बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार "राजेश'जी खन्ना" यांचे मुम्बईतील त्यांच्या राहत्या घरी (आशीर्वाद बंगला येथे) वयाच्या ७० व्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झालेले आहे. कालच रात्री लीलावती हॉस्पिटलमधून त्यांना डिसचार्ज दिला गेला होता. आज सकाळपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती. आज दुपारी १-४५ वाजता काका'ने "जिन्दगी'च्या सुहाना सफर"मधून कायमची एक्झिट घेतली.. :|
सर्व पिढ्यांना आवडणार्या आपल्या लाडक्या काका'ला भावपूर्ण श्रद्धांजली... ~*~*~*~*~*~ ...
प्रतिक्रिया
18 Jul 2012 - 2:19 pm | गवि
वाईट झालं. किशोर कुमारच्या गाण्यांशी अतूट जोडी बनल्याने गाण्यांच्या रुपात ते लक्षात राहिले होते. कालच हॉस्पिटलातून घरी आले अशी बातमी वाचली होती.
आदरांजली..
18 Jul 2012 - 2:22 pm | मोहनराव
"आनंद कभी मरते नही" बाबुमोशाय!

:(
18 Jul 2012 - 3:49 pm | अत्रुप्त आत्मा
"आनंद कभी मरते नही" >>>अखंड सहमती !
काकाला त्याच्याच एका अजरामर गाण्यातून ... --^--
18 Jul 2012 - 2:26 pm | प्यारे१
आनंद मरा नही... आनंद मरते नही!
18 Jul 2012 - 2:27 pm | बिपिन कार्यकर्ते
:( :( :( :( :(
18 Jul 2012 - 2:31 pm | मृत्युन्जय
अरेरे. भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार काळाच्या पडद्याआड गेला अखेर.
शम्मी कपूर, देव आनंद, दारासिंग, राजेश खन्ना. सुवर्णकाळातले सगळे खंदे शिलेदार फार थोड्या फरकाने गेले नाही?
18 Jul 2012 - 2:42 pm | बॅटमॅन
तेच ना चायला........२०१२ बद्दल म्हणतात ते खरे आहे की काय असे वाटू लागते अशा वेळी :( राजेश खन्ना अमर रहे!!!!!!!
18 Jul 2012 - 2:43 pm | गवि
मी अगदी एक्झॅक्टली राजेश खन्नाच्या पिढीचा नसलो तरी दूरदर्शन जमान्यात त्याला खूप पाहिलं आहे आणि भावविश्वाचा एक भाग त्याच्याशी जोडलेला आहेच. अमिताभशी हिरोचं नातं जास्त जोडलं असला तरी राजेश खन्नाही कुठेतरी आहे.. खास करुन किशोरच्या रोमँटिक / भावुक गाण्यांसाठी चेहरा म्हणून, हाणामारी किवा लुक्ससाठी नव्हे..
अशा वेळी कणेकरांच फिल्लमबाजीच्या शेवटाला असलेलं ते वाक्य आठवतं.
देव आनंद काय, दिलीप कुमार काय, राज कपूर काय किंवा लता मंगेशकर काय, आमच्या पिढीची भावस्थाने आहेत. एक राज कपूर जातो तेव्हा एक नट, निर्माता, दिग्दर्शक, संकलक व स्टुडिओचा मालक गेला, एवढी छोटीशी भावना नाही आमची. आमच्या लेखी आमच्या भावजीवनाचा एक भाग संपला. शरीराच्या एका अवयवाला लकवा मारला. शरीराचा एक भाग निकामी झाला. मृत्यू समीप आला. भितो ते स्वतःच्या मृत्यूला.. आणखी कशाला नाही.
