१९ मे की २० मे यावर यथासांग काथ्याकूट होऊन १९ मे रोजी कट्टा (एकदाचा) ठरला. ठाणे मुंबईत आहे का नाही इ. इ. प्रश्न उद्भवू नयेत याची खबरदारी म्हणून परळ (हुच्चभ्रूंनी "अप्पर वरळी" असे वाचावे) येथील "व्हेज ऑलवेज" ही जागा ठरवण्यात आली (धन्स टू प्रासभौ). नेमके याच नावाचे एक हॉटेल के.ई.एम.समोर (परळ - ईस्ट) येथे असल्याने माझा गोंधळ झालाच. मग अमोल खरे, वि.मे. यांच्या 'मार्ग'दर्शनानंतर योग्य जागी पोहोचलो. मी येईपर्यंत हॉटेलच्या आवारात खुर्च्या मांडून अमोल खरे, स्पा, चचा, सौरभ उप्स, जयपाल, प्रास, पुष्कर, विमे यांची गप्पांची मैफल रंगली होतीच.
थोड्याच वेळात मस्त कलंदर - निखिल देशपांडे जोडीचेही आगमन झाले. अनेक सदस्य प्रथमच भेटत असल्याने पहिली ओळख परेड झाली. ७ वाजत आल्याने सर्वजण हॉटेलात प्रवेशकर्ते होऊन नव्याने गप्पांचे फड रंगले. हास्य-विनोदाचा स्वर इतका टिपेला पोचला की तिथल्या कॅप्टनने अगदी क्रिप्टीक शैलीत आवाज कमी करायला सांगितले. त्याच्या सूचनेचा अर्थ लावण्यात कमीत कमी १० मिनिटे गेली. ११ मिपाकरांना एका वाक्यात बुचकळ्यात टाकणार्या त्या कॅप्टनचे मला खरोखरच कौतुक वाटले. नवमिपाकर मी-कस्तुरीचेही तेवढ्यात आगमन झाल्याने पुन्हा एक ओळख परेड झाली.
तिघात एक या हिशेबाने टेबलवर ४ मेनुकार्डे, नव्हे, मेनुबुक्स येऊन पडली. त्या पुस्तकांचा आकार बघूनच अनेकांनी मेनु ठरवण्याच्या जबाबदारीतून आपले अंग काढून घेतले. अभ्यासू प्रासभौनाच ही जबाबदारी सोपवण्यात आली. इकडे विमे व मक यांनी 'शाळा' व 'गमभन' या कलाकृतींचा तौलनिक अभ्यास अन्य सदस्यांपुढे मांडला. महाविद्यालयीन एकांकिकांचे कमर्शियल नाटकात रुपांतर करताना येणार्या अडचणी इतक्या प्रभावी शैलीत सांगितल्या की "हा माणूस टीसीएसमध्ये का मरतोय?" असा प्रश्न कुणालाही पडावा. दुसर्या बाजूला प्रास-पुष्कर-जयपाल कायद्याचा किस पाडत होते.
समोर आलेल्या स्टार्टर्सचा फडशा पाडत असतानाच दोन गहन प्रश्न समोर आले ते म्हणजे- १] नि.दे.- म.क. यांतील खरा संपादक कोण? व २] स्पाचा/ची 'सत्या' कोण? दोन्ही प्रश्नांना ज्या तर्हेने बगल देण्यात आली त्यावरुन तिघेही मुरलेले मिपाकर आहेत याची (पुन्हा) खात्री पटली.
प्रासभौंच्या बाजूला बसलेल्या कस्तुरीचा आवाज क्वचित का होईना, पण येत होता. मग तिने (कंटाळून की वैतागून?) जागा बदलली व मकतैपाशी बसली. मक व कस्तुरीचे बोलणे हे जॉब इंटरव्ह्यु किंवा वायवा एक्झामपेक्षा वेगळे वाटतच नव्हते. चचा व सौरभ उप्स श्रवणभक्तीत दंग होते.
मेन कोर्स येईपर्यंत पूर्वनियोजित कामांसाठी प्रास व कस्तुरी यांनी कल्टी घेतली होती. मग मिपावरील सिझलिंग आयडींबद्दल चर्चा करत सिझलर्स संपले देखील. बाहेर बरेच लोक उभे असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर थोडे उपकार करत बिल देऊन बाहेर आलो. निदे - मक यांना काही कारणाने लवकर निघायचे असल्याने आपसूकच सर्वजण पांगलो. तीन-साडेतीन तास चाललेल्या गप्पाही कमीच असतात. निदे-मक-विमे यांना निरोप देऊन मी, जयपाल, स्पा, सौरभ उप्स, चचा व अमोल खरे परळ स्टेशनकडे मार्गस्थ झालो. तिथे अमोलला निरोप दिला व टिटवाळा गाडीत गप्पांचा सिलसिला पुन्हा चालू झाला. स.प.रा. यांनी इथे सूक्ष्मलहरीरुपात अवतीर्ण होऊन संवाद साधला. शेवटपर्यंत चचाने एकही कविता ऐकवली नाही याबद्दल त्याचा निषेध करत सर्वजण तृप्त मनाने सुखरुप घरी पोचले.
