नरेंद्र मोदी यांचे उपोषण

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
17 Sep 2011 - 10:59 pm

क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु झाला आणि सगळे राष्ट्र टी व्ही कडे डोळे लावून बसले.

काय होतय, काय होतय ? उत्कंठा होती.

१९८३ मधे जिंकला, यावेळी जिंकणार का ! त्यात पुन्हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप.

बेट्याने नेहमीप्रमाणे शतके ठोकली.

पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर मात करीत २०११ चा
वर्ल्डकप भारताने जिंकला.

सचिनला भारतरत्न द्यावे ही मागणी होउ लागली.

४ दिवस जातात तोच अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन सुरु केले.
ते दिल्लीमधे उपोषणाला बसले.

एप्रिल नंतर ऑगस्टमधे पुन्हा उपोषणाला बसले. पूर्वीहून अधिक प्रतिसाद मिळाला.

आंदोलन प्रचंड यशस्वी. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर यांनीही महत्वाची भूमिका बजावली.

उपोषणालाही एक ग्लॅमर मिळाले.

या सगळ्यामधे झालं काय ? लोक कालच्या हीरोला विसरले. सचिन मागे पडला.
इंग्लंड दौर्‍यानंतर तर अधिकच.

बरं कुणी ऐरागैरा नाही उपोषण करत.

सोनिया राहूल नाही करीत उपोषण, जमले तर इफ्तार पार्टीमधे काही बाही खातानाच दिसतात.
पवार - त्यांच्याबद्दल तर कल्पनाही नाही करवत.
त्यांना आपली फिगर मेंटेन करायचीय, करतील कशाला ते उपोषण.

पण नरेंद्र मोदींनी उपोषण केले तेव्हा मात्र आम्हाला प्रश्न पडला
त्यांनी असं का करावं, हीच वेळ का निवडावी,
उपोषणाचच हत्यार त्यांनी का उपसावं.

त्यांच्याबद्दल अलिकडे काही बातम्या छापून येत आहेत, ज्या त्यांच्यासाठी सुखद आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे, मोदी कुठलीही गोष्ट उगाचच करणार नाहीत
सकारण करतील.नियोजन करून करतील.

मागे विजय तेंडूलकर गेले तेव्हा विजय तेंडूलकर यांना त्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली होती.
चार चांगले शब्द त्यांच्याबद्दल काढले होते. अनेकांच्या भुवया उंचावल्या.

जाणकार म्हणाले 'ये भी उनकी एक सोची समझी चाल हैं'

असो

त्यांनी आत्ताच हे उपोषण का करावं

--

औषधोपचारमांडणीसंस्कृतीनाट्यबालकथाप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

शाहिर's picture

18 Sep 2011 - 12:14 am | शाहिर

कदाचित पोट बिघडला असेल ओ ..

माझीही शॅम्पेन's picture

18 Sep 2011 - 12:24 am | माझीही शॅम्पेन

नरेंद्र मोदीं कोण ???

विचारले आहे ते सांगा ..
ही जनरल नॉलेज वाढवायची जागा नाही ..
गूगल करुन बघा

अनिल आन्ना रेल्वे वाले धुले कर's picture

18 Sep 2011 - 6:38 pm | अनिल आन्ना रेल्...

narendr

चिरोटा's picture

18 Sep 2011 - 12:43 am | चिरोटा

काय प्रॉब्लेम आहे राव. करता आहेत तर करु द्या की उपोषण! उपोषण त्यांनी १५ दिवसांनी केले असते तरीही हीच वेळ का निवडली असेही जाणकार विचारणार.
अवांतर- हल्लीच तो सुप्रिम कोर्टाचा निकाल लागला त्यात मोदी सुटले(पूर्ण सुटले नाहीत असे काँ.वाले म्हणत असले तरी जवळपास सुटलेच). निकालाने 'व्यथित' होवून काँ.वाले/एन्.जी.ओ.वाले उपोषणास बसायचा चान्स होता. आता मोदींनीच उपोषण केल्याने काँ/एन्.जी.ओ.वाल्यानी तिकडे ५० उपोषणे केली तरी काही फायदा नाही.

lakhu risbud's picture

18 Sep 2011 - 1:18 am | lakhu risbud

या बेगडी उपोषणाच्या नीशेदार्त अमी बी उद्यापासून ३ तासाचं आमरण उपोषण करण्याचं मनावर घेतलं हाय तवा समस्त मिपाकरान्नी प्रचंड संकेने हुपस्तीत रावे हि इनंती.ठिकान सगळ्यंना मेल न फाटवलं जाणार हाये

चेतन सुभाष गुगळे's picture

18 Sep 2011 - 1:21 am | चेतन सुभाष गुगळे

<< त्यांनी आत्ताच हे उपोषण का करावं >>

त्यांचा वाढदिवस आहे. ६१ वर्षांचे होताहेत.

शिल्पा ब's picture

18 Sep 2011 - 1:35 pm | शिल्पा ब

तुम्हाला बरी ओ सार्‍या दुनीयेची माहीती!!!