18 Jul 2012 - 2:31 pm | अमृत
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
अमृत
18 Jul 2012 - 2:32 pm | मी_आहे_ना
"जिंदगी का सफर" असो किंवा "जिंदगी एक सफर हैं सुहाना", "जिंदगीके सफर में गुजर जाते हैं जो मकाम"..... "मेरे सपनोंकी रानी" सारखे छेडखानी करणारे तर कधी "कोरा कागझ था ये मन मेरा", "रूप तेरा मस्ताना" असे उत्कट प्रेमगीत... "कुछ तो लोग कहेंगे" , "मैंने तेरे लिये ही सात रंग के सपनें.."... इतक्या वैविध्यपूर्ण अदाकारीने लाखो/ करोडो लोकांच्य मनावर अधिराज्य गाजवणारे बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना (ऊर्फ काका) ह्यांना भावपूर्ण आदरांजली!
18 Jul 2012 - 2:44 pm | दिपक
बाबुमोशाय ........ जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही..
18 Jul 2012 - 3:41 pm | मृगनयनी
रिसेन्टली २-३ महिन्यांपूर्वी राजेश'जींनी केलेली "हॅवेल फॅन्स"ची अॅडफिल्म, हे त्यांचे कॅमेरासमोरचे शेवटचे योगदान ठरले. -- "बाबुमोशाय, मेरे फॅन्स मुझसे कोई नही छीन सकता!!! "
त्या अॅडमध्ये दिसणार्या त्यांच्या वार्धक्याच्या खुणा पाहून आमच्या आया-मावश्यांच्या काळजात चर्र झाले.. कारण त्या शाळा-कॉलेजात असताना ज्याच्यासाठी त्या वेड्या झाल्या होत्या.. तो देखणा सुपरस्टार आता गलितगात्र अवस्थेत बघणं.. खरंच खूप त्रासदायक होतं... पण तरीही बर्याच वर्षांनी कॅमेरा फेस करत असतानाही राजेश'जींच्या डोळ्यांतली चमक मात्र अगदी जशीच्या तश्शीच्च होती.... म्हणून कदाचित ते गेल्यानन्तरही त्यांचे सुपरस्टार पद अबाधित आहे.
या फॅन्स'च्या अॅडव्हरटीज'चे त्यांना ३.५ कोटी मानधन म्हणून मिळाले. या मानधनातून त्यांनी २ 'बीएमडब्ल्यु 'खरेदी केल्या व त्या आपल्या दोन मुलींना- ट्विन्कल आणि रिन्की यांना गिफ्ट दिल्या.. :|
डिम्पल'बरोबर काका'चे वैवाहिक जीवन जरी चान्गले नसले, तरी काका'च्या शेवटच्या दिवसांत डिम्पलची व जावई- अक्षयकुमारची खूप मदत झाली. काका शेवटच्या घटका मोजत असताना त्यांचा भाऊ- भूपेश, डिम्पल, ट्विन्कल आणि अक्षयकुमार हे त्यांच्या बरोबर होते...
असे काही जण असतात, जे सुपरस्टार म्हणून जगतात..
पण असा एखादाच असतो, जो मेल्यानन्तरही त्याचं सुपरस्टार-पद कुणी हिरावून घेऊ शकत नाही... तो म्हणजे- राजेश खन्ना!!
18 Jul 2012 - 2:49 pm | नाखु
आदरांजली.......
18 Jul 2012 - 3:01 pm | क्षितीज
सुपरस्टार राजेश खन्ना ह्यांना भावपूर्ण श्रधांजली!!!!!
18 Jul 2012 - 3:24 pm | पियुशा
श्रद्धांजली !
18 Jul 2012 - 3:25 pm | स्मिता.
राजेश खन्ना!! आह्... अनेक भिडणार्या आणि सुरेख गाण्यांमुळे राजेश खन्ना यांना मनात एक अढळ स्थान आहे. त्यांनी इहलोक सोडला तरी आठवणी मनात शेवटपर्यंत तेवढ्याच ताज्या राहतील.
(आजच्या दिवशी दोन श्रद्धांजलीचे धागे आले हे आपले दुर्दैव! :()
18 Jul 2012 - 3:37 pm | किसन शिंदे
दुरदर्शनच्या काळात त्यांचा 'आनंद' पाहिला होता आणि रडलो होतो. जसा आनंद आठवतो तसाच बावर्ची, तसाच आराधना, तसाच कोरा कागज, तसाच........
आणखी काय बोलू :(
श्रध्दांजली!!
