मराठी ज्ञानसागरात मोलाची भर आणि मिनी कट्टा अर्थात परीकथेतील राजकुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर २०११

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in जनातलं, मनातलं
11 Dec 2011 - 10:52 am

आपले लाडके मिपाकर परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन काल संपन्न झाले.

मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते.

कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते. परंतु गाडीत पेट्रोल हवा भरून तेथे पोचेपर्यंत आणि पार्किंगला जागा सापडेपर्यंत (चारचाकी गाडी आहे असे सांगण्याचा क्षीण प्रयत्न :) )मला साडेसहा वाजले. तेव्हा रामदासकाका, सर्वसाक्षी, विश्वनाथ मेहेंदळे, अमोल खरे, मस्त कलंदर, निखिल देशपांडे, मिसळलेला काव्यप्रेमी वगैरे आणि खुद्द लेखक आधीच पोचलेले होते. नंतर येणार्‍यांना तिथल्या गर्दीत हे सगळे कोठे आहेत हे शोधायला विमेंचा टीशर्ट फार उपयोगी पडला. :P

माझ्याच बरोबर विलासराव देखील पोचले. किसन शिंदे उशीरा येणार असे कळले. पुण्याहून 'मोठ्या संख्येने' मिपाकर या कार्यक्रमासाठी आले होते. :)

आम्ही सगळे कार्यक्रम सुरू होण्याची वाट पहात होतो. तेवढ्यात मी विजयराज बोधनकरांनी काढलेली विविध लेखकांची अर्कचित्रे (मराठीत - कॅरिकेचर) पाहून आलो.
आयोजकांनी वेळ घालवण्यासाठी प्रेक्षकांना या प्रदर्शनाविषयी काय वाटते ते सांगायची विनंती केली. तेव्हा काही हौशी प्रेक्षक सुरू झाले. त्यांनी जवळजवळ अर्धा तास पकवले. तेवढ्यात इंडियन स्टॅण्डर्ड टाईमच्या बरेच आधी म्हणजे साडेसात वाजताच राज ठाकरे यांचे आगमन झाले.

त्यांनी प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली. हे होत होत श्री राज ठाकरे मंचावर पोचले तोवर आणखी वेळ गेला. मग मंचावर नमस्कार चमत्कार सत्कार झाले.

शेवटी ज्याची उत्सुकतेने वाट पहात होतो तो क्षण आला. राज ठाकरे यांनी ग्रंथाचे वेष्टण काढून पुस्तक प्रकाशित केले.

पुस्तक जरी छोटेसे असले तरी त्यातल्या ज्ञानाच्या भाराने आणि लेखकाच्या तेजापुढे राजजी झुकलेले दिसतात.

परा यांच्या लेखनाच्या तेजाने चंद्रानेही आपले तोंड काळे केले.

तदनंतर राज ठाकरे यांनी जमलेल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केले.

मात्र त्यांनी शाब्दिक आतषबाजी असलेले लांबलचक भाषण केले नाही. त्याचे कारण पुढच्या महिन्यात खूप भाषणे करायची आहेत असे सांगितले. मात्र रामदासकाकांच्या मते याचे खरे कारण बिपिन कार्यकर्ते, विजुभाउ आणि छोटा डॉन हे कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे राजजींचा मूड गेला हे होते.

राजजींनी भाषण फार लवकर आटोपते घेतल्याने आता पुढे काय असा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला. मग सर्वांनी तिथल्या मेजवानी स्टॉलकडे मोर्चा वळवला. आणि बरीचशी भजी आणि चहा यांना या जगातून मुक्ती देऊन त्यांचा उद्धार करण्यात आला.

मध्यंतरीच्या काळात नीलकांत, किसन शिंदे वगैरे मंडळीही "वेळेवर" पोचली.

मग जेवायला कुठे जायचे याचे चिंतन सुरू झाले. हे चिंतन खेळीमेळीच्या वातावरणात झाले.

चर्चा करताना विलासराव, निखिल देशपांडे, श्री सावंत व मस्त कलंदर

त्यातली चर्चा ऐकून मालकांनी डोक्याला हात लावला.

चर्चा चालू होती तेवढ्यात मिपाच्या सिद्धहस्त लेखकांचा एक फोटो घेण्यात आला.

वयोवृद्धांनी आपले कोणकोणते अवयव दुखतात याची चर्चा केली.

मध्येच मिपावरील कोणते वाङ्मय पुस्तकरूपात प्रसिद्ध करता येईल यावर प्रकाशक श्री कीर्तिकुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली.

जेवायला कुठे जायचे ही चर्चा खूपच लांबली. त्यामुळे शेवटी पोळीभाजीच मागवून तिथेच जेवायचे ठरले. "पोळीभाजीच" ठरल्यामुळे काहींची निराशा झाली.

पोळीभाजी येईपर्यंत इतका वेळ गेला की सर्वांना कडकडून भूक लागली. त्यामुळे सगळे जेवणावर तुटून पडले. सत्ते पे सत्ता मधील जेवणाच्या सीनची आठवण आली. मस्त कलंदर पदर खोचून (आपलं- ओढणी खोचून) वाढायला वगैरे लागल्या. पण त्याची काही गरजच नव्हती इतकी भूक सर्वांना लागली होती.

जेवणे झाल्यावर मंडळींनी निरोप घेतला.

