एक क्षण निसटू गेला..
.
हिरव्यागार पानाच्या टोकाशी..
थांबून राहिलेला थेंब,
पांढर्या शुभ्र स्पार्टेक्सवर..
साचलेल्या पसाभर पाण्यात,
टप्पकन पडला...
एक लाट उंच उसळली..
पाण्यात आणि मनात!
एकाच वेळी!!
क्लिक!!!
अल्बम मध्ये लावण्याजोगी,
अजून एक आठवण..
लगोलग आत गेले..
वाट बघत बसलेले रंग गोंजारले..
हळूच कुंचले मोकळे केले..
आणि गेले..
रंग ओले करण्यापुरतं पाणी आणायला..
तो थेंब तो क्षण!!!
तेव्हड्यात वाहून गेला..
छ्या!!!
जाऊदे!
मूड नाही आज!
म्हणताच कागद कोरा राहिला...
एक क्षण निसटू गेला..
======================
स्वाती फडणीस.............. २९-०७-२००८
प्रतिक्रिया
4 Aug 2008 - 10:22 pm | धनंजय
संवेदनाशील मनावर पडणारे ठसे हाहा म्हणता नाहिसे होतात.
मनात लाट उत्पन्न करणारे थोडेसे पाणीच, आणि ते चित्र पुसायला पुरणारा विलंब करणारे थोडेसे पाणीच, हा विरोधाभास विशेष आवडला.
छिद्रान्वेष : "स्पार्टेक्स" शब्दाचा वापर खटकला. पण मला त्या कंपनीच्या उत्पादनांशी चांगली ओळख नसेल म्हणून असेल.
4 Aug 2008 - 10:25 pm | बेसनलाडू
कविता आवडली.चित्रदर्शी वाटली;थेंब टपकन् पडल्याचा प्रसंग डोळ्यांपुढे तरळून गेल,क्लिक झाला :)
(चित्रकार)बेसनलाडू
4 Aug 2008 - 10:28 pm | चतुरंग
आपल्या हिरव्यागार ताज्या कवितेशी आमची ओळख झाली आणि एका कवितेला ती जन्म देऊन गेली ती अशी! :)
चतुरंग
5 Aug 2008 - 4:56 am | सर्किट (not verified)
तो थेंब तो क्षण!!!
तेव्हड्यात वाहून गेला..
छ्या!!!
जाऊदे!
मूड नाही आज!
म्हणताच कागद कोरा राहिला...
एक क्षण निसटू गेला..
मूड नाही आज, ही स्वतःची घातलेली समजूत आहे का ?
निसटू ऐवजी निसटून हवे का ?
कविता आवडली.
- सर्किट
5 Aug 2008 - 11:02 am | स्वाती फडणीस
निसटू ऐवजी निसटून हवे होते
5 Aug 2008 - 11:03 am | स्वाती फडणीस
:)
5 Aug 2008 - 12:54 pm | सहज
स्वाती ताई बरेच दिवसांनी लिहलेली कविता आवडली.
शिवाय ३ विडंबनांना प्रेरणादायक
क्या बात है!
:-)
5 Aug 2008 - 1:16 pm | ऋषिकेश
सुंदर कविता... चित्रदर्शी.. खूप आवडली :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
5 Aug 2008 - 3:46 pm | नारदाचार्य
ही कविता आवडली. निसटलेला क्षण टिपण्याचा हा प्रयत्न छानच. पु.ले.शु.
5 Aug 2008 - 4:46 pm | स्वाती फडणीस
:)