प्रतिक्रिया
20 May 2012 - 12:58 pm | पैसा
वृत्तांत मस्त लिहिलायस रे अन्या! फोटो कुणी काढलेत की नाही?
20 May 2012 - 8:02 pm | jaypal
ठरल्या प्रमाणे आम्ही सगळे म्हणजे स्पा, मी, चचा,खरे, पुश्कर ई. किरकोळ मंडळी हाटेलच्या बाहेर ६:३० पासुन जमा झालो होतो पण हाटेल मालक आम्हाला आत घ्यायलाच तयार नव्हता. शेवटी प्रास भाई आणि मन्या फेणे आत जाउन आले ( काय करुन आले कोणास ठाउक ?) आणि ताबोड्तोड प्रवेश मिळाला. ;-)
१) डावी कडुन चतुरचाणाक्य, सौरभ उप्स, स्पा उर्फ मन्याफेणे

२) तहान भागवुन घेताना प्रास

३) स्पाच वर्णन करताना पुष्कर आणि कौतक भरल्या नजरेने पाहताना खरे ( ते म्हणत होते की मुर्ती लाहन पण किर्ती कीती कीती महान ;-))

४) डावि कडुन मस्तकंलदर. निखिल देशपांडे, विश्वनाथ मेहंदळे व प्रास

५) डावि कडुन विश्वनाथ मेहंदळे,प्रास, जयपाल व अन्या दातार

६) डावी कडुन सौरभ उप्स, स्पा, अमोल खरे, पुष्कर वर्तक

७) स्थानापन्न होत असताना मिपाकर

८)पुर्व तयारी

९)

१०) पनिर शोले एवढी जबराट डिश होती की, फोटो काढे पर्यंत दोन्ही बाजुकढील दोन्,दोन तुकडे गायब. त्यो वेटर पण हैरण झाल्ता राव.


वेगवेगळे पदर्थ येत होते आणि फोटो काढायच्या आत डिश को-या आयला हे काय झंगाट ?वेटर, कॅप्टन आणि मी हाडबडलोच. वेटर कोल्हापुरचा होता. त्याने मला कान मंत्र दिला ..."साहेब फोटोचा नाद भरल्या पोटीच चांगला असतो." ;-)
११)
१२)

स्टार्टर तसेच मेन कोर्स मधिल पास्ता, विविध प्रकारचे सिजलर्स ई.खाण एकदम टेस्टी होत आणि त्या वर गप्पांचा तडका कहर होता.( सायबानु म्हनुन फटु काढायच ईसरलो, एक डाव माफी :-( )
मैफलीच्या सुरवातीस विजुभाऊंनी दुरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या तर पराच्या फोननी शेवट गोड केला.
( प-याशी फोन वर बोलताना मी त्याच्यावर बरीच स्तुती सुमनं उधळीत होतो आणि तो सगळ ख-यानेच घेतहोता ;-))
रामदास काका, मास्तर्,विजुभाउ, परा आम्ही सगळ्यांनी खरच तुम्हा सगळ्यांना मीस केल रे!!! तुम्हाला काल खुपच उचकी लागली असेल नाही?
20 May 2012 - 8:11 pm | प्रभाकर पेठकर
हम्म्म्म्म! आता कसं? कट्टा झाल्यासारखं वाटलं.
"साहेब फोटोचा नाद भरल्या पोटीच चांगला असतो."
अहो, फोटोंचाच काय कुठलाही नाद भरल्या पोटीच करावा.