प्रकाशनाच्या दिवशी पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली असे आमचे प्रतिनिधी कळवतात.

(वि. सू. - पोळीभाजीचे बिल कोणी दिले हे कळू शकले नाही).

बाकीचे हजर सदस्य अधिक भर घालतीलच.

अतिअवांतर : पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल पराचे पुन्हा एकदा अभिनंदन.

तंत्रशिक्षणअभिनंदनबातमीअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

11 Dec 2011 - 11:00 am | चिंतामणी

फर्स्ट हॅंड रिपोर्ट आला पराच्या लाडक्या चाचांकडुन.

मस्त. तीथे आल्यासारखे वाटले. :) :-) :smile:

पण फोटोंनी अंमळ निराषा केली आहे. थोडे आउट ऑफ फोकस आहेत असे वाटते. (बहुधा मोबाईलवर काढले असावे).

अमोल खरे's picture

11 Dec 2011 - 11:47 am | अमोल खरे

माझ्याकडुन थोडी भर.

काल सही मजा आली. मी, रामदास काका, निखिल, मकी, मिका, विमे, प्रशांत तायडे, साक्षीकाका, (आणखीन एक मुलगा होता, नाव आठवत नाहीये, हल्ली अ‍ॅक्टिव नसतो ), विलासराव, थत्तेकाका आणि माननीय परा असे सर्वजण आले होते. आम्ही भरपुर गप्पा मारल्या. का कोणास ठाउक पण निखिल एकदम बिचारा बिचारा वाटला. (ह.घे रे) पराने गुलजार नार चा पुढचा भाग श्रामो टाकणार आहेत असे सांगितले......... नवल वाटले. मग कॅफेत येणारा क्राऊड, पुण्यातला ट्रॅफिक ह्यावर मौलिक चर्चा झाली. आम्ही शांतपणे बाजुला उभे होतो तर आम्हाला जबरदस्तीने खाली बसायला लावलं. एकीकडे लोकं स्टेजवर येऊन बोलत होते. एक कॉलेजमधला मुलगा स्टेजवर येऊन आम्ही हल्लीची पिढी असं करतो, तसं करतो वगैरे बोलत बसला. आम्हा सर्वांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एका तरुण, कॉलेजकुमाराची आठवण झाली. :)) मग राज आला. लोकं मजबुत आवाज करत होते, त्याचे फोटो काढायला धडपडत होते. आम्ही जमेल तेवढ्या मोठ्या आवाजात एक्मेकांशी बोलत होतो. मग पराला स्टेजजवळ यायला सांगितलं. थोड्यावेळाने राज स्टेजवर आला आणि निवेदिकेने पराचं नाव घेऊन त्याच्या पुस्तकाचे राज प्रकाशन करेल असं सांगितलं. ते ऐकुन सॉल्लिड बरं वाटलं. मग परा पुढे आला आणि एकदम आदराने राजला नमस्कार वगैरे केला. लगेच पुस्तक प्रकाशन झालं आणि सर्व लोकांनी ( आम्ही सर्वांनी त्यातल्या त्यात जास्त) टाळ्या वाजवल्या. एकदम सही वाटलं. मग एक ५-७ मिनिटे बोलुन राज निघुन गेला आणि आम्ही सर्व परत जमलो. परा त्याची किती पुस्तकं खपतायत त्यावर लक्ष ठेवुन होता. थत्ते काकांनी पुस्तक घेतलं पण. सभा सुरु असताना थत्तेकाका त्यांच्या पॉवरफुल कॅमेर्यातुन फोटो काढत होते. सॉलिड पॉवरफुल कॅमेरा आहे. रामदास काका तर फुल फिदा झाले होते त्यावर. आम्ही खुप लांब बसलो होतो, तरीही फोटो चांगले आहेत. आउट ऑफ फोकस वाटत असले तरी नॉर्मल कॅमेर्यामधुन तेही आले नसते. तो पर्यंत नीलकांत पण आला होता. पण रात्रीचे ९-९.३० झाले होते आणि मला बोरिवली पर्यंत जायचे होते. मग थोड्यावेळात मी पण निघालो. पुढील बातम्या रामदास काका देतील.

पैसा's picture

11 Dec 2011 - 11:49 am | पैसा

कोण लिहितंय म्हणून वाटच बघत होते! मस्त खुसखुशीत वर्णन. राज साहेबांची जरा निराशा झाली तर!
़़

सुहास झेले's picture

11 Dec 2011 - 11:54 am | सुहास झेले

सही छोटेखानी वृत्तांत.... :) :)

मला यायचं होतं, पण म्यानेजर ने माती खाल्ली आणि शनिवार-रविवार शिफ्ट दिली :( :(

टवाळ कार्टा's picture

11 Dec 2011 - 12:25 pm | टवाळ कार्टा

+१

मी पण येणार होतो .....

प्रीत-मोहर's picture

11 Dec 2011 - 12:37 pm | प्रीत-मोहर

मी ही येणार होते. पण खुद्द पर्‍याने ऊप्स नै नै .. माननीय लेखकमहोदयांनी येउ नको म्ह्॑टल्यावर... :(

असो. ह्या घोर अपमानाचा योग्य त्या पद्धतीने बदला घेण्यात येइल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Dec 2011 - 1:16 pm | पुण्याचे वटवाघूळ

काल योगायोगाने मुंबईतच असल्यामुळे मी माझे पुण्याला परतणे लांबविले आणि कार्यक्रमाला मी पण आलो होतो आणि कार्यक्रम खूपच आवडला. अर्थात मी मिसळपाव परिवारात इतर कोणाला ओळखत नसल्यामुळे मला इतरांना भेटता आले नाही. श्रीयुत परिकथेतील राजकुमार, पुढच्या पुस्तकाची वाट बहत आहे.

