तुम्हाला जर कोणी विचारलं की धर्माचा आणि लोकसंख्या वाढीचा संबंध आहे का? आणि कसा? तर मला वाटतं बरीच लोक एका क्षणाचाही विलंब न लावता तावातावाने कसे क्ष धर्माचे लोक लोकसंख्या वाढीस कारणीभूत आहेत यावर तावातावाने बोलायला लागतील. काही जरा जास्त समजूतदार लोक लोकसंख्या धर्मावर नव्हे तर आर्थिक स्थानावर अवलंबून आहे असं म्हणतील.
पण जर एकून जागतीक लोकसंख्या, धर्म, लोकांचं सरासरी उत्पन्न या सगळ्या गोष्टी विचारात घेउन एक तक्ता आखला तर एक वेगळंच चित्र डोळ्यापुढे येतं.
हँस रॉसलिंग हा अशा प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स मधे रमणारा एक अवलिया. आजवर त्याने अनेक व्याख्यानांमधून लोकसंख्या, लोकांचं राहाणीमान, आर्थिक / सामाजिक परिस्थिती वगैर अनेक परिमाणांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवून देत आणलाय. हा लेखाचं कारण म्हणजे त्यांच नुकतंच पाहण्यात आलेलं एक व्याख्यान. या व्याख्यानादरम्यान त्यांनी जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर कसा कमी होत गेला, त्यामागे काय कारणं आहेत याचा आढावा घेतला आहे पण तोही त्यांच्या नर्म विनोदी शैलीत. विशेषतः एखाद्याने क्रिकेट कॉमेंट्री करावी तशा प्रकारे ते वेगवेगळ्या आलेखांची धावती कॉमेंट्री करतात ते तर बघण्यासारखंच आहे.
(विडियो १३ मिनिटांचा आहे)
जर वर विडियो दिसत नसेल तर त्याचा दुवा इथे देत आहे.
http://www.ted.com/talks/hans_rosling_religions_and_babies.html
टेड वर यांची बाकीची सगळी व्याख्यानं बघायला मिळतील.
(टीपः या लेखाचा उद्देश मला स्वतःला आवडलेलं काही तुम्हाला सांगावं, शेअर करावं इतकाच आहे.)
प्रतिक्रिया
22 May 2012 - 10:22 pm | रमताराम
लोकसंख्या वाढीचं कारण धर्म आहे की नाही ते पाहू/वाचूच आम्ही. आमचे वैयक्तिक मत (विदा मागू नका) मात्र नेमके उलट आहे. धर्म हा लोकसंख्या 'घटवण्याचे' एक मोठे हत्यार आहे हे मात्र इतिहास आम्हाला सांगतोय. :)
23 May 2012 - 4:03 pm | नाना चेंगट
सहमत आहे.
याचबरोबर भविष्यात धर्म हाच लोकसंख्या घटवण्याचे कार्य करेल.
हे कार्य दोन (किंवा अधिक ) धर्माला मानणार्यांमधील युद्धाने होईल
किंवा धर्म मानणारे आणि धर्म न मानणारे यांच्यातील युद्धाने होईल. :)
काहीही झाले तरी धर्म (मानणे वा न मानणे) आणि युद्ध याचा संबंध सतत असणार आहेच :)
22 May 2012 - 11:40 pm | दादा कोंडके
वपुंचे स्टॅटीस्टीक्स मराठे आठवले.
बाकी ते एक्सेल सारखं टूल आपल्याला जाम आवडलं. :)
23 May 2012 - 1:12 pm | अविनाशकुलकर्णी
मुसलमन लोक बच्चे ज्यादा पैदा करतात.
कारण एक डोके एक मत..
आज भारताच्या लोकशाहि वर मुसलमानाचा काबु आहे.
यु पी चे उदाहरण ताजे आहे.
ज्याच्या बाजुने एक गठ्ठा मुस्लिम मते त्याचे सरकार..
धर्माचा आणि लोकसंख्या वाढीचा संबंध असा आहे भारतात...
आज भारत सर्वात जास्त मुसलमान असलेला देश आहे.
म्यानमार स्वतंत्र झाल्यावर त्यांनी ४० लाख मुसलमान हाकलले.
व राज्यसभेतील
जमियत उलेमा ए हिंद चे खासदार मेहमूद मदनी यांनी संसदेत अशी मागणी केली
आहे कि म्यानमार मधून हाकलून लावण्यात आलेल्या ४० लाख मुस्लिमांना
भारतामध्ये शरण देण्यात यावी आणि त्यांची व्यवस्था लावून देण्यात यावी
23 May 2012 - 4:57 pm | JAGOMOHANPYARE
जागतिक लोकसंख्या.. %
ख्रिश्चन ३०
मुसलमान २५
निधर्मी १८
हिंदु १४
बौद्ध ६
इतर उरलेले.
23 May 2012 - 5:05 pm | यकु
>>हँस रॉसलिंग हा अशा प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स मधे रमणारा एक अवलिया. आजवर त्याने अनेक व्याख्यानांमधून लोकसंख्या, लोकांचं राहाणीमान, आर्थिक / सामाजिक परिस्थिती वगैर अनेक परिमाणांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखवून देत आणलाय.
-- गुड ! त्याला जे दिसतं ते तो सांगतो, आणि आपणही म्हणतो ते तसंच आहे ! गुड, गुड एन्टरटेन्मेंट.