'अंजली'ला लावलेली टेप आहे
गॅसवर सध्या जुना 'निर्लेप' आहे
रोज कविता चोरल्या काही नव्या मी
पायरट मी खास - जॉनी डेप आहे१
बाटल्या उघडून बसलो सर्व तरिही
"ग्लास सुकले", त्यांस हा आक्षेप आहे!
ना करीना, मल्लिका, प्रीती, बिपाशा
'ऍश' आणिक 'कॅश' - दृष्टिक्षेप आहे?
पाडताना काव्य मी थांबू कशाला?
दोस्तहो, पहिली न माझी खेप आहे
===================================================
१. पायरेट्स ऑफ दि कॅरिबिअन हा लोकप्रिय इंग्रजी चित्रपट आणि त्याचा नायक जॉनी डेप (कॅप्टन जॅक स्पॅरो) हा संदर्भ
===================================================
प्रेरणाः मिलिंद फणश्यांची झेप
प्रतिक्रिया
11 Jul 2008 - 3:58 pm | विसोबा खेचर
सुंदर विडंबन..
तात्या.
11 Jul 2008 - 4:04 pm | विजुभाऊ
मिलिन्द फणसे हे लैच जोरदार दिस्ताहेत.
केश्या पण त्यालाच नेहमी गिर्हाईक करतो
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत