सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
12 Aug 2008 - 11:34 am | विदुषक
अभिनन्दन !!
नक्कि कोणत्या विषयावर आहे ?
मजेदार विदुषक
12 Aug 2008 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे हो, ते सांगायचंच राहिलं! 'करीयर इन ऍस्ट्रॉनॉमी' या विषयावर. आणि ही मुलाखत "बोली शहरी", मराठीत आहे.
12 Aug 2008 - 7:01 pm | मुक्तसुनीत
यमूताई,
नक्की रेकॉर्डिंग करून अपलोड कर. आम्हाला इथे पहाता येईल.
13 Aug 2008 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद! तुम्ही सर्वांनी मला खूपच प्रोत्साहन दिलंत. पन लफ्रा जाला!
काल झी ची पुण्यातून मुंबईमधली लिंक फारच नॉयजी होती, त्यामुळे माझी रेकॉर्डेड मुलाखत ऐन वेळी मुंबईला जाईपर्यंत फारच नॉईजी झाली. म्हणून एवढं करूनही तुमची "लाडकी" यमी काल टीव्हीवर दिसलीच नाही :-)
माझा आणखी एक ऍस्ट्रॉनॉमर मित्र तिथे त्यांच्या स्टुडिओमधे मुलाखतीसाठी गेला होता ते मात्र प्रसारीत झालं. आणि तेव्हा त्यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आणि पुन्हा जेव्हा खगोलशास्त्रावर कार्यक्रम करतील तेव्हा दाखवतील असं सांगितलं!
ठीक आहे, बेटर लक नेक्स टाईम!
("स्किझोफ्रेनिक") यमी / अदिती / संहिता
अवांतर: "करीयर इन ऍस्ट्रॉनॉमी' या विषयावर मी पूर्वी लिहिलेला एक लेख इथे पहा.
12 Aug 2008 - 11:35 am | आनंदयात्री
आमच्या गल्लीतली चिउ एकदा बुगी वुगी मंदी आली व्हती .. त्यानंतर डायरेक्ट टीवी वर दिसणारी आमच्या ओळखीची यमीच ;)
जोक्स अपार्ट .. पण सायंकाळी किंवा रात्री पुनःप्रसारण असेल तर विचारुन ठेव नं ! आनंद होईल पहायला :)
पुत्र व्हावा ऐसा गुंडा
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !
आई वडिलांना अभिमान वाटेल तुमच्या !!
12 Aug 2008 - 11:35 am | मेघना भुस्कुटे
थ्यांकू जाहीर केल्याबद्दल!
12 Aug 2008 - 11:39 am | घाटावरचे भट
यमूतै,
व्हिडीओ करुन कृपया यूट्यूब वर टाका, आमच्या सारख्यांची सोय होईल...
आणि तुमचं अभिनंदन!!!
(शुभेच्छुक) भटोबा
12 Aug 2008 - 12:16 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
12 Aug 2008 - 2:14 pm | लिखाळ
अभिनंदन.
--लिखाळ.
12 Aug 2008 - 11:01 pm | श्रीकृष्ण सामंत
सहमत
पुतणीला ऐकायला आणि बघायला कोण आनंद होईल!
सामंतकाका
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
12 Aug 2008 - 11:40 am | चंबू गबाळे
अरे वा वा! अभिनंदन यमी आज्जी!!
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
12 Aug 2008 - 11:41 am | मनस्वी
अभिनंदन!
रेकॉर्डींग लोड कर नक्की.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
12 Aug 2008 - 11:44 am | छोटा डॉन
तुमचे अभिनंदन,
व्हिडिओची लिंक द्यावी ही विनंती ...
आम्ही त्या वेळेस घरीच असेन पण बंगरुळ सरकारच्या कॄपेने आमच्याकडे "झी २४ तास" दिसत नाही.
असो.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
12 Aug 2008 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
करीयर इन ऍस्ट्रॉनॉमी ची मुलाखत युट्युबवरुन इथे नक्की टाका.
