"पुरुषांची" खरच गरज आहे का ?

तर्री's picture
तर्री in जनातलं, मनातलं
25 Mar 2012 - 11:28 pm

सर्व सजीव सृष्टीत दोन मूलभूत प्रेरणा असतात. १.स्वतःचे संरक्षण आणि २.प्रजोत्पादन. सगळ्या सृष्टीमध्ये मानव प्रगत आहे पण हया दोन प्रेरणा मानाव जातीतही तीव्रतेने दिसून येतात. उत्क्रांतीमुळे मानवाच्या बुद्धीचा विकास झाला. हया बुद्धी-विकासाने मानवाला विज्ञानाचे वरदान लाभले.मानव जात ही कळपाने रहाणारी / समाज प्रिय मनात आहे. कळपाने रहाणार्या प्राण्यामध्ये अनेक प्राण्यांप्रमाणे मानव जात ही “मादी-केंद्रित” (female centered) ,“मातृ-सत्ताक” होती. चाकाच्या शोधा नंतरचा महत्वाचा शोध - शेतीचा शोध मानवाला लागला. शेतीच्या शोध लागे पर्यंत मानाव भटका होता. स्त्री ही कुटुंब प्रमुख होती. आपला कळप मोठा करणे ही सहज प्रेरणा होती. स्त्रीला कळपातील आवडत्या पुरुषाशी संग करून आपला वंश वाढवण्याची मुभा होती. शेतीच्या कामासाठी प्रथमच मानवाला “शरीरशक्तीचा” वापर सातत्याने करावा लागला. ह्या पूर्वी शिकारी करताच शारीरिक श्रमांची गरज होती. हया नव्या गरजे मुळे कळपामध्ये पुरुषांचे महत्व वाढू लागले. सुरवातीची शेती ही भटक्या स्वरूपाची होती. हळूहळू तिला स्थिरता आली. आणि तेंव्हा पासून स्त्रीचे महत्व कमी होवू लागले. पुरुष प्रधान समाज रचना हळूहळू आकार घेवू लागली. हया बदला मध्ये काही कळप मागे राहिले. हया कळपामध्ये अजूनही “स्त्री” / प्रजोत्पादन हीच मुख्य प्रेरणा होती. स्थीर शेती मुळे झालेल्या नव्या समाज रचने मध्ये हया अशा स्त्रीसमुहांची संख्या व स्थान झपाट्याने कमी होवू लागली. पुरुषांच्याच्या बळाचा वापर शेती प्रमाणे- हया स्त्रीसमुहांवर होवू लागला. त्यांना पुरुष आपली “भूक” भागवण्यासाठी वापरू लागले. त्यातूनच वेश्या व्यवसाय सुरु झाला. शेतीच्या कामांना लागणारे प्रचंड श्रम स्त्रीला “अबला” बनवून गेले.
शेती पासून कोसो दूर गेलेल्या समाजा मध्ये आज काय दिसते आहे ? स्त्री आपल्या “स्वयं” साठी झगडते आहे आणि कधी सहन करून कधी बंड करून उठते आहे.
आजच्या प्रगत समाजात कोणाला कोणाची किती गरज आहे ? ते ही पाहू या.

निसर्गाने स्त्री-पुरुषांच्या आकर्षणात आणि प्रजोत्पादनामध्ये मोठी “मेख” मारून ठेवली आहे. सामागामासाठी स्त्रीला शरीर सदैव सहज साथ देते पण स्त्रीचे मन निसर्गाने असे घडवले आहे की पूर्ण “विश्वास” असल्याशिवाय स्त्री-संगास तयार नसते. पुरुषाचे मन सदैव तयार असते पण सगं करण्यास शरीरावर प्रचंड मर्यादा आहेत. हे आजच्या विज्ञानामुळे फार बदललेले नाही. उलट विज्ञानामुळे प्रजोत्पादनासाठी पुरुषांची ( मोठ्या प्रमाणावर) काही गरज राहिली नाही. स्त्रिया परत कळपाने राहू लागल्या आणि काही निर्व्यसनी /बलवान पुरुष त्यांनी ( वीर्यनिर्मितीपुरते) पाळले की झाले. प्रजोत्पादन क्षमता हा आज स्त्रीचा शाप समजला जातो. ज्या दिवशी ते स्त्री ला मिळालेले अमोध वरदान ठरेल , त्या दिवशी मानवाची समाज रचना बदलेल. स्त्री गर्भ हत्या थांबेल आणि पुरुष गर्भ हत्या सुरु होईल. कारण मानव जातीला पुरुषांची काय गरज आहे ?
आजच्या विज्ञानामुळे परत हे चक्र उलटे फिरणार का? स्त्री-केंद्रीत अथवा स्त्री-प्रधान समाज परत निर्माण होणार का?

( ही शास्त्रीय कल्पना मला “ the backup plan” हा सिनेमा पहाताना सुचली आहे. थोडी गंभीर आहे पण टवाळकी करायला भरपूर वाव आहे. खात्री आहे - संयम दाखवला जाईल.)

संस्कृतीसमाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

26 Mar 2012 - 12:01 am | शैलेन्द्र

"सर्व सजीव सृष्टीत दोन मूलभूत प्रेरणा असतात. १.स्वतःचे संरक्षण आणि २.प्रजोत्पादन. "
प्रजोत्पादन हीच मुलभुत प्रेरणा, स्वसंरक्षन हे मुलभुत प्रेरणेच्या पुर्तीसाठी आवश्यक, म्हणुन महत्वाचे..

