ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
23 Jul 2009 - 10:26 am

डिस्केमर : या धाग्यावर, आपण ओळखीचे असा नसा, आपण अवांतर प्रतिसाद देवू शकतात. माझी काहीच हरकत नाही.

मला ईंधन देई नळावर आलेले अनूभव देत आहे. त्यात कसे काय अवधान राखले पाहिजे ते कळेल व त्या द्वारे आपण आपले द्रव्य (ईंधन व मुल्य) कसे वाचेल हे समजेल.

मी एकदा ईंधन देई नळावर दोन चाकी वाहनात ईंधन भरावयास गेलो होतो. पाऊस चालू होता म्हणून काही वाहनांची रांग पण नव्हती. ईंधन देई नळावर वरती छत असल्याने पाऊस लागत नव्हता. माझ्या आधीच्या गड्याने ईंधन विकत घेतले. (ए भाऊ, ३० चे पेट्रोल टाक रे). त्यानंतर माझा क्रमांक होता, म्हणून मी ईंधन टाकीचे झाकण उघडे ठेवून गाडी नळापुढे उभी केली. ईंधन नळ हातात घेवून ईंधन वाटणार्‍या मनुष्यापुढे एक मुल्य घेणारा मनुष्य हातात एक बुधले घेवून मला "आपल्याला ऑयल कितीचे टाकायचे" असे विचारत होता. माझी गाडी ४ धक्क्याची असल्याने तिस जिवाश्म चिकण द्रव्याची आवश्यकता नव्हती. (फक्त २ धक्के आंतरीक जळण यंत्राच्या वाहनाला जिवाश्म चिकण द्रव्याची आवश्यकता असते.) तेव्हड्या वेळात ईंधन नळ हातात घेवून ईंधन वाटणार्‍या मनुष्याने ईंधन नळ सुरु करीत ईंधन टाकीत टाकण्यास सुरुवात केली व मजकडे बधून म्हणाला की, "साहेब, कितीचे करू?", तोपर्यंत ईंधन देई नळावरील मोजयंत्रात काही आकडे पडलेले पुढे गेलेले होते. मी त्या मोजयंत्राचे शुन्य वाचन घेतलेले नव्हते. म्हणजेच माझ्या आधीच्या गड्याचेपण मोजलेले आकडे माझ्या ईंधनाच्या मोजलेल्या आकड्यात भरीस पडले होते.
मी घाईघाईत किती मुल्याचे ईंधन टाकायचे ते सांगीतले. नंतर मी त्यास "मोजयंत्र शुन्यवत केले काय? " असे विचारले असता "केल होत" असे उत्तर मिळाले. मी समजुन चुकलो होतो की आपण फसलो गेलो आहे.

मी रोख रक्कम देवून वाहनास पायधक्क्याची खटकी मारुन चालू केले व तेथून मलाच दोष देत निघालो.

त्यानंतर असेच मागील आठवड्यात मी परत दुसर्‍या एका ईंधन देई नळावर वाहनात ईंधन भरावयास गेलो. ह्या वेळेसपण पाऊस चालू होता. माझा क्रमांक आल्यावर मुल्य घेणार्‍या मनुष्याकडे मी माझे उधार पत्र दिले व त्यास "दोनशे चे कर" असे सांगितले. त्याने मला, "गुप्त कळ क्रमांक काय आहे?" असे विचारले. मी त्यास विचारले की "गुप्त कळ क्रमांकाची काय आवश्यकता आहे?" त्यावर तो गुप्त कळ क्रमांक न घेता उधार पत्र ओढण्यासाठी उधार पत्र यंत्राकडे चालता झाला. तेव्हढ्या वेळात ईंधन वाटणार्‍या मनुष्याने ईंधन नळ चालू करून काही ईंधन टाकले होते व त्यावेळी माझ्या आधीच्या गड्याचेपण मोजलेले आकडे माझ्या ईंधनाच्या मोजलेल्या आकड्यात भर पडले होते.

थोडक्यात, ईंधन देई नळावर ईंधन वाटप करतांना ईंधन देई नळावरील कर्मचारी आपल्यास बोलण्यात गुंतवतात व आपला कार्यभाग साधतात. आपण अवधान राखावे हे उत्तम.

