाईप या शब्दाबद्दल आपण जरा नीट माहिती घेतलीत तर मला आनंद होईल. आपण किमान या एका विषयाबाबत अर्धवट माहिती घेऊन बोलत आहात हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.
एका पातळीवर आलो, की पुढील चर्चा करूच..

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2012 - 9:47 pm | नगरीनिरंजन

ओके. कोणत्याही विषयाची मला पूर्ण माहिती आहे असा माझा दावा नाहीच आहे. त्यामुळे तुमचे म्हणणे मान्य आहे. ़जीवशास्त्र किंवा जेनेटिक्सशी माझा संबंध फक्त अवांतर वाचनातूनच थोडासा आला आहे. तुम्ही त्यावर खुलासेवार लिहीले तर वाचायला आवडेल. अर्थात तरीही तुमच्या पातळीला येणे मला शक्य नाही याची मला नम्र जाणीव आहे.

मिपावरच्या उत्तम लेखांपैकी एक,
बाकी मन आणि आत्मा वगैरे काय ते कधीच गुंडाळुन ठेवलं आहे, त्यामुळं बाकी विचार करायची गरज वाटत नाही, उद्यापासुनचा विकांत जरा हुळहुळत जाणार हे नक्की.

सस्नेह's picture

24 Aug 2012 - 1:22 pm | सस्नेह

हो, नसेना का आमच्याकडे पौष्टिक भाकरी अन सत्त्वयुक्त भाजी ? टीव्ही, मोबाईल अन संगणक तर आहेत ना ?
नसेना नैतिकता अन धार्मिकता ?, तरी आम्ही चंद्रावर अन मंगळावर जात आहोत ना ?
नसेल आमचे जीवन शांत, निवांत अन तृप्त ? आम्ही दर वर्षी जातो ना एखाद्या तरी पॅकेज टूरला ?
आमच्यासमोर खून झाला, बाँब उडाला तर आम्ही रोखू शकत नसू, पण त्याचे व्हीडीओ शुटींग तर करतो ना ?
प्रदूषण, बाजारीकरण, गुणवत्तेचा अभाव, नैतिकतेचा अभाव, नैसर्गिक साधन-संपत्तीचा ऱ्हास हे सगळं आहे हो आमच्याकडे. पण महागडी कार, अद्ययावत बंगला, इंटरनेट हेपण आहे ना ! मग दु:ख कसलं ?
चालू दे वाचतोय आम्ही....
अवांतर : या सगळ्यासाठी सहाव्या संज्ञेची गरज नाही हो ननिभाऊ, पाचच पुरेत !

हो, नसेना का आमच्याकडे पौष्टिक भाकरी अन सत्त्वयुक्त भाजी ? टीव्ही, मोबाईल अन संगणक तर आहेत ना ?
नसेना नैतिकता अन धार्मिकता ?, तरी आम्ही चंद्रावर अन मंगळावर जात आहोत ना ?
नसेल आमचे जीवन शांत, निवांत अन तृप्त ? आम्ही दर वर्षी जातो ना एखाद्या तरी पॅकेज टूरला ?
आमच्यासमोर खून झाला, बाँब उडाला तर आम्ही रोखू शकत नसू, पण त्याचे व्हीडीओ शुटींग तर करतो ना ?

असे अनेक प्रतिसाद कडवट-उपरोधिक आहेत.

प्रत्येक मुद्द्याचा नीट विचार करता येईल. ननिलाही तेच अपेक्षित असेल. नुसती मचूळ चूळ थुंकून टाकणार्‍यांपैकी तो नाही याची खात्री आहे.

उदाहरणार्थ म्हणून मला पडलेल्या अनेकांपैकी एक पहिला प्रश्न विचारायचा आहे.

शांत निवांत अन तृप्त जीवन म्हणजे तुमच्या मनानुसार काय आहे?

