"सत्यमेव जयते" मधली दारु बद्दल ची चर्चा वाचुन हा धागा काढण्याची प्रेरणा मिळाली.
माझ्याबद्दल सांगायचे तर , आमच्या शेजारचे काका रोज प्यायचे , कधी कधी मला त्यांचा चखणा आणायला पिटाळायचे.
एकदा त्यांचा ग्लास भरुन ठेवलेला होता अन ते जाग्यावर नव्हते तेंव्हा मी "पहिला घोट " घेतला होता. चव काही विशेष आवडली नाही, त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही.
पुढे मग इंजिनियरींग करताना पहिल्यावर्षी चा निकाल लागण्यापुर्वी "निकालच" लागण्याच्या भीतीने २-३ दिवस झोप लागली नव्हती , त्यातुन सर्दी- खोकल्यामुळे जाम झालो होतो. निकाल लागल्यावर एटी केटी च्या कृपेने वरच्या वर्गात पोहोचलो होतो , मग मित्रांनी आणलेल्या ओल्ड मोंक ची २-३ झाकणे नुसती प्यालो अन काय कमाल दुसर्या दिवशी सर्दी-खोकला गायब.
तर मंडळी ..."आपण पहिला घोट कधी घेतला ?" याबद्दल मिपा करांचे अनुभव वाचायला आवडेल
प्रतिक्रिया
1 Jul 2012 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा
पहिलाच घोट घातक...!
1 Jul 2012 - 8:43 pm | मोदक
+१ हेच बोल्तो...
नक्की काय मजा मिळते दारू पिवून?
ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा ताबा जातो / कमी होतो ती वस्तू कशी काय Enjoy करता येते???
1 Jul 2012 - 9:15 pm | पक पक पक
जावे त्यांच्या देशा..... ;)
1 Jul 2012 - 9:56 pm | शुचि
मैत्रिणींनी कार घेतल्याची पार्टी केली. त्या प्याल्या तेव्हा मी विचारलं प्याल्यावर काय मजा मिळते? ती म्हणाली - स्वप्नात कसं तरंगल्यासारखं वाटतं, हलकं हलकं वाटतं तसं वाटतं.
1 Jul 2012 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा
@नक्की काय मजा मिळते दारू पिवून? >>> जो आनंद(रिलेक्सेशन) तुंम्हाला एखादा पदार्थ खाऊन/एखाद्या ठिकाणाला भेट देऊन/एखादी आनंद दायक कृती करुन मिळतो,तोच आनंद व्यसनी(अॅडिक्ट) लोकांना त्यांचं अवडत व्यसन करुन मिळतो,आणी ती कृती पुनःपुन्हा कराविशी वाटते.
@ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा ताबा जातो / कमी होतो ती वस्तू कशी काय Enjoy करता येते???>>> तुमचं हे मत व्यसनी लोकांच्या दांभिक आचाराची परिणीती आहे. ताबा जायला सुरवात झाल्यानंतर,किंबहुना काहिशी त्याच्या अधीच ही एन्जॉय मुव्हमेंट संपलेली असते,आणी पुढे सुटता येत नाही,म्हणुन अडकलेपण शिल्लक राहिलेलं असतं.तरिही हे सत्य कबुल करायचं धाडस व्यसनी माणसात नसल्यामुळे/किंवा त्यानी ते नीटसं ओळखलेलं नसल्यामुळे,तो माणुस मी ''हे'' एंजॉयमेंट साठी करतोय,असं सांगत असतो.
2 Jul 2012 - 1:18 am | प्रभाकर पेठकर
त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही.
मग मित्रांनी आणलेल्या ओल्ड मोंक ची २-३ झाकणे नुसती प्यालो
ही पाठोपाठची दोन्ही वाक्ये एकाच माणसाची आहेत? कदाचित दोन वाक्यांमध्ये 'कॅडबरी ५ स्टार' खाल्ले असावे. (मास्टर, पिताजी की पँट एक बिलान कम कर दो|)
2 Jul 2012 - 10:54 am | कुंदन
>>त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही.