21 May 2012 - 11:06 am | श्रावण मोडक
हं... किती वाजले होते त्यावेळी? ;-)
21 May 2012 - 11:03 pm | jaypal
आता कुणाचे ते विचारु नका. ;-)
21 May 2012 - 2:08 pm | सुहास झेले
व्वा व्वा... एकंदरीत धम्माल केलेली दिसतेय :) :)
म्या मिसलो, पुढल्या कट्ट्याला भेटू
21 May 2012 - 2:21 pm | कुंदन
>>म्या मिसलो, पुढल्या कट्ट्याला भेटू
+१
21 May 2012 - 2:25 pm | सूड
>>पुढल्या कट्ट्याला भेटू
+२
22 May 2012 - 7:08 pm | रमताराम
एक शंकाय: ती टबात्लो (आमच्या कडे असाच उच्चार करतात) सॉसची 'बाटली आडवी' का आहे? ;)
22 May 2012 - 8:07 pm | बिपिन कार्यकर्ते
आमच्याकडे अशीच ठेवतात! ;)
21 May 2012 - 10:03 pm | कापूसकोन्ड्या
हे ठिकाण
धर्म (?? बहुधा खाण्याचा आणि चकाट्या पिटायचा असावा)
समाज
मौजमजा
प्रकटन
माहिती
20 May 2012 - 9:11 pm | अत्रुप्त आत्मा
पनीर फोटूमुळे
20 May 2012 - 1:45 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रं नसल्याने कट्ट्यास मजा आल्याचे विशेष जाणवले नाही. छोट्याशा वृत्तांतात लघुरुप शब्दांचा मुक्त वावर आणि वापर, माझ्या सारख्या मूढ सदस्यास, वृत्तांत गोंधळविणारा वाटला. 'आजच्या तरूणांची भाषा' असे म्हणून, चाळीशी पुसून, सकाळपासूनचा चहाचा चवथा कप तोंडास लावला.
20 May 2012 - 2:55 pm | मोदक
छायाचित्रं नसल्याने कट्ट्यास मजा आल्याचे विशेष जाणवले नाही.
+१
20 May 2012 - 2:18 pm | पियुशा
ए फोटू कुठाय ? फोटु फोटु फोटु ;)
20 May 2012 - 9:08 pm | अत्रुप्त आत्मा
फोटू फोटू फोटू....! झ्याक आले हायती...
20 May 2012 - 4:05 pm | अमोल खरे
काय गडबड चालवली आहे रे सर्वांनी...... जयपाल आजोबांनी त्यांच्या महागड्या सॅमसंग गॅलेक्सी टॅब मधुन सुंदर फोटो काढले आहेत. टाकतील ते थोड्याच वेळात. मी माझी डिटेल प्रतिक्रिया टाकेन काही वेळाने. अन्याला काल सर्वांनी प्रेशराईज करुन कोणत्याही परिस्थितीत आज धागा टाकच रे असा दम देऊन ठेवला होता म्हणुन त्याने बिचा-याने आज लगेच वृत्तांत टाकला. काल मस्त मजा आली. आम्हा बाकीच्यांच्या प्रतिक्रिया वाचुन आणि फोटो पाहुन तुम्हाला त्याचा अंदाज येईलच. जाता जाता - रामदास काका, सर्वसाक्षी काका आणि ज्यांच्यामुळे आम्ही मिपावर एकमेकांनी ओळखायला लागलो त्या तात्यांची उणीव खुप जाणवली. ते तिघे काल आले असते तर आणखीन मजा आली असती.
20 May 2012 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वृत्तांत आवडला. कट्टा वृत्तांत आवडला यासाठी की लेखनात प्रचंड स्मायल्या दिसल्या नाहीत, उगाच टींबटींब, बाण, असं विनाकारण लक्षवेधक काहीही न दिसल्यामुळे कट्टा वृत्तात सुसह्य आणि वाचनीय झाला. धन्स. :)
कट्टा वर्णनात फोटो पाहिजेच होते अर्थात बाकीचे सदस्य आता भर घालतीलच म्हणून फोटोच्या प्रतिक्षेत.
>>>>> १] नि.दे.- म.क. यांतील खरा संपादक कोण ?
च्यायला, या गोष्टींचा कधीच विचार मनात डोकावला नाही. अधिक तपशील काही वाचायला मिळेल काय...
[दोघेही ह.घे. घेतील]
-दिलीप बिरुटे
20 May 2012 - 4:31 pm | बिपिन कार्यकर्ते
<रत्नांग्री> यां पेंक्षां वृंत्तांतं टांकंलां नंसंतां तंरीं चांलंलें अंसंतें हों, झंप्यां ... हें अंसें चंटांवंरंच्या श्रांध्दांसांरंखें उंरंकंलेंनींतं!!
21 May 2012 - 12:25 pm | श्रावण मोडक
टॅग बंद कर की म्हाताऱ्या!
21 May 2012 - 1:50 pm | स्मिता.
मंगं चांलूं टँगंमंधें तुंम्हीं सुंद्धां तंसेंचं लिंहांयंचें होंतें ;)
*बिकांनी सुरू केलेला टॅग लिहायला फारच अवघड असल्याने आधीच संपवला.*
असो, कट्टा भारीच चर्चात्मक झालेला वाटतोय. अन्या, अमोल आनि जयपाल यांनी तुकड्या-तुकड्यात टाकलेला वृत्तांत आवडला.