५० फक्त's picture

24 Aug 2012 - 5:46 pm | ५० फक्त

शांत निवांत अन तृप्त जीवन म्हणजे तुमच्या मनानुसार काय आहे? - या प्रश्नावरुन इथलाच एक प्राडॉ. नी विचारलेला प्रश्न आठवला , - मग सचिनने कुठपर्यंत खेळावं असं तुमचं मत आहे ? -

शांत निवांत अन तृप्त जीवन म्हणजे तुमच्या मनानुसार काय आहे?
हे हे हे. यावरून एक ओळखीची फ्यामिली आठवली. मी आणि माझा नवरा विकांतला आमच्याच घरात निवांत तासभर गप्पा मारत असलेले पाहून त्यांनी " अहो, अहो नुसते बोलत काय बसलायत, उठा, विकांतला कुठे फिरायला जाणार नाही का?" असे विचारल्याचे आठवते. असो. ;)

फार पूर्वी वाचलेली आणि जपून ठेवलेली इंग्लिश कथा जशीच्या तशी देतोयः

An investment banker stood at the pier of a small coastal Mexican village when a small boat with just one fisherman docked. Inside the small boat were several large yellowfin tuna. The banker complimented the fisherman on the quality of his fish and asked how long it took to catch them.

The fisherman replied, “Only a little while.”

The banker then asked why didn’t he stay out longer and catch more fish?

The fisherman said he had enough to support his family’s immediate needs.

The banker then asked, “But what do you do with the rest of your time?”

The fisherman said, “I sleep late, fish a little, play with my children, take siestas with my wife, stroll into the village each evening where I sip wine, and play guitar with my amigos. I have a full and busy life.”

The investor scoffed, “I am an Ivy League MBA and could help you. You should spend more time fishing and with the proceeds, buy a bigger boat. With the proceeds from the bigger boat, you could buy several boats, and eventually you would have a fleet of fishing boats.
“The investor continued, “And instead of selling your catch to a middleman you would then sell directly to the processor, eventually opening your own cannery. You would control the product, processing, and distribution! You would need to leave this small coastal fishing village and move to Mexico City, then Los Angeles and eventually New York City, where you will run your expanding enterprise.”

The fisherman asked, “But how long will this all take?”

To which the banker replied, “Perhaps 15 to 20 years.”

“But what then?” asked the fisherman.

The banker laughed and said, “That’s the best part. When the time is right you would announce an IPO and sell your company stock to the public and become very rich. You would make millions!”

“Millions. Okay, then what?” wondered the fisherman.

To which the investment banker replied, “Then you would retire. You could move to a small coastal fishing village where you would sleep late, fish a little, play with your kids, take siestas with your wife, and stroll to the village in the evenings where you could sip wine and play your guitar with your amigos.”

"Oh, what do you think I am doing now, then?", asked the fisherman.

कडवटपणा ? छे.
उपरोध जरूर आहे पण कडवटपणा नाही. ही काही माझी वैयक्तिक समस्या नव्हे. सामाजिक आहे.
|>> शांत निवांत अन तृप्त जीवन म्हणजे तुमच्या मनानुसार काय आहे?<<
वेल, ते सांगायचं तर एक स्वतंत्र धागाच लिहावा लागेल. पण काही हायलाईटस देते.
१. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाचा अनुभव निवांत अन सविस्तर घ्यायला मिळणे. घाई गडबड न करता.
२. काम करण्याचे स्वातंत्र्य.
३. आरोग्यविषयक आवश्यक गोष्टीना पुरेसा वेळ.
४. कुटुंब व परिवारासाठी पुरेसा वेळ
५. सामाजिक सहभागासाठी वेळ
६. व्यक्तिगत परस्पर-सन्मान
हे सर्व आज ज्यामध्ये मिळते ते जीवन माझ्या दृष्टीने शांत निवांत अन तृप्त म्हणायला हरकत नसावी.

अर्धवटराव's picture

24 Aug 2012 - 9:59 pm | अर्धवटराव

आपण वैज्ञानीक प्रगती केली, जीवन सुरक्षीत करायला साधनं जमवली, आणि सगळ्या सेन्सेस ला अगणीत खाद्य पुरवायला अनेक संस्था निर्माण केल्या. व्हॉल्युम आणि गुंतागुंत जेव्हढा अधीक, सिंहावलोकन तेव्हढेच कठीण. आणि सर्वात मोठा प्रोब्लेम म्हणजे कंपॅरीजन करायला कोणिच नाहि. मानवाने मानवासाठी निवडलेल्या जीवनशैलिला इतर कुठल्या प्राण्याशी कंपेअर करता येत नसल्यामुळे आपल्या सुख-दु:खाचे परिमाणं आपल्याच भूतकाळात शोधण्या पलिकडे काहिच करता येत नाहि. आपणच निर्माण केलेली हि जगद्व्याळ सिस्टीम भस्मासुर बनुन आपल्यालाच खाणार कि काय हि भिती रास्त आहे... कारण तशी उदाहरणे/अनुभव यायला लागलेत. आपण भूतकाळातुन अपरिहार्यपणे वर्तमानात आलो आहोत, आणि तसच भविष्याकडेही जाऊ... पुढील प्रवासात डोळे/कान उघडे ठेऊन जाताना आपणच निर्माण केलेल्या सिस्टीम्स आपल्याला मदत करतील हीच काय ती जमेची बाजु.