12 Aug 2008 - 7:00 pm | प्राजु
यमूताई,
नक्की रेकॉर्डिंग करून अपलोड कर. आम्हाला इथे पहाता येइल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Aug 2008 - 11:43 am | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
मनापासून अभिनंदन.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
12 Aug 2008 - 11:45 am | स्वाती दिनेश
वावा..यमे, अभिनंदन!
भटोबा म्हणतात तसे रेकॉर्डिंग यु ट्यूब वर टाकले तर आम्हाला (उशिरा का होईना) पाहता येईल.
स्वाती
12 Aug 2008 - 11:46 am | ऋचा
अभिनंदन आज्जी , ;)
व्हिडिओची लिंक टाक ईथे ही विनंती ...
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
12 Aug 2008 - 11:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वोक्के! टि.व्ही. नसणाय्रांसाठी आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणाय्रांसाठी आणि त्या वेळी हापिसात बसून हाटेलात मिसळ खाणाय्रांसाठी, मला जर रेकॉर्डींग करता आलं तर यूट्यूब वर जरूर टाकेन!
12 Aug 2008 - 11:49 am | अनिल हटेला
अभिनंदन !!
आणी हो आम्ही चायना त बसलोये ..
त्या मुळे लाइव्ह नाय बघता येणार,
युट्युब वर विडीओ टाकलात तर बघता येइन आम्हाला !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
12 Aug 2008 - 11:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे चीनी सरकारला मिपा आक्षेपार्ह वाटत नाही तर! गुड फॉर अस! :-)
12 Aug 2008 - 11:53 am | हर्षद आनंदी
नमस्कार,
मनःपुर्वक अभिनंदन!!
सकाळ्ची पाळी असल्याने नक्की पाहीन अन् उंद्याच्याला परतिक्रीया !!!
ऐकावे जनाचे करावे मनाचे!!
12 Aug 2008 - 11:58 am | अनिल हटेला
आरे मिपा अखिल विश्वाला प्यारे आहे !!
( मराठी समजायला हव ,आणी वाच्ता यायला हव , एवढी माफक पात्रता)
आणी मी ह्या लोकाना अभिमानाने ही साइट दाखवतो आणी सान्गतो की ,
ही माझी मातॄभाषा !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
12 Aug 2008 - 12:01 pm | टारझन
काय हो यम्मी आज्जी , हे तुम्हाला ७ वर्षांपुर्वी न्हाय का मुलाकात द्येता आली ? आमची करियरची वाट चुकली ना ? आमाला कसं टिवीव यता यनार आता ? अफ्रिकेत असल्याने फकस्त नॅट जिओ,डिस्कव्हरी अन् ऍनिमल प्लॅनेट वर झळकता यिल ... :((
असो विनोद बाजूला ...
मला तुनळी (युट्युब) ची लिंक दे.... आनंद झालाय .. आमची १७५ वर्षाची छोटीशी यम्मी आज टिव्हीत दिसनार ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
12 Aug 2008 - 12:10 pm | सूर्य
अभिनंदन. आज मंगळवार म्हणजे नेमकी संध्याकाळी मिटींग :( . युट्युब चीच वाट बघावी लागेल आम्हाला.
- सूर्य.
12 Aug 2008 - 12:15 pm | अमिगो
मनःपुर्वक अभिनंदन. युट्युब वर व्हिडीओ नक्की टाका.
12 Aug 2008 - 12:17 pm | बिपिन कार्यकर्ते
यमे, यमे, अगं किती भटकशील? आता काय टि.व्ही. वर चाललियेस? जपून हो... शोभत नाही हे असं मुलीच्या जातीला... :D (ह.घे.)
कार्यक्रम बघता येईल की नाही शंकाच आहे... पण पुनःप्रक्षेपण नक्कीच असणार. जरा त्यांना विचारून बघ की? नाही तर तूनळी वर बेष्ट.... बघ जमतंय का... आणि टार्याशी सहमत, फक्त ७ वर्षांच्या ऐवजी २०-२२ वर्षे अगोदर का नाही केलास हा प्रोग्राम?
