राम राम मंडळी,
आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! :)
अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे. लवकरच ते नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण संस्थेत पोलिस उपनिरिक्षकाच्या पदाकरता प्रशिक्षण घेण्याकरता दाखल होतील!
मी संपूर्ण मिसळपाव परिवाराच्यावतीने नीलकांतचे हार्दिक अभिनंदन करतो व त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो!
एक अतिशय प्रामाणिक, सच्चा व कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमवावे हीच विठोबाच्या चरणी प्रार्थना!
तात्या.
प्रतिक्रिया
5 Jul 2008 - 6:51 pm | मैत्र
नीलकांत चं अभिनंदन... तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं...
पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
5 Jul 2008 - 6:51 pm | आजानुकर्ण
प्रिय नीलकांत,
तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा
आपला
(शुभचिंतक) आजानुकर्ण
6 Jul 2008 - 6:59 am | केशवसुमार
निलकांतशेठ,
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा
आपला
(शुभचिंतक) केशवसुमार
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर B) कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... :O :W
6 Jul 2008 - 8:08 am | विसोबा खेचर
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ...
हे स्वगत बाकी लै भारी! :)
6 Jul 2008 - 9:25 am | प्रभाकर पेठकर
आवडणारच तुम्हाला.
5 Jul 2008 - 7:07 pm | संजीव नाईक
सो. नीलकांत
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा! नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही.
संजीव
5 Jul 2008 - 11:25 pm | विसोबा खेचर
आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा
नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही.
संजीव, कुणाला खेचर म्हणतो आहेस? नीलकांताला? काय म्हणून अन् कुठल्या अधिकाराने??
ही काय फालतूगिरी आहे? माझी खैर आहे की नाही याची फिकीर तू का करतोस?
आणि काय रे? स्वत:ला काय खूप शहाणा समजतोस? माझा उल्लेख केल्याशिवाय एकही प्रतिसाद तुला लिहिता येत नाही?? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिसदात माझी काहीतरी भंकस केल्याशिवाय चैन पडत नाही तुला??
तात्या.
5 Jul 2008 - 7:12 pm | एकलव्य
वा! वा!! वा!!!
नीलकांतरावांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!
5 Jul 2008 - 7:20 pm | रामदास
सायबर सेल चे पोस्टींग मिळणार का?
अभिनंदन.जयहिंद.
5 Jul 2008 - 7:27 pm | यशोधरा
अभिनंदन नीलकांत!
7 Jul 2008 - 1:06 am | प्राजु
निलकांत,
अरे आजच आले की रे इकडे अमेरिकेला... नाहीतर एक जोरदार पार्टी घेतली असती तुझ्याकडून. असो.... पुढच्यावेळी आले ना की नक्की करू मस्त पार्टी.
जोरदार अभिनंदन तुझं... आणि हो.. माझी ही तेवढी ओळख ठेव बरं का! ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jul 2008 - 7:30 pm | अभिज्ञ
नीलकांतजी,
मनःपुर्वक अभिनंदन.
आपल्यासारख्या तज्ञ लोकांची खरोखरच तिथे गरज आहे.
आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अभिज्ञ.
5 Jul 2008 - 7:37 pm | हेरंब
अभिनंदन, तात्यांनी सुचवलेल्या सचोटीच्या मार्गावरुन चालाल ही शुभेच्छा!!
5 Jul 2008 - 7:51 pm | विकास
नमस्कार नीलकांत,
मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा!
तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!
5 Jul 2008 - 7:55 pm | सखाराम_गटणे™
आमच्या ही शुभेच्छा.
शिर्षक वाचुन थोडीशी भिती वाट्ली होती, पण शेवटी चांगली बातमी मिळाली.
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
5 Jul 2008 - 8:06 pm | मदनबाण
निलकांतराव मनःपुर्वक अभिनंदन.....
मदनबाण.....
5 Jul 2008 - 8:23 pm | सहज
प्रिय नीलकांत
अभिनंदन व शुभेच्छा!!.
5 Jul 2008 - 8:24 pm | देवदत्त
नीलकांतचे हार्दिक अभिनंदन :)
5 Jul 2008 - 8:24 pm | ऋषिकेश
वा! बातमी वाचून बरं वाटलं.
नीलकांतराव,
पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
तात्या,
छान बातमी दिलीत. आभार!
-('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश
5 Jul 2008 - 8:34 pm | झकासराव
नीलकांत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!