(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

अन्या दातार's picture

11 Dec 2011 - 1:18 pm | अन्या दातार

झालेला दिसतोय कार्यक्रम. आनंद झाला. :)

चिच्चा भन्नाट कार्यक्रमाचा तेवढाच भन्नाट वृत्तांत.
साला आम्हीच कमनशिबी, कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावू शकलो नाही. :(
(ईनो घेत आहे.) ;)

प्रभाकर पेठकर's picture

11 Dec 2011 - 1:25 pm | प्रभाकर पेठकर

श्री. परीकथेतील राजकुमाराचे पुनःश्च हार्दिक अभिनंदन.

थत्ते काकांनी पुस्तक घेतलं पण.

एवढे मिपाकर जमून फक्त एकच पुस्तक ह्या मंडळींमध्ये विकले गेले? आश्चर्य वाटले. (जेवण्याखाण्याची चर्चा मुख्य वाटली.)

भारतात आल्यावर पुस्तक नक्कीच विकत घेतले जाईल.

मस्त कलंदर's picture

11 Dec 2011 - 2:36 pm | मस्त कलंदर

मिपाकरांनी चार पुस्तकं तरी घेतली. एक आम्ही दोघांनी, एक वाहिदा, थत्तेचिच्चा आणि विलासरावांनी एक अशी. वाहिदा आणि विलासरावांनी या जहांबाज पर्‍याची पुस्तकावर स्वाक्षरी घेतली पण नंतर त्याच्या दोन्ही सह्या वेगवेगळ्या असल्याचं निदर्शनास आलंय.

प्रीत-मोहर's picture

11 Dec 2011 - 2:49 pm | प्रीत-मोहर

वाट्लच. हा पर्‍या इथेही हलकटपणाच करेल. आणि झालेही तस्सेच!!!

प्रभाकर पेठकर's picture

11 Dec 2011 - 2:59 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद मस्त कलंदर.

अपेक्षा होती की मिपाकर हजर राहात आहेत तर पुस्तकात हाताळलेल्या मुद्यांचा परामर्श घेतील. अगदी तपशिलात नाही, ते तर नीट वाचल्यावर येईलच पण जरा अनुक्रमणिका पुस्तकाचे वरवरचे तरी निरीक्षण. त्या मानाने आपले कार्यक्रमाचे वर्णन वाचनिय आहे.

पुन्हा एकवार धन्यवाद.

मैत्र's picture

11 Dec 2011 - 11:30 pm | मैत्र

एक सही नाना फडणवीस आणि एक सखारामबापू बोकील अशी आहे का?
नाही पेठेतले आहेत परा साहेब्...त्यामुळे सांगता येत नाही :)

मस्त कलंदर's picture

11 Dec 2011 - 1:37 pm | मस्त कलंदर

मिपाकर भेटतात आणि धमाल करत नाहीत असं कधी होत नाही, आणि कालचा कार्यक्रमही अपवाद नव्हताच. कॅरीकेचर्स, ब्रश न वापरता फक्त बोटं आणि नखांच्या साह्याने काढलेली चित्रं, पुस्तक प्रदर्शन सगळंच छान होतं. पुस्तकांच्या इथे जास्त वेळ गेला हे वेगळं सांगायला नकोच. मेजवानी हा खास मराठमोळ्या पदार्थांचा स्टॉल मुद्दाम आयोजित केल्याचं नवताचे प्रकाशक किर्तीकुमार शिंदें यांनी सांगोतलं. कोथिंबीर वडी,बटाटा-खेकडा भजी, थालीपीठ, वडापाव असं बरंच काही होतं पण आम्ही भुकेने कासावीस होऊन थांबायची तयारी नसल्याने भज्यांवरच हल्ला चढवला गेला.
आधी मैदान बरंचसं रिकामं असलं तरी नंतर गर्दी वाढत गेली.
काही क्षणाचित्रे:
१. आम्ही सहजपणे कल्टी.कॉम करता येईल म्हणून कडेला बसलो होतो पण मधले लोक उठून जाताना न दिसताही आम्हाला लोकांनी पुढे सरकवून सरकवून बरंच पुढे आणलं!!
२.राज ठाकरे आल्यावर आधी फटाक्यांचे फक्त आवाज येत होते, यावरून मला आणि विमेला फक्त आवाजाची सीडी लावलीय की काय असंच वाटलं.
३.नंतरची आतषबाजी मात्र राज ठाकरेंच्या भाषणाहून जास्त वेळ चालली इति प्रशांत.
४. बाकी स्टेजवरचं काही दिसण्याइतकं स्पष्ट नव्हतं पण थत्तेचिचांचा कॅमेरा लैच भारी होता. त्यात बरीचशी सेटिंग्ज होती.
५.खरंतर जे फोटो आऊट ऑफ फोकस आले आहेत ते मी आणि वाहिदाने त्या चांगल्या कॅमेर्‍याला साधा म्हणून हाताळल्याने तसे आले असावेत.
६. थत्तेकाका खूपच शांत आणि गंभीर असावेत असं मला वाटलं होतं, पण माझा समज साफ खोटा ठरला.
७. प्रशांत हा मनुष्यप्राणी आधीच्या भेटीवरून खूप सज्जन असेल असं वाटलं होतं. पण तो मुलखाचा टवाळ आहे याचा काल साक्षात्कार झाला. :-)
बाकी इतर लिहितीलच.