अर्थव्यवहारसमाजतंत्रशिफारससल्लाअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

23 Jul 2009 - 10:38 am | छोटा डॉन

मजेशीर आहे.
आपला लेख वाचुनच मला भयंकर हसु आले, बाय द वे, आशय अतिशय महत्वपुर्ण आणि गंभीर असला तरी मराठी भाषेच्या वापराच्या अट्टाहासाच्या अतिरेकाने लेख (मलातरी ) लेख भयंकर हसवुन गेला ...
मराठी प्रतिशब्द जरुर वापरावेत पणं इतकेही नको हो ...

असो, अवांतरासाठी क्षमस्व.
लेख उत्तम होता ...

------
छोटा डॉन
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ... सौजन्य : मराठमोळा शेठ ;)

पाषाणभेद's picture

23 Jul 2009 - 10:50 am | पाषाणभेद

डॉन्यवाद हं डॉनराव ! ( वर्‍हाड निघालय... च्या जॉनराव च्या टोनींगमध्ये)
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jul 2009 - 11:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदा असाच काहीसा अनुभव आल्यावर, मी हल्ली हातात पैसे फडफडवतच स्कूटरचा पेट्रोल टँक उघडते.

विचित्र भाषा, लिहीणार्‍याची इमेज यामुळे कधीकधी चांगला संदेश देणारा लेख आणि त्याबद्दलची चर्चाही भलतीकडेच जाते.
(दीज डेज मराठी वर्ड्स रिमेंबर करणं एवढं डिफीकल्ट नाही जात!)

अदिती

विजुभाऊ's picture

23 Jul 2009 - 12:19 pm | विजुभाऊ

इंधन विपणकाकडची माणसे या बाबतीत तरबेज असतात.
उधार पत्रक चूकून दोनवेळा छेदीत/ घसट ( स्वाईप या शब्दाला मराठी शब्द कोणता?) होण्याचे प्रमाणही चिंतनीय आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे जे जीवाश्म इन्धन तुम्ही तुमच्या रथात भरता ते कोणते आहे तेही जाणून घ्या पेटतेल( पेट्रोल) दीजतेल( डीझेल) यात बरेचदा खडकतेलाची( रॉकेल= रॉक ऑइल) चे मिश्रण मुख्य तेलटाकीतूनच येते. याबाबतीत तक्रार करूनही काही फायदा होत नाही.
आपल्या रथाच्या यन्त्राची दमच्छाक होते आणु ते प्रमाणाबाहेर काळे उच्छवास टाकू लागते

नितिन थत्ते's picture

25 Jul 2009 - 8:31 am | नितिन थत्ते

उधारपत्रक दोन वेळा पाठोपाठ घासल्यास विक्रेत्याला बँकेकडून (दोन्ही) पैसे मिळत नाहीत अशी सोय बँकेनेच केलेली असते. (असे एका विक्रेत्याकडून कळले). यात विक्रेत्याचे नुकसान होते कारण ग्राहकाला गाठणे शक्य नसते.
(त्या विक्रेत्याकडून एक ग्राहक ५०००/- ची खरेदी करून गेला. काही कारणाने एकदा घासून झाल्यावर जोडणी तुटल्याने. विक्रेत्याने उधार पत्रक पुन्हा घासले. तेव्हा ते मान्य होऊन पावती छापली गेली व ग्राहक सही करून निघून गेला. बँक आता त्या विक्रेत्याला पैसे देत नाही आणि त्याला ग्राहकाचा पत्ता वगैरे माहिती नसल्याने तो ग्राहकाशी संपर्कही करू शकत नाही).

हाच अनुभव मला स्वतःलाही आलेला आहे. अशाच प्रकारे दोनदा दोनदा घासल्यावर माझ्या भ्रमणध्वनीवर ताबडतोब संपर्क करून माझ्याकडून व्यवहाराची खातरजमा केली गेली.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

अवलिया's picture

23 Jul 2009 - 10:49 am | अवलिया

मजेशीर अनुभव.

--अवलिया
===================================
हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास इथे तक्रार करु शकता !

पाषाणभेद's picture

23 Jul 2009 - 11:28 am | पाषाणभेद

हा प्रतिसाद अजिबात अवांतर नाही असे नाही, असे आम्ही म्हणत नाही.
अवांतर: आता अवांतर प्रतीसादास लखकाची काही हरकत नसेल तर काय करणार?
मला तर काळजी वाटतेय.
:-)

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

योगी९००'s picture

23 Jul 2009 - 11:04 am | योगी९००

आम्हीही लक्षात ठेवू..चांगलाच अनुभव..