म्हणजे पाणी टाकुन प्यायच्या ;-) , असे मला म्हणायचे होते.
पेठकर काका , आय टी मध्ये शिरलात काय हल्ली हल्ली , नाय तुमचा छिद्रान्वेषी पणा फार वाढलाय हल्ली. ;-)
(छिद्रान्वेषी व्यवस्थापकाचा मित्र ) -कुंदन
2 Jul 2012 - 9:54 am | ५० फक्त
ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा ताबा जातो / कमी होतो ती वस्तू कशी काय Enjoy करता येते??? - वैश्विक सत्य,
ही गोष्ट बायकोच्या बाबतीत सुद्धा लागु होते.
2 Jul 2012 - 10:01 am | गणपा
अण्भव.. अण्भव बोलतो तो असा. ;)
2 Jul 2012 - 10:49 am | डावखुरा
कसे लगेच पटले पहा गणपांना..
4 Jul 2012 - 3:20 pm | रणजित चितळे
दारू प्यालेल्यांच्या लिला बघता बघता मजा इतरांना येते.
1 Jul 2012 - 6:19 pm | मराठमोळा
>>ओल्ड मोंक ची २-३ झाकणे नुसती प्यालो अन काय कमाल दुसर्या दिवशी सर्दी-खोकला गायब.
आनि त्यानंतर.. ;)
असो, शतकवीर दंगेखोरांच्या प्रतिक्षेत :)
1 Jul 2012 - 9:14 pm | पक पक पक
त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा धंदा तेव्हापासुनच बसला... :bigsmile:
2 Jul 2012 - 6:41 am | स्पंदना
हा हा हा!
अस?
मग काय बारवाल्याचा वाढला का काय?
2 Jul 2012 - 9:46 am | प्यारे१
>>>मग काय बारवाल्याचा वाढला का काय?
झमझम बारच्या मॅनेजरचा! ;)
कुंद्या मारतंय आता!
1 Jul 2012 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्सुकता, मित्र-मंडळींचा आग्रह, कार्यालयातील पार्टी, हाय-फाय सोसायटीतली स्ट्रारहॉटेलातील पार्टी, बीयर म्हणजे दारु नसते, आनंद-दु:ख, रिलॅक्स वाटावं म्हणुन किंवा सत्यमेव जयतेच्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे अनुवांशिकतेत असतंच फक्त सुरुवात होण्यासाठी निमित्त लागतं, अशा कारणाने पहिला घोटाची सुरुवात होते आणि मग पॅकचं प्रमाण वाढत चालतं. काहींना कळतं कुठे थांबायचं. काहींना नाही. आणि आयुष्याच्या परवडीला सुरुवात होते. काहींना परत येता येतं. काहींना नाही.
आपण पहिला घोट कधी घेतला ?
अवघड प्रश्न विचारला. :)
-दिलीप बिरुटे
1 Jul 2012 - 7:13 pm | मन१
प्रतिसाद मला समजला नाही की तुम्हाला तेच म्हणायचय?
उत्सुकता, मित्र-मंडळींचा आग्रह, कार्यालयातील पार्टी, हाय-फाय सोसायटीतली स्ट्रारहॉटेलातील पार्टी, बीयर म्हणजे दारु नसते,
हा मला भारतात चाललेला अपप्रचार वाटतो बियरवाल्यांकडून. प्यायला हरकत नाही हो, पण पिउन वर आम्ही "दारु" पीत नाही असं का म्हणायचं? आपले सोकाजी बघा...झोकात सांगतात, घेतो तर घेतो, रसिकतेनं घेतो,चवीचवीनं घेतो; आडवळणे नाहित. ह्यानं संवाद सोपा होतो.
बीयर, व्हिस्की, रम,वाइन, वोडका,विविध कॉकटेले, फेणी,ताडी ह्यांना बोलीभाषेत दारुच म्हणतात की . कुणी गव्व्हापासून बनिवतेत तर कुणी तांदूळ, द्राक्षापासून. जर प्रत्येकानं सांगायला सुरुवात केली की आमचे पेय दारु नाही, तर कमाल आहे.