14 Apr 2013 - 12:23 pm | आशु जोग
बावर्ची आराधना आनंद हे बरोबर आहे
पण
कोरा कागज हा चित्रपट विजय आनंद, जया भादुरी यांचा आहे
(कोरा कागज था ये मन मेरा हे गाणे राजेश खन्ना यांचे आहे)
14 Apr 2013 - 2:05 pm | चिरोटा
व्यनितून सांगा की राव. मला वाटले राजेश खन्नाला मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला की काय.
18 Jul 2012 - 3:38 pm | आप्पा
आमच्या काळातील सुपरस्टार काळाच्या पडद्याआड गेला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
18 Jul 2012 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार
काका...
18 Jul 2012 - 3:53 pm | मन१
अरेरे....
18 Jul 2012 - 3:54 pm | प्रभाकर पेठकर
राजेश खन्ना 'द सुपर स्टार'.
'सुपर स्टार' हे बिरुद राजेश खन्ना पासून सुरु झालं. त्याचे व्यक्तिमत्त्व बरच वादग्रस्त होतं. पण अभिनयाची नवि पातळी त्यानेच बॉलीवूडात आणली. 'ग्लॅमर' शब्दही आम्हाला त्या काळातच समजला.
राजेश खन्नाचा चित्रपट म्हंटलं की चुकवायचा नाहीच. त्याचं दिसणं, ती मध्ये भांग पाडायची 'हेअर स्टाईल', मान तिरकी करून पाहणं, 'बाबू मोशाSSSSय', 'आय हेSSSSSSट टिअर्स' वगैरे संवाद कांनात/मनांत गुणगुणायचे आणि मन म्हणायचं, 'आय लSSSSSव्ह राजेश खन्ना रे!'.
राजेश खन्नावर 'मरणार्या' मुलींनी त्याला आपल्या रक्ताने प्रेमपत्र लिहिली. त्याच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकला पण राजेश खन्नाने सकाळच्या जुहू किनार्यावरील आपल्या प्रभात फेरीत डिंपलच्या वडीलांकडे डिंपल बद्दल मागणी घातली. लाखो तरूणींचा 'पत्ता कट' होऊन डिंपल राजेश खन्नाच्या आयुष्यात आली. ते लग्न दहाएक वर्षे टिकलं.
गिरगावात राहणारा राजेश खन्ना केसी कॉलेजात शिकला. तेंव्हा त्याचे सहाध्यायी असणार्या आमच्या ओळखितल्या एकाने सांगितले. राजेश खन्ना भोवती नेहमी सुंदर सुंदर मुलींचा घोळका असायचा. कॉलेजकन्यकांमध्ये तो फार 'पॉप्युलर' होता. कॉलेजच्या गॅदरींगच्य नाटकांमध्ये कामे करायचा. हे गृहस्थ आणि त्यांचे मित्र त्यावेळी राजेश खन्नावर खुप 'जळायचे' (कारणः सुंदर मुलींचा घोळका). एकदा त्याच्या नाटकाला ह्या सर्वांनी मिळून त्याच्या वर अंडी आणि सडक्या टोमॅटोचा मारा केला. परीणाम- हे सहाजणं रस्टीकेट झाले.
राजेश खन्नाची गाडी (त्याला काहीतरी 'हॅनिटी कार' की काय म्हणायचे), त्याचा 'आशिर्वाद' बंगला हे चर्चेचे विषय असायचे. असो.
सत्तर म्हणजे तसा लवकरच गेला बिचारा. वाईट वाटलं.
18 Jul 2012 - 3:54 pm | प्रभाकर पेठकर
राजेश खन्ना 'द सुपर स्टार'.
'सुपर स्टार' हे बिरुद राजेश खन्ना पासून सुरु झालं. त्याचे व्यक्तिमत्त्व बरच वादग्रस्त होतं. पण अभिनयाची नवि पातळी त्यानेच बॉलीवूडात आणली. 'ग्लॅमर' शब्दही आम्हाला त्या काळातच समजला.
