इयत्ता पाचवीत शाळेतल्या संगीत शिक्षकांकडून शिकलेलं व आजही तोंडपाठ असलेलं एक वऱ्हाडी लोकगीत.
माझे योगदान केवळ टंकण्याचे.
------------------------------
पावसानं इचीबहीन कहरच केला
गावच्या नदीले पूरच काय आला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
बुढीबी बाप्पा भल्ली गया काढून रडे
अन खोपड्यामध्ये इचीबहीन उठू उठू पडे
यक जन पलीकडे जाऊन बी आला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
नागोबुढा पोरीच्या घरीबी गेला
अन तुपासंगं पोयी खाऊन बी आला
तरी म्हने यक रस राहूनच गेला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
पायटी पायटी बुढा कानी गावातची दिसे
अन लोकाईकडे पाहून गालातची हसे
लोक म्हने काबे काऊन नाही मेला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
------------------------------
प्रतिक्रिया
21 Jun 2012 - 12:18 pm | बॅटमॅन
इचिभना!!!!!! भाईशेट्या आठवला :)
गाणे मस्त आहे हेवेसांनल.
21 Jun 2012 - 2:17 pm | शुचि
मस्त
21 Jun 2012 - 2:56 pm | अरुण मनोहर
वाहवा! अगदी गावच्या मातीतले!
21 Jun 2012 - 4:39 pm | परिकथेतील राजकुमार
सध्या कितवीत असता तुम्ही ?
21 Jun 2012 - 9:45 pm | श्रीरंग_जोशी
जर १८वी नंतर शिक्षण थांबले नसते तर यंदा २६वीत गेलो असतो...
शिकायच्या आवडीनेच मनोगतच्या शाळेत काही वर्षे गेलो अन अखेर मिपा महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
इथले शिक्षण एकदम झेपत तर नाहीये पण आपल्यासारखे गुरुजन असताना चिंता कशाची?
18 Jan 2016 - 8:42 pm | होबासराव
पावसानं इचीबहीन कहरच केला
गावच्या नदीले पूरच काय आला
अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला
येन्जॉय :))
18 Jan 2016 - 8:57 pm | कैलासवासी सोन्याबापु
अबे बम ख़ास!!! नागोबुडा!!
18 Jan 2016 - 8:59 pm | होबासराव
हे गानच लय बम्बाट हाय ना हो
18 Jan 2016 - 9:19 pm | मित्रहो
लइच आवडला.
19 Jan 2016 - 1:07 pm | उगा काहितरीच
मस्त आहे गाणं . असेच एक गाणे होते. नीटसे आठवत नाही पण अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण देताना वापरतात. "चाराण्याचं तेल आणलं
सासूबाईच न्हाणं झालं
भावोजीची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला
त्यात उंट पोहून गेला.." वगैरे वगैरे.
कुणाला माहीत आहे का ?
19 Jan 2016 - 1:40 pm | चांदणे संदीप
हे आम्हाला शाळेत असताना नववी किंवा दहावीला मराठीमध्ये अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणून शिकवले होते. अतिशय आवडते पद्य आहे हे!
खरं हे...
दमडीच तेल आणलं
सासूबाईच वेणी झालं
मामंजीची शेंडी झाली
भावोजीची ***(हे विसरलोय! नाहीतर फुल्यांचा वेगळाच अर्थ निघायचा!) झाली
उरलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला
उंट त्यात पोहून गेला.
...असं होत!
मग मीही एक प्रयत्न केलेला....
...गाडीत पेट्रोल दहाचं
कौतुक झालं नावाचं!
आता नीटसं आठवत नाहीये, कुठ लिहिलेलं सापडल तर परत व्यवस्थित टंकतो!
Sandy
19 Jan 2016 - 3:39 pm | उगा काहितरीच
हाहा हेच ते . पूर्णपणे आठवत नाहीये .