अर्धवटराव

अन्या दातार's picture

24 Aug 2012 - 10:08 pm | अन्या दातार

आपण वैज्ञानीक प्रगती केली, जीवन सुरक्षीत करायला साधनं जमवली, आणि सगळ्या सेन्सेस ला अगणीत खाद्य पुरवायला अनेक संस्था निर्माण केल्या. व्हॉल्युम आणि गुंतागुंत जेव्हढा अधीक, सिंहावलोकन तेव्हढेच कठीण. आणि सर्वात मोठा प्रोब्लेम म्हणजे कंपॅरीजन करायला कोणिच नाहि. मानवाने मानवासाठी निवडलेल्या जीवनशैलिला इतर कुठल्या प्राण्याशी कंपेअर करता येत नसल्यामुळे आपल्या सुख-दु:खाचे परिमाणं आपल्याच भूतकाळात शोधण्या पलिकडे काहिच करता येत नाहि

सहमत

आपणच निर्माण केलेली हि जगद्व्याळ सिस्टीम भस्मासुर बनुन आपल्यालाच खाणार कि काय हि भिती रास्त आहे... कारण तशी उदाहरणे/अनुभव यायला लागलेत.

कोणते बरे अनुभव??

पुढील प्रवासात डोळे/कान उघडे ठेऊन जाताना आपणच निर्माण केलेल्या सिस्टीम्स आपल्याला मदत करतील हीच काय ती जमेची बाजु.

असहमत. एका बाजूला ही सिस्टीम भस्मासूर बनायचीही शक्यता बोलून दाखवताना दुसरीकडे त्याचाच आधार कसा काय वाटतो तुम्हाला?
ननिंचा मुद्दा (माझ्या आकलनाप्रमाणे) असा आहे की अनेक सिस्टीम्स गरज नसताना निर्माण केल्या आहेत. बर, नुसत्या निर्माण करुन थांबलो नाही तर समाजाच्या (भौगोलिक, आर्थिक) घटकांना त्याचा एक हिस्सा बनवत सुटलो आहोत.

अर्धवटराव's picture

24 Aug 2012 - 10:26 pm | अर्धवटराव

>>कोणते बरे अनुभव??
-- ननी म्हणतात तसे अफाट मार्केटींगच्या जमान्यात माणसाची किंमत एखाद्या कारखान्यातल्या उत्पादनापेक्षा कमी होणे, मार्केट कॅप्चर करायला नैतीकता, सामाजीक सलोखा वगैरे भानगडींचा बळी देणे, शत्रुभाव नसुन सुद्धा केवळ नैसर्गीक संसाधन प्राप्ती करता युद्ध करणे, आपले उत्पादन गरज भागवायला असण्यापेक्षा उत्पादनाला विक्री मिळावी म्हणुन गरज निर्माण करणे... हे सगळे अनुभव...

>>एका बाजूला ही सिस्टीम भस्मासूर बनायचीही शक्यता बोलून दाखवताना दुसरीकडे त्याचाच आधार कसा काय वाटतो तुम्हाला?
-- आधार सिस्टीमचा नाहि, तर सिस्टीम वापरत असलेल्या आयुधांचा आहे. जंगल, जमीन, पाणि, इत्यादींचा र्‍हास थांबवायचा असेल तर विज्ञानाने दिलेले साधनच उपयोगी पडतील. नाहितर हतबल होऊन उसासे टाकत मरण्यापलिकडे काहिच करता येणार नाहि.

>>ननिंचा मुद्दा (माझ्या आकलनाप्रमाणे) असा आहे की अनेक सिस्टीम्स गरज नसताना निर्माण केल्या आहेत. बर, नुसत्या निर्माण करुन थांबलो नाही तर समाजाच्या (भौगोलिक, आर्थिक) घटकांना त्याचा एक हिस्सा बनवत सुटलो आहोत.
-- बरचसं बरोबर. अगदी नेमकं सांगयचं तर अनेक सिस्टीम्स आपल्या अ‍ॅक्च्युअल टार्गेट कस्ट्मरला सोडुन मास बेसीस वर फैलावण्याचा प्रयत्न होतोय... अगदी साधं उदाहरण म्हणजे पाण्याच्या बाटल्या. वी आर फेलींग टु प्रायोरटाइज द सिस्टीम अप्लिकेशन्स.