@अमोल खरे:
१. तो मुलगा देवदत्त गाणार होता
२. तुला पोचल्यावर क्षणाची उसंत घेऊ न देता झापतात ते लोक बिचारे असतात असे दिसते. पुढच्या वेळॅस मीही हेच करेन.

चिंतामणी's picture

12 Dec 2011 - 12:45 am | चिंतामणी

>>>५.खरंतर जे फोटो आऊट ऑफ फोकस आले आहेत ते मी आणि वाहिदाने त्या चांगल्या कॅमेर्‍याला साधा म्हणून हाताळल्याने तसे आले असावेत.

मिपावर राहूनसुध्दा प्राजंळपणाचे उदाहरण दाखवल्याबद्दल आभार. :D :-D :lol:

दादा कोंडके's picture

11 Dec 2011 - 1:56 pm | दादा कोंडके

मजा आली वाचून. फोटो आउट ऑफ फोकस वाटत नाहित. पण कॅमेराचं रिजोल्युशन मात्र खत्रा असलं पाहिजे.
अगदी एक-दोन किलो पिक्सेल तरी सहज! :)

वृत्तांत वाचून मजा आली.
राज साहेब भर दिवाळीत एका मराठी वाहिनीवर चांगले अर्धा-पाऊण तास अड्डा जमवून बसले होते, इथंही तसं झालं असतं तर मजा आली असती.
पुस्तक फ्लिपकार्ट्याकडून हस्तगत करणेत येईल.

थत्ते काकांचे चर्चा प्रस्ताव, प्रतिसाद वगळता त्यांनी लिहीलेलं असं लेखन पहिल्यांदाच वाचले. ;-)

बाकी आपले इतर ठाणेकर कुटं गायबले?

अवांतरः मागचं अ.भा.मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झालं होतं का?
अतिअवांतरः मामलेदाराची मिसळ किंवा तिथं रांगेत उभं राहून मिसळ घ्यावी लागते म्हणून गेला बाजार किमान 'आमंत्रण' मधली मिसळ दिसेल अशी आशा होती. ;-)

देवदत्त's picture

11 Dec 2011 - 11:02 pm | देवदत्त

मागचं अ.भा.मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झालं होतं का?
नाही, ते दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये झाले होते.

नितिन थत्ते's picture

11 Dec 2011 - 2:12 pm | नितिन थत्ते

कॅमेरा १२ मेगापिक्सेल आणि १२ एक्स झूम वाला कॅनन आहे. :( फोटोग्राफरच्या तंत्रात दोष आहेत.

आम्ही मुख्य कार्यक्रमापासून इतके लांब बसलो होतो की १२ एक्स झूमनेही फोटो दूरच दिसत होते. म्हणून पुढे आणखी डिजिटल झूम करून फोटो काढले. त्यामुळे थोडे ब्लर आले असतील.

शिवाय काही क्रॉपिंग देखील केले आहे.

अवांतर : फायरफॉक्सवर मिपाचा स्क्रीन दोन्ही बाजूस एक इंच सोडून दिसतो त्यात फोटो ठीक दिसतात. आय ई वर (माझ्याकडे) पूर्ण स्क्रीनच्या रुंदीएवढे दिसतो तेथे थोडे ब्लर दिसतात.

अप्पा जोगळेकर's picture

11 Dec 2011 - 2:29 pm | अप्पा जोगळेकर

वॄतांत वाचून छान वाटले.

कुंदन's picture

11 Dec 2011 - 2:50 pm | कुंदन

सकाळी सकाळी आमचे मित्र थत्ते चाचांना विचारले , कार्यक्रम कसा झाला?
तर चाचा बोलले "श्रद्धा - सबुर"
म्हटले चाचा वृत्तांत टंकण्यात व्यस्त असतील ( हो त्यांना स्व:तच टंकावा लागणार ना , त्यांच्याकडे टंकनिका थोडीच आहे ;-)

वृत्तांत छानच लिहिला आहे.
पर्‍याचे पुन्हा एकदा अभिनंदन.
मनसे आता उमेदवारांसाठी परिक्षा घेते , तेंव्हा पुढील पुस्तक आता पराने या उमेदवारांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचे लिहावे ही विनंती.

सर्वसाक्षी's picture

11 Dec 2011 - 2:54 pm | सर्वसाक्षी

पराच्या सन्मानर्थ झालेली आतषबाजी! आहाहा. ते सांगयचेच राहीले की.

पर्नल नेने मराठे's picture

11 Dec 2011 - 3:19 pm | पर्नल नेने मराठे

परा वावा आम्हाला तुझ्झा अभिमान वाट्टओ

कुंदन's picture

11 Dec 2011 - 3:59 pm | कुंदन

नुसता अभिमान वाटुन काय उप्यओग?
५-५० प्रती खपव पुस्तकाच्या.