"कळपाने रहाणार्या प्राण्यामध्ये अनेक प्राण्यांप्रमाणे मानव जात ही “मादी-केंद्रित” (female centered) ,“मातृ-सत्ताक” होती. चाकाच्या शोधा नंतरचा महत्वाचा शोध - शेतीचा शोध मानवाला लागला. शेतीच्या शोध लागे पर्यंत मानाव भटका होता. स्त्री ही कुटुंब प्रमुख होती. आपला कळप मोठा करणे ही सहज प्रेरणा होती. स्त्रीला कळपातील आवडत्या पुरुषाशी संग करून आपला वंश वाढवण्याची मुभा होती. शेतीच्या कामासाठी प्रथमच मानवाला “शरीरशक्तीचा” वापर सातत्याने करावा लागला. ह्या पूर्वी शिकारी करताच शारीरिक श्रमांची गरज होती."
मादी केंद्रीतपेक्षाही, सगळे कळप, अपत्य केंद्रीत असतात.. नवजात अर्भकांच्या संगोपणासाठी जी रचना योग्य असेल ती उत्क्रांतीच्या ओघात स्वीकारली जाते. स्रीला आवडता पुरुष निवडता यायचा, पण हा आवडता पुरुष प्राय कळपातला सर्वात बलवान पुरुष असावा, बर्‍याचदा तो पुरुष इतर पुरुषांना आव्हान देवुन, त्यांना मारुन स्वत:चे बिज पसरवण्याचे काम करत असावा. आजही अनेक सस्तन प्राण्यात ही प्रवृत्ती दिसते. शारीरिक ताकदीची खरी गरज फक्त शिकारीसाठी नसुन कळपात होणार्‍या वर्चस्वाच्या लढाईत पडत असावी.

मानवी समाज आज जसा आहे तसा होण्यामागे, पुरुषी वर्चस्वापेक्षाही, अपत्याला आधिक सुरक्षीतता, कळपातील लढाईत वाया जाणारी पुरुषी शक्ती वाचवुन समुहाच्या लढाईत वापरणे, त्या शक्तीद्वारे इतर कळपांना अंकीत करुन घेणे, त्यांच्या साधन सामग्रीवर ताबा मिळवणे या प्रेरणा असाव्यात. विवाहसंस्थेचा उद्देशही कळपात सुव्यवस्था आणुन मानवी जिवीताचे रक्षण व सुविधाजनक अपत्य संगोपण हाच असावा.

"सामागामासाठी स्त्रीला शरीर सदैव सहज साथ देते पण स्त्रीचे मन निसर्गाने असे घडवले आहे की पूर्ण “विश्वास” असल्याशिवाय स्त्री-संगास तयार नसते. पुरुषाचे मन सदैव तयार असते पण सगं करण्यास शरीरावर प्रचंड मर्यादा आहेत."
शास्त्रीय दृष्ट्या चुकीचा विचार.. चारही वाक्य चुकीची आहेत..

"उलट विज्ञानामुळे प्रजोत्पादनासाठी पुरुषांची ( मोठ्या प्रमाणावर) काही गरज राहिली नाही. स्त्रिया परत कळपाने राहू लागल्या आणि काही निर्व्यसनी /बलवान पुरुष त्यांनी ( वीर्यनिर्मितीपुरते) पाळले की झाले. प्रजोत्पादन क्षमता हा आज स्त्रीचा शाप समजला जातो. ज्या दिवशी ते स्त्री ला मिळालेले अमोध वरदान ठरेल , त्या दिवशी मानवाची समाज रचना बदलेल. स्त्री गर्भ हत्या थांबेल आणि पुरुष गर्भ हत्या सुरु होईल. "
स्त्रीपासुन स्त्री तयार करण्यासाठी पुरुष बिजाची गरज नाही, पण स्त्री पासुन नर तयार करण्यासाठी आहे.. पुरुष मात्र स्वत:च्या शरीरापासुन , स्त्री व पुरुष असे दोन्ही सेट तयार करु शकतो.. त्याला स्त्रीची गरज नाही..

"कारण मानव जातीला पुरुषांची काय गरज आहे ?"
मानव जात म्हणजे फक्त स्त्रीयाच का?

माझा हा एकमेव गंभीर प्रतीसाद.. पुढे पॉपकॉर्ण घेवुन बसल्या गेले आहे..

स्त्रीपासुन स्त्री तयार करण्यासाठी पुरुष बिजाची गरज नाही, पण स्त्री पासुन नर तयार करण्यासाठी आहे.. पुरुष मात्र स्वत:च्या शरीरापासुन , स्त्री व पुरुष असे दोन्ही सेट तयार करु शकतो.. त्याला स्त्रीची गरज नाही.. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पटलं न्हाई... पुरुषाच्या शरीरात एक्स आणि वाय असला तरी स्वतःच्याच दोन सेल मधून दोन एक्स किंवा एक्स वाय घेऊन स्त्री किंवा पुरुष निर्माण होऊ शकत नाही.

