भंकस

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
21 Apr 2012 - 7:22 pm

म्हणजे तसं काही नाही विशेष लिहिण्‍यासारखं. च्यायला एवढी चांगली सुट्टी असून आज ऑफिसात येऊन बसावं लागलंय. मग आम्ही दुसरीकडे कुठे जाणार?

इथेही आलो तर काय ते लोक नेहमीप्रमाणे एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलेले. जरा म्हणून मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारायची सोय नाही. त्यातून मला आजकाल मिपावर ''असहमत'' असा आयडी घ्‍यावा वाटतोय. आता हे मध्‍येच कुठं आलं? पण हे असंच. आजकाल सगळी जिंदगीच बोगस झाली आहे. हे म्हणजे नेहमी सुचणारं वाक्य. त्यातून ती कोसला आणि बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट, कंम्प्लीट शेरलॉक होम्स कॉटवर पडलेले असते आणि आजकाल लॅपटॉप बंद! मग आम्ही यातलंच कुठलंतरी पुस्तक उचकणार आणि सकाळचे साडेचार वाजवणार. मग ऑफिसला बारा-एक वाजता.

हे ऑफिसचे लोक आता फडफड करीत नाहीत. मागे एकदा केली होती तेव्हा मी माझं अस्ताव्यस्त रुटीन सांगून सरळ 'आय क्वीट' म्हणालो. त्यांना वाटलं मी खरोखर पूर्ण भंगलो आहे, त्यामुळं याच्या नादी लागण्‍यात अर्थ नाही. मग ते म्हणे तुला जसं वागायचंय तसं वाग. आता मी कुठे काय करतोय? मला सांगा, एखाद्या माणसाला काही प्रश्न पडले असतील आणि त्याचं काहीच प्रॅक्टीकल उत्तर मिळत नसेल तो रात्रभर भंकस करीत जागणारच की नाही? तुम्हाला सगळं माहित नसेल. तुम्हाला कधी स्वत:च्या असण्‍याबद्दलच प्रश्न पडले आहेत काय? हे भलतंच आहे मान्य! पण असे अवघड प्रश्न पडतातच. उदाहरणार्थ मी! उगाच नोकरी करायला म्हणून इकडे येऊन राहिलो तर ती पण नीट होत नाही. म्हणजे असं वाटतं की हा फालतू टाइमपास आहे - म्हणजे नोकरी. ठीक आहे पैसे वगैरे मिळतात, पण तरीही तो टाइमपासच!

इफ यू वाँट ए लोफ ऑफ ब्रेड, यू नीड टू वर्क फॉर इट. तुम्ही जर म्हणालात की हा खरोखर बोगसपणा आहे आणि आपण असं काही करणारच नाही तर तुम्ही बाद! जा जिकडे जायचंय तिकडे आणि करा काय करायचंय आहे ते. असली भंकस होऊ नये या कारणासाठी हे नोकरी करणं. तरी बरं मी लग्न वगैरे फालतू लफडी मागे लाऊन घेतली नाहीत आणि घेणारही नाही. आयुष्‍य एकट्याला नीट जगता येत नाही, दुसर्‍या कुणासोबत तरी जगून बघायचं म्हणजे ते कितीही गोड वाटत असलं तरी रोगापेक्षा इलाज भयंकर. हे तर छाटछूट प्रश्न. हे जाऊ द्या, हे एवढं महत्त्वाचं नाही.

पण हे आपलं शरीर आहे, हे मन आहे, आपला जन्म झालेला आहेच तर आपल्या जगण्‍यासाठीही खूप मोठा काळ समोर असेलच. पण आपल्याला काही या गोष्‍टींबद्दल खोलवर माहित नाही. म्हणजे मादरचोद ज्या पायावर आपण नावाचं जे काही उभं आहे त्याबद्दलच काही झाट माहिती नाही आणि गगनभेदी स्वप्ने कसली पहायची? होत असतील ती स्वप्ने पूर्ण तर होत असोत, पण आपल्याला त्यात इंटरेस्ट नाही. म्हणूनच कसली वासना, आकांक्षा, स्वप्ने, ‍नियोजन ही भंकस आपल्याकडे नाही. आपण आहे त्या गबाळासोबत ह्याच प्रश्नांवर अडखळलो आणि खरोखर आतून काही कळेपर्यंत तिथेच रहाणार! हा खरं म्हणजे मूर्खपणा म्हणता येईल. एवढं सगळं सुचत असताना आता आतून आणखी काय कळायचं आहे?

पण म्हणालो ना, अवघड प्रश्न आहेत म्हणून. उदाहरणार्थ मी आतापर्यंत 26, 27 वर्षे जगलो आहे. काय झालं? काहीच नाही! किधरसे आये पता नही, किधर जा रहे है वो भी पता नहीं और यहां क्यूं खडे हो वो भी पता नहीं. यांव नोकरी केली, त्यांव केलं, हे अमूक मिळवलं ह्याला काही अर्थ नाही. एवढं कुत्र्यासारखं राबलं तर कुणालाही काहीतरी छाटछूट मिळतंच. आणि एवढे लोक तेच करतात तर आपण एक अजून त्यात कशाला? पण इलाज नाही म्हणून काही गोष्‍टी कराव्या लागतात, म्हणून पडलेले प्रश्न विसरता येतात असं नाही.