राजेश खन्नाचा चित्रपट म्हंटलं की चुकवायचा नाहीच. त्याचं दिसणं, ती मध्ये भांग पाडायची 'हेअर स्टाईल', मान तिरकी करून पाहणं, 'बाबू मोशाSSSSय', 'आय हेSSSSSSट टिअर्स' वगैरे संवाद कांनात/मनांत गुणगुणायचे आणि मन म्हणायचं, 'आय लSSSSSव्ह राजेश खन्ना रे!'.
राजेश खन्नावर 'मरणार्या' मुलींनी त्याला आपल्या रक्ताने प्रेमपत्र लिहिली. त्याच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकला पण राजेश खन्नाने सकाळच्या जुहू किनार्यावरील आपल्या प्रभात फेरीत डिंपलच्या वडीलांकडे डिंपल बद्दल मागणी घातली. लाखो तरूणींचा 'पत्ता कट' होऊन डिंपल राजेश खन्नाच्या आयुष्यात आली. ते लग्न दहाएक वर्षे टिकलं.
गिरगावात राहणारा राजेश खन्ना केसी कॉलेजात शिकला. तेंव्हा त्याचे सहाध्यायी असणार्या आमच्या ओळखितल्या एकाने सांगितले. राजेश खन्ना भोवती नेहमी सुंदर सुंदर मुलींचा घोळका असायचा. कॉलेजकन्यकांमध्ये तो फार 'पॉप्युलर' होता. कॉलेजच्या गॅदरींगच्य नाटकांमध्ये कामे करायचा. हे गृहस्थ आणि त्यांचे मित्र त्यावेळी राजेश खन्नावर खुप 'जळायचे' (कारणः सुंदर मुलींचा घोळका). एकदा त्याच्या नाटकाला ह्या सर्वांनी मिळून त्याच्या वर अंडी आणि सडक्या टोमॅटोचा मारा केला. परीणाम- हे सहाजणं रस्टीकेट झाले.
राजेश खन्नाची गाडी (त्याला काहीतरी 'हॅनिटी कार' की काय म्हणायचे), त्याचा 'आशिर्वाद' बंगला हे चर्चेचे विषय असायचे. असो.
सत्तर म्हणजे तसा लवकरच गेला बिचारा. वाईट वाटलं.
18 Jul 2012 - 4:01 pm | सर्वसाक्षी
७० च्या दशकातला सुपर हिरो. देखणा आणि रुबाबदार. याच्या केसांचे वळण आणि याचा गुरु शर्ट तरुणांचा आदर्श ठरले होते. या प्रणयपटांच्या नायकाने आपली शैली निर्माण केली. नायिकेप्रमाणे याची अदा बदलायची. मुमताजबरोरचा राजेश खन्ना वेगळा, शर्मिला बरोबरचा वेगळा, आशा पारेख बरोबरचा वेगळा आणि वहिदा रेहमान बरोबरचा वेगळा.खामोशी मधली त्याची आणि वहिदाची अभिनयाची जुगलबंदी केवळ अविस्मरणीय.
आनंद हा त्याचा खास आणि गाजलेला; जणु त्याच्याचसाठी निर्माण केलेला, लिहिलेला सिनेमा. त्याने साकार केलेला असाच एक लक्षात राहणारा चित्रपट म्हणजे खामोशी.
जुन्या चित्रपटांच्या कथेतल एक पर्व संपल.
18 Jul 2012 - 4:17 pm | विसुनाना
राजेश खन्ना भावनोत्कट चित्रपटांचा बादशहा होता.
राजेश खन्ना गेला. वाईट वाटते आहे.
18 Jul 2012 - 5:26 pm | चौकटराजा
मी त्यांचा पहिला चित्रपट आखरी खत हा रत्नागिरीच्या राधाकृष्ण चित्रमंदिरात पाहिला. नंतर राज हा ही पाहिला. मग आराधना ! काय सांगाव" महाराजा आराधनात एस डी बर्मन व राजेश काकाने केलेला कहर.
आतापर्यंतचे रोमॅन्टिक हिरोपेक्षा वेगळीच संवाद फेक असणार्या खन्ना साहेबाने कल्ला च केला. एकावर एक यशस्वी सिनेमांची रांग त्याने लावली.