बिपिन.
(स्वगतः ही यमी नक्की आहे तरी कोण? कोणी यमुताई म्हणतं, कोणी आज्जी म्हणतं, अजून कोणी अदिती, ती स्वतः म्हणते माझं नाव संहिता ... अरे काय प्रकार काय आहे हा? एक व्यक्ति वेगवेगळ्या आयड्या घेऊन वावरते हे तर मोप बघितलंय, पण एकाच आयडीतून इतक्या व्यक्ति वावरतात हे भारी आहे राव!!!) :O :?
12 Aug 2008 - 12:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही यमी नक्की आहे तरी कोण? कोणी यमुताई म्हणतं, कोणी आज्जी म्हणतं, अजून कोणी अदिती, ती स्वतः म्हणते माझं नाव संहिता ... अरे काय प्रकार काय आहे हा? एक व्यक्ति वेगवेगळ्या आयड्या घेऊन वावरते हे तर मोप बघितलंय, पण एकाच आयडीतून इतक्या व्यक्ति वावरतात हे भारी आहे राव!!
संहिता हे माझं खरं नाव! ते कठीण आणि अद्वैतची बहिण म्हणून हाक मारायला अदिती! आता आई आणि शेजारच्या आजीनी माझं नाव ठेवलं मी स्वतःलाच का नाही नावं ठेवायची, म्हणून इथे यमी!
हुश्श्!
12 Aug 2008 - 12:38 pm | बिपिन कार्यकर्ते
हुश्श!!! मी तर वाचूनच दमलो. तुला लिहिताना किती कष्ट पडले असतिल!!! :) बाकी स्वतःला नावं ठेवायची जिंदादिली आवडली, दुर्मिळ आहे ही गोष्ट, जियो.
बिपिन.
13 Aug 2008 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे
आन आमी ठुल्याल नावं पाच षष्ठांश काळी ठमी. ;)
प्रकाश घाटपांडे
12 Aug 2008 - 12:18 pm | मदनबाण
अभिनंदन !!!!!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
12 Aug 2008 - 12:40 pm | धमाल मुलगा
यमु आजी :)
म्हणजे आता तू ऍस्ट्रोनॉमीमध्ये करिअर गायडन्स पण करतेस? ग्रेट्च आहेस की.
शाब्बास !!!
बाकी, ते 'तु नळी'चं पहा बुवा जमलं तर. म्हणजे आम्हा गरिबांनाही ही मुलाखत पाहता येईल.
अगदी टारझनसारखंच म्हणतो "हे तुम्हाला ७ वर्षांपुर्वी न्हाय का मुलाकात द्येता आली ? आमची करियरची वाट चुकली ना ? "
(स्वगतः ह्या यमीनं ७-८ काय किंवा २०-२५ वर्षांपुर्वी जरी हाच कार्यक्रम केला असता तरी शिंच्या तुला रे काय कळतं त्यातलं? साधं दुसरीच्या गणिताच्या पेपरात पास नाही होता येत नीट, चाल्लाय ऍस्ट्रोनॉमीत करीअर करायला...तू आपला बस तुझ्या फेदरवेट सायबाच्या हुकुमाची वाट पहात विदा चिवडत...)
12 Aug 2008 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्या यमीनं ७-८ काय किंवा २०-२५ वर्षांपुर्वी जरी हाच कार्यक्रम केला असता तरी शिंच्या तुला रे काय कळतं त्यातलं? साधं दुसरीच्या गणिताच्या पेपरात पास नाही होता येत नीट, चाल्लाय ऍस्ट्रोनॉमीत करीअर करायला...तू आपला बस तुझ्या फेदरवेट सायबाच्या हुकुमाची वाट पहात विदा चिवडत...
=))
तुला यायचंय का इथे टेलिस्कोप्सवर काम करायला?
12 Aug 2008 - 1:18 pm | छोटा डॉन
कशाला जागवतेस निद्रीस्त समंधाला ...
तो आहे तिथेच बरा आहे ...