काकू त्याच ईश्टाइल मधे किती काळ लिवणार

चेतन सुभाष गुगळे's picture

18 Sep 2011 - 9:09 pm | चेतन सुभाष गुगळे

आशु जोग,

मला जे सांगायचे होते, ते आपण समर्पक आणि अधिक प्रभावी वाक्यांत त्यांना समजाविल्याबद्दल आपले आभार.

आशु जोग's picture

18 Sep 2011 - 9:47 pm | आशु जोग

आपल्याला जे माहीत नाही ती माहिती एखाद्याने पुरवली तर
कौतुक करावं हे सोडून चेष्टा करावी ही या काकूंची ष्टाइइल
--

बरं ष्टाइइल नेहमीचीच - लाजत मुरकत, नाव घेतल्यासारखी
--

खेडूत's picture

18 Sep 2011 - 1:50 am | खेडूत

थोडी गडबड होतेय..
ते उपोषण नाही, उपवास करत आहेत.
उपोषण हे मागण्यांसाठी/निषेध वगैरे म्हणून करतात.
उपवास /उपास आत्मशुद्धी साठी (!) करावा म्हणतात. वाढदिवसा व्यतिरिक्त इतर वेळी केला तरी चालतो.

खेडूत.

आशु जोग's picture

18 Sep 2011 - 8:16 am | आशु जोग

खेडूत व चेतन यांचे म्हणणे पटले

पिंगू's picture

18 Sep 2011 - 10:47 am | पिंगू

उपवास असो वा उपोशण.. वेळ मात्र अगदी मुहूर्त साधून आहे. त्यामुळे मोदींना जास्तीचा फायदाच होईल.

- (स्वतःच्या फायद्यासाठी ६ दिवस उपवास करणारा) पिंगू

उपास वगैरे ठीक आहे,
आमच्या फार्माच्या exhibition चा पार विचका केला मोदीसाहेबानी,
ऐन वेळेला जागा बदलायला लावली गुजरात युनीवर्सीटीतुन पार लांब गांधीनगर मध्ये शिफ्ट करायला लावल.

आशु जोग's picture

18 Sep 2011 - 7:35 pm | आशु जोग

इतक्यात हाती आलेल्या बातमीनुसार

अमिरखानही नरेंद्र मोदींच्या शेजारी बसायला निघत आहेत.

नगरीनिरंजन's picture

18 Sep 2011 - 8:04 pm | नगरीनिरंजन

या आमीरखानला अभिनय वगळता बाकी सगळे धंदे करता येतात.

समीरसूर's picture

19 Sep 2011 - 3:13 pm | समीरसूर

मोदींच्या उपवासात ठळक गोष्टी समोर आल्या:

भाजपतर्फे ते पंतप्रधानपदाचे मुख्य दावेदार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.

लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, इत्यादी भाजप प्रभृती मूकपणे सगळा तमाशा बघत होते. त्यांना मोदींचे इरादे स्पष्ट दिसत होते. खूपच असहाय आणि केविलवाणे झाले होते ते.

'अल्ला हू अकबर' चा घोष निव्वळ हिंदूत्वाच्या तत्वावर राजकारण करणार नसल्याचा निर्वाळा होता.

लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेला ठोस उत्तर म्हणून हा उपवासाचा खटाटोप करण्यात आल्याचे वाटत होते. अडवाणींना यशस्वी शह दिल्याचे आज तरी दिसत आहे.

मोदींच्या बोलण्यातला आवेश आणि आक्रमकता भाजपच्या नेत्यांना एक सज्जड इशारा होता. माझ्या मार्गात याल तर याद राखा असा खणखणीत इशारा देण्यासाठीच हा प्रकार घडवून आणण्यात आला.

राष्ट्रीय स्तरावर सगळ्याच नेत्यांच्या उरात धडकी भरवणारा हा प्रकार होता. स्वत:च्या धोरणांची आणि गुजरातमधल्या प्रगतीची एक ओळख निर्माण करून त्याचे ब्रँण्डींग करण्यात मोदी यशस्वी झाले. एक उत्कृष्ट मार्केटिंगचा नमुना म्हणून 'सद्भावना मिशन' या उपवासाच्या कार्यक्रमाकडे बघता येईल.