बाकी "ईंधन देई" आणि "जिवाश्म चिकण द्रव्य" हे आवडले. बाकी काही म्हणा काही फुल्सना मराठी राईट करताना इंग्लिश शब्द युस करायची बॅड हॅबिट असते.

खादाडमाऊ
कोपनहेगन, जर्मनीचा काही भाग, स्टॉकहोम आणि स्विडनचा काही भाग, फिनलंडचा काही भाग मिळून संपूर्ण नॉर्वे झालेच पाहिजे.

विंजिनेर's picture

23 Jul 2009 - 11:04 am | विंजिनेर

विश्वासार्ह इंधन-वाटप-नळ-कोंडाळ्यावरूनच इंधन विकत घ्यावे.

----
१८००-डायल्-अवांतर्-प्रतिसाद

बेचवसुमार's picture

23 Jul 2009 - 11:23 am | बेचवसुमार

समदु:खी मिळाल्याचे समाधान वाटले.
आता पेट्रोल भरताना मी नेहेमी खात्री करतो की पम्प रिडिंग झिरो ला सेट केले आहे का नाही ह्याची.
कुठल्याही पंपावरचे कर्मचारी विनाकारण वाघ पाठिमागे लागल्या असल्यासारखी घाई करतात आणि अश्या ठिकाणी थोड्या गुर्मीतच वागायचे असते हे हि अनुभवाने शिकलोय.
दुसरे म्हणजे पेट्रोल भरताना शक्यतो कधीही एकटे जाऊ नये.कोणाला तरी बरोबर न्यावे आणि पेट्रोल भरण्याआधी मीटरकडे लक्ष दे असे त्याला निक्षुन सांगणे.

फसविण्याची दुसरी पध्दत म्हणजे कर्मचारी झिरो सेटिंग वगैरे सगळे व्यवस्थित करतो पण मध्येच पेट्रोल भरणे थांबवुन कितीचे भरायचे हे विसरलो असे म्हणतो..असे झाल्यास समजावे कि भाई कुछ लोच्या है..
अश्यावेळी जेवढे पेट्रोल भरले असेल तेवढ्याचीच रक्कम देवुन लगेच सटकणे.

त्याने काय साध्य होते? समजले नाही मला.

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

बेचवसुमार's picture

23 Jul 2009 - 11:43 am | बेचवसुमार

ग्राहकाला गोंधळात टाकायचा एक प्रकार असावा.मी असाच फसलो गेलो होतो. मी २०० रु. चे पेट्रोल भरायला सांगितले.५० रु.चे झाल्यावर कर्मचारी थांबला आणि मला म्हणाला कि कितीचे भरायचे होते? मी २००चे सांगितल्यावर ठिक आहे आता १५० चे भरतो असे म्हणाला.
सगळा एपिसोड झाल्यावर गाडीचे फ्युअल इंडिकेटर बघितले असता ५० रू.चे पेट्रोल कमी भरले असल्याचे लक्षात आहे. स्वतःवरच चरफडत ही रक्कम अक्कलखाती जमा करुन घेतली.
तात्पर्य हेच की आपण म्हटल्याप्रमाणे सावधगिरि बाळगणे महत्वाचे.!

मैत्र's picture

23 Jul 2009 - 12:23 pm | मैत्र

हा ग्राहकाला गोंधळात टाकून फसवण्याचा सगळ्यात सोपा प्रकार.
पुणे बेंगलुरू हैदराबाद कुठेही अनुभवता येतो. दुचाकी /चारचाकी असली तरी हे सगळे लोक फसवायला तयार असतात.
लक्ष वेधून घ्यायला एक नवीन प्रकार म्हणजे दोनशे सांगितल्यावर पेट्रोल भरत असताना तो ५० ला थांबवतो. तेवढ्यात इकडे पैसे घेणारा विचारतो 'पावती पाहिजे का?' तुम्ही हो नाही सांगून आकडा बघता तर गडी ५० वर शांत. मग सांगितलं की अहो ५० नाही २०० पाहिजे की मग म्हणतो असं का बरं... मग पुढे १५० करतो. तेव्हा अत्यंत चलाखीने १५० ला बंद करतो. आधीचे ५० झाल्यावर पुन्हा शुन्य होत नाही. तर तुम्हाला एकूण १५० चंच इंधन दिलं जातं.
हिंजवडी, करिश्मा जवळचा नवीन पंप, कर्वे पुतळ्याजवळ, कुठेही हे अनुभवास येतं. कुलकर्णी पंप लक्ष्मी रोड आणि कर्वे पंप शास्त्री रोड इथला अनुभव चांगला आहे.
शेल चे नवीन पंप जिथे सुरु झाले आहेत तिथे सर्वत्र पेट्रोल व्यवस्थित भरणे, ग्राहकांना चांगली वागणूक. प्रिंटेड पावती आणि अनेक वेळा वाढलेले मायलेज असा अनुभव आहे...