तिकडे येउन तो काम तर करणार नाहीच, दिवसभर "मिपा" वर पडीक राहिल ...
उलट त्याच्या खरडवहीत टाकायला म्हणुन "तुमच्या टेलिस्कोपवर पाय टाकुन बसलेला फोटो " तो "This is How I Work " ह्या टायटल खाली काढेल व आख्ख्या गावात मिरवेल ... ;) ;) ;)
त्यापेक्षा मलाच घे, मी एकदम सज्जन आणि सोज्वळ आहे ... :) :) :)
[ कोण आहे रे ते दाताड काढुन हासतेय ? ६४ च्या ६४ दात बाहेर काढीन ]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
12 Aug 2008 - 1:22 pm | ऋषिकेश
=)) =)) =))
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
12 Aug 2008 - 1:40 pm | धमाल मुलगा
डान्या लेकाचा हुशार आहे हां!!! त्याची आन् माझी मतां बराब्बर जुळतां.
बाकी, मी तिथे आलो तर तुमच्या त्या टेलिस्कोपचा शिनेमास्कोप व्हायला वेळ नाही लागायचा ;)
आणि उरलेल्या वेळात पाखरं निरखत बसेन.
उदा. झाडावर टकटकणारा सुतारपक्षी, एखादा नदीकाठचा खंड्या, घरट्यातल्या पिलांना घास भरवणारी एखादी शिंपीण वगैरे वगैरे.
(तो आंद्या हसला बघ खवचटपणे, मी 'पाखरं' म्हणालो की.. हल्ली काही बोलायची सोयच उरली नाहीय्ये.)
धन्य आहेस रे बाबा....कुठुन कुठे धावते तुझी कल्पनाशक्ती! ऑप्शनल केस म्हणून दे पाठवून ऑलिंपिकात...लै जोरात धावेल.
हो हो...त्यालाच घे हो. म्हणजे पुढच्या सहा महिन्यात तुमच्या टेलिस्कोपला हे महाराज फोर-स्ट्रोक ब्लॉक पिस्टन जोडून "फ्युएल इफिशिएंट टेलिस्कोप" किंवा "टेलिस्कोपिक फ्युएल इफिशियन्सी" असल्या अगम्य प्रकारावर 'प्रेझेंटेशन देत फिरतील.
=))
देवाऽऽऽऽ
आत्ता मला कळलं, मी गणितात नापास का व्हायचो...एकाच बाजुची मोजणी केल्यावर उत्तर निम्मंच येणार नाही का?
तात्पर्यः मला बोलावुन नसते झेंगट ओढवुन घेऊ नये. भारताची सॉफ्टवेअर क्षेत्रात आम्ही करत असलेली नाचक्की पुरेशी आहे.
अवांतरः विषयाला सोडून बरंच अवांतर झालं, नाही?
क्षमस्व! (उर्वरीत खेचाखेची खरडीतून खेळावी झालं.)
12 Aug 2008 - 12:53 pm | पद्मश्री चित्रे
मज्जा आहे बॉ एका मुलीची..
अभिनंदन ग,
(लिन्क ची वाट पहाणारी) फुलवा
12 Aug 2008 - 1:13 pm | ऋषिकेश
अभिनंदन!!
मी हाफिसात असेन पुनःप्रक्षेपण आहे का? नसल्यावा दुवा दे आणि आमचा दुवा मिळव :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
12 Aug 2008 - 1:28 pm | अनिल हटेला
त्यापेक्षा मलाच घे, मी एकदम सज्जन आणि सोज्वळ आहे ..
[ कोण आहे रे ते दाताड काढुन हासतेय ? ६४ च्या ६४ दात बाहेर काढीन ]
लै भारी !!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
12 Aug 2008 - 1:32 pm | श्री
अभिनंदन !!!!!
कालचा दिवस अभिनव चा, आजचा दिवस यमी चा, ऊद्या कोण नंबर लावतोय?
12 Aug 2008 - 1:48 pm | स्नेहश्री
मंदार वासी सॉलीड चमकत आहेत झी टि.व्ही. वर.