गुजरात खूप जबरदस्त झाले आहे असे मी बर्‍याच जणांकडून ऐकले आहे. गुजरातमध्ये सगळ्या गावांत २४ तास वीज उपलब्ध असते. लोड शेडींग हा शब्द तिथे आता कुणालाच माहित नाही असे ऐकले आहे. सापुतारापर्यंत गुजरातेत प्रकाश आहे आणि २० किलोमीटरवरील महाराष्ट्रात लोड शेडिंगचा अंधार. अहमदाबादेत बीआरटी इतकी यशस्वी होते आणि पुण्यातली बीआरटी नेत्यांच्या खिशातून त्यांच्या तिजोर्‍यांमध्ये जाते. पुण्यात बीआरटी आहे म्हणणे हे खूपच हास्यास्पद विधान आहे. महाराष्ट्रातले नेते काही शिकतील तर शपथ! इतका खमका आणि बेडर नेता दुर्दैवाने महाराष्ट्राला कधीच मिळाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राची अशी दयनीय अवस्था झालेली आहे. शरद पवार, देशमुख, इत्यादी नेत्यांनी मोदींकडून थोडेफार शिकले तर बरे होईल असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. मुत्सद्दीपणाच्या बाबतीत आणि अंग मोडून काम करण्याच्या बाबतीत मोदी शरदरावांच्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. गुजरातला एक समृद्ध आणि सबल राज्य बनवण्याची त्यांची कामगिरी दुर्दैवाने पवारांना महाराष्ट्रात कधीच करून दाखवता आली नाही. पाठीत सुरा खुपसण्याच्या किळसवाण्या राजकारणाखेरीज त्यांच्यासारख्या इतक्या प्रभावशाली, हुशार, आणि मुत्सद्दी नेत्याने काहीच केले नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव!

आता त्या बिचार्‍या पवारांनी तरी काय काय करायचं? दोन्ही हातांनी पैसा ओरबाडून खाताना त्या बिचार्‍यांची आधीच दमछाक झालीय, त्यात या असल्या अपेक्षा! काय करावं बिचार्‍यानं?

बाकी, सर्वधर्मसमभावाचं हे नाटक म्हणजे "उत्कृष्ट मार्केटिंगचा नमुना" हे म्हणणे जरा जास्त्तच होतंय बरं का! मोदी आणि सर्वधर्मसमभाव हाच एक मोठ्ठा विनोद आहे! मोदींच्या ढोंगाचा काही राष्ट्रीय वगैरे परिणाम होइल का ते काळच ठरवेल, पण अट्टल हिंदुत्त्ववादी नेत्याला राष्ट्रीय प्रवाहात बाजी मारण्यासाठी "अल्ला हू अकबर" चा नारा देऊन "सर्वधर्मसमभाव" जागवावा लागतो, यातच सगळं आलं नाही का?!:D

( का कुणास ठावूक, पण मला असं वाटतं भारतात काँग्रेस हा एकच पक्ष आहे आणि बाकी इतर पक्ष त्याचीच वेगवेगळी रुपे आहेत की काय? कारण बघाना, प्रत्येक पक्ष मोठा होताना काँग्रेसचीच वाट कळत-नकळत चोखाळतो, किंवा त्याचे काँग्रेसीकरण या ना त्या स्वरुपात होतेच. उदा. गेल्या काही वर्षापासून पूर्णतः गैरकाँग्रेसी असलेल्या भाजपला झालेली गटबाजी, दगाबाजी, पक्षांतर्गत लाथाळ्या असल्या टिपिकल काँग्रेसी रोगाची लागण! जनता दल वगैरे तर काँग्रेसुत्पन्नच आहेत म्हणून त्यांचे काही विशेष नाही, पण भाजप, शिवसेना इ पक्षांची काँग्रेसी स्टाईलमधली घसरण वैशिष्ट्यपूर्ण तशीच चिंताजनकसुद्धा वाटते.)

नितिन थत्ते's picture

20 Sep 2011 - 10:49 am | नितिन थत्ते

>>का कुणास ठावूक, पण मला असं वाटतं भारतात काँग्रेस हा एकच पक्ष आहे आणि बाकी इतर पक्ष त्याचीच वेगवेगळी रुपे आहेत की काय? कारण बघाना, प्रत्येक पक्ष मोठा होताना काँग्रेसचीच वाट कळत-नकळत चोखाळतो, किंवा त्याचे काँग्रेसीकरण या ना त्या स्वरुपात होतेच. उदा. गेल्या काही वर्षापासून पूर्णतः गैरकाँग्रेसी असलेल्या भाजपला झालेली गटबाजी, दगाबाजी, पक्षांतर्गत लाथाळ्या असल्या टिपिकल काँग्रेसी रोगाची लागण! जनता दल वगैरे तर काँग्रेसुत्पन्नच आहेत म्हणून त्यांचे काही विशेष नाही, पण भाजप, शिवसेना इ पक्षांची काँग्रेसी स्टाईलमधली घसरण वैशिष्ट्यपूर्ण तशीच चिंताजनकसुद्धा वाटते.

या विषयावर वेगळा लेखच लिहावा अशी बाळकराम यांना विनंती.

अगदी बरोबर आहे

म्हणजे अभिनेते फक्त सिनेमात नसतात

सुहास झेले's picture

19 Sep 2011 - 11:19 pm | सुहास झेले

राजकीय स्टंटबाजीचा ठेका काय फक्त कॉंग्रेसने उचलला आहे काय??
शेवटी प्रत्येकाचा स्वार्थ, परमार्थ आणि राजकारण... बाकी चालू द्या :) :)