आता हे युजींसारखे लोक. हे म्हणतात की तुम्ही असे खोपच्यात अडकला पाहिजेत की तिथून बाहेर पडण्‍याचा मार्गच शिल्लक उरायला नको. श्वास कोंडून मेलात आणि खरोखर मरुनच गेलात की तुम्हाला खरं काय असतं ते कळेल. आता हे म्हणजे काही एन्लायटन्मेंट मिळवणं, जागृत होणं, तत्त्वज्ञान वगैरे भंकस नाही. काही लोकांना उगाच तसं वाटतं ते सोडा. खरोखर जीवंत माणूस व्हायचं म्हणजे उत्क्रांतीच्या टप्प्‍यावरचं प्युअर्ली बायॉलॉजीकल एंड प्रॉडक्ट. म्हणजे ब्रह्मज्ञान होईल असं नाही. म्हणजे हा जो चौदा अब्ज वर्षांपासूनचा (असं म्हणतात म्हणे!) माणसाच्या असण्‍याच्या स्थितीतील शेवटचा टप्पा तुटलेल्या श्वासासोबतच ओलांडून जे आजूबाजूला अफाट आहे त्याच्यात सामावून जाणं. यात काही 'मिस्‍टीकल कंटेंट' नाही. पण हजारो लोकांनी याबद्दल बडबड करुन ठेवल्याने ते मिस्‍टीफाय होतंच - त्याला इलाज नाही.

पण ते प्रॅक्टीकली आयुष्‍याशी रिलेट केलं तर तेवढं गूढ रहात नाही. उदाहरणार्थ युजी म्हणतात की माणसाच्या आत काहीच नाही. कितीही शोधाशोध केली तरी काहीच सापडणार नाही. तुम्हाला जे तुम्ही जाणवता तो 'मी' फक्त विचार सांधले जाण्‍यातून धूसर धूसर दिसतो. एरव्ही माणसाच्या आतमध्‍ये काहीच नाही. विचार येतात, जातात - त्यातले काही तुमच्यामधून कुठल्या ना कुठल्या कृती रुपातून बाहेर पडतात आणि तेच तुम्ही आणि तुमचं आयुष्‍य बनतं. उदाहरणार्थ आता हे मी लिहितोय, हे काय आहे? हे मनात तुटक तुटक येणारे विचारच आहेत आणि ते टाइप केले की असलं भंकस बाहेर पडतंय. खराखुरा सॉलीड 'मी' वगैरे कुणाला आढळणारच नाही.

आणखी काही उदाहरणं दिली आहेत ती जास्त लागू पडतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर श्रद्धा बाळगण्‍याचं काही कारण नाही. उदाहरणार्थ खोलीचं दार बंद करुन, फॅन लाऊन निवांत पडलं की अंधार्‍या खोलीत तो फॅनचा आवाज ऐकू येतो तेवढेच तुम्ही असता. बस खलास. तुम्ही तेवढेच असता. त्यापेक्षा जास्त काही नाही. तुमच्या आजूबाजूला जे आहे, ज्या गोष्‍टीत तुम्ही गुंतले आहात त्या गोष्‍टींचं प्रतिबिंब तुमच्यात पडतं, आणि ते प्रतिबिंब म्हणजेच तुम्ही असता - बाकी तुम्ही बिलकुल असत नाही. शरीर? शरीर हा या सगळ्या पसार्‍याचाच एक भाग आहे - कुठल्याही किटक, प्राण्याला शरीर असतं तसंच.

हे सांगणं अवघड आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्‍टींबद्दल काय वाटतं? तुम्ही कसे जगता?

जीवनमानराहणीमौजमजारेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Apr 2012 - 8:04 pm | पैसा

किती दिवसात झोपला नाहीस बाबा? हे बघ, मदर इंडिया आठवतोय का? भारतातल्या गावातल्या निरक्षर बाईची प्रातिनिधिक गोष्ट. ती बिचारी असला विचार करत बसली असती तर तिच्या पोरांचं काय झालं असतं? तिला विचार करायलासुद्धा वेळ नसतो रे! बैल नसला तर नांगरापुढे पण उभं रहायची तयारी. 'मी' हा शब्दच तिच्या शब्दकोषात नाही. तिचं आयुष्य फुकट गेलं का? नाही ना? तुम्ही कसे जगता विचारशील तर माझं पण हेच तत्वज्ञान आहे. भले कोणी मागासलेले म्हणो. आपल्या भोवतालच्या लोकांसाठी लहानात लहान जी गोष्ट करणं शक्य आहे ती करत रहायची. एकदा तुझ्या आईजवळ मनमोकळ्या गप्पा मार. स्वतःसाठी जगण्याचा विचार सोड. दुसर्‍यासाठी जगून बघ. कदाचित कमी प्रश्न पडतील आणि आयुष्यात जास्त मजा वाटायला लागेल. सर्वात पहिलं म्हणजे सगळी अध्यात्मावरची पुस्तकं फेकून दे आणि निदान काही दिवस असले विचार डोक्यातून हाकलून लाव. काहीतरी कृती कर. आत्मशून्याबरोबर परिक्रमेला गेला असतास तर बरं झालं असतं! अजूनही दुसरं कोणी निघत असेल तर बघ!

अमोल खरे's picture

21 Apr 2012 - 8:09 pm | अमोल खरे

इतका विचार का करतोस तु राजा. माझं ऐकशील तर जरा ब्रेक घे आणि कुठेतरी फिरुन ये. मिपा हवंतर थोडे दिवस अ‍ॅक्सेस करु नकोस म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा होणार नाही आणि तु थोड्या दिवसांनी परत सगळं एन्जॉय करु शकशील. कामाच्या जागी एखादं नवीन काम करुन बघ. असं काम जे कधी तु केलं नाहीयेस. त्याच्या नोट्स काढ. ९-१० तास जागेवरुन न हलता सलग काम करुन सरळ घरी जा. मस्त वाटेल. असं १०-१५ दिवस कर आणि परत मिपावर लॉगिन कर. आणखीन एक. अध्यात्मावरची पुस्तके वाचणं बंद कर. त्याने गरज नसताना फ्रस्टेशन येईल तुला. त्यापेक्षा गाणी ऐक, सिनेमा बघ. ह्या वयात अध्यात्म वाचायला लागलास तर तु गेलास कामातुन. प्लीज शांतपणे विचार कर.

