आपण सगळेच बैल असतो
बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो
फक्त दोनवेळा जेवण आणि फोमच्या डबलबेडवर खूश असतो ;)
बायकोच्या एखाद्या इशार्या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो.
आपण सगळेच बैल असतो
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी
अंघोळीला आपली पाठ चोळावी
कधी तरी पुरणपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो :(
आपण सगळेच बैल असतो
आपल्याला आपण फसवले गेलो आहोत याची काही लाज नसते
ती जाणीवच थिजलेली असते
उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते
बायको माहेरी गेली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या बायकोच्या शोधात असतो
आणि नव्या बायकोकडे गेलो की जुनी कशी चांगली होती (?!?!?!) याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 12:17 pm | केशवसुमार
बेलाशेठ,
अगदी मनातल बोल्लात.. असे बरेच प्रतिसाद येणार!!
जबरा विडंबन.. आवडल..
(हहपोदु)केशवसुमार
तो पुरण पोळीच्या जागी चुंबन हवे होते का? (कोण ते असभ्य असभ्य म्हणून ओरड रे!!)
अनुभव कमी त्या मुळे असेल..अनुभवाने जमेल!!!
(अनुभवी)केशवसुमार
स्वगतः केश्या जुन्या संकेतस्थळा कडून नव्या संकेतस्थळा कडे जा अस काही करा येईल का? :?
18 Jul 2008 - 12:18 pm | अनिल हटेला
क्या बात है !!!
आज जोरात बैलाचा उदो -उदो होतोये....
काय बैलपोळा आहे की काय !!!!!
चालू देत !!!!!
स्वगत : आन्या बेट्या , उस के घर देर है , पर अन्धेर नही !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
18 Jul 2008 - 12:22 pm | बेसनलाडू
स्वगत : आन्या बेट्या , उस के घर देर है , पर अन्धेर नही !!!
काय हो!? कुणालातरी तुमचा दर्द समजला म्हणायचे काय? ;)
(दर्दभरा)बेसनलाडू
18 Jul 2008 - 12:29 pm | अनिल हटेला
मिपा वर सगळ्या विषयावर चर्चा ,कविता चलू असतात ....
पन आज बैलाला तुम्ही जे मानाच स्थान दिलये....
ते पाहुन फार - फार भरुन आलये...
मन !!!
त्याबद्दल धन्यवाद !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
18 Jul 2008 - 1:20 pm | सहज
आज अगदी बैलपोळाच म्हणायचा!!!
मस्त...
18 Jul 2008 - 2:56 pm | बाजीरावाची मस्तानी
तुम्ही बाईल असु शकता...मी नाहि.....मी तर बाजीरावाची मस्तानी आहे......
18 Jul 2008 - 5:57 pm | विजुभाऊ
मस्त रे बेला
बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
18 Jul 2008 - 6:48 pm | विसोबा खेचर
हेही विडंबन क्लास! :)
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी
अंघोळीला आपली पाठ चोळावी
सह्ही...
आपला,
(अविवाहीत) तात्या.
18 Jul 2008 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी
अंघोळीला आपली पाठ चोळावी.
बेला, मस्त रे !!!
ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे
दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे
18 Jul 2008 - 7:19 pm | चतुरंग
एकदम जबरा विडंबन, सर्वच ओळी मस्त!
कसं अगदी 'विडंबन सप्ताह' चालू असल्यासारखं वाटतंय! ;)
(स्वगत - ह्या बे(बै)लाचं लग्न ठरलं आहे की काय? एकदम इतकी सत्य परिस्थिती वर्णन केली आहे म्हणून शंका येते आहे! ;) )
चतुरंग
18 Jul 2008 - 11:33 pm | सर्किट (not verified)
कमीत कमी शब्द बदल : १० गुण
जुनी - नवी : ७ गुण (तिथे गाणी ऐवजी आणखी काही तरी हवे होते राव.)
आमचा मुक्तक फ्याक्टर : ०.७
त्यामुळे, एकूण गुणः (९ * ०.७) = ६.३
- सर्किट
18 Jul 2008 - 11:38 pm | वरदा
आपण एवढे फॉर्मात येऊ असा बैलाने विचारही केला नसेल...
कसं अगदी 'विडंबन सप्ताह' चालू असल्यासारखं वाटतंय!
अगदी अगदी....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
19 Jul 2008 - 2:43 am | मदनबाण
बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी
अंघोळीला आपली पाठ चोळावी.
जबरा :)
(गायीचा शोधात असलेला बैलोबा !!)
मदनबाण.....
19 Jul 2008 - 1:11 pm | विजुभाऊ
(गायीचा शोधात असलेला बैलोबा !!)
मदनबाण.....
=))
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत