फिशरमन्स व्हार्फ..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
20 Oct 2011 - 4:17 pm

गोव्याला फेरी ही माझ्या जिवाभावाची गोष्ट आहे. यंदाच्या फेरीत मी माझ्या आवडत्या कोळवा बीचवरच मुक्काम ठोकला. कोळवा बीचवर केंच्युकी हे खाण्याचं जबरदस्त ठिकाण आहे. त्याहूनही भारी असलेलं "मार्टिन्स कॉर्नर" तिथून थोड्याश्याच अंतरावर आहे.

या ठिकाणांविषयी परत कधीतरी लिहीन कदाचित. पण यंदा असंच फिरत फिरत सापडलेलं ठिकाण म्हणजे "फिशरमन्स व्हार्फ" सर्वांसमोर आणावं म्हणून लिहावंसं वाटलं.. खादाडी सफरीमधे.. अशा खात्रीने की मिपावर अनेक खाद्यसंप्रदायी आहेत, आणि वेगवेगळ्या टाईपची खादाडीची ठिकाणं माहीत झालेली त्यांना आवडतील

यावेळी काहीतरी वेगळं हवं होतं. म्हणून रात्री कोळव्याच्या बीचवर बाहेर पडलो.

तिथे किनार्‍यावर संध्याकाळ ते मध्यरात्र असा एका रिक्षात मशीन बसवून डोळ्यादेखत गरमागरम चिकन शवारमा (उच्चारातल्या चुकांबद्दल मिपाकरांनी एकूणच मला माफ करत चलावं..) बनवून देणारा पिंटो नावाचा मनुष्यविशेष आहे. पिंटोकडचे तीन शवारमा काजूच्या फेणीसोबत चापले. त्यातच रात्रीचं जेवण झालं. मग बाजूलाच असलेल्या नेहमीच्या आवडत्या केंच्युकीत जायची पोटाची हिंमत झाली नाही.

दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळी मी ठरवलं की गोव्याच्या आणखी आणखी दक्षिणेकडे जात रहायचं. बघू तरी कोळव्याच्या अजून दक्षिणेला अजून किती आणि कसा गोवा आहे?

बरंच अंतर रँडमली भटकत गेल्यावर निर्जन भाग लागला. तिथपासून रस्त्याच्या बाजूला फुलसाईझ होर्डिंगवर एका मस्तपैकी फ्राय करुन ठेवलेल्या प्रचंड माशाचा फोटो होता. माझी भूक खवळली.

हा फोटो मी फिशरमन्स व्हार्फच्या साईटवरुन घेतला असला तरी असाच काहीसा तो होर्डिंगवरचा फोटोही होता. त्यावर एक बाण दाखवून "फिशरमन्स व्हार्फ" असं नाव लिहिलं होतं.

अगदी हव्या तेवढ्या योग्य अंतरावर हे बोर्ड रिपीट होत होते, फक्त माश्याऐवजी कधी खेकडा, कधी कोळंबी... पोटाचे हाल व्हायला लागले.

त्यामुळे मग या ठिकाणी जायचंच असं माझ्या मनाने घेतलं.. बोर्डांवरचे बाण फॉलो करत मी खूप खूप दूर जात राहिलो. शेवटी इतक्या निर्जन ठिकाणी खरंच काही असेल की आपला पोपट बनवण्यात येत आहे हे कळेना. पोपट झाल्यास उडता तरी येईल असा पॉझिटिव्ह विचार करुन मी तसाच जात राहिलो.

शेवटी एका ठिकाणी संपूर्ण आयसोलेटेड भागात एक वळण आलं. तिथेच होती फिशरमन्स व्हार्फची जागा. माझा फोटो पूर्ण व्ह्यू कव्हर करणारा न आल्याने मी इथे फिव्हाकडून घेतलेला फोटो साभार देत आहे.

आहा. जागा तर बेहद्द आवडली.. आता मुख्य प्रश्न.. मेनू कायकाय ? आणि किंमतीचं काय?

उर्दू पद्धतीने मेनूकार्ड पाहून तातडीने आनंद झाला कारण पदार्थांच्या किंमती अगदीच वाजवी होत्या. व्हरायटीही उत्तम दिसत होती. समुद्रजीवप्रेमींना नंदनवन वाटायला हरकत नव्हती.