ता क :- सत्यमेव जयते पाहिलेले नाही.
1 Jul 2012 - 9:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला असं म्हणायचं आहे, की कोणतंही पिणं काही प्रतिष्ठेचं नाही. आता ते प्रतिष्ठेचं होत चाललं आहे, तो भाग वेगळा. अल्कोहलचं प्रमाण कशात किती आहे, भाग वेगळा. पण, ड्रिंक्स (आपल्या सोकाजीच्या वाईनच्या गोष्टी सोडुन द्या) चवी-चवीनं घेणं ही नंतर सवय होते आणि अशा व्यसनापासून दूर होता येत नाही, असं मला म्हणायचं आहे. आणि असं हे पिणं कधी सुरु होतं. कधी मित्रमंडळी आग्रह करतात. कधी एखादी पार्टी असते, कधी स्वतःतच पिण्याची उत्सुकता निर्माण होते असं म्हणायचं आहे.
सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमात काही मुली म्हणत होत्या की एखादा पेग घेतला की डान्स करायला उत्साह संचारतो. कुछ कुछ हलका हलका लगता है म्हणुन पिणारे होते. आणि मग हे पिणं माणसाला कुठे घेऊन जातं त्या पहिल्या घोटाची कहाणी कुठुन सुरु होते त्याबद्दल मी बोलत होतो.
-दिलीप बिरुटे
1 Jul 2012 - 6:58 pm | कानडाऊ योगेशु
होस्टेलमध्ये काही दिवस एका मित्राच्या रूमवर पॅरासाईट म्हणुन राहत होतो. मी दारू सिगारेट त्याआधी कधी प्यायलो नव्हतो. मित्र रोज संध्याकाळी पिऊन यायचा आणि "साX चुX तुला लेकाला ऐशच करता येत नाही!"
.असा उध्दार करायचा.
हे रोजच चालायचे.एके दिवशी म्हटले दाखव मला तुझी ऐश.आणि तिथे सिगारेट दारूशी पहीली ओळख झाली.
त्यादिवशी इतकी पिली कि मित्र घाबरुन रूममध्ये कोपर्यात गपचुप बसला होता.त्यानंतर मात्र त्याने कधी उध्दार केला नाही.
दारुचे व्यसन असे काही लागले नाही.पण सिगारेट मात्र मानगुटीवर बसली.आणि ती सोडायल जाम प्रयत्न करावे लागले.
एकदा तर वर्ष दिडवर्षाच्या गॅपनंतर पुन्हा ओढायला सुरवात केली होती.
नंतर मात्र निग्रह करुन सोडली.
पण माझ्या त्या मित्राची अजुन काही सुटली नाही.
"यार सिगारेट घेतली नाही तर सकाळी प्रेशरही येत नाही" अशी त्याची समस्या होऊन बसली आहे.
आज कधीतरी फोनाफोनी झाली वा प्रत्यक्ष भेट झाली तर मी त्याला म्हणतो
"साX चुX तुला लेकाला ऐशच करता येत नाही!"
आणि तो ही खरंय म्हणतो.
1 Jul 2012 - 7:15 pm | मन१
आधी चर्चाप्रस्ताव वाचून आपण "कुनाच्या नरडीचा घोट प्रथम घेतलात" अशा अर्थाचा सवाल आहे का काय असे वाटले.
अर्थातच ते(ही) कधी केलेले नाही.
1 Jul 2012 - 7:20 pm | कुंदन
फारच छिद्रान्वेषि झालेला दिसतोयस मनोबा हल्ली....