हो हो
( हेच म्हणेन भलेही किती जिवावर आले असले तरी )
पर्या आम्हाला तुझा अभिमान वाट्तो रे :)

प्रचेतस's picture

11 Dec 2011 - 3:47 pm | प्रचेतस

खुसखुशित वृत्तांत.
मजा आली वाचून.
पर्‍याचे पुनश्च अभिनंदन.

बरं झालं रिपोर्ट आला , वाचुन आनंद जाहला. येणं शक्यच नव्हतं. परा पुण्यात आल्यावर भेटतोच आहे रे.

नितिन थत्ते's picture

11 Dec 2011 - 7:15 pm | नितिन थत्ते

हा फोटो पाहून रेझोल्युशन कसे वाटते?

प्रास's picture

11 Dec 2011 - 7:22 pm | प्रास

रेझोल्युशन भारी वाटले

आणि

परा राजचा धाकटा भौ वाटला ;-)

प्रकाशन कार्यक्रम आणि कट्टा आणि थत्ते चाचांचा नि बाकी कट्टेकरांचा वृत्तांत मस्त झालाय हे समजून येतंच आहे.

(हे सर्व हुकलेला)

अन्या दातार's picture

11 Dec 2011 - 7:34 pm | अन्या दातार

रेझोल्युशन भारीच, परा राजचा धाकटा भाऊ वाटलाच, आणि उजवीकडच्या कोपर्‍यात उभे असलेले गृहस्थ मला प्रासभौ वाटले ;)

ते गृहस्थ स्वतःच्या खांद्यावर स्वतःच उभे राहिले असते तर कदाचित प्रासभौंच्या खांद्यापर्यंत आले असते..... ;-)

(हा कार्यक्रम हुकलेला) <--- हे तेवढं विसरू नका अन्याभौ....

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Dec 2011 - 12:31 am | बिपिन कार्यकर्ते

हा फोटो पाहून परा फेशियल वगैरे करून गेला असावा असे वाटते. जरा बरा दिसतोय! लवकरच निवडणुकीला वगैरे उभा राहिल असेही वाटून गेले.

बाकी आम्ही असले छप्पन्न परा आणि सत्तावन्न पुस्तकं बघितली असल्यामुळे फारसे कौतुक वगैरे वाटले नाही!

चिंतामणी's picture

12 Dec 2011 - 12:37 am | चिंतामणी

असाच शार्पनेस बाकी फोटोत आणा हो.

नितिन थत्ते's picture

14 Dec 2011 - 4:19 pm | नितिन थत्ते

फोटो टाकताना (अज्ञानामुळे) कमी रेझोल्युशनच्या लिंकस टाकल्या गेल्या होत्या. संपादक मंडळाला विनंती करून फोटो दुरुस्त करून घेतले आहेत.

संपादक मंडळाला धन्यवाद.

माझीही शॅम्पेन's picture

11 Dec 2011 - 7:59 pm | माझीही शॅम्पेन

अरे वा ! कार्यक्रम झकास झालेला दिसतोय ! नेमके काही आठवडे अमेरिकेत पडिक असल्याने मिपाचे मागचे दोन्ही कट्टे बुडाले

बाकीची नेहमीची कट्टे-बाज मंडळी कुठे दिसत नाही आहेत ती ? ( गवी , किस्णा इत्यादी)

राज काय बोलले हे कोणीच सांगायला तयार नाही ?

एकही शूर मीपकारंने मंदाकीनीचे फोटो टाकले (उपस्थितीत असलेली कुठलीहीचालली असती) नाहीत हे पाहून हळवा झालो ;)

अमोल खरे's picture

11 Dec 2011 - 8:18 pm | अमोल खरे

राज मोजुन ५-७ मिनिट्स बोलला असेल. आणि मंदाकिनीचे फोटो आणि पुढील भाग श्रामो टाकणार आहेत असं पराने सांगितलं आहे. उद्या ऑनलाईन आल्यावर परा कन्फर्म करेलच.

श्रावण मोडक's picture

11 Dec 2011 - 8:21 pm | श्रावण मोडक

मंदाकिनीचे फोटो आणि पुढील भाग श्रामो टाकणार आहेत असं पराने सांगितलं आहे.

मी त्या धाग्यावरच लिहिलं होतं, हा पऱ्या गंडवणार!

स्टेजवर दोन्ही हात पुढे धरुन शक्य तेवढ्या नम्रपणे उभे राहण्याचा प्रयत्न करणार्‍या पराचा फोटू आवडला! ;)
सगळे जेवायला बसलेले असताना मस्त कलंदर तै वाढायला उभ्या राहिलेल्या बघून डोळे पाणावले. (निखिल आठवडाभर घरीच भरपूर काम करुन दमला असल्याने मदतील उभा राहिला नसावा, असा आपला एक अंदाज! ;) )

मालकांनी कपाळाला हात लावलेला बघून चर्चेचा अंदाज आला! ;)

अवांतर - पुस्तकाबद्दलही कोणीतरी लिहा रे.

-रंगा

jaypal's picture

11 Dec 2011 - 9:06 pm | jaypal

कार्यालयीन कामा निमीत्त बाहेरगावी असल्याने एका चांगल्या संधिस मुकलो अन्यथा अजुन नविन ओळखी सहज झाल्या असत्या. :-(

सोत्रि's picture

11 Dec 2011 - 9:33 pm | सोत्रि

थत्तेचाचा,

मस्त वृत्तांत!