अरे सेंटी मत बनो मित्रहो. हे असंच लिहिलंय, एव्हरीथिंग इज ओके विथ् मी, पर्फेक्‍टली नॉर्मल! पण वेळ आहे तर थोडासा लेखाजोखा करुन पहावा म्हटलं. पण समजाऊन सांगणार्‍या आणि सहानुभूती दाखवणार्‍या प्रतिक्रिया (अर्थात त्याबद्दल मी आभारीच आहे, आणि इथल्या लोकांसोबत एवढा मोकळेपणा वाटतो म्हणूनच असं लिहू शकतो ) होत आहेत त्या अर्थी हा एकूण लेखाजोखा फसला आहे.

बहुगुणी's picture

21 Apr 2012 - 8:35 pm | बहुगुणी

मुक्त-कल्पनाविष्कार आवडला, कळलाच असं नाही.

एक विचार फार वर्षांपूर्वी कुठेतरी वाचला होता, की आयुष्यात अर्थ आनंद, अर्थ वगैरे शोधणं म्हणजे कांदा सोलण्यासारखं आहे. आज तुमचा लेख वाचल्यावर त्याची आठ्वण झाली. तो मूळ लेख अर्थातच सापडला नाही, पण तत्सम लिखाण असलेलं एक संस्थळ सापडलं. ते कितपत योग्य्/अयोग्य विचार प्रसारित करतं हे मला माहीत नाही (माहीत करून घेण्याची इच्छाही नाही - का, ते शेवटी* लिहिलं आहे), पण केवळ विचार पोचवण्यासाठी तिथलीच काही मूळ वाक्य आहेत तशीच उद्धृत करतो:

In exploring any creative endeavor of any significance size, and/or exploring the truth of how we create our experiences and the reality of those experiences, we can expect our journey to have a spiral and onion like facet.............Exploration of our true nature we can come to see truth is onion like in that each revisit is at a new level of understanding is as if another layer was peeled off. It is peeled off as you would peal the layers of an onion or another curtain or veil is removed revealing a deeper layer. It is onion like in the way it is layered and each layer you peal is more concentrated in the depth and breath of the truth that it covers but it is smaller and more concentrated. Of course you may cry as you peal the layers. Cry in the joy and ecstacy of discovery. Or, you will cry in the letting go of what you need to give up in the realization of a deeper more profound truth. ..............After we have continued this spiral and after we have peeled the onion, we no longer have an onion. We can’t put the layers back together again. We can’t put the onion back the way it was.

या सर्वातून माझ्या अल्प-बुद्दीला जाणवलं ते इतकंच, की कांदा - त्यातला गर्भित अर्थ शोधण्यासाठी - सोलता-सोलता अखेर हेच होईल ना की जे गर्भित 'रहस्य' आहे कांद्याच्या रडवणार्‍या सुगंधाचं (अमोनिया वायू), तेच नाहीसं होईल सर्व थर संपल्यावर? मग रहस्यच राहिलं नाही म्हणून रडण्यापेक्षा/ शोक करण्यापेक्षा/ निराश होण्यापेक्षा, त्या उलगडण्याच्या प्रक्रियेतून जो आनंद मिळतोय तोच उपभोगणं हेच बरं नाही का?

* हल्ली असे लेख इथे आणि इतरत्र बरेचदा वाचायला मिळतात, तेंव्हा एकच वाक्य उस्फूर्तपणे डोक्यात येतं: "लई मोकळा वेळ आहे राव, सुखी आहात!" :-)

राजेश घासकडवी's picture

21 Apr 2012 - 8:29 pm | राजेश घासकडवी

असे विचार, वागणूक हे क्लिनिकल डिप्रेशनचं लक्षण असू शकतं.

http://en.wikipedia.org/wiki/Major_depressive_disorder
http://www.medicinenet.com/depression/article.htm

खाली दोन प्राथमिक सेल्फ इव्हॅल्युएशन्स आहेत. त्यातल्या प्रश्नांशी तुमच्या लेखनात येणाऱ्या विधानांची मी मनातल्या मनात सांगड लावून पाहिली, तर तुम्ही डिप्रेस्ड असू शकता असं माझं मत झालं. मी काही मनोवैज्ञानिक नाही, पण तुम्ही स्वतः काही टेस्ट घेऊन बघा अशी कळकळीची विनंती करतो.

http://en.wikipedia.org/wiki/Geriatric_Depression_Scale
http://depression.about.com/cs/diagnosis/l/bldepscreenquiz.htm

इतक्या तरुण वयात डिप्रेस्ड असणं फार चांगलं नाही. हा इलाज असलेला रोग आहे, तो जर तुम्हाला असेल तर तपासणी करून घ्या इतकंच म्हणायचं आहे.

राजेशजी, दुव्यांबद्दल आभारी आहे.
डिप्रेशन वगैरे काही नाहीय - कारण मला खरोखर त्रासदायक यात काहीच नाहीय.
मनातले विचार भीडभाड न राखता, स्वत:चेच म्हणणे खरे वाटेल याची काळजी न करता, अगदी स्वत:लाही वार्‍यावर सोडून प्रत्येकाने लिहिले तर प्रत्येकजणच डिप्रेशनचा रुग्ण दिसायला लागेल.

पण राजेशजींनी दिलेल्या दुव्यावर छोटीशी चाचणी केली आहे --

Q: Do you feel sad or irritable?

Yes
No [वाइट, दु:खी, उदास, हताश वाटत नाही. इरिटेट व्हायचं नाही ठरवलं तर होत नाही, म्हणून नो! ]

Q: Have you lost interest in activities once enjoyed?

Yes
No [मी पूर्वीसारखंच वाचन करतो, कामाच्या निमित्ताने होणार्‍या अनुवादाव्यतिरिक्तही ही अनेक अनुवादाची कामे करतो, विरंगुळा म्हणून इथेही काही अनुवाद केले आहेत. बाकी काम, ‍सिनेमा, फिरायला जाणे वगैरे नॉर्मलचवरच तेव्हा कशातलाही रस निघून गेलेले नाही ]

Q: Have you experienced changes in weight or appetite?