>>"कुनाच्या नरडीचा घोट प्रथम घेतलात"
कधी गचांडी तरी पकडली आहेस का कोणाची? नाना पकडतो तशी? ;-)
1 Jul 2012 - 7:29 pm | मन१
निव्वळ समाजसेवा न केल्याबद्दल कुणीतरी येउन माझ्याच नरडीचा घोट घेइल असं वाटतय. ;)
1 Jul 2012 - 7:20 pm | चौकटराजा
ब्रँडी जर लिकर मधे मोडत असेल तर २० व्या वर्षी एक चमचा घेतली. एक चमचा बरोबर एक घोट हे बरोबर असेल तर त्यावेळी एक घोट घेतली. त्यानंतर भुशी डॅम येथे गच्च भिजलो असताना पाव ग्लास व्हिस्की ( डायल्यूट न करता ) घेतली. दोन्ही वेळेस औषध या स्वरूपात
फायदाच झाला. पण दारू पिण्यात काय आनंद असतो रे भाउ ? याचे उत्तर कोणी देइल काय?
आयला, आपल्याला करंटा म्हणा हवंतर ! आपल्याला प्रतापगडावरचे ताकच आवडले जास्त !
1 Jul 2012 - 9:21 pm | पक पक पक
फायदाच झाला. पण दारू पिण्यात काय आनंद असतो रे भाउ ?
आता फायदा काय झाला ते सांगा आजोबा ;) आनंदाच काय घेउन बसलात तो मानण्यावर असतो... :)
1 Jul 2012 - 8:12 pm | निनाद मुक्काम प...
आमच्या कॉलेजात एक कंपनी टच भाय होता.
त्याचे संपूर्ण घराणे हे कंपनीमय होते. आणि आर्थर रोड मध्ये बहुसंख्य नातेवाईक.
त्यांच्या वाढदिवसाला मला आमंत्रण मिळाले.आमचे वडील चेंबूर वॉर्डात मनपा चे अधिकारी आहेत ही बातमी त्याच्या कानावर आल्याने त्याने माझ्याशी ओळख व्हावी ह्या विशुद्ध हेतूने मला आमंत्रण दिले होते
( नाही जाऊन सांगणार कोणाला )
त्याने एकच प्याला माझ्या हातात दिला व म्हणाला
पोटभर पी
त्याचा आग्रह आणि निग्रह पाहून मी पहिला प्याला एका दमात रिता केला. .
1 Jul 2012 - 9:26 pm | नितिन थत्ते
दारू पिणे वाईट असते.
मी पहिला ग्लास इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षाला असताना घेतला. (तेव्हा अमुक दारू वगैरे भेदभाव ठाऊक नव्हते. जी मिळाली ती - रम होती).
आताही अधूनमधून घेतली जाते.
तुम्हाला कोणा मित्राला भेटल्यावर त्याच्याबरोबर दारू प्यायलाच हवी असे वाटत असेल - तर ठीक नव्हे
दारू पिण्याचे निमित्त म्हणून मित्राला भेटत असाल- तर ते त्याहूनही वाईट.
तसे होत नाही तोवर काळजी नसावी.
2 Jul 2012 - 12:02 am | शिल्पा ब
कोणतंही व्यसन वाईटंच. दारु असो पत्ते असो का अजुन काही.
2 Jul 2012 - 12:15 pm | मोदक
ओशो म्हणतात सवय वाईट मग दारू असो की जपमाळ.
2 Jul 2012 - 12:51 pm | प्यारे१
तसं पाहिलं तर बरोबर आहे विधान पण मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणं,
चांगल्या व्यसनाला सवय तर वाईट सवयीला व्यसन म्हणावं लागतं...!
व्यायामाच्या व्यसनाला (ठराविक वेळी नि केलीच पाहिजे , नाही केलं तर बेचैन होतं अशी सवय ) चांगलं म्हणावं की वाईट?
वाचनाची, अभ्यासाची, फिरण्याची अशा अनेक सवयींना ह्या व्यसनांचीच 'संवादी ' रुपे म्हणता येईल.
बाकी मिपावर बरीच चांगली वाईट 'व्यसने' आहेत म्हणा! ;)
2 Jul 2012 - 12:33 am | चतुरंग
-
2 Jul 2012 - 12:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
उद्या विचाराल व्हर्जिनिटी कधी गेली. तुझ्या जिभेला काही हाड?
