राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र...

अमितसांगली's picture
अमितसांगली in जनातलं, मनातलं
13 Mar 2012 - 4:36 pm

National Counter Terrorism Centre (NCTC)...राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र..

दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी १ मार्च २०१२ पासून राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंध केंद्र सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.परंतु दहा राज्याच्या(गुजरात,बिहार ,तामिळनाडू, प. बंगाल .मध्यप्रदेश,पंजाब ,छत्तीसगड,ओरिसा,त्रिपुरा,हिमाचल प्रदेश) मुख्यमंत्र्यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे या प्रस्तावावर चालू अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे.

NCTC हि दहशतवाद विरोधी यंत्रणा असून याचा मुख्य उद्देश भारत सरकारच्या विविध गुप्तहेर विभागांमध्ये माहितीची आदान-प्रदान करणे व त्यांना एकत्र आणणे हा आहे. सध्या भारतामध्ये intelligence bureau (IB), research and analysis wing (RAW), joint intelligence comitee (JIC), national investigation agency (NIC), state intelligence agency (SIA) अशा विविध संस्था हेरगिरी करीत असतात. यातील काही संस्था पंतप्रधान, काही गृहमंत्री तर काही संस्था राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती देत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला संपूर्ण माहिती एकत्र न होता गफलत होण्याची शक्यता असते. त्यासाठी हि माहिती विविध प्रमुखांकडे न देता, हि माहिती एकत्र करण्यासाठी एक स्वतंत्र केंद्र तयार करणे गरजेचे होते आणि यातूनच दहशतवाद विरोधी केंद्र हि संकल्पना उदयास आली. अमेरिका, इंग्लंड व अन्य युरोपीय राष्ट्रांमध्ये अनेक वर्षापासून या प्रकारचे केंद्र अस्तित्वात आहे.

विविध गुप्तहेर संस्थेकडील माहिती एकत्र करणे, त्यावर विचारविमर्श करणे,कारवाई करण्यासाठी नियोजन करणे व कारवाई करणे हे या केंद्राचे मुख्य काम आहे. गरज पडल्यास दहशतवाद विरोधी कारवाई अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला, पुर्वसुचनेशिवाय किंवा त्या राज्यांच्या परवानगीशिवाय कधीही अटक करण्याची मुभा आहे. हे केंद्र रिपोर्ट, ट्रान्सक्रीप्त किंवा सायबर याप्रकारच्या कोणत्याही स्वरूपातील माहिती CBI, national technical research organisation, directorate of revenue intelligence, सातही armed police force किंवा अन्य कोणत्याही संस्थेकडून घेऊ शकते. या केंद्राच्या कामकाजाविषयी ग्रहमंत्रालयाला नियमित माहिती देणे बंधनकारक आहे.

विरोधाची कारणे :

१. या प्रकारचे केंद्रस्थापन करण्यासंबंधी केंद्र सरकारने सर्व राज्यांना विश्वासात घेतले नाही.

२ . एखाद्या राज्यामध्ये कारवाई करण्यासाठी त्या राज्याला पूर्वसूचना देणे किंवा त्यांची परवानगी घेणे आवश्यक. परंतु NCTC हे केंद्र स्वतंत्र असून त्यांना कोणत्याही पुर्वासुचनेशिवाय कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. (राज्यांच्या स्वतंत्र अस्तित्वावर घाला).

३. NCTC हि सर्वशक्तिमान यंत्रणा असून पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. राजकीय विरोधकांविरुद्ध याचा वापर केला जाऊ शकतो.
उदा. इंदिरा गांधीनी आणीबाणीवेळी विरोधकांना देशद्रोही ठरविले होते.

४. कायदा व सुव्यस्था हे राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहेत. NCTC कायदा इतका सक्षम बनविला आहे कि दहशतवादाविरुद्ध लढण्याची राज्य पोलिसांची मानसिकता संपुष्टात येईल.

समर्थनातील मुद्दे:

१. दहशतवाद विरोधी कारवाईत सर्व लोकांचा समावेश करून घेणे अशक्य आहे. यामुळे काही महत्वपूर्ण निर्णय सार्वजनिक होण्याची शक्यता.

२. दहशतवादी हल्ला कोणत्याही राज्यात होऊ शकतो. यासाठी राजकारण हस्तक्षेपाविरहित कारवाई करणे आवश्यक.

३. संविधानातील २४२ व्या कलमानुसार केंद्र सरकारला देशातील कोणत्याही भागातील अवैध घटनांना थांबविण्याची परवानगी आहे.

विकल्प :

१. सर्वाना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक असे दहशतवाद विरोधी केंद्र तयार करणे आवश्यक.

२. सरकार कोणतेही असले तरी देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य हवे. केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे.

३ . अशा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप टाळायला हवा. निपक्षपातीपणे निर्णय घेणे आवश्यक.

फक्त एखादे केंद्र स्थापन करून दहशतवादी हल्ला परतवून लावता येणे शक्यच नाही. त्यासाठी स्थानिक प्रशासनाला हाताशी धरणे गरजेचे आहे. त्यांना पर्याय असूच शकत नाही. त्यासाठी केंद्र व राज्य यांच्यामध्ये सुवर्णमध्य काढणे आवश्यक.