काठावरचं एक टेबल पकडून बसलो.

बारच्या काउंटरवर एकदोन उत्साही तरुण बारटेंडर दिसत होते आणि बाजूला एका बोर्डवर बर्‍याच ऑफर्सही लिहिलेल्या होत्या. एकावर एक फ्री ड्रिंक वगैरे. ताज्या हापूस आंब्याचे मार्गरिटा बनवून देत होते. ही कल्पना मला आवडली आणि त्यातलं एक मी फस्त केलं. अफलातून टेस्ट होती. इथे मी फिव्हाला हाय रेटिंग द्यायला सुरुवात केलीच. मार्गरिटातील टकीला गोव्यातच बनवलेला उत्तम दर्जाचा टकीला होता. डेस्मंडजी या मेकचा.

नंतर मी मेनूवर नजर टाकली. बटर गार्लिक श्रिंप अशा एका प्रॉन्सच्या डिशने लक्ष वेधलं. मग ती मागवली आणि सोबत मागवला लंबबेट चहा. इथे मिळालेला लाँग आयलंड आईस टी आत्तापर्यंत चाखलेल्यातला सर्वोत्कृष्ट होता. अप्रतिम ब्लेंड.. अजूनही चव तोंडात येतेय.

मेनूत प्रॉन्स, खेकडे, मासे, म्हाकुळ यांचे असंख्य प्रकार दिसत होते. आंबट तिखट टायटलखाली येणारं गोवन कालवण, मोरी ऊर्फ शार्कचे पदार्थ असा बराच व्हरायटीवाला मेनू होता.

गोव्यात नवीन ठिकाणी गेलं की मुख्यतः फिशकरी आणि भात असा साधा मेनू मागवावा. मी तर गोव्यात दोनपैकी एक जेवण फिशकरी राईसचंच घेतो. ती गोव्याची "सिग्नेचर" डिश आहे. शिवाय माझं असं मत आहे की साधा पण त्या इलाक्यातला सिग्नेचर पदार्थ मागवला की संपूर्ण किचनची आणि त्यातल्या चवीची कल्पना एकदमच येते. उदा. उत्तरेकडील ढाब्यांवर दालरोटी..

तर.. फिशकरी राईस मागवला.

पुन्हा एकदा तेच.. आत्तापर्यंत गोव्यात खाल्लेल्या गोवन फिशकरीपैकी ही सर्वात टेसदार होती. अतिशय तृप्त वाटलं. सोबत मद्याचे सिप्स आणि मासा यासारखं सुख नाही. इथेही फेणी उपलब्ध होतीच.

एकूण शंभर ते दोनशेच्या मधे किंमती असलेले पदार्थ आणि ड्रिंक्स, प्रशस्त ऐसपैस जागा, पोरांना खेळायला भरपूर बाग, समुद्र आणि नदी यांच्या अगदी काठावर आणि मुख्य म्हणजे अतिशय मस्त चव.. असे खूप गुण असलेलं फिशरमन्स व्हार्फ सोडलं ते लवकरात लवकर परत येण्यासाठीच...

त्यांची वेबसाईट नंतर सापडली. तिथे कसं जायचं वगैरे वेबसाईटवरुन कळेल...

रेकमेंडेड.. जा जरुर...

संस्कृतीपाकक्रियाप्रकटनविचारप्रतिसादआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Oct 2011 - 4:23 pm | प्रचेतस

मस्त हो गवि.
फिशरमन्स एकदम ढंगदार दिसतय.
आम्हा शाकाहार्‍यांसाठी काही ऑप्शन्स आहेत का तिथे?

अरे दुष्टा कुठे फेडशील ही पापं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Oct 2011 - 1:31 am | निनाद मुक्काम प...

+ १
आता कुठे बियर फेस्ट मधील धुंद आठवणीतून बाहेर येत होतो .
तर चक्क ताज्या आब्यांची मार्ग रीटा ,( जुने कॉलेजचे दिवस आठवले .फेस्टिवल मध्ये असेच काहीतरी भन्नाट प्रयोग करायचो .)
वर फिशकरी तीही फोटोसह
काही आठवड्यापूर्वी जर्मनीत गोवन उपहारगृहात जाऊन अत्यंत भिकार फिशकरी खाल्याची आठवण ताजी झाली .