2 Jul 2012 - 1:08 am | आनंदी गोपाळ
प्रेषक अत्रुप्त आत्मा (यांचेकडून साभार)
पहिलाच घोट घातक...
2 Jul 2012 - 1:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
:D
2 Jul 2012 - 11:07 am | प्रभाकर पेठकर
उद्या विचाराल व्हर्जिनिटी कधी गेली.
फारच मिळमिळीत प्रश्न आहे. लोकं लग्नाची तारीख देऊन मोकळे होतील.
प्रश्न, 'विवाहापूर्वी किती आधी व्हर्जिनिटी गेली/घालवली?' असा पाहिजे. म्हणजे चर्चा जरा चमचमीत होईल.
2 Jul 2012 - 10:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लोकांच्या तारखा समजल्यामुळे चमचमीतपणा येत असेल तर ... अरेरे! असो.
काका, तुम्ही (आणि मी सुद्धा) अशा प्रश्नांचा विचार करता म्हातार्या व्यक्ती आहोत. भारतात 'एज ऑफ कन्सेंट' १८ आणि २१ आहेत (यावरून थोडे घोळ आहेतच). तर ज्यांची वयं १८ + वर्गमूळ (१८), २१+ वर्गमूळ (२१) यापेक्षा अधिक आहेत ते लोकं वयस्क. त्यांची सध्याच्या ट्रेंड्सबद्दल असणारी माहिती परहस्ते आलेली समजावी.
-- ९९_१०० बळचकर
2 Jul 2012 - 11:48 pm | सोत्रि
एका मित्राच्या लग्नात त्याच्या बायकोच्या 'तारखांचा' घोळ होउन त्याचे 'मनोरथ' लांबणीवर पडले होते त्याची आठवण झाली आणि तुमचा लग्नाच्या तारखेचा मुद्दा निकालात निघाला :)
- (चमचमीत) सोकाजी
5 Jul 2012 - 9:30 pm | आनंदी गोपाळ
तारखा काढतांना पंचांग हातात घेतल्याबरोब्बर अडचण आहे का असे गुरुजी विचारतातच. काही तरी वेगळाच घोळ असणारे...
किंवा गुरूजींची चूक
(बरोबर) गोपाळ
2 Jul 2012 - 1:34 am | प्रभाकर पेठकर
'आपण पहिला घोट कधी घेतला?' ह्या शीर्षकात कसला घोट हे न दिल्याने सांगतो. पहिला घोट जन्मतःच (दुधाचा) घेतला.
पण, पुढे विषय दारुकडे वळला. तेंव्हा तो घोटही, माझ्या तान्ह्या वयात मला जबरदस्त सर्दी झाली असता, वडीलांनी स्वहस्ते, गोकर्णाने ब्रँडीच्या स्वरूपात दिला.
पिणं वर्ज्य नाही पण, मिपाखेरीज इतर कुठलेच व्यसन नाही.
2 Jul 2012 - 1:40 am | शिल्पा ब
कोणतंही व्यसन वाईटंच बरंका आजोबा! एक आपुलकीने सांगितलं इतकंच.
2 Jul 2012 - 1:47 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद बरं का आज्जीबाई. आयला, एवढं वय झालं पण इतक्या आपुलकीने कोणी सांगितलंच नाही.
2 Jul 2012 - 10:11 am | शिल्पा ब
कस्चं कस्चं! अहो आजोबा, नातंच आपुलकीने सांगणार! ह्हो क्की नै?
2 Jul 2012 - 10:15 am | प्रभाकर पेठकर
खरंय ग आज्जे (की तू ही आजोबाच आहेस?). काय काय गोष्टी नव्याने शिकायला लागताहेत पाहा.
2 Jul 2012 - 10:25 am | शिल्पा ब
तुमचा अभ्यास कमी पडतोय दुसरं कै नै!
2 Jul 2012 - 10:40 am | प्रभाकर पेठकर
शाळा-कॉलेजातही कमीच पडायचा. लहानपणापासून अभ्यासाचा भयंकर कंटाळा आहे.
