आज पुण्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली.....
संतोष माने नावाच्या एका माथेफिरू S.T महामंडळाच्या कर्मचाऱ्याने बिचाऱ्या ९ माणसांना कारण नसताना चिरडले आणि कित्येक लोकांना जखमी केले..
याच्यावर काय लिहावे तेच कळत नाही....डोके बधीर आणि सुन्न झाले आहे.
या घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांना !! श्रद्धांजली !!
प्रतिक्रिया
25 Jan 2012 - 3:05 pm | विसुनाना
या भयानक बातमीमुळे हादरून गेलो.
25 Jan 2012 - 3:07 pm | प्यारे१
खरंच दुर्दैवी घटना...!
मेलेल्यांना का मारले गेलो हेही कळाले नाही/नसावे. :(
श्रद्धांजली.
25 Jan 2012 - 3:15 pm | मी-सौरभ
:(
25 Jan 2012 - 9:55 pm | मृगनयनी
खूप दुर्दैवी घटना..९ जण ठार आणि २७ जखमी झालेत.... :|
"श्वेता ओसवाल" नावाची एक तरूणीदेखील या अपघतात गम्भीर जखमी झाली होती. तिला ससून रुग्णालयात नेत असताना तिची अवस्था अतिगम्भीर झाली... आणि आपला मृत्यू आता खूप जवळ आलाये.. हे तिला समजलं असतानाच तिने त्याही अवस्थेत मरणोत्तर"नेत्रदाना"ची इच्छा व्यक्त केली..
आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानन्तर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एस. टी. महामन्डळावरचा राग "सन्तोष माने" या माथेफिरु ड्रायव्हरने निष्पाप लोकान्ना चिरडून व्यक्त केला... आणि त्याच चिरडलेल्या लोकांपैकी एक म्हणजे "श्वेता ओस्वाल"...
मरणोन्मुख अवस्थेतही माणुसकी जपणारी एक सामान्य तरूणी...
या मृत्यूच्या तान्डवातदेखील खरंच किती विरोधाभास आहे! :|
- नि:शब्द....
अशी वेळ शत्रूवर देखील येऊ नये..............
26 Jan 2012 - 8:09 am | गवि
सुरुवातीच्या धक्क्यातून सावरल्यावर मग मला ती प्रसिद्ध कविता आठवली.
मन अंधाराची गुंफ़ा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल..
26 Jan 2012 - 9:19 am | चिंतामणी
यात बळी पडलेल्या निष्पाप जिवांना श्रध्दांजली.
"श्वेता ओसवाल" हीस अनेक प्रणाम.
__/\__
25 Jan 2012 - 3:10 pm | आनंदी गोपाळ
म्हणजे झालंय काय नक्की? नीट लिव्लंत तर पुन्या बाहेरच्या लोकास्नी सम्जेल.
25 Jan 2012 - 3:19 pm | विसुनाना
ही बीबीसीवरील बातमी.
25 Jan 2012 - 3:24 pm | सूड
हे वाचा !!
http://www.esakal.com/esakal/20120125/5027033415392506597.htm
25 Jan 2012 - 3:33 pm | ५० फक्त
एस्टि महामंडळाच्या सातारा डेपोच्या माने नावाच्या एका ड्रायव्हरनं स्वारगेट डेपोतुन एक एस्टि डायरेक्ट विना परवानगी बाहेर काढली, आणि स्वारगेट व आसपासच्या परिसरात अंदाधुंद पद्धतीनं चालवली, वाटेत येणा-या ३०-३५ गाडया उडवल्या किंवा चिरडल्या. ४० च्या आसपास पादचारी तसेच गाड्यात बसलेली माणसं सुद्धा या धडाक्यात आली. यापैकी ९ जण जागेवरच मरण पावले तर बाकी जखमींपैकी ३ जण गंभीर अवस्थेत वेगवेगळ्या दवाखान्यात भरती आहेत.
प्राथमिक माहितीनुसार सदर ड्रायव्हर हा मानसिक तणावाखाली होता असं सांगण्यात आलेलं आहे, तो नशेत होता किंवा कसं हे समजलेलं नाही. याबद्दल जास्त माहिती सध्या तरी नाही.
हा प्रकार झाल्यावर तिथं झालेल्या ट्रॅफिक जॅम मध्ये मी अडकलो होतो ३० मिनिटं, पण त्यावेळी एक छोटासा अपघात झाल्याचंच सांगण्यात येत होतं.