मी त्याकाळात इंग्रजी चित्रपटाचा जास्त करून फॅन होतो. साहजिकच काकाचे अनेक चित्रपट मी पाहिलेले
नाहीत, पण इत्तफाक आनंद बावर्ची यात तो लाजवाब होता.
मेहबूबाचे काही शूटींग पाचगणी येथे झाले . त्यावेळी हॉटेल आमीर मधे तेथील ओळखीतून एका रूमच्या
बाल्कनीतून खाली धोम धरणाकडे पहात होतो. दाखविणारा मॅनेजर म्हणाला " आज संध्याकाळी या रूम
मधे कोण राहयला येणार आहे माहीताय " मी खुणेनेच विचारले " उत्तर होते " राजेश खन्ना !
18 Jul 2012 - 5:52 pm | मदनबाण
अरेरे... फार वाईट्ट वाटलं :(
मागच्या १-२ आठवड्या पासुनच काकांच्या विषयी वेगवेगळे कार्यक्रम विविध वाहिन्यांवर दिसत होते... तेव्हाच जरा वाटले होते...आणि शेवटी तेच झाले. :(
काकां चे मला आवडलेले चित्रपट अनेक आहेत्,पण त्यांचा "स्वर्ग" हा चित्रपट मला फार आवडला होता.
18 Jul 2012 - 6:03 pm | जेनी...
:(
18 Jul 2012 - 5:55 pm | नाना चेंगट
:(
18 Jul 2012 - 6:22 pm | निवेदिता-ताई
आमच्या काळातील सुपरस्टार काळाच्या पडद्याआड गेला. खूप वाईट झाले.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
18 Jul 2012 - 6:23 pm | पैसा
श्रद्धांजली.
18 Jul 2012 - 6:28 pm | सुहास झेले
:( :( :(
18 Jul 2012 - 8:05 pm | तिमा
आज फार उदास वाटते आहे. कालच मृणालताई गेल्या आणि आज ही बातमी! आमच्या कॉलेजवयात हे आमचे आयडॉल होते.
'जिंदगी ... कैसी है पहेली हाए' !!!
19 Jul 2012 - 2:00 pm | तिमा
शेवटी म्हणे तो म्हणाला, 'टाईमअप हो गया, पॅकअप'.
हे जरा अतीच होतंय! महात्मा गांधींच्या तोंडी काँग्रेसने असेच 'हे राम ' कोंबले होते.
18 Jul 2012 - 8:19 pm | प्रदीप
सुमारे १९८०- १ चा सुमार. तेव्हा मी सीप्झ येथील 'एस्क्वायर व्हिडीयो' येथे काम करत होतो. भारतीय चित्रपटांच्या होम व्हिडीयोचे परदेशातील वितरण हक्क विकत घेऊन त्यांच्या व्हिडीयो कॅसेट्स निर्यात करण्याचा आमचा धंदा होता. तत्कालिन आधुनिक उपकरणे वापरून आम्ही उभारलेला हा प्रकल्प तेव्हा अगदी अनोखा होता. फिल्म इंडस्ट्रीत त्याचे बरेच कुतूहूल होते. तेव्हा आमच्या त्या फॅक्टरीस त्य चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत व्यक्ति भेट देत असत. देव आनंद कामानिमीत्त अनेकदा तेथे आले, व्ही. शांताराम आले होते, हेमा मालिनी, झीमत अमान ह्याही येऊन गेल्या. आमच्या आजूबाजूस अनेक कारखाने होते. ह्या व्यक्ति तेथे आल्या की बातमी तात्काळ इतरस्त्र पसरत असे. प्रॉडक्शन लाईनीवरील मुलेमुली त्यांच्या सुपरव्हायजर्सना सांगून कामातून थोडीफार सूट घेऊन आमच्या गाळ्याच्या आजूबाजूस 'दर्शन' घेण्यासाठी गर्दी करत असत.