चला म्हणजे विश्वास नांगरे पाटिल यांच्या मागोमाग तुमचही नाव गाजेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
5 Jul 2008 - 8:36 pm | पिवळा डांबिस
रामराम नील्कांतराव!
आनी आम्च्याकडून पन "कांग्रेस्-लोशन"!!
गरिबाची वळख ठेवा हां सायेब!
येकदम "तडीपारी" लावू नगा आमाला!!!:)
बा़की एक कॉम्प्युटरतज्ञ पोलिसात जाणार ही पोलीसखात्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे!!
आमच्या शुभेच्छा!!
-डांबिसकाका
5 Jul 2008 - 9:07 pm | विद्याधर३१
अभिनंदन नीलकांत.
अपेक्षा खूप आहेत..
पुनश्च एकवार अभिननदन.
विद्याधर
5 Jul 2008 - 9:09 pm | अविनाश ओगले
नीलकांतजी, खूप मनापासून अभिनंदन...
खाकी आणि खादी ही दोन बदनाम खाती.
तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मंडळींमुळे त्यांची प्रतिमा उजळो या शुभेच्छा.
5 Jul 2008 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मा. पोलिस उपनिरिक्षक साहेब,
नीलकांतजी.........आपले मनपुर्वक अभिनंदन !!!
यशाची बातमी कळवल्याबद्दल तात्यासाहेबांचे आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
5 Jul 2008 - 10:30 pm | चंबा मुतनाळ
अभिनंदन नीलकांत साहेब, आठवण राहुद्या!!
चंबा
5 Jul 2008 - 11:17 pm | डॉ.प्रसाद दाढे
अभिन॑दन नीलका॑त! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
(एकेकाळी पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिलेला) प्रसाद
5 Jul 2008 - 11:22 pm | भाग्यश्री
शिर्षक पाहून आत काय असेल याचा अंदाज येईना.. पण फारच छान बातमी कळली!!
अभिनंदन नीलकांत!! तात्यांची प्रार्थना तुम्ही जरूर मनापासून पूरी कराल याची खात्री.. :)
http://bhagyashreee.blogspot.com/
5 Jul 2008 - 11:26 pm | ईश्वरी
अभिन॑दन नीलका॑तजी ! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
ईश्वरी
5 Jul 2008 - 11:48 pm | प्रभाकर पेठकर
रामराम साहेब. ओळख ठेवा गरीबाची..
5 Jul 2008 - 11:48 pm | कोलबेर
निलकांतरावांसारखे प्रगल्भ विचारसरणीचे लोक शासकीय सेवेत जात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. पोलिस खात्यात अधिकाधीक असे लोक येवोत.
अभिनंदन !!
6 Jul 2008 - 2:46 am | चित्रा
अगदी असेच मनात आले.
अभिनंदन, नीलकांत!
6 Jul 2008 - 2:30 pm | छोटा डॉन
असेच म्हणतो ...
खुप चांगली गोष्ट आहे की असे हुशार लोक शासकीय सेवेत जात आहेत.
जनतेला नक्की फायदा होईल ....
*** निलकांतचे हार्दीक अभिनंदन ***
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
5 Jul 2008 - 11:52 pm | सैरंध्री
अभिनंदन नीलकांत! आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सैरंध्री
6 Jul 2008 - 12:08 am | चतुरंग
'मिपा'सारखी साईट तयार करणार्या संगणकतज्ञाकडून पोलीसखात्याला नवीन 'फोरसाइट' मिळेल अशी आशा आहे!:)
पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!!
चतुरंग
6 Jul 2008 - 12:17 am | विकि
सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा !
आपला
कॉ.विकि
6 Jul 2008 - 12:23 am | मुक्तसुनीत
नीलकांत यांचे अभिनंदन ! अतिशय आनंदाची बातमी. केव्हा तरी मिपावर येऊन जरूर लिहा !
6 Jul 2008 - 12:53 am | अभिता
आमच्यातील एक झाल्याबद्द्ल अभिनंदन.
6 Jul 2008 - 1:29 am | नंदन
नीलकांतचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Jul 2008 - 1:34 am | धनंजय
एक विचारी आणि कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलिसांना लाभतो आहे.
6 Jul 2008 - 3:02 am | भडकमकर मास्तर
ओहो... खूप छान खबर..
फार आनंद झाला...
अभिनंदन नीलकांत ...
आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
6 Jul 2008 - 7:27 am | पक्या
अभिनंदन नीलकांत ...आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
6 Jul 2008 - 7:31 am | स्वप्निल..
नीलकांत साहेब,
तुमच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!
स्वप्निल..
6 Jul 2008 - 9:24 am | मनिष
यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !! :)
तुझ्यातील विचारी, समंजस आणि सहिष्णू माणसाला पोलिसात जप.
- मनिष
6 Jul 2008 - 10:42 am | नीलकांत
धन्यवाद...मानापासून धन्यवाद. :)
(आणि बोलू तरी काय?)
नीलकांत
6 Jul 2008 - 11:11 am | प्रगती
आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा!
लहानपणापासून माझं पण पी. एस. आय. व्हायचं स्वप्न होतं पण मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच पेपरफुटीचा गोंधळ होउन तीन ते
चार वर्ष हे प्रकरण रखडलं होतं म्हणून नाइलाजाने मी हा नाद सोडून दिला. :( असो
मात्र आमची पण ओळख ठेवा. ;;)
6 Jul 2008 - 11:48 am | II राजे II (not verified)
निलकांतशेठ,
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!!
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
6 Jul 2008 - 12:55 pm | अन्या दातार
नीलकांतरावांचे शतशः अभिनंदन :)
6 Jul 2008 - 1:49 pm | बेसनलाडू
खूप खूप शुभेच्छा!
(शुभेच्छुक)बेसनलाडू
6 Jul 2008 - 4:14 pm | नरेंद्र गोळे
नीलकांत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला.
हार्दिक अभिनंदन.
नीलकांतांसारख्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आद्य क्रियायोगी गाडगे महाराज यांच्या शिकवणूकीवर दृढ विश्वास असणार्या उद्यमी, महाजाल विद्वानास महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणे हा मी समस्त प्रामाणिक मराठी नागरिकांचा सन्मान समजतो. नीलकांतजी, आपली संस्कृती आणि परंपरांचा ध्वज तुम्ही कायम फडकता ठेवाल ह्यात मुळीच संशय नाही. मात्र त्यादरम्यान तुम्हाला कधीही आवश्यकता भासली तर आम्ही सारेच पाठीशी आहोत असा विश्वास बाळगा. आमच्याही अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याची उमेद बाळगा. उद्याचा महाराष्ट्र सशक्त घडवा. तुम्हाला पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!
6 Jul 2008 - 7:36 pm | संदीप चित्रे
नीलकांत .. हार्दिक अभिनंदन !
' सद रक्षणाय....' ह्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे तुमच्या प्रामाणिक वाटचालीस अनेक शुभेच्छा !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
7 Jul 2008 - 12:22 am | केशवराव
निलकांत,
तुझे हार्दिक अभिनंदन!!!!
7 Jul 2008 - 3:54 am | शितल
नीलका॑तचे अभिन्॑दन.
आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा !
7 Jul 2008 - 7:41 am | मेघना भुस्कुटे
नीलकांतचे मनःपूर्वक अभिनंदन!
7 Jul 2008 - 10:13 am | सागररसिक
अनेक शुभेच्या
7 Jul 2008 - 10:26 am | अमोल केळकर
प्रशिक्षण झाल्यानंतर कुठे पोस्टिंग होते आहे ते कळवा !! ;)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Jul 2008 - 10:32 am | विसुनाना
वा!वा! काय सुरेख बातमी आहे.
नीलकांता, अभिनंदन!
7 Jul 2008 - 10:38 am | रिमझिम
नीलकांतचे मनःपूर्वक अभिनंदन! !
आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !! :)
7 Jul 2008 - 10:41 am | मनस्वी
नीलकांत, एम्. पी. एस्. सी. उत्तीर्ण झाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शुभेच्छा.
:)
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
7 Jul 2008 - 10:59 am | चाणक्य
अभिनंदन नीलकांतजी, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
7 Jul 2008 - 3:10 pm | सागर
नीलकांत,
तुमचे मनापासून अभिनंदन ...
आमची वळख ठेवा राव.... पुढेमागे कशी भेट होईल काय सांगता येत नाय...
(कर्तव्यदक्ष पोलिसांचा चाहता...) सागर
7 Jul 2008 - 6:27 pm | वरदा
मस्तच बातमी
नीलकांत,
मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा!
तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!