अर्धवटराव

नगरीनिरंजन's picture

27 Aug 2012 - 2:39 pm | नगरीनिरंजन

जंगल, जमीन, पाणि, इत्यादींचा र्‍हास थांबवायचा असेल तर विज्ञानाने दिलेले साधनच उपयोगी पडतील.
वी आर फेलींग टु प्रायोरटाइज द सिस्टीम अप्लिकेशन्स.

अगदी सहमत.
विज्ञान (Science) म्हणजे तंत्रज्ञान (Technology) नव्हे हे लक्षात ठेवून योग्य त्या घटकांना प्राधान्य देणे हाच यावर उपाय आहे.
या दृष्टीने बरेचसे विचार पुढे येऊ लागले आहेत. जोसेफ स्टिगलिट्झसारख्या नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञांनी Efficient, free and perfect Markets हा एक आभासच आहे हे सिद्ध करून विषमतेविरुद्ध सध्याच्या अर्थ-राजकीय व्यवस्थेवर बरीच टीका केली आहे आणि उपायही सुचवले आहेत (काय उपाय सुचवले आहेत ते अजून वाचले नाहीयेत मी.)
मुख्य म्हणजे जीडीपीसारख्या प्रगतीच्या निर्देशांकाची व्याख्या बदलण्याबाबत प्रयत्न चालू आहेत आणि प्रगती मोजताना सामाजिक आणि पर्यावरणीय लाभ/हानी कशाप्रकारे मोजता येईल त्यासाठी स्टिगलिट्झ आणि अमर्त्य सेन यांची एक समिती काम करत आहे.

मन१'s picture

30 Aug 2012 - 12:55 am | मन१

अवांतर टिप्पण्या....
अर्थतज्ज्ञांनी Efficient, free and perfect Markets हा एक आभासच आहे हे सिद्ध करून विषमतेविरुद्ध सध्याच्या अर्थ-राजकीय व्यवस्थेवर बरीच टीका केली आहे आणि उपायही सुचवले आहेत
खुस्श्शाल काहीच न वाचता, काहीही अभ्यास नसतानाही आमची आपली एक मताची पिंक टाकतोय :-
एका समस्येवरील उपाय हे नवीन समस्येची उभारणी करतात.
.
.
मुख्य म्हणजे जीडीपीसारख्या प्रगतीच्या निर्देशांकाची व्याख्या बदलण्याबाबत प्रयत्न चालू आहेत आणि प्रगती मोजताना सामाजिक आणि पर्यावरणीय लाभ/हानी कशाप्रकारे मोजता येईल
हे म्हणजे भूतानच्या ग्रॉस हॅपिनेस प्रॉडक्ट सारखं झालं. फक्त तिथे विकासाला/राहणीमानाच्या मोजमापाला मानवीय चेहरा द्यायचा प्रयत्न आहे; इथे पर्यावरणीय चेहरा द्यायचा प्रयत्न दिसतोय.
.
उंटावरचा शहाणा