22 May 2012 - 7:12 pm | रमताराम
किती उद्धटपणा हा हल्लीच्या पिढीचा. बिपिन आपला आहे म्हणून ऐकून घेतो झालं.
खुद के साथ बांतां*: ररा तुला काम्पिटिशन लौन दिली ती ही बिपिनची. श्रामो लै ड्याम्बिस मानूस.
*प्रताधिकार रंगाकाकांचा असला तरी आम्हाला वाप्रायची परवानगी आहे.
20 May 2012 - 4:46 pm | अमोल खरे
काल संध्याकाळी ५ ला स्पाचा फोन. म्हणे "कुठे आहात खरे" ? मी पण मख्खपणे त्याला "मी आत्ता बोरिवलीत आहे पण निघतोय आता, पोहोचतो आता लगेच ६ पर्यंत" असे म्हणालो. त्यावर त्याने हताशपणे "ये रे बाबा लवकर" असं म्हणुन फोन ठेवला. मी शार्प ६.३० ला पोहोचलो. :) तेव्हा तिथे स्पा, सौरभ उप्स, चचा आणि पुश्कर गोल करुन गप्पा मारत बसले होते. मी पण त्यांना जॉईन झालो. मग माननीय विमे आले आणि आम्ही आत जाऊन बसुया म्हणुन हॉटेल मध्ये शिरलो तर तिकडे लाद्या पुसत होते, बाहेर जा म्हणाले. मग परत बाहेर आलो. मोठा ग्रुप आहे बघितल्यावर आम्हाला बसायला खुर्च्या मांडुन दिल्या. वारा छान वाहत होता त्यामुळे बाहेर पण खुप मजा येत होती. एकेक जणांना फोन करुन तो येतोय / नाही येत याचा अंदाज घेणं सुरु होतं. तेवढ्यात अन्या दातार चा फोन आला. अरे तुम्ही कुठे आहात असं गोंधळुन विचारत होता. मी इकडे तिकडे पाहिलं तर एकजण शॉर्ट्स आणि टीशर्ट मध्ये फोनवर बोलत फिरत होता. मी उत्साहात अन्याला तु शॉर्ट्स घालुन आलायस का रे ? असं विचारलं, तर बिचारा बावचळला. मग थोड्या वेळाने हा भाई केईएम समोर असलेल्या नाव समान असलेल्या हॉटेल मध्ये आहे असं कळलं. मग तो तेथुन १५ मिनिटांत आला आणि आम्हाला जॉईन झाला. मग मकी आणि निदे आले आणि आम्ही सर्व जण आत गेलो. तोपर्यंत जयपाल पण आले होतेच. मग आत परत गप्पांची मैफल रंगली. अनेक विषय डिस्कस केले गेले, ज्यामध्ये अवलिया कोण ? (हा प्रश्न दर कट्ट्याला बाय डिफॉल्ट असतोच आणि त्याचं उत्तर कोणाकडेच नसतं), धमु का ऑनलाईन नसतो, आणि असे अनेक प्रश्न चर्चिले गेले. ( खरड / व्यनि पाठवुन "कोणते प्रश्न रे ?" असं विचारु नये. म्हणजे खरड पाठवा हवं तर पण उत्तर मिळणार नाही). अनेक ईंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. हे सर्व चालु असताना लज्जतदार पदार्थ येत होते. पनीर च्या अनेक डिश टेस्ट केल्या. प्रास दादांचं सिलेक्शन मस्त होतं. एकेक डिश अप्रतिम चवीची होती. विमे, पुशकर (नाव बरोबर लिहिलाय. ह्याला पुशकर बदलुन घ्यायचाय. सारखं कोणीतरी ढकलताय असं वाटतं त्याला बहुदा) अनेक नवीन गोष्टी सांगत होते. निदे आणि मकीला सतावणं चालुच होतं. पण निदे बिचारा शांतपणे सर्व ऐकुन घेत होता. बोलता बोलता २-२.५ तास असेच निघुन गेले. एकदा मी आपणही लाईव्ह अपडेट्स देऊ असं म्हणालो पण मागील ठाणे कट्ट्याच्या वेळेस लोकांचं निम्म लक्ष अपडेट्स देण्यात होते आणि त्यामुळे गप्पा नीट रंगल्या नाहीत असं काहीजणांच मत पडलं. पण काहीही असलं तरी सॉल्लिड म्हणजे सॉल्लिड मजा आली. परत एकदा तात्या, रामदास काका आणि सर्वसाक्षी काकांची कमतरता जाणवली. ते असते तर जास्त मजा आली असती. ते सर्वजण काही कामात बिझी असल्याने येऊ शकले नाहीत. पण ह्या एका मिपामुळे मी टोटली अनोळखी लोकांना बिन्धास्तपणे भेटु शकलो. ह्याच मिपामुळे अन्या दातारला त्याने कधीही न पाहिलेल्या मिपाकरांना भेटावसं वाटलं, ह्याच मिपामुळे स्पा इतक्या रात्रीपर्यंत थांबुन ठाकुर्लीपर्यंत गेला. हे सर्व तात्यांमुळे झाले. मिपा असंच बहरत राहो आणि असे कट्टे वरचेवर होवोत हीच इच्छा. कालच्या कट्ट्याला हजर असलेले बाकी मिपाकर ह्यात भर घालतीलच.