हेच म्हणते...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
8 Jul 2008 - 12:16 am | सर्वसाक्षी
सुयशाबद्दल नीलकांतचे आणि असे व्यक्तिमत्व 'खात्याला' लाभल्याबद्दल पोलिसखात्याचेही अभिनंदन. देव करो आणि सरकारला अशा पात्र उमेदवारास संगणकिय गुन्हेगारी हे कार्यक्षेत्र देण्याची सुबुद्धि मिळो.
9 Jul 2008 - 11:11 am | फटू
एक संगणक तज्ञ पोलिस खात्यात रुजू होणार... पुन्हा एकदा अभिनंदन...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
9 Jul 2008 - 3:58 pm | प्रशांतकवळे
अभिनंदन निलकांत..
9 Jul 2008 - 4:56 pm | महेश हतोळकर
नीलकांत! तुझ्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.
10 Jul 2008 - 3:58 pm | लिखाळ
नीलकांत,
फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन !
पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा !
--लिखाळ.
10 Jul 2008 - 4:09 pm | चावटमेला
फौजदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन
पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा !
http://chilmibaba.blogspot.com
10 Jul 2008 - 4:16 pm | अवलिया
नीलकांत,
फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन !
पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा !
नाना
11 Jul 2008 - 4:13 pm | चित्तरंजन भट
प्रिय नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस (डीवायएसपी, आयएएस वगैरे) हार्दिक शुभेच्छा! नाशिकला गेल्यावर तिथल्या संस्थेचेही चांगलेसे संकेतस्थळ बनवून टाक.
11 Jul 2008 - 7:00 pm | कलंत्री
तात्याचे शीर्षक वाचून घाबरत घाबरतच लेख उघडला, पण धक्का बसलाच पण गोड धक्का होता इतकेच.
नीलकांत आता आपली जबाबदारी वाढली हेही खरे.
मराठी मध्ये बर्याच ठिकाणी पाट्या नसतात हे आपल्या अखत्यारीत येत असेल तर बारीक लक्ष ठेवा.
बाकी शीर्षक असे हवे होते,"पोलिसखाते मिसलपावाच्या हातात."
परत एकदा नीलकांत आपले अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.
6 Jan 2011 - 9:14 pm | सुहास..
कुठे पोस्टिंग सध्या ?
6 Jan 2011 - 9:49 pm | ५० फक्त
निलकांत, अतिशय अभिनंदन,
पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
माझे भावजी नाशिकच्याच पोलिस ट्रेनिंग अॅकॅडमीचे पास आउट आहेत. काही मदत लागली तर त्यांना विचारेन.
हर्षद.
6 Jan 2011 - 11:01 pm | शिल्पा ब
हार्दीक आभिनंदन!!
7 Jan 2011 - 8:14 am | इन्द्र्राज पवार
ग्रेट !! मूळ धागा तब्बल दोन वर्षापूर्वीचा असल्याने व मी २०१० च्या मध्यास इथला सदस्य झालो असल्याने [त्यातही श्री.नीलकांत यांच्याकडे ज्या आठवड्यात श्री.तात्यांनी मिपाची सूत्रे दिल्याचे जाहीर केले, त्याच आठवड्यात...] नीलच्या प्रत्यक्षातील करीअरविषयी काहीच माहिती नव्हते. पुढे त्यांच्यासमवेत ज्या ज्या वेळी इथे खरडीतून वा अन्यत्र प्रतिसादातून विचाराची देवाणघेवाण झाली त्यावेळीही माझी समजूत अशी झाली की ते आय.टी. क्षेत्राशी निगडीत आहेत. पण आज अचानक या धाग्याचे पुनर्रज्जीवन झाल्याने श्री.नीलकांत हे पोलिस दलात आपले कर्तृत्व दाखवित आहे. आनंद झाला.
या क्षेत्रात तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
इन्द्रा
9 Feb 2011 - 6:41 pm | jaydip.kulkarni
नीलकांत तुझे हार्दिक अभिनंदन .................
9 Feb 2011 - 6:48 pm | पर्नल नेने मराठे
+१
9 Feb 2011 - 6:51 pm | पिंगू
निळुशेठ हार्दिक अभिनंदन..
- शुभेच्छुक पिंगू
9 Feb 2011 - 7:28 pm | गणेशा
आपले मनपुर्वक अभिनंदन
9 Feb 2011 - 7:30 pm | अप्पा जोगळेकर
अभिनंदन. इनामदार साहेब, नांगरे पाटील साहेब यांच्यासारखेच कर्तॄत्व तुम्ही गाजवाल अशी आशा बाळगतो.