Yes
No [भुकेचं काही सांगता येत नाही... ते काय आणि किती खाल्लं यावर अवलंबून आहे.. पण वजन वाढलेलं नाही]

Q: Have you experienced changes in sleeping pattern?

Yes [हो, हे मात्र बदललंय.. ]
No

Q: Do you have feelings of guilt?

Yes
No [च्यायला मजाच आहे. गिल्ट कशाबद्दल? गिल्ट वगैरे काही नाही.. ]

Q: Are you unable to concentrate, remember things, or make decisions?

Yes
No [असं असतं तर काम फारच डिस्टर्ब झालं असतं... असं काही होत नाहीय ]

Q: Have you experienced fatigue or loss of energy?

Yes
No [उशीरा का होईना पण ऑफिसमध्‍ये येऊन पुन्हा घरी सकाळी 4 - 4.30 पर्यंत जागू शकतो म्हणजे थकवा, शक्तीक्षय वगैरे काही नाही ]

Q: Have you experienced restlessness or decreased activity noticed by others?

Yes
No [नाही. असं काही होत नाही.]

Q: Do you feel hopeless, or worthless?

Yes
No [कशाच्या तुलनेत? मी तुलनाच करीत नाही कशाशी, म्हणून होपलेस, वर्थलेस वाटत नाही..]

Q: Have you had thoughts of suicide or death?

Yes
No [कधीच नाही. लेखात मरणाचा उल्लेख आहे तो ती त्या प्रक्रियेतील एक अपरिहार्य पायरी म्हणून.. म्हणजे मला नेहमी आत्महत्त्या करावी, मरुन जावं वगैरे चिल्लर विचार येतात असं नाही]

आणि हा चाचणीचा परिणाम:

You answered 1 items out of 10 "Yes". According to The National Mental Health Association, 5 or more yes answers indicates that you may be suffering from clinical depression.

धन्यवाद! :)

कवितानागेश's picture

21 Apr 2012 - 9:17 pm | कवितानागेश

व्यायाम सुरु कर.
रात्री गप्चुप झोपशील ७ तास. :)

राजेश घासकडवी's picture

21 Apr 2012 - 9:19 pm | राजेश घासकडवी

मनातले विचार भीडभाड न राखता, स्वत:चेच म्हणणे खरे वाटेल याची काळजी न करता, अगदी स्वत:लाही वार्‍यावर सोडून प्रत्येकाने लिहिले तर प्रत्येकजणच डिप्रेशनचा रुग्ण दिसायला लागेल.

हा लेखनशैलीचा प्रश्न नाही. याच लेखात तुम्ही जे तुमच्या वागणुकीतले पॅटर्न्स सांगितले ते डिप्रेशनच्या काही लक्षणांशी जुळतात.

१. झोपेची अनियमितता
२. कशातच फारसा रस न वाटणे (उदाहरणार्थ - काय पडलंय नोकरीत? एकंदरीतच आयुष्यात? जिंदगीच बोगस वाटणं वगैरे)
३. एकंदरीतच अस्ताव्यस्त रुटीन
४. ज्या वयात आयुष्यात साथी शोधायचे त्या वयात 'ही झंझट नको' असं वाटणं.

आधीच्या काही लेखांतूनही वेळोवेळी जाणवलेलं आहे, पण आता त्यांमधले बारीकसारीक मुद्दे आठवत नाहीत. तुमच्या अनेक मित्रांनीही 'फार विचार नका करू राव' वगैरे सांगितलेलं आहे. विचार करणं वाईट नाही, पण ऐन तारुण्यात अतिरेकी कोरडे, नैराश्याकडे झुकणारे विचार वाचले की लोकांना काहीतरी खटकतंच.

डिप्रेशन अंगावर काढणारे खूप लोक बघितले आहेत. तो काही चांगला अनुभव नसतो. स्वतःचं मन खोड्यात अडकून राहिलेलं असताना 'मी असाच आहे' असं म्हणणं अंतिमतः फायद्याचं नसतं.

तुम्ही ही सेल्फ टेस्ट करा एवढंच म्हणतोय. उगाच रजनीश, युजी वगैरेंकडून आपला आपण मार्ग शोधण्यापेक्षा, तज्ञांकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा या बाबतीत बराच अभ्यास असतो. शेवटी त्यांचा सल्ला मानायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचं.

>>>>>हा लेखनशैलीचा प्रश्न नाही. याच लेखात तुम्ही जे तुमच्या वागणुकीतले पॅटर्न्स सांगितले ते डिप्रेशनच्या काही लक्षणांशी जुळतात.
१. झोपेची अनियमितता २. कशातच फारसा रस न वाटणे (उदाहरणार्थ - काय पडलंय नोकरीत? एकंदरीतच आयुष्यात? जिंदगीच बोगस वाटणं वगैरे)
३. एकंदरीतच अस्ताव्यस्त रुटीन ४. ज्या वयात आयुष्यात साथी शोधायचे त्या वयात 'ही झंझट नको' असं वाटणं.

हे खरं आहे; पण केवळ हे असं वाटतं म्हणून 'डिप्रेशन आलं असेल' असा निष्कर्ष निघू शकत नाही.

>>>>>आधीच्या काही लेखांतूनही वेळोवेळी जाणवलेलं आहे, पण आता त्यांमधले बारीकसारीक मुद्दे आठवत नाहीत. तुमच्या अनेक मित्रांनीही 'फार विचार नका करू राव' वगैरे सांगितलेलं आहे. विचार करणं वाईट नाही, पण ऐन तारुण्यात अतिरेकी कोरडे, नैराश्याकडे झुकणारे विचार वाचले की लोकांना काहीतरी खटकतंच. डिप्रेशन अंगावर काढणारे खूप लोक बघितले आहेत. तो काही चांगला अनुभव नसतो. स्वतःचं मन खोड्यात अडकून राहिलेलं असताना 'मी असाच आहे' असं म्हणणं अंतिमतः फायद्याचं नसतं.