28 May 2012 - 5:49 pm | वपाडाव
काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झालीये वाटते... अन्या दातारने पुण्यात ४-५ कट्टे केले आहेत. २ ट्रेका केल्यात. तेही वर्षभरापुर्वी...
अन तरीही न पाहिलेले मिपाकर असे म्हटल्याबद्दल "खर्यांचा" निषेध...
-(दातारांचा व्हर्च्युअल अन रियल मित्र) वप्या
20 May 2012 - 6:25 pm | नितिन थत्ते
कट्टा नक्की झाला का याविषयी शंका आहे. तुम्ही कॉन्स्पिरसी करून खोटा वृत्तांत कशावरून दिलेला नाही.
आम्ही डोळ्यांनी फोटो पाहू तेव्हाच विश्वास ठेवू.
20 May 2012 - 7:23 pm | अमोल खरे
घोर अपमान. आम्ही आडनावाला जागतो. फोटो पाहाल तेव्हा खात्री पटेलच तुमची. :) कॉलिंग जयपाल...कॉलिंग जयपाल....कॉलिंग जयपाल...कॉलिंग जयपाल.
21 May 2012 - 8:21 am | कापूसकोन्ड्या
अहो बड्या आसामी आहेत त्या!
ते काय फोटो पण मॅनेज करतील. प्रत्यक्ष हजरी महत्वाची. पण चला आता टाकलेच आहेत ना फोटो, मग जळजळ विसरून मोठ्या मनाने ठेवुया विश्वास अन काय.
20 May 2012 - 6:43 pm | सूड
अरे अन्या शेवटी का होईना मी पण फोन केला होता की रे !! ते लिहीलंच नाहीस. बाकी काही अपरिहार्य कारणास्तव येणे झाले नाही.
20 May 2012 - 8:38 pm | रेवती
कारण काय असावे याचा अंदाज आला.
21 May 2012 - 11:37 am | सूड
आज्जीं भारीच मनकवडी हों !!
20 May 2012 - 8:41 pm | रेवती
अन्या दातार, अमोल, जयपाल यांचे वृत्तांत, फोटू आवडले.
निदे बिचारा शांतपणे सर्व ऐकुन घेत होता.
मकची कृपा आहे ही. ;)
नेहमीपेक्षा हा कट्टा गुणी मुलांचा का वाटला? ;)
एकंदरीतच इनो घेण्याची वेळ.
21 May 2012 - 3:07 pm | वपाडाव
घोर गैरसमज !!
आज्जे, काजळ स्पाजळ होतं बरं त्यांच्याकडे?
21 May 2012 - 1:15 am | सौरभ उप्स
कट्टा उत्तम झाला राव.. माझा हा पहिलाच कट्टा होता.
स्पा ला आधीपासून ओळखत होतो, चचा व विमे यांना रायगड दौर्यावर भेटलो होतो त्यामुळे हे तिघे सोडले तर बाकी सगळ्यांशी पहिल्यांदाच भेट झाली, सर्वांना भेटून खूप छान वाटले .....
21 May 2012 - 8:29 am | कापूसकोन्ड्या
करा लेको मजा करा!
मटार उसळ खा! शिक्रण पोळी खा! चैन करा! एकतर सगळ्यांनी जमायचे, वर पोट्भर गप्पा मारायच्या
हादड हादड हादडायचे आणि वर फोटो पाठवून आम्हाला खिजवायचे कुठे फेडाल ही पापे?
फोटो बाकी मस्तच हं!
पुढच्या कट्ट्याला शुभेच्छा!