एक क्रोमोसोम सेट पुरुषाकडून आणि एक स्त्रीकडून असे केले ( भले हे लॅबमध्ये का करेना) तरच जीव निर्मिती शक्य आहे.... लॅब मध्ये डोकं फिरलेली माणसं कुठले तरी क्रोमोसोम सेट मिसळून काही करत असतीलही, पण हा काही घाऊक प्रमाणावर प्रजा निर्मितीचा उपाय नाही.... घाऊक प्रमाणावर निर्मितीसाठी स्त्री पुरुषानी हमीमून साजरा करणे हाच स्वस्तात मस्त उपाय आहे.

नुसते २-४ पुरुष ठेवले की झालं >>>>>>>>>>>>>> हा तर आणखी वाइट उपाय..... यातून एखादा अनुवंशिक जीन एखाद्यात असेल तर घाऊक प्रमाणावर रोगट प्रजा जन्मणार. .. त्यापेक्षा स्त्री पुरुषांची संख्या पुरेशी असेल तर प्रजानिर्मिती जास्ती सक्षम होणार..

इथून पुढे बायकांचा सामाजिक हिस्सा वाढणार हे मात्र मान्य आहे... पोस्ट ऑफिस, बँका, मॅनेजमेंट, मास्तरकी, दुकानं, क्लेरिकल .. इथं आता बायकाच जास्त आहेत.... शिवाय हल्ली एक किंवा दोनच मुलं असल्याने तेवढा काळ सोडल तर उरलेला आयुष्याचा काळ स्त्रीयाही पुरुषाइतक्याच सक्षम आहेत.

शैलेन्द्र's picture

26 Mar 2012 - 12:51 am | शैलेन्द्र

"पटलं न्हाई... पुरुषाच्या शरीरात एक्स आणि वाय असला तरी स्वतःच्याच दोन सेल मधून दोन एक्स किंवा एक्स वाय घेऊन स्त्री किंवा पुरुष निर्माण होऊ शकत नाही."

का नाही? जमतय,.... बघा करुन..

सुहास झेले's picture

26 Mar 2012 - 12:32 pm | सुहास झेले

अवो the backup plan चं परीक्षण लिव्हलं असतं, तर बरं झालं असतं की....असो धाग्याच्या शंभरीसाठी शुभेच्छा :) :)

पॉपकॉर्न स्वत: आणायचे की..... ;) :) :)

लक्षात घेता प्रतिक्रीयेसाठी जागा राखून ठेवत आहे.

सोबत

From Drop Box" alt="" />

हे घेउन आलेलो आहेच.

(ज्यांना पाहीजे त्यांनी आगावु पैसे देणे)

सुहास झेले - Pl note ;)

सुहास झेले's picture

26 Mar 2012 - 12:43 am | सुहास झेले

धन्स :) ;)

चिंतामणी's picture

26 Mar 2012 - 12:48 am | चिंतामणी

पण नोंदणी केलीत का??????? :-(

हाच निरोप शैलेन्द्रला देणे. ;)

शैलेन्द्र's picture

26 Mar 2012 - 12:58 am | शैलेन्द्र

थोड बट्टर लावुन लालसर भाजुन घ्या , मग करतो नोंदनी..

चिंतामणी's picture

26 Mar 2012 - 1:10 am | चिंतामणी

फ्री सँपल देतो.

दिपक's picture

26 Mar 2012 - 10:42 am | दिपक

पॉपकॉर्न मिळेपर्यंत जागा पकडत आहे. :-)

मूकवाचक's picture

26 Mar 2012 - 11:31 am | मूकवाचक

(आज मिपावरच्या धाग्यांच्या शीर्षकात सूत्रबद्धता आहे असे वाटले. द अंडरटेकर, गप्पा युजींशी आणि पुरूषांची खरंच गरज आहे का? )

पैसा's picture

26 Mar 2012 - 11:34 am | पैसा

____/\____

धनंजय's picture

26 Mar 2012 - 3:18 am | धनंजय

रोचक. स्नायूंच्या बाबतीत बघता सरासरी पुरुष सरासरी* स्त्रीपेक्षा अधिक बळकट असतात. (*अर्थात स्नायू कमवलेल्या खेळाडू स्त्रिया या सरासरी पुरुषापेक्षा बळकट असतात. पण गोष्ट सरासरी स्त्रीबाबत आहे.) त्यामुळे मातृसत्ताक समाजांतसुद्धा पुरुषांचा कार्यभाग मोठा असतो.

समजा स्नायूंची बहुतेक कामे यंत्रे करू लागली तर... वरील कल्पनाभरारी अगदीच टाकाऊ वाटत नाही. आजही काही कष्टकरी समाजात अशी कित्येक कुटुंबे दिसतात : काम करून मिळवती स्त्री दारुड्या किंवा बेकार पुरुषाला ठेवून घेते. परंतु अजूनही अनेक स्त्रियांनी पैसे वाचवण्याकरिता एखादा पुरुष ठेवण्याची प्रथा तितकीशी दिसत नाही. (असल्यास अप्रसिद्ध आहे.)