----- *च्यायला ! माझ्या लिखाणातून नेहमी नैराश्यपूर्णच प्रतिमा निर्माण होते का? मला तरी ते कधी तापदायक वाटलेले नाही. इव्हन हे सगळं तापदाकच आहे असा भावही या किंवा इतर कुठल्या लिखाणात उमटलेला नाही. एखादी स्थिती जशी आहे तशी एखाद्यानं मांडली तर ती स्थितीच तशी की विचार करणाराच तसा?
मुळात मी नेहमी नेहमी हे असलं किंवा आध्‍यात्मिक वाटेल असं लिहितो त्याचं कारण म्हणजे इथे एकाच बोटीतून प्रवास करणारे आपल्यासारखे लोक आहेत का, आणि असतील तर त्यांच्याबाबत कसे आहे हे पहाण्यासाठी.
त्यामुळं 'मी असाच आहे' हे म्हणायचं नाहीय.

>>>>> तुम्ही ही सेल्फ टेस्ट करा एवढंच म्हणतोय. उगाच रजनीश, युजी वगैरेंकडून आपला आपण मार्ग शोधण्यापेक्षा, तज्ञांकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा या बाबतीत बराच अभ्यास असतो. शेवटी त्यांचा सल्ला मानायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचं.

केली. पाच उत्तरं 'हो' अशी आली तर कदाचित डिप्रेशनचे रुग्ण असू शकता म्हणतेय ती साइट.
माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर हो असं आहे.

* च्यायला - ही कुणालातरी दिलेली शिवी नसून आपण मित्रांसोबत बोलताना जसा शिव्यांचा मुक्तहस्ताने वापर करतो तसा तो आपोआप आलेला हा शब्द आहे.. हा aggresiveness आहे असं वाटलं असे सांगणारा व्यनि आल्याने हे स्पष्‍टीकरण.

दारु प्यायल्यावर मी प्यायलो नाही असं म्हणणं आणि डिप्रेसड असताना मी अजिबात डिप्रेसड नाही असं ठामपणे सांगणं या दोन्हीत काही फरक नाही. जे आहे ते वास्तव मान्य करायला जड जाणं किंवा त्या वास्तवात न जगता उगाच चिरफाड करत राहणं ही देखील डिप्रेशनची लक्षणं आहेत.

नवीन दुख: अनुभवा, म्हणजे थोडक्यात लग्न करा.

>>>>दारु प्यायल्यावर मी प्यायलो नाही असं म्हणणं आणि डिप्रेसड असताना मी अजिबात डिप्रेसड नाही असं ठामपणे सांगणं या दोन्हीत काही फरक नाही. जे आहे ते वास्तव मान्य करायला जड जाणं किंवा त्या वास्तवात न जगता उगाच चिरफाड करत राहणं ही देखील डिप्रेशनची लक्षणं आहेत.

---- खरं म्हणजे असला लेख लिहून पुन्हा त्यावर साद-प्रतिसाद करीत बसणं म्हणजे 'आ बैल मुझे मार!'
मी डिप्रेस्ड वगैरे असेन की नसेन ते माझं मी पाहुन घेईनच, आणि इथे बरेच चांगले लोक आहेत तेव्हा काही प्रॅक्टीकल चर्चा करावी म्हटले तर ती करणार्‍यालाच आरोपीच पिंजर्‍यात उभं केल जातंय. ठीक. हे मी समजू शकतो.
नेहमी नेहमी 'स्वत:ला वगळून' केलेल्या वांझोट्या चर्चा करणे, सल्ले देणे, अक्कल पाजळणे वगैरे पासून मी दूर आहे - कारण त्यात प्रॅक्टीकल काही नाही.
तर मग वर मी जे लिहिलंय त्यावर 'हे तर डिप्रेशन आहे' यापेक्षा वेगळं काही तुम्हाला सांगता येईल काय?

उदाहरणार्थ -
पण हे आपलं शरीर आहे, हे मन आहे, आपला जन्म झालेला आहेच तर आपल्या जगण्‍यासाठीही खूप मोठा काळ समोर असेलच. पण आपल्याला काही या गोष्‍टींबद्दल खोलवर माहित नाही. म्हणजे मादरचोद ज्या पायावर आपण नावाचं जे काही उभं आहे त्याबद्दलच काही झाट माहिती नाही आणि गगनभेदी स्वप्ने कसली पहायची?

हे असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर तुम्ही याबद्दल काही सांगू शकता का?

स्वानन्द's picture

22 Apr 2012 - 12:56 am | स्वानन्द

:)
लिहीत रहा.

गोंधळी's picture

22 Apr 2012 - 12:44 pm | गोंधळी

संन्यास घेण्याची वेळ आली आहे.
बघा विचार करुन.

असे अज्ञानात किती वेळ जगायचे?

५० फक्त's picture

22 Apr 2012 - 1:01 pm | ५० फक्त

'पण हे आपलं शरीर आहे, हे मन आहे, - चला निदान भौतिक वास्तव तरी अजुन मान्य करत आहात, हे ही नसे थोडके.

आपला जन्म झालेला आहेच तर आपल्या जगण्‍यासाठीही खूप मोठा काळ समोर असेलच. - जमलं तर किती काळ जगायचं हे तुम्ही ठरवु शकता, ती मुभा तुम्हाला आहे.

पण आपल्याला काही या गोष्‍टींबद्दल खोलवर माहित नाही. - मनाबद्दल माहित करुन घेण्यासाठी काय करावं लागतं माहित नाही पण मेडिकल डॉक्टर झाला तर शरीराबद्दल बरंच काही कळेल, नसाल तर ते आपल्याला माहितच असायला हवं हा हट्ट कशासाठी, आणि असेल तर द्या पुन्हा मेडिकलची एंट्रंन्स आणि व्हा डॉक्टर.