हे सगळे मुद्दाम इथे सांगायचे कारण, तेव्हाच्या दोन प्रमुख नटांच्या वेळी झालेल्या गर्दीतील प्रचंड तफावत. एकदा अमिताभ, त्याच्या कुटुंबियांसकट तेथे आला, त्यावेळी आजूबाजूच्या गाळ्यांतील कामकाज मला वाटते अक्षरशः बंद पडले. सगळ्या मुली बाहेर दर्शन घेण्यास आलेल्या! ह्याउलट राजेश खन्ना आला कधी व गेला कधी, आजूबाजूस काहीच गोंधळ नव्हता, सर्व शांत शांत होते. तेव्हाच अमिताभने राजेश खन्नाच्या पुढे किती बाजी मारली होती हे ह्यावरून कळावे! एकार्थी त्याची प्रथम स्थानावरून एक्झिट तेव्हाच झालेली होती.
19 Jul 2012 - 11:04 am | सहज
बीबीसीने बाँबे सुपरस्टार नामक एक माहीतीपट मालीका केली होती, १९७३ मधे. त्यात राजेश खन्नावर एक भाग होता युट्युबवर बघायला मिळेल.
तेव्हाच त्याचा तो प्रभाव उतरत होता हे दाखवले आहे. पण नंतर ह्या अस्थीर दुनीयेत तो एक-दोन दशके वर्ष टिकला हे आज एक मोठे यश मानावे लागेल. १९८० नंतर सौतन, अवतार, आखिर क्यों व अजुन काही हिट/सेमी हिट सिनेमे दिले.
लोकांच्या मनात अमिताभ, राजेश खन्ना ही परिहार्य तुलना होणे स्वाभावीक मानले तरी खुद्द अमिताभच्या शब्दात राजेश खन्ना या वलयाचा, पहिल्या वहिल्या सुपरस्टार असामीचा प्रभाव इथे वाचायला मिळेल. इथेच अमिताभ- राजेश खन्नाची तुलना संपावी. आजही तरुण राजेश खन्नाचा कोणताही सिन बघताना त्याचे ते हिंदी, संवादफेक त्यातले उतार चढाव पाहिले की आजचे हिंग्लीश बोलीवाले हिरो बाह्यरुप चकाचक करुन आले तरी भाषा का हरवून आले हे कोडे पडतेच.
माझ्या लहानपणी मी बडे बुजूर्ग लोक सैगल, अशोककुमार वगैरे नंतरच काका लोक दिलीपकुमार बद्दल बोलायचे व अमिताभचा फॅन असलेल्या मला, हे कसले कसले हिरो वाटून हसायला यायचे. कालाच्या ओघात अमिताभ-राजेश खन्ना यांनी सैगल, दिलीपकुमारची जागा घेतली असेल लोक आमिर, ऋतीकचे गोडवे गात असतील...
पण राजेश खन्ना तो राजेश खन्ना... सलाम! अलविदा!
19 Jul 2012 - 10:08 pm | sanjivanik१
तुमच म्हणण खटकतंय सर जरा. राजेश खन्ना नी जो इतिहास रचला तो इतक्या वर्षात तरी कुणी मोडू शकला नाही. यावरूनच ते प्रथम स्थाना पेक्षा पण पुढे होते हे सिद्ध होते. प्रत्येकाचा एक काळ असतो , तिथून त्याला तो कितीही मोठा असला तरी EXIT घ्यावी लागते, आणि त्याची जागा दुसरा कुणी घेतो. तेव्हा त्याने त्याच्या काळात काय करून दाखवलं हे जास्त महत्वाच .
19 Jul 2012 - 10:10 pm | sanjivanik१
तुमच म्हणण खटकतंय प्रदीप सर जरा. राजेश खन्ना नी जो इतिहास रचला तो इतक्या वर्षात तरी कुणी मोडू शकला नाही. यावरूनच ते प्रथम स्थाना पेक्षा पण पुढे होते हे सिद्ध होते. प्रत्येकाचा एक काळ असतो , तिथून त्याला तो कितीही मोठा असला तरी EXIT घ्यावी लागते, आणि त्याची जागा दुसरा कुणी घेतो. तेव्हा त्याने त्याच्या काळात काय करून दाखवलं हे जास्त महत्वाच .
19 Jul 2012 - 10:10 pm | sanjivanik१
तुमच म्हणण खटकतंय प्रदीप सर जरा. राजेश खन्ना नी जो इतिहास रचला तो इतक्या वर्षात तरी कुणी मोडू शकला नाही. यावरूनच ते प्रथम स्थाना पेक्षा पण पुढे होते हे सिद्ध होते. प्रत्येकाचा एक काळ असतो , तिथून त्याला तो कितीही मोठा असला तरी EXIT घ्यावी लागते, आणि त्याची जागा दुसरा कुणी घेतो. तेव्हा त्याने त्याच्या काळात काय करून दाखवलं हे जास्त महत्वाच .
18 Jul 2012 - 8:27 pm | जाई.
श्रध्दांजली
18 Jul 2012 - 8:44 pm | सुनील
बॉलिवूडच्या इतिहासातील १९७० ते १९७५ हा काळ फक्त राजेश खन्नाचाच होता. त्यापूर्वीही राज कपूर, देवानंद आदी लोकप्रिय नट होते ज्यांनी सुपर हिट चित्रपट दिले होते. पण "सुपर स्टार" हे बिरुद मिळविणारा पहिला नट म्हणजे राजेश खन्नाच!
असे म्हणतात, की त्या सुमारास एक आठवडा असा येऊन गेला, जेव्हा मुंबईतील सर्वच्या सर्व चित्रपटगृहात फक्त त्याचेच चित्रपट लागले होते. ह्याची सत्यासत्यता पडताळून पाहिलेली नाही, पण हे अशक्यही नसावे!
पुढे लोकांची आवड बदलली. चॉकलेट हिरोऐवजी अँग्री यंग मॅन हिरोचा जमाना आला (दिवार, शोले नंतरचा काळ) आणि राजेश खन्नाची सद्दी संपली, अमिताभ युग सुरु झाले (वर प्रदीप यांनी हेच म्हटले आहे).
अर्थात, त्याच्या यशात त्याला मिळालेल्या गाण्यांचा वाटाही लक्षणिय आहे.
राजेश खन्ना यांना श्रद्धांजली!
18 Jul 2012 - 9:00 pm | जेनी...
आज अगदि आजहि ...तेवढच ताजं वाटतं हे पाहुन ,ऐकुन ...
18 Jul 2012 - 9:24 pm | अर्धवटराव
गेला काका :(
अर्धवटराव
18 Jul 2012 - 9:07 pm | रेवती
:(
मी त्यांचे दोनेक चित्रपट पाहिले असतील त्यामुळे प्रसिद्धीबद्दल नुसते ऐकून आहे.
असो. झाले ते वाईट झाले. ७० वर्षे वय बघता लवकर गेले म्हणायचे.
18 Jul 2012 - 9:24 pm | अर्धवटराव
नफरत कि दुनीया को छोड के प्यार कि दुनिया मे...
खुष रेहेना मेरे यार.
बावर्ची आनंद अमर रहेगा.
अर्धवटराव
18 Jul 2012 - 10:12 pm | प्रचेतस
:( :( :(
18 Jul 2012 - 10:51 pm | अशोक पतिल
राजेश खन्ना........ पहिला सुपरस्टार ! ........ रोमान्टिक नायक...
आज एक पर्व समाप्त....
कुठेतरी आतमधे... विषण्ण वाटतेय....
या वर्षात शम्मी कपूर...देव आनंद.....दारासिंग....व आता राजेश खन्ना.
आम्हा भारतीया चे भावविश्व सिनेमा व कालातीत गाणी यानींच व्यापलेले .....
कुठेतरी जूने गाणे कानावर एकू यावे..व.. क्षणात....मन त्या काळात चिबांवे...
तसेच या रटाळ आयुष्यात राजेश खन्ना...अमिताभ...देव आनंद..लता...रफी....किशोर...राज..शशी...शम्मी कपुर.. इ. नेच रंग भरावे.
कोणी जवळचे गेले तरी दुख्ख होते...पण भावविश्वातिल सहचर गेल्यावर हुरहुर मनात दाटते.मन विषण्ण होते.
इश्वर त्यांच्य आत्म्याला शातिं देवो.
