(मोजलेली 'मापे')

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
15 Jul 2008 - 1:30 am

मिलिंद फणसे यांची 'माझ्या रचना' वाचून आणि त्यानंतर केसुशेठची (माझ्या रचना) बघून आमचीही जुनी कारागिरी डोळ्यांसमोर आली! ;)

मोजण्याची माप पहिली खेप आहे
त्यात अन आखूड मेला टेप आहे

कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी
'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे!

'मोजमापे' घेतली का मी चुकीची
यौवनाचा की तिच्या प्रक्षेप आहे?

मोजताना 'माप' मी हुरळू कशाला?
दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे?

सलवार, वा कुडता असो वा कंचुकी
शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे!

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

15 Jul 2008 - 1:44 am | केशवसुमार

वा वा रंगाशेठ,
एकदम जबर्दस्त विडंबन.. हा हा हा
कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी
'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे!
क्या बात है.. हासीले विडंबन...
'शेप' ची कारागीरी ही झकास
(शेपलेस कारागीर)केशवसुमार
स्वगतः हा रंग्या नावा पेक्ष्या जास्त रंगेल दिसतो :W

सर्किट's picture

15 Jul 2008 - 2:01 am | सर्किट (not verified)

एकूण गुण ८.

टेप - ६ गुण
बाकी सर्व "शेप" - १० गुण

कोवळ्या जमवून .. ह्या ओळीतील ठसका - १० गुण

सलवार, वा .. ह्या ओळीतील ओढाताण - ७ गुण

असो, विडंबन आवडले.

पुविशु.

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

15 Jul 2008 - 2:08 am | मुक्तसुनीत

कंचुकी वा तो असो सलवार- कुडता
शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे!

सर्किट's picture

15 Jul 2008 - 2:12 am | सर्किट (not verified)

आता ह्या ओळींना - १० गुण

- "गुण"ग्राही सर्किट

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 2:14 am | चतुरंग

आता 'विडंबनातले' पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर 'सर्किट+मुक्तसुनीत क्लासेस'ला पर्याय नाही! ;)

(स्वगत - मुख्य शिक्षक केसुशेठ असतील की काय? :? )

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

15 Jul 2008 - 2:16 am | मुक्तसुनीत

आम्ही म्हणजे प्रोफेसर ठिगळे हो !! ;-)

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 2:18 am | चतुरंग

लेखक "विडंबनचंद्रिका!" ;)
चतुरंग

सर्किट's picture

15 Jul 2008 - 2:17 am | सर्किट (not verified)

परीक्षकांना क्लासेस घेता येत नाहीत, त्यामुळे आमचा नाईलाज आहे.

मुक्तसुनीतांचे क्लासेस लावण्याची आमचीही इच्छा आहे.

(स्वगतः मुक्तपुलंचे क्लासेस कुठे आहेत ?)

- सर्किट

प्राजु's picture

15 Jul 2008 - 2:06 am | प्राजु

मस्त झाले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

15 Jul 2008 - 3:16 am | बेसनलाडू

(इन् शेप)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

15 Jul 2008 - 8:26 am | विसोबा खेचर

मोजताना 'माप' मी हुरळू कशाला?
दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे?

सलवार, वा कुडता असो वा कंचुकी
शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे!

हे शेवटले दोन शेर सर्वात मस्त! :)

आपला,
तात्याशिंपी.

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 11:37 am | स्वाती फडणीस

आवडले

मदनबाण's picture

15 Jul 2008 - 4:18 pm | मदनबाण

कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी
'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे!
जबराट....
मोजताना 'माप' मी हुरळू कशाला?
दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे?
!!!!

मदबाण.....