म्हणजे मादरचोद ज्या पायावर आपण नावाचं जे काही उभं आहे त्याबद्दलच काही झाट माहिती नाही आणि गगनभेदी स्वप्ने कसली पहायची?' - दोन शिव्या किंवा घाणेरडे शब्द सोडले तर, त्या प्रकारचे शब्द लिहुन ट्यार्पी खेचणे या पेक्षा जास्त अर्थ या वाक्याला नाही. प्रत्येक स्वप्न गगनभेदी असावं याची गरज नाही , किंबहुना प्रत्येकाचं गगन की,जे भेदायचं आहे ते एकच असावं किंवा एकाच पातळीत असावं ही गरज नाही,

अशा विचारांबद्दल एवढंच सांगु शकतो की, शरीराच्या ज्या त्या अवयवांचा उपयोग ज्या त्या काळात योग्य त्या पद्धतीने केला गेला की मग असे विचार येत नाहीत, अन्यथा मनाच्या फडताळातील सगळेच डबे रिकामे असल्याने थोडीशी थरथर झाली तरी मोठा भुकंप झाल्यासारखा भास होतो. एकदा का डबे भरले की मग हा प्रकार कमी होतो.

असो.
जे मुद्दे आहेत त्यावर दिलेली उत्तरे पाहून 'मियाँ की दौड मस्जिद तक' असे वाटून गेले.

मियां की दौड मस्जिद तक नसावी तर मग कुठेपर्यंत असावी? मॅनेजमेंटमधली दोन वर्तुळांची थेअरी माहित असेलच तुम्हाला ? नसेल तर माहित करुन घ्या. ही थेअरी ऑफिसच्या कामकाजातच नाही तर कुठेही लागु पडते.

चौकटराजा's picture

21 Apr 2012 - 8:55 pm | चौकटराजा

यकू , तुम्ही रहाता तिथलं पाणी फार जड आहे का ? मला काही कळत नाहीय काय लिहिलं ते ! त्यामुळे " चौकशी" करता येत नाही याबद्दल अंगाची लाही लाही होतेय .
आप्ला हितेषू - चव कट करणारा राजा .

तु पुर्ण नॉर्मल वाटतोयस.
तूझी पावल दुरुन कोठुन्तरी येणार्‍या ढोला वरती पडतायत

रेवती's picture

22 Apr 2012 - 12:48 am | रेवती

परिक्रमेला निघा.

कवितानागेश's picture

22 Apr 2012 - 1:42 am | कवितानागेश

यात मध्येच 'डीप्रेशन' कुठून येतंय मला कळले नाही.
एखाद्याचा विचार, फक्त स्वतःच्या आयुष्याची +- ५० वर्षे किंवा फार तर आजूबाजूच्या इफेक्टिव्ह जगाची +- १०० वर्षे याच्यापलिकडे १४ अब्ज वगरै काळापर्यंत जात असेल आणि जाणीव फक्त इफेक्टिव जीवांपर्यंत न रहाता जर अजून जरा लांब पोचत असेल, तर त्यात काळजी करण्यासारखे काय?
अशा विचारांमध्ये असताना आपोआपच अजूबाजूच्या 'जीवां'शी मिळते जुळते घेणे थोडेसे कठीण जाउ शकते.
ज्यांना मनाला स्वैर सोडून द्यायची सवय नाही अशा कुणालाही हे सगळे 'भंकस' वाटू शकते.
आणि या दोन्हीही गोष्टी 'अ‍ॅबनॉर्मल' नाहीत असे आपले मला उगीचच वाटते.
माझा वरचा प्रतिसाद फक्त झोप आणि रुटीन यबद्दल आहे.
पण ४. ज्या वयात आयुष्यात साथी शोधायचे त्या वयात 'ही झंझट नको' असं वाटणं.> याचा अर्थ कळला नाही.
सोबत कुठल्याही वयात हवीच असते! जगातल्या प्रत्येक माणसानी फक्त २० ते ३० य वयोगटात असतानाच 'हंटिंग' करावे असा आग्रह का?
शिवाय सोबत शोधून मिळते का? आणि शोधलेली 'सोबत' सोबत करत असते का? वगरै कधीच न संपणारे प्रश्न आहेतच.
पुन्हा प्रत्येक व्यक्तीनी संसार मांडूनच बसावे असा काही नियम नाही, असे आपले मला उगीचच वाटते.
किंवा ठराविक पद्धतीनीच, ठराविक चाकोरीतले विचार करावेत असा काही नियम आहे का?
जोपर्यंत कुणाचेही विचार दुसर्‍याला/ स्वतःला कुठाही प्रकारच्या हिंसेला बळी पाडत नाहीत, तो पर्यंत त्यांना 'चाकोरीबाहेरचे' असले तरी 'चुकीचे' ठरवणे बरोबर वाटत नाही.
कुठल्याही गोष्टीच्या मूळापर्यंत शोध घेताना मध्येमध्ये गोंधळाची अवस्था येणे स्वाभाविक आहे, असे आपले मला उगीचच वाटते.

राजेश घासकडवी's picture

22 Apr 2012 - 9:57 pm | राजेश घासकडवी

यात मध्येच 'डीप्रेशन' कुठून येतंय मला कळले नाही.