18 Jul 2012 - 11:10 pm | शिल्पा ब
राजेश खन्नाचे बरेच चित्रपट पाहीलेत. मी लहान असतानापासुनच एकदम आवडला होता राजेश खन्ना. एकदम "हीरो" !
:( मरण कुणाला चुकलंय म्हणा!
19 Jul 2012 - 12:47 am | शकु गोवेकर
अरे ओ पुष्पा,ये क्या हुआ,छोडो बेकार की बाते --
ईत्तेफाकम राजेश खन्नम्,काकावर हिन्दि चित्रपटवाल्यांचे ईतके प्रेम कि किशोर दानी त्याच्यासाठी खास पंक्ती म्हटल्या
व मेहमुदने बोम्बे टु गोआ मधे बस ड्रायवर व कंड्क्टर म्हणुन राजेश व खन्ना ही नावे घेतली
मी त्याना पुणे स्टेशन जवळ आशिर्वाद हाटेल जवळ सन १९७०-७१ मध्ये अंजु महेन्द्रु बरोबर फिरताना पाहीले आहे
काका जरी पंजाबी होते तरी त्यांनी केवळ एका पंजाबी चित्रपटात काम केले
त्यांचा बाल पणी चा मित्र जीतेन्द्र याच्या बरोबर फक्त एका हिन्दी फिल्म मधे काम केले आहे
काकाजी आप अमर हो- क्योकी आपने शर्मिला टागोर के साथ अमर प्रेम मे काम किया--
काकाला साश्रु नयनांनी श्रध्यांजली --
19 Jul 2012 - 7:51 pm | वेताळ
काकानी शेवटचा चित्रपट वफा हा केला. त्याची नायिका होती लैला खान ती पण बिचारी मेली.दोघांच्या पण आत्म्याला ईश्वर शांती देवो.
19 Jul 2012 - 7:52 pm | वेताळ
काकानी शेवटचा चित्रपट वफा हा केला. त्याची नायिका होती लैला खान ती पण बिचारी मेली.दोघांच्या पण आत्म्याला ईश्वर शांती देवो.
19 Jul 2012 - 9:27 pm | सुमीत भातखंडे
.
20 Jul 2012 - 2:48 am | मैत्र
आनंद, आराधना, अमर प्रेम, बावर्ची, सफर, खामोशी, कोरा कागज...
राजेश खन्नावर चित्रित गाणी सुरेल होती पण ती अजून स्मरणीय झाली कारण 'काका' त्या गाण्यात 'अभिनय' करत नव्हता. तर सहजपणे त्या गाण्यामध्ये वावरत होता..
एका अप्रतिम कलाकाराला श्रद्धांजली...
वर अनेकांनी म्हटल्या प्रमाणे - "आनंद मरा नहीं. आनंद मरते नहीं"
20 Jul 2012 - 7:02 am | शिल्पा ब
<<राजेश खन्नावर चित्रित गाणी सुरेल होती पण ती अजून स्मरणीय झाली कारण 'काका' त्या गाण्यात 'अभिनय' करत नव्हता. तर सहजपणे त्या गाण्यामध्ये वावरत होता..
+ १
22 Jul 2012 - 12:27 pm | कलंत्री
आज लोकसत्तामध्ये राजेश वर बरेच चांगले लेख वाचायला मिळाले. अमिताभ, सचिन, सिमा देव इत्यादींचे, यात एक आठवण दिली गेली आहे, की राजेशने डिंपल नावाचा बंगला घेतला आणि त्याचे नामकरण आशिर्वाद असे ठेवावे असे त्याच्या वडिलांनी सुचवले. कारण असे की कोणी काही पत्रे लिहिली /टिका केली तर पत्र पाठवतांना "राजेश खन्ना, आशिर्वाद" असे लिहिणारच.
एकंदरीतच राजेश खन्ना यावरील विवीध लेख वाचण्यात आले आणि चित्रपट सृष्टी तील आपल्याला वाटणारे प्रेम आणि आत्मियता किती गाढ आहे याचा प्रत्यय आला.
खरेतर या सर्व लेखांचे एक चांगले पुस्तक होऊ शकेल असे वाटते.
22 Jul 2012 - 9:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही सुंदर गाणी.
-दिलीप बिरुटे