पर्‍याचे पुनश्च अभिनंदन!!!

- (स्वतःच्या घोडचूकीने कार्यक्रम आणि सर्व मिपाकरांची भेट चुकलेला) सोकाजी

अभिज्ञ's picture

11 Dec 2011 - 9:43 pm | अभिज्ञ

पराशेठचे पुनश्च अभिनंदन.

थत्ते काकांचा वृत्तांत आवडेश.

हरिकथा's picture

11 Dec 2011 - 10:45 pm | हरिकथा

इथे लिखाण करणारे, पुस्तके प्रकाशित होणारे प्रथितयश लेखक आहेत, हे वाचून फारच आनंद झाला.
श्री. परिकथेतील राजकुमार यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुस्तकांच्या प्रति शेकड्याने विकल्या जावोत याबद्दल मनापासून शुभेच्छा!
तसा श्री. परा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विषय फारच जिव्हाळ्याचा आहे कारण हा प्रतिसाद लिहिण्यासाठीही मला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. तेव्हा सदर पुस्तक स्वखर्चाने मिळवून स्वतःच्या मराठी टंकनामध्ये सुधारणा करण्याचा विचार मनात उचल खात आहे. आमच्या टंकनात सुधारणा झाल्यास लगेच कळवले जाईल याची नोंद घ्यावी.
बाकी या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या सहभोजनाच्या कार्यक्रमाचा वृत्तांतही आवडला आहे.

देवदत्त's picture

11 Dec 2011 - 11:04 pm | देवदत्त

परा चे अभिनंदन.
(काल प्रत्यक्ष भेट झाली, पण काही कामामुळे प्रकाशन सोहळ्यास थांबता आले नाही.)

अविनाशकुलकर्णी's picture

11 Dec 2011 - 11:58 pm | अविनाशकुलकर्णी

श्री. परिकथेतील राजकुमार उर्फ परा...यांचे हार्दिक अभिनंदन ...

कार्यक्रम छान झालेला दिसतोय व वृतांतही छान आहे. पुस्तक नक्कीच घेतले जाईल.
परासाहेबांचे पुन्हा एकदा अभिनंदन.

आमच्या मनाच्या गाभार्‍यातुन अभिनंदन!! आम्ही जेव्हा कधी भेटु तेव्हा आमच्या येण्याने आनंद झाल्याने पर्‍या स्वत:चे आता प्रकाशित झालेले अन येईपर्यंत जे काही प्रकाशित करेल ते भेट म्हणुन सही करुन देईलच.

चिच्यांचा वृत्तांत आवडला हेवेसांनल आणि स्वताचा भारी क्यामेरा नवशिक्यांच्या हाती दिल्याने काय होते ते सुद्धा सगळ्यांनी पाहीलेच. विमेंचा सुर्यालासुद्धा लाजवणार्‍या पिवळ्या रंगाचा टीशर्ट पाहुनच साहेबांचे डोळे दुखुन ते लवकर निघुन गेले असावेत असा आमचा अंदाज आहे. (आणि त्याला तुम्ही लोकं राज म्हणणं सोडा पाहु!! )

कौशी's picture

12 Dec 2011 - 2:00 am | कौशी

वॄतांत वाचून छान वाटले.
पराचे पुन्हा एकदा अभिनंदन !!!

प्राजु's picture

12 Dec 2011 - 5:20 am | प्राजु

वा वा वा!! परा जियो!!
छान दिसतो आहेस हो फोटो मध्ये.
तुझीच अशीच आणखीही पुस्तके प्रकाशीत होवोत!!!
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!

रेवती's picture

12 Dec 2011 - 5:58 am | रेवती

आज्ञाधारक पराचा फोटू आवडला.
(आंतरजालीय मिपा विवाहमंडळात नाव नोंदवून घेतल्या गेले आहे.)
कार्यक्रम चांगला झालेला दिसतोय.
अभिनंदन!
पुढचे पुस्तक हे मिपावरच्या पाकृ आणि त्यातील पदार्थ बाजारात कसे शोधावेत यावर येऊदेत अशी मागणी करीत आहे.

श्रावण मोडक's picture

12 Dec 2011 - 10:10 am | श्रावण मोडक

आज्ञाधारक पराचा फोटू आवडला.

तो लई रायरंगी आहे. फटूला पोज कशी द्यायची हे या नाटक्याकडूनच शिकावं. ;)

वरील बर्‍याच प्रतिक्रियांशी सहमत...
बाकी काही दिवसांपूर्वीच विजयराज बोधनकरांच्या प्रदर्शनाला जाउन आलो होतो, त्याची प्रकाशचित्रे सवड मिळताच टाकीन म्हणतो... :)

पाषाणभेद's picture

12 Dec 2011 - 8:11 am | पाषाणभेद

वृत्त्तांत छान. एवढी सगळी मंडळी एकत्र आल्यानंतर कुणीही बसण्याची गोष्ट केली नाही हे वाचून सगळ्यांचा सखेद निषेध करावा असे वाटते. असेच कट्य्ट्यांना होत असेल तर कट्टा करण्यात काय अर्थ आहे?

sneharani's picture

12 Dec 2011 - 10:06 am | sneharani

अरे वा! कार्यक्रम मस्त झालेला दिसतोय!
चाचांचा वृतांतही छान!
लेखकाचं पुन्हा एकदा अभिनंदन!!
:)