विशिष्ट प्रकारचे विचार मनात येणं, विशिष्ट प्रकारची वागणुक करणं यातून डिप्रेशनची लक्षणं इतरांना दिसू शकतात. कधी ते निदान बरोबर असतं, कधी नसतं. अशा जाणीवा असणं आणि डिप्रेशनसारखी मानसिक व्याधी असणं यांचा परस्पर संबंध असेलच असं नाही. पण असू शकतो हे बऱ्याच जणांना जाणवत आहे. अनेकांनी काळजी वाटून 'अति विचार करणं थांबव; मन कशात तरी रमव' असे सल्ले दिलेले आहेत. आता तुम्हीसुद्धा नाही का 'व्यायाम कर भरपूर म्हणजे झोप लागेल चांगली' असा सल्ला दिलात? (व्यायाम करणं, मन रमवणं, सकारात्मक विचार करणं, झोप व्यवस्थित घेणं हे डिप्रेशनवरचे प्राथमिक इलाज आहेत) त्यात तुम्हालाही त्यांची काळजी वाटलेली दिसते.

पण ४. ज्या वयात आयुष्यात साथी शोधायचे त्या वयात 'ही झंझट नको' असं वाटणं.> याचा अर्थ कळला नाही.

सोबत कुठल्याही वयात हवीच असते - असं म्हणताना तुम्ही सर्वसामान्यांविषयी विधान केलेलं आहे, 'चिंता करितो विश्वाची' म्हणणाऱ्यांविषयी नाही. असो. सोबत शोधावीच असं नाही, पण ती ऍक्टिव्हली नाकारण्यात वेगळेपणा दिसून येतो हे तुम्हीही मान्य करालच. मुद्दामून फक्त याच वयात शोधावी असं म्हणायचं नसून, या वयात बहुतांश लोक सोबत शोधताना दिसतात, एवढंच अधोरेखित करायचं होतं.

चाकोरीबाहेरचे विचार करणं हे चूक नाही. पण एकंदरीतच लेखनातून 'स्व'ला नाकारण्याची प्रवृत्ती दिसते. मी कोणी नाही, माझं कार्य आत्तापर्यंत काही नाही, अंधार करून झोपलो तर मी म्हणजे फक्त पंख्याचा आवाज वगैरे... म्हणून लोकांना काळजी वाटते इतकंच.

मात्र एका प्रतिसादात लेखकाने 'मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चालू आहे' वगैरे म्हटलं ते दुर्दैवी वाटलं. त्यांनी स्वतःलाच पिंजऱ्यात उभं केलेलं आहे, आणि या पिंजऱ्यातून बाहेर यावं अशी अनेकांचा कळकळीचा प्रयत्न दिसतो.

स्पा's picture

23 Apr 2012 - 12:20 pm | स्पा

+१ लीमाउजेट

... प्रतिसाद वाचून लैच हसू अल...

पब्लिक कुठल्या गोष्टी शिरेस्ली घील काय सांगता येत नाही..
अरे नारायण धारप भयकथा ल्ह्यायचे.. याचा अर्थ त्यांना भूत दिसत असा होत नाही ..

यकू ने अस काही लिहील याचा अर्थ तो abnormal आहे अस कसा घेऊ शकता ?

यकू मला तरी लेख लई आवडला
पुढील लेखापासून लेख काल्पनिक आहे.. वास्तवाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.. अशी टीप न विसरता लिही आणि ;)

शिल्पा ब's picture

22 Apr 2012 - 2:45 am | शिल्पा ब

हं...कधीकधी गोंधळ उडतो खरा. असो.

प्रचेतस's picture

22 Apr 2012 - 8:42 am | प्रचेतस

जे काही लिहिलय ते आवडलंय.

मन१'s picture

22 Apr 2012 - 2:55 pm | मन१

सोडा हो...
(की सोडा कमी पडलाय हो?)

माठ्या, अतिसामान्य

पप्पु अंकल's picture

22 Apr 2012 - 2:58 pm | पप्पु अंकल

फॅन लाऊन निवांत पडुन "या जन्मावर या जगण्यावर"एका

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2012 - 3:27 pm | भडकमकर मास्तर

http://www.youtube.com/watch?v=CKvxAUxrto0&feature=share

यातला राज बब्बरचा ड्यान्स पहा...
सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील....

पुलाच्या धातूरज्जूंवरती नायिकेला कवेत घेऊन अभिनय करत असताना खाली बर्फाळ नदी वाहतानाचा जो आवाज येतो, तेवढेच तुम्ही असता असे खुद्द राज बब्बरने एका मुलाखतीत सांगितल्याचे स्मरते...

आपल्याला अन्न हवे तर डोंग र उ तारावर धावत येऊन मूर्खासारखे कपडे घाल्लून जड नायिकेला उचलून अभिनय करणे भाग आहे, ( ब्रेड हवा तर काम करणे आवश्यक)....

हाहाहाहा
थँक्यू हो मास्तर. :)
ये हुयी ना बात ;-)

दादा कोंडके's picture

22 Apr 2012 - 3:49 pm | दादा कोंडके

फारच अधीर लोकांनी डायरेक २:४० ते ३:१० ह्या वेळेत ड्यांन्स बघावा असं सुचवतो!

ती चक्क गुडघ्यानी त्याच्या "ह्याच्या"वर मारते आहे!

आहाहा काय ते गाणं .....काय तो ड्यँस.;)
त्या बाईनं इतक्या कसरती केल्यात की शेवटी शेवटी दोघांपैकी निदान एकाचे तरी पाठीचे दुखणे चालू होणार अशी शंका आली. बुवा नवीन पद्धतीच्या कपड्यात आणि बाई मात्र 'देवादिक' ब्रँडचे कपडे घातलेली. हे सगळं पूर्वी चालून गेलं म्हणून हसू आलं. उच्च गाणं पहायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मास्तरांचे आभार.

मी म्हणते की तुम्ही लग्न करा. कजाग बायको मिळाली तर तुम्हाला ऑफीसचे काम बरे वाटू लागेल.
सालस बायको मिळाली तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच.