तुमच्या सारख्या (गरजेपेक्षा) जास्त अभ्यास करणार्यांचा आदर करतो.
2 Jul 2012 - 1:56 am | आनंदी गोपाळ
त्या आमीरखानच्या नानाची टांग!
अहो,
आषाढी पासून चातुर्मास लागला.
लोक कांदे वांगे लसूणही खात नाहीत. दारवा बंद करतात अन हा भौ पारण्याच्या/करेच्या दिवशी दारूच्या नावाने भोभो करतोय ;)
(आमीरच्या नावाने संध्याकाळीच दोन थेंब शिंपडून आनंदात 'आजारी' पडलेला) गोपाळ
(Drinking is a disease....)
2 Jul 2012 - 11:32 am | नितिन थत्ते
आमीरखानच्या नानाची टांग म्हणताय म्हणून ठीक आहे.
आमच्या नानाविषयी बोललात तर तुमचीच टांग मोडण्यात येईल. :)
2 Jul 2012 - 12:19 pm | आनंदी गोपाळ
खात्रीचे औषध इथेच मिळते असे ऐकून आहे.
2 Jul 2012 - 11:34 am | चिंतामणी
अविनाशकाका मार्गदर्शक आहेत का????????
2 Jul 2012 - 12:20 pm | मोदक
मिपावरील मान्यवर महिलांच्या (स्वानुभवी) प्रतिसादाच्या प्रतिक्षेत... ;-)
2 Jul 2012 - 12:25 pm | सूड
प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ;)
2 Jul 2012 - 12:28 pm | मोदक
कोण रे? कोण कोण???
(सज्जन, सालस, सभ्य, सोज्वळ आणि निरागस) मोदक.
2 Jul 2012 - 12:34 pm | सूड
अभ्यास वाढवा !!
:D
2 Jul 2012 - 2:29 pm | चिगो
नुस्ता घोटच नाहे, पेग रिचवले.. ते पण व्हिस्की, वोडका, बियर आणि मॉकटेल्स पण. माझी सिलेक्ट झाल्याची / नोकरी लागल्याची पार्टी होती.. घरी आई-वडीलांना सांगून ठेवलेलं होतं, की पाजण्याची ऐपत येईल तेव्हाच पिणार. त्यादिवशीही घरी सांगितलं होतं की आता पितोय.. ;-)
बाकी दारुच्या दुष्परीणामांवर बोलत नाही. जोपर्यंत माझ्या दारु पिण्याने दुसर्या कोणालाही आर्थिक, मानसिक, शारीरीक, भावनिक त्रास होत नाही तोपर्यंत मी "दुष्परीणाम" होण्याइत्पत पितोय असं मला वाटत नाही. (कारण एवढं भान ठेवलं तर तुम्ही जास्त पिऊच शकत नाही.)
ह्याबाबतीत आपण लिंकनसाहेब का कुणाचंतरी वाक्य शिरोधार्थ मानतो.. "Your right ends where your hand touches my nose.."
2 Jul 2012 - 2:32 pm | तिमा
आमच्या लहानपणी वडील आम्हाला समुद्रावर पोहायला घेऊन जायचे. आम्ही किनार्यावरच लाटांत डुंबायचो, पण वडील पार क्षितिजापर्यंत पोहून यायचे. त्यानंतर त्यांच्या एका कोळी मित्राकडे जेवायला जायचो. तोही प्रेमाने आम्हाला भरपूर मासे, कोळंबी खाऊ घालायचा. तर असेच एकदा जेवायला बसलो असताना, मी डावरा असल्यामुळे पाणी प्यायला चुकून डावीकडचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला! अशा काही झिणझिण्या आल्या जिभेला! मी ओरडल्यावर सगळ्यांचे लक्ष गेले आणि एकच हास्यकल्लोळ झाला. माझ्या डावीकडे अर्थातच वडील बसले होते. तोच माझा पहिला घोट! (त्यावेळी वय वर्ष होते ५)
2 Jul 2012 - 10:38 pm | गोंधळी
अशा काही झिणझिण्या आल्या जिभेला!
अहो ते सॉफ्ट ड्रिंक असेल.
माझ्या मते मेंदुला झिणझिण्या येतात.असे पेय घेत्ल्यावर.
माझा पहिल्या घोटेचा अनूभव ईईईईईईईईई....... असा होता.वास ही बेकार होता( खंड्यापक्शी).
त्यापेक्षा आपली फ्रुट बीयर बरी.
3 Jul 2012 - 1:11 pm | तिमा
तसे असते तर आम्हालाही दिले असते की. शिवाय त्यानंतर तातडीने तो ग्लास माझ्यापासून लांब ठेवला नसता.
5 Jul 2012 - 9:35 pm | आनंदी गोपाळ
उजव्या हाताने जेवणारे लोक 'णार्मली' डाव्या हाताने पाणी पितात असा अनुभव आहे. तुम्ही डावरे असल्याने 'चुकून' कसाकाय ग्लास उचल्ला? :-w
2 Jul 2012 - 10:14 pm | गणपा
शाळेत असतानाचा पहिला? की कॉलेज मधला? की नोकरीला लागल्या नंतरचा? की हाता पायात बेड्या पडल्या नंतरचा पहिला?
धागाकर्त्याला नक्की कुठला 'पहिला' घोट अपेक्षित आहे?
2 Jul 2012 - 10:36 pm | कुंदन
मी सोदाहरण स्पष्टीकरण धाग्यात दिलेले आहे , गणपा सेठ.
शेवटी ज्याची त्याची समज , जाण ... वगैरे ....वगैरे
2 Jul 2012 - 10:29 pm | नर्मदेतला गोटा
मी दारु सोडली
घशाखाली
2 Jul 2012 - 11:58 pm | सोत्रि
पहिला घोट कधी घेतला ह्या प्रश्नात तसा काही दम नाही.
'कुठलीही' गोष्ट 'पहिल्यांदा' करतना त्यात एक अवखळपणा असतो, अतिउत्साही घाई असते, नवलाई असते. त्यामुळे चुका होतात / होऊ शकतात. पण एकदा का सवय झाली आणि त्यातली गंमत कळाली की मग जी काही मजा येते ते अशा प्रश्नांची उत्तरे देऊन कळणे शक्यच नाही. :)
- (रोजच, हा पहिला 'घोट' आहे समजणारा) सोकाजी
3 Jul 2012 - 2:57 am | प्रभाकर पेठकर
(रोजच, हा पहिला 'घोट' आहे समजणारा)
हम्म्म्म! म्हणजे रोजच अवखळपणा, अतिउत्साही घाई, नवलाई असते वाट्ट..! बSSSरं..! (ह. घ्या.)
3 Jul 2012 - 1:44 pm | सोत्रि
हो ना, त्याने होते काय की थरार वाढतो, रोज, पण अनुभवसिद्ध झाल्यामुळे चुका टाळल्या जातात :-D
-(हलकेच घेतलेला) सोकाजी
3 Jul 2012 - 12:05 pm | रुमानी
आपण पहिला घोट कधी घेतला ?
>>>>>अवघड प्रश्न विचारला.
अशि पळवाट बरी नाही ? कधितरीच संधी मिळते माणसाला......!
5 Jul 2012 - 1:57 pm | सर्जे
उत्तर खुप सोपं आहे. पहिल्यांदा ज्यावेळी हातात पगाराचे पैसे आले होते त्यवेळी. खुप विचार केला पण रहावल नही आणी घेतली. इथे मला पटलं (नवलाई असते त्यामुळे चुका होतात / होऊ शकतात)
पण पैसे नसतात त्या त्या वेळी सोडायाची.
5 Jul 2012 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार
दुसर्या घोटाच्या आधी.
5 Jul 2012 - 8:56 pm | प्रकाश घाटपांडे
मंग दुसरा घोट कवा घेतला?
पहिल्या घोटानंतर कि तिसर्या घोटाच्या आदुगर?