बेचवसुमार's picture

23 Jul 2009 - 2:02 pm | बेचवसुमार

.

लिखाळ's picture

23 Jul 2009 - 12:04 pm | लिखाळ

सिंहगडरस्त्यावर दांडेकरपुलाच्या इथल्या चौकात जो पेट्रोलपंप आहे तेथे मी सहा-सात वर्षांपूर्वी असाच फसवला गेलो होतो. पेट्रोल भरायला सुरुवात केल्यानंतर लगेचच ऑइल टाकण्यास माणूस आला आणी त्याने लक्ष वेधले. आणि लगोलग इकडे पेट्रोल वाल्याने एकदम पेट्रोल झाले भरुन असे म्हणत मला आकडे पाहायची संधी न देता खटका ओढून आकडे शून्य करुन टाकले. ऑइल किती पडले ते पाहायला वेळ दिला नाही आणि पेट्रोल किती टाकले ते पाहू दिले नाही. आणि ५०रु. चे पेट्रोल टाकायला असा कितीसा वेळ लागतो ! झाले होते टाकून असे तो म्हणू लागला.
त्या पंपावर पुन्हा कधी गेलो नाही पण त्या अनुभवावरुन इतरत्रसुद्धा मी ऑइलवाला जवळ आला की त्याला हाताने थोपवून ठेवतो आणि एकावेळी पेट्रोल अथवा ऑइल असाच व्यवहार करायला भाग पाडतो.

ईंधन देई नळ, जिवाश्म चिकण द्रव्याची या शब्दांची मजा वाटली :)

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

सुनील's picture

23 Jul 2009 - 12:05 pm | सुनील

छान अनुभव.

सुदैवाने मी माझ्या चारचाकीत सहसा जेथे इंधन भरतो तेथील कर्मचारी मी मोजयंत्राचे शून्य वाचन पाहिले असल्याची खात्री केल्याशिवाय इंधन नळीचा खटकाच ओढीत नाही.

तरीही, तुम्ही सांगितलेला अनुभव नेहेमीच लक्षात ठेवण्याजोगा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रेवती's picture

23 Jul 2009 - 12:31 pm | रेवती

माहितीपूर्ण व सावध करणारा लेख आहे.
पाषाणभेदसाहेबांचे आभार!
सगळे प्रतिसादही चांगले आहेत.
रेवती

सुप्रिया's picture

23 Jul 2009 - 1:42 pm | सुप्रिया

मलापण दोनदा असा अनुभव आलाय. आतामात्र पेट्रोल भरणारा मोक्याच्या वेळेला काहीही बोलू देत (मॅडम क्रेडिट कार्ड आहे का, पावती हवीये का), मी एकलव्यासारखी माझी नजर मीटरवरून ढळू देत नाही.

सोहम_व's picture

23 Jul 2009 - 2:19 pm | सोहम_व

शक्यतो पेट्रोल भरन्याचा स्पीड हळु किवा मध्यम ठेवण्यास सान्गावे, उच्च स्पीड ठेवल्यास लिटरमागे एक/दोन पोइट्स कमी पेट्रोल मिळ्ते असा माझा अनुभव आहे.
त्याचप्रमाणे पेट्रोल शक्यतो सकाळी आठ वाजायच्या आत भरावे कारण जस जसे जमीनीचे तापमान वाढ्ते तस तसे पेट्रोलचा GAS होतो जो मोजला जातो पण लगेच हवेत उडुन जातो आणि टाकिमधे पेट्रोल कमी पडते.