छोटा डॉन's picture

12 Dec 2011 - 10:24 am | छोटा डॉन

थत्तेचाचांनी पक्षविचारातले सैद्धांतिक मतभेद, आत्मविचारातली दरी आणि तात्विक मतभेद वगैरे बाजुला सारुन एकगठ्ठा घोळक्याने जमत असणार्‍या जहाल, कडव्या आणि सो कॉल्ड संकुचित प्रादेशिक तसेच धार्मिक अस्मिता असणार्‍या समुहाबरोबर ह्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने काही क्षण घालवले आणि वृत्तांताच्या रुपाने तेच क्षण आम्हाला दाखवले ह्याचा आम्हाला आनंद आहे.
परमपुज्य बापुंच्या स्वप्नातील भारत असाच होता, एक ना एक दिवस अशी वेळ येईल असे खुद्द चाचाजी खासगीत बोलुन दाखवायचे, असो, विषयांतर होत आहे.
मुळ वृत्तांताशिवाय 'समारंभाला कोण येणार' अशी जाहिरात करणारे व ऐनवेळी स्वतः गायब होणारे श्री. अ‍ॅडी जोशी यांचे सज्जन मित्र श्री. अमोल खरे आणि तुर्तास आमच्यावर नाराज असणार्‍या मस्त कलंदर ह्यांनी प्रतिसादातुन दिलेला वृत्तांतही आवडला.
एकाच वेळी एकाच ठिकाणी अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जमतात, शांतपणे बसतात, जमल्यास थट्टामस्करी करतात आणि कसलेही 'खळ्ळऽऽखट्याकऽऽ' न होता त्या कार्यक्रमाचा वृत्तांतही येतो हे 'परिकथेतील राजकुमार' ह्यांच्या लेखनाचे यशच मानायला हवे.
वृत्तांत, छायाचित्रे आवडली हे पुन्हा एकदा नमुद करतो.
पराचे पुन्हा एकदा अभिनंदन, जेव्हा कधी पार्टी द्यायला भेटशील तेव्हा सही वगैरे करुन पुस्तक भेट देशीलच अशी खात्री आहे ;)

बाकी आम्ही स्वतः जातीने कार्यक्रमास उपस्थित राहणार होतो.
पण ऐनवेळी निवडणुक आयोगाने थोडीशी गंमत केल्याने आमच्या प्रभागातल्या निवडणुकांचे टायमिंग चेंज झाले व पर्यायाने गेला शनिवार-रविवार आम्हाला तिकडेच लक्ष घालायला जावे लागले.
गावात निवडणुकाचे वातावरण तापले असताना आम्हाला असे कार्यक्रमात येणे जमले नाही, तसे केले असते तर पक्षाचे लै लुस्कान झाले असते व राज ठाकरे ह्यांचा डब्बल मुड गेला असता, असो.

बाकी सविस्तर नंतर, धन्यवाद

- छोटा डॉन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2011 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकाच वेळी एकाच ठिकाणी अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जमतात, शांतपणे बसतात, जमल्यास थट्टामस्करी करतात आणि कसलेही 'खळ्ळऽऽखट्याकऽऽ' न होता त्या कार्यक्रमाचा वृत्तांतही येतो हे 'परिकथेतील राजकुमार' ह्यांच्या लेखनाचे यशच मानायला हवे.वृत्तांत, छायाचित्रे आवडली हे पुन्हा एकदा नमुद करतो.

छोडॉ च्या शब्दा शब्दाशी सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

दत्ता काळे's picture

12 Dec 2011 - 10:30 am | दत्ता काळे

वृतांत वाचला. आवडला. पुढील पुस्तकांसाठी हार्दिक शुभेच्छा.

वयोवृद्धांनी आपले कोणकोणते अवयव दुखतात याची चर्चा केली.
हा.. हा..

पिवळा डांबिस's picture

12 Dec 2011 - 10:49 am | पिवळा डांबिस

वृत्तांत आणि फोटो दिल्याबद्दल थत्तेकाकांना धन्यवाद.
पराचे पुनश्च अभिनंदन!
५-७ मिनिटे बोलल्याबद्दल राजसाहेबांचेही (त्यांच्या तारतम्याबद्दल) अभिनंदन!! :)
ओढणी खोचून वाढण्यात पुढाकार घेतल्याबद्दल सौ मस्तताईचे (कोन रे शिंचा तिला अजून मकी म्हणतोय? काय ल्हानमोठं हाय का नाय?) अभिनंदन!
अलफिदा रामदासकाकांचेही अभिनंदन! (त्यांचं अभिनंदन करायला कारण लागत नाय!)
:)
पर्‍या, एक प्रत माझ्यासाठी राखून ठेव, पुन्हा भेट झाली की विकत घेईन.
पुढील वाटचाली साठी पुन्हा अनेक शुभेच्छा!!
व्हेरी गुड न्यूज, आनंद झाला...

वा परा
मनापासून अभिनंदन

त्याच दिवशी गावाला गेल्याने उपस्थित राहू शकलो नाही :(

स्मिता.'s picture

12 Dec 2011 - 2:08 pm | स्मिता.

अभिनंदन रे परा! कार्यक्रम मस्तच झालेला दिसतोय.
आमच्यासारख्या उपस्थित राहू न शकणार्‍यांकरता वृत्तांत दिल्याबद्दल थत्ते चाचांचे आभार.