खरोखर त्रासदायक यात काहीच नाहीय
एखाद्या आजीबाईला (मला नव्हे) विचारून बघा.
ती म्हणेल सुख दुखतय, बाकी काही नाही.;)

स्पंदना's picture

23 Apr 2012 - 6:47 am | स्पंदना

>>उदाहरणार्थ खोलीचं दार बंद करुन, फॅन लाऊन निवांत पडलं की अंधार्‍या खोलीत तो फॅनचा आवाज ऐकू येतो तेवढेच तुम्ही असता. बस खलास. तुम्ही तेवढेच असता. त्यापेक्षा जास्त काही नाही. तुमच्या आजूबाजूला जे आहे, ज्या गोष्‍टीत तुम्ही गुंतले आहात त्या गोष्‍टींचं प्रतिबिंब तुमच्यात पडतं, आणि ते प्रतिबिंब म्हणजेच तुम्ही असता - बाकी तुम्ही बिलकुल असत नाही. शरीर? शरीर हा या सगळ्या पसार्‍याचाच एक भाग आहे - कुठल्याही किटक, प्राण्याला शरीर असतं तस>>>>>

च्च! आता मला स्वतःला असच काही वाटुन राहिल बघ हे वाचल्यावर. ते जाउ दे आश्रम कोठे उघडणार तेव्हढ सांग. नाही आम्ही आभिमानान सांगु ह्यो बाबा आमच्या मिसळीवरचा म्हणुन.

अन वरचा रेवेतीचा सल्ला तर शंभर नंबरी. बघता बघता आयुष्य रम्य वाटु लागेल, अन झोप पुरी होउन काम ही अगदी जोषात होइल. नाही तुला भंगलायस म्हणुन किती दिवस कोणी ठेवेल ना कामावर म्हणुन हा सल्ला.

श्वास घेणं ही प्रतिक्षिप्त क्रिया (इनव्हॉलंटरीला हा शब्द योग्य नसल्यास माफी) आहे. तो आपला आपण चालू असतो आणि कधीतरी आपला आपण बंद पडतो. विचारांनी श्वास थांबवता / चालू करता येत नाही.

तस्मात:

ठरवून श्वास
ठरवून दीर्घश्वसन
श्वासावर लक्ष केंद्रित करणं
श्वासावर लक्ष केंद्रित करायला लागणं
श्वासावर लक्ष केंद्रित करायला लावणं
श्वासोच्छवासामागील प्रक्रियेची किंवा कारणभावाची मीमांसा करणं.

वगैरे यापैकी काहीही करुन श्वास चालू राहणं किंवा बंद राहणं किंवा श्वास चालू राहण्याचा कालावधी यात काही फरक पडत नाही.

आपोआप अजिबात न कळता श्वास चालू असतो तोपर्यंत सर्व उत्तम आरोग्यपूर्ण असतं.

श्वासाची जाणीव व्हायला लागली म्हणजे तंत्र बिघडलं..

जगणं म्हणजे श्वास घेणं. मरणं म्हणजे श्वास थांबणं.

आपण जन्मलो तेव्हा जग उत्पन्न.. आपण मेलो तेव्हा जग नष्ट..

थोडक्यात, खोलवर जाऊन विचार करु नये असं नव्हे पण टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, इतकंच.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Apr 2012 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

किती त्या वांझोट्या चर्चा !

यक्कु भावा रोज रात्री २ पेग. :) हे एकमेव उत्तर.

प्यारे१'s picture

23 Apr 2012 - 1:10 pm | प्यारे१

बाकी शून्य.....! ;)

या विषयावर इथे चर्चा घडवुन त्यातुन किती लाभ तुला होईल ते माहित नाही.
त्यापेक्षा ज्या आंतरजालिय मायाजालातुन काही दिवस रजा घे.
चार खर्‍या खुर्‍या माणसांबरोबर / मित्रांबरोबर वेळ घालव.
जमल्यास एखादा चार्ली चॅप्लिनचा चित्रपट टाक.
रात्री गच्ची वर जाउन दोन घटका चांदण्यांचा खेळ पहा. (जवळपास समुद्र् असल्यास लाटांची गाज ऐकत बस.)
पुलंच एखाद पुस्तक घे हातात. वाचायचा कंटाळा आला असेल तर त्यांच्या कथाकथनाच्या ध्वनीफिती ऐकत बस.
एखादा सुटलेला छंद पुन्हा जोपास.
हाकानाका.

त्यापेक्षा ज्या आंतरजालिय मायाजालातुन काही दिवस रजा घे.
चार खर्‍या खुर्‍या माणसांबरोबर / मित्रांबरोबर वेळ घालव.

जबरा जबरा उपदेश ऑफ द आंजा.

इरसाल's picture

23 Apr 2012 - 5:25 pm | इरसाल

यांच्या प्रतिसादावर टोपी काढली आहे. (ह्याट्स ऑफ)

मोदक's picture

23 Apr 2012 - 7:41 pm | मोदक

Life is very Simple, we make it Complex and then we try to resolve it.

बिचार्‍याने एक सरळ लेख लिहिला ज्यात स्वतःच्या किंवा नायकाच्या मनातला गोंधळ मांडला तर तुम्ही त्याला पश्चाताप करायला लावताय!! डीप्रेशन असल्यासारखं जाणवतं नाही.

घासकडवींनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एक बारीकसं: उशीरा उठणं वगैरे सवयी असतात... त्याला कोणी गर्लफ्रेंड नाही त्यामुळे वेळा पाळायची गरज नसावी ;) .

आता गविंचा प्रतिसाद घेउ: योगविद्येत तर श्वासावर नियंत्रण वगैरे आणायला शिकवतात, मग हजारो वर्षांपुर्वी डोक्याला / शरीराला भरपुर ऑक्सिजन मिळावा म्हणुन हे जे प्राणायाम वगैरे प्रकार शोधले ते व्यर्थ आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का?

असो, याला असे नकारात्मक प्रतिसाद दिल्याने तुम्ही माझ्या एका तात्वज्ञानिक लेखाला मुकला आहात याची नोंद घेणे.

>>>त्याला कोणी गर्लफ्रेंड नाही
--- हो ना राव :(