सूहास's picture

23 Jul 2009 - 3:39 pm | सूहास (not verified)

<<<<डिस्केमर : या धाग्यावर, आपण ओळखीचे असा नसा, आपण अवांतर प्रतिसाद देवू शकतात. माझी काहीच हरकत नाही.>>>>

=)) =)) =)) =)) =)) =))

ईंधन देई नळावर ,
जिवाश्म चिकण द्रव्याची ,
फक्त २ धक्के आंतरीक जळण यंत्राच्या,
मोजयंत्र शुन्यवत ,
पायधक्क्याची खटकी ,
उधार पत्र ,
गुप्त कळ क्रमांक....

=)) =)) =)) =)) =)) =))
काय हे !! शब्दसप॑देची आख्खी घागर आमच्यावर रिती केलीत...

बाकी पेट्रोल भरावयाच्या बाबतीत, एकाच प॑पातुन आठवड्यातुन एकदाच भरले की काळजी जरा कमी असते...आम्हाला काय अनुभव नाय..

सुहास
(पिल्यान॑तरही बिल व टिप चेक करणारा...)

सूहास's picture

23 Jul 2009 - 3:43 pm | सूहास (not verified)

( =)) डिस्केमर) हे वाचुन अजुनच हसु आल...एखादी डिव्हीडी वा सिडी वा हार्ड डिस्क खराब झाली की हा शब्द मी शब्दश वापरणार असे मी दगडफोड्याला शब्दशा वचन देतो..
डिस्क-ए-मर

सुहास

विकास's picture

23 Jul 2009 - 4:48 pm | विकास

आपला लेख जर इतर मिपा सदस्यांना आवडला असेल तर तो चांगला असू शकेल! (आता हे मान्य नसेल तर वेगळी चर्चा चालू करा. येथे वाद नको!) :-)

मात्र मला वर सुहास ने दिलेल्या जंत्रीतील शब्दांमुळे अमंळ डोक्यावरून गेला :-(

त्यामुळे विशेष करून "इंधन देई नळावर", जिवाष्म चिकण द्रव्याची (यात चिकण हा शब्द मराठी का चुकीचा N टंकीत केलेला इंग्रजी?) ह्या आणि इतर शब्दांना मराठीत काय म्हणता येईल ते सांगितले तर बरे होईल.

अमृतांजन's picture

23 Jul 2009 - 6:51 pm | अमृतांजन

बेंगलुरु मराठी याहू ग्रुपवर ही चर्चा नुकतीच वाचली होती. (ती ईमेल तुम्हीच लिहिली होती का?)
प्रतिसादातील अनेक चांगल्या सुचना आज इतरांनाही सांगितल्या आहेत.

दत्ता काळे's picture

23 Jul 2009 - 7:25 pm | दत्ता काळे

उधार पत्रक चूकून दोनवेळा छेदीत/ घसट न होण्याची काळजी घेणे मलाही महत्वाचे वाटते. नेमके आपण कार्यालयात जाण्यासाठी नित्यनेमाने उशीरा निघणार, दुचाकीमध्ये इंधन भरावयास जाणार, त्याचे मूल्य उधार पत्रक देऊन चुकते करणार, घाईघाईने निघून जाताना उधार पत्रक किती वेळा छेदले गेले आहे हे लक्षातसुध्दा येत नाही.

एकतर- माझे दुचाकी वाहन सरासरी देत नाही, आणि त्यातून उधार पत्रक चूकून दोनवेळा छेदले गेले, तर दोहोबाजूनी तोटाच की :O

उधार पत्रक चूकून दोनवेळा छेदले गेले, तर काय होते?

धमाल मुलगा म्हणतात त्या प्रमाणे उधार पत्रक चूकून दोनवेळा छेदले गेले, तर २ पावत्यांवर सह्या कराव्या लागतील ना?