21 May 2012 - 3:48 pm | मी-सौरभ
कट्टयाचं ठीकाण पुणे नव्हत तर मूम्बै होतं
तेव्हा खा लेको पानी पुरी खा! पाव भाजी खा!! असं म्हटलं पाहिजे. ;)
21 May 2012 - 8:33 pm | जेनी...
सौरभ
+++११११११ :)
21 May 2012 - 10:10 pm | कापूसकोन्ड्या
विचार करण्याची प्रक्रिया ही माणसाच्या मनात असते तो कुठे असतो किंवा कुठले वृत्तांत वाचतो यावर नसते असे मोठे लोक (अर्थातच पुण्याचे, दुसरे कुठले?) म्हणतात ना रे झंप्या?
21 May 2012 - 10:10 pm | कापूसकोन्ड्या
विचार करण्याची प्रक्रिया ही माणसाच्या मनात असते तो कुठे असतो किंवा कुठले वृत्तांत वाचतो यावर नसते असे मोठे लोक (अर्थातच पुण्याचे, दुसरे कुठले?) म्हणतात ना रे झंप्या?
21 May 2012 - 8:30 am | लीलाधर
अखेर (उन्नीस) १९ तारखेला कट्टा ठरला आणि मग काय स्पा उर्फ (मन्या फेणे) यांनी कट्ट्याला अपेक्षित मिपाकरांची यादी धाग्यावर दिली. यावरुन हाटेल्च्या बाहेर काही काळ व्यतित करावा लागल्याने मग स्पा आणि विमे यांच्यात पैज लागली विमे म्हणे स्पा अरे तु अपेक्षित असे धाग्यावर नमुद केलेच नाहीस मग काय तर स्पा गप्प बसेल तर तो स्पा कसला? लगेच त्याने एक हाती पैजेचा विडा उचलला आणि विमेपुढे आव्हान उभे केलेन की मी जर अपेक्षित असा शब्द धाग्यावर नमुद केला आहे जर असा शब्द असेल तर मला रुपये ५००/- द्यायचे आणि जर नसेल तर तु मला रुपये ५००/- द्यायचे...
शेवटी स्पाने बाजी मारली पण हार मानेल तो विमे कसला त्याने स्पष्ट्च सांगितले की मी कुठे मान्य केले तुला रुपये ५००/- देईन म्हणून....
शेवटी एकदा हाटेलात गेल्यावर ओळख परेड झाली आणि कट्ट्याला खर्र्या अर्थाने सुरुवात झाली :) यात नव्याने ओळख झालेले मिपाकर: नि.दे, स्वाती तै, अमोल खरे, पुशकर
मग काय गप्पा टप्पा आणि खादाडी खादाडी आणि नुसती खादाडी
21 May 2012 - 8:48 am | लीलाधर
जर अपेक्षित असा शब्द नसेल तर मी तुला रुपये ५००/- देईन असे वाचावे चुकुन चूक झाली राव
21 May 2012 - 8:53 am | प्रचेतस
वृत्तांत आवडला.
मुंबई कट्टा जेव्हा सुरु होता तेव्हा पुण्यात पुणेकरांचाही राजधानीमध्ये समांतर कट्टा चालू असल्याने जळजळ झाली नाही. मोदक, ५० फक्त, प्यारेकाका, गणामास्तर, कवि गणेशा, पिंगू आणि अस्मादिकांनी मिळून आमरसाचा मनसोक्त आस्वाद घेतल्या गेला.
21 May 2012 - 10:00 pm | कापूसकोन्ड्या
म्हणजे मुबै आणि पुणे दोन्ही कडे नसलेल्यांचे हाल का करता? वाटले पुण्याचे लोक आमच्या बाजूने असतील तर कसेल काय, ते पण कट्ट कट्ट खेळत होते तर !
असुया ही निसगदत्त भावना चक्रवाढ पद्धतीने वाढली ना?
पण आम्ही पण केंव्हा तरी असेच येउ हो.
21 May 2012 - 9:22 am | पिंगू
समांतर वेळेत मनसोक्त अनलिमिटेड भोजनाचा फन्ना उडवला गेल्याने इनो घ्यायची वेळ टळली..
- पिंगू
21 May 2012 - 11:32 am | पुश्कर
कट्ट्याला आलेल्या सर्वांचे आभार. मी सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होतो तरी पण कोणी अनोळखी वाटले नाहीत . खूप विषयांवर बोललो , चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेतला...
असेच कट्टे वरचेवर होऊदे .
21 May 2012 - 11:46 am | प्यारे१
मस्त कट्टा झालेला दिसतोय.
बाकी मुंबई कट्ट्याला ठाणेकरांची उपस्थिती अम्मळ कमीच दिसते आहे. ;)
अवांतरः फोटो ४ मध्ये निदेंनी अशी 'गलगले स्टाईल' पोझ का घेतली आहे बरे?