अभिनंदन आदिती....... :) =D>
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
12 Aug 2008 - 2:07 pm | अवलिया
यमुताई
आपली अशीच प्रगती होत राहो व आम्हाला नेहमी अशा वृत्तांताचे वृत्त समजत राहो अशी प्रामाणिक इच्छा
आमच्या घरी दुरदर्शन नामक झेंगाट नसल्यामुळे आम्ही सदर कार्यक्रम पाहु शकणार नाही तरी चित्रफित उपलब्ध केल्यास जरुर आस्वाद घेवु व प्रतिक्रिया कळवु
(शुभेच्छुक) नाना
12 Aug 2008 - 2:27 pm | टारझन
.
12 Aug 2008 - 2:27 pm | लबाड मुलगा
हा हा हा
अरे (खविसा) आता टारझना असे नाव बदलण्यापेक्षा नवीन आय डी करुन लेख लिहिले असते तर आज तु पण लाडका नसता का झाला?
अहो रुपम अहो ध्वनी विसरलास काय तसेच आहे .
चालायचेच आभाळातले जमीनी वर आलेले .... तारे जमी पर रे ... जावु दे चालु दे तुझे ..एएओओओओएएएओओओ
12 Aug 2008 - 2:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे लोक तुझी मुलाखत पहायला ऊत्सुक आहेत का तुला पहायला ? जगदंब जगदंब ...
हे बघ आता लोक (पुरूष) माकडं पहाणार का मुलगी? :p
आणि बायका पण मुली-बायकांकडेच जास्त पहातात, माकडांकडे नाही!
12 Aug 2008 - 2:21 pm | टारझन
हे लोक तुझी मुलाखत पहायला ऊत्सुक आहेत का तुला पहायला ? जगदंब जगदंब ...
मी ईवढ्या वेळा डिस्कव्हरी वर दिसलो .. मी पण एक धागा टाकला असंता .. पण टारझनाला पहायला कोण ऊत्सुक? जंगलातल्या माकडांच्या (संदर्भ: जंगलकथा) प्रतिक्रियांवर समाधान.. आणि धागा रिसेंट लिस्ट मधे दिसावा म्हणून दर पाच तासाला एक नवा आयडी ऊघडून आपणच प्रतिक्रिया लिहायची ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
12 Aug 2008 - 2:28 pm | लबाड मुलगा
हा हा हा
अरे (खविसा) आता टारझना असे नाव बदलण्यापेक्षा नवीन आय डी करुन लेख लिहिले असते तर आज तु पण लाडका नसता का झाला?
अहो रुपम अहो ध्वनी विसरलास काय तसेच आहे .
चालायचेच आभाळातले जमीनी वर आलेले .... तारे जमी पर रे ... जावु दे चालु दे तुझे ..एएओओओओएएएओओओ
12 Aug 2008 - 2:27 pm | प्रियाली
तू नळीवर विडिओ टाकणार का?
12 Aug 2008 - 2:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला एका मित्राकडे TV tuner card असल्याचं कळलं आहे. त्याच्याकडे झी २४ तास लागत असेल तर नक्कीच टाकेन!
12 Aug 2008 - 2:32 pm | श्रीमंत दामोदर पंत
अभिनंदन यमु ताई............... :)
जमल तर रेकोरर्डिंग करून ठेव म्हणजे मग आम्हाला बघता येईल......
12 Aug 2008 - 2:38 pm | ब्रिटिश टिंग्या
यमे,
हार्दिक अभिनंदन!
शक्य असेल तर मुलाखत यु ट्युबवर अपलोड कर!
- टिंग्या
12 Aug 2008 - 2:47 pm | अभिज्ञ
यमुताई,
ह्या टि.व्ही. मुलाखतीबद्दल अभिनंदन.
युटयुब ची लिंक नक्की द्या.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अभिज्ञ.
12 Aug 2008 - 3:06 pm | प्रकाश घाटपांडे
मंग त्येलाच " आमची माती आमची मान्स" मधी कनवर्ट करु कि. शेवटी आपन आभाळातुन मातीतच पडनार न्हवं?