ह्यावर्षी राजस्थान आणी दिल्ली आग्रा ह्या डिसेंबर मध्ये पाहणार आहोत .मात्र पुढील वर्षी गोव्याला जाणे पक्के

वपाडाव's picture

21 Oct 2011 - 10:56 am | वपाडाव

चक्क ताज्या आब्यांची

म्हणजे हो, आबांनी अंघोळ केल्यावर असे म्हणायचे आहे का?

ताजे आंबे म्हणजे टिनमधला आमरस नव्हे एवढेच म्हणायचे असेल.

गोव्यात गेल्या नंतर आवडीने जाणारा नक्की ..

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2011 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>गोव्यात गेल्या नंतर आवडीने जाणारा नक्की ..

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

मी ऋचा's picture

20 Oct 2011 - 5:15 pm | मी ऋचा

ओळख, जागा, मेन्यु हे सगळं अगदी छान पण

>>पोपट झाल्यास उडता तरी येईल असा पॉझिटिव्ह विचार करुन मी तसाच जात राहिलो.<<

या अति वाईट विनोदाबद्दल माफक निषेध व्यक्त केल्या शिवाय रहावलं गेलं नाही ;)

'या अति वाईट विनोदाबद्दल माफक निषेध व्यक्त केल्या शिवाय रहावलं गेलं नाही '

या अति मवाळ निषेधाबद्दल दुखः व्यक्त केल्याशिवाय उभं राहता आलं नसतं दोन पायावर' असो, हे अवांतर आहे.

गवि, जागा तर लई भारी आहे पण आमच्यासाठी काय, म्हणजे मी, वल्ली, आत्मशुन्य, पराग दिवेकर, आणि वपाडाव, आम्ही काय पाप केलंय ओ, आमच्या साठी पणं काहीतरी सुचवा की जरा.....

पण आमच्यासाठी काय, म्हणजे मी, वल्ली आणि वपाडाव आम्ही काय पाप केलंय ओ, आमच्या साठी पणं काहीतरी सुचवा की जरा.....

हेच मला पण लागु आहे बरं... ;)
बाकी विनोद गमतीदार होता... ;)

नंदन's picture

20 Oct 2011 - 5:50 pm | नंदन

दक्षिण गोव्यात फारसा फिरलो नाही, पण कोळवा बीचला जायचं अजून एक कारण मिळालं :)

जरुर जा. केंचुकीला पण.. अगदी बीचलगतच आहे.

फि.व्हा मात्र कोळव्याला नाही. तिथूनही बरंच खाली दक्षिणेला आहे...

मद्य, किमान फेणी आणि मासे खात नसल्यास गोव्यात जाण्यातली अर्ध्याहून अधिक मजा नष्ट झालेली असते. :) अर्थात या मताला कितीजण सपोर्ट करतील माहीत नाही...

पण यापुढे जरुर शाकाहारी ऑप्शन्सही आजमावत जाईन..

तिमा's picture

20 Oct 2011 - 8:48 pm | तिमा

गवि,
तुमच्याबरोबरच हिंडलं पाहिजे अशी खाण्याची चंगळ करायला. तोंडाला पाणी सुटलं.

म्हंजे आम्ही शाकाहारी गोवन्स मज्जा करत नाय अस म्हणायचय का तुम्हाला?

(गेल्या वर्षीची बर्थ्डे पार्टी तिथे देउन पस्तावलेली) प्रीमो

ओ ५०राव....
आशुला कसं इसर्ला हो.... त्याने काय पाप केलंय त्याला विसरलात ते....

रेवती's picture

20 Oct 2011 - 6:04 pm | रेवती

लेखन आवडलं. वर म्हटल्याप्रमाणं शाकाहारींसाठीही पर्याय देत राहिलात तर तुमचा जयजयकार करू.;)
नुकताच तुम्हाला गंगामईयाच्या कृपेनं एक तिर्थक्षेत्र पहायचा योग आला होता. हे दुसरं तिर्थक्षेत्रही चांगलं टिपलय.

प्रभो's picture

20 Oct 2011 - 8:08 pm | प्रभो

मस्तच!!