पराने एवढ्या नम्र, साळसूदपणे उभा राहू शकतो हे डोळ्यांना, बुद्धीला पटले नाही ;)

इरसाल's picture

12 Dec 2011 - 2:23 pm | इरसाल

पराचे हार्दिक अभिनंदन आणि श्री. थत्ते यांचे आभार.

स्वाती दिनेश's picture

12 Dec 2011 - 4:28 pm | स्वाती दिनेश

नितिन थत्ते,कार्यक्रमाचा वृत्तांत आवडला,
परा पुन्हा एकदा अभिनंदन रे..
स्वाती

विनायक प्रभू's picture

12 Dec 2011 - 4:55 pm | विनायक प्रभू

आरे परा तुला मी घरी बोलवले होते ना?
चेरी आप्पे खायला.
आला का नाहीस?

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Dec 2011 - 6:54 pm | llपुण्याचे पेशवेll

परा अभिनंदन. पार्टी पाहीजे. भेटायचे जमवा. :)

आत्मशून्य's picture

12 Dec 2011 - 7:10 pm | आत्मशून्य

.

देविदस्खोत's picture

12 Dec 2011 - 7:51 pm | देविदस्खोत

अभिनन्दन.......!!!! माननिय " परा " यान्चे मनापासुन पुन्हा एकदा " अभिनन्दन ".!!!!!!!!!!!

चित्रा's picture

13 Dec 2011 - 8:40 am | चित्रा

छान वृत्तांत. फोटो फारसे स्पष्ट नाहीत, पण तरी अंदाज येतो आहे.

सुनील's picture

13 Dec 2011 - 9:29 am | सुनील

छान वृत्तांत. कार्यक्रम चांगला झालासे दिसते!

परा यांचे अभिनंदन!

दिपक's picture

13 Dec 2011 - 9:46 am | दिपक

पराच्या लोकप्रियतेचा यंदाच्या निवडणूकीसाठी राज ठाकरे असा वापर करतील असे वाटले नव्हते. :-)

अंवातर- वृत्तांत भारी!

गवि's picture

13 Dec 2011 - 10:11 am | गवि

मस्त वृत्तांत. येऊ न शकल्याबद्दल चुटपुट.

मॅजेस्टिक बुक डेपोच्या पुढील भेटीत हे पुस्तक "न्यू रिलीजेस"मधे शोधणार.

अभिनंदन पराशेठ.. (टंकनिका मिळाली वाटते एवढे डीटेलवार पुस्तक लिहायला.. ;) )

दूरुस्ती

"टंचनिका" मिळाली वाटते एवढे डीटेलवार पुस्तक लिहायला..

:bigsmile:

क्रान्ति's picture

13 Dec 2011 - 1:42 pm | क्रान्ति

सविस्तर वृत्तांत, फोटो आणि प्रतिसादांमुळे प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्याचं समाधान मिळालं. :)

कदाचित कालच मान्यवर लेखक महोदयांचं पुस्त्कांसह दर्शन, मकूताईशी फोनवर गप्पा, आणि लेखक महोदयांकडून स्वाक्षरीसह भेट मिळालेलं पुस्तक यांचाही परिणाम असेल. ;)

एकंदरीत जोरदार कार्यक्रम झालेला आहे, परिकथेतील राजकुमाराच्या लौकिकाला साजेसा! अभिनंदन रे परा.

पुस्तक छानच आहे.

चिगो's picture

13 Dec 2011 - 2:10 pm | चिगो

आदरणीय श्री. परासाहेबांचे अनेकवार अभिनंदन.. :-)

त्यांच्या ह्या पुस्तकामुळे आंतरजालावरील मराठीवर होणारे अत्याचार कमी होतील आणि मराठी शुद्धलेखन सुधारेल, ही आशा..
पुन्हा एकदा, अभिनंदन पराशेठ.. जियो..

अन्या दातार's picture

13 Dec 2011 - 2:45 pm | अन्या दातार

त्यांच्या ह्या पुस्तकामुळे आंतरजालावरील मराठीवर होणारे अत्याचार कमी होतील आणि मराठी शुद्धलेखन सुधारेल, ही आशा..

सायबा, ते पुस्तक काँप्युटरवर मराठी कसे लिहावे याबद्दल आहे. शुद्ध मराठी कसे लिहावे यावर नाहीये. ;)

आता कसे सगळेच फेशियल करुन आल्या सारखे दिसताय. ;)

प्यारे१'s picture

14 Dec 2011 - 4:38 pm | प्यारे१

असहमत.
चंद्राचा जरा 'कौटुंबिक' प्रॉब्लेम झालेला म्हणून सगळे वजा एक. ;)
बिच्चारा तोंड लपवून होता. :)

समीरसूर's picture

26 Dec 2011 - 2:14 pm | समीरसूर

पराशेठ,

त्रिवार अभिनंदन!!

पुस्तक कुठे मिळेल? वाचायला नक्कीच आवडेल.

प्रकाशन समारंभ झोकात झालाय असे दिसते. मी मागचे काही दिवस (जवळपास एक महिना) मिपावर येऊ शकलो नाही. काही कारणांमुळे जमले नाही. कार्यक्रमाला यायला आवडले असते. असो.

पुन्हा एकदा अभिनंदन! पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा!!

--समीर