प्रवास वर्णन-ईशान्य भारत

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
9 Aug 2011 - 4:51 pm

इशान्य भारतात जाण्यासाठी निघणे हा माझ्यासाठी नेहमीच एक प्रफुल्लीत करणारा अनुभव असतो. दरवर्षी हा अनुभव मी सातत्याने घेत आलो आहे. आणि दरवेळी मी नव्या उत्साहाने प्रवासाला निघतो तसाच. २३मे ला मुंबईहुन सकाळच्या ७.५० च्या एअरटेल च्या विमानात माझे आऱक्शण असल्याने पुण्याहुन २२ला मी संध्याकाळी नीता ट्रवेल ने निघालो. मुंबईला नितीन घोडके मला घ्यावयास आले. ते देखील आसाम मध्ये काही वर्षे असल्याने इशान्य भारत या विषयावर आमच्या रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा रंगल्या. सकाळी लवकर उठुन व स्नानादि कार्यक्रम आटोपुन नितीन ने मला कार ने एअरपोर्ट वर सोडले. दरवेळी विमान प्रवासात खिडकितुन दिसणारे नभांचे खेळ साठवुन ठेवण्याचा मानस असुनही विमान प्रवासात मोबाईल बंद करावा लागत असल्याने यावेळि मी निकॊन चा कैमेरा मुद्दाम विकत घेतला होता. दोन तास आकाशात असल्याने मला नविन कैमेरा ने फोटो काढण्यास निवांत वेळ मिळाला व मी त्याचा भरपुर व मनसोक्त उपयोग करुन घेतला.

कलकोता विमानतळावर उतरतांना

पुनःश्च उड्डाण अगरताला साठी

अगरताळा विमानतळावर उतरतांना

गोहाटी विमानतळावर उतरतांना दिसणारे विशाल ब्रम्हपुत्रेचे पात्र

गोहाटी हे शहर म्हणजे इशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे. तसेच या भागातील सर्वात मोठे शहर. दिसपुर हे आसामच्या राजधानीचे शहर हे देखील गोहाटीच्या मध्यभागी आहे. युनायटेड किंगडम(U.K.) माध्यमाच्या सर्वे नुसार गोहाटी हे जगातील जलद वाढीसाठी प्रसिधद असणार्‍या १०० शहरामध्ये एक तर भारतातील जलद वाढत असलेल्या ५ शहरातील एक म्हणुन प्रसिध्द आहे. पुर्व-पश्चीम ४५ कि.मी तर उत्तर दक्षीण १४ कि.मी अशा परिसरात हे शहर पसरलेले आहे. ब्रम्हपुत्रेच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेले हे शहर या नदामुळे समुद्र किनार्‍यावर वर वसलेल्या शहराचा आभास निर्माण करते. दमट हवामानामुळे येथे कायम गर्मी भासत असते. ब्रम्हपुत्रेचे पात्र काही ठिकाणी ६ ते ८ कि.मी तर सराइघाट येथील पुलाजवळ कमितकमी म्हणजे १-२ कि.मि. इतके आहे. नदित अनेक लहान मोठी बेटे असली तरी उमानंदा हे बेट गोहाटी शहरामध्ये असुन फारच निसर्ग रम्य असे आहे.

अपुर्ण

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

9 Aug 2011 - 5:36 pm | किसन शिंदे

पहिल्या(अ‍ॅक्चूअली सगळ्याच) फोटोतले द्रुश्य आणी त्यावरची वेळ यामध्ये विसंगती वाटतेय.

प्रास's picture

9 Aug 2011 - 5:51 pm | प्रास

२३मे ला मुंबईहुन सकाळच्या ७.५० च्या एअरटेल च्या विमानात माझे आऱक्शण असल्याने

एअरटेलचं विमान? :-o

काय प्रॉब्लेम काये?

माझा अंदाज -

कदाचित मुंबई - कोलकाता - आगरताळा असा विमान प्रवास असावा आणि त्यापैकी दुसरा टप्पा दुपारच्या वेळेला स्पाईसजेट मधून घडला असावासा वाटतोय.

कल्याणकर काका, ते जरा पुन्हा एकदा नीट अवलोकन करून स्वसंपादनाचं तेव्हढं बघा बुवा.....

पंगा's picture

9 Aug 2011 - 9:33 pm | पंगा

क्यामेर्‍याचे घड्याळ सेट करताना एएमपीएमचा घोळ तरी झाला असावा, किंवा २४ तासांच्या फॉर्म्याटात मध्याह्नीनंतर घड्याळ सेट करताना १२ मिळवावे लागतात याचे विस्मरण झाले असावे. त्यानंतर २४ तासांच्या फॉर्मॅटात वेळ छापताना व्हायचा तो परिणाम झाला असावा.

(असा आपला माझा अंदाज.)

नितिन थत्ते's picture

10 Aug 2011 - 8:23 am | नितिन थत्ते

विमान उतरताना इलेक्ट्रॉनिक उपकरण चालू ?

विश्वास कल्याणकर's picture

11 Aug 2011 - 11:17 am | विश्वास कल्याणकर

कैमेरा चे टायमीग दुकानदाराने सेट केले तेच होते ते पहाण्याच्या भानगडीत पडलो नाही त्यामुळे ही घोड चुक माझ्या सर्वच ६०० फोटोमध्ये झाली इलाज नाही. प्लाईट मध्ये मोबाइल व लैपटोप(इंटरनेट) बंद करण्यास सांगतात कारण त्यांचा परिणाम विमानाच्या कंट्रोलवर होतो. कैमेरा बद्दल तसे काही नसते. त्यामुळे याआधी मोबाइल कैमेरा असुनही बंद असल्याने फोटो काढु शकलो नाही.