मन१'s picture

13 Sep 2012 - 4:40 pm | मन१

आताच थोडिशी उसंत मिळाली प्रतिसाद देण्याइतकी.
ननिंचा लेख वाचणे म्हणजे खरे तर स्वतःला विनकारण त्रास करुन घेणे आहे. पण तरीही राहवत नाही, आणि वाचणं होतच.
ह्या लेखाच्या "टोन" च्या प्रत्युत्तरात एकदम काही क्षण माझीही प्रतिक्रिया "इतका त्रास आहे तर जंगलात जाउन रहा की खुश्शाल" अशीच होती. खरच ते शक्य आहे का?
नाही. ते अशक्य आहे.
मग जे मर्यादित, पुनर्वापर होउ न शकणार्‍या स्त्रोतांचा अनिर्बंध उपभोग घेणे, उपसा करणे चाललय ते तसेच चालू द्यावे का? शिवाय ह्या अतिप्रगतीमनानैसर्गिक जीवनशैलीवर जे परिणाम होताहेत त्याचे काय?
.
थेट जंगलात राहणे हे एक टोक. सगळे जग आजच्या प्रगत देशांसारखे करुन आख्ख्या पृथ्वीतील संसाधनांचा काही दशकातच चुथडा करणे, प्रगतीच्या नावाखाली , हे दुसरे टोक. मधे काहीच नाही का? टोकच गाठायला हवीत का?
.
महात्मा गांधी, विनोबा ह्यांच्याकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला जाणारा मुद्दा म्हणजे स्वसंयमन, स्वनियंत्रण, कमी गरजा, गरजातील साधेपणा, भपका नसलेली जीवनशैली. थोडक्यात ग्रामीण्/नागर पारंपरिक भारतीय जीवनशैलीतील अस्पृश्यता, अंधश्रद्धा, सतीप्रथा अशा वाईट गोष्टी काढल्यावर जे काही निव्वळ शांतरसपरिपोषक शिल्लक राहते ते.
.
तुमच्या घराला लागणार्‍या वस्तू पाच मैलाच्या परिसरातून जमवाव्यात. साधेपणाने त्यत रहावे असे गांधीजींचे तत्वज्ञान. त्यात चूक असे काय आहे.. आजही प्रचंड वर्षा असलेल्या आसामातील भागात पारंपरिक राहणी वगैरे पाहिली, धान्ये साठवण्याची पद्धती पाहिली, त्यांची निसर्गाला हानी न पोचवता(सिमेंटचा फारसा वापर न करता) पावसापासून रक्षण करण्याची पद्धत पाहिली आणि जर त्यांनी केलेली पावसाशी दोस्तीही पाहिली तर मी काय म्हणतोय ते लक्षात येइल.
प्रत्येक प्रकारच्या हवामानात, "हॅबिटॅट" मध्येच तिथे कसे रहावे ह्या गोष्टी निसर्गतः उप्लब्ध असतात.
सर्वच ठिकाणी टिकेल, भक्कम राहिल असे काहीतरी आपण शोधतो, नि त्यातून नव्या समस्या उभ्या राहतात.(उदा:- अतिवापर होउ लागलेले प्लास्टिक. )
Earth has enough for everyone's need but not enough for everyone's greed. असं काहीतरी ते म्हणत.
.
दोन जोडी कापडानं काम होतय ना, मग तेवढ्यातच चालवूयात की; असा विचार प्रत्यक्षात करनारे शेकडो अनुयायी त्यांना मिळाले होते.
.
आता हे सर्व ऐकायला नक्कीच छान वाटतं, पण एकच छोटिशी (नेहमीची ) अडचण काय आणि किती "पुरेसं" ठरावं?
कुणी ठरवावं?
अर्थातच, ज्यानं त्यानं स्वतःवर बंधन घातलं, जगातील लोकसंख्येपैकी जर मोठा समूह जीवनशैली बदलत हा आख्खा paradigm shift आणू पाहिल, तरच काही होइल.
.
अर्थात हा विचारही "नागर संस्कृतीचा" पुरस्कार करणाराच आहे; पण निसर्गाच्या थोडा अधिक जवळ जाणारा तरी आहे निदान.

अर्धवटराव's picture

13 Sep 2012 - 8:59 pm | अर्धवटराव

या सर्व त्रासाचे मुख्य कारण म्हणजे मानवाने अंगीकारलेले लिनीयर डेव्हलेपमेण्ट मॉडेल. एका बिंदु पासुन साधन सामुग्रीचा पुरवठा सुरु होतो, मध्ये त्याचा उपभोग/उपयोग होतो, दुसर्‍या बिंदुला स्वाहा. हे दोन बिंदु जोडणे, अगदी प्रत्येक प्रोसेस मध्ये, हाच त्यावर शाश्वत उपाय. हा बिंदु जोड होत पर्यंत सामुग्री मधल्यामध्ये गरगरत ठेवायची, तिचे विघटन करायचे, या विघटकांचा प्राथमीकतेने वापर करायचा व शेवटी जे उरते ते निसर्गात सहज सामावले जाण्यायोगे बनवायचे.

गरजा ठेवणे , स्वावलंबन वगैरे गोष्टी आचरणात आणण्याजोग्या करायच्या असतील तर स्पायरल मॉडेलला पर्याय नाहि... अन्यथा ति एक दडपशाही बनुन राहिल बस्स.

अर्धवटराव