(मोजलेली 'मापे')
मिलिंद फणसे यांची 'माझ्या रचना' वाचून आणि त्यानंतर केसुशेठची (माझ्या रचना) बघून आमचीही जुनी कारागिरी डोळ्यांसमोर आली! ;)
मोजण्याची माप पहिली खेप आहे
त्यात अन आखूड मेला टेप आहे
कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी
'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे!
'मोजमापे' घेतली का मी चुकीची
यौवनाचा की तिच्या प्रक्षेप आहे?
मोजताना 'माप' मी हुरळू कशाला?
दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे?
सलवार, वा कुडता असो वा कंचुकी
शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे!
चतुरंग
वाचन
5407
प्रतिक्रिया
0