- - -

फक्त पुरुष-बालकांची हत्या करण्याची प्रथा पितृसत्ताक पद्धतींतही दिसते. युद्धातले विजेते पराजित गावातील/देशातील सर्व पुरुषांची - बालकांसह - कत्तल करून स्त्रियांना बटकी म्हणून वाहून नेण्याच्या घटना इतिहासात पुष्कळदा नोंदल्या गेल्या आहेत. अगदी अलीकडेच झालेल्या बोस्निया युद्धात स्रेब्रेनित्साची कत्तलीत पुरुष आणि मुलग्यांची विशेष करून कत्तल करण्यात आली.

पुराणकथांत जावे तर कंसाकडून वसुदेवाच्या मुलग्यांना मारण्याची कथा आहे. (त्याने मुलीला मारणे विशेष निरुपयोगी आणि दुष्ट मानले गेले.) अश्वत्थाम्याने द्रौपदीची पुरुष-अर्भके मारली. बायबलमध्ये मुलग्यांना मारण्याच्या किमान दोन कथा सापडतात : (१) जुन्या करारात देव इजिप्शियनांना दंड करण्यासाठी प्रत्येक घरातील ज्येष्ठ पुत्र मारतो. (२) नव्या करारात मॅथ्यू म्हणतो की येशूला ओळखले नाही तरी मारता यावे म्हणून हेरोद राजाने गावातील सर्व बाळ-मुलगे ठार मारले. (अर्थात पुराणकथा जशाच्या तशा इतिहास म्हणून स्वीकारता येत नाहीत. पण कदाचित पुराणकथा लिहिणार्‍या व्यक्तीने दुसर्‍या कुठल्या देशात किंवा काळात अशी घटना झाल्याचे ऐकले असू शकेल.)

अर्थात या असल्या निर्घृण प्रकारांत स्त्रियांचे सबलीकरण होत नाही.

Nile's picture

26 Mar 2012 - 3:46 am | Nile

कळपाने रहाणार्या प्राण्यामध्ये अनेक प्राण्यांप्रमाणे मानव जात ही “मादी-केंद्रित” (female centered) ,“मातृ-सत्ताक” होती. चाकाच्या शोधा नंतरचा महत्वाचा शोध - शेतीचा शोध मानवाला लागला. शेतीच्या शोध लागे पर्यंत मानाव भटका होता. स्त्री ही कुटुंब प्रमुख होती. आपला कळप मोठा करणे ही सहज प्रेरणा होती. स्त्रीला कळपातील आवडत्या पुरुषाशी संग करून आपला वंश वाढवण्याची मुभा होती.

दोन तीन शंका आहेत.
१. कळपाने राहणार्‍या, अगदी आजही, अनेक प्राण्यांमध्ये "मातृ-सत्ताक" पद्धती नसते. (उदा. घ्यायचं तर एप्स, सिंहाचा कळप, हत्तींचा कळप इ.) बलवान नरच प्रमुख असतो. कळपातील माद्यांशी संग करण्याची मुभा त्याला असते. (काही कळपात इतर नरांना दुय्यम माद्यांशी संग करण्याची मुभा असते)

२. शेती(किंवा चाका)अगोदर मातृसत्ताक पद्धती मानवात होती असे काही पुरावे आहेत का? कळपात स्त्री अनेकांशी संग करत असेलही, पण म्हणून पद्धती मातृसत्ताक होत नाही असे वाटते.

३. या पूर्वीच्या कळपांत पुरुषांना इतर स्त्रीयांशी संग करण्याची मुभा नव्हती का? (की एकच स्त्री असे कळप असत असे म्हणायचे आहे?)

या शिवायही उत्तरार्धात मांडलेल्या प्रश्नावर विचार करता येईल.

उलट विज्ञानामुळे प्रजोत्पादनासाठी पुरुषांची ( मोठ्या प्रमाणावर) काही गरज राहिली नाही. स्त्रिया परत कळपाने राहू लागल्या आणि काही निर्व्यसनी /बलवान पुरुष त्यांनी ( वीर्यनिर्मितीपुरते) पाळले की झाले. प्रजोत्पादन क्षमता हा आज स्त्रीचा शाप समजला जातो. ज्या दिवशी ते स्त्री ला मिळालेले अमोध वरदान ठरेल , त्या दिवशी मानवाची समाज रचना बदलेल. स्त्री गर्भ हत्या थांबेल आणि पुरुष गर्भ हत्या सुरु होईल. कारण मानव जातीला पुरुषांची काय गरज आहे ?

या तर्कात सोपा प्रश्न अवघड करून ठेवला आहे असे वाटत नाही का? जर संगासाठी तयार असणार्‍या पुरुषांची कमतरताच नसेल तर पुरुषांना पाळण्याची आवश्यकताच काय? (उठाठेव, का तरी?)

आजची अनेक प्राण्यांमध्ये संग करण्याकरता मादीची तयारी लागतेच. (उदा. बहुतेक सर्व पक्षी) स्त्री पुरुष समानता आहे असे मानले (विवाह वगैरे इतर सामाजिक बंधनातुन मुक्त झालेली स्त्री) तर स्त्रीला हवे ते बळ मिळालेच आहे. (आजची पाश्चात्य जगात अनेक स्त्रीया गरज आणि आवडीनिवडीनुसार पार्टनर निवडत आहेतच)

उलट, बलवान आणि "अवेअर" असलेली स्त्री पुरुष गर्भ हत्या करून हवा तो पुरुष मिळवण्याकरता एकमेकांत मार्‍यामार्‍या करण्याचा पर्याय का निवडेल हे समजत नाही.

स्पंदना's picture

26 Mar 2012 - 8:37 am | स्पंदना

निळे साहेब माफ करा पण >>>हत्तींचा कळप इ.>>
नाही हो हती मॅट्रीआर्क असतात. अर्थात कळप. वांड नर हत्ती वयात येउ लागले अन धागड धिंगा करु लागले की त्यांना कळपातुन हुसकावुन लावल जात. अन सारा कळप त्यांच्या प्रमुख मातेच्या अदेशा नुसार चालतो.
हा सिंह मात्र एका नराबरोबर दोन ते तिन माद्या अन त्यांची पिल्ल असे रहातात. पण बहुतेक शिकार माद्या करतात, एखादीच मस्तवाल रेड्याची वगैरे सिंह करतो. बहुतेक्दा त्याचा हस्तक्षेप हा अगदी गरज पडली तरच असतो.

Nile's picture

26 Mar 2012 - 9:52 am | Nile

हत्तींचा कळप मातृसत्ताक असतो हे बरोबर. पण मला इथे फक्त संग करण्याचा दृष्टीने म्हणायचं आहे. (म्हणून दुहेरी अवतरण)

लेखात जो मुद्दा मांडला आहे त्या प्रमाणे हत्तींच्या कळपात मातृसत्ताक पद्धत असूनही "बलवान मादे कोणाशी संग करायचा" हे ठरवत नाही. (हत्तींमध्ये मादी नरापेक्षा वेगाने पळू शकत असल्याने संग अनेकदा टाळते, पण तो वेगळा मुद्दा.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Mar 2012 - 1:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कळप, मातृसत्ताक पद्धत याबद्दल माझा फार अभ्यास नाही. काही (विज्ञानावरच्या कार्यक्रमांमधून) ऐकीव आणि पुस्तकी/वाचीव माहिती:
१. काही प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातींमधे, नर नसेल तर माद्यांपैकी काही नराचे काम करतात आणि प्रजोत्पादन होतं.
२. पुरूष उपलब्ध नसतील अशा वातावरणात समलैंगिकता अनुसरणार्‍या (ज्या मुळात समलैंगिक नसतील) अशा स्त्रियांचं प्रमाण वाढतं. किंवा आयुष्याचा काही काळ स्त्रिया समलैंगिक बनतात. त्यातल्या बर्‍याचश्या पुरूष उपलब्ध झाल्यावर भिन्नलैंगिक संबंधच ठेवतात.

या तर्कात सोपा प्रश्न अवघड करून ठेवला आहे असे वाटत नाही का? जर संगासाठी तयार असणार्‍या पुरुषांची कमतरताच नसेल तर पुरुषांना पाळण्याची आवश्यकताच काय? (उठाठेव, का तरी?)

स्त्रियांना संग करायचाच नसेल आणि फक्त प्रजोत्पत्तीसाठीच अमका पुरूष हवा असेल तर? (हे उत्क्रांतीच्या तत्त्वाविरोधात सकृतदर्शनी वाटतं आहे. पण गोरगरीबांची काळजी घ्या वगैरे सांगणारे सगळे धर्मसुद्धा नाही का उत्क्रांतीच्या विरोधात बोलतात. ;-) )
किंवा एकाशी संग आणि दुसर्‍याचे अपत्य हवे असेल तर? (अमका पुरूष क्यूट आहे पण त्याचं अपत्य नको.)

साय-फाय म्हणून किंवा बौद्धीक व्यायाम म्हणून या गोष्टीचा विचार करण्यात हशील आहे. संबंधित विषयाबद्दल असणारे स्वत:चे विचार त्यातून स्वतःलाच स्पष्ट होण्यात मदत होते आहे. धन्यवाद तर्री!

Nile's picture

27 Mar 2012 - 2:37 am | Nile

स्त्रियांना संग करायचाच नसेल आणि फक्त प्रजोत्पत्तीसाठीच अमका पुरूष हवा असेल तर?

कोणतंही कारण असेना का. सप्लाय डिमांडच्या भाषेत बोलायचं तर, सप्लाय कमी करून डिमांड वाढवण्याची क्रिया कोणी का करेल?

सोन्याचं अंड देणारे दहा 'कोंबडे' मिळाले तर त्यातले नऊ मारून एकाच्याच अंड्यावर मी जगेन असे कोण म्हणेल?

धनंजय's picture

27 Mar 2012 - 3:08 am | धनंजय

खुराकाचा खर्च आणि तजविजीची मजुरी हे खर्च मोजावे लागतात.

माझ्या पणजोबांकडे एक म्हैस होती. दुभती म्हैस होती - तिला पिले होतच होती. तरी पणजोबांच्या घरात म्हशींची संख्या वाढली नाही, कित्येक वर्षांपर्यंत ती एकच म्हैस घरात राहिली.

(सप्लाय अँड डिमांडच्या गणितात वेअरहाउसिंग कॉस्टचा हिशोब केलेला नाही, इतकेच म्हणणे आहे. शिकारी सिंहिणी कळपात किती ऐतोबा सिंहांना पाळू शकतील?)

मी म्हणतोय पाळण्याची गरजच ओढवूनच कशाला घेईल कोण?

दोन्ही बाजूंनी भरपूर सप्लाय आहे अन डिमांडही आहे. सिंबायोटीक व्यवस्था आहे. अशा वेळी काहींना पाळून (आणि इतरांना मारून) अव्यवस्था निर्माण करून फायदा होणारच नाही.

पाळणं आलं की सांभाळणं आलं, चोरीला जायची भिती आली, एकमेकांच्याशी लढणं आलं आणि पुन्हा अंतर्गत वाटणी आली ती वेगळीच. (शेवटी नाही म्हणायला बंडाळीपण आली. त्यात गांधी भक्त आले म्हणजे 'असहकार' आला. ;-) )

सांजसंध्या's picture

26 Mar 2012 - 7:27 am | सांजसंध्या

खूप विचार करता तुम्ही लोक. मला तर वाटतं अडाणी असलेलं बरं.. :)

शिल्पा ब's picture

26 Mar 2012 - 8:29 am | शिल्पा ब

यांनापण १००-२०० प्रतिसाद हवेसे वाटताहेत तर!!

अमृत's picture

26 Mar 2012 - 10:14 am | अमृत

आज आसमान साफ रहेगा पर मिपापर धूलभरी आंधी चलनेकी संभवना है.

अमृत

बॅटमॅन's picture

26 Mar 2012 - 10:43 am | बॅटमॅन

>>>कळपाने रहाणार्या प्राण्यामध्ये अनेक प्राण्यांप्रमाणे मानव जात ही “मादी-केंद्रित” (female centered) ,“मातृ-सत्ताक” होती.

निश्चित पुराव्याअभावी असहमत.

मृत्युन्जय's picture

26 Mar 2012 - 10:48 am | मृत्युन्जय

स्त्रिया परत कळपाने राहू लागल्या आणि काही निर्व्यसनी /बलवान पुरुष त्यांनी ( वीर्यनिर्मितीपुरते) पाळले की झाले.

स्त्रियांची तरी खरेच गरज आहे का? प्रजननासाठी काही स्त्रिया पाळल्या की झाले. पुरुष लोक मजेसाठी म्हणुन आळीपाळीने त्याच स्त्रियांचा उपभोग घेतील.

सामागामासाठी स्त्रीला शरीर सदैव सहज साथ देते पण स्त्रीचे मन निसर्गाने असे घडवले आहे की पूर्ण “विश्वास” असल्याशिवाय स्त्री-संगास तयार नसते. पुरुषाचे मन सदैव तयार असते पण सगं करण्यास शरीरावर प्रचंड मर्यादा आहेत.

वरील विधान बरोबरच आहे. त्यामुळे अनेक पुरुष आळीपाळीने एकाच स्त्रीचा उपभोग घेउ लागले तरी त्यात अवघड काहीच नसावे. हा आता एक स्त्री एका वर्षात केवळ एकच मूल जन्माला घालु शकते हा एक प्रश्न आहे पन विज्ञान ज्या वेगात प्रगती करते आहे ते बघता काही उपाय करुन एका वेळेस ७-८ गर्भांची धारणा करणे कदाचित शक्य होइल आणि मग हा प्रश्नही निकालात निघेल. नाही का?

असो.

जरा गांभीर्याने उत्तर द्यायचे झाल्यास. हा धागा आणी त्यामागचे विचार संपुर्णतया चुकीचे आहेत असे म्हणावे लागेल. माझे वरील विचार हे केवळ उपहासाने लिहिलेले आहेत आणि धागकर्तीच्या विचारांची दूसरी बाजू दाखवण्यासाठी लिहिलेले आहेत. माझे विचार एरवी असे अघोरी आणी विकृत नाहीत.

थोडी गंभीर आहे पण टवाळकी करायला भरपूर वाव आहे. खात्री आहे - संयम दाखवला जाईल.)

टवाळकी करायला भरपूर वाव असेल तर संयम दाखवला जाण्याची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. असेही तुम्हाला सुद्धा एकुण टवाळकीच करायची आहे असे वाटते,

पैसा's picture

26 Mar 2012 - 10:49 am | पैसा

लेख आणि अनेक प्रतिसाद वाचनीय.

गवि's picture

26 Mar 2012 - 11:21 am | गवि

अगदी नको असेल तर राहूदे.. . जबरदस्ती नाही..

तर्री's picture

26 Mar 2012 - 12:28 pm | तर्री

१. लेखक पुरुष आहे.
२. विचार चुकीचे वाटले > तसे ज्यांनी स्पष्ट लिहीले > त्यांचे आभार.
३. ह्या विचारांना थोडा शास्त्राधार , थोडा कल्पना विस्ताराची जोड आहे. तेंव्हा मी
म्हण्तो तेच बरोबर ही भुमिका नाही.
४.शैलेंद्रजी / निळे यांचे विचार वेगेळे आहेत.
५.संयम दाखवला गेला आहे . त्या प्रित्यर्थ आभार. टवाळकीची अपेक्षा ह्या लेखाच्या प्रतिसादासाठी नव्हती.
६.अजुन विचार आवश्यक .

स्पा's picture

26 Mar 2012 - 12:34 pm | स्पा

वाचशील... ऑ?
वाचशील असे लेख परत?

कवितानागेश's picture

26 Mar 2012 - 1:32 pm | कवितानागेश

शेवटी जंगलचाच कायदा येणार तर...
बळी तो/ती कान पिळी!