21 May 2012 - 1:16 pm | सौरभ उप्स
21 May 2012 - 8:36 pm | जेनी...
एकमेकाना भेटायला जातात की फक्त हाटेलात खायला जातात ..प्रश्न पडलाय राव :(
21 May 2012 - 11:01 pm | jaypal
या की एक डाव कट्ट्यावर आं, मग दाखवितो तुम्हाला .................................मज्जा. ;-)
29 May 2012 - 6:38 pm | जेनी...
ही ही ही ......... :)
22 May 2012 - 11:22 am | मृगनयनी
छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि फोटो पण!.. फक्त 'मिसळपाववर मुम्बईच्या स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमी आहे'... याची प्रचिती फोटोतून आली. :) (रेशो- १० : १ असा आहे) ;)
असे का ? की मुम्बईच्या स्त्रिया जास्त बिझी असतात?
आमच्या पुण्यातल्या कट्ट्याला किमान हा रेशो १० : ४/५ असा तरी असतो.... :)
22 May 2012 - 11:56 am | विश्वनाथ मेहेंदळे
कुठल्या कट्ट्याला म्हणताय ? वृत्तांताच्या 1-2 लिंका द्याल का ? जास्ती दिल्या तरी चालतील.
(सुधारणा :- प्रमाण 12:2 असे होते, पण ते महत्त्वाचे नाही फार. लिन्कांच्या प्रतीक्षेत आहे )
22 May 2012 - 12:57 pm | प्रभाकर पेठकर
स्त्रियांचे प्रमाण वाढल्यास पुरुषांचे प्रमाणही (नक्कीच) वाढेल म्हणजे रेशो पुन्हा आहे तोच. आयला, हे गणित सोडवायचे कसे??
23 May 2012 - 11:29 am | विश्वनाथ मेहेंदळे
काका, मुंबईचे गणित नंतर सोडवू. मला पुण्याच्या प्रमेयाची सिद्धता पहायची आहे.
नैनी बाय, देतेस ना गो सिद्धता ???
29 May 2012 - 11:03 am | मृगनयनी
मज उचित लिन्का सापडत नाहीयेत!!!!
पण एक कट्टा आठवतोय.. की त्यास धम्याची धमी, विक्षिप्त अदिती, रुचा, आय थिन्क सौ. पेठकर, स्वाती राजेश, आणि इतर काही स्त्री-वर्ग (अॅम सॉरी.. मला आत्ता त्यांची नावे आठवत नाहीयेत!!!) उपस्थित होता.. बहुधा अभिरुची कट्टा असावा तो!...
या कट्ट्याला "सखाराम गटणे" नामक एक जुना सदस्य देखील होता, तसेच वरद, धमाल मुलगा, चित्तर, विजुभाऊ, छोटा डौन, पेठकर काका इ. मान्यवर उपस्थित होते. त्यावेळचा रेशो चान्गला होता... (पक्षी: बॅलन्स होता..)
कुणास सापडत असल्यास ह्या कट्ट्याची लिन्क देउ शकता... :)
29 May 2012 - 2:26 pm | प्रभाकर पेठकर
आपली माहिती बरोबर आहे. तो 'अभिरुची' कट्टाच होता. ही त्याची लिंक http://www.misalpav.com/node/3196
त्यावेळी मी नवा सदस्य होतो (आणि समक्ष बायको हजर होती. 'कट्टा' राहायचा बाजूलाच आणि घरी जाऊन 'कट्टी' सहन करायला लागायची) त्यामुळे स्त्री सदस्यांची छायाचित्रे नाहीत त्यात. समजुन घ्या.
एक कट्टा मुंबईत शिवाजी पार्क इथे झाला होता. (म्हणजे विराट मेळावा म्हणावा असा). त्यात तात्यांनी शास्त्रीय संगितावर व्याख्यान दिले होते. (पुढे पुढे प्रत्येक कट्ट्यात तात्यांचा हा कार्यक्रम असायचाच.)
त्या कट्ट्याला प्रमाण जवळ जवळ ५०-५० टक्के होते. काही स्त्री सदस्यांनी कार्यक्रमही सादर केला होता. त्यातील कोणा स्री सदस्याने पुलंच्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' हा कार्यक्रम फार चांगला केला होता तो विशेष लक्षात राहिला.
29 May 2012 - 6:30 pm | मृगनयनी
धन्यवाद पेठकर काका! :)
22 May 2012 - 10:35 pm | मस्त कलंदर
छे छे.. हम अकेलेही काफी है इसलिए...
बाकी विमेंशी सहमत!
23 May 2012 - 10:05 am | श्रावण मोडक
हं... ;-)
21 May 2012 - 2:23 pm | यकु
आता फोटो आले असले तरी चटावरचे श्राद्ध उरकल्यासारखा छोटासा वृत्तांत टाकल्याबद्दल अन्याचा निषेध!