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

क्रान्ति's picture

23 Jul 2009 - 8:59 pm | क्रान्ति

होतं की असं फसणं हा केवळ बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे! त्यामुळेच माझ्या गाडीतलं पेट्रोल संपत आलं, की ती नव-याने न्यायची आणि येताना पेट्रोल भरून आणायचं असा बरेच दिवस अलिखित करार होता! [आता बिच्चा-याला तेवढा वेळच मिळत नाही!] :S मी पण एकदा फसले होते, आणि त्यावेळी माझ्या मराठीतल्या बीपीचा [पक्षी बावळटपणाचा] उद्धार झाल्यापासून जास्तच काळजी घेते!;)

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

धमाल मुलगा's picture

23 Jul 2009 - 9:37 pm | धमाल मुलगा

मी स्वतः एक काम करतो,
पंपापाशी गेलो तरी आधी 'शुन्य वाचन' घेतो, किती भरायचंय ते सांगतो, सोय असेल तर डिजीटल मिटरवर 'अमुक इतक्या रकमेचं लॉकिंग कर' असं सांगुन ते पाहुन घेतो आणि मगच टाकीचं झाकण उघडतो. इतकं केल्यावर गडबडवायला हे 'एक्स्ट्रा मायलेज'वालं पाऊच किंवा 'द्या पैसे' करणारे दुसरे पंटर आले की फक्त एक हात दाखवतो....नजर पंपाच्या मीटरवर, नुसता ह्या पंटर्सच्या दिशेनं एक उंचावायचा (राजकारणी मिरवणुकीत उंचावतात तसा ;) ) त्यांच्याकडं पहायचंही नाही :)
सगळं आपोआप शिस्तीत घडतं.

बाकी, क्रेडिट कार्ड दोनदोनदा स्वाईप करण्याचं प्रकरण नाही कळलं. दोनदा स्वाईप झालं तर २ पावत्यांवर सह्या कराव्या लागतील ना आपल्याला? मग?

पाषाणभेद's picture

24 Jul 2009 - 6:01 am | पाषाणभेद

"बाकी, क्रेडिट कार्ड दोनदोनदा स्वाईप करण्याचं प्रकरण नाही कळलं. दोनदा स्वाईप झालं तर २ पावत्यांवर सह्या कराव्या लागतील ना आपल्याला? मग?"

हि क्रिया कोणी समजून सांगेल काय?

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Jul 2009 - 6:37 am | llपुण्याचे पेशवेll

दगडफोड्या छानच लिहीले आहेस.
मी देखील इंधन सारक यंत्राच्या ठीकाणी माझ्या दुचाकीत इंधन सारायला गेलो तर दक्ष असतो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रसन्न केसकर's picture

24 Jul 2009 - 1:46 pm | प्रसन्न केसकर

त्यानंतर असेच मागील आठवड्यात मी परत दुसर्‍या एका ईंधन देई नळावर वाहनात ईंधन भरावयास गेलो. ह्या वेळेसपण पाऊस चालू होता. माझा क्रमांक आल्यावर मुल्य घेणार्‍या मनुष्याकडे मी माझे उधार पत्र दिले व त्यास "दोनशे चे कर" असे सांगितले. त्याने मला, "गुप्त कळ क्रमांक काय आहे?" असे विचारले.

हा प्रकार सर्वात धोकादायक आहे. ज्या पंपावर हा अनुभव आला तेथे कार्ड क्लोनिंगचे प्रकार होत असण्याची शक्यता दाट आहे. या विषयावर आजपर्यंत जो अभ्यास झाला आहे त्यानुसार कार्ड क्लोनिंगचे सर्वाधिक प्रकार पेट्रोल पंप, हॉटेल, दुकाने अश्या ठिकाणी होतात. अशी क्लोन केलेली कार्ड खरेदी करणे यासारख्या मार्गांनी मुळ मालकाची लुबाडणुक करण्यासाठी वापरली जातात. क्लोन्ड कार्ड सहसा कॅश विथड्रॉव्हल साठी वापरली जात नाहीत कारण त्यासाठी पिन नंबर लागतो पण अश्या प्रकारे पिन नंबर मिळाला तर ते ही करणे शक्य होते. एकुणच भारतात कार्ड फ्रॉड चे प्रमाण गेली काही वर्षे सातत्याने वाढत आहे हे लक्षात घेता अश्या ठिकाणी कार्ड वापरणेच योग्य ठरते असे अनेक तज्ञ सांगतात. वापरलेच, तर स्वॅप करताना शक्यतो आपण स्व्तः तेथे उभे रहावे आणि ते कार्ड एकदाच स्वॅप केले जात आहे आणि ते ही प्रमाणित रीडरनेच याकडे लक्ष ठेवावे हे सर्वोत्तम.