परिकथेतील राजकुमार's picture

26 Mar 2012 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार

वेश्याव्यवसायाचे मूळ शेतीत आहे तर.

आज हा लेख वाचला आणि 'वेश्या क्यूं?' ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

गणपा's picture

26 Mar 2012 - 1:39 pm | गणपा

धागा रोचक आहे. आणि काही निवडक प्रतिसादही.

ह्याच कारणासाठी वेश्येकडून देवीची मूर्ती बनवण्यासाठी माती आणाली जाते. आदी श़क्ती चे रूप साकारताना , मातृ सत्ताक पध्दतीला केलेले ते वंदन आहे.
पारो चंद्रमुखी कडे माती घेण्यासाठी जाते , देवदास ह्या (संजय लिला कृत )मध्ये हा प्रसंग घेतला आहे .

इष्टुर फाकडा's picture

26 Mar 2012 - 2:42 pm | इष्टुर फाकडा

तुम्ही लिहिता त्याप्रमाणे जेव्हा मानव कळपामध्ये राहत होता तेव्हा शिकारी वगैरे करण्यासाठी त्याला शारीरिक श्रमांची गरज होती पण शेती एवढ्या श्रमांची न्हवती. आणि म्हणूनच पुरुष फार गरजेचा न्हवता, हे मला वाटतं जरा ताणीव विधान आहे.

आपण शेती आणि शिकार दोन्ही गोष्टी कधी करून बघायचा प्रयत्न केला आहे काय ?
हा घ्या ;)

तर्री's picture

26 Mar 2012 - 7:47 pm | तर्री

शेती आणि शिकारीचा अनुभव आहे.

शेती करता दीर्घकाळ शारिरीक आणि कमी काळ बौध्दीक गरज असते. शिकारी बुध्दी , शरिर संपदेपेक्षा "माहिती" ची गरज अधिक असते.

हलकेच घेतो हो मी सगळे. तरिही वैयक्तिक प्रष्ण व्य.नि तुन करावे , कसे ?

आत्मशून्य's picture

26 Mar 2012 - 8:21 pm | आत्मशून्य

"पुरुषांची" खरच गरज आहे का ?

ज्या स्त्रिया लेस्बियन प्रवृत्तिच्या नाहीत त्यांना समागमासाठी तरी पुरुषांची गरज कायमच राहणार आहे असं वाटतं. बाकी स्त्री-केंद्रीत अथवा स्त्री-प्रधान समाज वगैरे फारश्या चिंतनाचे वा चिंतेचे विषय ठरत नसल्याने त्या बाबतीत आपला पास.

इथे काय बदला-बदला खेळण चालू आहे काय.आधी तुम्ही स्त्री भ्रूण हत्या करा मग आम्ही पुरुष भ्रूण हत्या करू.अहो ज्या बायका स्त्री भ्रूण हत्ये विरोधात लढतायत त्या पुरुष ब्रुन हत्या व्हावी अस नाही म्हणत आहेत.तुम्हाला बाळ पाहिजे न मग पोटातन जे काय येईल ते स्वीकारा.

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ....

मला हे वाचल्यावर, आय मीन धागा वाचल्यावर, वेगळाच प्रश्न पडला.

आंजावर 'लेखकांची' काही गरज आहे का ? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2012 - 10:55 am | परिकथेतील राजकुमार

आंजावर 'लेखकांची' काही गरज आहे का ?

वाशा, तुझी मते आजकाल फारच टोकदार होत चालली आहेत हो. उद्या आंतरजालाची गरज आहे का असे विचारशील. ;)

सुहास..'s picture

27 Mar 2012 - 2:43 pm | सुहास..

हा हा हा ,

बर या ' टोकदार पणाची ' खरोखरच गरज आहे का ? असे नाही विचार पडला अजुन ;)

५० फक्त's picture

27 Mar 2012 - 8:14 am | ५० फक्त

आंजावर 'लेखकांची' काही गरज आहे का ? - अतिशय महत्वाचा प्रश्न, अन्यथा, जे आंजावर लिहितात त्या सर्वांना लेखक म्हंणावे अशी त्यांची किंवा त्यांच्या लिखाणाची लायकी तरी असते का ?