प्रकाश घाटपांडे
12 Aug 2008 - 3:50 pm | विसोबा खेचर
अर्रे वा! यमे, तुझं अभिनंदन हो! :)
12 Aug 2008 - 4:34 pm | सर्वसाक्षी
या वेळेस आम्ही कचेरीत! असो इथे काही चिकटवले तर पाहता येईलच
आपण आता दूरदर्शित होणार ! अभिनंदन
12 Aug 2008 - 4:43 pm | अजिंक्य
अभिनंदन, यमुताई(का यमूआज्जी म्हणू!)
माझे 'करियर' अजून चालू व्हायचे आहे. त्यामुळे मला हा कार्यक्रम पाहायला नक्की आवडेल,
पण आमच्याकडे ही वाहिनी दिसत नाही.(अरेरे!)
त्यामुळे, कृपया व्हिडिओ लिंक द्यावी, ही विनंती.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
12 Aug 2008 - 4:52 pm | विकास
अभिनंदन! आपली मुलाखत निश्चितच जालावर दाखवण्याची व्यवस्था करा.
अवांतरः घरात सध्या झी-मराठी ऑनलाईन दिसतो म्हणून ही बातमी वाचताच झी-२४ आणि झी-मराठीतील फरक न समजून तो लावला आणि "या सुखानो या" का काहीतरी दिसले. मुकाट्याने बंद केले.
12 Aug 2008 - 5:04 pm | प्रकाश घाटपांडे
डिट्टो ह्येच म्हन्तो.
प्रकाश घाटपांडे
12 Aug 2008 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते
झाला का गं प्रोग्रॅम?
बिपिन.
12 Aug 2008 - 5:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला पण दिसलं नाही ... ऐन वेळेला इथल्या होस्टेलमधला टि.व्ही. बोंबलला! तेव्हा आता पाहूया काय करता येतंय ते!
आणि ज्याच्याकडे TV tuner card आहे त्याच्याकडे झी २४ तास दिसत नाही!
12 Aug 2008 - 6:02 pm | शितल
तुमचे अभिनंदन.:)
आमचे नाही करिअर त्यात हो ऊ शकत पण ज्यांच्या पुढे अजुन पर्यांय उपलब्ध आहेत त्यांना नक्की सांगेन :)
12 Aug 2008 - 7:18 pm | मानस
यमुताई
मुलाखतीसाठी शुभेच्छा, एका दुसर्या संकेतस्थळावर माझं नाव "अंतरिक्ष" होतं, असो ऍस्ट्रॉनॉमी हा आमचा अत्यंत आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय.
मानस
12 Aug 2008 - 7:33 pm | आप्पा
रिपीट टेलिकास्ट केव्हा आहे?
12 Aug 2008 - 8:57 pm | रेवती
आपले अभिनंदन, मुलाखतीसाठी व आपण निराळ्या विषयात करियर केल्याबद्दल !
रेवती
12 Aug 2008 - 10:24 pm | यशोधरा
जमल्यास यूट्यूबवर तुझी मुलाखत नक्की चढव गं, बघायला खूप आवडेल.
13 Aug 2008 - 8:28 pm | बहुगुणी
झी२४ आणि इतर अनेक संस्थळावर कार्यक्रमाची माहिती न मिळाल्याने मी जालावर शोधून एका संहिता जोशी नामक डॉक्टोरल विद्यार्थिनीची खालील माहिती मिळवलेली आहे. हीच आपली 'यमी' असल्यास तिच्या खगोलशास्त्रीय कामाची माहिती मिळावी म्हणून हे दुवे देत आहे.
बहुतेक हे अदितीचे मुंबईतील खगोलमंडळ असावे.
आणि ही जॉड्रेल ऑब्झर्वेटरी च्या स्थळावरील अदितीची माहिती.
अदिती: हा तुझा फोटो आहे का? नसल्यास संपादकांनी ही लिंक काढून टाकावी ही विनंती.
- बहुगुणी