धोरणमांडणीसमाजविचारमतप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

13 Mar 2012 - 5:27 pm | चिरोटा

छान माहिती. पण आता हा सुवर्णमध्य कोणी आणि कसा काढायचा?
जाता जाता- त्या हेरगिरी करणार्‍या संस्थांना स्वतःच्या वेबसाईटी तरी काढायला सांगा. मध्यंतरी चिनी हॅकर्सनी गृहखात्याची,पंतप्रधानांच्या कार्यालयातील माहिती काढून ह्यांचा पोपट केला होता असे वाचले होते.

नितिन थत्ते's picture

13 Mar 2012 - 5:31 pm | नितिन थत्ते

लोकायुक्त प्रकरणाच्या निमित्ताने "फेडरलिझम" हा नवा बझवर्ड प्रचलित झाला आहे.

असो. कुठल्याही प्रकारे विना चौकशी अटक करणे अयोग्यच आहे.

मूकवाचक's picture

14 Mar 2012 - 1:23 pm | मूकवाचक

+१

तर्री's picture

13 Mar 2012 - 8:04 pm | तर्री

प्रश्न नवीन कायदा -उपाययोजना की असलेल्या कायद्यांची निपक्ष अंमलबजावणी हा आहे ?

चेतनकुलकर्णी_85's picture

13 Mar 2012 - 8:21 pm | चेतनकुलकर्णी_85

अहो फायदा काय अश्या संघटनांचा ???त्यावर अध्याक्ष्य म्हणून कोणीतरी ढेरपोटा आय.एय.स. अधिकारी बसणार..

अमितसांगलीजी लेख अतिशय चांगला लिहिला आहे हे मत ठोकण्याच्या गडबडीत राहून गेले.

मन१'s picture

13 Mar 2012 - 11:02 pm | मन१

योग्य ती अंमलबजावणी केली तर हा जो काही प्रकार आहे तो उपयुक्त ठरु शकतो.
कायद्याने पोलिसांचे हात बांधले जात, गुन्हेगारांचे नाही, ह्याचा फायदा घेत गुन्हेगारी वाढते.
व्यवस्थेस अधिकचे अधिकार असले आणी त्यांचा योग्य वापर झाला तर सर्वांच्याच ते हिताचे होइल.

अमितसांगली's picture

14 Mar 2012 - 8:35 am | अमितसांगली

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हवीच.
कारगिल युद्धानंतर MAC(multi agency centre) किंवा ताजवरील हल्ल्यानंतर NIA(national investigation agency) या प्रकारची केंद्रे स्थापन करण्यात आली पण राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपामुळे ती फारसी प्रभावी ठरली नाहीत.

५० फक्त's picture

14 Mar 2012 - 7:13 am | ५० फक्त

उत्तम माहितीपुर्ण लेख, एक उपेक्षित आणि सामान्यांकडुन दुर्लक्षित पण त्यांच्याच आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारा विषय पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. या विषयात जास्त माहिती / गती नाही, त्यामुळं इथली चर्चा वाचायला आवडेल.

Ravindra's picture

14 Mar 2012 - 7:03 pm | Ravindra

या विषयावर टोम क्लान्सी या लेखकाचे रेनबो सिक्स हे पुस्तक वाचावे. त्या पुस्तकामध्ये नाटो एका दहशतवाद प्रतिबंधक केंद्र स्थापन करते. [अमेरिकन लोक त्यांच्या पुस्तकामध्ये किंवा सिनेमामध्ये एकदम जगालाच वाचवत असल्यामुळे पूर्ण जगातल्या दहशतवादी घटना दाखवल्या आहेत.] या केंद्राची स्थापना , प्रशिक्षण, वापरलेल्या तांत्रिक पद्धती, इत्यादी फार छान वर्णन केल्या आहेत. आणि जे ओळखीचे सैन्यातले लोक आहेत, त्यांच्या मते दाखवलेल्या कमांडोंच्या methods अगदी खऱ्या आहेत.

गोंधळी's picture

14 Mar 2012 - 10:27 pm | गोंधळी

अरे पण त्या कसाब ला आपण का पोसतो आहे? |( \( :angry:

तुम्ही आर्थर रोड जेलचे आचारी आहात काय? ;-)

चेतनकुलकर्णी_85's picture

14 Mar 2012 - 11:40 pm | चेतनकुलकर्णी_85

तुम्हाला "income tax" माफ आहे काय हो यशवंत साहेब? :P

मग तुम्ही त्याचे वकिल आहात का?

आता पर्यंत काहि कोटि रु. खर्च (उधळले)झाले आहेत(source- indian media)

त्यामध्ये ही भ्रष्टाचार असणार.

चेतनकुलकर्णी_85's picture

15 Mar 2012 - 12:40 am | चेतनकुलकर्णी_85

नाव काय आणि विचार काय हो तुमचे :D

गोंधळी's picture

15 Mar 2012 - 12:23 pm | गोंधळी

नाव बदलावयास मदत करा

नावातकायआहे's picture

15 Mar 2012 - 5:22 pm | नावातकायआहे

का बदलताय?