नगरीनिरंजन's picture

27 Mar 2012 - 10:54 am | नगरीनिरंजन

तसं पाहायला गेलं तर "पृथ्वीवर मानवाची गरज आहे का?" असं विचारलं पाहिजे.
पण त्या फंदात न पडता या काकुवर विचार करू.
स्त्रियांची सत्ता की पुरुषांची सत्ता, स्त्रियांना पुरुषांची गरज की पुरुषांना स्त्रियांची गरज असे विचार करण्यापेक्षा स्त्री-पुरुषांच्या मीलनाचे आणि प्रजोत्पादनाचे नियंत्रण करणार्‍या कृत्रिम व्यवस्थेची गरज आहे का असा विचार केला पाहिजे.
आपली जनुके टिकवण्याची गरज दोघांनाही आहे. जनुक पुढच्या पिढीत संक्रमित करण्यासाठी स्त्रीला प्रचंड शारीरिक किंमत मोजावी लागते, त्यामानाने पुरुषाला काहीही किंमत मोजावी लागत नाही. ती किंमत मोजावी लागावी लागावी म्हणून पुरूषाने स्त्रीसाठी घर बनवणे, पैसे कमवणे वगैरे गोष्टी स्त्रीला आकर्षित करण्यासाठी करणे पुरुषासाठी आवश्यक आहे.
घर असणे आणि पैसे कमवणे या कामालाच सत्ता (आणि स्त्रियांवर उपकार) असे समजले गेल्याने या संस्थेत एक विकृतपणा आला आणि स्त्रियांना गुलाम समजले जाऊ लागले. म्हणजे जनुकसंक्रमणासाठी स्त्रिया शारीरिक किंमत मोजत होत्याच, वर आता त्यांच्या हक्काच्या संपत्तीसाठी पुरुषांचे वर्चस्व आणि बंधने सहन करू लागल्या.
सद्यस्थितीत व्यवस्थित शिकलेल्या स्त्रीला संपत्ती जमवणे हे सहज शक्य असल्याने त्यांनी फक्त फलनासाठी पुरुषाची मदत घेऊन अपत्याला जन्म देऊन जनुकसंक्रमणासाठी मोजावी लागणारी किंमत कमी करून घ्यायला हरकत नाही.
पण यात ज्याच्याकडून बीजफलन झाले त्या पुरुषाला फुकटचा फायदा असल्याने त्यादृष्टीने पाहता स्त्रिवर्गासाठी हे अन्यायकारक आहे.
म्हणूनच स्त्री कितीही सक्षम झाली तरी पुरुषाची नाममात्र मदत घेऊन प्रजोत्पादन करणार नाही. उलट जास्तीची किंमत मोजून पुरुषांना बदलण्याचा खटाटोप केला जाईल ज्यायोगे पुरुषांना जनुकसंक्रमणाची योग्य ती किंमत चुकवावी लागेल.
(अवांतरः जनुकसंक्रमणाची किंमत म्हणून पुरुषाने स्त्रीचा आणि अपत्यांचा अपत्ये स्वतंत्र होईपर्यंततरी परिपाळ करणे न्याय्य आहे. आजकाल नोकरी करण्याचा हट्ट करणार्‍या आणि सुपर मॉम सिंड्रोम झालेल्या स्त्रिया व्यावहारिक दृष्ट्या खूप तोट्यात जातात. नोकरी करायचीच असेल तर पुरुषाची नाममात्र मदत घेऊन स्वतंत्रपणे अपत्यप्राप्ती करून घेणे कदाचित जास्त फायद्याचे ठरेल. इक्वल वर्क, इक्वल पे हा विचार स्त्रीमुक्तीवादी नसून स्त्री शोषक आहे, कारण घरातली कामेही अगदी निम्मी वाटून घेतली तरी प्रजोत्पादनाची शारीरिक किंमत स्त्रीने जास्तच दिलेली असते. निसर्गात काम करणे ही एक किंमत असते आणि आराम हराम नसतो. लोभाचे उदात्तीकरण झालेल्या काळात जास्ती काम करणे आणि जास्ती पैसा कमवणे हे चांगले समजले जाते हा दैवदुर्विलास आहे.)
(अतिअवांतरः यात पुन्हा भावनिक जवळीक वगैरे मुद्दे येतीलच. भावनिक जवळिकीसाठी तडजोड करायचीच असेल तर त्याला तसेही कोणतेच नियम लागू होत नाहीत.)

गवि's picture

27 Mar 2012 - 11:08 am | गवि

पण मी काय म्हणतो..

स्त्रिया परत कळपाने राहू लागल्या आणि काही निर्व्यसनी /बलवान पुरुष त्यांनी ( वीर्यनिर्मितीपुरते) पाळले की झाले.

एवढी एम्पॉवरमेंट (एकत्र येणे, सर्वजणी मिळून सुसूत्र प्लॅन करणे इत्यादि..) जर स्त्रीची होऊ शकली तर त्या आधीच इतर बर्‍याच सुधारणा झालेल्या असतील तिच्या आयुष्यात.. तेव्हा मग पुरुषांना इतके टाळण्याची इच्छाही होणार नाही कदाचित त्यांना..

आभार/अभिनंदन : आदिती , नगरीनिरंजन , गवी यांचे थेट विषयाला अनुसरून व पूरक विचारांवद्दल .

मानवाच्या शरीरात समुद्री घोड्याचे काही गुणधर्म घातल्यास प्रश्न नक्की सुटू शकेल.समुद्री घोडा-घोडीच्या मिलानामध्ये नर आपले शुक्रजंतू मादीच्या शरीरात सोडतो.जर मादीस गर्भाभारणा झाली तर ती काही काळ ते अंडे सांभाळते व योग्य वेळ आली कि ते नराच्या शरीरात सोडते.मग नर शरीरातूनच बाळ बाहेर पडत.

बॅटमॅन's picture

27 Mar 2012 - 2:13 pm | बॅटमॅन

त्यापेक्षा asexual reproduction असेल तर सगळेच प्रश्न सुटतील...प्रजोत्पादनासाठी म्हणा नैतर अजून कशासाठी म्हणा, नर-मादी हि भानगडच नै उरणार...सगळी कटकट मिटेल. ते कितीतरी चांगलं असेल पितृ/मातृ-सत्ताक समाजापेक्षा...