बाकी मस्तच म्हणायचं :( :)
(फोटोजनित जळजळग्रस्त ) यक्कू
21 May 2012 - 3:07 pm | सौरभ उप्स
त्या पनीर कडे बघून अक्षरशः तोंडाला नुस्त पाणी सुटलेलं, कसातरी खाण्यावर किंचित सय्यम ठेऊन मी काढलेला हा फोटो.

21 May 2012 - 5:07 pm | प्रभाकर पेठकर
सुला (एक), सुले (अनेक). मुळात मांसाहारी पाककृती. २"X २" आकाराचे मांसाचे तुकडे मसाल्यात घोळवून, उघड्या विस्तवावर शिजवतात. राजस्थानी पाककृती आहे. त्याचाच शाकाहारी भाऊबंद म्हणून 'पनीर सुले' केले असतील. मस्तं असतो हा पदार्थ. (चखना म्हणून).
21 May 2012 - 3:20 pm | निनाद मुक्काम प...
अप्पर वरळीत जमलेला मराठमोळा मिसळपाव चा कट्टा आणि त्याचा वृत्तांत व फोटो लाजवाब
शाकाहारी कट्टा झाल्याने शाकाहारी मिपाकरांना आनंद वाटला झाला असेल.
अजून नवे नवे सदस्यांनी अश्या कट्याला हजेरी लाऊन परस्परातील स्नेह वृद्धिंगत करत आहेत हे पाहून आनंद झाला.
पुढील कट्याला आगामी शुभेच्छा.
21 May 2012 - 3:23 pm | ऋषिकेश
वा वा वा!
फुल्टु धम्माल
21 May 2012 - 3:24 pm | विनायक प्रभू
तरी मी त्याला सांगत होतो की माझ्या नादाला लागु नकोस.
21 May 2012 - 9:00 pm | प्रास
वर चचा म्हणतोय त्याप्रमाणे कट्टा १९ ला असावा की २० ला हा महत्त्वाचा प्रश्न होता. २० ला असता तर मला पूर्ण वेळ थांबता येणार होतं पण १९ ला ठरल्याने माझी उपस्थिती अर्धवेळच असणार होती. (खरं तर विमे आणि स्पांनी मी येणार नाही असंच गृहित धरलं होतं.)
मी वेज ऑल्वेजला पोहोचे पर्यंतअंगणात मिपाकरांची मस्त मैफल जमली होती. विमे, जयपाल, स्पा, चचा, अमोल खरे, सौरभ, पुश्कर यांच्यात मी जॉईन होतोय तोवर अन्या, निदे, म.क. आले आणि आम्ही वेज ऑल्वेजवर चढाई केली. हॉटेल माझ्या माहितीचं असल्याने ऑर्डर देण्याची जबाबदारी माझ्याकडे होती ती बहुदा मी योग्य पाळली असावी असा अंदाज आहे. स्टार्टर्सची ऑर्डर देई पर्यंत 'मी कस्तुरी' देखिल डेरेदाखल झाली.
ओळखपरेडी आणि मिपा नि मिपाबाह्य इतर अनेक प्रकारच्या गप्पांमध्ये बरोबरच मागवलेल्या स्टार्टर्सच्या खाण्यामध्ये दोन तास कसे गेले ते कळलंच नाही. मग मी मेन कोर्ससाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलर्सची ऑर्डर दिली. दरम्यान गप्पा सुरूच होत्या. ही ऑर्डर येण्यापूर्वीच घरी परतण्याची ऑर्डर मला फोन वरून मिळाल्याने दु:खी अंतःकरणाने आणि हलक्या पोटाने ;-) मी घराकडे प्रस्थान केलं. पण मला वाटतं की मी मागवलेले सिझलर्स चवीला सगळ्यांनाच आवडले असतील. (अजून तरी कुणी त्याला नावं ठेवलेली वाचनात आलेली नाहीत :-))
या कट्ट्याचा प्लस पॉईन्ट हा की मुंबईकर मिपाकरांच्या ओळखी झाल्या. आता पुढला जोरदार कट्टा दक्षिण मुंबईतच घ्यायचा यावर शिक्कामोर्तब इथेच होऊ द्या. बाकी कार्य सिद्धीसाठी मिपाकर समर्थ आहेतच. :-)
22 May 2012 - 8:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे
म्हणजे पुढील वेळेस पण (almost) सगळे ठाणेकर टांग देणार ? ;-)
22 May 2012 - 8:39 pm | सूड
मी येणार हे नक्की !!
23 May 2012 - 9:44 am | स्पा
वा वा ...
बरिच मजा केलेलि दिस्तेय :)