25 Jan 2012 - 4:22 pm | अन्नू
फार वाईट् झालं. खुपच दुर्दैवी घटना! बिचार्यांचा विनाकारण जीव घेतला. मन सुन्न झालं; :( :(
आमच्याच भागातल्या ड्रायव्हरनं असं लांछनस्पद कृत्य कराव! श्शी!!!.
25 Jan 2012 - 3:35 pm | Maharani
खरंच दुर्दैवी घटना...!
25 Jan 2012 - 3:39 pm | आनंदी गोपाळ
श्रद्धांजली व सहवेदना सर्व बळींसाठी.
25 Jan 2012 - 3:39 pm | चिरोटा
भयानकच. असे माथेफिरु लोक पाश्चिमात्य देशात असतात असे वाटायचे. पण भारतातही असे अनेक आहेत.
श्रद्धांजली.
25 Jan 2012 - 4:06 pm | वरद
बघुनच हदरुन गेलो
25 Jan 2012 - 4:20 pm | स्वातीविशु
दुर्देवी घटना.
असे बेजबदार चालक घेतातच कशाला कोण जाणे? नाहक माणसे मारली त्याने.
25 Jan 2012 - 8:38 pm | तिमा
मुंबईला येण्यासाठी ७.५० ला डेपोत शिरलो. ७.५२ला आमची शिवनेरी बाहेर पडली. नंतर कळले की ८.०० वाजल्यापासून हा धुमाकुळ सुरु झाला.
25 Jan 2012 - 9:27 pm | चौकटराजा
हिंसेनेच मनुजा आले करंटेपण या जगामाजी
25 Jan 2012 - 9:41 pm | पाषाणभेद
भयानक आहे हे!
25 Jan 2012 - 10:09 pm | जाई.
दुर्देवी घटना
25 Jan 2012 - 10:54 pm | रंगोजी
खरंच दुर्दैवी घटना.
(क्षणभर वाटले दिल्लीच्या ब्लु लाईन ची बातमी आहे. तिथले डायवर सकाळी आकडा ठरवून लोकाना उडवतात असे ऐकिवात आहे.
'माने' वाचून गैरसमज दूर झाला.)
-रंगोजी
26 Jan 2012 - 1:09 am | कौशी
अतिशय वाईट घटना..
26 Jan 2012 - 8:00 am | चौकटराजा
गवि , आपली मनाची कविता फारच बोलकी. कविता या काव्य प्रकाराचे प्रचंड सामर्थ्य सांगणारी !
मी थोडेसे तरी पुण्य केले होते म्हणून मेल्यावर मला देवासमोर थोडा तरी वेळ उभे रहाण्याची मुभा मिळाली.
देवाने विचारले , " पृथ्वीवर सर्वात विस्मय व विषण्णता आणणारी गोष्ट कोणती दिसली."
एका क्षणाचाही विलंब न लावता मी उत्तरलो. " मानवी मन " .
26 Jan 2012 - 8:06 am | गवि
खरंय. पण ही कविता अर्थातच माझी नाही बरं का. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरल्यावर मग मला ती आठवली.
ती कविता प्रसिद्ध असल्याने तसं लिहिलं नाही इतकंच.
26 Jan 2012 - 12:06 pm | चौकटराजा
जाउ द्या हो ! घ्या "यॅडजेष्ट करूण" आपलाच मानुस हाय . अशा वृतीने याला ठेवला असणार ! अशी अनेक माणसे आपापल्या सोसायटी तही बेदरकार पणे आपण कार्यकारिणीवर निवडून देतो. मग या बेगुमान
श्वापदा सारखे ते सोसायटीवर तूटून पडतात.
26 Jan 2012 - 12:25 pm | शिल्पा ब
:(
29 Jan 2012 - 11:13 am | आशु जोग
अनेकदा अशा घटना घडतात, आपण भांबावून जातो.
एक मी स्वतः पाहिलेली घटना
एक सायकलस्वार सुसाट वेगाने चाललेला होता.
पुढे एस टी होती. हा मुलगा त्या एस टी लाही ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता.
रस्ता खेड्यातला, अगदी बोळकांड्यासारखा.
वाटेत दगड आला सायकल कलंडली, आमच्यासमोर तो मुलगा नि सायकल
गाडीखाली गेले. आजुबाजूचे सर्वजण पहात होते
पुढच्या काही क्षणात तो मुलगा चिरडला जाणार हे दिसत होते .