कार्ड दोनदा स्वॅप केले तर दोन सह्या कराव्या लागतील हे खरे पण अनेकदा बॅन्का सह्या चेक न करता पेमेंट करतात. खरेतर प्रत्येक कार्ड ट्रॅन्झॅक्शनची सही नीट पडताळता आली तर कार्ड फ्रॉडस किमान निम्म्याने कमी होतील. पण तसे होत नाही ही वस्तुस्थिती आहे.

गेली दोन तीन वर्षे मी स्वतः महिन्याला सरासरी तीन या प्रमाणात असे प्रकार पुण्यात घडताना पहात आहे आणि वेळोवेळी यावर लिहिले आहे. खबरदारीच्या सूचनाही अनेकदा दिल्या आहेत. तरीही माझ्या वाचकांपैकी अनेकांची अशी फसवणुक झालेली पाहिली असल्यानेच हा धोक्याचा इशारा.

---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मनिष's picture

24 Jul 2009 - 2:52 pm | मनिष

एकुणच भारतात कार्ड फ्रॉड चे प्रमाण गेली काही वर्षे सातत्याने वाढत आहे हे लक्षात घेता अश्या ठिकाणी कार्ड वापरणेच योग्य ठरते असे अनेक तज्ञ सांगतात.

एकुणच भारतात कार्ड फ्रॉड चे प्रमाण गेली काही वर्षे सातत्याने वाढत आहे हे लक्षात घेता अश्या ठिकाणी कार्ड वापरणेच योग्य ठरते असे अनेक तज्ञ सांगतात.

असे म्हणायचे असावे असे वाटते. खरे तर भारतात ह्या क्रेडीट कार्ड वाल्यांना नीट लगाम घालायला चांगले कायदेच नाहीत (मी वसूलीबद्दल बोलत नाही आहे). जेंव्हा फक्त कार्ड नंबर आणि CVV नंबर (जो कार्डवरच छापलेला असतो) ने ऑनलाईन खरेदी करता येते हे पहिल्यांदा पाहिले होते तेंव्हाच धक्का बसला होता. क्रेडीट कार्ड वापरतांना जास्तीत जास्त काळजी घ्यावी - निदान ऑनलाईन खरेदीसाठी पासवर्ड असावा, नाहीतर २ मिनिटात क्रेडीट कार्ड स्वॅप करतांना कार्ड नंबर आणि CVV नंबर सहज टिपता येतो.

प्रसन्न केसकर's picture

24 Jul 2009 - 3:02 pm | प्रसन्न केसकर

झालेली घोड्चुक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद मनिषजी.

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

पाषाणभेद's picture

27 Jul 2009 - 3:35 am | पाषाणभेद

C V V क्रमांक खोडला तर फायदा होतो का? ऑनलाईन खरेदिसाठी वेगळा पासवर्ड कोठे मिळतो? म्हणजे बँकेकडून की त्या त्या शॉपींग वेबसाईटकडून?

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

बर्‍याच दिवसांनी लेख वाचला. जीवाश्म इंधनभरती केंद्रावर घ्यायची दक्षता नोंद केल्या गेली आहे.

(कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ व तमिळनाडू मिळून संयुक्त द्रविडिस्थान झाला पाहिजे ही मागणी करणारा ब्याट्म्यानण्णा)

हा जबर्‍या लेख वर आलेला पुन्हा लवकरच खाली गेला असं वाटतं. सध्याच्या काळात एकदम चपखल लेख आहे हा.. ;) म्हणून कळफलक आणि नंतर मूषककळ दाबून लेखास वर आणण्याचे पुण्यकर्म.

धन्या's picture

7 May 2012 - 3:08 pm | धन्या

हा लेख वाचून आम्हास निर्वाण प्राप्त झाले आहे. असे लेख जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत कुणाची माय व्याली आहे मराठीकडे वाकडया नजरेने पाहायची.

हा लेख वाचून पोटात गोळा आणणारे लेखन करणारे लेखकसुद्धा मासेमारी करतील असे हे लेखन आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2012 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा

@हा लेख वाचून आम्हास निर्वाण प्राप्त झाले आहे. >>> ++++++++++++++++१११११११११११११११११११११११

हसून हसून खलास जाहलो आहे... अता याची लिंक त्या धाग्यांवर उतारा म्हणुन द्यायला पायजे... ;-)

पार्‍याचे इंधन वापरतो ...