जाई.'s picture

20 Oct 2011 - 8:35 pm | जाई.

छान माहिती

यकु's picture

20 Oct 2011 - 11:44 pm | यकु

गविंनी मासे खायला शिकवेपर्यंत मत्स्यविषयक पोस्टांवर नो प्रतिक्रिया.

पैसा's picture

20 Oct 2011 - 10:59 pm | पैसा

या हाटेलाने फार नाव कमावलं आहे, पण याशिवाय काही अजून स्वस्त आणि खवय्याना ओढून नेणारी ठिकाणं माहिती आहेत. एक बांबोळी इथे आहे. नाव विसरले. एक पणजीत गीता बेकरीजवळ मामाची खाणावळ आहे, तिथे मनोहर भाऊ पर्रीकराना खूपवेळा पाहिलं आहे. अशी कित्येक. गोव्यात १८ वर्ष राहून मासे, फेणी न खाल्ल्याबद्दल मला तुम्ही बहुधा म्युझियममधे ठेवाल. पण काही इलाज नाही.

गोव्यातलं चविष्ट शाकहारी जेवण पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्यातरी गोंयकाराकडे वशिला लावावा लागेल. गोव्याच्या पद्धतीचं शाकाहारी जेवण देणारं एकही हाटेल मला माहिती नाही. हॉटेलात उडपी, पंजाबी, चायनीज, अगदीच काही नाही तर मालवणी मिळेल पण गोंयचे रांधप फक्त घरातच मिळेल.

>>> गोव्यातलं चविष्ट शाकहारी जेवण पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्यातरी गोंयकाराकडे वशिला लावावा लागेल.

कुणाकडे कशाला. तुझ्याकडेच वशिला लावतो पैसाताय. नाहीतरी नोव्हेंबर शेवटी गोव्याला यायचा प्लान करतोय.

- पिंगू

सोत्रि's picture

21 Oct 2011 - 10:41 am | सोत्रि

मी पण.... मी पण...

मलाही गोव्याला जाउन हाटेलात खाण्यापेक्षा घरी केलेले जेवण चापण्याची फार्फार जुनी इच्छा आहे.

- ( बहुदा मागच्या जन्मीचा गोयंकर ) सोकाजी

पैसा's picture

21 Oct 2011 - 7:22 pm | पैसा

शीत कढी करायला काही कठीण नाही!

वपाडाव's picture

21 Oct 2011 - 11:05 am | वपाडाव

गोव्यात १८ वर्ष राहून मासे, फेणी न खाल्ल्याबद्दल मला तुम्ही बहुधा म्युझियममधे ठेवाल.

काय पैसातै, सकसक्काळी फेणी मारुन लिहिताय नवं का?

पैसा's picture

21 Oct 2011 - 7:23 pm | पैसा

आमच्याकडे कोणत्याही दारूसाठी "दारवा खाणे" असाच वाक्प्रयोग आहे!

म्हणजे बंगाली लोकांसारखच म्हण की!
तेही पाणी खातात.;)

मार्गारीटा नाहीतरी थोडी आंबटावर जाणारी हवी. हापूस इथे वाया.

(गोव्याला भेट देऊन अनेक वर्षे झाले. पारपत्रावरचा पत्ता "गोवा" असूनही! म्हणून "धन्याला हापूस आंबट" ही म्हण खरी करून दाखवली.)

विसुनाना's picture

22 Oct 2011 - 4:15 pm | विसुनाना

"..ला हापुस गोड" हवे का?

ह्याच नावाचे एक हॉटेल वरळीला होतं .इकबाल मिर्ची ह्या स्मगलरचं हॉटेल. हॉटेल पिक अप जॉइंट म्हणून फार फेमस होतं .अधिवेशनाच्या काळात रात्री दहा पंधर आमदार हमखास भेटायचे. इकबाल मिर्ची लंडनला पळून गेला.मग ते हॉटेल बंद झालं .
अवांतर : त्या वेळी तीन इकबाल होते. एक इकबाल मिर्ची दुसरा इकबाल चित्रा तिसरा इकबाल लिमका . सगळ्यांची गुंतवणूक मनोरंजन क्षेत्रात म्हणजे डान्स-बार -पिक जॉइंट-दुबई शोज -बेटीग ह्यात होती